"त्या चार योनींची गोष्ट"

कालच हे नाटक बघितलं.

नाटकाचं रंजनमूल्य शून्य पण शैक्षणिक मूल्य मात्र खूप. करमणुकीच्या अपेक्षेने गेलात तर फसाल आणि चिड्चिड होईल. ५०च्या पुढच्या मध्यमवर्गीय महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय, पण नाटक सतत पुरुषानाच संदेश देत राहातं. मला एका गोष्टीची खूप गंमत वाटली . स्त्रियांची कामतृप्ती कशी ओळखायची हे पुरुषांना शिकविण्यासाठी संभोगात रमलेल्या स्त्रियांचे मोनिंगचे आवाज मुद्दाम ऐकविण्यात आले. याचा अर्थ बहुसंख्य पुरुषांना स्त्रियांची कामतृप्ती कळत नसावी... असो.

आणि हो, मला आवडलेला नाटकातला एक विनोद - म्हातारा होणारा पुरुष कसा ओळखायचा? उत्तर - पुरुष स्वत:च्या बायकोवर प्रेम करायला लागला की म्हातारा झाला असं समजावे.

पण एक महत्त्वाचा मुद्दा या नाटकानं हाताळला नाही असं वाटलं, तो म्हणजे असमान लैंगिक भूकेचा. म्हातारपणी कामप्रवृत्ती जागृत असणं हे समाजानं चूक ठरवलं आहे पण निसर्गाने नाही आणि म्हणून म्हातारपणी sexually active राहाणं चूक ठरत नाही.

हे नाटक सामाजिक मानता येईल. (दूरदर्शनवर जे प्रौढ्शिक्षणाचे कार्यक्रम असतात त्या धाटणीचं) कथानक असं काही नाही. "चार योनी" त्यांची मनोगतं व्यक्त करतात. आणि त्यांची कामपूर्ती समाजस्वास्थ्याकरता आवश्यक आहे हे ठसवायचा प्रयत्न करतात. त्यांच्या पूर्तीसाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व पुरुषांना उद्देशून असतं. स्त्रियांनी आपल्या कामजीवनातील गरजा पूर्ण करताना अपराधी भावना, संकोच बाळगू नये हे सांगितलं जातं (उदा. हस्तमैथुनाबद्दल संकोच बाळगु नये).

व्हजायना मोनोलॉग्जच्या मराठी अवताराचा बराच गाजवाजा झाला होता, ते बघता आले नव्हते म्हणून हे बघायला गेलो होतो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

नाटक नेमकं काय आहे याची कल्पना नाही. पण मनुष्याला आयसोलेटेड लिंग, योनी अशा रितीने मोजणारी असली टायटल्स फारशी आवडत नाहीत. पुरुष म्हणजे फक्त लिंग नव्हे तशी स्त्री म्हणजे फक्त योनी नव्हे. अगदी प्रतीकात्मक अर्थाने देखील. ही सर्व साधने आहेत. व्यक्ती आणखी बर्‍याच गोष्टींनी बनते.

हे म्हणजे आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे.

खवचट ऐवजी विनोदी श्रेणी द्यावी अशी विनंती.

नाटकाच्या माहितीबद्दल तर्कतीर्थांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीयांना आणि पुरुषांना असे दोन विरुद्ध ध्रुवांवर बसवणारी विचारसरणी मला मुळीच आवडत नाही. कोणतीही स्त्री 'मी व्यक्ति आहे' असा विचार ९५% वेळा करते, तिथे तसेच संदर्भप्राप्त असते. ५% वेळा 'मी स्त्री आहे' आहे असा विचार करते.

आणि अशी नाटके आपल्या बुद्धीचा नव्याने झालेला अविष्कार, पश्चिमेकडून आलेले, अजून नीट न उलगडलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आजपावेतोच्या सर्व मानवी अस्तित्वाला हिन ठरवायचा अट्टाहास, प्रत्येकच गोष्ट ऐरणीवर घेतली कि तिच्यावर घेता येणारे तोंडसुख, अखिल भारतीय पुरोगामिता प्रतिपुरोस्पर्धा, केवळ नास्तिक, अपरंपरावादी, मानवाधिकारवादी इ इ आहोत असे 'केवळ डिक्लेर' केल्याने मिळणारे बुद्धिप्रामाण्यवादीत्व, अशी अनेक आत्मसुखे इ इ नी तयार झालेले एक मार्केट टॅप करतात. समाजात एक वर्ग आहे - 'स्त्री आता घराबाहेर पडू लागली आहे' म्हटले कि लगेच इंप्रेस होऊन तसेच मानू लागणारा. मग ते शेकडो वर्षांपासून रोज दुपारी न्याहारी घेऊन शेताला जाणारी कुणब्याची बायको आरामात विसरतात. नवर्‍यासोबत कुठेही जाणार्‍या गवंड्याच्या बायका विसरतात. आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या गावात कुणी राहिलाच असेल तर तो आरामात सांगेल कि दुपारी गावात केवळ म्हातारे लोक व लहान मुले असतात.

या मार्केटचा शिरोमणी म्हणजे नवाविष्कृत लैंगिकता. सभ्यता आणि शिष्टता यांच्या नावाखाली नागरी संवाद इतका दबला गेला आहे कि नव्याने जे स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते आहे त्यात नुसते 'लैं' म्हटले कि काहीतरी नविनच ऐकायला मिळणार याची खात्री असते. हा प्रकार जेव्हा ऑफिसला खूप मोठे अधिकारी भेट देणार असतात आणि सगळे लोक नाही म्हटले थोडे टेन्सच असतात आणि तेव्हा हे मोठे अधिकारी काहीतरी फालतू जोक करतात आणि सगळे अधिकारी असे हसू लागतात कि इतका मोठा विनोद पूर्वी कधी ऐकलाच नव्हता. असे हसण्यासाठीचे जे deprivation लागते ते अतिशिष्ट आणि अतिसभ्य समाजात प्रचंड आहे. हेच लोक सहसा नाटक पाहतात म्हणून त्यांच्यासाठी तशी नाटके बनतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"कोणतीही स्त्री 'मी व्यक्ति आहे' असा विचार ९५% वेळा करते, तिथे तसेच संदर्भप्राप्त असते. ५% वेळा 'मी स्त्री आहे' आहे असा विचार करते."

सादर असहमत.

गेल्या काही वर्षात माझ्या आयुष्यात आलेल्या मैत्रिणींशी बोलताना आणि समाजात वावरताना त्यांना जे काही अनुभवावे लागते, किंबहुना भोगावे लागते, ते किंचित अधिक समजत गेले व त्यातून वेगळेच काही जाणवले आहे. मुलगी १०-१२ वर्षांची झाल्यानंतर साधारण पुढची चाळीस पन्नास वर्षं तरी समाज (पुरूषप्रधान संस्कृतीत 'समाज' म्हणलं की प्रामुख्याने पुरूषच अध्याहृत असतात.) त्या मुलीकडे 'स्त्री' अशा वस्तुवादी भूमिकेतून बघतो. अर्थात, स्त्रियाही पुरूषांकडे सेक्स ऑब्जेक्ट म्हणून बघत असतील पण समाजात स्त्रियांना जितक्या थेटपणे याचा सामना करावा लागतो तितके थेट पुरूषांना नाही सामोरे जावे लागत. त्यातून परत घरातून, तू मुलगी आहेस त्यामुळे अमुकच कर, तमुक करू नकोस, पाय पसरून बसू नकोस, नजरेला नजर देत जाऊ नकोस वगैरे संस्कार (?) होत असतात. या सगळ्यामुळे, निदान मी ज्या सामाजात राहतोय त्यात तरी स्त्री 'मी एक व्यक्ति आहे' (इथे व्यक्ति आहे म्हणताना, व्यक्ति ही लिंगनिरपेक्ष अशी मूळात एक माणूस आहे) हे साफ विसरून जात असावी. 'मी एक स्त्री आहे', ... केवळ ही आणि हीच जाणिव प्रखरतेच्या दृष्टीने वरचढ ठरत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

बिपिनजी, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे खरे. पण मला यावर जे काही म्हणायचं आहे त्यासाठी मला नीटसे शब्द सापडत नाहियेत. पण 'मला मांडायचा विषय' आणि आपल्याला मांडायचा विषय हे केवळ स्पर्शून जातात, ते एकच नाहीत असे काहीसे मी म्हणेन.

स्त्रीत्वाची जाणिव नसणे यात मी जीवशास्त्रीय जाणिव ही व्यक्तिवाचक गृहित धरली आहे. म्हणजे बाळाला दूध पाजताना स्त्री स्वतःला '१००% व्यक्ति' समजते असे पकडले आहे. दुसरे म्हणजे दुसर्‍या धृवावर नेऊन ठेवल्याची जाणिव ही दोन प्रकारची असते - १. जुनी २. रोज नव्याने होणारी.
१. माझ्या आईने कधीही जीन्स घातली नाही पण रोज साडीच घालताना तिला आपणांस अभिप्रेत असेलेली 'मी एक स्त्री आहे' ही जाणिव असते कि नसते याबद्दल मी साशंक आहे. सहसा कुटंबामधे प्रेम असते, जबरदस्ती नसते, म्हणून एखाद्या स्त्रीस कुंकू सुंदर दिसते असे वाटू लागल्यास या जाणिवेस femininity zone मधे न नेता cosmetic zone मधे न्यावे अश्या मताचा मी आहे. तरीही ज्या गोष्टींचा प्रकर्षाने जाच होत नाही त्यांची ट्रीटमेंट कशी करावी याचा मला संभ्रम आहे. मी स्त्री आहे म्हणून म्हणून मला स्वयंपाक करावा लागतो असे आईला किती प्रकर्षाने जाणवत असेल याची कल्पना नाही. पण मी तिला नेहमी आनंदाने असे करताना पाहिले आहे म्हणून 'स्वयंपाक करावा लागावयाची जाणिव' पुन्हा व्यक्तिवाचक धरली आहे.

२.मात्र स्त्रीत्वाचा संबंध नसलेली नव्याने करून दिलेली/झालेली हिनतादर्शक/भिन्नलिंगतादर्शक जाणिव मी १००% 'मी स्त्री आहे' टाईपची मानतो. हजार वाहन चालवताना चूका करतात, टिका मात्र स्त्रीयांवरच होते. याला ५% जीवनाचा भाग म्हटले आहे. या टक्केवारीला अर्थ नाही पण ते काढले तर वाक्य फार मोघम बनते - स्त्रीयांना बव्हंशी आपल्या व्यक्तित्वाची जाणिव असते, स्त्रीत्वाची नव्हे - म्हणून मुद्दाम आकडे टाकले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या आईने कधीही जीन्स घातली नाही पण रोज साडीच घालताना तिला आपणांस अभिप्रेत असेलेली 'मी एक स्त्री आहे' ही जाणिव असते कि नसते याबद्दल मी साशंक आहे.

रोचक विधान! हे एक उदाहरण आहे मान्य, तरीही, साडी नेसताना त्यांना त्या 'व्यक्ती' असल्याची जाणिव तरी असते का? म्हणजे, साधारणतः अश्या प्रकारच्या अंगवळनी पडलेल्या कृती करताना आपण व्यक्ती आहोत, स्त्री आहोत, किंवा पुरूष आहोत म्हणून हे करतोय अशी जाणिव खरंच होते का? (पाणी पिण्याकरता तहान लागल्याची जाणिव होते तशी).
मला वाटते, स्त्रीत्वाची, पुरुषत्वाची, किंवा एक व्यक्ती असल्याची जाणिव आपल्यावर होणार्‍या संस्कारातून होते. अगदी लहानपणापासून मुलीला किंवा मुलाला तू मुलगा आहेस्/मुलगी आहेस म्हणून अमुक कर, तमुक करू नकोस असं सांगण्यातून होते. असं होत नसतं तर मुलासाठी चेंडू आणि मुली साठी भातुकली आणल्या गेली नसती. आपण लहानग्यांना ते एक व्यक्ती आहे हे शिकवण्याआधिही ते मुलगा/मुलगी (पक्षी स्त्री/पुरूष) आहेत ह्याची जाणिव करून देतो. तुम्हाला 'स्वयंपाक करावा लागावयाची जाणिव' ही व्यक्तीवाचक वाटते कारण तुम्ही तुमच्या आईला ती कृती आनंदाने करताना पाह्यलंय, मग बाबांना होणारी 'स्वयंपाक न करावा लागावयाची जाणिव' ही कुठली म्हणायची? आपली संस्कृती पुरूषप्रधान आहे तेव्हा कोणत्याही व्यक्तीला ती स्त्री - पुरूष असल्याची जाणिव आधी होत असावी. आपण व्यक्ती असल्याची जाणिव ही त्यानंतर येते. अशी जाणिव आधी यायला आपली संस्कृती व्यक्तीप्रधान व्हायला हवी. कदाचित आपली वाटचाल त्या दिशेने सुरू झाली आहे, पण तशी परिस्थिती येण्यासाठी 'दिल्ली अभी बहुत दूर है!'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

मी गंडलोय. माघार घेतो. विचार करेन, तुम्ही काय लिहिलंय ते कळलं तर एखादे वेळेस परत येईन. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ते स्त्री आणि व्यक्तीचे पर्सेंटेज वगळले तर बाकी प्रतिसाद एकदम आवडला व पटला. मिळणार्‍या श्रेण्या काही का असेनात, पण हे व्यक्त केलेले विचार बरोबर आहेत. काही निरीक्षणे विशेष आवडली, उदा.

आणि अशी नाटके आपल्या बुद्धीचा नव्याने झालेला अविष्कार, पश्चिमेकडून आलेले, अजून नीट न उलगडलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आजपावेतोच्या सर्व मानवी अस्तित्वाला हिन ठरवायचा अट्टाहास, प्रत्येकच गोष्ट ऐरणीवर घेतली कि तिच्यावर घेता येणारे तोंडसुख, अखिल भारतीय पुरोगामिता प्रतिपुरोस्पर्धा, केवळ नास्तिक, अपरंपरावादी, मानवाधिकारवादी इ इ आहोत असे 'केवळ डिक्लेर' केल्याने मिळणारे बुद्धिप्रामाण्यवादीत्व, अशी अनेक आत्मसुखे इ इ नी तयार झालेले एक मार्केट टॅप करतात. समाजात एक वर्ग आहे - 'स्त्री आता घराबाहेर पडू लागली आहे' म्हटले कि लगेच इंप्रेस होऊन तसेच मानू लागणारा. मग ते शेकडो वर्षांपासून रोज दुपारी न्याहारी घेऊन शेताला जाणारी कुणब्याची बायको आरामात विसरतात. नवर्‍यासोबत कुठेही जाणार्‍या गवंड्याच्या बायका विसरतात. आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या गावात कुणी राहिलाच असेल तर तो आरामात सांगेल कि दुपारी गावात केवळ म्हातारे लोक व लहान मुले असतात.

या मार्केटचा शिरोमणी म्हणजे नवाविष्कृत लैंगिकता. सभ्यता आणि शिष्टता यांच्या नावाखाली नागरी संवाद इतका दबला गेला आहे कि नव्याने जे स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते आहे त्यात नुसते 'लैं' म्हटले कि काहीतरी नविनच ऐकायला मिळणार याची खात्री असते. हा प्रकार जेव्हा ऑफिसला खूप मोठे अधिकारी भेट देणार असतात आणि सगळे लोक नाही म्हटले थोडे टेन्सच असतात आणि तेव्हा हे मोठे अधिकारी काहीतरी फालतू जोक करतात आणि सगळे अधिकारी असे हसू लागतात कि इतका मोठा विनोद पूर्वी कधी ऐकलाच नव्हता. असे हसण्यासाठीचे जे deprivation लागते ते अतिशिष्ट आणि अतिसभ्य समाजात प्रचंड आहे. हेच लोक सहसा नाटक पाहतात म्हणून त्यांच्यासाठी तशी नाटके बनतात.

हे लैच जबरी आहे. पचनी पडेल किंवा नाही सांगता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिळणार्‍या श्रेण्या काही का असेनात, पण हे व्यक्त केलेले विचार बरोबर आहेत.

गेले काही दिवस हे लिहावं का न लिहावं या विचारात होते.

वाईट प्रतीच्या श्रेणी देण्यासाठी "विचार पटले नाहीत म्हणून" हे कारण मलातरी पुरेसं वाटत नाही. वाईट श्रेणी ही असहमतीसाठी 'शिक्षा' देण्यासारखं वाटतं. शिक्षा देण्यासारखे खोडसाळ किंवा मुद्दाम खुस्पटं काढून त्रास देणारे अवांतर प्रतिसाद क्वचित कधी दिसतात, त्यांना जरूर शिक्षा करावी. पण विचार पटले नाहीत, समजले नाहीत, झेपले नाहीत म्हणून होणारी चिडचिड अशा रूपात व्यक्त होऊ नये. विशेषतः विचार पटले नाहीत तर प्रतिवाद करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही वाईट प्रतीच्या श्रेणी देण्याचा शॉर्टकट वापरण्याचा त्रास होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा शॉर्टकट नको तिथे वापरला गेल्याची कैक उदाहरणे पाहिली आहेत. विशिष्ट प्रकारचीच चिडचीड इथे जास्त व्यक्त होते. तेही ठीकच, पण तो दोष तसे सरसकटीकरण करणार्‍यांचा आहे. प्रतिवाद करूनही वाईट श्रेणी दिली जाते असेही पाहिले आहे. हा प्रतिवाद, त्याचा प्रकार अन श्रेणीदान-सगळ्याचा फॉरमॅट ठरलेला असतो अगदी. त्यामुळे हे कमी होईल असे काही वाटत नाही. नाही म्हणायला नको असलेले प्रतिसाद दाबायला याचा चांगला उपयोग होतो. हाच फायदा लोक उठवत असावेत, भले मग त्या शॉर्टकटचा कुणाला त्रास होवो अथवा न होवो. पण ते काहीसं फसवं आहे. उपक्रमवर अशी दाबायची सुविधा नसली तरी ट्रोलिंगचे प्रमाण तिथे अत्यल्प होते. त्यामुळे श्रेणीमुळे काही जास्त साध्य होते असे मला वाटत नाही. पण ते अवांतर आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रेणीव्यवस्था ही फक्त शिक्षा करण्याची सोय नाही. उलट १. बहुसंख्य प्रतिसादांची श्रेणी त्यांच्या बेस व्हॅल्यूपेक्षा वाढलेलीच दिसते. १अ. श्रेणीची सांख्यिकी पहाता (अंदाजे) १०% वाईट आणि ९०% चांगल्या श्रेणी दिलेल्या दिसतात. २. सुरूवातीला ५ वाईट, ६ चांगल्या प्रतीच्या श्रेणी होत्या. आता ४ वाईट आणि ७ चांगल्या प्रतीच्या श्रेणी आहेत. यामुळे श्रेणीव्यवस्था उलट चांगल्याला चांगलं म्हणताना प्रतिसादसंख्या सुजल्यासारखी, निष्कारण न वाढण्यासाठीही आहे. क्वचित कधीतरी अशा अर्थाचे दिसणारे प्रतिसाद, "मार्मिक श्रेणी देऊन समाधान झालं नाही म्हणून प्रतिसाद दिला", हे ही याच गोष्टीकडे निर्देश करतात.

एखाद-दोन व्यक्तींनी कधी या व्यवस्थेचा दुरूपयोग केला असं वाटलं म्हणून संपूर्ण व्यवस्थाच निकामी ठरवण्याइतपत विदा मलातरी दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या उपचर्चेला "त्या चार श्रेणींची गोष्ट" म्हणावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रेणीभारादलसगमना स्तोकनम्रा चर्चाभ्याम् ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile लाईक ++

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अदिती - शब्दाशब्दाशी सहमत.
@ बॅटमॅन - आपले निरीक्षण योग्य असू शकते, पण तो संस्थळाचा तांत्रिक दोष आहे. सिमित श्रेण्या असल्याने (किंवा अन्यथा) निरर्थक न वाटणारे प्रतिसाद वर काढावेत, सार्थ बनवावेत अशी जबाबदारी कोण का घ्यावी? कोणी कशीही श्रेणी द्यावी मात्र 'प्रतिसाद लपवणे' हा प्रकार केवळ संपादकांनी निरर्थक श्रेणी दिल्यावर व्हावा असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'प्रतिसाद लपवला' जात नाही. Comment viewing options मधे थ्रेशोल्ड: -1 ठेवा सगळे प्रतिसाद दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद लपवला जात नाही, शेरादर्शनाची मर्यादा कमी केली किंवा डबल क्लिक केले तर तो दिसतो हे सर्वच सदस्यांना माहित आहे/असावे. पण मुद्दा तो नाही, असा 'वर काढलेला' प्रतिसाद वाचताना वाचकाची त्याच्याकडे पाहण्याची नजर अकारण अपराध्याकडे पाहिल्यासारखी किंवा सहानुभूतीने पाहत असल्यासारखी असते. -१ श्रेणी, न दिसणे इ प्रकार संपादकांनी करावेत असे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरील चर्चा आम्ही दुरूपयोग करू शकतो-एखादवेळी करतोही- म्हणून आमच्याकडे आधीच काही मोजके आधिकार-सुविधा आहेत त्याही काढून घ्याव्यात व ते अधिकार/सुविधा काही मोजक्या लोकांकडेच असाव्यात अश्या धर्तीची वाटली. Wink

वैयक्तिक मतः माझा सामुहिक शहाणपणावर विश्वास आहे. एखाद्याला एखादा प्रतिसाद 'निरर्थक'/'खोडसाळ'/'मार्मिक'/'रोचक' इत्यादी काहीही वाटला तर ते मत त्याच्यापुरते प्रामाणिक आहे असे मला समजायला आवडते - मी तसे समजतो. बाकी प्रत्येकजण या सुविधेचा वापर आपापल्या वकूबानुसार करतो त्यावर इलाज करावा असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे नाही. प्रतिसाद झाकण्यामागे ते प्रतिसाद अवांतर, खोडसाळ, किंवा भडकाऊ असल्याने मुळ चर्चा बाजूला राहून धागा भरकटण्याचे चान्सेस जास्त असतात. शिवाय, सर्वांनाच अश्या अवांतर चर्चेत भाग घ्यायची किंवा वाचायची इच्छा असते असे नाही. धाग्याच्या मुळ विषयाशी सुसंगत प्रतिसाद आणि चर्चा सामान्यतः दिसावी असा श्रेणी सुविधेचा उद्देश असावा. ह्या सुविधेसंदर्भात संस्थळाच्या सुरवातिच्या दिवसात चर्चा झालेली आठवते. एकंदर 'समुहाचं शहाणपण' धाग्यावर्/संस्थळावर दिसून यावं अश्या आशयाचा तो धागा असल्याचंही अस्पष्टं आठवते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

असा 'वर काढलेला' प्रतिसाद वाचताना वाचकाची त्याच्याकडे पाहण्याची नजर अकारण अपराध्याकडे पाहिल्यासारखी किंवा सहानुभूतीने पाहत असल्यासारखी असते. -१ श्रेणी, न दिसणे इ प्रकार संपादकांनी करावेत असे वाटले.

दुसर्‍याने केलेला विचार आपल्याला पटला पाहिजे असं काही नाही, असं अनेकांच्या इथल्या लिखाणातूनही दिसतं. असं असताना १०० लोकांपैकी कोणी कशालातरी वाईट म्हटलं म्हणून आपणही म्हणावं, अशी कळप मानसिकता असेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. प्रत्यक्षात प्रतिसादासमोर दिसणारं मूल्य पहाता असं होत नाही हे ही समजतं. तुमच्या ज्या प्रतिसादावरून ही उपचर्चा सुरू झाली आहे, त्याचं मूल्यही मी पाहिलं तेव्हा २ होतं. ही दोन किंमत २-१+१ अशा आकडेमोडीतून आलेली असावी. त्या प्रतिसादाला +१ देण्याचं काम ~१०० लोकांपैकी कोणीतरी केलेलं तेव्हाही दिसत होतंच.

व्यवस्थापक या नात्याने कमीतकमी ढवळाढवळ आणि सदस्य या नात्याने अधिक वावर असा काहीसा विचार बहुतेकांच्या डोळ्यासमोर असावा, आमच्या डोळ्यासमोर निश्चितच आहे. श्रेणीव्यवस्था हे त्या विचारांमागचं तंत्र आहे; बहुसंख्य लेखक-वाचक सदस्यांना अधिकचे संपादकीय अधिकार देऊन व्यवस्थापकांचा कमीतकमी हस्तक्षेप यामुळे साधला जातो.
(त्याशिवाय व्यवस्थापक कधी हस्तक्षेप करतील याची कल्पना या धाग्यातून येऊ शकते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या प्रतिसादातल्या एकाही वाक्याशी यातला एकही शब्द जोडून अर्थ काढता आला नाही. Completely Lost.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असा 'वर काढलेला' प्रतिसाद वाचताना वाचकाची त्याच्याकडे
पाहण्याची नजर अकारण अपराध्याकडे पाहिल्यासारखी किंवा सहानुभूतीने पाहत असल्यासारखी असते. >> मला नाही वाटत असं होतं. जर नॉर्मल प्रतिसाद आणि -१ श्रेणी दिसत असेल तर प्रतिसादकर्त्याकडे अपराधी/सहानुभुतीने पाहणे यापेक्षा तो श्रेणी देणारा ट्रोल/आगाउ/नविन सदस्य असणार असे पाहिले जाते. आणि कधीकधी चुकुनही सर्वसाधारण श्रेणी दिली जाते. तो प्रतिसाद आणि 'वर काढलेला' प्रतिसाद सारखेच दिसतात. त्यातला फरक कळायला सदस्याच्या प्रोफाइलवर जाउन किती जणांनी श्रेणी दिलीय वगैरे पाहाव लागतं. कोण शक्यतो एवढी उठाठेव करत नाही. अनामिक म्हणतायत त्याप्रमाणे या -ve श्रेणी ट्रोल ना कंट्रोल करण्याकरता आहेत. सेन्सरशीप वगैरे काही नाही त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा 'वर काढलेला' प्रतिसाद वाचताना वाचकाची त्याच्याकडे पाहण्याची नजर अकारण अपराध्याकडे पाहिल्यासारखी किंवा सहानुभूतीने पाहत असल्यासारखी असते.

जवळजवळ सगळे प्रतिसाद मी याच नजरेने वाचतो, त्यात चुकलं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

ते सर्वद्वेष्ट्यांबद्दल बोलत नाहीयेत बहुधा.

(भौतेक सर्वाञ्चा प्रेमी) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरुण जोशी आणि बॅटमॅन. १००+
ही श्रेण्या देण्याची पद्धत म्हणजे 'आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कळतं' असं गृहीत धरुन लादलेली सेन्सॉरशिपच झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे सगळेच श्रेण्या देउ शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे म्हणजे आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे.

हॅहॅ. मला पुर्वी "छोड दो ऑचल जमाना क्या कहेगा|" हे गाण फारच चावट वाटायच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अहो, अश्लील अशी श्रेणी कुठे आहे? आणि किमान मी ऐसीवर सदस्य असेपर्यंततरी अरुणाचल बद्दल काही लिहू बिहू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगागागागागागा ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL निव्वळ थोर _/\_

अरुणाचल प्रदेश बद्दल काही वाचले तरी हीच कोटी आठवणार आता.

अवांतरः पूर्वी "आचवणे" या क्रियापदाच्या अर्थाबद्दलही असेच वाटत असे, त्याची या निमित्ताने आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरुणाचल वाचल्यावर,
नीट चष्मा लावून ३-३ दा चेक केलं.
अरुणजोशी आहेत की अरुणाजोशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अहो, अरुण व आचल आणि अरुणा व आचल या दोहो जोडींची संधी अरुणाचल अशीच होते. पण काळजी ती नव्हती, काळजी ही आहे कि इथे दिल्लीत बसून मी (म्हणजे अरुणने) छोड दो आचल म्हणणे तीव्रतेने राष्ट्रद्रोही वाटायला लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दिल्लीत किंवा अजून कुठेही बसून जर असे विधान केले तर ते राष्ट्रद्रोहापेक्षा देहलज्जाद्रोही ठरावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'छोड़ दो'मध्ये 'पहले पकड़ा था' हे अध्याहृत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आँचल में क्या जी, अजबसी हलचल'बद्दल काय वाटते?

('आँचल'च्या खर्‍या अर्थानेदेखील ते गाणे आम्हांस काहीसे चावटपणाकडेच झुकत असल्याची शंका येते, पण ते एक असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'चोली के पीछे क्या है' या गाण्यावर जेंव्हा आक्षेप घेण्यात आला तेंव्हा त्या गाण्याच्या समर्थनार्थ याच जुन्या गाण्याचे उदाहरण देण्यात आले होते. पण ते अजिबात पटणारे नव्हते. कारण, आँचलमे क्या जी, गाण्यातला देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचा संयत अभिनय कुठे आणि 'चोली' गाण्यातला प्रक्षोभक नाच कुठे! शिवाय जुन्या गाण्यातली आशाच्या आवाजातली मोहक जादू कुठे आणि नवीन गाण्यातला इला अरुणच्या आवाजातला व्हल्गरपणा कुठे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाटक बघितलेलं नाही, नाटकाबद्दल या वरच्या चार ओळी वगळता बाकी काही वाचलेलंही नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रतिसाद हा अंदाज आहे.

मनुष्याला आयसोलेटेड लिंग, योनी अशा रितीने मोजणारी असली टायटल्स फारशी आवडत नाहीत. पुरुष म्हणजे फक्त लिंग नव्हे तशी स्त्री म्हणजे फक्त योनी नव्हे. अगदी प्रतीकात्मक अर्थाने देखील. ही सर्व साधने आहेत. व्यक्ती आणखी बर्‍याच गोष्टींनी बनते.
हे म्हणजे आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे.

दोन-तीन तासांच्या नाटक-सिनेमात मनुष्य म्हणून कोणत्याही व्यक्तीचे जे निरनिराळे पैलू असतात/असतील ते सगळे दाखवणं शक्य नाही, एखादाच कोणतातरी निवडून त्याबद्दल उहापोह करण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळेस स्त्रियांची (किंवा पुरुषांची) लैंगिकता हा किंवा यातला उपविषय निवडला असल्यास त्याचं निर्देशक म्हणून लिंग, योनी असे शब्द येऊ शकतात. (त्यातही 'योनीमनीच्या गुजगोष्टी'चं मूळ नाटक Vagina Monologue आहे त्यावर vaginaच का vulva किंवा clit का नाही असा आक्षेप म्हणे घेतला गेला आहे.) लैंगिकता ही फक्त लैंगिक अवयवांपुरती मर्यादित नसते, पण निर्देशक म्हणून असे शब्द वापरणं अस्थानी वाटत नाही.

आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे.

दूधाच्या उत्पादनाबद्दल बोलताना, ललित लेखनात ही शैली अस्थानी वाटणार नाही.

---

स्त्रियांची कामतृप्ती कशी ओळखायची हे पुरुषांना शिकविण्यासाठी संभोगात रमलेल्या स्त्रियांचे मोनिंगचे आवाज मुद्दाम ऐकविण्यात आले. याचा अर्थ बहुसंख्य पुरुषांना स्त्रियांची कामतृप्ती कळत नसावी.

लैंगिकतेसंदर्भात स्त्रीवादी वाङमय, लिखाण वाचताना, स्त्रियांना या विषयाबद्दल "स्त्रीसुलभ" लज्जा वाटते, असं बरेचदा जाणवतं. अशी लज्जा वाटू नये, असाही एखादा हेतू असू शकतो.

पण हे सगळे अंदाज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन-तीन तासांच्या नाटक-सिनेमात मनुष्य म्हणून कोणत्याही व्यक्तीचे जे निरनिराळे पैलू असतात/असतील ते सगळे दाखवणं शक्य नाही, एखादाच कोणतातरी निवडून त्याबद्दल उहापोह करण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळेस स्त्रियांची (किंवा पुरुषांची) लैंगिकता हा किंवा यातला उपविषय निवडला असल्यास त्याचं निर्देशक म्हणून लिंग, योनी असे शब्द येऊ शकतात. लैंगिकता ही फक्त लैंगिक अवयवांपुरती मर्यादित नसते, पण निर्देशक म्हणून असे शब्द वापरणं अस्थानी वाटत नाही

जीवशास्त्रातल्या female reproductive system बद्दल हे नाटक नक्कीच नसावे. नाव हे जो विषय आहे त्याला धरुन असावे हे सर्वस्वी मान्य पण या वापराचा संदर्भ काय हे ही महत्त्वाचे. ऐसीवर मागे एक धागा होता - स्त्री लैंगिकतेची अभिव्यक्ति असे काहीसे त्याचे नाव होते - ते नाव अतिशय समर्पक होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे.

दूधाच्या उत्पादनाबद्दल बोलताना, ललित लेखनात ही शैली अस्थानी वाटणार नाही.

अस्से काय?

ठीक आहे, एक विनोद सांगतो. तो आक्षेपार्ह आहे किंवा कसे, असल्यास का आहे आणि नसल्यास का नाही, हे कृपया सांगणेंचे करावे.

एकदा दोन अल्पपरिचित गृहस्थ गप्पा मारत असताना त्यांपैकी एकजण दुसर्‍यास म्हणतो: "मला दहा मुले आहेत. आणखी एक असता, तर छानपैकी एक क्रिकेटची टीम झाली असती."

दुसरा गृहस्थ केवळ हसतो.

पहिला विचारतो: "का रे बाबा हसलास?"

दुसरा उत्तरतो: "नाही, यावरून आठवले. मला सतरा मुली आहेत. आणखी एक असती, तर छानपैकी एक गॉल्फ कोर्स झाला असता."
=========================================================================================
(अवांतर: "चौर्‍याऐशी लक्ष योनींचा फेरा" हा एक मोठ्ठाच मोठ्ठा गॉल्फ गेम असेल, नै?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हे म्हणजे आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे."

हा हा हा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हातारपणी कामप्रवृत्ती जागृत असणं हे समाजानं चूक ठरवलं आहे पण निसर्गाने नाही आणि म्हणून म्हातारपणी sexually active राहाणं चूक ठरत नाही.

सहमत आहे. हे अगदी समलैंगिकत्त्वा सारखंच आहे समाजानं काहीही ठरवो, निसर्गानं तसं ठरवलेलं नाही त्यामुळे त्यातही काही चूक नाही. तुम्हालाही तसंच म्हणायचंय ना?

बाकी मूळ नाटकाबद्दल काही माहित नसल्याने काहीच मत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'योनीमनीच्या गुजगोष्टी' अशा नांवाच्या नाटकाबद्दल जर हे असेल तर स्वतः नाटक बघितल्याशिवाय कुठलेही मत देता येणार नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहेच. ज्यांना याला उत्तर द्यायचे असेल ते पुरुष, 'लिंगाचे बिंग' वा तत्सम नांवाने नाटक काढू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांना याला उत्तर द्यायचे असेल ते पुरुष, 'लिंगाचे बिंग' वा तत्सम नांवाने नाटक काढू शकतात.

तसे नको. ते म्हणजे, फारच उघडउघड नि बटबटीत वाटते. थोडे साटल्य पाहिजे.

'दांडेकरांचा धाकटा भाऊ' (किंवा, 'दांडेकरांचा मधला') कसे वाटते? ('धाकटे दांडेकर' हाही पर्याय विचारात घेण्यासारखा आहे.)

('मोहित्यांची मंजुळा'च्या धर्तीवर 'दांडेकरांचा xxx' असेही काहीतरी करण्याचा बेत होता, परंतु 'मंजुळा'करिता सर्वपरिचित नि सर्वमान्य सब्स्टिट्यूट चटकन् न आठवल्याने तो रहित करावा लागला. 'दांडेकरांचा बाबूराव' असेही करता येईल.)

(पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक ह.पा.ला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनुष्य म्हणजे केवळ लिंग नाही (व्हजायना मोनोलॉग्स), केवळ दोन-एक भावना नाही (मानापमान), केवळ दारूचे व्यसन नाही (एकच प्याला) केवळ मोजण्यालायक नग नाही (चारचौघी), वगैरे, हे खरेच आहे.

परंतु २-३ तासांच्या नाटकात मनुष्यांचे कुठलेतरी वैशिष्ट्य अधोरेखित करायचे असते, आणि ते वैशिष्ट्य सांगणारे शीर्षक पुष्कळदा सोयीचे असते. (आवश्यक असते, असे नाही : "मॅकबेथ" हे शीर्षक त्याच्या कुठल्या स्वभाववैशिष्ट्याबाबत आहे, ते सांगत नाही.)

"योनीमनीच्या गुजगोष्टी" विषयानुरूप योग्य नाव आहे असे वाटते.

मुलां-मुलांमध्ये लैंगिक विनोद अधिक बोलले जातात, हे बहुधा खरे असले, तरी लैंगिकतेशी संबंधित ज्ञान तितके नसावे. शिश्नांडांबाबत (वैद्यकीय नाही, पण गंभीर/सामाजिक/ललित/अनुभवकथन) नाट्यरचना सुद्धा बघण्यालायक असू शकेल. कोणी (गूगलून शोधा, सापडेल) "कॉक टेल्स" आणि "द पीनिस रिस्पॉन्ड्स" हे नाट्यप्रयोगही केलेले आहेत. ते "व्हजायना मोनोलॉग्स" इतके चालले नाहीत - कदाचित लेखनाचा किंवा निर्मितीचा दर्जा तितका उत्तम नसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही नाटक पाहिलंत हे कळलं, पण हा लेख नाटकाची ओळख करुन देण्याकरता लिहला आहे का तुम्ही नाटक पाहिलं हे सांगण्याकरता? दुर्दैवाने(?) नाटकाचा विषय काय, नाटक कशाबद्दल आहे वगैरे काही माहिती कळली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

लेख वाचून नाटकाविषयी पुरेशी माहिती मिळत नाही. हे विनोदी नाटक आहे, की सामाजिक आहे की व्यक्तिचित्रण करणारं आहे? काही घट्ट वीण असलेलं कथानक आहे की स्टॅंडअप कॉमेडी प्रकारची एका सूत्राशी संबंधित विधानांची मालिका आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे नाटक सामाजिक मानता येईल. (दूरदर्शनवर जे प्रौढ्शिक्षणाचे कार्यक्रम असतात त्या धाटणीचं) कथानक असं काही नाही. "चार योनी" त्यांची मनोगतं व्यक्त करतात. आणि त्यांची कामपूर्ती समाजस्वास्थ्याकरता आवश्यक आहे हे ठसवायचा प्रयत्न करतात. त्यांच्या पूर्तीसाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व पुरुषांना उद्देशून असतं. स्त्रियांनी आपल्या कामजीवनातील गरजा पूर्ण करताना अपराधी भावना, संकोच बाळगू नये हे सांगितलं जातं (उदा. हस्तमैथुनाबद्दल संकोच बाळगु नये).

व्हजायना मोनोलॉग्जच्या मराठी अवताराचा बराच गाजवाजा झाला होता, ते बघता आले नव्हते म्हणून हे बघायला गेलो होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे म्हणजे आमच्या गोठ्यात सोळा आचळे आहेत असं म्हटल्यासारखं आहे.

गोठ्यात फक्त आचळच नस्तात.
गोठ्यात गोट्यासुद्धा असतात.
आणि गोट्यांशिवायचेसुद्ध असतात.
लिंगभेदाचा तीव्र निषेध!!!

१. माझ्या आईने कधीही जीन्स घातली नाही पण रोज साडीच घालताना तिला आपणांस अभिप्रेत

माझ्या आईनी कध्धी साडी घातली नाही.
पण साडी घालतच नैत ...
नेसतात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

माझ्या आईनी कध्धी साडी घातली नाही.
पण साडी घालतच नैत ...
नेसतात!

छे हो. आमच्या मराठवाडा-विदर्भ भागात साडी घालतात, नेसत नाहीत. शिवाय आजकाल रेडीमेड साड्या आल्यात (म्हणे), त्याही घालतातच, नेसत नाहीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

जालीय आयडी आणि घडामोडी यांवर आधारीत व्यनींच्या मनीच्या गुजगोष्टी असं एक नाटक लिहावसं वाटू लागलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

....

जालीय आयडी आणि घडामोडी यांवर आधारीत व्यनींच्या मनीच्या गुजगोष्टी असं एक नाटक लिहावसं वाटू लागलंय.

ते योनीलिंगवृषणवक्षादि सर्व गुजगोष्टींपेक्षा बरेच ज्यास्त स्फोटक आणि वादग्रस्त ठरेल अश्या स्वरुपाच्या शुभेच्छा देतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0