संगीतातील हास्यरस

संगीतात हास्य रस नसतो असं म्हणतात. पण या समजाला आह्वान/छेद देतील अशा काही रचना मला अलिकडेच ऐकायला मिळाल्या. कुणाला हसवुन हसवुन मारायचे असल्यास या रचना ऐकवाव्यात. या कलाकृती सादर करणार्‍या कलाकारांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करावे तेव्हढे मात्र थोडेच आहे.

http://youtu.be/A0ZpuA8_YYk

http://www.youtube.com/watch?v=GUAnlLnEuXo

http://www.youtube.com/watch?v=NeBqfDL77wA

यातली १ली पाश्चात्य रचनाकार रॉसिनी याच्या "विल्यम टेल" या रचनेवर आधारीत आहे. एक आई तिच्या मुलाना २४ तासात काय काय ऐकवते हे अनिता रेनफ्रो या गायिकेने २ मि ५५ से मध्ये बसवले आहे. हे सर्व कुठेही न अडखळता, कागद हातात न धरता सादर करायचे तिचे कौशल्य अचाट आहे.

२ री आणि ३री रचना मात्र भारतीय संगीतावर इंग्लिश शब्द प्रयोगांनी बांधल्या आहेत. २री रचना पोट धरधरून हसवते.

पुण्यात पूर्वी आफळेबुवा म्हणुन एक कीर्तनकार इंग्लिश्मध्ये कीर्तन करायचे त्याची या निमित्ताने आठवण झाली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दुसरी रचना अतिशय उत्कृष्ट वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पहिले गाणे 'दि मम्* सॉङ्ग्' म्हणून प्रसिद्ध आहे. संवादानुवादासहित येथे मिळेल.
* मम् : पन् इंटेंडेड्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक उत्कृष्ट उदाहरण. (टीप: ३:५८ ला मस्त पंचलाईन आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा !!! शैली रॉकी रोड टु डब्लिन ची आठवण करुन देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिली कीन, फॅसिनेटिंग आयडाची मुख्य सदस्य ही देखिल डब्लिनरच आहे. आयर्लंडमधे जन्मलेली पण मुख्यतः इंग्लंडमधे वाढलेली कीन, ट्रिनिटी कॉलेज डब्लिनमध्ये संगीत शिकली आहे.
वरील गाण्यात बर्याच आयरीश खुबी आहेत. आयर्लंडमधे, फ** शब्द मुलामाणसात वापरायचा असेल तर त्या 'फेकिंग', 'फेकर' वगैरे पर्यायी शब्द वापरतात. मला हे फार मजेशीर वाटायचं, म्हणजे शब्द मूळ अर्थानेच वापरायचा पण ते शिवराळ वापरू नये म्हणून केलेली सारवासारव फार आयरीश खुबीची आहे, वरील गाण्यात वापरलेले बरेच शब्द असेच 'खास आयरीश' आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईक ++

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईक ++

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारेच विडीयो आणि सादरीकरण मस्त आहे
फक्त प्रश्न हा पडला की हा संगीतातील हास्यरस कसा?
सदर गोष्टीत कॉमेडी शब्दांनीच साधलेली आहे. संगीत प्रभावी असलं तरी सहाय्यक माध्यम म्हणूनच वापरले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते शब्द गद्यात (सूरांशिवाय) म्हटले असते तर विनोदनिर्मिती होईल का? मला तरी तसे वाटत नाही. म्हणुन ती सांगीतिक हास्यरस निर्मिती ठरते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर सूर शब्दाशिवाय वाजवले असते तरी हास्यनिर्मिती झालीच नसती की! म्हणून त्याला शाब्दिक कोटी म्हणावे का? तर तसेही नाही. ही दोन (किंबहुना काही ठिकाणी अधिक) कलांच्या मिश्रणातून विनोद निर्मिती आहे.

मला म्हणायचे होते, एखादा सुर ऐकून किंवा सुरावट ऐकून शांत वाटते, किंवा वीर रस उत्पन्न होतो, किंवा शृंगारीक वाटू लागते किंवा भक्तीमय वाटू लागते. (कोणाला नक्की काय वाटेल हा त्याच्या कंडीशनिंगचा भाग झाला, मात्र जे काही होते ते केवळ संगीतामुळे होते) मात्र अशी सुरावट ज्यामुळे (शब्दांविना) माणसे खो खो (किंवा कशीही) हसू लागली तर तो संगीतातील हास्यरस होईल.
अन्यथा संगीताचे महत्त्व त्या त्या सादरीकरणात अभिनय, शब्द, प्रकाश, ध्वनी यांच्या जोडीने आहे (आणि त्याचे महत्त्व नाकरलेले नाहीच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!


ही दोन (किंबहुना काही ठिकाणी अधिक) कलांच्या मिश्रणातून विनोद निर्मिती आहे.

दोन कलांचे मिश्रण असले तरी अंतिम प्रॉडक्ट संगीत आहे जे हसवते, त्या मुळे ही सांगीतिक हास्यरसनिर्मिती मानायला हरकत नाही. Smile

सदर सूर शब्दाशिवाय वाजवले असते तरी हास्यनिर्मिती झालीच नसती की!

कोणत्याही शब्दप्रधान संगीतरचने मधले जर शब्द काढले आणि नुसतीच सुरावट वाजवली तर होणारी मुड/रस निर्मिती ही सशब्द रचनेप्रमाणे असेल याची खात्री देता येत नाही. मूळ रचनेतले शब्द ज्यांना ठाऊक आहेत तेच कदाचित मूळ रचनेतला मुड अनुभवु शकतील, पण शब्द ज्यांना ठाऊक नाहीत त्याना अनुभवाला येणारा मुड वेगळा असु शकतो.

रस थिअरी ही बरीच वादग्रस्त आहे, असे ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दाशिवायसुद्धा संगीतात हास्यरस येऊ शकतो. कदाचित संस्कृतिसापेक्ष असू शकते, पण काही ताल आणि स्वरांच्या लकेरी हास्योस्पादक मानल्या जातात. (पाश्चिमात्य अभिजात संगीतात ढोबळ मानाने तालामध्ये काही अतिजलद आणि काही अतिधीम्या खंडांची आवर्तने असली; अतिखर्ज किंवा अतितार सप्तकात सुरसंचार...)

शेर्झो (scherzo) शोधावे. उदाहरणार्थ :

किंवा

बेथोवन त्यांच्या सिंफनींमध्ये एखदा शेर्झो किंवा शेर्झोसदृश विभाग रचत असे :

काही संगीतकार विनोदी "बादिनेरी" (badinerie) रचतात :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

scherzo = 'स्केर्त्सो' असा इतालीय उच्चार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रोचक माहिती आहे
यातील रचना ऐकून मला हसू जरी आले नाही तरी मजेशीर जरूर वाटले.

मात्र गंमत अशी की यातील पहिल्या विडीयोतील सुरावट वाजत असताना बाजुला खेळत असलेली माझी दीड वर्षाची मुलगी लॅपटॉपकडे बघत अचानक हसु लागली - फारतर ५ एक सेकंद असेल - मग पुन्हा खेळण्यात रममाण झाली. आता तिला अजून काही शब्द वगळता सलग बोलता येत नसल्याने ती कधी कधी हाका मारून उगान हसते हे खरे आहे तरी हा काकतालीय न्याय किंवा कसे हे ठरवणे कठीण होऊन बसले हे ही खरेच!
(कारण पुन्हा सुरावट वाजवल्यावर तिने लक्षही दिले नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतीय शास्त्रीय संगीताच्या चालीवर इंग्रजी ऐकवलं नाही. हसायला पण आलं नाही.
संगीताला भाषा नसते पण भाषेला (शोभेल असं) संगीत असतं बहुदा (किंवा आपली सवय म्हणावी लागेल).

शब्दांशिवाय फक्त संगीताने हसवणं कितपत शक्य आहे माहित नाही....दिलेली उदाहरणं चपखल वाटत नाहीयेत.

हल्लीच्या मराठी दैनंदीन भुक्कड मालिकांमध्ये विनोदी पात्र असलं की काही विशिष्ट संगीत वाजवायचं खूळ आलं आहे- पण ना त्या संगीताने ना त्या विनोदी पात्राच्या तोंडच्या वाक्याने हसू येतं...विनोद निर्मितीचे क्षीण प्रयत्न वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला व्हिडो जब्बरदस्त एकदम!!!!!!!!!

दुसराही आवडला. तिसरा तुलनेने कमी आवडला.

दुसर्‍यात वात्रटपणा करायचा हे ठरवल्यागत वाटतेय, पण मजा येतेच-त्यात अस्सल मराठी उच्चारांचा वाटा मोठा आहे असे माझे मत. (ट, "फ" आणि प्लेझंट मधील झ हे अनमिस्टेकेबलि मराठी उच्चार-अजून कोणी संभवतच नै.) बाकी रागदारी का काय तेही ऐकवतंय म्हणा-पण इणोदी इफेक्ट जास्त.

तिसर्‍यातले उच्चार कमी ऑकवर्ड वाटतात आणि हिलेरियस इफेक्ट कमी वाटतोय. खरोखर चांगलंदेखील वाटतंय.

ऋता यांनी लिहिलेय की भारतीय चालीवर इंग्रजी ऐकवले नाही. कदाचित आपल्या विशिष्ट चालींचा हा परिणामही असेल. ऑपेराच्या चालीवर भारतीय संगीतही ऐकवेल असे वाटत नाही. कुडकुडल्यागत वाटणारे हाय पिचच्या त्या चिरक्या/किनर्‍या चालींवर (आमच्या रसग्रहणाची झेप एवढीच!) भारतीय शब्दांची कल्पना करणेही कठीण.

हे ऐकून कधीकाळी ऐकलेला एक व्हिडो आठवला. हसूनहसून कळायचं बंद.

कार्ल ऑर्फ या सङ्गीतकाराचा जगप्रसिद्ध व्हिडो "कार्मिना बुराना ओ फॉर्च्यूना" याची मिसहर्ड लिरिक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी. गंमत वाटली.

दुसरी फीत मुद्दामून वात्रट आहे, इंग्रजी कविता चांगली असती, आणि तालात इंग्रजीतील आघात नीट बांधले असते, तर इंग्रजी गीत भारतीय अभिजात संगीतासह गाता येईल असे वाटते - हास्यास्पद वाटणार नाही. त्याच कारणामुळे तिसरी फीत मुळीच विनोदी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्मिना बुरानाचे (दृष्य) विडंबन आवडले. शेर्झो हा प्रकार प्रथमच कळला. धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0