म्येणबत्त्यांच्या पिसार्‍याचा मोर!

येका सिक्युरिटीवाल्याच्या डायरीतलं पान :

सायबांना रातरी भयाण स्वप्न पल्डं. दच्कून जागे झाले बोंबलत. भायेरून सिक्युरीटीवालेबी धावत आले आन ब्येडरूमभायेर हुबे राह्यले का भाभीजीनं भय्याजीले कानपट्टीले घोडा लावून ठोकला का काय जनू? पण बाईबी वरडत होती.
दार तोडावं का तोडू नये? का आदी बडवून पहावं? काय सुचंना. छत्तीस कोटी द्येव. कोणाला आठवावं? याला आठवलं तर त्याला राग यायचा, त्याला आठवलं तर याला राग यायचा, कोनालाच नाई आठवलं तर पप्पु आठवलेला राग यायचा. काय ब्र करावं?
आखरीले बायकुचं स्मरण क्येलं... द्येव काय इचारायचे त्ये ज्याब तिलेच इचारतील आन आपल्याले इचारलं तर प्रातःसमयी तिलेच स्मरावं लागते सांगायचं.
मग बडवलं दार. नायतरी बंदुक कधी कामी येणार? दस्ताच तर त्येवडा साबूत हाय... बाकी काय काय गंजलंय आणि गोळ्या किती सरदल्यात त्ये कोनाच्या बापाले ठाउकाय?
तं आखरीले भाभीजीनं दार उगडलं उलुसं आन काय नाय काय नाय झोपा उगं म्हणाल्या.
म्हणलं आसं कसं झोपायचं? आप्ले मालक वराडले. उद्या त्येंचं काय झालंग्येलं तं च्यानलवाले मलेच इचारणार का तू कुटं हुता बाबा? काय करीत हुता? बार भरला हुता का तोंडात आन गुंगी आली हुती का? आता कसं वाटतंय?
भाभीजीला अशायेळंला आता कसं वाटतंय इचारलं तर लाजतीला! हां.. आसं इचारायचं आस्तंय का नव्या नव्या इधवेला? कसं खरं सांगाव येकायेकी बाईनं?
तं हां... मी तसाच हुबा राह्यलो, तं भाभीजी मनल्य का काय नाई र्‍ये. सपान पडलं त्येंना. सपनात काय दिस्लं त्ये बी सांगनात.
आता भाभीजीची बी कमाल हाये. बायकुला कोण आसं सगळं सांगत्ये का काय कदी?
मले आंतरज्ञान हाये; कोणाले काय सपान पल्डं आसेल त्ये बी वळकतो. गेल्या जन्मी ल्येखक हुतो. लवकर म्येलो. त्यामुळं या जन्मी तसली सिद्धी मिळालीय. छत्तीस कोटी द्येवांची आणि बायकोची कृपा.

तं सायबाचं सपान आसं हुतं :
म्येणबत्ती मार्च निगाला हुता. सायेब टीवीत बगत हुते, परतेक्ष नाई. तं टीवीतून येक महिला पत्रकार भायेर आली. तिच्या मागनं बाकी म्येणबत्यावालेबी आले. खोली खच्च भरली. रत्नखचित दागिना र्‍हातोय ना, तशी चमचम दिसू लागली. आदी तं सायबाच्या तोंडून लाळ गळू लागली. मंग येकायेकी त्येंचा च्येहरा बदलल्ला. त्यांना पायजमाच सापडत न्हवता. पलंगाखाली ग्येला का काय म्हनून शोदायला वाक्ले आनी आरडले.
मागाहून त्येंच्या पार्श्वभागातून पाच-पाच म्येणबत्त्या काडल्या डाक्तरनी शस्त्रक्रिया करून.
आणि त्याच येळंला येक बावीस वर्षाची पोरगी अनाउंस करत होती का... नुस्कान भर्पाई द्येऊ. उपचार नीट व्हतील याची काळ्जी घ्येऊ. यांचं नाव पेपरात द्येऊ नका. उपचाराचा खर्च अल्लग द्येऊ.
पालथे पडलेले साह्येब ठणाणा बोंबलू लागले... तं डाक्तरनं सांगलं का उगा वरडू नका. तुमाले ब्येडरूममदीबी सिक्युरिटीबी दिली जाईल पायजे तं... आसं सांगून राह्यलेत टीवीवर. आशा गोष्टी होत र्‍हातात म्हानगरांत.
भाभीजी समजाऊन र्‍हायल्यात का कलीयुग आलंय ना. तुमचा शनि वक्री आसल... र्‍हाउ काळ पायलाय का?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)