नवीन शब्दांचं अप्रूप

आमच्या बंधूराजांनी म्हणे, त्यांच्या बाळपणी वेगवेगळे तीर मारले होते. त्याला कुठूनतरी सावत्र हा शब्द, आणि त्याचा वाक्यात उपयोग समजला. मग गावभर ओरडत फिरत होता, "मी आई-बाबांचा सावत्र मुलगा!" आता आईचा किंवा बाबांचा, एका कोणाचा सावत्र मुलगा असेल तरी समजण्यासारखं आहे. दोघांचाही सावत्र मुलगा? अंमळ अक्कल आल्यानंतर कधीतरी ही गोष्ट बाबांकडून कळली तेव्हा आम्ही तिघे चिक्कार खिदळलो होतो. आम्ही दोघांनी एक अट्टल बॉलिवूडी गोष्टही तयार केली होती. भावाचा जन्म झाला, मग आईने दुसरं लग्न केलं, ते आमचे बाबा. मग आईच्या पाठी बाबांनी दुसरं लग्न केलं, मग ही आई आली वगैरे! बॉलिवूडमधे काळ-काम-वेगाचं गणित आणि एकंदर लॉजिक तसं हुकलेलं असतंच. त्यामुळे बाबांच्या शंका-कुशंका फाट्यावर मारून आम्ही ही सनिमाची गोष्ट पूर्ण केली.

---

आपल्याकडे जे नसतं तेच बरोबर हवंहवंसं वाटतं. आमच्यासारख्या शुद्ध, तुपातल्या, पांढरपेशा लोकांना शिवराळ भाषेचं काय कौतुक! म्हणजे तशी च्यायला, आयलाची सवय आहे. पण गोर्‍यागोमट्या, तुपकट, जोशी लोकांकडून आणखी किती शिव्या येणार? त्यामुळे एखादा एपिसोड बोअर झाला तरी 'ब्रेकींग बॅड' ही अमेरिकन टीव्ही मालिका अगदी उत्साहाने पहातो आहोत. विशेषतः त्यातला जेसी आणि त्याचे मित्र आले की आमची ऑडीटरी नर्व्ह चौपट क्षमतेने काम करायला लागते. तर गेल्या आठवड्यात आमचा बरा अर्धा सांगितलेल्या वेळेत घरी उगवला नाही. फोन केला तर उचलला नाही. पुन्हा दहा मिनीटांनी फोन केला. पुन्हा व्हॉईस मेसेजवर. मग मी व्हॉईस मेसेज ठेवला, "Yo biatch. कधी येणारेस तू घरी? Man, मला भूक लागल्ये. मी खायला सुरूवात करत्ये... bitch"

हा आमचा जेस्सी, आमचं याच्या भाषेवर भारी प्रेम.

---

आजच एका आठ-साडेआठ वर्षांच्या पोट्ट्याशी गप्पा मारत होते. तो बनेल होऊ पहाणारा किंवा बनेल असण्याची पुरेशी क्षमता असणारा पोट्टा आहे, असं माझं मत आहे. इथे आमच्यात मतभेद आहेत कारण त्याच्या मते तो "ऑस्सम गीक" आहे. सध्या त्याला प्युबर्टी हा शब्द नवीनच समजलेला आहे. त्याच्या बापाकडून समजलेली गोष्ट अशी की त्याला ग्रंथालयातून कोणतसं पुस्तक हवं होतं. ते पुस्तक त्याला या वयात समजणार नाही म्हणून बाप म्हणाला, "अरे हे तुझ्यासाठी नाहीये." तर पोट्टा म्हणे, "हे प्युबर्टीनंतर वाचायचं पुस्तक आहे का?" बाप अजूनही बुचकळ्यात पडलेला आहे की पोराला हा शब्द समजला कुठून? सध्या शाळांना तर सुट्टी आहे.

पुस्तकाची यत्ताच वरची असली तरीही आता या हीरोला लवकरात लवकर प्युबर्टी गाठायची आहे. तर आज गप्पा मारताना मी त्याला विचारलं, "काय रे, येत्या वर्षात तू शाळेत एकटा जाणार का आई-बाबा कोणीतरी सोडायला येणार?" तर नकार दिला, "कोणीतरी सोडायला येणार." मग मीच मुद्दाम विवक्षित शब्द वापरला, "बहुतेक प्युबर्टीनंतर तुला एकट्याला उनाडता येईल." माझ्या तोंडून हा शब्द ऐकून पोट्टा पेटला. मग बराच वेळ त्याने मला प्युबर्टीचं महत्त्व सांगितलं. मी पण ऐकून घेतलं. "तुला माहित्ये, प्युबर्टीनंतर बर्‍याच गोष्टी नवीन समजतात. आई-बाबा एकट्याने बाहेर पाठवतात. आणि तुला माहित्ये, प्युबर्टीनंतर मलाही दाढी-मिशी येणार बाबांसारखी. मग मी पण रोज शेव्ह करणार."

मी त्याला थोडं अडवलं, "अरे पण हे शेव्हींग वगैरे बोअर असतं फार. कंटाळा येतो. तुला कशाला हव्ये रे एवढ्यात प्युबर्टी?"
तर त्याने मलाच समजावायला सुरूवात केली. "तू मुलगी आहेस, तुला काय माहित शेव्हींग वगैरे!" (मी फक्त ऐकणे आणि प्रश्न विचारण्याच्या मोडमधे असल्यामुळे मुलींच्या जगतात काय चालतं याचा त्याला अजिबात सुगावा लागू दिला नाही.)
मी आपली उगाच बचावात्मक पवित्रा घेऊन, "मला डॅडींनी सांगितलंय ना. शिवाय ..."
मी अर्ध्या सेकंदाचा पॉझ घेतल्याची संधी त्याने साधलीच, "शेव्हींग करायला लागलं तर लागलं. त्यात काय झालं? प्युबर्टीनंतर मला एकट्याला फिरता येईल. मला एकट्याला सायकल चालवता येईल. आणि हवी ती पुस्तकंही वाचता येतील."

आता मात्र मी थोडी दचकले. याला नक्की काय काय माहित्ये, कोण जाणे! "काय रे, कोणती पुस्तकं वाचणार तू?" त्याने मोठी फुशारकी मारत बापाला जे पुस्तक आणायला सांगितलं होतं त्याचं नाव सांगितलं, "Lord of the flies". ही याची प्युबर्टीची कल्पना! असो.

नवीनच शब्द समजलाय त्याला, आपण त्याचं कौतुक नाही करायचं तर कोण करणार!

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

भारीच दिसतोय पोट्टा. Smile

या नवीन शब्द वापरण्यावरून आठवलेला किस्सा. हा "ठणठणपाळ"च्या निरोपाच्या लेखात आलेला आहे.

ठणठणपाळाने साठ नि सत्तरच्या दशकांत मराठी साहित्याच्या छोट्याश्या संसारात केलेली मौजमजा सर्वांना ठाऊकच आहे. पण सर्वच लेखकांना हा प्रकार पसंत नव्हता. स्वतःला "विनोदी लेखक" म्हणवून घेणारे गंगाधर गाडगीळ (आठवा : "बंडू" ! Sad ) त्यातलेच. बरे तिथवर ठणठणपाळ कोण ते माहिती नसल्याने तिथूनही पंचाईतच.

एकदा "ठणठणपाळ"चे प्रकाशक केशवराव कोठावळे दळवींकडे - म्हणजे ठणठणपाळाकडे - येऊन म्हणाले, "का हो दळवी, हा 'व्हिशस्' काय प्रकार असतो ?". दळवींनी कोठावळ्यांना त्याचा संदर्भ विचारल्यावर ते म्हणाले, "आज गंगाधर गाडगीळ भेटल्यावर म्हणाले, 'हा तुमचा ठणठणपाळ व्हिशस् आहे !'" त्यावर कोठावळ्यांनी काय प्रतिक्रिया दिली, असं विचारल्यावर ते म्हणाले, "मी त्यांना अगदी लगेच 'थँक्यू' म्हणालो !"

दळवी लिहितात : कोठावळ्यांनी थँक्यू म्हण्टल्यावर गाडगीळांचा चेहरा कसा झाला असेल याची कल्पना करून मी मनातल्या मनात जोरात हसलो, पण ते कोठावळ्यांना मात्र दाखवलं नाही !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Smile ही निरागसता (!!!!!!!) बघुन 'वनवास' आठवले (त्यातली चुंबन ही गोष्ट) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL दोन्ही किस्से भारी आहेत.
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' हे नावावरुन लहान मुलांच पुस्तक वाटतं खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"निमित्त " हा शब्द नुकतीच शिकलेली मिनू तो कुठेही वापरायला उत्सुक असे . तिची आई म्हणाली आज आपल्याला बारशाला जायचे आहे . मिनू म्हणाली , बारशाचे निमित्त काय आहे आई ? आई म्हणे , काही विशेष नाही ग मावशीला बाळ झाल्याच्या निमित्ताने बारसे ठेवले आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:bigsmile:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

लहानपणी केलेल्या अनेक उपद्व्यापांची या निमित्ताने आठवण होऊन अं.ह. झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

K : "My parents divorced six months
into their marriage..."

"You're kidding me..."

"And then I arrived...
so they remarried
two years into their
second marriage,
my dad found out that
I was born a year
after the divorce.
so they divorced again..."

"That sucks, dude!
So when was your brother born?
In the second coming or..."

K : "After the second divorce..."

"So he's not exactly
your blood brother?"

K : "He is"

"How?
See...
They married.
Then divorced.
Then they had you.
Married again.
Divorced again.
Then they had him.
which means he can't
be your real brother.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

असेच म्हणतो. (वरील अनेक प्रतिसादांना.)

मराठी संकेतस्थळांवर नवीन होतो, तेव्हा "प्रकाटाआ" चा काहीतरी निंदाव्यंजक अर्थ आहे, असे मला अनेक महिने वाटत असे.

आजही अधूनमधून कळते, की मी कुठलेकुठले शब्द चुकीच्या अर्थाने वापरत आहे. "कोडगा" शब्द "भावनाशून्य कोरडा" या अर्थी मी अगदी हल्लीहल्लीपर्यंत वापरत असे. एकदा कुठल्याशा गंभीर कौटुंबिक परिस्थितीत मी तो शब्द वापरला. पुन्हा-पुन्हा वापरला. शेवटी कोणीतरी मला सुधारून सांगितले. पण माझ्या गंभीर वक्तव्याची हवा फुस्स झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग कोडगा म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोल्सवर्थमधल्या नोंदी मी इथे कॉपी-पेस्ट केल्या आहेत. हे सगळे अर्थ माझ्या मते 'भावनाशून्य कोरडा' शी अगदी तंतोतंत जुळणारे नसले तरी त्याच्या आसपास घोटाळणारे आहेत.

कोडगा [ kōḍagā ] a Shameless, callous, obdurate, incorrigible.
कोडगा [ kōḍagā ] m A sound beating. v दे. 2 A whipping top.
कोडगेला [ kōḍagēlā ] a unc (Qualif. form of कोडगा) Approaching to obduracy or callousness.
पटकोडगा [ paṭakōḍagā ] a Utterly callous or incorrigible.
लतकुटा, लतकुटार, लतकुठा, लतकोडगा [ latakuṭā, latakuṭāra, latakuṭhā, latakōḍagā ] a लत- गाढव c लतखोर or रा a (लात, कुटणें, कोडगा) Shameless, callous, persisting in bad ways, heedless of kicks and blows, of prohibitions and rebukes.
लाचकोडगा [ lācakōḍagā ] a unc Shameless, callous. See लत- कोडगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

पण लहानपणी मरेस्तोवर मार खाल्ल्यानंतर, "कोडगे झाला आहात &$*#(##" हा संवाद ऐकायला मिळत असे. एकदा तर "कोडगा झालोय ना? मग मारून काय उपयोग?" असे विचारले तर डब्बर मार अजून मिळाला!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कोडगा हा शब्द आता जास्तच आवडला.

एक माजी घरमित्र माझा उद्धार करताना incorrigible आणि दुसर्‍या मित्राचा उद्धार करताना cretin हा शब्द नेहेमी वापरत असे. त्याने पहिल्यांदा हे दोन्ही शब्द वापरले तेव्हा आम्ही समस्त फकिन' फॉरीनरांनी "भाऊ, दारू म्हणजे काय रे?" असा चेहेरा केला. त्यानेही आमचे निरागस चेहेरे पाहून, तत्परतेने, आदल्याच दिवशी ज्या पुस्तकात हे शब्द वाचले होते, त्याचं नाव सांगितलं.

ब्रेकिंग बॅडमधे त्याच त्या जेसीच्या तोंडी हाच तो cretin शब्द पुन्हा एकदा ऐकला आणि कानांचं पारणं फिटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin लहानपणी नको तिथं नको त्या शब्दांचे अर्थ विचारून घरच्यांना लाज आणायचो ते आठवलं.
नव्या शब्दाचं आकर्षण किंवा क्रेझ बरीच असते. काही दिवसांपूर्वी मित्रमंडळींनी बोलण्यात उगाच अचाट शब्द वापरायला सुरुवात केलेली होती. डोसा अचाट भारी झालाय वगैरे.

बाकी जास्ती एन्जोइड माडीदे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकमेकींशी संबंध नसलेल्या तीन नोंदी:

१. अलीकडे 'विलायत' हा शब्द कुठेच ऐकायला मिळत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे तो एकेकाळी 'परदेश' पेक्षाही 'इंग्लंड' या अर्थानेच वापरला जात असे. चिपळूणकरांनी कुठेतरी 'विलायतेत असं असतं, पण अमेरिकेत तसं असतं' अशासारखं वाक्य लिहिल्याचं आठवतं. हे खरं असेल तर व्हँकूव्हरमध्ये राहणारा माणूस 'विलायती अमेरिके'त राहतो असं म्हणता येईल. 'ऐअ' च्या एका माननीय संपादिकेने विलायतेत शिक्षण घेतल्याचं ऐकून आहे, तेव्हा त्याच यावर प्रकाश टाकू शकतील.

२. जेव्हा 'sanction' हा शब्द समोर आला, तेव्हा सुरवातीला बऱ्यापैकी बुचकळ्यात पडल्याचं आठवतं. कारण 'निर्बंध घालणं' आणि 'संमती देणं' असे त्याचे दोन जवळजवळ विरुद्ध अर्थ होतात. अशासारखं मराठी उदाहरण कुणाला माहित आहे का?

३. भारतात राहणाऱ्या मंडळींकरता एक पृच्छा. तिथे वाढणाऱ्या अलिकडच्या पिढीतल्या (पांढरपेशा घरांतल्या) मुलांना f-word साधारण कितव्या वर्षी माहित होतो? मला तो दहावीनंतर कॉलेजमध्ये गेल्यावर (म्हणजे १४-१५ व्या वर्षी) माहित झाला अशी अंधूक आठवण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

'सॅङ्शन'ची गंमत माहीत नव्हती. मी आजवर संमती/परवानगी देणे याच अर्थी ऐकला आणि वापरला आहे.

तुम्ही म्हणता त्याचे तंतोतंत उदाहरण म्हणून नव्हे पण मराठीत वापरल्या जाणार्‍या 'अपरोक्ष' ची गंमत त्याच्या जवळ जाते. जरी त्याचा मूळ अर्थ 'डोळ्यासमोर/समक्ष' असा असला तरी रूढ झालेला आणि वापरात असलेला अर्थ अगदी विरूद्ध आहे आणि तो म्हणजे 'डोळ्याआड/पाठीमागे'.
उदा. "माझ्या अपरोक्ष तू माझ्याबद्दल असे का बोललास ?" हे वाक्य अपरोक्ष = पाठीमागे या अर्थी वापरले जाते.

यावरून एक आठवले -
'भारंभार' या शब्दाचा वापर भरपूर या अर्थी केला जातो. उदा. मी आज भारंभार जेवलो.
पण खरा अर्थ 'जेवढ्यास तेवढे' असा आहे. तराजूच्या एका पारड्यात जेवढा भार तेवढाच दुसर्‍या पारड्यात; म्हणून भारास भार = भारंभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

abnehmen हा असाच एक जर्मन शब्द. to accept आणि to decline असे दोन्ही अर्थ सांगणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमच्या भाराइतके जेवलात, म्हणजे समजा तुमचे वजन ७५ किलो, तर ७५ किलो जेवलात असा अर्थ होइल की Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आणखी एक उलटी गंमत - flammable आणि inflammable ह्या विरूद्धार्थी भासणार्‍या शब्दांचा अर्थ एकच आहे.
'in' मुळे जे flammable नाही ते inflammable अश्या अर्थाचा चुकीचा वापर ऐकला आहे.
दोन्हींचा विरुद्धार्थी शब्द nonflammable आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत flammable हा शब्द वापरतात आणि अमेरिकनांना कळत नाही या कारणास्तव 'विलायते'तही अलिकडच्या काळात inflammable च्या जागी flammable हा शब्द वापरतात, असं समजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकाच शब्दाचे दोन विरुद्धार्थ मला मराठीत चटकन आठवत नाहीत. इंग्लिशमधला टेरिबल आणि टेरिफिक यांचे अर्थ सर्वसाधारणपणे विरुद्ध होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकाने जुनेच शब्द नवीन पद्धतीने वापरात आणलेले दिसतात. वॉल किंवा भिंत, लाइक, अनलाइक, ब्लॉक, फ्रेंडरिक्वेस्ट, अनफ्रेंड हे शब्द वापरकर्त्यांत पसरायला लागलेले आहेत. त्यांचं अप्रूप किती आहे याचा अंदाज असे फेसबुकी शब्द वापरून तयार झालेल्या कवितांच्या संख्येवरूनच यावा.

सेलफोननेही असेच नवीन शब्द आणि वाक्प्रचार आणले. मिस्ड कॉल, टावर नाय, बर्मग्ठिव्का...

नव्यांपैकी सगळे इंग्लिशच आहेत असंही नाही - आंतरजाल, संस्थळ, धागे, प्रतिसाद, उपप्रतिसाद, व्यनि, खरडवही असेही अनेक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बिग टाईम' हा शब्द नव्याने कळला, तेव्हा मला झोप आणि भूकही 'बिग टाईम' लागायची त्याची आठवण झाली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी घरी एकदा "बाप तसा बेटा" या नव्यानेच ऐकलेल्या म्हणीचा प्रयोग केला होता.
आईई ग्ग.. काय चोपल व्हतं रं.. अग्गाय्याया..

-SYG-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या लहानपणी वात्र्य लहान मुलांना सिक्षा म्हणून, खोडीच्या तीव्रतेनुसार एक किंवा दोन जेवणे दिली जात नसत. पोटात आगीचा असा गोळा पडे कि तशी खोड पून्हा होणार नाही याची मी तरी खात्री बाळगत असे. पण एकदा याचाही कढ झाला.

तेव्हा मी ५-६ वर्षांचा असेन. सणासुदीला कधीकधी आम्ही पूर्ण कुटुंबानिशी आमच्या शहरातल्या नातेवाईकांकडे जात असू. तिथल्या मुलांसाठी आमचे बोलणे, वागणे, सवयी म्हणजे विनोदाचा, मनोरंजनाचा, उपहासाचा मोठा स्रोत असे. त्यांना माझ्या मानीपणाची कल्पना नसावी, पण असे अपमान सहन न होऊन मी आणि माझ्या मोठ्या भावाने त्यांना चांगलेच बुकलून काढले आणि त्यांचे आमच्या पद्धतीने अपमान केले. हे सगळे त्यांच्या शेतात झाले, हो, तेव्हा शहरी लोकांनासुद्धा मोठमोठाली शेते असायची.

आम्ही घरी गेलो तेव्हा अर्थातच आम्हाला २ उपासांची सजा झाली. मला एवढे काही वाटले नाही. पण जसजसे २-३ वाजले, पूजा-अर्चा संपल्या, पक्वांनाचा घमघमाट सुटला, आणि पंगती बसल्या, तिच्यात आम्ही दोघे वजा जाता सर्वजण बसले तसा माझा सात्विक संताप पून्हा उसळला. जेवणं संपत आली, मी तडक पंगतीच्या केंद्रस्थानी जाऊन गरजलो, "बंद करा ते श्लोक-बिक. कुणाचं खराय खोटाय न समजता पाहुण्याच्या* मुलांना उपाशी ठेऊन 'गांडीला बोट देऊन' हादडायला लाज नाही वाटत तुम्हाला?" त्यानंतर त्या सुशिक्षित, छोट्या मोठ्या नोकर्‍या करणार्‍या 'ब्राह्मणां'मधे जो क्षोभ माजला होता त्याची ते आजही मला आठवण करून देतात.

*'पाहुणे' साठी उदगीरकडे एक वेगळा शब्द आहे, विसरलो आहे.
सबब वाक्प्रचार आई वापरायची, सहसा अण्णांना, कधी कधी आम्हालाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमचे या उलट होते.
राग आला की काही भावंडे उपोषणाला बसत. आम्ही मात्र हा प्रकार कधीही केला नाही. आई-बाबांचा कितीही राग आला तरी जेऊन घेत असु.
"मी नाही जेवणार" असे (अगदी कितीही रुसून वगैरे) काही म्हटले असते तर आईने "ठीक आहे." असे म्हणून माझे ताटच मांडले नसते याची खात्री आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समदु:खी आहे हो मी. माझीही आई अशीच. कोठे ती श्यामची आई आणि कोठे आमची पाषाणहृदयी आई... Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धमालच आहे की हे. आमचे एक शिक्षक 'घरच्या वडलांना विचारून या' असं म्हणायचे ते आठवलं. मग एकानं कधीतरी घरच्या वडलांना कुतूहलानं प्रश्न विचारला आणि ते आले शाळेत. मग काय धमाल...
शब्दांच्या सैल वापराच्या तर खूप गमती आहेत.
कंड हा शब्द मी अकरावीत असताना वर्गात एका वादविवादात विचारला. सरांनी "हा शब्द वापरू नये" म्हटल्यावर मी आपलं निरागसपणे " मग खाज म्हणूया" असं म्हणून टाकल्यावर सरांनी डोक्याला लावलेला हात आणि वर्गातल्या मोजक्या मुलांचं खुसखुस हसणं आठवतंय. ( तेव्हा इंजिनिअरिंगला मोजक्या मुली आणि आर्टसला मोजकी मुलं असत! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

मुळात 'कंड' काय किंवा 'खाज' काय, यांपैकी कोणत्याही शब्दात आक्षेपार्ह अथवा हे शब्द न वापरण्यासारखे नेमके काय आहे, ते कळले नाही. (आणि हो, या शब्दांचे 'विशिष्ट अर्थ' मला ठाऊक आहेत.)

पण 'मास्तर' ही जमातच मला कळली नाही, हेही तितकेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच आहे! Smile
शाळेत असताना कधीतरी उत्सुकतेपोटी वाचलेल्या मोठ्या वयोगटाच्या काही पुस्तकांमधून पौगंड, नितंब वगैरे शब्दांचा शोध लागला तेव्हा आम्हालाही लै भारीच वाटलं होतं.
मित्रा-मित्रांमध्ये "काय रे, फार पौगंड झालाय का? नितंबावर लाथ मारीन" असं म्हणायची जाम फ्याशन आली होती आमच्या टोळक्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा ROFL ROFL

जबरीच Biggrin आमच्याकडचेही असे काही शब्द आठवून लै मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साधारणत: कॉलेजाच्या पहिल्या वर्षापासून आपल्या कळपाची अशी एक स्पेशल भाषा बनत असते. काही अत्यंत भारी नवे शब्द त्यातून मिळत असतात.
भीषण सुंदर अशा प्रकारचे ते असतात.
आम्ही बनवलेले हे काही 'इंग्रजी' शब्द :

१. ऑटॉरुब्रिफिकेशन.
स्वतःची लाल करणे.
२. म्यूचुअल रुब्रिफिकेशन.
एकमेकांची लाल करणे.
३. ऑटो पॅरोटिझम
स्वतःचा पोपट करणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-