माझ्यासाठी

माझ्यासाठी एक मन लिही - चांदण्याचा वर्ख माखलेले
आभाळाच्या कुशीत पहुडलेले - अनाघ्रात, कोवळे

माझ्यासाठी एक गाणे लिही - पाचूच्या पोपटी शीतलशा
ज्वाळेने वेढलेले, पेटलेले - दुर्बोध आणि अगम्य

माझ्यासाठी एक क्षण लिही - अनेक अश्वांच्या दमदार
घोडदौडीने निनादलेला - शीतल हेमंतात

माझ्यासाठी एक चव लिही - टपोर्‍या जांभळाची
लुसलुशीत, लाललाल ओठांवर ओथंबलेली - तुरट तुरट

माझ्यासाठी एक स्पर्श लिही - ऊबदार, हात
हातात धरून दिलेला - आश्वासक, प्रेमळ

माझ्यासाठी एक नाद लिही - शारीरीक मीलनात
एकमेकांत विरघळताना - आवेगाचा, तन्मयतेचा

माझ्यासाठी एक रात्र लिही - वार्‍यावरच्या मंजूळ लकेरीची
चित्त्याच्या दबक्या पावलांची - स्तब्ध, सावध

माझ्यासाठी एक गंध लिही - स्वप्नातून जागृतावस्थेत येताना
आत्यंतिक आसक्तीचा इच्छेचा - तीव्र, मादक

हे सर्व लिहीशील का माझ्यासाठी?
मग मी सदैव तुझा शोध घेईन - स्फटीकांच्या पर्वतराशींत
________________________________________________

मूळ कविता - Bonnie parker यांची

Write me a heart...With the feel of stars....And a clasp of heaven.
Write me a singing ....With the caverned emerald....Of unfathomed fathoms.
Write me a moment....With a stallion flame....Galloping hills of October.
Write me a taste....Of wild apple honey....On a mouth uptilted.
Write me a touch....With a blossomed ardor....In the palm's caging.
Write me a sound....Of the body's lightning....And the bone-deep thunder.
Write me the night....With a cry of music....And the stride of panthers.
Write me a scent....Of the dream undreaming....And a white desire.
Write me of these....And I will forever seek you....High in the crystal mountains.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

समर्पक अनुवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

धन्यवाद पाभे. पण कोणी अधिक चांगला अनुवाद करून डकविला तर आवडेल. माझा ट ला ट झाला आहे. त्यात ती काव्यमयता आणि इन्टेन्सिटी नाही जी "stallion flame....Galloping hills" मध्ये आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ कवितेचा भावानुवाद चांगला झाला आहे. विशेषतः त्याच प्रतिमा न वापरता त्यांचं मराठीकरण करण्याचा प्रयत्न आवडला. 'वाइल्ड ऍपल हनी' ऐवजी 'टपोर्‍या जांभळाची लुसलुशीत' सारख्या प्रयोगांतून ते दिसून येतं. शब्दरचना देखील थोडी बदललेली आहे. या कवितेचा आत्मा असलेली मराठी कविता लिहिण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

खरं सांगायचं झालं तर मला मूळ कविता काहीशी शब्दबंबाळ वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राजेश. माझ्याकडे "Season of Golden dragon" हे या कवयित्रीचे स्वाक्षरी केलेले पुस्तक होते जे आता नाही कारण इकडून तिकडे जाण्याच्या नादात मी ते काढून टाकले. पण फारच सुरेख कविता होत्या. शब्द इतके डौलदार वापरते ती. मला अतिशय आवडतात तिचे शब्द. आताची ही कविता या ब्लॉगवरून घेतली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच.

मूळ इंग्रजी कविता आवडली नाही. जालावर ही कविता शोधली.
(बॉनी एलिझाबेथ पार्कर शोधता बॉनी अँड क्लाईडचे संदर्भ आधी येतात, ते वगळायचे.)
कवियित्रीच्या अन्य काही कविता आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर कविता. (आय मीन भाषांतर). लेखन आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर रुपांतर.. रुपांतर अधिक भावले.. मुळ कविता थोडी 'दवणीय' वाटली Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!