सकाळनेच कोलटकर-शहाणे यांच्याकडून छपाईचा खर्च वसूल करायला हवा होता

काही तरी चुकते आहे खास.

कोलटकरांची कविता छापून सकाळ आणि संदीप खरे यांनी नेमका गुन्हा काय केला? कोलकटकरांच्या कवितांचे वेगळे पुस्तक छापून त्यांनी पैसे कमावले आहेत का? चांगल्या भावनेने त्यांनी ही कविता छापली. सकाळमध्ये कविता छापून आल्याने कोलटकरांची कविता अधिक लोकांपर्यंत गेली. त्यातून त्यांचे दोन कवितासंग्रह जास्तीचे खपले असणार. याबाबत कृतज्ञता बाळगायचे सोडून आमचे काहीतरी कोट्यवधींचे धन लुटले गेले अशा थाटात त्यांच्यावर खटला भरणे म्हणजे अतीच झाले. हा सगळा उपद्व्याप करण्यामागे कोलटकर-शहाणे यांचा प्रसिद्धी मिळविण्याचा हेतू असणार यात कोणतीही शंका नाही.

तसेही मराठी कवितांना विचारतो कोण? कविता लिहून झाल्यावर स्वत: हे कवी लोकही आपल्या कविता पुन्हा वाचत नसतील. मुळात त्यात वाचण्यासारखे काही नसतेच. असे असूनही कोणी तुमच्या कवितांचा गौरव करीत असेल, तर ती आनंददायक गोष्ट म्हटली पाहिजे. मराठी कवितांना चांगले म्हणणाèया चाहत्यांचा गौरव केला पाहिजे. ते सोडून चाहत्यांना कोर्टाच्या फेèया मारायला लावणे नक्कीच शहाणपणाचे नाही.

या मुद्दावर ज्या बाजूने साधारणत: विचार केला जात आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने विचार करून पाहा. सकाळने कविता छापली. त्यासाठी सकाळच्या पानावरील काही कॉलम सेंटिमीटर जागा त्यासाठी खर्ची पडली. वृत्तपत्रांतील प्रत्येक कॉलम सेंटिमीटरला विशिष्ट किंमत असते. ही किंमत खरे तर सकाळने कोलटकर-शहाणे यांच्याकडून वसूल करायला हवी होती. कविता छापल्यानंतर सकाळने कोलटकर-शहाणे यांना एक बिल पाठवून छपाईचा खर्च मागायला हवा होता. हे नैसर्गिक झाले असते. सकाळने ते केले नाही. या पाश्र्वभूमीवर ‘फेअर डील'च्या तत्त्वानुसार, कोलकटकर-शहाणे यांनीच मनाचा मोठेपणा दाखवून कविता छापण्याचा खर्च सकाळला नम्रपणे पाठवून द्यायला हवा होता.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

त्या पेक्षा "फेअर डील'च्या तत्त्वानुसार" सकाळने आधी निमूट माफी छापून नंतर छपाईचा खर्च अशोक शहाणेंच्या कडून वसूल करण्याचा विचार करावा.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे वाचले आहे की चीनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा अपराध्याला गोळी घालून दिली जाते आणि त्यानंतर त्या शिक्षेच्या अंमलबजावणीचा खर्च अपराध्याच्या कुटुंबाकडून वसूल केला जातो.

गावगुंडाने एखाद्या गरीबाचे घर सक्तीने ताब्यात घ्यावे आणि नंतर घराच्या देखभालीचा आणि राखणीचा खर्च त्या गरीबाकडून मागावा.

वरच्या धाग्यात आणि ह्या दोन उदाहरणात काय फरक आहे?

कॉपीराइटकडे दुर्लक्ष ही नित्याचीच बाब आहे. मला माहीत असलेले एक उदाहरण देतो. माझे काका कै. बाळ कोल्हटकर ह्यांचे 'उठि उठि गोपाळा' हे गीत नेहमी ऐकू येते. (गणेशोत्सवात वगैरे ह्या गीतानेच सकाळी जाग येते!) ३ वर्षांपूर्वी मी 'मराठी बाणा' हा गाजलेला प्रयोग पाहण्यासाठी गेलो होतो. त्याची सुरुवातच ह्या गाण्याने झाली पण कार्यक्रमाच्या अखेरपर्यंत गाण्याचा लेखकाचा साधा उल्लेखहि कोठे कानावर पडला नाही, कॉपीराइट आणि गाणे वापरून उत्पन्न निर्माण केल्याबाबत लेखकाच्या वारसांना काही शुल्क देणे दूरच राहिले.

माझा एक भाचा सध्या गाजलेला संगीत दिग्दर्शक आहे. त्याला हे सांगण्यास मी गेलो तेव्हा त्यालाहि ह्या प्रकारात काही वावगे दिसले नाही. वरच्या धाग्यातील प्रतिवाद त्यानेहि केला. त्याचे म्हणणे असे पडले की ह्यात वाईट काय आहे? उलट ह्यामुळे काकांचे गाणे लोकांपुढे राहात आहे आणि त्यांच्या स्मृतीला अप्रत्यक्ष उजाळाच मिळत आहे.

(ह्यावर मला कोणी विचारेल की असे झाल्यावर तुम्ही किंवा बाळ कोल्हटकरांचे वारस कोर्टात का गेला नाहीत. प्रश्न बरोबर आहे, कोर्टात जाणे हा एक पर्याय आहे. पण तो पर्याय वापरण्याआधी कलाविष्कारासारख्या सुसंस्कृत क्षेत्रात दुसर्‍याचे काही फुकट उचलून आपला खिसा भरू नये, त्याला चोरी म्हणतात, ही जाणीव का न यावी?)

वरच्या धाग्यातील 'तसेही मराठी कवितांना विचारतो कोण? कविता लिहून झाल्यावर स्वत: हे कवी लोकही आपल्या कविता पुन्हा वाचत नसतील. मुळात त्यात वाचण्यासारखे काही नसतेच' असे ex-cathedra judgement सहजी लिहू शकणारे धीट लोकहि येथे आहेत हे पाहून मौनच बाळगलेले बरे. सर्ववेत्त्यांना कोण काय सांगणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावगुंडाने एखाद्या गरीबाचे घर सक्तीने ताब्यात घ्यावे आणि नंतर घराच्या देखभालीचा आणि राखणीचा खर्च त्या गरीबाकडून मागावा.

हे असे प्रकार दुसर्‍या महायुद्धकाळात झाले होते.

एगॉन शीलः (Egon Schiele) नावाच्या चित्रकारने दोन पोर्ट्रेट्स काढली होती, एक स्वतःचं आणि एक आपल्या मॉडेल मैत्रीणीचं. या मैत्रीणीच्या चित्राचं नाव Portrait of Wally. डाव्या बाजूला जे सिनेमाचं पोस्टर आहे, ते वॉलीच्या व्यक्तीचित्राच्या आर्टवर्कवरच बनवलेलं आहे. शीलः व्हीएनाचा रहिवासी होता, तेव्हा लेआ बाँडी नावाच्या, आर्ट गॅलरी चालवणार्‍या एका बाईंनी वॉलीचं चित्र स्वतःच्या व्यक्तिगत संग्रहासाठी हे विकत घेतलं. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीला जेव्हा नाझींनी ऑस्ट्रीयावर हल्ला(!) केला तेव्हा बाँडी यांचं कलादालन नाझींनी ताब्यात घेतलं. बाँडी यांच्या घरातून हे चित्र लंपास केलं आणि पुढे आयुष्यभर बाँडी हे चित्र शोधत राहिल्या. त्यांना ते जिवंतपणी मिळालं नाहीच. त्यांच्या वारसांनीही पुढे अनेक वर्ष या चित्राच्या मालकीसाठी ज्या 'चोरा'शी लढा दिला, त्याबद्दल हा 'पोर्ट्रेट ऑफ वॉली' नामक माहितीपट आहे.

याची इथे आठवण होण्याचं कारण आहे ते अगदी कोल्हटकरांनी लिहील्यासारखा प्रसंग बाँडी यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष आला म्हणून. महायुद्ध संपल्यानंतर बाँडी लंडनहून परत व्हीएनाला गेल्या. त्यांना त्यांचं कलादालन आणि चित्रसंग्रह परत हवा होता. तत्कालिन ऑस्ट्रीयन सरकारने त्यांना सांगितलं, "नाझींनी जेवढे पैसे घालून तुमचं कलादालन सुस्थितीत ठेवलं तेवढे भरा आणि कलादालन परत ताब्यात घ्या." या माहितीपटात पुढे अशा अर्थाचं वाक्य आहे, "ऑस्ट्रीयन लोकांना आता नाझींबद्दल सहानुभूती दाखवता येत नाही. पण महायुद्ध सुरू होताना आणि संपल्यावरही नाझींना ऑस्ट्रीयात बरीच सहानुभूती होती. आता हा डाग झटकून टाकण्याचा ते फार प्रयत्न करतात." काही ऑस्ट्रीयन कलावंतही अशाच अर्थाचे विचार मांडताना माहितीपटात दिसतात.

तेजासुद्धा नाझीप्रेमी ऑस्ट्रीयन लोकांचे वैचारिक भाईबंद दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आधी केले मग सांगितले.

नाहीतर चालू द्या तुमचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा वायफळ धागा वाचण्यात माझा अर्धा तास वाया गेला. त्याचे खरंतर $१०० धागालेखकाने द्यावेत. पण कोल्हटकरांचा एक चांगला प्रतिसाद आणि माझा प्रतिसाद वाचण्यात तुमचा गेलेला वेळ हे हिशेबात चुकते करून बाकी उरलेले $ ५० लेखकाने मला पाठवून द्यावेत. पोस्टखर्चास मी जबाबदार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्र.का.टा.आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

या पाश्र्वभूमीवर ‘फेअर डील'च्या तत्त्वानुसार, कोलकटकर-शहाणे यांनीच मनाचा मोठेपणा दाखवून कविता छापण्याचा खर्च सकाळला नम्रपणे पाठवून द्यायला हवा होता.

आयला, आपल्या प्रकाशनात हवं ते छापायचं आणि त्याचा छपाईखर्च लेखकाकडूनच घ्यायचा ही आयड्या मस्तच आहे. आपल्याला तर प्रचंड आवडली.

तेव्हा श्रीयुत/श्रीमती तेजा, ‘फेअर डील'च्या तत्त्वानुसार, कृपया ऐसी अक्षरेवर तुमचा लेख छापायचा खर्च तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून नम्रपणे ऐसी अक्षरेला पाठवून द्यावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परुळेकरांकडून ओरबाडून 'सकाळ' ताब्यात घेतला तेंव्हाही त्यांच्याकडून खर्च वसूल केला असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय या चर्चेमुळे लोकसत्ता आणि सकाळ यांची जी प्रसिद्धी झाली त्याचे बिल फेसबुकने लोकसत्ता आणि सकाळकडून वसूल करायला पायजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धागा मौजमजा या सदरात आला आहे म्हणून धागाकर्त्याला उपरोध अभिप्रेत आहे असे गृहीत धरले आहे.

परंतु वास्तवात अशीच प्रवृत्ती पाहिलेली आहे आणि वारंवार दिसते.
उदा. एका मराठी माणसांच्या मंडळाने आपल्या सभासदांपैकी हौशी कविंच्या कवितांचे पुस्तक छापायचे ठरवले तेव्हा मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की जे पूर्वी सदस्य होते पण आता नाहीत त्यांच्या ते सदस्य असताना सादर केलेल्या कविताही त्यात घेतल्या जाणार नाहीत.
ते सदस्य असताना केलेल्या कविता मंडळाचा इतिहास म्हणून सामील केल्या पाहिजेत; तसेही आपण त्यांना काही देणार नाही आहोत असे त्यांना म्हटले असता, "असं कसं? 'आपण' त्यांना हा 'प्लॅटफाॅर्म' देतोय ना!" असे उत्तर मिळाले.
ज्या सदस्यांनी वर्गणी भरून 'मराठी माणसाच्या गुणांना वाव देण्यासाठी' बनलेले ते मंडळ तगवले, वाढवले त्यांची ही कथा तर त्रयस्थाचं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलेल्या उदाहरणात मराठी मंडळाच्या जागी एखादं संस्थळ ठेवून पहिलं मनातल्यामनात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बी आर टी वर शेकडो अंक काढून झाले. बस डे वर विक्री वाढवण्याचा प्रयत्न करून झाला. तनिष्काच्या माध्यमातून आम्ही काहीतरी लय भारी करत आहोत असे सांगायचा प्रयत्न करून झाला. तरी कोणी म्हणेना की पेपर चांगला आहे. मग असल्या नतद्रष्ट वाचकांचा सूड घेण्यासाठी कोलटकरांची एक कविता टाकली छापून तर बिघडले काय? बाकी उरले काय आहे छापण्यासारखे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्याने डोळे उघडले. वृत्तपत्रांनी कविता छापणे केव्हांच बंद केले आहे. एक शंका आहे. हल्लीच काही वृत्तपत्रांनी झणझणीत वेब मसाला इ. आपल्या पोर्टलवर ठेवण्यास सुरुवात केलीच आहे. या ठिकाणी जवळच्या कुणाचे फोटो चुकून छापले गेले तर त्याचा खर्च लेखात म्हटल्याप्रमाणे संबंधित वृत्तपत्रास द्यायचा किंवा कसे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

साधारणतः ज्याचा फोटो छापला जातो त्याला छापणार्‍याने पैसे द्यायचे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाप्पा! मनमोहन्,मोदी,सचिन कुणा कुणाला किती पैसे देत असावेत?
पेप्रात एखादा मोठ्ठा मॉबचा, जनसमुदायाचा फोटो छापुन आला तर कसे करावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धागा मौजमजा या सदरात आला आहे म्हणून धागाकर्त्याला उपरोध अभिप्रेत आहे असे गृहीत धरले आहे.

शहाणे-कोलटकर जोडीने जो उपद्व्याप केला, तो प्रकारच मौजेचा आहे. त्यांचा उद्देश प्रसिद्धी मिळविणे हाच होता. ती त्यांना मिळाली. मी वर म्हटल्याप्रमाणे त्यांचे चार-दोन कविता संग्रह जास्तीचे खपले असतीलही.

बाप्पा! मनमोहन्,मोदी,सचिन कुणा कुणाला किती पैसे देत असावेत?
पेप्रात एखादा मोठ्ठा मॉबचा, जनसमुदायाचा फोटो छापुन आला तर कसे करावे?

मनमोहन, मोदी, सचिन यांना न्यूज व्हॅल्यू आहे. शहाणे-कोलटकरांना कोणतीही न्यूज व्हॅल्यू नाही. त्यामुळे शहाणे-कोलटकरांना थेट मनमोहन, मोदी, सचिनच्या पंक्तीत नेऊन बसविणे योग्य नाही.

गावगुंडाने एखाद्या गरीबाचे घर सक्तीने ताब्यात घ्यावे आणि नंतर घराच्या देखभालीचा आणि राखणीचा खर्च त्या गरीबाकडून मागावा.

सकाळ किंवा अन्य कोणत्याही वृत्तपत्राला गावगुंड अशी उपमा देणे हे जरा अतिच झाले. त्याचप्रमाणे शहाणे-कोलटकरांना थेट गरीबांच्या पंक्तीला नेऊन बसविणे हेही चूकच.

ता. क.

"मराठी कविता वाचतो कोण?", हा माझ्या लेखातील उल्लेख बहुतेकांना खटकलेला दिसतोय. पण वस्तुस्थिती हीच आहे. मुळात मराठी पुस्तकांची आवृत्ती १,००० (एक हजार) प्रतींची असते. या हजार प्रति विकायला किमान ५ वर्षे लागतात. कवितांच्या पुस्तकांची अवस्था तर याहूनही भीषण आहे. याला कोलटकरही अपवाद नाहीत. हजार लोकांपर्यंत पोहोचायलाही ज्या कवितेला पाचेक वर्षांचा काळ लागतो. त्याचे वर्णन "विचारतो कोण?" या सदरातच होऊ शकते.

असे गृहीत धरा की एखाद्या लेखक कवीचे पुस्तक वर्ष-दोन वर्षातच संपते; तरीही त्यामुळे वरील तथ्य फारसे बाधित होत नाही. वर्षाला एक आवृत्ती खपली तरी पाच वर्षांत फक्त पाच हजार पुस्तके विकली जातात. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी आहे. त्यातील किमान ९-१० कोटी लोक मराठी भाषिक आहेत. म्हणजे या कथित महाकवींच्या कविता ०.०००५ टक्के मराठी भाषिक लोकांपर्यंतही नीटपणे पोहोचत नाही. अशा कवितांचे वर्णन "विचारतो कोण?" या सदरातच होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे गृहीत धरा की एखाद्या लेखक कवीचे पुस्तक वर्ष-दोन वर्षातच संपते; तरीही त्यामुळे वरील तथ्य फारसे बाधित होत नाही. वर्षाला एक आवृत्ती खपली तरी पाच वर्षांत फक्त पाच हजार पुस्तके विकली जातात. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी आहे. त्यातील किमान ९-१० कोटी लोक मराठी भाषिक आहेत. म्हणजे या कथित महाकवींच्या कविता ०.०००५ टक्के मराठी भाषिक लोकांपर्यंतही नीटपणे पोहोचत नाही. अशा कवितांचे वर्णन "विचारतो कोण?" या सदरातच होऊ शकते.

लेखातील उर्वरित लॉजिकबद्दल संमिश्र भावना असल्या (आणि, विशेष करून, 'सकाळनेच कोलटकर-शहाणे यांच्याकडून छपाईचा खर्च वसूल करायला हवा होता' हे आर्ग्युमेंट कोर्टात साधारणतः पाच सेकंदांहून अधिक काळ टिकून न राहण्याच्या लायकीचे अत एव न पटण्यासारखे वाटत असले, अ‍ॅन अटर पर्सनल ल्याक ऑफ रिष्पेक्ट टूवर्ड्ज़ मिष्टर कोलटकर नॉटविथष्ट्यांडिंग), तरी ताज्या कलमातील या 'पर क्यापिटा लोकप्रियते'संबंधीच्या (किंवा, 'विचारतो कोण' हा प्रश्न लक्षात घेता, 'पर क्यापिटा पृच्छणीयते'संबंधीच्या) आर्ग्युमेंटामागील लॉजिक रोचक वाटले.
====================================================================================================================

येथे, प्रस्तुत आर्ग्युमेंटाचे ष्टेटमेंट कोर्टात मांडावयास सुमारे पाच सेकंद लागावेत, असे गृहीत धरले आहे. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात मराठी पुस्तकांची आवृत्ती १,००० (एक हजार) प्रतींची असते. या हजार प्रति विकायला किमान ५ वर्षे लागतात.

अहो, पूर्वीचं पुणं राहिलं नाही आता. काये, कॉपी करायची तरी ते पुस्तक/वर्तमाणपत्राचा चिटोराही थोडा तरी नवा पायजेल, नैका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> शहाणे-कोलटकर जोडीने जो उपद्व्याप केला, तो प्रकारच मौजेचा आहे. त्यांचा उद्देश प्रसिद्धी मिळविणे हाच होता. ती त्यांना मिळाली. <<

कोलटकर मरून काही वर्षं झालीत. अर्थात, त्यांचं भूत प्लँचेटद्वारे शहाण्यांशी संवाद साधत असेल आणि ते जोडीनं कोर्टात जात असतील वगैरे शक्यता नाकारता येत नाहीत.
असो. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कदाचित अशोक शहाणे आणि सूनु कोलटकर असे त्यांच्या मनात असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मग मराठी गंडलंय. कारण पुढच्याच वाक्यात 'त्यांचे चार-दोन कविता संग्रह जास्तीचे खपले असतीलही' असंदेखील म्हटलेलं आहे. आता सुनूताईंचे कविता संग्रह कोणते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण मग मराठी गंडलंय.

नक्की काय काय गंडलंय याचा एकदाच काय तो हिशोब लावा. कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रस्तावात काही गाळलेल्या जागा भरल्यास गोंधळ होऊ नये. एकूणात प्रस्ताव गांडळलेला (शब्द गाळल्याने गंडलेला) वाटतो.

अरूण कोलटकरांची कविता छापून सकाळ आणि संदीप खरे यांनी नेमका गुन्हा काय केला? अरूण कोलकटकरांच्या कवितांचे वेगळे पुस्तक छापून त्यांनी पैसे कमावले आहेत का? चांगल्या भावनेने त्यांनी ही कविता छापली. सकाळमध्ये कविता छापून आल्याने अरूण कोलटकरांची कविता अधिक लोकांपर्यंत गेली. त्यातून अरूण कोलटकर यांचे दोन कवितासंग्रह जास्तीचे खपले असणार. याबाबत सुनू कोलटकर यांनी कृतज्ञता बाळगायचे सोडून आमचे काहीतरी कोट्यवधींचे धन लुटले गेले अशा थाटात त्यांच्यावर खटला भरणे म्हणजे अतीच झाले. हा सगळा उपद्व्याप करण्यामागे कोलटकर-शहाणे यांचा प्रसिद्धी मिळविण्याचा हेतू असणार यात कोणतीही शंका नाही.

________
१. सुनू कोलटकर यांना त्यांच्या दिवंगत पतीच्या पुस्तकांचा खप वाढवणार्‍याबद्दल कृतज्ञता वाटायला हवी होती, असे गृहीतक यामागे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Et tu, Brute?

विक्षिप्तबाई, बोडकीचा असा औपहासिक उल्लेख तुमच्याकडून तुमच्याकडून केला जावा अं? ईश्वरा, आता मिटव डोळे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधल्या काळात या लोकांनी संस्कृती बुडवून फार घोळ घातला हो. मला बोडकी म्हटल्यावर एकतर शबाना आठवते किंवा पर्सिस खंबाटा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला बोडकी म्हटल्यावर एकतर शबाना आठवते किंवा पर्सिस खंबाटा

आम्हाला (बोडकी होता होता वाचलेल्या) सुषमातै आठवतात!

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्यत्र रक्षाबंधनावर गळा काढणार्‍यांनी अशी स्त्रीद्वेष्टी म्हण स्वतः वापरावी यातला विरोधाभास रोचक आहे. बहुतेक स्वतः आणि स्वेतर लोकांना वेगळे नियम लागत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अपेक्षा महाराष्ट्राच्या नावाचं सदर 'चालू' झाल्यापासुन पेपर फुकट देतो आतातरी घ्या असे आमचा पेपरवाला म्हणत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पहिला मित्र दुसर्‍याला १००० रु मागतो. हो नाही करता करता दुसरा शेवटी ५००/- देतो. नंतर पहिला पैसे परत करायचे नावच घेत नाही. शेवटी दुसरा मग कंटाळुन विषय काढतो. पहिला म्हणतो तुच मला ५००/- देण आहे. दुसरा चकित होतो. कसे काय? हे बघ मी किती मागितले होते तुला? दुसरा म्हणतो एक हजार. मग तू दिले किती? पाचशे. म्हणजे तुच मला पाचशे देणे नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

उपरोधिक आहे का कळत नाही पण चुकीचे आहे .ज्या कृतीचे कॉपीराईट कोणाकडे आहे त्याची लेखी अनुमती हवीच .या नियमाने कोर्टाने खटला दाखल करून घेतला .इथे कोलटकरांचे प्रतिसादातले उठि उठि गोपाळा चे उदा:हरण ,वारस कोर्टात गेले तर हे गाणे फुकटचे वाजवता येणार नाही .गाण्याच्या कासेट सीडी काढणारा फुकटचा फायदा लाटतोय .तीनचार वर्षांपासून गणेशोत्सवांतील गाणी बॉलिवुडने बंद करायला लावलीच .कवी आपल्या कविता वाचतील नाहीतर बंबात जाळतील प्रडूयसर त्या गाण्यांचे काहीही करतील .तेजा तुमचा मुददा नाही पटला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या प्रतिपादनातला अर्थ समजून घ्या. कॉपिराईटबद्दल काही वादच नाही. लेखक/कवीला आणि प्रकाशकाला कॉपीराईटचा हक्क असलाच पाहिजे. पण कॉपीराईट कुठे वापरायचा आणि कुठे नाही, याबाबतचे तारतम्य असायला हवे. ते वरील प्रकरणात पाळले गेलेले नाही. सकाळ अथवा खरे यांनी कोलटकरांची कविता छापून चार पैसे कमावले आहेत का? अथवा सकाळमध्ये कविता छापून आल्याने कोलटकर-शहाणे यांचे काही आर्थिक नुकसान झाले आहे का? तर, असे काहीही झालेले नाही. उलट कवीची प्रसिद्धीच झाली आहे. उठी उठी गोपाळाचे उदाहरण येथे गैरलागू आहे, हे स्पष्टपणे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळ अनेक बाबतींत अतिशहाणपणा करतो आणि वर्तमानपत्रातली जागा भरण्यासाठी तर काय वाटेल ते करतो - उदा : गर्भसंस्कार, बस डे, सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राच्या अपेक्षा वगैरे. सबब, 'सकाळ'ला अद्दल घडवणारं कुणीही कौतुकाला पात्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सदर लेख मुपीत छापून सकाळ स्वतःलाच अद्दल घडवू शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ती कशी काय बॉ? या एका लेखाने मुपीच्या लोकप्रियतेवर शष्प परिणाम होणार नाही. लेखाशी संबंध असो वा नसो, ज्यु. ब्रह्मे, स्वाती ठकार, बालमोहन अमेरिका, पोतदार-पावसकर मॅडम, पुणेकर आणि बाकी अनेक लोकांच्या तद्दन अवांतर प्रतिक्रियावरच ज्याचा ट्यार्पी अवलंबून आहे त्या सदराला एका लेखाने काही होणार नाही. "आज आपले भारत जिंकले पाहिजे" अशा प्रतिक्रियाही कैकदा दिसतात, तस्मात कोरम भरावयास अज्जीच अडचण नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सकाळ अनेक बाबतींत अतिशहाणपणा करतो आणि वर्तमानपत्रातली जागा भरण्यासाठी तर काय वाटेल ते करतो - उदा : गर्भसंस्कार, बस डे, सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राच्या अपेक्षा वगैरे. सबब, 'सकाळ'ला अद्दल घडवणारं कुणीही कौतुकाला पात्र आहे.

आपला राग नेमका कशावर आहे? सकाळने केलेल्या कॉपीराईटभंगावर आहे की, मुळात सकाळ पेपरवरच? सकाळ पेपरवरच राग असेल, तर मग बोलायलाच नको. मग सकाळमधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला चुकीचीच दिसणार. म्हणजेत्यांची भूमिका न्याय्य असली तरी तुम्ही ती मान्य करू शकणार नाही, कारण तुमचा रागच मुळात सकाळवर आहे. पूर्वग्रह कधीही घातकच असतात, हे येथे लक्षात घेतलेले बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मग सकाळमधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला चुकीचीच दिसणार. म्हणजेत्यांची भूमिका न्याय्य असली तरी तुम्ही ती मान्य करू शकणार नाही, कारण तुमचा रागच मुळात सकाळवर आहे. <<

पण इथे कोणत्याही बाजूनं पाहिलं तरी सकाळची भूमिका न्याय्य नव्हतीच. किंबहुना, ह्या प्रकरणात सकाळच्या बेमुर्वतखोरीचा आणि निष्काळजीपणाचा कळस झालेला दिसतो (न्यायालयाकडून आलेल्या समन्सला दाद न देणं, स्वत:ची बाजू मांडण्यासाठी तारखांना हजर न राहणं वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तेजा यांना दोन प्रतिसादांमधून, स्पष्टपणे नोटीस दिल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयाकरवी हे प्रतिसाद दिले नसले तरीही, तेजा यांनी या प्रतिसादांची दखलही घेतली नसल्याचं दिसतं. सकाळनेही शहाण्यांच्या पत्रांबाबत हेच केलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॉपीराईटचा भंग हा झालाच .त्याने भरपाई किती द्यायची हा दुसरा मुद्दा झाला .पेपरातील मजकुराशी संपादक सहमत नसल्यामुळे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे लेखन नसल्यामुळे पेपरसमूह संपूर्णपणे अलिप्त राहातो .इथे एका प्रतिसादात आट गैलरी आणि चित्राचा मालकिचा या खटल्याशी साधर्म्य दाखवण्याचा चुकीचा प्रयत्न केलेला आहे .युध्दात जिंकणारा देश सर्व मालमत्तेचा मालक होतो .नंतर संबंध सुधारले म्हणून ती वस्तु फुकट परत कशी मिळेल ? असे असते तर गोवळकोंडयाचे हिरे लंडनहून परत मिळाले असते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्यकारणभाव हुकला आहे.

अॉस्ट्रिया 'मतदान' करून, बहुसंख्येच्या 'इच्छे'नुसार नात्झी जर्मनीत विलीन झाला होता. जर्मनी-अॉस्ट्रिया असं युद्ध झालंच नाही. लेआ बॉंडी यांची खासगी मालमत्ता नात्झी सैनिकांनी ताब्यात घेतली होती. त्यांचं कलादालन सरकारी नव्हतं. त्यांच्या मालमत्तेवर टाच आलेली होती कारण त्या ज्यू होत्या. ख्रिश्चन अॉस्ट्रियन लोकांची मालमत्ता (बॉंब पडेल नसल्यास) शाबूत होती. महायुद्ध संपल्यानंतर अॉस्ट्रीयन सरकारने लेआ बॉंडी यांना "पैसे भरा, वस्तू ताब्यात घ्या" हे सांगितलं, त्यात नात्झी (हे तोपर्यंत करारमदार करण्याच्या परिस्थितीत नव्हतेच) किंवा जर्मन सरकारचा काहीच संबंध नव्हता. शिवाय हे करताना त्यावर लेआ बॉंडी यांचा मूळ हक्क मान्य केला गेला.

गोवळकोंड्याचे हिरे हे नक्की काय प्रकरण आहे हे माहित नाही. पण युद्धखर्च म्हणून जीतांकडून मालमत्ता वसूल केली जात असेल तर त्याचा संबंध सुधारण्याशी फार संबंध लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोवळकोंड्याचे हिरे हे नक्की काय प्रकरण आहे हे माहित नाही. पण युद्धखर्च म्हणून जीतांकडून मालमत्ता वसूल केली जात असेल तर त्याचा संबंध सुधारण्याशी फार संबंध लागत नाही.

म्हण्जे नेमके काय? कोणी स्पष्ट करील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0