गप्पा... मनाशी...

एकदा असंच आपलं नेहमीप्रमाणे रात्री Balcony मध्ये उभा होतो… १२-१२.३० वाजले असावेत बहुधा… नेमकी वेळ आठवत नाहीये… समोरंच असलेल्या runway कडे बघत बसलो… दर ५-२ मिनटांनी २-४ विमानं इकडून-तिकडे उडत होती… त्यातच वाऱ्याची मंद आणि गार झुळूक अंगाला स्पर्शून जात होती, आल्हदुन जात होती... छान वाटत होतं...
मग नेहमीप्रमाणेच माझ्या नजरेचा मोर्चा मी वर त्या गर्द काळ्या आकाशाकडे वळवला आणि सवयीने (अथवा छंद म्हणून) मी त्या ताऱ्यांना न्ह्याळू लागलो… एक-एक तारा बघू लागलो, शोधू लागलो... "ये तारा, वो तारा, हर तारा... " असं करत-करत आपलं सुरूच होतं... काही जुने तारे मधूनच डोकावत होते... काही नवीन तारे देखील लुकलुकत होते... म्हणाल तर, एकंदरीत "Awesome" वाटत होतं...

हे माझं आपल्याच धुंदीत सुरु असतांना अचानक कुणाचातरी ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला - "वैताग, वैताग आणि फक्त वैताग"… मी म्हटलं शेजाऱ्यांपैकी कुणाचंतरी वाजलं असेल बायकोशी, आपल्याला काय करायचं? आपण म्हटलं आपल्या ह्या ताऱ्यांवर concentrate करूया, असा म्हणून दुर्लक्ष केलं… जरा वेळाने पुन्हा तोच आवाज, बघितलं तर जवळपासच्या साऱ्याच शेजाऱ्यांचे दिवे तर बंद होते, मग म्हटलं भास असावा... आता जरा माझी थोडी धड-धड वाढायला लागली... मग मी स्वतःलाच समजावलं की "डर के आगे जीत है... " उगाच आपलं काहीतरी सांत्वन म्हणून आणि थांबलो...

थोडयावेळाने पुन्हा तेच - "अरे मी वैतागलोय"… मी घाबरून इकडे-तिकडे बघायला लागलो... "अरे मी इथेय, तुझ्या आत तर डोकावून बघ जरा... मी आहे... तुझं "मन"… " मी जरा दचकलोच...
"बरोबरेय, रोज एवढ्या गर्दीत वावरून, स्वतःच्या मनात डोकावायला वेळ कसा असणार रे तुझ्या कडे?" मी आश्चर्याने आणि काहीश्या ओशाळलेल्या नजरेने माझ्याच मनाकडे बघत होतो… ऐकत होतो...
मनाने आपले रडगाणे सुरूच ठेवले... "सालं रोजचं हे monotonous routine… तीच रोज सकाळची धावपळ... office ला जायची घाई-गडबड... " मन बोलतच होते... मी त्यावर काही बोलावे, उत्तरावे अशी त्याची अपेक्षा नसावी कदाचित...
"रोज आपलं मिल्खा सिंग सारखं धावत जाऊन bus पकडायची घाई... office जाऊन १० -११ तास मर-मर... पुन्हा शेवटी बसची वाट बघणं... घरी या, जेवा आणि झोपा... बस्स... हेच फक्त...?"
एक-एक करून मनाने मला खूप काही सांगितलं... ऐकवलं... ते ऐकून जरा कीव आली मला त्याची... खूप वर्षांनी, कदाचित युगांनीच जणू माझं मन कुणाजवळ तरी "मनमोकळं" करत होतं... मी फक्त ऐकत गेलो, त्याला न थांबवता...
"office, घर, साऱ्यांचे फक्त tension…" मन बोलत असतांना आता मात्र मी त्याला जरा थांबवलं...

जरा समजवलं... म्हटलं -
"मनोबा, अगदी खरंय रे मित्रा तुझं... कळतेय मला तुझी अवस्था, तुझी व्यथा...
पण तुला नाही का वाटत की हे सारं तू स्वत:हून ओढवून घेतोस...?
किती tension घेशील रे बाबा आयुष्यातल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचं... पैसा, काम, भविष्य, घर, प्रेम, मैत्री, नाती-गोती... ह्या साऱ्यांच्या जाळ्यामध्ये, गुंता-गुंतीमध्ये पार बुडून गेलायेस रे... अरे कंटाळा कसा नाही येत रे तुला?
एक दिवस जात नसावा फालतूच्या tensions शिवाय...
आठव तर जरा, किती काळ गेलाय की ज्या दिवशी जरा मनमोकळा बसला असशील, एखाद्या पाखरासवे मुक्त उडत नंतर एखाद्या झाडावर निवांत विसावला असशील, मुसळधार सरीखाली बेधुंद भिजला असशील, काही दुर्मिळ गोड क्षण आठवून गालातल्या गालात हसला असशील, पुन्हा कधी ते खट्याळ लहानपण अनुभवलं असशील... मित्रा, जमाना झाला असेल हे सारं करून... असू दे आता...
अरे, जागतिक पातळी वर अशा कितीतरी घडामोडी सुरु आहेत tension घेण्याजोग्या...
Global Warming, US-Syriya युद्ध, European Countries (जिथे सध्या तुझा देव म्हणजे Customer आहे) मधले economic crisis, recession, जागोजागी होणारे भूकंप, सुनामी...
इतक्या लांब तरी कशाला जायचं, आपल्या भारतातंच काय कमी गोंधळ सुरुये का?
दिवसेंदिवस फक्त घसरत जाणारा अन खोलीचे नव-नविन विक्रम गाठणारा "₹" (रुपया), नेहमीच तोंडावर आपटणारा सेंसेक्स, हजारो-लाखो कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार, पेट्रोल-डीझेलच्या दराने घेतलेला भडका, कांद्याचं आसवं निघेस्तोवर रडवणं, Match Fixing, कुठे दुष्काळ, तर कुठेतरी पूर, चोऱ्या-माऱ्या, बलात्कार, हत्या, दरोडे... आणि ह्या सगळ्यांवर मनमोहनचं अढळ "मौन"... बस्स... आता दम लागायला लागलाय मला...

लेका, हे सार मोजायला माझं आयुष्य कमी पडेल एक वेळेस, पण ती यादी काही संपायची नाही... सकाळी-सकाळी वाचायला एखादं वर्तमानपत्र घ्यावं म्हटलं तर ही भलीमोठी रांग ह्या साऱ्या मसालेदार बाताम्यांची... आणि News Channels बघाव्या तर TRP साठी चाललेली वायफळ आणि केविलवाणी चढाओढ...

आता तू ह्याही गोष्टींचं tension घ्यावंस आणि आणखिन मनस्ताप करून घ्यावास, असा मूळीचं उद्देश नाहीये माझा... ह्या साऱ्याची काळजी करायला आपले (अति)कर्तबगार नेते आहेतंच की... असो... तो भाग वेगळा...
फक्त एवढंच संगावंस वाटतय की, ह्या साऱ्या समस्यांच्या महाकाय हत्ती पुढे तुझी सारी दुःखं तुला इवल्याश्या मुंगी सारखी (की "Ameba" म्हणू...) नाही वाटली तर शप्पथंच... म्हणूनच म्हणतोय मी की, सोड हे फाजील tensions घेणं... ते न घेताही छान जगता येता...
अरे मना, नुसताच धावत सुटलायेस रे... एकदा जरा थोडंस थांब... जरा विश्रांती घे... ह्या साऱ्या गोष्टींचा विचार तर करून बघ.... किती दूरवर निघून गेलायेस तू, याचा आढावा तर घे...

ऐक जरा माझं, पुरे झालं आता हे गुदमरणं... पुन्हा जरा स्वैर उडून बघ, जरा निवांत एखाद्या झाडावर, डोंगरावर विसावून बघ...
भिजावं कधी तरी त्या चिंब पावसात पुन्हा मनसोक्त, माराव्या उड्या चिखलात... होउ दे ना झालेच जर का कपडे मळके... काय फरक पडतोय?
नाच अगदी बेभान होउन, तुझ्याच मस्तीत मस्त होउन... फिरव घड्याळाचे काटे जरा उलटे, अन चल पुन्हा जरा मागे... कधी लहान होऊन तर बघ, निरागसते मधलं सुख अनुभवून बघ...
पुन्हा जरा उगाचंच मनमुराद आरडा-ओरड करून तर बघ, कळू दे ना ह्या जगाला तू जिवंत आहेस म्हणून...
हो की जरा बेफिकीर, वाटू दे जगाला काय वाटायचं असेल ते... पर्वा कसली करतोयेस ह्या डोळे असलेल्या आंधळ्यांची...
खरंच, एक दिवसतरी, पुन्हा जरा स्वतःसाठी अन स्वतःसाठीच फक्त "जगून" तर बघ..."

मनाने माझं हे सारं "प्रवचन" शांतपणे ऐकून तर घेतलं… आधी जरा धीर-गंभीर look दिला...
नंतर थोडं हसलं आणि म्हणालं - "धन्यवाद... आज बरं वाटलं जरा... बरं वाटलं तू माझ्यासाठी देखील थोडा वेळ काढलास आज म्हणून... माझं म्हणणं शांतपणे ऐकलंस, समजून घेतलंस... आज मन "हलकं" झालं रे तुझ्याशी बोलून... फक्त एक निरपेक्ष "कान" हवा असतो रे कधी मलाही... त्यासाठीही कुणाला वेळ नसतो सध्या... आजकाल लोकं मला विसरून गेलेत रे... ते हेही विसरून जातात की मनाला देखील एक मन असतं... भावना असतात... तेही कधी रागवतं, चिडतं आणि कधी हिरमुसतं देखील...

असो... खूप वेळ घेतला आज तुझा... "ऋणी" आहे तुझा आज मी... तू सांगितलेल्या गोष्टींवर नक्कीच विचार करेन, अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन... चल, मी येतो आता... भेटू पुन्हा कधीतरी... अशाच एखाद्या एकांत राती... मारू जरा गप्पा… पुन्हा धन्यवाद..."

एवढं बोलून तो आवाज शांत झाला... त्या अंधाऱ्या काळोखात हरवला कुठंतरी... हे सारं नेमकं काय झालं हे तसं कळलंच नाही मला, पण खरं सांगतो मलाही जरा बरं वाटलं... हलकं वाटलं... मी गाल्यातल्या गालात हसलो आणि पुन्हा आपल्या आवडत्या छंदाकडे वळालो... पुन्हा आभाळातल्या त्या ताऱ्यांकडे निरागसतेने बघू लागलो... आता मला देखील मी "जिवंत" असल्यासारखं वाटायला लागलं...

मित्रांनो, सांगायचं तात्पर्य इतकेच की, स्वतःसाठी देखील जरा वेळ काढा... जरा स्वतःशी गप्पा मारून बघा... एक वेगळाच आनंद, एक वेगळंच समाधान मिळतं... मला सगळं मान्य आहे की, आजकाल आपण सारे खूप busy झालो आहोत… अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यांचे ओझे वाहून-वाहून आपले खांदे पार झुकून गेलेत... पण आपल्या मनाशी मारलेल्या गाप्पा जीवनात एक नवीन अंकुर पेरून जातात... कापसाहून हलकं करून जातात... आपण मग वाहणाऱ्या त्या मंद झुळूक सोबत स्वैर तरंगत जातो, वाहत जातो...
हा माझा अनुभव आहे... तुम्ही देखील तो नक्कीच अनुभवा...

- सुमित विसपुते

(पूर्वप्रकाशित...)

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

चांगलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गप्पा आवडल्या. पण मोठ्याने मारल्या कि मनातल्या मनात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

धन्यवाद...

कुणी वेड्यात काढू नये म्हणून गप्पा मनातल्या मनात मारल्या … Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

धन्यवाद मनोबा...

- सुमित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

हे धन्यवाद कुठल्या मनाला दिले Wink

बाकी लेख उत्तमच, आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो धन्यवाद (प्रतिसाद) ऐ.अ.च्या "मनोबा" ला होता... Wink
चुकुन नविन comment लिहिला गेला...

बॅटमॅन, आपले देखिल धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

हे मागे कुठेतरी वाचलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुण जोशी,

Actually लेख जूनाच आहे, तुम्ही बहुधा पूर्वी वाचला असावा...
कामामुळे मला बरेच दिवस "ऐ.अ." वर येणं जमलं नाही...
त्यामुळे उशिरा "प्रतिसाद" दिलेत मी... (माफ करावे... Smile )
म्हणून लेख list मध्ये पुन्हा वर दिसत आहे... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

त्यामुळे उशिरा "प्रतिसाद" दिलेत मी... (माफ करावे...)

अहो, माझ्या प्रतिसादात काहीच टिकात्मक नाही. ती फक्त एक सरळ नोंद आहे. उशिरा प्रतिसाद देण्यात (ते ही सकारण) काहीच गैर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही "टीका" केलीये, असं मी म्हणत/समजत नाहीये हो... Smile
"लेख नव्याने वर का दिसतोय?" ह्याचे स्पष्टीकरण होते हे...
आणि "माफी" फक्त मी इतरांची मागितली, ज्यांना मी वेळेवर प्रतिसाद देउ शकलो नाही... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."