हुस्ना..

पियुष मिश्रांनी लिहिलेलं, कॉम्पोज केलेलं आणि गायलेलं हुस्ना पहिल्यांदा ऐकलं आणि मनात भरलं. नंतर अनेकदा ऐकलं, मनात घोळवलं.

त्याविषयी जसं सुचलं तसं...

**************************************************************************************************

पाकिस्तानात कोण जायला बसलंय? जायलाच कशाला पाहिजे, तुमचा-आमचा, प्रत्येकाचा सेप्रेट, पाकिस्तान तुमच्या-आमच्या मनात आहे.

तो कधी नव्हता? केन-एबलच्या मनात होताच की! महाभारतातल्या भाऊबंदकीत तो आहेच, मध्ययुगातल्या बेबंदशाहीत बेलगाम उधळला तो. हातपाय ऐसपैस पसरले त्याने. लांब का जा? आजही जनतेचे सेवक निढळाचा घाम गाळून पेरत असतातच की एकेका पाकिस्तानाची बीजं गल्ली-मोहल्ल्यात! तुमच्या-आमच्या फक्त मनातच असतो असं नाही पण मनातही असतो. आणि बाहेरही. मनातला असतो जरासा धूसर, पाचोळ्यानं झाकलेल्या विस्तवातुन येणार्‍या धुराच्या वळशांसारखा. आणि तोच जन्म देतो बाहेरच्याला. ते महत्त्वाचे. तुमचा पाकिस्तान मोठा असेल तर मला कदाचित काही सुटका नाही हो त्यातुन. मी आलंच पाहिजे. किंवा गेलंच. काय फरक पडतो तुम्हाला?

तर हा होता, आहे, असणार. आहे का? असावा का? असतोच का? वगैरे वगैरे म्हणजे वांझेच्या ओकार्‍या. पण 'आहे' म्हटलं म्हणुन याची टोचणी टळत नाही. आणि लाख मान फिरवलीत तरी याचा दाह पोळून काढणारच.

जावेद आणि हुस्नाच्या कहाणीच्या पार्श्वभूमीला हा पाकिस्तान होऊ घातलेला हिन्दुस्थान आहे. सर्वत्र खदखद आहे. पण जावेद आणि हुस्नाच्या मनात लाहोरच्या धुक्यात हरवलेल्या वाटा, दवं पांघरलेल्या सुंदर बागा आहेत. लग्न ठरलंय, भेटीगाठी होऊ लागल्यात, ओढ वाटु लागलीये.

कामानिमित्त जावेद लखनौला आला काय आणि ते सगळं अभद्र सुरू झालं. लोक दिशा हरवले, बागेतल्या गुलाबांवर रक्ताचे शिंतोडे उडाले. जावेदची परतीची वाट काटेरी कुंपणात अडकली. तडफडला काही दिवस पण मग शहाणा झाला. आता दोन गोंडस पिल्लं आहेत त्याची. सगळं सुखाचंच चाललंय, पण डोळे मिटले की मनातला एक तरूण अडखळत, धूंडाळत शोधत असतो हुस्नाच्या पाऊलखुणा. लाहोरमध्ये. त्या दुसर्‍या मुलुखात. पाकिस्तानात. त्याच्या आठवणीतलं लाहोर! त्याच्या आठवणीतली नव्या नव्हाळीतली हुस्ना. काळ जणू थांबलाय त्याच्यासाठी. पण फार वेळ रेंगाळता येत नाही तिथे टोचणीवाचुन. मग मनातली वेदना झरू लागते, अंधुक-निवडक स्मृतींचा झिम्मा शब्दांतुन उमटू लागतो.

लाहौर के उस पहले जिले के दो परगना में पहुंचे
रेशम गली के, दूजे कूचे के, चौथे मकां में पहुंचे
और कहते हैं जिसको दूजा मुल्क, उस पाकिस्तां में पहुंचे
लिखता हूँ ख़त मैं हिन्दोस्तां से, पहलू-ए हुस्ना में पहुंचे
ओ हुस्ना..

मैं तो हूँ बैठा, ओ हुस्ना मेरी, यादों पुरानीयों में खोया
पल-पल को गिनता, पल-पल को चुनता, बीती कहानी में खोया
पत्ते जब झड़ते हिन्दोस्तां में यादें तुम्हारी ये बोलें
होता उजाला हिन्दोस्तां में बातें तुम्हारी ये बोलें

ओ हुस्ना मेरी
ये तो बता दो
होता है, ऐसा क्या
उस गुलिस्तां में
रहती हो नन्हीं कबूतर सी
गुमसुम जहाँ
ओ हुस्ना..

आणि बाकी सगळं कसं आहे तिकडे? अजुन हुझुरी बागेशेजारी, बाजाराच्या वाटेवर तो मोठा पिंपळ, तो दगडी पार तसाच आहे का? त्याचं एक तळहाताएवढं पान, शीरांच्या जाळ्यासकट अजुन आहे पुस्तकाच्या पानात ठेवलेलं माझ्याकडे. तुझंच पुस्तक ते, बुल्ले शाहच्या रचनांचं. माझ्याकडेच राहिलं. पिंपळ अजुन तसाच सळसळतो का? पानं तशीच गळतात का गं अजुन? इथेही एक पिंपळ आहे त्यासारखा पण तो निराळाच.

पत्ते क्या झड़ते हैं पाकिस्तां में वैसे ही
जैसे झड़ते यहाँ
ओ हुस्ना..
होता उजाला क्या वैसा ही है
जैसा होता हिन्दोस्तां में हाँ
ओ हुस्ना..

वो हीरों के रांझे के नगमें
मुझको अब तक, आ आके सताएं
वो बुल्ले शाह की तकरीरों के
झीने झीने साये..

मला आठवते ईदच्या वेळची ती सगळी धामधूम.. फझ़र नमाझासाठी उठायची गडबड. डोळे चोळत, कसंबसं आवरून मशिदीत पोचलं की दिसणारी गर्दी. अन् मग थोड्या वेळानं आवारात नजर जाईल तिकडे झुकलेले नमाझी. मशिदीच्या बाहेरचा तो खमंग कलकलाट.. ते रेवडीचे ढीग, ती शेवयांची झालर. आणि आठवते ती दिवाळीत लालाजींच्या दुकानातली रोषणाई - मिठाई, गुरदीपचा बैसाखीतला भांगडा, ते रंग, ती चिमट्यांची खणखण्, ढोलावर डग्गा-तिलीचा तडाखा! थंडी ओसरायला लागली की टालावरून उचलून आणलेल्या लाकडांची, ढलप्यांची साठवण व्हायची. अन् मग जी होळी पेटायची! गर्दी दहादिशा झाल्यावर, चट्चट् आवाज येणार्‍या ओंडक्यांवर दोघांनी धरलेल्या ओंजळी, तो उबदार, हवाहवासा स्पर्श..

वो ईद की ईदी लम्बी नमाजें
सेंवैय्यों की झालर
वो दिवाली के दीये संग में
बैसाखी के बादल
होली की वो लकड़ी जिनमें
संग-संग आंच लगाई
लोहड़ी का वो धुआं जिसमें
धड़कन है सुलगाई
ओ हुस्ना मेरी
ये तो बता दो
लोहड़ी का धुंआ क्या
अब भी निकलता है
जैसा निकलता था
उस दौर में हाँ वहाँ
ओ हुस्ना..

क्यों एक गुलसितां ये
बर्बाद हो रहा है
एक रंग स्याह काला
इजाद हो रहा है

ये हीरों के, रांझों के नगमे
क्या अब भी, सुने जाते है हाँ वहाँ
ओ हुसना
और
रोता है रातों में
पाकिस्तां क्या वैसे ही
जैसे हिन्दोस्तां
ओ हुसना

आठवणी आता धूरकट होत चालल्यात.. पण काळजातला व्रण अजुन जागा आहेच. तो कधी जायचा नाही. मनातल्या फुलबागेत डागण्या देणारे ते दिवस अजुन डोके वर काढतात. वाटतं सगळ्या हवेतच भरून राहिलीय ती तडफड, ती घुसमट.. मागे जाऊन कायकाय बदलु मी? तेव्हा मीही वेगळा होतो आजच्याहुन. अन् तूही बदलली असशीलच माझ्या कल्पनेपेक्षा.. पण सांग ना गं काही बदललंय का आज खरोखर? अजुन लोक रात्री पाय मोकळे करायला येतच असतील शालिमार बागेजवळ. गप्पा, कहाण्या इकडून तिकडे जमा होतच असतील की! आणि गेलेल्या दिवसांच्या, माणसांच्या आठवणीही निघत असतील कदाचित, नाही? मला तर अजुन छातीत कळ येते बघ..

आणि कदाचित तुलाही साहवत नसेल हे सगळं... हो ना गं?

इथे हुस्ना ऐका..

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

'हुस्ना' या गाण्याविषयी आणखी वाचण्यासारखा तपशिलातला लेख 'आंदोलन' मासिकामध्ये रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिला होतो, तो इथे वाचता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेझींग!! फार आभारी आहे. लेख आधी वाचनात आला नाही.

जबरदस्त लिहिले आहे हुस्नाबद्दल सगळ्या अंगानी या माणसानं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहेत दोन्ही लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हुस्ना' गेले काही महिने ऐकते आहे, अजूनही समाधान झालेलं नाही.

डोक्यातला सगळा गोंधळ अचानक शांत होताना "ये हीरों के, रांझों के नगमे..." म्हणताना जावेदला काय वाटलं असेल हे आपापलं समजून घेतलेलंच बरं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तू हे गाण‌ं सुच‌व‌लेल‌ंस (ख‌फ‌व‌र‌ती का फोन‌व‌र‌ती?)
काय‌ हॉंटिंग‌ गाण‌ं आहे. निव्व‌ळ हॉंटिंग‌. म‌ला झेप‌ल‌ं प‌ण क‌स‌ं ब‌स‌ं. मूड विष‌ण्ण!!

होली की वो लकड़ी जिनमें
संग-संग आंच लगाई
लोहड़ी का वो धुआं जिसमें
धड़कन है सुलगाई

.

"ये हीरों के, रांझों के नगमे..." म्हणताना जावेदला काय वाटलं असेल हे आपापलं समजून घेतलेलंच बरं असं वाटतं.

ख‌रे आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाण्याविषयी कितीही लिहलं गेलं तरी त्यातला आत्मा पकडणं कठीण आहे. मला तो कधीच मिळू नये, नाहीतर खूप काहीतरी भयंकर निसटून गेल्याची भावना निर्माण होईल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

पियूष मिश्रा गीतकार म्हणून खरोखर ग्रेट आहे. हुस्ना तर निव्वळ लाजवाब. आता याविषयी सगळं काही वर आणि इतरही ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याविषयी आणखी काय बोलणार.
लेख खरोखर आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पियुष मिश्रा हा स्वतः खूप संवेदनशील कवी आहे. त्याच्या या लिखाणातून, स्वरातून जीवाला पीळ पाडणारी आर्तता व्यक्त होते. ह्या गाण्याचे झपाटलेपण आपोआपच आपल्यावर स्वार होते. अन विशेष म्हणजे ते उतरूही नये असे वाटत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाण्याचे झपाटलेपण

अग‌दी अग‌दी हॉंटिंग‌!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0