वाचनप्रेमींना जाहिर प्रश्न....
इथल्या सर्व पुस्तक्वेड्यांबद्दल मला सदैव पडणारे काही असूयायुक्त प्रश्नः-
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?(ह्याचं उत्तर जितकी जणं देतील तितकं चांगलच;
शिवाय नगरिनिरंजन ह्यांनीही ह्या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं नाही तर बरं होइल.)
.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का?
की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता?
.
इथं चर्चा करणारी तुम्ही माणसं अचाट,अफाट वाचन असणारी दिसता, काही शे पुस्तकं कुणाकुणाच्या वैयक्तिक संग्रहात आहेत, कुणाची वाचून्/पचवून झालित,
म्हणून मुद्दाम ह्या मंचावर हे विचारावसं वाटलं; सगळ्यांनाच, एकसाथ, होलसेलमध्ये.
.
तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का?
वाटत असल्यासः- आपण वाचत सुटल्यास कुणाचा तरी प्रभाव पडून आपण नकळत नक्कल करु लागू असे वाटत नाही का? ही भीती तुम्ही कशी म्यानेज करता?
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का
आवड, हौस, खाज.१
अलीकडे चिरकाल एकच एक भावनिक अस्वस्थता टिकत नाही. योग्य वाटेल ते घेतो आणि मनात त्याची नोंद होते. ते पुढे कुठेतरी, कधीतरी, कसेतरी दिसते.
.
प्रथमार्धाचे उत्तर १ मध्ये दिसेलच. द्वितीयार्धाचेही उत्तर काहीसे तसेच.
पोटापाण्याच्या चिंता पूर्णपणे कधीच मिटत नसतात, त्यामुळे आवड जोपासायची तर असेच केल्या जाते.
त्यातून ही आवड तितकीशी खर्चिकही नाही. ईबुक्स आणि नेटच्या जमान्यात तर लैच तापशून्य मामला झालाय. तस्मात, तुलनात्मकरीत्या फार पैसे न खर्चता असे होत असेल तर क्यूँ ना करें?
वाचून झाल्यावर ठेवून देतो. लहर येईल तसे पुन्हा वाचतो. स्वतःची पुस्तके कुणाला वाचायला देणे किंवा विकणे हे माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही.
.
लाख वाटतं हो, पण त्याने काय होणारे. तेवढा अभ्यास अन वेळ पाहिजे. बाकी भानगडी जमवताना चुकूनमाकून जर कधी जमलंच तर पाडू एखादं पुस्तक, हाकानाका
हे झालं नॉनफिक्शनबद्दल. फिक्शनबद्दल ती भीती योग्य आहे पण मला लागू नै कारण वो हमसे ना हो पायेगा. (बॅटाधीर सिंह).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाचन (आणि सगळेच छंद) आणि
वाचन (आणि सगळेच छंद) आणि मूलभूत गरजा यांच्यामधे काही कॉन्फ्लिक्ट आहे, असं तुम्ही गृहित का धरताय? अन्न, वस्त्र, छप्पर या गरजा भागूनही काही नशीबवान लोकांकडे बर्यापैकी रिकामा वेळ उरतो. (तुमच्याकडे उरत नाही का? तसं नसणार, नाहीतर तुम्हाला असले प्रश्न पडलेच नसते. ;-)) तुमच्या सगळ्या मूलभूत गरजा भागल्यात का? तरी तुम्ही इथे असा टीपी करताय की नाही? तसाच टीपी करायला मी वाचते.
वाचून त्रास? नाही बा होत. थोडीफार अस्वस्थता येते - क्वचित कधीतरी. पण इतपत अस्वस्थता नसेल, तर काय गंमत आहे एकूणच कशातही (पुस्तक वा सिनेमा वा कविता वा गाणं वा माणूस वा.. असो.)? अशा अस्वस्थतेतून डोक्यातले काही गोटे एकमेकांवर आपटतात, आपण थोडे बदलतो, उघडतो, पुढे (वा मागे) जातो, आपल्यात, वा इतर कुणात वा इतर कशात बदल घडावा म्हणून पुन्हा अस्वस्थ होतो. थोडीफार, अर्धीमुर्धी, अजून प्रश्न पाडणारी उत्तरं कधीतरी मिळतात, त्यानं मज्जा येते. ही अस्वस्थता आणि ही मजा एकमेकांत गुंतलेल्या असतात. त्या मिळवण्याचा पुस्तकाइतका स्वस्त, सोईचा, कमीत कमी धोक्याचा आणि अफाट आवाका असलेला दुसरा मार्ग नसेल. म्हणून वाचन.
वाचलेली सगळी पुस्तकं काही स्वत:जवळ बाळगावीशी वाटत नाहीत. ते शक्यही नसतं. बदलणार्या आपल्यासह स्वत:ही बदलतील, नवीन अर्थ दाखवू शकतील असा आवाका असलेली काही(काहीच) पुस्तकं असतात - निदान त्या त्या वेळी भासतात. ती कष्ट घेऊन सोबत बाळगली जातात. त्याबद्दल सहसा पश्चात्ताप झाल्याचं आठवत नाही. ती लोकांना देणं वा विकणं (बॅट्याचे शब्द उधार-) स्वप्नातही येऊ शकत नाही. पण या लूपमधून बाहेर फेकली गेलेली पुस्तकंही असतात. मी तरी अशी पुस्तकं रद्दीत विकायला शिकले आहे. कारण मला रद्दीवाल्याकडे कितीक अनमोल रत्नं मिळाली आहेत.
स्वत: लिहिण्याबद्दल: वाटेल ढीग हो. पण रिकाम** छंदांत वेळ न घालवता बैठक मारून बसलं की झालं पुस्तक - असं होत नसावं, असा मला दाट संशय आहे. तो दूर झाला की, झाला तर, झाल्यावर लगेच तीन तरी पुस्तकं लिहिणारे मी. अर्पणपत्रिका तय्यार आहेत.
बाकी प्रभाव पडायचे ते पडतातच. त्यांना घाबरलं तर च्यायला लेखन काय, काहीच करायला नको. प्रभावबिभाव पडू द्यावेत. असलीच आपली थोडीफार लायकी, तर त्यातून आपण लवकरच बाहेर पडतो. काहीतरी कमावूनच बाहेर पडतो असं दिसतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
त्यानं मज्जा येते. ही
म्हणूनच त्याला मज्जासंस्था म्हणतात होय.. शाळेत कळलं नव्हतं.. आत्ता समजलं..
अपेक्षित श्रेणी : विनोदी
घ्या, दिली!
घ्या, दिली!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
धन्यवाद. आता तुम्हाला माझ्या
धन्यवाद.
आता तुम्हाला माझ्या दोन मार्मिक आणि एक रोचक पक्क्या..
१. मी फक्त इंग्रजी फिक्शन
१. मी फक्त इंग्रजी फिक्शन वाचते. आतापर्यँत तरी 'इतकी सारी' म्हणण्याएवढी यादी झाली नाही.
२. मला चाइल्ड अब्युज असलेली पुस्तक वाचुन त्रास होतो. (आणि फिफ्टी शेड्स मधे सारखसारखं 'oh my' वाचुनपण त्रास झाला :-P)
३. फिक्शनच असल्याने त्रास काही काळाने कमी होतो किँवा दुसर एखादं लाइट पुस्तक वाचायच.
४. सध्या भरपुर वेळ आहे.
५. पोटापाण्याच्या चिँता मिटल्या आहेत अशा आशेवर जगतेय.
६. मुलभुत गरजा फार कमी आहेत.
७. तेवढी संपत्ती कमवुन झालीय अशा आशेवर आहे सध्यातरी. पुण्यात रिअल इस्टेट खड्ड्यात गेलं तर आमी बी जाउ त्याच्यासोबत.
८. मी इबुकच वाचते, त्यामुळे कोणाला हवे असेलतर फॉर्वड करते.
९. विकत घेतलेली जी थोडी आहेत ती दुसर्यांना द्यायला मला आवडत नाही.
१०. मी आणि लेखक
१. मी जेव्हा कॉलेज जीवनात
१. मी जेव्हा कॉलेज जीवनात होतो तेव्हा वाचन खूपच कमी होते. (शालेय जीवनात किंचित जास्त होते..... कारण कॉलेज जीवनात 'दुनियादारी' असते ती शालेय जीवनात नव्हती). पण कॉलेज संपून नोकरीला लागलो तो काळ जुन्या अर्थव्यवस्थेचा होता. त्यामुळे एम्प्लॉयी एक्स्प्लॉयटेशन कमी होते. त्यात एका परदेशी मूळ असलेल्या कंपनीत नोकरी लागली. शनिवार-रविवार सुट्टी असे. आणि टीव्ही (केवळ दूरदर्शन होते) पाहण्याची खूप आवड नव्हती. मग काय भरपूर मोकळा वेळ (लग्न झाले नव्हते
).
२. महिन्या दोन महिन्याला एक पुस्तक विकत घेणे सहज परवडते.
३. विकत घेऊन वाचायची पुस्तके आणि विकत न घेता वाचायची पुस्तके यांचे क्लासिफिकेशन केले आहे. फिक्शन-कादंबर्या सहसा विकत घेत नाही.
४. काही पुस्तके पुन:पुन्हा वाचली जातात. क्रॉस रेफ़रन्ससाठी वगैरे.
>>काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?
काही पुस्तके वाचली की सुरुवातीला त्रास होतो. पण हळुहळू कमी होऊ लागतो. (कोडगेपणा? किंवा कदाचित सत्य हे कुठेतरी मध्ये असते याची जाणीव).
पुस्तकं विकत नाही. पण ती "गहाळ" मात्र होतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझी उत्तरं
माझ्या मते हा फार गहन प्रश्न आहे. एक सोपं उत्तर : एकदा वाचनाची सवय लागली की ते एखाद्या मादक द्रव्याच्या व्यसनासारखं असतं. म्हणजे बऱ्याच दिवसांत काही चांगलं वाचलं गेलं नाही तर अस्वस्थ वाटू लागतं, वगैरे.
पुस्तकच नाही, तर मुळात कोणतीही चांगली कलाकृती जर आपल्या मनात खोलवर रुतली, तर अधिक चांगली रुजते. आणि अधिक रुजली, तर दीर्घकाळ आपली सोबत करते. जर हे रुतणंच टाळत गेलं, तर वर सांगितल्याप्रमाणे व्यसनदेखील लागणार नाही.
अर्थात, वेफर, पॉपकॉर्नसारख्या जंक फूडचं जसं आकर्षण वाटू शकतं, तसंच किरकोळ रंजन करणाऱ्या हलक्याफुलक्या कलाकृतीचंसुद्धा वाटू शकतं. त्यानं होणारा त्रास वेगळा असतो. तुम्हाला तो अस्वस्थ करत नाही. त्यामुळे तुम्हाला तो अभिप्रेत नसावा असं वाटतं.
अगदी आदिम काळापासून माणूस गुफाचित्रं, खेळणी वगैरे गोष्टी आपल्या परिसरात निर्माण करत आणि जवळ बाळगत आला आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी धावाधाव करणारा माणूससुद्धा आपल्या पद्धतीनं (आणि वेगानं) जमेल तसं वाचन चालू ठेवू शकतो. मुळात ती आवड असायला हवी. अन्यथा पोटापाण्याची भ्रांत नसलेली पण आहार-निद्रा-भय-मैथुन ह्यापलीकडे काहीही करत नसलेली माणसं जगात आहेतच.
पुस्तक विकत घेणं आणि संग्रही ठेवणं हा ज्याच्या त्याच्या तारतम्याचा भाग आहे. कालांतरानं रुचीही बदलते. त्यामुळे एके काळी आवडलेली पुस्तकं नंतर नकोशी वाटू शकतात. पुस्तकाच्या दर्जानुसार आणि संग्रहमूल्यानुसार ती अधूनमधून संग्रहातून काढून टाकणं हे कुणाही पुस्तकप्रेमी माणसाचं 'ऑक्युपेशनल हॅजर्ड' आहे. पुस्तकं (अगदी अप्रिय झालेली किंवा न आवडलेली सुद्धा) शक्यतो सुस्थळी जावी असं वाटतं. विकत शक्यतो नाही. रद्दीत द्यावीशी वाटावी अशी पुस्तकं मुळात विकत घेतच नाही. त्यापेक्षा ग्रंथालय किंवा मित्रसंग्रहातून पुस्तक मिळवून ते परत करणं पसंत आहे. असं एखादं पुस्तक संग्रही असावं असं वाटलं तर मग ते यथावकाश विकत घेता येतं. ह्या संदर्भात नरहर कुरुंदकरांचा 'माझा ग्रंथसंग्रह नाही!' हा निबंध वाचा अशी शिफारस करेन.
मुळात वाचन आणि लिखाण ह्या दोन वेगवेगळ्या कृती आहेत. चांगला वाचक चांगला लेखक होईलच असं नाही. इथे मला (आणि बहुधा तुम्हालाही) क्रिएटिव्ह लिखाण अभिप्रेत आहे. मी 'ऐसी'वर जे लिखाण करतो त्याला मी क्रिएटिव्ह मानत नाही.
आपली प्रवृत्ती आणि शैली ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं. उदा : जेम्स जॉइसची शैली वेगळी आणि ग्रॅहॅम ग्रीनची वेगळी. दोन्ही आपापल्या जागी शोभतात, कारण त्या खास त्यांच्या आहेत. जी आपली शैली नाही ती उसनी घेतली तर होणारं लिखाण कलाकुसरीसारखं होऊ शकेल; क्रिएटिव्ह होणार नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सर्वांत महत्त्वाचे
बाकीचे मुद्दे मार्मिक आहेतच, पण सर्वांत जास्त हा अधोरेखित मुद्दा महत्त्वाचा. वाचन वैग्रे चैन आहे असे मानणार्यांचे शिकरण-मटार उसळ वैग्रे अन्य छंद असतात त्याला ते चैन मानत नाहीत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गविंचा प्रश्न चिंतातुरांनाच
गविंचा प्रश्न चिंतातुरांनाच (म्हणजे तशा व्यक्तित्वाच्या माणसाला) होता. त्याचं अगदी संतुलित उत्तर. आवडलं
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कुरुंदकरांचा 'माझा
कुरुंदकरांचा 'माझा ग्रंथसंग्रह नाही' हा लेख येथे वाचता येईल - http://www.loksatta.com/lokrang-news/upcoming-marathi-book-nivadak-narha...
चिंजंनी प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे, यात तारतम्य महत्त्वाचे. खुद्द कुरुंदकरांनीच विद्यार्थ्यांनी आपल्या या सवयीचे अनुकरण करू नये असे म्हटले आहे -
आम्ही
आम्ही सर्व भावंडं आता सिनियर सिटिझन उर्फ वरिष्ठ नागरिक आहोत. त्यामुळे सणाला, वाढदिवसाला वा अन्य काही निमित्ताने एकमेकांना पुस्तके भेट देतो. अर्थातच एकमेकांमधे सर्क्युलेट करतो. त्यामुळे भरपूर वाचन होते. दरवर्षी काहीतरी निरर्थक आणि महागडी भेटवस्तु देण्यापेक्षा हे चांगले, हे सर्वांना पटले आहे.
वाचल्याशिवाय जगणे अशक्य आहे .
१ . वाचल्याशिवाय जगणे अशक्य आहे म्हणून वाचते .
२ . अतिशय त्रास होतो . नैराश्य येत . ब्रेक घेऊन दुसरे पुस्तक वाचते . गेल्या वर्षभरात सतत संमोहित झाल्यागत ह्युमन सफरिंगशी निगडीत पुस्तके वाचली .
३. मी लायब्रेरीयन असल्याने कार्यालयात बसून वाचणे सहज शक्य आहे . पोटापाण्याची चिंता नाही आणि चैनीत रहायचा षौक नाही .
४. शक्यतो मी सार्वजनिक वाचनालयातून पुस्तके आणते त्यामुळे वेळेचे बंधन असते आणि पुस्तक हमखास वाचून होते . (अपवाद फक्त "समृद्ध अडगळ " पुष्कळ दिवस साठवून ठेवली होती शेवटी वाचणे अशक्य झाल्याने परत केली .) विकत घेतलेली पुस्तके सावकाश वाचू , काय घाई आहे म्हणून पडून रहातात . माझी पुस्तके मी अगदी निवडक लोकांना वाचायला देते . विकून टाकण्या ऐवजी मी वाचनालयाला देईन .
५ . पुस्तक लिहिण्याचे कष्ट कोण करेल प्रभो ? शिवाय चुकून माकून लिहिले तर वाचणार कोण हा ही प्रश्न आहेच . माझे वाचन इतके फुलपाखरी आहे कि कोणाचा प्रभाव पडला हे शोधणे कठीणचं असेल .
मी पुस्तक वेडा नाही तरी काहीबाही
१.) तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
एखादा धागा सुरु होतो, लोक आपापली यादी देउ लागतात. आपण सगळ्यांचे प्रतिसाद वाचत असतो. दहा लोक असली व दहा जणांना दोन दोन उपप्रतिसाद आले तरी आपल्याला/एखाद्याला वाटते की सर्वांनी सर्व/भरपूर पुस्तके वाचली आहेत. खरे तर प्रत्येकाने त्या यादीतली फक्त दोन - तीन वाचलेली असु शकतात.
२) त्रास होणे न होणे हे सापेक्ष. वय - अनुभव - संवेदनशीलता वगैरे वगैरे
३) पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
आपल्याला जी गोष्ट आनंद देते त्याकरता मनुष्य वेळ काढू शकतो/ काढतोच. त्यामुळे चिंता मिटल्या - न मिटल्या प्रश्न आवडत्या कामात/छंदात भेसाडवत नाही.
बाकी प्रश्नांची उत्तरे वर आली आहे अथवा प्रश्न लागू होत नाही.
अवांतर - लेखन, चित्रकला हे फार जुने प्रकार मानले जातात. पण लेखनावर अथवा कोणत्या कलेवर आधारीत फिल्म्स, माहितीपट, प्रदर्शने, व्याखाने, चर्चा असतात त्यात सहभागी असले तर ते मुळ पुस्तक वाचलेच गेलेच पाहीजे असे नाही. फिल्म ह्या तुलनेत नव्या माध्यमामुळे फक्त पुस्तक वाचनापेक्षा भरपूर काही मिळू शकते. अर्थात पुस्तके वाचू नये किंवा पुस्तके श्रेष्ठ की अन्य माध्यमे असे काही दावे नाही.
पुस्तकवेडा नाही तरीही काही
पुस्तकवेडा नाही तरीही काही उत्तरे.
>>तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?<<
छे एवढी पुस्तके मी वाचत नाही. त्यातली बरीचशी चाळतो फक्त.
>>काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?<<
होतो थोडा त्रास पण ती अस्वस्थता फार काळ टिकत नाही. विश्वाच्या पटलावर आपण स्वतःला क्षुद्र मानले की हा त्रास होत नाही.
>>पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?<<
व्हीआरएस घेतली ना! त्यामुळे वेगळा वेळ काढायला लागत नाही. पोटापाण्याच्या चिंता मिटल्या आहेत असे किमान वाटते तरी.भुकेपुरत तरी खायला मिळेल असे वाटते.सरकार पेन्शन देत ना!
>>आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?<<
लोकांकडे पहाता कमी गरजा आहेत असे वाटते.कमी गरजा हा पिंड आहे त्यासाठी नियंत्रण ठेवावे लागत नाही.
>>पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का?<<
रॅकमधे ठेवतो. नंतर पुन्हा वाचतो किमान चाळतो.
>>की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता?<<
शक्यतो कुणाला वाचायला देत नाही. विकून नाही टाकत. एकवेळ देउन टाकतो.
.
>>इथं चर्चा करणारी तुम्ही माणसं अचाट,अफाट वाचन असणारी दिसता, काही शे पुस्तकं कुणाकुणाच्या वैयक्तिक संग्रहात आहेत, कुणाची वाचून्/पचवून झालित,
म्हणून मुद्दाम ह्या मंचावर हे विचारावसं वाटलं; सगळ्यांनाच, एकसाथ, होलसेलमध्ये.<<
अफाट वाचन नाही.ललित कथासंग्रह कादंबर्या वगैरे फारस आवडत नसल्याने संग्रहात नाहीत.
.
>>तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का?<<
खुप कटेंट नव्हे पण स्वतंत्र पुस्तक असाव अस वाटल होत म्हणून दोन पुस्तके प्रकाशित केली. १) ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद २) यंदा कर्तव्य आहे?
>>वाटत असल्यासः- आपण वाचत सुटल्यास कुणाचा तरी प्रभाव पडून आपण नकळत नक्कल करु लागू असे वाटत नाही का? ही भीती तुम्ही कशी म्यानेज करता?<<
विचारांचा प्रभाव असणे व त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे झुकणे याला मी नक्कल मानत नाही. पण तो प्रभाव असतो अस मी मानतो. काळानुसार तो बदलतो देखील.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
उत्तरे ...
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
- प्रश्न थोडा विचित्र आहे. कितीतरी कारणं देता येतील. पण त्यातल्या त्यात निवडायचं म्हणालात तर - १. आवड २. सवय ३. हौस इ.
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?
- त्रास अस्वस्थता थोड्याफार प्रमाणात सापेक्ष आहेत. काय वाचतोय, कधी वाचतोय याप्रमणे कधीकधी अतिशय त्रास होतो . वाईट वाटतं .. नैराश्य येत .. अशा वेळेस काही दिवस काहीच वाचत नाही. कधीतरी असं पुस्तक काही काळासाठी बाजुला ठेवून दुसरे पुस्तक वाचतो.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
- पुस्तक वाचणं ही आवड आहे. व्यसन म्हणा हवं तर. त्यामुळे वेगळा वेळ काढावा लागत नाही. लोक विकांताला फिरायला जातात, नाक्यावर जातात, टपरीवर टीपी करतात आम्ही पुस्तक घेउन बसतो. बाकी पोटापाण्याच्या चिंता आहेतच. कधीकधी तर पोटापाण्यासाठीसुद्धा वाचावं लागतं.
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
- मूलभूत गरजा व्यक्तीसापे़क्ष आहेत. अन्न, वस्त्र, आणि निवारा याव्यतिरिक्त वाचन पण एकप्रकारे मूलभूत गरजच आहे. छंद आणि मूलभूत गरजा यांचा मेळ घालणं महत्वाच. सगळीच पुस्तकं काही विकत आणत नाही त्यामुळे वाचनालयाची वर्गणी भरून बरीच पुस्तके वाचता येतात. बरं आमच्या वाचनालयात पुस्तक परतीसाठी वेळेचं बंधन नाही त्यामुळे चार-पाच दिवस संपत्ती कमावण्यात जास्त व्यग्र राहिलो तरी विकांताला वाचन करता येतं ..
पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का?
- वाचलेली सगळी पुस्तकं काही स्वत:जवळ बाळगावीशी नसतात. ते शक्यही नाही. काही काही पुस्तकं अनेकदा वाचता येण्यासारखी असतात, ती कष्ट घेऊन सांभाळली जातात. इतर पुस्तकं वाचनालयातून आणून वाचतो. त्यामुळे फार प्रश्न येत नाही. काही पुस्तकं वाचून झाल्यानंतर मित्रमंडळीत बदलली जातात. काही पुस्तकं वाचनाची आवड असलेल्या आणि पुस्तकं जिवापाड जपेल अशा कोणालातरी देऊन टाकतो.
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
वाचनाच्या वेडा/छंदापायी
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
वाचनाच्या वेडा/छंदापायी
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?
त्रास नक्कीच होतो. परंतु दुसरं एखादं पुस्तक वाचणं हा त्याच्यावरचा उपाय असतो.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
छंदासाठी वेळ मिळतोच. मुळात हा छंद असल्यानंतर इतर छंदांसाठी वेळ, श्रम व पैसा नसतो. पोटापाण्याचा प्रश्न असला तरी छंद जोपासला जातो.
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
पुस्तकवेड्यांच्या मुलभूत गरजामध्ये पुस्तक वाचन ही एक गरज असते. पुस्तक वाचन म्हणजे पुस्तक खरेदी असे नसते. खरेदी केव्हा केव्हा तरी होत असते. त्यासाठी फार संपत्तीची गरज नाही.
पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का?
पुस्तकं विकत घेतली जातात. संग्रह वाढत जातो. जागेची अडचण भासते. त्यामुळे त्यातली काही पुस्तकं शाळेला वा ग्रंथालयांना देणगी दाखल दिल्या जातात. त्या पुस्तकांचे पुढे काय होते हे कधीच कळत नाही.
फारच कमी पुस्तकांचे दुसरे - तिसरे वाचन होते. मात्र संदर्भ म्हणून आठवण झाली की काही पानं वाचल्या जातात.
की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता?
आवडीने घेतलेले, संग्रही असलेले पुस्तक विकणे ही कल्पनाच विचित्र वाटते. विशिष्ट प्रकारची पुस्तकं असल्यामुळे ही पुस्तकं वाचण्यासाठी म्हणून कुणी घेत नाहीत.
तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का?
वाटत असल्यासः- आपण वाचत सुटल्यास कुणाचा तरी प्रभाव पडून आपण नकळत नक्कल करु लागू असे वाटत नाही का? ही भीती तुम्ही कशी म्यानेज करता?
No comments.
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
लहानपणापासून लागलेली आवड आणि सवय यामुळे.
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?
नाही, अजिबात त्रास होत नाही.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
वेळ मिळत नसेल तर काढावा लागतो. रात्री उशीरापर्यंत जागून वाचन करायची सवय आहे. मी फारसा TV बघत नाही, त्यामुळे वेळ मिळतो. शिवाय मला प्रत्येक वर्षी ६ आठवडे सुट्टी मिळते, शनिवार/रविवार शिवाय २ आठवड्यांनी शुक्रवारी सुट्टी मिळते. भरपूर वेळ असतो.
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
हो. मुळात गरजा कमीच आहेत. मरेपर्यंत त्या पूर्ण होउनही संपत्ती उरेल, त्यामुळे ती काळजी नाही.
पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का? की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता?
मी DRM असलेली eBooks वाचत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा कागदावरच छापलेली पुस्तके वाचतो. जर पुस्तक लायब्ररीमध्ये मिळत असेल, तर तिथून आणतो, नाहीतर विकत घेतो.
पुस्तक वाचून झाले की GoodReads मध्ये त्याचे वर्गीकरण करतो. (५ स्टार = स्वतःच्या संग्रहात ठेवण्यासारखे आणि मित्रांना भेट देण्यालायक. ४ स्टार = वाचायला चांगले. परत वाचावेसे वाटू शकेल. ३ स्टार = एकदा वाचायला ठीक. विकत घेण्यापेक्षा लायब्ररीतून आणलेले बरे. २ स्टार = बकवास. पैसे वाया गेले. १ स्टार = फुकट दिले तरी पुन्हा वाचणार नाही.)
विकत घेतलेले पुस्तक वाचून झाले, की स्वतःच्या संग्रहात ठेवण्यालायक नसेल तर लायब्ररीला देतो.
तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का?
वाचन आणि लेखन हे वेगवेगळे पैलू आहेत. पुस्तक लिहिता येईल इतपत ज्ञान मला कुठल्याच विषयात नाही. शिवाय लेखनाचा पिंडपण नाही. त्यामुळे स्वतःचे पुस्तक कधी प्रकाशित होईल, असे वाटत नाही.
वाचनाची सवय ही लहानपणीच
वाचनाची सवय ही लहानपणीच जडलेली होती. आमचे आईबाबा मला दिवाळीच्या वेळी फटाके आणण्याऐवजी पुस्तकं आणण्याचा चॉइस द्यायचे. आणि फटाके पटकन आवाज करून संपतात आणि पुस्तक मनात बराच काळ टिकून रहातं म्हणून मी पुस्तकंच निवडायचो. घरी बऱ्यापैकी संग्रह होता. अमेरिकेत आल्यावर तसं गंभीर वाचन कमी झालं. लायब्रऱ्यांमधून पुरेशी पुस्तकं मिळायची. इथे आपल्याला हवी तितकी पुस्तकं चार आठवड्यांसाठी घेऊन जायची परवानगी असते. त्यामुळे खर्च तसा फार न होताही छंद जोपासता आला. बायको मिळाली तिला माझ्यापेक्षाही जास्त वाचनाचं वेड. अमेरिकेतही बरीच वर्षं आमच्याकडेे टीव्ही नव्हता. अजूनही केबल नाही - त्यामुळे टीव्ही केवळ हवे ते कार्यक्रम किंवा सिनेमे बघण्यासाठी वापरतो.
गेली काही वर्षं प्रत्यक्ष पुस्तकं वाचण्यापेक्षा ऑनलाइन लेख, आर्टिकल्स इत्यादी वाचनावर अधिक वेळ जातो. चिंतातुरजंतूंच्या भाषेत याला संवेदनांचं किंवा अनुभवग्रहणाचं आधुनिकोत्तर भंजाळीकरण म्हणता येईल. तसाही माझा ओढा फिक्शनपेक्षा नॉनफिक्शनकडे अधिक आहे. त्यामुळे तुकड्या तुकड्यांनी वाचायला काही वाटत नाही.
स्वतःचं पुस्तक लिहावं असं जरूर वाटतं. पण फिक्शन लिहीन असं सध्यातरी वाटत नाही. माझं ऐसीवरचं आणि इतर संस्थळांवरचं लेखन वाचलं तर अनेक विषयांचे पाट काढून ठेवलेले आहेत हे दिसून येईल. प्रत्यक्ष एखाद्या विषयाचं संपूर्ण क्षौरकर्म करण्याचे कष्ट घेण्याइतका वेळ कधी मिळेल सांगता येत नाही.
पुस्तकं वाचण्यापेक्षा ऑनलाइन लेख, आर्टिकल्स
....पुस्तकं वाचण्यापेक्षा ऑनलाइन लेख, आर्टिकल्स
यस्स्..ऑनलाइन म्हणूनच नाही तर इतरत्रही माझं स्वतःच (नगण्य का असेना पाण आहे तितकं)वाचनही डिस्क्रिट रुपात, तुकड्यातुअकड्यात होतं.
वर घाटपांडे काका म्हणतात तसं पुस्तक कधी हाती आलच, तर आधी चाळलं जातं.
इतरत्र असे तुकडे तुकडे, लेख्,भाष्य, भाषण आणि इतर स्रोत; अगदि मुलाखती आणि मनोगतंही बरीच माहिती देउन जातात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझं वाचन फारसं नाही तरीही
माझं वाचन फारसं नाही तरीही केवळ वाचनप्रेमी म्हणून प्रश्नांच्या अनुषंगाने व्यक्तिगत अनुभव लिहिते.
मला वाचनाचा छंद शाळेत फारसा नव्हता. नंतर हळूहळू जडला आणि अजून टिकून आहे. त्यात मराठी वाचन आधीपासून जास्त होते....इंग्रजी तसे अलिकडचेच. वाचनात माझी आवड अजून तितकी प्रगत नाही की अगदी छातीठोकपणे म्हणावं की ह्या प्रकारचं आवडत्च आणि त्या प्रकारच नाहीच. सध्या फुकटात चांगलं वाचनालय उपल्ब्ध आहे. तिथे पुस्तकांमध्ये आधीच्या आवडीच्या लेखकांची पुस्तकं मिळतील याची अजिबात शाश्वती नाही-किंबहुना माहित असलेले लेखक शोधून न सापडल्यामुळे जे समोर येतय नवीन त्यात काय आवडतय हे पहाण्याचा सध्या प्रयोग सुरू आहे-म्हणजे तसा नेहमीच एका बाजूला माहित असलेले लेखक वाचत्तना नवीन वाचून पहाण्याचा प्रयोग चालू होता पण आता तोच पूर्णवेळ आहे. आता त्यातही नवीन आवडी विकसित होत आहेत.
झोपायच्या आधी काहीतरी अभ्यासाव्यतिरिक्त वाचण्याची सवय आहे. वाचायला वेळ झाला नाही असे एकाही दिवशी होत नाही कारण मी रोज झोपतेच आणि त्या आधीची वेळही रोज येतेच. वाचायला वेळ मिळावा म्हणून रात्रीचे जेवण लवकर आटपायची सवय आहे. ती मी नातेवाईक घरी येतात तेव्हाही नेटाने पाळते. माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या लवकर* जेवण्याच्या आग्रहाला लष्करी शिस्तही म्हणतात.
* जेवण सावकाश पण त्याची सुरुवात लवकर ह्या अर्थाने. मी स्वतः फक्त सावकाशच जेवू शकते. एवढी जेवणाची घाई करून आता तो भात किती वेळ खात बसली आहेस असेही ऐकावे लागले आहे.
पुस्तकं वाचून काही वरवरच्या माहितीवर आधारित मतं जास्त पक्की होतात किंवा कधी कधी पूर्ण बदलतात. तसे होताना अस्वस्थही वाटतं पण म्हणून काय. नैराश्य म्हणावं असं कुठल्या पुस्तकाने आलेलं नाही. पण आलंच जर तर अजून वाचलं काही काही की उभारीही येइल याची खात्री आहे.
पोटापाण्याची चिंता मिटलेली नाही पण ती मिटली तर फुलटाइम वाचन नक्कीच करणार नाही. त्यामुळे वाचन आणि पोटापाण्याच्या चिंतेचा संबंध काही फारसा आहे असे नाही.
माझ्या संग्रहात किती/कोणती पुस्तकं आहेत ही गोष्ट मी कधीही जाहिर करत नाही :).
लेखन जमत नाही असा एक न्यूनगंड शाळेत असल्यापासून तयार झाला आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पुस्तक लिहून प्रकाशित करण्याचा विचारच कधी मनात आलेला नाही.
वाचकोsहम्
मी पुस्तकवेडा नाही. १९९४ ते २०१३ मधे मी प्रतिवर्षी फारतर १ अवांतर पुस्तक वाचले असेल. पुस्तके वाचू नयेत, ते बोरिंग आहे अश्या मताचा आहे. पण त्यापूर्वी मी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत जवळ ३००-४०० अवांतर पुस्तके वाचली आहेत. शुद्ध गावातून आलो असल्याने, शहरातही गावासारख्या वातावरणात राहत असल्याने, शहरी लोकांच्या संपर्कात आल्यावर स्वतःवरचा ग्राम्यतेचा शिक्का पुसण्यासाठी मला हे वाचन कामी आले. त्याकाळात 'ज्ञान सांगून शान मारणे' हे ही कारण मी नजर चोरत चोरत सांगायला हरकत नसावी.
मी समस्येचे स्वरुप काय आहे, ती कशी सोडवायची आहे/ सोडवली आहे हेच जाणण्याकरता पुस्तक वाचतो. धोंडो केशव कर्वे वाचताना त्यांची व्यक्तिगत माहिती पूर्णपणे टाळून (तिच्यात जास्त न गुंतता) 'स्त्रीयांच्या समस्या' आणि कर्व्यांच्या संस्थेने त्या कशा सोडवल्या इतके वाचतो. म्हणून अनिल अवचटांचं मनात हे पुस्तक जास्त आवडलं नाही. मन बाजूला ठेऊन ७५% शब्द मानसशास्त्रज्ञांच्या बद्दल आहेत. लेखन हा भावूकता विकण्याचा बाजार आहे म्हणून मी शक्यतो कल्पनेतल्या पात्रांसाठी भावना लावायचं टाळतो. पण दुसरीकडे पिंक डेली मधल्या एका कोरड्या सांख्यिकीने अस्वस्थ होतो. वो बनता है।
मी फक्त ऐसी, मीम चे ९०% लेख प्रतिसाद वाचतो, क्वचित मिपा, मायबोली ही वाचतो. हे फार काही नाही. आता तर पायाभूत क्षेत्र थंड आहे अन्यथा मी संस्थळांवर कार्यरत नसतो. हे सगळं सांगायचं कारण कि इथल्या लिखाणाचा दर्जा मला पुस्तकांपेक्षा उजवा वाटतो शिवाय लेखकाशी प्रतिसादातून संपर्क साधता येतो. नोकरी चालू आहे तोपर्यंत पोटापाण्याच्या चिंता मनात आणू नयेत. Basic survival is very easy in India.
पगार वाढतो तशा अधिकाधिक गरजा मूलभूत वाटतात. तीन पिढ्यांपासून आमच्या खानदानात कुणाचे घर्/जमिन नाही, मी यावर्षी पुण्यात फ्लॅट घेतला, त्या आनंदात या प्रश्नाचं उत्तर होय असं येईल. सहसा आवश्यक तेवढी संपत्ती नेहमीच कमावून ठेवलेली असते, रियालाईझ पुढे/मागे होते, असे माझे मत आहे.
कंसल्टंट म्हणून काम करताना कितीतरी रिपोर्ट बनवले आहेत, त्यात मी बर्याचदा 'contributor of original thoughts' राहिलो आहे. कंपनीला त्यांचे लाखांनी रुपये मिळाले आहेत. 'भाषेवर काम करण्याचं सुख' कराराची नि:संदिग्ध कायदी भाषा वापरताना प्रचंड मिळालं आहे. लेखक बनायला प्रतिभा, ज्ञान, भाषा, बुद्धी, वेळ, साहित्याचा / माहिताचा अक्सेस इ इ लागतात. इच्छा आणि पात्रता या दोहोंचा अभाव आहे. पेक्षा ऐसी सारख्या जागी 'संवादात्मक' लेखन करायला आवडते. अशा जागेचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे कोल्हटकर, घासकडवी, चंद्रशेखर, थत्ते, ऋषिकेश, चिंतातूर, रमतारम, आणि अशा इ इ प्रभूतींचे एक रिअल सर्कल असते तर नेहमी मला बाजूला गप्प बसायला लागले असते. जालाचा फायदा असा आहे कि कोणीही सोम्या, गोम्या, जोश्या,इ इ मधे लूडबूड करू शकतो and one has to take it with due regard. Such fora more than siffice needs of an individual like me.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>अशा जागेचा अजून एक फायदा
>>अशा जागेचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे कोल्हटकर, घासकडवी, चंद्रशेखर, थत्ते, ऋषिकेश, चिंतातूर, रमतारम, आणि अशा इ इ प्रभूतींचे एक रिअल सर्कल असते तर नेहमी मला बाजूला गप्प बसायला लागले असते. जालाचा फायदा असा आहे कि कोणीही सोम्या, गोम्या, जोश्या,इ इ मधे लूडबूड करू शकतो and one has to take it with due regard.
अनुमती, सहमती, टाळ्या, शिट्ट्या, शेमले....
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नाहीतर काय!!!
अहो, नाहीतर काय? आषाढातल्या त्या न भावलेल्या दिवसाबद्दल रमतारम आणि चिंतातुर जंतू या दिग्गज द्वयींचं जे कोणत्या अज्ञात प्रतलावर द्वंद्व जुंपलं होतं ते जर त्या कालिदासाची, त्याच्या कोण्या मित्रा/शत्रूची आणि मल्लिकेची भूमिका करणार्या करणार्या कलाकारांना वाचून दाखवलं तर ते सगळे अधरीय काय आणि उत्तरीय काय अगदी नितंबीय टाकून धूम पळाले असते. त्यात आमच्यासारख्या महाभागाने 'मल्लिका म्हणजे पैलवाणिन का?' असे विचारुन एक विनोदी श्रेणी मिळवणे म्हणजे अन्यथा अशक्यच नाही का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ते सगळे अधरीय काय आणि उत्तरीय
हे सुप्परलाईक्ड केल्या गेले आहे. तिसर्या शब्दाचा वापर अगदी चपखल जमला आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
यात आमच्यासारख्या महाभागाने
स्वानुभवातून सांगते, प्रत्यक्षात थोडा हशा कमावणं कठीण नाही. बाकी प्रतिसाद आवडला.
मी ललित लिखाण फार वाचत नाही. अधूनमधून वेगवेगळ्या विषयांचे किडे घुसले की त्या विषयासंदर्भात ग्रंथालयात मिळतील ती पुस्तकं घरी आणते. परतीच्या तारखेपर्यंत जेवढं वाचून होईल तेवढं वाचते आणि बाकी सोडून देते. तोपर्यंत नवा विषय सापडलेला असतोच. सध्या evolutionary psychology चा किडा चावला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ते रमता'रम' मुद्दाम लिहताय की
ते रमता'रम' मुद्दाम लिहताय की चुकुन?
बाकी 'नितंबीय' शब्दामुळे फारपुर्वी माहेर मधे वाचलेली वपुंची कथा आठवली. त्यात एक पात्र तक्रार करत असत की कोणाएका लेखकाने 'तिच्या नितंबावर कंचुकी घट्ट होत होती' असं काहीस लिहील.
ठ्ठो....
कंचुकी ?
नितंबांवर?
हे म्हणजे त्याने "आपल्या झाटांच्या जटा बांधून त्यावर फेटा चढवला" असं काहिसं होतय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
दोन्ही कल्पनांचे
दोन्ही कल्पनांचे मानसचित्रीकरण आपसूकच झाले आणि रोफललो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मानसीचा चित्रकार तो..
आणी याबाबतीत नो पिकासो-फिकासो ओन्ली रविवर्मा ना?
येस्सार! ओनली रविवर्मा.
येस्सार! ओनली रविवर्मा. पिकासो नैतर चार चिंध्या अन एक सापळा काढून काय ते स्वतःच व्हिज्युअलाईझ करा म्हणायचा, रविवर्मा कसे सगळे अगदी व्यवस्थित चितारतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाहीतर काय!!!
अहो, नाहीतर काय? आषाढातल्या त्या न भावलेल्या दिवसाबद्दल रमतारम आणि चिंतातुर जंतू या दिग्गज द्वयींचं जे कोणत्या अज्ञात प्रतलावर द्वंद्व जुंपलं होतं ते जर त्या कालिदासाची, त्याच्या कोण्या मित्रा/शत्रूची आणि मल्लिकेची भूमिका करणार्या करणार्या कलाकारांना वाचून दाखवलं तर ते सगळे अधरीय काय आणि उत्तरीय काय अगदी नितंबीय टाकून धूम पळाले असते. त्यात आमच्यासारख्या महाभागाने 'मल्लिका म्हणजे पैलवाणिन का?' असे विचारुन एक विनोदी श्रेणी मिळवणे म्हणजे अन्यथा अशक्यच नाही का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अनिल अवचटांचं मनात हे पुस्तक
हे पुस्तक अच्युत गोडबोले यांचे आहे. वाचकांना चूकिची माहिती मिळू नये म्हणून स्पष्टीकरण.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उत्तरे
>> तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
कारण तितकीच घेणे परवडते (उपलब्ध वेळ व पैसा गृहित धरून)
>> काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का?
'विशिष्ट' म्हंजे? आणि कशा प्रकारचा त्रास होणे/न होणे अपेक्षित आहे?
आता हे काय वाचून कशा प्रकारची अस्वस्थता येते त्यावर अवलंबून आहे. काही अवस्था-अस्वस्थता हव्याहव्याशा असतात त्यात आपणहून बाहेर येतच नाही. अन्यथा दुसरे पुस्तक वाचायला घेतले की आपोआप बाहेर येतो.
पोटापाण्याच्या चिंता मिटलेल्या राहव्यात म्हणून तर नोकरी करतो. त्या मिटलेल्या असत्या तर नुसती पुस्तके वाचत नस्तो का बसलो?
). काही कामाच्या वेळी (जसे संसदेचे सत्र चालु असताना
) वाचन आपोआप कमी होते.
बाकी वेळ कसा काढता याला ठोस असे उत्तर नाही. पण TV अगदीच कमी बघणे (मी साधारणपणे दिवसात जास्तीत जास्त १ तास टिव्ही बघतो. न्यूज च्यानेलांच्या डिबेट्स लाईव्ह बघणे वर्ज्य केले आहे - चांगली डिबेट झाली असे कळले तर जालावर मोफत उपलब्ध असते ती बघतो), प्रवासात पुस्तके वाचणे, विकांताची एक दुपार + शुक्रवार रात्र + जेव्हा 'वर्क फ्रॉम होम' असेल त्यातील काही वेळ जमेल तितके वाचन करणे यात घालवतो. (विकांताच्या उरलेल्या दुपारी एखादा चित्रपट पहायचा प्रयत्न करतो - न जमल्यास मस्त झोप काढतो
मूलभूत गरजा बर्याच कमी आहेत. एकच उदा देतो: आम्ही (मी व बायको मिळून) एकच कपाट - म्हंजे मोठे वॉर्ड्रोब नव्हे - वापरतो व त्या कपाटात मावतील तितकेच कपडे घ्यायचे असे ठरवले आहे. नवीन कपडे घ्यायचे असतील तर आधीच्या तितक्या कपड्यांची विल्हेवाट लावणे स्वतःलाच बंधनकारक केले आहे. त्यामुळे विनाकारण कपडे घेणे एकूणच कमी झाले आहे.
घरात कपड्यांइतकेच मोठे पुस्तकाचेही कपाट आहे.
स्वतःजवळ ठेवतो. जसा मूड असेल तशी पुस्तके पुन्हा वाचतो. बायकोचेही तसेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार. मुळात "अलिकडे काय वाचलत?" मधला हा एक प्रतिसाद होता; ज्याचा नंतर धागा बनला.
धाग्याची निमित्तानं बरीच माहिती मिळाली; कोण का वाचतं; कसं वाचतं हे समजलं.
"नितंबीय" हा अफ्लातून शब्द मराठीला बहाल झालेला दिसला.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
उत्तरं....
< तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता? >
सवय, आवड, गरज, नाइलाज म्हणून.
< काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता? >
त्रास होतो. त्यामुळे एखादं पुस्तक सलग वाचून होत नाही. 'बिटर चॉकलेट' वाचायला मला दोन वर्षं लागली होती. आणि आता गेलं सव्वा वर्ष 'ब्लाइंडनेस' वाचते आहे.
< पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का? >
बाकी 'नसते उद्योग' कमी केलेत आणि वाचण्याचा वेग वाढवला आहे. तापदायक नसलेलं साधं पुस्तक असेल तर दिवसाला अडिचशे पानं वाचू शकते. त्यामुळे पुष्कळ वाचून होतं. पोटापाण्याच्या चिंतेसाठीही वाचनच करावं लागतं, हा नाइलाज.
< आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये? >
नियंत्रण ठेवते.
< पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का? की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता? >
घरी तीन प्रकारची पुस्तकं संग्रहात ठेवते... १. कोणत्याही लेखकाचं आवडतं पुस्तक, २. आवडत्या लेखकांची सर्व पुस्तकं, ३. संदर्भासाठी लागणारी पुस्तकं.
ही पुस्तकं पुनःपुन्हा वाचत असते; काही पूर्ण तर काही तुकड्याने. काही नुसती चाळली जातात अधूनमधून.
बाकी पुस्तकं वाचनालयांना भेट देते. घरात 'देण्या'च्या पुस्तकांची एक रास कायम असते. घरी येणारे कुणीही त्यातली पुस्तकं उचलून घेऊन जाऊ शकतात. संग्रहातली पुस्तकं अभ्यासकांना उपलब्ध करून देते; ते बहुतेकवेळा परत आणून देतात. कॉलनीतली लहान मुलं त्यांच्यासाठीची असलेली पुस्तकं नेतात आणि व्यवस्थित आणून देतात. पुस्तकं विकत नाही... ( स्वतः प्रकाशित केलेली पुस्तकं अपवाद! )
< तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का? >
वाटतंय. स्वतंत्र पुस्तकं लिहिलीत, पण उत्तम आणि भरपूर कंटेंट असलेलं लिहिणं अद्याप जमलेलं नाही. काही विषय मनात आहेत; कधी जमेल माहीत नाही. कादंबर्या लिहिण्याचा नाद सुटला, तर जमेल बहुदा.
< वाटत असल्यासः- आपण वाचत सुटल्यास कुणाचा तरी प्रभाव पडून आपण नकळत नक्कल करु लागू असे वाटत नाही का? ही भीती तुम्ही कशी म्यानेज करता? >
प्रभाव असतातच. ते टाळता येत नाहीत. पण प्रभाव म्हणजे पूर्ण नक्कल नसते. आधीच्यांच्या वाटेवरून चालत जाऊन पुढे स्वतःची वाट निर्माण करता आली, तर प्रभाव काहीसे ओसरत जातात.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
वाचनप्रेमी नाही
वाचनप्रेमी नसल्याने काहीच प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.
वाटतं.
वाटतं.
वाचत नाही.
आपल्या मूलभूत गरजांवर
होय कमावली आहे. ओह शूट म्हणजे तळी नाही ब्वॉ साठलेली रोज हातपाय हलवावे लागतायतच. ते सांगायचच राहीलं.
.
हां आता असे विचाराल की हाव संपलीये का? आपले प्रियजन असाध्य रोगाने पिडीत आहेत व आपण हतबलतेने पहाण्या व्यतिरीक्त काही करु शकत नाही - असल्या काल्पनिक भीती संपल्याहेत का? - तर नाही ब्वॉ! अज्जिबातच नाही
.
वरील दोन मानसिक स्थितींमध्ये विवेक वापरुन फरक करायला तुम्ही शिकला आहात का? - तर नाही ब्वॉ!
माझं वाचन अफाट, अचाट वगैरे
माझं वाचन अफाट, अचाट वगैरे नाही. पण पुस्तकांमध्ये वेळ घालवायला आवडतं ( जितका वेळ मिळेल तितका)
आजकाल फारसे वाचन जमत नाही.. डोळ्याचे ऑपरेशन झाल्यापासून.
पुस्तके बरीच जमवली आहेत. पण ती कुणाला द्यावी असं वाटत नाही.
काही पुस्तकं वाचून अस्वस्थता येते .. काही काळासाठी. अर्थात त्याचा परिणाम रोजच्या रुटीनवर होत नाही.
बालगंधर्वाचे चरित्रं " शापित राजहंस" वाचल्यावर काही काळ खूप कसंतरी वाटत होतं.
पुलं ची पुस्तकं माझ्यासाठी काहीवेळा अँटी डिप्रेसंट सारखी आसतात. वाचायला सुरवात केली की मूड, डोके इ. ताळ्यावर येते.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
समग्र
लोकांचं --
रुचिरा,कुंडली साधन, समग्र योगी मनोहर, समग्र ओशो, समग्र ओरोबिंदो, समग्र थोरो, समग्र टॉलस्टॉय्, समग्र चेकॉव्ह्, समग्र श्याम मनोहर, समग्र किरण नगरकर, समग्र नेमाडे, समग्र पु ल, समग्र तेंडुलकर, समग्र अत्रे, समग्र गोडसे भटजी, समग्र अरुणा ढेरे, समग्र रा चि ढेरे, समग्र पाडस, लंपन, तोत्तोचान, समग्र मेघना पेठे, समग्र कविता महाजन, समग्र संत तुकाराम्, समग्र दिलिप पुरुषोत्तम चित्रे, समग्र दया पवार्, समग्र डॅन ब्राउन, समग्र आयन रॅण्ड्, समग्र डिकन्स, समग्र रॉबर्ट फ्रॉस्ट, समग्र गटे, समग्र वूडहाउस्, समग्र जॉर्ज बर्नार्ड शॉ, समग्र शेक्सपियर, समग्र सु शि, समग्र समग्र बाबा कदम, समग्र सिमॉन बुव्वॉ, समग्र काम्यु, समग्र काफ्फ्का, समग्र फ्रॉइड, समग्र डोट्रोवस्की, समग्र नित्शे, समग्र सार्त्र , समग्र एलकुंचवार, समग्र विश्राम बेडेकर, समग्र सदानंद मोरे, समग्र शेषराव मोरे, समग्र रामचंद्र गुहा, समग्र गांधी, समग्र आंबेडकर, समग्र
मोलिएर (Jean-Baptiste Poquelin) , समग्र अलेक्झांडर ड्युमा, समग्र वात्सायन्, समग्र मराठी आद्यकवी मुकुंदराज, समग्र रवींद्रनाथ टागोर, समग्र शरदचंद्र चॅटार्जी, समग्र मुन्शी प्रेमचंद, समग्र हायेक, समग्र मिल्टन फ्रिडमन, समग्र फ्रेडरिक हायेक, समग्र पॉल क्रुग॑मन्, समग्र कुंडली साधन्, समग्र सनातन प्रभात, समग्र पातंजल योगभाष्य, समग्र त्रिपिटक, बुद्धा अॅण्ड हिज धम्मा, समग्र जपानी हायकु, समग्र थॉमस सॉवेल , समग्र कार्ल मार्क्स, समग्र फ्रेडरिक एंगल्स, समग्र सतीश तांबे, समग्र चं प्र देशपांडे, समग्र गो पु देशपांडे, समग्र माधुरी पुरंदरे, समग्र ग ह खरे, समग्र मेहेंदळे, समग्र शेजवलकर, समग्र कुरुंदकर, समग्र राजवाडे, समग्र जिम कॉर्बेट , समग्र बबन प्रभु अमृता प्रीतम, समग्र साहिर, समग्र गालिब, समग्र 'निराला' , समग्र बच्चन , समग्र कुसुमाग्रज, समग्र नामदेव ढसाळ, समग्र बा भ बोरकर, समग्र पद्मा गोळे, समग्र भा रा तांबे, समग्र सुमती क्षेत्रमाडे, समग्र भडभडे, समग्र गिरीजा कीर , समग्र ह ना आपटे सेतुमाधव पगडी, समग्र गो नी दा, समग्र डेल कार्नेगी, समग्र असंख्य सेल हेल्प बुकं('आउटलायर्स' वगैरे पकडून), समग्र अरुण साधू, समग्र इरावती कर्वे, समग्र विंदा करंदीकर , समग्र द मा मिरासदार, समग्र व्यंकटेश माडगुळकर , समग्र शिवाजी सावंत, समग्र दुर्गा भागवत, समग्र नारायण भागवत, समग्र गंगाधर गाडगिळ, समग्र वि स खांडेकर, समग्र मिलिंद बोकिल, समग्र श्री ना पेंडसे, समग्र श्री ज जोशी , समग्र मोरोपंत , समग्र मंगेश पाडगावकर, समग्र जी ए कुल्कर्णी , समग्र श्री कृ कोल्हटकर, समग्र मारुती चितमपल्ली, समग्र शांता शेळके, समग्र आनंद यादव , समग्र ग प्र प्रधान, समग्र सुनिताबाई, समग्र बहिणाबाई, समग्र ऐतिहासिक , समग्र अनैतिहासिक लिखाण
.
.
वाचून झालय की काय असं वाटतं. भारियेत लोकं.
सर तुमाला कित्ती कित्ती लेखक
सर तुमाला कित्ती कित्ती लेखक माहितियेत!!! खूप चान. मला तुमचा ल्कास लावायचाय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
इतकं टंकण्यात वेळ घालवलास
इतकं टंकण्यात वेळ घालवलास सॅम, त्यात एखादंतरी चमग्र्स, तुझंही वाचून झालं असतं हो.
हम्म
चक्क चक्क सपनामामी ढोस देताहेत यावरून काही बोध घे (मेल्या) मनोबा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यातलं जवळजवळ काहीच वाचलेलं
यातलं जवळजवळ काहीच वाचलेलं नाही . ज्यानं वाचलं असेल त्याच्यावर लई म्हणजे लईच जळणारे मी. आधी शाळेत - कॉलेजमध्ये असताना बरंच वाचायचो. मोस्टली कादंबऱ्या. गाजलेल्या. आणखीन वपु , पुल वगैरे. नववीत असतानाच राधेय , गारंबीचा बापू मृत्युंजय आणि छावा वाचलेलं त्यामुळे मित्रांच्यात भाव खायचो. आता मात्र वाचन खूपच कमी झालंय. खासकरून फिक्शन, फँटसी वाचायला आवडतं . गेम ऑफ थ्रोन्स बघितल्यावर ती मालिका ज्यावरून बनवली आहे ते " अ सॉंग ऑफ आईस अँड फायर " पुस्तक वाचायची इच्छा झाली. तेच सध्या वाचतोय. अगदी लहानपणापासून एक मोठी ,छान , मस्त फँटसी कादंबरी मराठीत लिहायची खूप मनात आहे. पण वेळ, अभ्यासाचा अभाव, प्रतिभेची आणि अफलातून कल्पनाशक्तीची कमतरता यामुळे जमेल का नाही कुणास ठाऊक.
मनोबा, चंद्रकांत काकोडकरांनी
मनोबा, चंद्रकांत काकोडकरांनी आणि मिलिंद रत्नपारखींनी तुझं काय घोडं मारलंय ?
बाबा कदम व गुरुनाथ नाईक
बाबा कदम व गुरुनाथ नाईक र्हायलेत का?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
मन१ , ही सगळी पुस्तक
मन१ , ही सगळी पुस्तक वाचनालयातच उभ्याउभ्या चाळली तेव्हा लक्षात आलं यातली निवडक पाचसहाच वाचली तरी पुरेत॥विकत घेऊन तर अजिबात नाही.पुर्व इंटरनेट नव्हतं तेव्हा रेल्वे टाइमटेबलच विकत घेत असे. डिक्शनरी,सलिम अलिचे पक्षांचे पुस्तक हे आहे.
इथल्या सर्व
मी स्वतःला एकवेळ वेडा म्हणेन पण पुस्तकवेडा वैगेरे अजिबात म्हणणार नाही.
अर्थात नाही. जर त्रास होत असेल तर कोण लेकाचा वाचेल. पुस्तक हे एक जग असतं. एखादं चांगलं पुस्तक वाचणे म्हणजे ते जगणे होय. Dan Brown ची काही पुस्तकं वाचताना मी ते सगळं अनुभवल्याचा आभास होतो. Sir Arthur Conan Doyle ची शेरलॉक सिरीस वाचताना पण ते लाईफ कसं असलं असेल असं वाटतं. आपणही तिथं असतो तर वैगेरे टाईप.
ए बाळा, अरे काम-धंधे सोडून कुणी पुस्तकं वाचतं का?
जर मुलं थोडी मोठी असतील आणि आठवड्यातून respectable ४०-४५ तासच काम असेल तर बऱ्यापैकी वेळ मिळतो. मी ऑफिसच्या प्रवासात बसमध्ये बसून १-१.५ तास (बोथ वेज) वाचतो.
वाचन हा शेवटी कुठल्याही इतर छंदा सारखा छंद आहे. अजून शंका असल्यास रफीचे “हा छंद जीवाला लावी पिसे” गाणे ऐका.
जाळून टाकतो.मराठी पुस्तकं भारतातून विकत आणलीयत. ती ठेवतो. पुन्हा वाचतो. इंग्रजी लायब्ररीतून घेतो आणि इमानेइतबारे परत करतो.मलाही. पण काय करणार, आपण जास्त लक्ष द्यायचं नाही.
There is no self-made man, we are made of thousands of others.
मलाही लिहावसं वाटतं. मी अगदी लेखक-बिकक आहे असं नाही वाटत. उलट मी आत्ताच २-३ वर्षापूर्वीपासून लिहायला सुरु केलंय. त्यामुळे मरेपर्यंत (वाचक: कधी?) मी काय तरबेज होईन अशी काय अपेक्षा नाही. मला बऱ्याच वेळेला जाणवतं कि माझी वाक्यं ही मी पूर्वी वाचलेली-ऐकलेली-बघितलेली असतात. त्यामुळे भीती तर वाटत नाहीच उलट छान वाटतं कि मला मनात दडलेली वाक्यं नेमक्या वेळी आठवतात. आपल्याला माहित असणाऱ्या गोष्टी वापरून त्या कलेनं मांडता येणं ही सुद्धा एक जादू आहे.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
हे
ओबामा चे चाहते दिसताय. हे वाचा म्हंजे लक्षात येईल की मला काय म्हणायचंय ते...
अजून शंका असल्यास रफीचे “हा
.
हाण्ण!!
.
वा!!
.
टिकलुजी तुमची सही खूप आवडली.
क्या बात है! कॉमेडीला मरण नाही.
_/\_
_/\_
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
आपला प्रतिसाद आवडला.
आपला प्रतिसाद आवडला.
आभार
आभार
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
नारायण सुर्वे
संपलाच नाही / भाकरीचा मार्ग
ग्रंथातले स्वर्ग / कशापायी ?
: नारायण सुर्वे
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
याला कुणीतरी चक्क विनोदी
याला कुणीतरी चक्क विनोदी श्रेणी दिल्ती
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हा श्रेणी प्रकार एकूणच मोठा
हा श्रेणी प्रकार एकूणच मोठा विनोद आहे. मी बऱ्याच गोष्टी विनोदी म्हणून टाकतो पण मला "भडकाऊ", "अवांतर" अशा श्रेण्या मिळतात. विनोदी वाटत नसेल मान्य करतो पण "भडकाऊ", "अवांतर" तर कुठल्याही बाजूने नसतात. मला वाटतं ऐसीकरांचे श्रेणीवेड बरेच चर्चेत असते. त्यातल्या त्यात आमच्यासारखे जे श्रेण्यांपासून (अजून तरी) परे आहेत ते सुखी आहेत.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जगायला आवडतं
रशियन परिकथांमधली धाकटी भावंडं सगळ्यात हुशार असतात, इतकं वगळलं, तर परी-जादूचा गालिचा असं सगळं आवडायचं.
साध्या,पापभिरू मध्यमवर्गीय आईबाबांनी साध्या-सुरक्षित वातावरणात ठेवलं, त्यामुळे 'एक्स्पोझर' मिळत नसे, पण घरी येणार्या मासिकांमधून क्वचित नितंब,उरोज शब्द असायचे. आपल्या बावळटपणावर एकच जालिम उपाय म्हणजे वाचन, हे तेव्हाच कळलं. पुस्तकं खायची सवयच लागली, तेव्हा पुस्तकं वाचणं चांगलंच समजत असत. पुढे त्याचे पलायनात रूपांतर होऊ शकतं हे तेव्हा कळलं नव्हतं. त्यामुळे लग्न झाल्यावर, खायला स्वयंपाकही करावा लागतो, हे कटू सत्य पचवणं जड गेलं.
पोर झाल्यापासून ट्विटरची १४० अक्षरांवर लक्ष केंद्रित होऊ शकलं, तर मिळवली, इतकी अधोगती झाली. आता पुन्हा ग्रंथालयात 'बुक क्लब' मधे जाऊ लागले, कारण त्या निमित्ताने वाचन होईल.
नवराही पुस्तक-खाऊ आहे, पण तो फक्त सत्यावर आधारित/अ-काल्पनिक वाचतो. मी पोळ्या लाटत असतांना मला (कधीकधी सक्तीचे) उद्बोधक धडे देत असतो (मी वरवर उपरोधिक वागले तरी मला ते आवडतं, हे त्याला माहितीये). पण मी त्याला आता घरी पुस्तके विकत घेऊन साठवण्याची बंदी केली आहे. ग्रंथालयात मिळत असतांना घरी कशाला ठेवायची? मागे कधी न वाचलेली, अथवा, कधी न वाचली जाण्याची शक्यता असलेली ५० एक पुस्तकं ग्रंथालयात दान केली होती. अपवाद मराठी- भारतातून जमेल तितकी, कोणी कोणी सुचवलेली मराठी पुस्तकं आणते, कारण ती इथे सहज उपलब्ध नसतात.
पुस्तक लिहायची आपली कुवत नाही. जालावर लिहितेय, तितकं बास आहे. अर्थात, जे काही लिहिते, त्यात वाचनाचा प्रभाव असणारच, आणि तो का नसावा? मी शिक्षिका आहे, विद्यार्थ्यांनी आपले स्वत:चेच लिखाण पाठवले आहे (जालावरून चिकटवलेले नाही), हे तपासून पाहण्याकरता 'टर्नइटइन' अशी वेबसाईट आहे. आणि त्यात आश्चर्यकारक बाब अशी आहे की,शेकडो विद्यार्थी साधारण सारख्या पुस्तकांबद्दल, सारखे निबंध लिहित असले, तरी, प्रत्येकाची स्वत:ची शैली असते, त्यामुळे स्वतः लिहिलेली वाक्य ही बर्यापैकी 'अद्वितीय' असतात.
वाचलेले बाहेर व्यक्त होतांना तसेच्या तसे न होता, त्यावर प्रत्येकाच्या विचारांचा संस्कार झालेलाच असतो, त्यामुळे कल्पना तीच असली, तरी तपशील, शैली, कुठल्या मुद्द्यावर भर आहे, हे व्यक्तीसापेक्ष बदलतंच.
वाचण्याचा त्रास नव्हे, तर वेळेअभावी, न वाचण्याचा त्रास बरेचदा होतो.
सरतेशेवटी, माझ्या मुलाला वाचनाची आवड आहे, हे आवडतं, पण त्याबरोबर त्याने इतरही गोष्टी शिकाव्या ह्यासाठी प्रयत्नशील राहते, तेव्हा वाचन अगदी सर्व जीवन व्यापून उरलं नाही तरी चालेल, हे स्वीकारलं आहे. प्रत्येकाने वेळ-पुस्तकं-विषय-वाचन-माहिती, हे गणित आपापल्या सोयीनुसार सोडवायचं आहे, इतपत.