डिजिटल कॅमेरा व छायाचित्रण तंत्र

आज जागतिक छायाचित्रण दिवस आहे. ऐसी अक्षरे वर आपण पाक्षिक आव्हान-स्पर्धांद्वारे विविध उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेत असतोच. त्याच बरोबर उत्तम छायाचित्रांसाठी अनेक महत्त्वाच्या घटकांपैकी एक असतो छायाचित्रणासाठी वापरलेला कॅमेरा आणि दुसरे असते छायाचित्रणाचे तंत्र.

सदर धागा 'कॅमेरा' व 'छायाचित्रण तंत्र' या विषयावर चर्चा करण्यासाठी काढत आहोत. सदर धाग्यावर या विषयांशी संबंधित कोणत्याही विषयावर चर्चा सुरू करता येईल. इथे देता येणार्‍या प्रतिसादाबद्दल काही विषय उदाहरणादाखल देत आहे:
कॅमेरा: (विषय केवळ उदाहरणादाखल)
-- कॅमेरा कसा निवडावा, कोणते घटक लक्षात घ्यावेत वगैरेबद्दल माहिती/शंका
-- दोन कॅमेरा मॉडेल्समधील तुलना / शंका
-- कोणत्या प्रकारच्या छायाचित्रणासाठी प्रकारचे सेन्सर्स अधिक उपयुक्त किंवा त्यासंबंधीच्या शंका
-- लेन्सेसचे प्रकार व त्यांचे उपयोग व त्या विषयीच्या शंका
-- विविध फिल्टर्स, ट्रायपॉड्स उत्यादींची तुलना / शंका

छायाचित्रण तंत्रः (विषय केवळ उदाहरणादाखल)
-- कमी प्रकाशात किंवा अधिक प्रकाशात छायाचित्रणासाठी वापरायची तंत्रे
-- वेगात हालचालकरणार्‍या वस्तुंचे चित्रण
-- ठराविक छायाचित्रणासाठी ठराविक लेन्स वापराचे फायदे/तोटे
-- विविध प्रकारच्या पोस्ट-प्रोसेसिंगवर चर्चा, प्रश्न किंवा तांत्रिक चर्चा
-- एखादे चित्र काढण्याच्या तंत्रांबद्दल तुलनात्मक चर्चा

चर्चा रंगल्यास रुपांतर वेगळ्या चर्चेत करता येईलच! या निमित्ताने या विषयाशी संबंधित विविध शंका, सुचवण्या, माहिती याची एकत्रित माहिती एका धाग्यावर उपलब्ध होईल.

सर्व सदस्यांना विनंती आहे की या धाग्यावर संबंधित विषयाशी निगडित आपापली मते, मुद्दे, प्रश्न, माहिती देत राहून धागा जिवंत ठेवावा Smile

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पॉइंट अ‍ॅन्ड शुट कडून अधिक नियंत्रण असलेल्या छायाचित्रणासाठी डीएसएलार प्रत्येकाला घ्यावासा वाटतो मात्र त्यात मोठा अडसर असतो किंमत Smile आणि त्यातही प्रत्येक लेन्ससाठी वेगळी किंमत नंतर मोजत रहावी लागते ते वेगळे. शिवाय काही वर्षांनी त्या कॅमेराचा 'कंटाळा' किंवा खरंतर अधिक उच्च दर्जाच्या कॅमेराची ओढ लागली की पुनश्च हरी ओम्!

त्यावर आता एक पर्याय बाजारात दिसतो 'ब्रिज' पॉईंट अ‍ॅन्ड शुट कॅमेरांचा (एक उदा. घ्यायचे तर Canon Powershot SX500 IS). असे कॅमेरे डीएसएलार तुलनेने बर्‍यापैकी कमी किंमतीचे (जवळजवळ ५०% हून अधिक) असतात व जालावरील माहितीनुसार तरी बर्‍यापैकी फीचर्स डीएसएलार प्रमाणे असतात.

-- प्रत्यक्षात असे कॅमेरे कोणी वापरले आहेत काय?
-- असल्यास / इतरांचा अनुभव माहित असल्यास डीएसएलार घेण्याआधी (किंवा खरंतर एन्ट्री लेवल डीएसएलार पेक्षा) हा कॅमेरा घेणे कितपत संयुक्तिक वाटते?
-- बजेट हा मुद्दा आहेच पण त्याव्यतिरिक्त अश्या कॅमेरांमधील इतर त्रुटि कोणत्या? (बजेट असेल तर डीएसएलारच घ्या हे उत्तर नको Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या मनात आलेले प्रश्न -
१. कॅमेर्‍याची कोणकोणती स्पेसिफिकेशन्स असतात?
२. ती त्यांच्या महत्त्वाच्या क्रमाने कशी लावता येतात?
३. कॅमेर्‍यांचे किती प्रकार आहेत (घरगुती, व्यावसायिक, इ इ )?
४. मोठे किती ब्रँड आहेत?
५. डिजीटल सोडून बाकिचे कॅमेरे युग संपले का?
६. थोडक्यात डिजिटल कॅमेराची काम करण्याची शास्त्रीय पद्धत काय?
७. यांचा व्हीडिओ चांगला असतो का? अगोदरच्या कॅमकॉर्डरचे काय करावे?
८. ३ डी कॅमेरा काय प्रकार आहे?
९. चित्रे कोणत्या फॉर्मॅट मधे साठवावीत?
१०. कॅमेरात जीपीएस असेल तर अक्षांश रेखांश च्या जागी गाव कसे येईल?
११. सगळ्यात स्वस्त किमतीत तेच मॉडेल घ्यायचे असेल तर पायपीट कशी टाळावी? म्हणजे कोणती साईट पाहावी?
१२. चांगला अल्बम बनवायच्या टीपा काय? ८०००-१०००० रु घेऊन एक मोठा फोटो बनवून देतात. त्याच्याबद्दल काही टीपा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उद्देश्यबद्दल सांगता आलं पाहिजे, छायाचित्र नक्की का काढतो हे काढणार्‍याला सांगता आल्यास साधन सोपे होईल. आपल्याला जे सांगायचं आहे ते नेमकेपणाने सांगण्यासाठी काय काय करावं हे शिकण्यासाठी नक्की आपल्याला काय सांगायचं आहे हे कळलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0