गढवाली वाडी मधला सोन्याचा हंडा

2 जानेवारी 2011 हा दिवस, गुजरात मधील एका प्राचीन जागी उत्खनन करत असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांसाठी, सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा ठरला. ‘गढवाली वाडी‘ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या स्थानी एका खड्ड्यात खणत असलेल्या एका मजुराला दोन छोट्या आकाराचे मातीचे कुंभ पुरलेले असल्याचे आढळून आले. त्याने हे कुंभ बाहेर काढले व स्थानीय सुपरवायजर श्री. एस. नंदकुमार यांच्याकडे तो ते घेऊन गेला. ते कुंभ मग ते दोघे या उत्खनन स्थळाची जबाबदारी अंगावर असलेले सुपरिन्टेंडिंग आर्किऑलॉजिस्ट श्री. जितेंद्र नाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्या कुंभात असलेल्या वस्तू तपासल्यानंतर आश्चर्यचकित झालेले श्री. नाथ यांनी या कुंभात असलेले मणी व इतर वस्तू सोन्याच्या असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेप्रमाणे:
” या दोनपैकी एका कुंभात सोन्यातून बनवलेले व चकतीसारखे दिसणारे 26 मणी, अगदी बारीक आकाराचे गोल मणी आणि एक अंगठी आणि या शिवाय एका विशिष्ट मृदू अशा पाषाणापासून बनवलेले मणी सापडलेले आहेत. परंतु खरी आशचर्याची बाब ही आहे की या वस्तू सोन्यापासून बनवलेल्या असल्या तरी हे सोने साधेसुधे नसून 4200 वर्षांपूर्वी किंवा सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या हडप्पा कालामधील (इ.स.पूर्व 2565 ते 2235) ते सोने आहे.”
ज्या स्थानावर हे उत्खनन केले जात होते ती जागा ‘गढवाली वाडी‘ या नावाने ओळखली जाते. भुज पासून ‘नारायण सरोवर‘ कडे जाणार्‍या राज्य महारस्त्यावर भुजच्या साधारण वायव्येला, 85 किलोमीटरवर, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील नाखत्राणा तालुक्यात असलेले ‘खिरसारा‘ नावाचे एक गाव लागते. या गावाच्या आग्नेय दिशेला ‘खारी‘ या नावाची एक नदी वाहते. या नदी पासून थोड्या अंतरावर ही जागा आहे.

तसे पहायला गेले तर 1970 च्या दशकापासूनच ‘गढवाली वाडी‘ या स्थानावर हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष सापडतात हे भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांना ज्ञात होते. भारतीय पुरातत्त्व विभाग प्रसिद्ध करत असलेल्या ‘ इंडियन आर्किऑलॉजी‘ या वार्षिकाच्या 1976-77 या वर्षाच्या अंकात या स्थानावर मिळालेल्या काही महत्त्वाच्या पुरातन वस्तूंबद्दल खालील उल्लेख आढळतो.
” हडप्पा कालीन पुरातन वस्तू, नेत्रा-खिरसारा गाव, कच्छ जिल्हा : – पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडळाचे श्री. एन.एम.गणम यांना वरील जागेवर शोध घेत असताना हडप्पाकालीन मोठ्या चौरस आकाराचे एक वजन, भाजलेल्या मातीच्या व पॉलिश केलेल्या भांड्यांचे तुकडे आणि पाण्याचा फवारा उडवता येईल या प्रकारच्या झारीचे मुख व नळ्या मिळाले. गुजरात शासनाच्या पुरातत्त्व संचालकांना लोलक बसवलेल्या आधुनिक होकायंत्राशी तुलना करता येईल या प्रकारचे एक शोध घेणारे उपकरण ‘गढवाली वाडी‘ येथे सापडले.”
(ही नोंद वाचून मी खरे तर बुचकळ्यातच पडलो आहे. माझ्या माहितीप्रमाणे होकायंत्राचा शोध चीनमध्ये हान घराणे राज्यावर असताना म्हणजे इ.स.पूर्व 2रे शतक ते इ.स. पहिले शतक या कालखंडात लागलेला आहे. 4200 वर्षे पुरातन असलेल्या हडप्पाकालीन स्थानावर ( 2565 ते 2235 इ.स.पूर्व) होकायंत्रासमान उपकरण कसे सापडू शकते ही गोष्ट अनाकलनीय व अशक्य वाटते. परंतु या बाबत जास्त माहिती मिळणे शक्य नसल्याने ही बाब मला तशीच सोडून दिली पाहिजे.)

असे वाटते की 1970 ते 1972 या कालात केलेल्या ‘सुरकोटाडा‘ येथील उत्खननात व व 1990 ते 2005 या कालात केल्या गेलेल्या ‘धोलावीरा‘ येथील उत्खननात जे अभूतपूर्व यश भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांना प्राप्त झाले त्यामुळे हुरुप येऊन डिसेंबर 2009 मध्ये परत एकदा विस्तृत प्रमाणातील उत्खनन कार्य ‘गढवाली वाडी‘ येथे भारतीय पुरातत्त्व विभागाने सुरू केले आणि नेटाने ते पुढची 3 वर्षे चालू ठेवले. ही तिन्ही वर्षे, वर्षातील 4 किंवा 5 महिने उत्खनन विभागाच्या 100 लोकांचा एक गट ( ज्यात उत्खनन तज्ञ आणि मजूर यांचा समावेश होता.) या स्थानावर कार्यरत होता आणि या प्रयत्नांना लगेचच यश प्राप्त झाले.

या उत्खनन प्रकल्पाचे संचालक श्री जितेन्द्र नाथ यांना एप्रिल 2010 मधल्या एका सकाळी दिसलेल्या दृष्यांचे संपूर्ण स्मरण आहे. ते म्हणतात:
” त्या सकाळी उत्खनन केलेल्या खड्ड्याच्या काठावर उभे राहून वमोरचे दृष्य बघताना माझे डोळे आश्चर्याने अक्षरशः विस्फारून गेले होते. समोरच्या खड्ड्याच्या एका कोपर्‍यात चार छिद्रे असलेले एक उंच आणि निमुळत्या आकाराचे,गंजासारखे भांडे उभे होते. या वरील छिद्रे वरच्या कडेच्या खालील बाजूस आणि समोरासमोरच्या बाजूस प्रत्येकी दोन अशी पडलेली होती. मातीत अर्धवट पुरली गेलेली व उत्कृष्ट कारागिरी दर्शवणारी 3 भांडी तेथे दिसत होती आणि या पैकी एका भांड्याचे उलटे पडलेले झाकण पलीकडच्या बाजूस पडलेले होते. एखाद्या पंख पसरून उड्डाण करत असलेला पक्षी शिकार्‍याची गोळी लागून जखमी होऊन जमिनीवर पडावा तसाच दिसणारा एक मोठ्या आकाराचा शंख खड्ड्याच्या तळावर पडलेला होता.”
उत्खननात सापडलेल्या या वस्तूंमुळे आश्चर्यचकीत झालेल्या श्री. नाथ यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात संशोधन करणार्‍या व त्यांना या प्रकल्पात सहकार्य करणार्‍या तरूण पुरातत्त्व संशोधक श्रीमती कल्याणी वाघेला यांना लगेचच सांगितले होते:
” या छोट्याशा खड्ड्यात आपल्याला एबढी भांडी मिळाली आहेत आहेत की हा खड्डा मोठा करणे आपल्याला अपहरिहार्य आहे. तो मोठा केला की आपल्याला येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडी का सापडत आहेत याचे कारण लक्षात येईल.”
श्री. जितेन्द्र नाथ यांचे भाकित थोड्याच दिवसात खरे ठरले. डिसेंबर 6, 2012 पर्यंत 10 मीटर X 10 मीटर आकाराचे 39 खड्डे याच ठिकाणी खणले गेले गेले आणि या ठिकाणी अगणित संख्येची व अनेक आकार व मापांची भांडी व इतर गोष्टी येथे सापडल्या. यामध्ये छिद्रे पाडलेली, गोलसर, रंगवलेली, पसरट, उभट, भांडी त्याचप्रमाणे बशा, बोल्स, डाव, सुगंध निर्मिती साठी वापरण्याची ज्वलनपात्रे हे ही सापडले. (globular pots, sturdy storage jars, painted ware, perforated parts of broken jars, incense burners, dish-on-stand, goblets, beakers, basins, bowls, ladles) या खड्ड्यांत सर्वत्र भाजलेल्या मातीची भांडीच फक्त विखुरलेली दिसत होती. या भांड्यांशिवाय युनिकॉर्न आणि नीलगाय यांची चित्रे असलेली मातीची चौकोनी सील्स, हडप्पा लिपी मधील चित्राक्षरे असलेली चौकोनी सील्स आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्तर कालात प्रचलित असलेली गोल आकाराची सील्स ही सुद्धा तेथे सापडली. यामुळे हे स्थळ उत्तर हडप्पा संस्कृतीकालीन असल्याचे सिद्ध होत होते.

खिरसारा येथील पुरातन स्थल हे धोलावीरा येथे उत्खननात सापडलेल्या नगराएवढे विस्तृत स्वरुपाचे नसले तरी तरी सापडलेल्या अवशेषांवरून पद्धतशीर नगररचना करून बांधलेली, वस्तीची घरे, गोदाम, कारखान्यातील उत्पादन आणि वस्ती अशा दोन्ही कामांसाठी वापरल्या जाणार्‍या वास्तू व त्याला लागून असलेल्या फक्त वस्तीसाठीच्या खोल्या आणि मातीची भांडी भाजण्यासाठी बांधलेली भट्टी येथे अस्तित्वात होती असे दिसते. या वस्तीवरील अधिकारी वर्ग, तटबंदी असलेल्या किल्यामध्ये चौरस आणि चौकोनी आकाराच्या खोल्या, त्यासमोर बांधून काढलेला व्हरांडा,त्यातून वरील मजल्यावर जाण्यासाठी काढलेला जिना आणि निरनिराळ्या रंगातील टाइल्स बसवलेली जमीन, अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या घरात रहात असे. हा किल्ला अगदी गोदामालगत बांधलेला होता, जेणेकरून अधिकारी वर्गाला गुदामात चालू असलेल्या उत्पादन आणि व्यापार या संबंधीच्या कार्यांवर बारीक नजर ठेवता येत असे. किल्यालगत असलेले गोदाम 28 मीटर लांब व 12 मीटर रूंद होते व याच्या आत एकमेकाला समांतर असलेल्या अनेक 10 मीटर लांब आणि 1.5 मीटर रूंद अशा भिंती बांधलेल्या होत्या. सर्व बांधकाम घडविलेल्या सॅन्डस्टोन पाषाणातील असून, बांधकामातील दगड मातीच्या प्लॅस्टरमधे पक्के रचलेले होते. खिरसरा मधील प्राचीन स्थळाचे एक वैशिष्ट्य असे सांगता येते की या मध्ये असलेल्या प्रत्येक वस्ती भोवती तटबंदी होती व या शिवाय संपूर्ण वसाहती भोवती एक अतिरिक्त तटबंदी बांधलेली होती. होती. किल्ला, गोदाम, कारखाना आणि भट्टी या प्रत्येकाभोवती स्वतंत्र तटबंदी होती. अशा अनेक तटबंदी दुसरीकडे कोठे सापडलेल्या नाहीत.

खिरसारा उत्खननात अतिशय मोठ्या संख्येने, शोभेच्या आणि रोजच्या वापरातील वस्तू प्राप्त झाल्या आहेत. वर निर्देश केलेले चकतीसारखे, सूक्ष्म आकाराचे आणि पुंगळीसारखे असलेले सोन्याचे मणी तर मिळाले आहेतच पण या शिवाय शंख शिंपले, मृदू पाषाण, आणि मौल्यवान खडे यापासून बनवलेले मणी सुद्धा मिळाले आहेत. या मौल्यवान खड्यात lapis lazuli, agate, carnelian, chert, chalcedony and jasper यापासून बनवलेल्या मण्यांचा समावेश आहे. एका खड्ड्याततर मृदू पाषाणापासून बनवलेले 25000 हून अधिक मणी मिळाले. तांब्यापासून आणि शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या बांगड्या, इनले काम (inlays) आणि अंगठ्या सुद्धा प्राप्त झाल्या आहेत. तांब्यापासून बनवलेल्या व प्राप्त झालेल्या हत्यारात छिन्या, चाकू, सुया, अग्रे, मासे पकडण्याचे हूक, बाणाची अग्रे आणि वजने मिळाली आहेत. या शिवाय हाडांपासून बनवलेली हत्यारे, अग्रे आणि मणी हे पण मिळाले आहेत.

येथे सापडलेल्या प्राचीन वस्तूंवरून एक गोष्ट खचितच लक्षात येते की खिरसारा हे पश्चिम कच्छ मधील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र होते. खिरसारा मधील कारखाना बहुविध उत्पादनांची आश्चर्यजनक व मोठी अशी एक मालिकाच उत्पादन करीत होता. यात painted pottery, sturdy storage jars, globular pots, perforated jars, basins, dishes, bowls, beakers, dish-on-stand and incense burners यासारख्या उत्पादनांचा समावेश होता. रंगवलेल्या मातीच्या भांड्यांवर पट्टे, क्रॉस, स्पायरल्स, झिगझॅग यासारखी भौमितिक डिझाइन्स आणि प्राण्यांच्या चित्रांच्यावर आधारित डिझाइन्स, रंगवलेली असत. या शिवाय विपुल प्रमाणात आढळणारी अगदी छोटी भांडी हे सुद्धा खिरसाराचे वैशिष्ट्य मानता येईल.

सध्याच्या पाकिस्तान मधील सिंध प्रांत हा खिरसारा गावापासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर आहे. गुजराथ मधील इतर भाग आणि सिंध यांच्यामधील व्यापार ज्या मार्गाने पूर्वी चालत असे त्या मार्गावरच खिरसारा हे गाव वसलेले आहे. यामुळे असा निष्कर्ष काढणे सहज शक्य आहे की हडप्पा कालात या स्थळावर जे रहिवासी रहात होते ते मूलत: उत्पादक आणि व्यापारी होते. हडप्पा संस्कृतीतील जवळपास किंवा दूर अंतरावर असलेली इतर गावे, शहरे आणि वसाहती यांना खिरसारा मधे औद्योगिक स्वरूपात उत्पादित केलेला माल हे रहिवासी निर्यात करत असत.

खिरसारा यथील उत्खननामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना आणि इतर संशोधकांना आणखी एक अतिरिक्त फायदा मिळणार आहे. हडप्पा संस्कृती लिपी मधील अक्षरे कोरलेल्या चौकोनी पट्टीच्या आकाराच्या सील्सचा येथे लागलेला शोध, हा हडप्पा लिपी समजावून घेण्याच्या दृष्टीने पुढे पडलेले एक पाऊल आहे असे आता मानले जाते आहे.

23 ऑगस्ट 2013

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

उत्तम माहिती
एकदम ताजी माहिती आहे. Smile
समांतर प्रश्नः
१. सदर काम (विशेषतः कच्छ मधील) प्रत्यक्ष जाऊन बघता येते का? असल्यास काही विशेष परवाना लागतो का?
२ ही जी भांडी वगैरे मिळाली त्यासाठी एखादे संग्रहालय उभारले गेले आहे का? कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही प्रथमच ऐकलेली माहिती दर्शविल्याबद्दल धन्यवाद.

अधिक वाचन करावयास एक धागा मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहिती !!! याबद्दल आधी एके ठिकाणी पाहिले होते. कुठे ते विसरलो. हडप्पा.कॉम येथे या सोन्याच्या चकत्यांचा फोटो पाहिला होता, पण होकायंत्र इज़ समथिंग व्हेरी न्यू!!!! काय काय सापडेल काही सांगता येत नाही. १२०० हडप्पाकालीन साईट्सपैकी वट्ट ४०० चेच उत्खनन आत्तापर्यंत झालेय. उरलेल्या साईट्सच्या पोटात काय दडले असेल कुणास ठाऊक???

अवांतरः हडप्पा स्क्रिप्टबद्दल मध्ये एक रोचक माहिती वाचलेली ती अशी- काही हडप्पन लोकांचे एक गाव मेसोपोटॅमियामध्ये होते आणि त्यांच्या एका हडप्पन-टु-अक्कादियन ट्रान्स्लेटरचे नावही नमूद आहे. इन्शाल्लाह, कदाचित, कधीतरी, कुठेतरी, एक हडप्पन-अक्कादियन असे द्वैभाषिक इन्स्क्रिप्शन मिळेल तेव्हा अनेक अत्रुप्त आत्मे त्रुप्त होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या ट्रान्स्लेटरचं नाव शु-इलिशु (shu-ilishu). सिंधु संस्कृतीच्या प्रदेशाला तेव्हा मेलुहा म्हणून ओळखलं जायचं - हा ट्रान्स्लेटर स्वतःला मेलुहाच्या भाषेचा अनुवादक असं म्हणवून घेतो
खिरसरातील पुरावशेषांचे फोटो या दुव्यावर बघायला मिळतील

खिरसराच्या पाठोपाठ डेक्कन कॉलेजमधील डॉ. शिरवळकर आणि गुजरात स्टेट आर्किऑलोजी डिरेक्टोरेटचे डिरेक्टर रावत यांनी कोटडा भडली नामक कच्छमधील गावापाशी उत्खनन केले तिथेही तटबंदीयुक्त सिंधूसंस्कृतीची वसाहत मिळाली आहे. हे शहर नसून व्यापारी मार्गावरील महत्वाचं ठाणं असावं असा अभ्यासकांचा कयास आहे. इथे व्यापारी वस्तूंबरोबरच तांब्याच्या वस्तूंच्या उत्पादनाचे पुरावे मिळाले आहेत. तसंच एक तांब्याची पेन्सिलच्या आकाराची ५ सेमी लांब सळई मिळाली आहे आणि तिचे टोक सोन्याच्या पत्र्याचे आहे. तिचा वापर नक्की कशासाठी होत असावा याचं अनुमान करता आलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्म्याम!!! शु-इलिशु हे नाव विसरलो होतो, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुव्याबद्दल आभार. तिसर्‍या फोटोतील चपट्या चकत्यांची माळ (एखाद्या कमनीय यौवनेवर) आताच्या काळातही, हल्लीच्या कपड्यांवरही अतिशय सुरेख दिसेल असे वाटते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे स्थळ सर्वसाधारण नागरिकांसाठी पुरातत्त्व विभागाने खुले केले आहे का? किंवा येथे सापडलेल्या वस्तू प्रदर्शनासाठी कोठे ठेवल्या आहेत या संबंधी माहिती माझ्याजवळ तरी नाही. परंतु हे स्थळ त्याचा अचूक ठावठि़काणा आणि येथे सापडलेल्या काही वस्तूंची छायाचित्रे माझ्या ब्लॉगवर येथे बघता येतील.

लेखाला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्रशेखरजी, एक प्रश्न आहे. आपण सांगितल्याप्रमाणे आपला ब्लॉग पाहिला, परंतु त्या होकायंत्रवजा वस्तूचा फोटो काही दिसला नाही. तरी तो कुठे पाहता येऊ शकेल याबद्दल काही सांगू शकाल का? आपण संदर्भ दिलेला इंडियन आर्किऑलॉजीचा १९७६-७७ सालचा अंकही नेटवर पाहिला, त्यातही कुठे काही दिसत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंडियन आर्किऑलॉजी मधील मूळ मजकूर असा आहे.

7. Harappan Antiquities, Netra Khirasara, District Kutch- Shre N.M. Ganam of the western circle of the survey, while reexploring the site, encountered a cubical wight of substantive size, chanks and pottery of the Harappan period besides sprinklers and sprouts of red polished ware of early historical times. The Director of Archaeology, Government of Gujarat, recovered a survey instrument, comparable to the modern prismatic compass from the site called Gadhvali Vadi.

हा मजकूर वाचून मी सुद्धा चक्रावून गेलो आहे. या तथाकथित होकायंत्राचे छायाचित्र मला तरी कोठे मिळाले नाही. वैयक्तिक रित्या मला हा शोध एकूण संशयास्पद वाटत असल्याने मी पुढे फारशी शोधाशोध केली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. मीही तेवढाच मजकूर पाहिला. फक्त तेवढेच लिहिल्यामुळे जरा संशय वाढतो हेही खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंडियन आर्किऑलॉजी च्या १९७६-७७ च्या अंकातील नोंद पृष्ठ ७४ वर आहे. कोणाला ती नोंद बघायची असल्यास ते बघू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अशा स्थळांना भेटी द्यायला कधीच बंदी नसते. फक्त आता गेलात तर सर्वसामान्यांना रस वाटेल असं काही दिसत नाही. उत्खनन झाल्यावर खड्डे बुजवले गेले असतील. थोडी फार खापरं आणि इतर पुरावशेष विखुरलेले दिसतील. ज्यांना खूप रस आहे ते जितेन्द्रनाथ (किंवा त्यांची बदली झाली असल्यास गुजरात सर्कलचे संबंधित अधिकारी) यांच्या कार्यालयात भेट देऊन माहिती घेऊ शकतात, एखादवेळेस उत्खनित वस्तूही बघायला मिळू शकतात

होकायंत्रवजा वस्तू (प्रिझ्मॅटिक कम्पास सारखी) मिळाली आहे असं आय.ए.आर मधे नमूद केलं आहे. पण खिरसरा या ठिकाणी फक्त सिंधूसंस्कृतीचेच नव्हे तर नंतरचे ऐतिहासिक काळातील अवशेषसुद्धा मिळाले आहेत. तेव्हा ही वस्तू (ज्याचा फोटो किंवा इतर नोंदणीकरण अस्तित्वात नसल्याने आणखी काहीच भाष्य करता येणार नाही) सिंधूसंस्कृतीच्याच काळातली असेल असं अजिबातच प्रतिपादन करता येणार नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होकायंत्रवजा वस्तू (प्रिझ्मॅटिक कम्पास सारखी) मिळाली आहे असं आय.ए.आर मधे नमूद केलं आहे. पण खिरसरा या ठिकाणी फक्त सिंधूसंस्कृतीचेच नव्हे तर नंतरचे ऐतिहासिक काळातील अवशेषसुद्धा मिळाले आहेत. तेव्हा ही वस्तू (ज्याचा फोटो किंवा इतर नोंदणीकरण अस्तित्वात नसल्याने आणखी काहीच भाष्य करता येणार नाही) सिंधूसंस्कृतीच्याच काळातली असेल असं अजिबातच प्रतिपादन करता येणार नाहीये.

सहमत. पण कसेही असले तरी भारतातल्या उत्खननात असे काही सापडल्याची बातमी मी पहिल्यांदाच वाचली, त्यामुळे उत्सुकता वाढली.

तदुपरि एक प्रश्नः उत्खननात जे सापडले ते एकदाचे पब्लिश केल्यावर या सर्व गोष्टी नक्की कुठे जातात? कुठल्या म्युझियमला की कसे? मूर्ती, नाणी वगैरे एखादवेळेस जात असतीलही कुठेतरी, परंतु या साईट्सचे पुढे काय होते? पुढेही या उत्खननासाठी ठेवल्या जातात की खड्डे बुजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या? कारण मी पाहिले आहे, जुन्या पुस्तकांतील प्रकाशित शिलालेखांना प्रत्यक्ष ट्रॅक करायचे म्हंजे सोपे काम नाही. खुद्द मिरजेच्या किल्ल्यातील काही फारसी शिलालेख जे ग.ह. खर्‍यांनी प्रकाशित केले होते ते बहुतेक सगळे मिसिंग आहेत हे माहिती आहे. त्यामुळे हे असे होणे सार्वत्रिक आहे की कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एएसआय ने उत्खनन केले असेल तर उत्खनित पुरावशेष, त्यांच्या नोंदी इत्यादी गोष्टी त्यांच्याकडे असतात - यथावकाश दिल्ली किंवा प्रांतीय कार्यालयांमधे डिपॉझिट केल्या जातात.
विद्यापीठाने उत्खनन केल्यास या गोष्टी विद्यापीठाच्या - त्या डिपार्टमेन्टच्या - ताब्यात जातात. या सर्व नोंदींचा उपयोग करून तपशीलवार उत्खनन अहवाल लिहिणे अपेक्षित असते

साईट्स या बहुतांशी खाजगी किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असतात. त्यांच्याकडून परवानगी घेऊन खणाखणी होते. काम संपल्यावर खड्डे बुजवले जातात आणि उत्खनकांचा त्यावरील स्टेक संपतो. बरेच वेळा या साईट्स शेतजमिनीतसुद्धा असतात.
जर एखादी साईट फार म्हणजे फारच महत्वाची असेल तर मात्र शक्य तेवढा भाग एएसआय ताब्यात घेऊन संरक्षित म्हणून जाहीर करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा. माहितीकरिता बहुत धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह असे आहे तर!
मग कोणाला दायमाबाद साईट बद्दल स्टेटस माहिती आहे काय? तिथे साईट शिल्लक आहे का बुजवलेली आहे?
पुढील औ'बाद ट्रीपच्या वेळी तिथे चक्कर टाकायचा बेत होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दायमाबाद साइट नगर जिल्हा, श्रीरामपूर तालुका येथे प्रवरा नदीच्या काठावर, नेवासे गावापासून काही किमी अंतरावर आहे. ए.एस. आय ने येथे बरेच उत्खनन केलेले आहे परंतु साइट्वर फारसे काही बघण्यासारखे असेल असे वाटत नाही. हा दुवा बघा.

दायमाबाद मधील सगळ्यात प्रसिद्ध शोध म्हणजे तेथे एका शेतकर्‍याला सापडलेल्या कथीलाच्या मोठ्या वस्तू. यात बैल जोडलेला रथ आणि हत्ती अतिशय प्रेक्षणीय आहेत. मी या वस्तू दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात बघितल्या असून माझ्याजवळ त्याची छायाचित्रे आहेत. प्राचीन भारतात रथाला घोडे जोडत नसून बैल जोडत होते हे या वस्तूंवरून स्पष्ट होते. (टीव्ही सिरियल मधे काहीही दाखवत असले तरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात स्वतंत्र हडप्पा कक्षच आहे. दायमाबादचा रथ, ती मोहेंजोदडोची "डान्सर" मुलगी, वजनमापे, लेपिस लाझुलीचे कोरलेले असंख्य बीड्स, ती फेमस पशुपती अन अन्य लोकांची चित्रे असलेली हडप्पा लिपीतील सील्स, इ.इ. काय काय आहे! खजिनाच जबरदस्त. आणि ३०/- घेऊन का होईना, फोटो अलाउड आहेत हे सर्वांत जबरदस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साईट 'शिल्लक' आहे (एएसआय ने त्याचा काही भाग संरक्षित केला आहे). पण आधीच्या प्रतिसादात उल्लेख केल्याप्रमाणे खड्डे बुजवलेले आहेत. साईटवर हिंडलात तर ताम्रपाषाणयुगीन खापरं दिसतील, फार बारीक नजर असेल तर गारगोटीची छोटी हत्यारं, मणी असंही काही मिळू शकेल. दिल्ली-दौंड रेल्वेलाईनवर पुणतांब्यापाशी जो प्रवरेवर रेल्वेचा पूल आहे तिथे पूर्वेच्या बाजूला ही साईट आहे.

@चंद्रशेखर - त्या दायमाबाद ब्रॉन्झेसमधे बैलाची गाडी/ रथ आहे या एका उदाहरणावरून प्राचीन भारतात रथांना बैल जोडत असत हे विधान करणं कितपत तर्कसुसंगत आहे? ती ब्रॉन्झेस उत्तरसिंधूसंस्कृतीशी संलग्न आहेत असं मानलं जातं. तेव्हा घोडा भारतीय उपखंडात माहित नव्हता (सिंधूसंस्कृतीच्या सुरकोटडा किंवा तत्सम ठिकाणी सापडलेली 'घोड्या'ची हाडं ही तिथल्या रानटी गाढवांची हाडं आहेत असं हाडतज्ज्ञांचं मत आहे) म्हणून गाडीला ओढ्णारे प्राणी हे बैल असणं अगदीच स्वाभाविक आहे. शिवाय त्या 'गाडी'ला आपण रथ/चॅरियट म्हणतोय. तो काही संस्कृत साहित्यात वर्णन केलेला रथ नव्हे. या ब्रॉन्झेसचा काळ अदमासे इसपू २००० च्या आसपासचा आहे. आणि ऐतिहासिक काळ त्यानंतर सुमारी दीडेक हजार वर्षांनी सुरू झाला

@बॅटमॅन - दिल्लीच्या नॅशनल म्यूझियममधे या हरप्पन सील्सच्या प्लास्टर ऑफ पॅरिसमधे केलेल्या छोट्या प्रतिकृतीही सूव्हेनीर्स म्हणून मिळतात (स्टॉक असेल तर), इतर शिल्पांच्या प्रतिकृतीही मिळतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंधूसंस्कृतीच्या सुरकोटडा किंवा तत्सम ठिकाणी सापडलेली 'घोड्या'ची हाडं ही तिथल्या रानटी गाढवांची हाडं आहेत असं हाडतज्ज्ञांचं मत आहे)

या मुद्द्याचा चावून चोथा झालाय तसा, परंतु विख्यात हंगेरियन घोडेतज्ञ श्री. सँडोर बोकोर्न्यी यांनी ती हाडे घोड्याचीच-ईक्वस कॅबॅलस-चीच आहेत असे सिद्ध केलेय. अर्थात यावरून अन्य जनरलायझेशन करणे चूक आहे. निर्विवादपणे त्या काळातल्या भारतातील घोड्याचा तो एकमेव पुरावा आहे.

बाकी सूव्हेनिरच्या माहितीबद्दल आभार! नेक्ष्ट टैम जर/कधी जाणे होईल तेव्हा नक्की लक्षात ठेवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आभार!
आपल्या इतक्या जवळ हडप्पाकालीन (उत्तर हडप्पाकालीन म्हणा हवं तर) अवशेष असणारी साईट आहे हे जेव्हा मला कळलं (त्यालाही काही महिनेच उलटले आहेत) तेव्हाच अतिशय आनंदाश्चर्य वाटलं होतं. त्यामुळे अगदी लोथल वगैरे कधी जमेल माहित नाही पण इतक्या जवळच्या ठिकाणी जाऊन यावंस वाटत होतं म्हणून माहिती विचारली.

या विषयाची माहिती अजिबात नसल्यात जमा होईन इतकी तुटपुंजी असली तरी आपल्या इतक्या जवळ ३-४ हजार वर्षापूर्वीचे अवशेष सापडावेत ही माहिती रोमांच उभी करणारी वाटते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्राचीन भारतात (इ.स.पू. २०००) घोडे होते याचा निर्विवाद पुरावा सुरकोटाडा येथे मिळालेला आहेच. माझ्या ब्लॉगवरील या लेखात यासंबंधी मला जी माहिती संकलित करता आली ती मी दिली आहे. परंतु घोड्यांची पैदास बहुधा होत नसावी आणि ते आयात केले जात असावेत व फक्त महत्त्वाच्या धार्मिक किंवा उत्सव प्रसंगी वापरले जात असावे असे बर्‍याच तज्ञांचे म्हणणे आहे. या उलट बैल हा प्राणी कॉमनली उपलब्द्ध असल्याने तोच सर्वसाधारणपणे रथाला जोडला जात असावा असे मला वाटते व हीच गोष्ट दायमाबाद ब्रॉन्झेस वरून दिसते. बाकी बॅटमन म्हणतात तसा घोड्याचा मुद्दा आणि आर्यांचे आक्रमण हे मुद्दे चावून चोथा झालेले असल्याने चर्चा करण्यालायक उरलेलेच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोकोर्न्यीसुद्धा त्यातली ६ सॅम्पल्स ही 'प्रॉबॅबली' खर्‍या घोड्याची आहेत असं म्हणतो. आणि परत मीडोचे त्यावरही काही तांत्रिक आक्षेप आहेतच. दुर्दैवाने बोकोर्न्यी निधन पावल्याने त्यांचा वाद अर्धवटच राहिला. असो. हा मुद्दा एकुणातच चर्चाविषयाशी पूर्णपणे अवांतर आहे! तेव्हा इत्यलम्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो मान्य. तो वाद अनिर्णीत आहेच. अवांतराबाबत सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@चंद्रशेखर - पण ज्या वाहनाला संस्कृत साहित्य 'रथ' म्हणते तो सिंधूसंस्कृतीत होता याचा काय पुरावा उपलब्ध आहे?

आणखी एक - दायमाबाद ही मुळात एक ताम्रपाषाणयुगीन वसाहत होती (डेक्कन चाल्कोलिथिक म्हणून जो पुरातत्त्वीय संस्कृतीसमुच्चय ओळखला जातो त्यातली एक). त्यामधे विविध कालखंड होते. त्यातील एक हा उत्तरसिंधूसंस्कृतीचे प्रभाव दाखवणारा होता. गुजरातच्या उत्तरसिंधूसंस्कृतीकडून या गोष्टी आपल्याकडे दख्खनमधे आल्या. तापीच्या खोर्‍यात आणखी २०-२५ ठिकाणी उत्तरसिंधूचा प्रभाव असलेली खापरं सापडली आहेत. पण यावरून या वसाहती सिंधूसंस्कृतीच्या म्हणून गणल्या जात नाहीत तर त्या डेक्कन चाल्कोलिथिकमधेच गणल्या जातात.

@ऋषिकेश - दायमाबादसारखी अनेक तत्कालीन वसाहतींचे अवशेष महाराष्ट्रात आहेत. शिरूरजवळचं इनामगाव, मंचरजवळचं चांदोली (आता बहुदा तिथे काही शिल्लक नसावं), धुळ्याजवळचं प्रकाश, नेवासा, बारामतीजवळचं सोनगाव (इथेही आता बहुतेक सगळं नांगरटीखाली येऊन नष्ट झालं असावं) ही त्यातली काही ठळक नावं. डेक्कन चाल्कोलिथिकचा कालखंड सुमारे २४०० ते ९०० इसपू असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार. माहिती नवी व रोचक आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नीरा यांनी व्यनीमध्ये दिलेला हा दुवा या विषयाशी संबंधीत अधिक माहिती अतिशय सोप्या शब्दात देतो.
ऐसीची, अशा माहितीपूर्ण लेखनाचे, इतर संस्थळावरील दुवे देण्यास हरकत नसल्याने इतरही वाचकांच्या सोयीसाठी दुवा जाहिररित्या देत आहे.

नीरा यांचे दुव्याबद्दल आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी रथ हा शब्द जनावराने ओढले जाणारे व एका किंवा जास्त व्यक्तीना घेऊन जाणारे चाके असलेले वाहन या अर्थी वापरलेला आहे. संस्कृत साहित्याशी कोणताही संबंध मी लावू इच्छित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0