एक लघुत्तम कथा: पुरावे

पोलिस स्टेशनवर पोहोचले, तेव्हा पाय लटपटत होते. काही खाकी वर्दीवाले पूर्ण दुर्लक्ष करत होते, तर काही अगदी रस घेऊन एकटक नखशिखान्त न्याहळत होते. मी एका टेबलासमोरच्या खुर्चीत जाऊन बसले

"कशावरून?" खुर्चीतला खाकी वर्दीवाला म्हणाला.

"माझ्याकडे पुरावे आहेत." मी धीर एकवटून पुटपुटले.

"कोणते पुरावे?" त्याने गुर्मीत विचारलं.

मी माझ्या शरीरात हात घातला आणि एक योनी काढून त्याच्या टेबलवर ठेवली. ती चिरफाळलेली होती. मग काही रक्ताचे ओघळ टेबलवर ठेवले आणि वीर्याचे काही थेंब. माझ्या नखांत काही त्वचेचे सूक्ष्म तुकडे अडकले होते आणि मुठीत काही केस उपटून आले होते, ते मी टेबलवर ठेवले आणि ओरखड्यांच्या काही जुड्या.
चुरगळलेले कागदी बोळ्यासारखे स्तन, चावून मांसाच्या धांदोट्या झालेले ओठ ठेवले. माझे दुखावलेले लांबलचक आतडे काढून ठेवले, तेव्हा तर टेबल पूर्ण भरून गेले. तरी थोडी जागा शोधून मी माझी जीभ अत्यंत काळजीपूर्वक टेबलवर ठेवली - तिच्यावर जबानीचे सगळे शब्द न लडखडता ठाम पाय रोवून उभे होते.

मी खाकीवर्दीवाल्याकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर एक बारीकशी आठी उगवली आणि विरली.
त्यानं डावा हात उचलून टेबलावरच्या मी ठेवलेल्या सगळ्या गोष्टी गोळा केल्या आणि खुर्चीजवळच्या कचराडब्यात टाकल्या.

मी पाहिलं की तो कचराडबा एखाद्या कृष्णविवरासारखा खोल होता. विज्ञानकथांमध्ये मी अशा विवरांविषयी वाचलं होतं की ते कसं त्याच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट क्षणार्धात गिळंकृत करतं आणि नंतर ती या जगात कुणालाही कधीही दिसत नाही. त्यात गेलेला प्रकाशदेखील पुन्हा बाहेर पडत नाही.

खुर्चीतला खाकीवर्दीवाला पांढऱ्या रुमालाला हात पुसत मला म्हणाला,"कुठे आहेत पुरावे?"

०००

(या धाग्यातून प्रतिसाद वेगळा काढला आहे.)

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

कथा आवडली.

खरंतर कृष्णविवर हा शब्द आणि ललित लेखन हे सुरुवातीला पटलं नव्हतं. पण पूर्ण वाचून आवडली. आणखी थोडा विचार केला तर कृष्णविवरात वस्तुमान ओढलं गेल्यानंतर घडणार्‍या क्रिया आणि या घटनेचे पडसाद यामधेही विचित्र साम्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कल्पक लघुतरकथा.

(लेखिकेकडून या कथानकाची सारभूत लघुतमकथासुद्धा प्रभावी ठरली असती अशी खात्री वाटते.)

लेखिकेच्या अनुमतीने "लघुत्तम"च्या ठिकाणी "लघुतम" हा सामान्य लेखी शब्द योजता येईल का? ही शक्यता नाकारता येत नाही : लेखिकेला "लघुतम" आणि "लघु-उत्तम" या दोन अर्थांचा श्लेष साधायचा आहे. परंतु असा श्लेष कथेच्या आशयाला पोषक नाही. म्हणून "लघुतम" असेच असावे, आणि "-उत्तम" हा टंकनदोष असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लघुतम हे योग्य आहे.. पण..

मग "एक" लघुतम कथा ही द्विरुक्ती होईल.

"तम" गोष्ट एकमेवच असली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच तर माझ्या मूळ अभिप्रायात "लघुतर कथा" आवडल्याबाबत म्हटले आहे! कथा छोटी आहे खरी, पण तीत मितभाषीपणा लक्षणीय नाही.

"उत्तम" हे एकमेवाद्वितीय वर्णन अलंकारिक रीत्या "खूप चांगले" अर्थाने खूपदा वापरतात. Smile तसेच येथेही मानायला हवे. शिवाय, माझ्या मते जरी कथा विशेष मितभाषी नसेल, तरी लेखिकेच्या दृष्टीने असेल ना! यातून एकही अक्षर कमी केले तर इजा होईल, असे लेखिकेचे मत असेल.

लेखिकेला खरोखरच एकमेव-लघुतम असे म्हणायचे असेल, तरी शीर्षकातील द्विरुक्ती चालून जाते. आणि शीर्षक हे कथेचे वर्णन असल्यामुळे स्वतःचे वर्णन असण्यापासून मुक्त असते. (उदाहरणार्थ, पुष्कळदा म्यूझियममध्ये चित्राच्या शीर्षक-पट्टीवर "Untitled" असे लिहिलेले दिसते. परंतु अशा प्रसंगी Untitled हेच शीर्षक आहे, आणि वदतोव्याघात आहे, असे आपण म्हणत नाही. अथवा मेंडेलसोन या संगीतकाराने अनेक "Song without words" नावाच्या संगीतरचना लिहिलेल्या आहेत. या शीर्षकामुळे त्या रचनेत शब्द आहेतच, आणि शीर्षक स्वखंडन करते, असे आपण म्हणत नाही. पुस्तकाचे शीर्षक हे रचनेनंतर चिकटवलेली झंझट आहे, याबाबत कविता महाजनांनी वैयक्तिक अनुभवही नुकतेच "ऐसी अक्षरे"वर लिहिलेले आहेत. या धाग्यातील कथेचे शीर्षकही लांबलचक आहे - ते कथेशी संलग्न आहे, पण कथेचा भाग नाही. लघुतमता कथेचे उद्दिष्ट्य असले, तरी शीर्षकाचे उद्दिष्ट्य नाही. म्हणून शीर्षकात अलंकारिक द्विरुक्ती असल्यास आत्मखंडन होत नाही.)

(गंभीरपणे म्हणायचे झाले, तर "एक" मध्ये कुठलीच द्विरुक्ती नाही. इंग्रजीत "इन्डेफिनिट आर्टिकल" वापरतात, त्या ठिकाणी "एक" हा शब्द मराठीत वापरतात. तो वापरला नाही, तर अर्थात फरक पडतो. "एक सिंह एका नदीपाशी आला." येथे आतापर्यंत अविवक्षित असा एक सिंह, आतापर्यंत अविवक्षित अशी एक नदी, असा निर्देश होतो. "सिंह नदीपाशी आला." असे म्हटल्यास याआधीच ठाऊक असलेला विवक्षित सिंह याआधीच ठाऊक असलेल्या विवक्षित नदीपाशी आला, असा निर्देश होतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे काहि वाचले की नुसतं छान म्हणण्यावाचुन काही पर्याय नसतो, मात्र तेवढचं म्हणणे योग्यही वाटत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमच्या अन्यत्र लेखनातून कळले की तुम्ही ह्या संबधीदेखील काम केले आहे. एक सामाजिक कार्यकर्ती म्हणुन तुमचा अनुभव असा आहे का की महाराष्ट्र राज्यात सर्व/ बहुसंख्य बलात्कार केसेस मधे हे असे होते? हा लेख एका कार्यकर्तीचा की ललित लेखन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भूमिका अशा दरवेळी वेगळ्या काढता येत नाही. मी माणूस असते, मी स्त्री असते, मी कार्यकर्ती असते आणि मी लेखकही असते. या प्रत्येक भूमिकेतून मला व्यक्त व्हावं वाटतं. क्वचित या भूमिका एकमेकींना विरोधी असतात; बहुतेक वेळा मिसळतात. त्यामुळे तर दुभंग व्यक्तिमत्त्व न बनता मी सलग एक राहू शकते. जगणं, वागणं, विचार वा भावना करणं आणि लिहिणं यांत एक सूत्र राहतं.

सर्व केसेसमध्ये असेच होते असे नाही. मात्र अनेक केसेसमध्ये होते. कधी घरा-कुटुंबात, कधी परिसरात, कधी कार्यक्षेत्रात, कधी जाती-धर्मात... अनेक जागा आहेत, ज्या अडथळे बनतात. ज्यांनी पाठबळ देणं गरजेचं आहे, तेही बर्‍याचवेळा विरोधक बनून उभे राहतात. कुटुंब, पोलिस, न्यायालय, प्रसारमाध्यमं, स्वयंसेवी संस्था, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांच्याकडून मदतीची, सहकार्याची, पाठबळाची अपेक्षा असते. या प्रत्येक टप्प्यावर येणारे अनुभव निराळे असतात.
तरीही मी आशावादी आहे. आता कायदे पुष्कळ अनुकूल बनताहेत... आणि लोक पूर्णतः निराश नाहीत, संघर्षासाठी उभे राहताहेत.
अन्यथा बलात्कार सर्वकाळात, सर्वत्र होत आलेत; होताहेत; आणि होत राहणार आहेत... ही वस्तुस्थिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

खुलाश्याबद्दल धन्यवाद. कायदे अनुकूल होते आहेत हे वृत्तपत्रातुन वाचत होतो. अर्थात तुमचा प्रत्यक्ष अनुभव जास्त बोलका. कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी महाराष्ट्राची हाही बाबत उलटी वाटचाल होते आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रतिसादप्रपंच.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा फार आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंच सांगतो, नाही आवडली कथा.

भडक, बीभत्स आणि उत्तान शब्द/प्रतिमा वापरल्या म्हणजे लेखन महान होत नाही. महान जाऊ द्या, गेला बाजार परिणामकारकही होत नाही, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. या कथेतीलस चिरफाळलेली योनी, चुरगळलेले स्तन, वीर्याचे थेंब वगैरे प्रतिमा अर्थहीन आहेत, असे मला वाटते.

मोकळेपणाने मत मांडले. समजून घ्याल ही अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेकांना अशा थेट शब्दांचा त्रास होतो याची जाणीव आहे. कारण तो मलाही होतो.
मला छान, सुंदर, सभ्य, रोमँटिक लिहिणं आवडलं असतं. माझी भाषा मला सुरेख आणि सुरेल वापरावी वाटते.
पण दरवेळी ते शक्य नसतं. शिवीची जागा शिवीचीच असते आणि ओवीची जागा ओवीची. त्याला इलाज नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे या 'प्रतिमा' नाहीत कशाच्याही. हे फक्त एक वास्तव आहे.
खूप शब्द खूप वेळा, कुठेही आणि कसेही वापरून आपण गुळगुळीत करून टाकले आहेत. काही शब्दांबाबत आपले पूर्वग्रह आहेत. त्यामुळेही असे वाटू शकते.
एक केस जरी प्रत्यक्ष बघितली तरी पापण्यांचे केस जळतात आणि बुबुळांचा कोळसा होतो. तो कोळसा अश्रूंनी भिजवून ठेवण्यापेक्षा तो पेटवून त्याचा निखारा बनू देणं मला श्रेयस्कर वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

हिंसक कृत्याचं वर्णन नक्की कशा (आणि किती तुपाळ) भाषेत करावं म्हणजे ते वास्तववादी आणि परिणामकारक वाटेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

हे स्फुट 'निर्भया' नंतर तुमच्या फेबु भिँतीवर वाचलेलं. तेव्हाइतकंच आताही परीणामकारक वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानवी समाजात अनेक गुन्हे आहेत. त्यातले काही गुन्हे अतिशय भयंकर मानले जातात. अमानवी, पशूवत, मानवतेला कलंक फासणारे, गुन्हेगारास फाशी द्यावी असे, इतर क्रौयपूर्ण वागणूक द्यावी असे, इ त्यांचे वर्णन केले जाते. असे सर्व गुन्हे एकत्र मांडले तर बलात्कार त्यातील सर्वात घाण अशा पहिल्या काहींमधे मोडेल असे सर्व मानतात. प्रवाहाप्रमाणे मी ही बलात्कार अतिशय घृणास्पद आहे असे मानतो. मित्रांमधे ऑफिसमधील वातावरणाचे वर्णन करताना मी पहिल्यांदा हे वाक्य ऐकले तेव्हा बलात्काराबद्दल माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले - If rape is certain, lie down and enjoy it. मी हे वाक्य ऐकून भयंकर चमकलो होतो. मी ज्या शंका खाली लिहित आहे त्या वाचून कृपया माझ्यावर तुटून पडू नका. त्या शंका केवळ माझे अज्ञान आणि संभ्रम दाखवतात, कोणती विचारसरणी नाही.

बलात्कार प्रोजेक्ट केला जातो तितका गंभीर गुन्हा आहे का असा प्रश्न वरील आंग्लभाषीय वाक्प्रचार ऐकून माझ्या मनात आला. त्या दृष्टीने मी पुढे विचार केला नि खालील शंका जमा झाल्या.

१. आनंददायक संभोग आणि बलात्कार यांच्यात बरेच फरक आहेत. पण इतर गुन्ह्यांना असा आनंददायक equivalent नाहीच. काही केसेस मधे तरी बलात्कार केवळ दॄष्टीकोन तर नव्हे?
२. गर्भ नाही राहिला तर या अपराधाचा केवळ शारीरिक परिणाम कितपत असतो?
३. समाजाची बलात्कृतेची स्वीकृती हा एक मोठा मुद्दा आहे. हा नाही असे मानले तर या अपराधाचा मानसिक परिणाम किती? मानसिक परिणाम कितपत 'समाजाच्या स्वीकृतीशी' निगडित असतो आणि कितपत 'बलप्रयोगाच्या भयाशी'.
४. बलात्काराला मोठा गुन्हा नाही मानले तर काहीही होऊन समाज व्यवस्था बिघडेल म्हणून त्याला मोठा गुन्हा मानले आहे का?
५. स्त्रीयांबद्दल समाजाला सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून हा गुन्हा मोठा आहे का?
६. वैवाहिक बलात्कार मानला तर आपला समाजाचा पायाच खचून जाईल हा स्टँड भारतीय संसदेने अगदी अलिकडच्या काळात घेतला आहे. बलात्कार हा इतका मोठा गुन्हा असेल, (पती धरून ) तो कोणीही पुरुष करू शकत असेल तर संसद इतके निर्लज्ज विधान देईलच कसे?
७. पतीने केलेला बलात्कार स्त्रीयांना भयंकर गुन्हा का वाटत नाही? पती या रोलमधे पुरुषाला पाशवी गुन्हा करण्याचे लायसन्स कसे असू शकते? स्त्रीयांचा या बाबतीत शुकशुकाट (बर्‍याच देशात तसे कायदे आहेत, भारतात क्वचित आवाज उठतो) या गुन्ह्याचे कोणते तांत्रिक स्वरुप दर्शवतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बलात्काराबाबतचं सदर वाक्य हे बलात्काराइतकंच घृणास्पद आणि विकृत मेंदूची निपज आहे. मला त्या वाक्याचा कायम तिरस्कार वाटत आलेला आहे.

१. इतर गुन्हेही गुन्हेगारांसाठी आनंददायकच असतात. गुन्हेगारांचे मानसशास्त्र पाहिले की हे लक्षात येईल. बलात्कार हा दृष्टिकोन नक्कीच नाही, कोणत्याच केसमध्ये.

२. अ. गर्भ राहणं हा परिणाम वाईटच. कारण त्यात दुसरा एक जीवही अकारण बळी जातो. वेळेतच लक्षात आलं तर गर्भपात शक्य होतो; अन्यथा मूल जन्माला घालावं लागतं. ११ वर्षांच्या एका मुलीवर तिच्या वडलांनी बलात्कार केल्याची केस मी हाताळली होती. ती गरोदर राहिली. तिचं गरोदरपण अवघड होतंच; कारण मानसिक त्रासही खूप होते; पण बाळंतपण इतक्या कमी वयानं अत्यंत गुंतागुंतीचं आणि जीवावर बेतणारं होतं. ज्यानं डिलिव्हरी केली त्या डॉक्टरवरही तिनं अविश्वास दाखवला; ज्या मुलीचा वडलांवरचा विश्वास उडतो ती जगातल्या दुसर्‍या कोणत्याही पुरुषावर काय विश्वास दाखवणार? तिचं मूल पुढे दत्तक दिलं गेलं. त्या बाळातही तिची गुंतवणूक अजिबात नव्हती. ( जी इतर कुमारीमातांची असते अनेकदा!) आज सुमारे नऊ वर्षांनी ती बर्‍यापैकी सावरली आहे. कारण सकस जेवण, समुपदेशन, शिक्षण या गोष्टी तिला संस्थेत मिळाल्या. जिथं हे मिळत नाही तिथले प्रश्न कायमची जखम होऊन बसतात.
ब. ज्या मुली अगदीच लहान असतात, त्यांच्या शारीरिक जखमा तुलनेत लवकर बर्‍या होतात आणि काही कळण्याच्या वयाच्या नसल्याने मानसिक संघर्ष नसतो. उदा. सगळ्यात लहान वयाची केस मी ४ महिन्यांच्या मुलीची हाताळली होती. तिच्या मांड्यांवर भाजल्यासारख्या जखमा त्वचा सोलवटल्याने दिसत होत्या. ती तुलनेत लवकर, म्हणजे आठेक महिन्यांत क्युअर झाली.
क. तोंडात लिंग खुपसल्याने एका छोट्या मुलीचा घसा फाटला होता. ( ही घटना मी माझ्या 'भिन्न' या कादंबरीत लिहिली आहे.) ती आजही बोलू शकत नाही. आणि केवळ पातळ आहार घेऊ शकते.
ड. अनैसर्गिक संभोग झालेला असेल तर जखमा बर्‍या होण्यात पुष्कळ काळ जातो.
इ. इतर वस्तूंचा वापर केला गेला असेल, तर जखमा तीव्र असतात. असे गुन्हेगार अधिक हिंसक वृत्तीचे असतात. त्यामुळे ते पूर्ण शरीरावर जखमा करू शकतात. दिल्लीच्या केसमध्ये तर योनीत लोखंडी रॉड खुपसून आतडी बाहेर काढल्याचे आपल्याला माहीत आहेच. असे अनेक प्रकार आहेत.
ई. शरीर आणि मन वेगळं असतं, असं मी मानत नाही. मानसिक विकारांचे परिणाम शरीरावर व शारीरिक विकारांचे मनावर होतच असतात. हे ती व्यक्ती मरेपर्यंत विसरत नाही; हां... काळाने आणि अनुकूल परिस्थिती लाभली तर हे परिणाम काहीसे सौम्य होत जातात.

३. केवळ समाजातच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नजरेतूनही ती उतरते. हा पगडा अजून किती पिढ्या राहणार आहे माहीत नाही. पुरुषांनाही विपरित अनुभव येतात; पण स्त्रीच्या तुलनेत ते मानसिक त्रासातून लवकर मुक्त होतात. किंवा त्रास देणार्‍या व्यक्तीचा 'बदला' घेण्याची वा काहीवेळा जाहीर नाचक्की-तक्रार करण्याचीही हिंमत दाखवू शकतात. स्त्रियांकडून हे क्वचित घडते. उलट बलात्कारित व्यक्तीशी तिचं लग्न लावून देणे इत्यादी आचरट प्रयोग आपल्याकडे केले जातात. सिनेमांमधून असली चित्रणं दिसतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

४. तो मोठा गुन्हा आहे, म्हणूनच त्याला मोठा गुन्हा मानले जाते. केवळ समाजव्यवस्थेचा प्रश्न नाही.

५. स्त्रियांबद्दल समाजाला सॉफ्टकॉर्नर असता, तर असे गुन्हे घडलेच नसते. हा प्रश्नच हास्यास्पद आहे. असं कुणाला सुचू शकतं, हेच मला माणूस म्हणून लाजिरवाणं वाटतं.

६. संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते.

७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

१. आनंददायक संभोग आणि बलात्कार यांच्यात बरेच फरक आहेत. पण इतर गुन्ह्यांना असा आनंददायक equivalent नाहीच. काही केसेस मधे तरी बलात्कार केवळ दॄष्टीकोन तर नव्हे?

प्रत्येक गुन्ह्यामध्ये मर्जीने केलेले कृत्य असते. जसे खून असतो तसेच दयामरण असते, कायदेशीर फाशी असते. म्हटलं तर या तिन्ही मध्ये दुसर्‍याचा जीव घेतला जातो पण तीन्ही वेगळेच. तसेच चोरीही असते, दरोडा असतो, दान दिले जाते, म्हटलं तर तिन्ही मध्ये संपत्ती एकाकडून दुसर्‍याकडे जाते पण तीन्ही वेगळे. तसेच संभोग, आनंददायी संभोग आनि बलात्कार हे ही वेगवेगळेच

२. गर्भ नाही राहिला तर या अपराधाचा केवळ शारीरिक परिणाम कितपत असतो?

डिपेन्ड्स. वर कविताताईंनी उदाहरणे दिली आहेतच. त्याउप्पर मुलीच नव्हे व लहानच नव्हे तर चांगल्या ज्यु कॉलेजमधील मुलग्यांवरही असे प्रसंग येतात असे वाचत असतोच! Sad

३. समाजाची बलात्कृतेची स्वीकृती हा एक मोठा मुद्दा आहे. हा नाही असे मानले तर या अपराधाचा मानसिक परिणाम किती? मानसिक परिणाम कितपत 'समाजाच्या स्वीकृतीशी' निगडित असतो आणि कितपत 'बलप्रयोगाच्या भयाशी'.

माझ्यामते समाजाच्या स्वीकृतीशी तर असतोच शिवाय "योनीशुचितेच्या" थोतांडाचे त्या व्यक्तीवर किती व कसे कंडिशनिंग झाले आहे त्यावरही असते. किमान आपल्या घरात आपली बायको, मुलगी, आई, आजी, बहिण यांच्याशी त्यांच्यावर बलात्कार झाल्यास त्यांनी काय काय केले पाहिजे अश्या पद्धतीची चर्चा कधीतरी केली असली तर त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यास सोपे जावे असा कयास आहे.

४. बलात्काराला मोठा गुन्हा नाही मानले तर काहीही होऊन समाज व्यवस्था बिघडेल म्हणून त्याला मोठा गुन्हा मानले आहे का?

असे वाटत नाही.

५. स्त्रीयांबद्दल समाजाला सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून हा गुन्हा मोठा आहे का?

माफ करा, पण असा प्रश्न हास्यास्पद आहे. एक तर बलात्कार हा स्त्रीयांवरच होतो असे नाही. तुमच्या-माझ्यावरही होऊ शकतो हे लक्षात घेतलेले बरे! कारण बलात्काराचा आणि लैंगिक आकर्षणाचा संबंध अजिबात नाही! दुसरे असे की सॉफ्ट कॉर्नर असता तर स्त्रीयांवर बलात्कार झाले असते काय?

६. वैवाहिक बलात्कार मानला तर आपला समाजाचा पायाच खचून जाईल हा स्टँड भारतीय संसदेने अगदी अलिकडच्या काळात घेतला आहे. बलात्कार हा इतका मोठा गुन्हा असेल, (पती धरून ) तो कोणीही पुरुष करू शकत असेल तर संसद इतके निर्लज्ज विधान देईलच कसे?

असे बदल समाजात मुरायला वेळ लागतो अजून काही वर्षांनी चित्र बदललेले दिसू शकते. समलैंगिक संबंध ठेवणार्‍या स्त्री-पुरूषांच्या बाबतीत समाज हळुहळु मोकळेपणाने व सकारात्मकतेने बोलु लागला आहे तसेच!

७. पतीने केलेला बलात्कार स्त्रीयांना भयंकर गुन्हा का वाटत नाही? पती या रोलमधे पुरुषाला पाशवी गुन्हा करण्याचे लायसन्स कसे असू शकते?

(एकतर हा भारतात कायदेशीर गुन्हा नाही दुसरे असे) कारण हे गैर आहे आहे हेच बहुतांश स्त्रियांना वाटत नाही. अजूनही लग्नाचा संबंध संभोगाशी जोडला जातो. मुळात संभोगासाठी लग्न करण्यची काय आवश्यकता? वगैरे वगैरे

स्त्रीयांचा या बाबतीत शुकशुकाट (बर्‍याच देशात तसे कायदे आहेत, भारतात क्वचित आवाज उठतो) या गुन्ह्याचे कोणते तांत्रिक स्वरुप दर्शवतो?

प्रश्नच कळला नै

बाकी यासंबंधातील बलात्कार: (गैर)समज आणि तथ्ये हा धागा ग्राह्य ठरावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फारच छान लघूकथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

श्री. अरुण जोशी यांनी बलात्कार एन्जॉय करण्यासंबंधी जे इंग्रजी वाक्य वर दिले आहे, ते मूळ असे आहे : If rape is inevitable, lie back and enjoy it. हे वाक्य महान चिनी तत्त्ववेत्ता कनफ्युसिअस याचे असल्याचे सांगण्यात येते. "सांगण्यात येते" असे यासाठी म्हटले की, त्याचा मूळ संदर्भ अजून तरी माझ्या वाचनात आलेला नाही. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात कनफ्युसिअस होऊन गेला. मानवी इतिहासात त्याने पहिल्यांदा नीतीतत्त्वे प्रतिपादिली. संस्कृतातील सूत्रांसारखी छोटी छोटी वाक्ये हे त्याच्या शैलीचे खास वैशिष्ट्य आहे. बायबलमध्ये येशूच्या तोंडी असलेली अनेक वाक्ये मूळची कन्फ्यूसिअसची आहेत.

मानवी नीतिचा पुरस्कर्ता "If rape is inevitable, lie back and enjoy it" यासारखा विचार सांगेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. त्यातील शब्द योग्यच वाटले. 'निर्भया' केसचे वाचलेले वृत्तांत आणि फुलनदेवीच्या वाट्याला आलेले भोग हे , या शब्दांपेक्षाही भयंकर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0