मंगळयान आणि बालाजी
बातमी : इस्रो प्रमुख बालाजीच्या पायाशी दरवेळी साकडं घालतात?
बातमीतला काही भागः
बालाजी चरणी प्रतिकृती
भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सोमवारी तिरुपती बालाजीची पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पदमिनी होती. इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. यावेळीही त्यांनी मंगलयानाची प्रतिकृती आणली होती. ती बालाजीपुढे ठेवण्यात आली.
हे माहीत नव्हतं.. सीरियसली??
इस्रो आआणि प्रतिमा
ईस्रो ममधील दिग्गज्जांबद्दल जनमानसातील प्रतिमा म्हण्जे
"तो एक बबुद्धीमान माणूस आहे"
.
त्यांनी केलेल्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्स मधुन ते बुद्धीमान असल्याचं ददिसतं.
अशा कृतीतून शेवटी बुद्ध्हीमान पण " माणूस"च असल्याचं दिसतं.
अर्थात पप्रतिक्रिया देण्याइत्पत तपशील मजकडे नाहित. ही फक्तअअशीच एक मताची पिंक.
काय संबंध? चंद्रावर जाऊन
काय संबंध? चंद्रावर जाऊन निळूभौ भुजबळ बायबल वाचतात ते चालतं तर इस्रोच्या अध्यक्षांनी एक साधी पूजा केली तर काय लोकांचा पोटशूळ उठतो देव जाणे. सोडा हो, करणारे करतात आणि नकर्ते आरडाओरडा करतात. काही करण्यापेक्षा आरडाओरडा करण्याचे ग्लोरिफिकेशन सुरू झाले की असली चिकित्सा सुरू होते.
तुमचा पोटशूळ आधी सांभाळा
चंद्रावर जाऊन निळूभौ भुजबळ बायबल वाचतात ते चालतं तर इस्रोच्या अध्यक्षांनी एक साधी पूजा केली तर काय लोकांचा पोटशूळ उठतो देव जाणे. सोडा हो, करणारे करतात आणि नकर्ते आरडाओरडा करतात. काही करण्यापेक्षा आरडाओरडा करण्याचे ग्लोरिफिकेशन सुरू झाले की असली चिकित्सा सुरू होते.
या दोन उदाहरणात फरक आहे हे आधी समजून घ्या, नायतर अजून दुखायचं पोट. दुसरी गोष्ट म्हणजे, असेल त्याने शेण खाल्लं, पण मग त्याचंही अनुकरण कशाला?
आधी इनो घ्या
एकदा देव मध्ये आणणे ही अंधश्रद्धा हे ठरले की चंद्रावर जौन बैबल वाचोत नैतर मिशन सुफळ संपूर्ण होवो म्हणून केलेली प्रार्थना असो, अंधश्रद्धाच ती. तिथे कसली आलीय वर्गवारी?
बाकी अनुकरण को मारो गोली. अन्य ठिकाणच्या अंधश्रद्धांचा कधीच उल्लेख दिसत नसल्याने ते सायटेशन येणे क्रमप्राप्त आहे. पण मुद्दा वेगळा आहे. त्याला धरून काही बोलले तर ठीक.
शास्त्र व श्रद्धा
त्यांच्या कामाच्या बाबतीतील निर्णय मात्र त्या त्या क्षेत्रातील शास्त्रमान्य कसोट्यांप्रमाणेच व्हावेत. पण त्याव्यतिरिक्त शास्त्रज्ञ लोकांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर श्रद्धावान असणे व त्या श्रद्धेचे आधुनिक शास्त्राच्या कसोट्यांवर मूल्यमापन करण्याचा प्रयत्न न करणे यात मला काही गैर वाटत नाही. जर ते त्यांचे काम योग्य रीतीने करत असतील तर सहसा त्यांच्या कार्यालयात बहुसंख्यांना सर्वमान्य असलेली अशी गोष्ट अगदी सरकारी खर्चाने जरी केली तरी त्यात मला काहीच चूक वाटत नाही.
कार्यालयीन कामाचा भाग नसलेल्या पण साधारणपणे "प्रोफेशनल सोशल" म्हणता येतील अशा या गोष्टी आहेत. माझा अंदाज आहे की तेथील बर्याच लोकांना हे हवेच असेल. ऑफिसेस मधे होणार्या पूजा, खांडेनवमीची मशिनरीची पूजा ई. सारखेच. ऑफिसमधील मोटिव्हेशनचाही तो भाग असू शकतो.
भारताचे पहिले मंगळोड्डाण
भारताच्या मंगळावर जाणार्या यानाने उड्डाण केले आहे.
जगभरातील नागरीकांचा जळफळाट भारताला दिल्या जाणार्या 'Aid' वर निघतो आहे असे दिसते ;)
बीबीसीच्या बातमीखालील ब्रिटिश नागरीकांच्या प्रतिक्रीया आसुरी आनंद देणार्या वाटु शकतात :P
टोलिंग फॉर द विन!
चार पाच ठिकाणी जाऊन ट्रोलिंग करून आलो! ब्रिटीश लोकांना अस्सल ब्रिटिश शिव्या देण्याची मजा बाकी औरच!! अजूनतरी ब्यान झालेलो नाही! दोन चार दिवस धमाल येणार!!
माझ्या प्रतिसादांवर काकदृष्टी ठेवणार्या मराठी संस्थळांच्या संपादकांनो, वाचलंत ना? शिका काहीतरी त्यांच्याकडून!
या निमित्ताने एका वेगळ्या
या निमित्ताने एका वेगळ्या लेखाचा विषय असलेला, पण मनात बराच काळ असलेला प्रश्न मांडून पाहतो.
खरंच मिशन मार्स हे भारताला परवडणारं, किंबहुना, परवडत असेल तरी आजच्या घडीला आवश्यक तरी आहे काय?
भरपूर आर्थिक बोजा तर आहेच.. ते नाकारता येणार नाही. प्रत्येक प्रकारच्या प्रगतीला योग्य प्रमाणात बजेट दिलं गेलं आहे असं म्हणता येईल. पण "मिशन मार्स" यापेक्षा खूप जास्त प्राथमिक प्रायॉरिटीज असताना हे आवश्यक आहे का? असलेला प्रत्येक पैसा मिशन मार्सपूर्वी अन्य पायाभूत सुविधांना जावा असं वाटत नाही का?
तुला माझे विचार बर्यापैकी
तुला माझे विचार बर्यापैकी माहीत आहेत. हा धागा कर्ते विरुद्ध नाकर्ते किंवा अंधश्रद्धाविरोध अशासाठी नाहीये हे स्पष्ट करतो. मला नील आर्मस्ट्राँगने तिथे जाऊन बायबल वाचलेलं चाललं होतं असं कुठेही ध्वनित केलेलं नाहीये किंवा त्यामुळे आज इस्रो या शुद्ध मॉडर्न सायन्साधारित संस्थेचे अध्यक्ष तिरुपती बालाजीसमोर साकडं घालतात आणि यानाची प्रतिकृती नेतात यात काहीच गैर नाही (कारण नील आर्म्सट्रॉंगने नाही का बायबल वाचलं.. मग?) असंही नाही.
मिशन यशस्वी होण्याचा आनंद आहे. राजकीय नेते, खेळाडू वगैरे अश्यांपैकी कोणी जनरेट्यास्तव किंवा अन्य व्यक्तिगत कारणांनी अगदी मांढरदेवीला जाऊन बळी दिला तरी त्यात हरकत असायचं कारण नाही. कारण ते कधी प्युअर सायन्सवर आधारित संस्थेचे प्रतिनिधित्व करत नसतात.
मी किंवा तू किंवा अगदी कर्त्यांपैकी म्हणशील तर मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी सत्यसाईंपुढे लोटांगण घालणं हे वेगळं आणि श्री. शाम मानव यांनी घातलं तर ते वेगळं आणि लक्षवेधी नक्कीच होईल.
ओके.
इस्रोच्या अध्यक्षाने किंवा प्रकल्पातील शास्त्रज्ञाने समजा पूजा केली-एकट्याने अथवा अख्ख्या टीमला बरोबर घेऊन-तर नक्की आक्षेप काय आहे? शास्त्राधारित संस्थेचे प्रतिनिधित्व करतात म्हणून? जर मुहूर्त वैग्रे बघून काही केलं असतं आणि त्याच्या आधारावर प्रोजेक्ट कॅन्सल केला असता किंवा लाँचिंग डेट पुढेमागे केली असती तर आक्षेप समजण्यासारखा आहे. पण इथे तांत्रिक बाबींवर, त्यातल्या निर्णयप्रक्रियेवर जर पूजेचा परिणाम होत नसेल तर आक्षेप घ्यायचा हक्क माझ्या मते कुणाला नाही. शेवटी अंधश्रद्धा माजू नये इतकाच उद्देश आहे ना? जर निर्णयप्रक्रियेत अडथळा येत नसेल तर निव्वळ या प्रतीकांचा निषेध वांझोटा आहे. आणि हा निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. ट्याक्सपेयरने उगा स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलावे हे मला पटत नाही. कर्ते-नाकर्ते हा प्वाइंट इतक्यासाठी आणला की हा निषेध इथे अस्थानी आणि अंततोगत्वा वांझोटा१ आहे.
१यामागील प्रतीके निषेधावयास कुणी 'कर्त्री' पुढे येणार असेल तर आनंदच आहे. दुसरी अपेक्षा नाही.
१. असे रिच्युअल करण्याचा
१. असे रिच्युअल करण्याचा प्रतीकात्मक तरी का होईना, अर्थ काय? की त्यातही मला अर्थ घेऊन काय करायचे आहे असं म्हणावं?
२. मुहूर्त किंवा वेळेत बदल केला नसला तरी या पूजेचा आणि प्रतिमा तिथे पायाशी ठेवण्याचा मानसिक अर्थ:
२ अ. मोहिमेचे यश काही प्रमाणात बालाजी (अर्थात ईश्वराचे प्रतीक) हिच्या हाती आहे. (म्हणजे तसं बरोबर आहे, की अनफोरसीन काहीतरी होऊ शकतं, वारा, निसर्गाचे इतर फोर्सेस यांमुळे सर्व कोलॅप्स होऊ शकतं. सगळंच काही सायन्सनुसार १०० टक्के यशस्वी होत नाही)
२ ब. वरील २ अ एकदा मान्य केले तर मग मोहिमेचं अपयश काही प्रमाणात बालाजी (अर्थात ईश्वराचे प्रतीक) यावर सोडता येते. यात कीस काढल्याचा आरोप झाला तर तो सिलेक्टिव आरोप म्हणता येईल.
३. ईश्वराचं अस्तित्व जर वैज्ञानिक क्षेत्रातल्या शिखर संस्थेला मान्य असेल (जे स्पष्ट दिसतं आहे), तर ते अस्तित्व हे प्रतीकात्मकरीत्या तरी का होईना, पण बालाजीसारख्या मूर्त स्वरुपात असतं हे या संस्था मान्य करतात का?
हे प्रश्न वांझोटे म्हटले तर प्रश्नच संपला.. आणि नुसतं प्रतीकात्मक तर आहे, सोडून द्या असं म्हटलं तर इतकंच सांगतो, प्रतीकात्मक असलं तरी ते कोणत्यातरी स्ट्राँग बिलीफकडे ढळढळीत निर्देश करत असतं. त्यामुळे मुहूर्त, किंवा गंडादोरा किंवा अंगारा या पातळीवर गेले तरच ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी प्रतारणा करताहेत असं नसून केवळ प्रतीकात्मक कृतीही पुरेशी आहे. हा आपल्या देशाच्या वैज्ञानिक संस्थेच्या धारणांचा प्रश्न आहे. करेना का एक छोटीशी पूजा असा छोटी की मोठी या प्रकारातला नाही.
बाकी या संस्थांना आधुनिक विज्ञानाधारित अशी प्रणाली फॉलो करुन त्याचवेळी (उगंच जर्रा प्रतीकात्मकरित्याच की.. त्यात काय ? )देशाची दिशा देवाकडे आणि दैववादाकडे वळवायची असल्यास माझी व्यक्तिगत हरकत काही नाही.. जय हो...!!
२ ब. वरील २ अ एकदा मान्य केले
२ ब. वरील २ अ एकदा मान्य केले तर मग मोहिमेचं अपयश काही प्रमाणात बालाजी (अर्थात ईश्वराचे प्रतीक) यावर सोडता येते. यात कीस काढल्याचा आरोप झाला तर तो सिलेक्टिव आरोप म्हणता येईल.
हहपुवा. इस्रोची कैक मिशन्स फेल झालेली आहेत. पैकी किमान काही मिशन्स सुरू करताना पूजा केली असे समजू. त्याचे फेल्युअर-खापर देवावर फोडलेले कोणी पाहिलेय का?
विदा द्या की हो जरा, नुस्ते प्रतीक-प्रतीक किती खेळायचे ते?
तुमच्या बाकी प्रश्नांचा अर्थ काढणे मला महत्त्वाचे वाटत नाही आजिबात- कारण आजपर्यंत पूजा ऑर नो पूजा, अपयशाचे खापर कोणी देवावर फोडलेले मी ऐकलेले नाही. इंजिनिअरिंगला असताना माझा चारी वर्षे सोबत असलेला हॉस्टेल रूममेट इस्रोमध्ये आहे. त्यामुळे त्याच्याकडून जे ऐकतो त्यावरून असला विचार तिथे कोणी करत नाही हे तरी नक्कीच सांगू शकतो.
समजा त्यांचा देवावर विश्वास आहे तर त्याने त्यांच्या एकूण कार्यपद्धतीत कुठे आणि कसा फरक पडतो ते पाहिले पाहिजे. विश्वास नुसता असून भागत नाही. त्या विश्वासाचा आचरणावर नेमका कसा आणि कुठे परिणाम होतो हे तपासल्याशिवाय अशी झाडूमार-विधाने करण्यातले औचित्य मला दिसत नाही.
तदुपरि, प्रतीकांशी खेळणे हा इन इट्सेल्फ बडा बिजनेस आहे हे माहिती आहे, पण त्या धंद्यात इस्रो नाही. त्यामुळे प्रतीकांचा कीस इथे काढण्यात अर्थ नाही. हेच जर पॉलिटिक्स, समाजशास्त्र, इतिहासलेखनपद्धती, इ. ठिकाणी असते तर मी सहमत असतो थोडा का होईना. पण इथे नाही.
तुमच्या प्रश्नांपैकी २ अ व २ब सोडता बाकीचे प्रश्न निव्वळ प्रतीकांबद्दल आहेत. उर्वरित प्रश्नांत तुमच्याकडे विदा नसेल तर तुम्ही जे बोलाल त्याला अर्थ काय?
अन जाता जाता: इंग्लंडात सुद्धा पार्लमेंट मेंबरांना देव नामक प्राण्याची मदत घ्यावी लागते, याचा अर्थ काय होतो बरे? अनेक देशांत देवाची मदत घेतात, याचा अर्थ काय होतो? देशाची दैन्यावस्था देवावरच ब्लेमित असतील, नै का?
इस्रोची कैक मिशन्स फेल झालेली
इस्रोची कैक मिशन्स फेल झालेली आहेत. पैकी किमान काही मिशन्स सुरू करताना पूजा केली असे समजू. त्याचे फेल्युअर-खापर देवावर फोडलेले कोणी पाहिलेय का?
इस्रोच काय कोणीही देवाचे अस्तित्त्व मान्य करणार्याने कोणत्याही गोष्टीचे फेल्युअर-खापर देवावर फोडलेले कोणी पाहिलेय का? ;)
समांतरः भारतात देव हा न्यायालयात एक अधिकृत पार्टि असतो हे आपण अयोध्या खटल्यात पाहिले आहेच ;)
महाराष्ट्र म्हणजे भारत नव्हे -
अनाठायी मुद्दा म्हणाल - पण स्पष्टच सांगायचे तर महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेल्या माणसावर बुद्धीप्रामाण्याचे जे संस्कार असतात ते भारतातील अन्य राज्यातील व्यक्तींवर तितके झालेले नसतात. तेव्हा महाराष्ट्रात डॉ. वसंत गोवारीकर/ डॉ. जयंत नारळीकर प्रभृती या बुद्धीप्रामाण्याच्या विषयावर जसा विचार करतील तोच विचार डॉ. के. राधाकृष्णन करतील असे नाही.
बाकीच्यांबद्दल माहित नाही, पण
बाकीच्यांबद्दल माहित नाही, पण न्यूटन या माणसाला नावं ठेवणारं (/निकृष्ट दर्जाचा माणूस ठरवणारं) बरंच लिखाण इंग्लिशमधे उपलब्ध आहे.
(अवांतर आणि माझ्या माहितीतलं उदाहरण - कट्टर नास्तिक आणि बऱ्यापैकी हुशार संशोधक मित्र गर्लफ्रेंड/होणाऱ्या बायकोच्या सांगण्याखातर ख्रिश्चन झाला तेव्हा आम्ही मित्रंडळाने दबकं गॉसिप केलंच.)
"जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ" या तर्कातला फोलपणा समजूनही त्याला बळी पडावं का?
हे असं लिखाण म्हणजे अमुक एक
हे असं लिखाण म्हणजे अमुक एक कलाकार दारुडा असल्याने तो कलाकार म्हणून निकृष्ट आहे असे म्हणण्यापैकी आहे.
चुकीचं उदाहरण.. या दोन गोष्टी बर्यापैकी अनरिलेटेड आहेत. आणि ज्याप्रमाणे इस्रोप्रमुखांची व्यक्तिगत श्रद्धा त्यांच्या कामाच्या आड आली नाही म्हणजे झालं, तद्वतच या कलाकाराचे मद्यपिपण त्याच्या कलेच्या आड आलं नाही म्हणजे झालं असं म्हणून बाजूला सारता येतं.
इथे अगदी चपखल पॅरेलल उदाहरण जमेल का नाही ठाऊक नाही पण:
१. देशाचे विद्वान अर्थमंत्री किंवा रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी वैयक्तिक आयुष्यात फ्लॅट विकताना अर्धे पैसे ब्लॅकचे घेतले.. बरेचसे सामान्य नागरिक अशा व्यवहारात काळापैसा देतात घेतात.. त्याच्या समर्थनासाठी त्यांची अनेक तत्वज्ञाने उदयाला आलेली आहेत. चालतंच आहे ते सर्वत्र.. पण देशाच्या अर्थव्यवस्थेशी कोअर संबंध असलेल्या अथॉरिटीने अर्थकारणास उणी असणारी एखादी गोष्ट केली तर.. कार्यालयात ते असतील रिझर्व बँक गव्हर्नर.. केल्या असतील काळापैसाविरोधी पॉलिसीज..
पण व्यक्तिगत फ्लॅट सामान्य नागरिकाप्रमाणे पार्शल ब्लॅकने विकण्याचा त्याला हक्क आहे आणि तो त्यांनी आपल्या कार्यालयीन कक्षेबाहेर विकला आहे.. विकलेला फ्लॅट आरबीआयच्या मालकीचा आहे का? नाही ना? मग वीस लाख घेतले कॅशमधे तर काSSSSय एवढा पोटशूळ ? असं म्हणावं का?
(आता काळा पैसा हा अर्थकारणास वाईट नाहीच मुळी असं कोणी तज्ञ म्हणणार असेल तर सध्या मी तसं आहे असं फक्त गृहीत धरलेलं आहे इतकंच सांगतो. शिवाय काळा पैसा घेणे/देणे हा गुन्हा आहे. पूजा हा तसा गुन्हा नाही, पण उदाहरण हे कायद्याचं नसून व्यक्तीच्या पेशा आणि कार्यप्रकारामुळे आपोआप येणार्या अपेक्षांचं आहे.)
२. गांधीजींनी स्वदेशीची चळवळ केली तेव्हा त्यांनी घरी व्यक्तिगत आवडीसाठी एक परफ्यूम मात्र परदेशी बनावटीचा बाळगावा..
३. आयुर्वेदाला आयुष्य वाहिले आहे आणि मॉडर्न मेडिसिनच्या दुष्परिणामांवर कायमच लेखन आणि काम केले आहे, विशेषतः आयुर्वेद सर्वांगीण आहे आणि त्याच्या कक्षेत त्यांचे कार्य आहे, अशा देशातल्या टॉप आयुर्वेदाचार्य ऑथोरिटीने स्वतः डोके दुखल्यावर पॅरेसिटामोल घेणे..
अशा वेळी हॅ.. फक्त साधी पॅरासिटामोलच तर घेतली ना .. तीही व्यक्तिगत आयुष्यात.. आयुर्वेदिक दवाखान्यात बसून नाही ना घेतली, किंवा इतर कोणाला नाही ना दिली?..शिवाय पॅरेसिटामोलच तर आहे एक छोटीशी.. आख्खी केमोथेरपी तर नाही ना घेतली.. मग उगीच बवाल कशाला? असं म्हणायचं का?
पुन्हा एकदा.. उदाहरणे बिंदूस बिंदू लावून समांतर नसणार.. पण आधी दिलेल्या काही उदाहरणांपेक्षा ही उदाहरणं नेमकं काय वाटतं ते अधोरेखित करतील अशी आशा..
कसाबचं उदाहरण एक्स्ट्रीम वाटण्यासारखं होतं पण त्यात एक तांत्रिक मुद्दा चालू धाग्यातल्या मुद्द्याशी संबंधित होता.. तो असा की पंतप्रधान = देशाचा प्रतिनिधी. कसाब = देशाचा शत्रू. देशाच्या मते शत्रूला दयामाया नाही.. शासनच..
अशा वेळी व्यक्तिगत करुणेने पंतप्रधानाने कसाब = देशाचा शत्रू याला, व्यक्तिगत बँक अकाउंटमधून कुटुंबियांसाठी मदत दिली, आणि ती व्यक्ती टू व्यक्ती पातळीवर कितीही जस्टिफायेबल दिसली तरी अॅज अ कंट्रीज हेड त्यांनी असं व्यक्तिगतरित्या करणंही वाकडा संदेश देणारं आहे.
या सर्व प्रकारात आपल्या मूळ तत्वांशी फारकत दिसते.
आणि याउपर जर इस्रो प्रमुख
आणि याउपर जर इस्रो प्रमुख इतक्या उच्च पदावरचा मनुष्यही कामाच्या जागी आधुनिक शास्त्र... घरी आलो की कपडे उतरवावेत तद्वत कार्यकारणभाव उतरवून कर्मकांडं मान्य करणारा असा निव्वळ पोटासाठी चाकरी अशा मानसिकतेचा असेल तर खेदजनक आहे. भ्रमनिरास आहे.
(आठवा बापू काणे सेक्रेटरी: कुटुंबनियोजन संस्थेचा सेक्रेटरी बापू काणे आणि घरी मात्र लटांबर-पोरवडा.. प्रश्न विचारला असता उत्तरः "संस्थेचं कार्य आणि कार्यवाहाचा संबंध काय? मी अंत्यविधी मंडळाचाही सेक्रेटरी आहे.. म्हणून संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी तिरडीवर जाऊन पडू?"
हे गंमतीदार असलं तरी असा रिलक्टन्स आणि "चाकरीसाठी ओवळेपणी पाट्या टाकतो.. घरी येऊन सोवळा.. " अशा प्रकारे कारकुनाचं काम होत असेल.. शास्त्रज्ञ, अंतराळविषयक इंजिनियर्स आणि त्यातल्याही उच्चपदस्थ ऑथोरिटीजकडून असं होत असेल हे मला नवीन आणि म्हणून धक्कादायक ठरलं.
दोन छोटेसे मुद्दे:
स्वतः इस्रोप्रमुखांनी जाहीररित्या आपला अजेंडा शुद्ध विज्ञानवादी आहे असं म्हटलं नसेल.. कबूल. पण इस्रोसारख्या संस्थेने विज्ञाननिष्ठता सर्व अर्थांनी आणि मार्गांनी रुजवावी.. आणि ईश्वरी संकल्पनांना आवताण न देता प्रकल्प साध्य करण्याची मानसिकता देशात वाढवावी अशी निदान माझी तरी अपेक्षा आहे. आणि इस्रो ही व्यक्ती नाही. त्याचे प्रमुख हे तिचे एक मुख्य प्रतिनिधी आहेत.
दुसरी गोष्ट.. कलाकार - दारुडा उदाहरण..
आता असं पाहू... उदाहरणच बरं का.. खरं नव्हे..
एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख.. संध्याकाळी फक्त दोन सिंबॉलिक पेग्ज घेतात.. ते व्यसनाच्या आहारी गेलेले नाहीत हं.. त्यांचा फुल्ल कंट्रोल आहे.. आणि शिवाय मुख्य म्हणजे ते घरी.. व्यक्तिगत घेतात.. व्यसनमुक्ती केंद्रात बसून कार्यालयीन वेळेत नव्हे.. आणि त्यामुळे त्यांच्या व्यसनमुक्ती कार्यात कधी खंड पडलेला नाही.
बरोबर आहे रे तात्विकदृष्ट्या.. पण इच्छुक व्यसनमुक्तांचं आणि ऑलरेडी झालेल्यांचं मोराल उतरवायला पुरेशी आहे ना ही फॅक्ट??
कलाकार हा व्यसनविरोधी कार्याचा सिंबॉल नसतो रे.. त्यामुळे तो दारुडा आहे याचा परिणाम त्याच्या कलाकाराच्या इमेजवर होत नाही, उलट झालाच तर मनस्वी आहे असा पॉझिटिव्ह होतो.
इथे चर्चा ही ज्या लोकांच्या निव्वळ कार्यप्रकारामुळे ते एक संदेश कॅरी करतात त्याचाच स्पेसिफिक सांधा निखळवणारी कृती करण्याविषयी आहे.
एखादा मुद्दा मोकळा वेळ
एखादा मुद्दा मोकळा वेळ असल्याने आधिक विस्तारुन लिहीण्याला आटापिटा म्हणणे म्हणजे..
इथेच अन्यत्र वर्क्ड अप होण्याविषयी टिप्पणी केलेली पाहिली.
असं असेल तर तपशिलात जाण्यात अर्थच नाही.
नीट काही व्यक्त होऊ गेल्यास समोरच्याचा मुद्दा हा चिंधीभर मुद्दा असं हिणवायचं असेल तर मग बोलणं खुंटलं.. आणि सीरियसली.. आय टू थॉट अदरवाईज..!!
असोच.
व्यसनमुक्ती केंद्रच्या
व्यसनमुक्ती केंद्रच्या प्रमुखाने दारु प्यायली तर मला ते विसंगत वाटणार नाही. तो सरसकट सगळ्यांना दारू पिऊ नका असं सांगत नाही किंवा दारुबंदीची मागणी करत नाही तोपर्यंत. व्यसनमुक्ती केंद्रातील कांऊन्सेलिंग हे दारू पिणं तुझ्यासाठी कसं हानिकारक आहे या अंगानी जातं बहुदा. दारू इन जनरल कशी वाइट आहे या बद्दल नसावं.
तेच रिजर्व बँकेचे गव्हर्नरांच्या बाबतीत. तिथे ते दुसर्यांना एखादी गोष्ट बेकायदेशिर म्हणून करू देत नाहीत आणि स्वतः करतात हे विसंगत वाटतं.
थोडक्यात 'लोका सांगे ब्रह्मज्ञान... ' जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला ते विसंगत वाटणार नाही.
इथे जर राधाकृष्णन जर देवळात जाण्याच्या विरोधात एरवी प्रचार करत असते तर मला त्यांचं आत्ता देवळात जाणं विसंगत वाटलं असतं.
कोणी अग्निपंख वाचले नाही
कोणी अग्निपंख वाचले नाही बहुतेक ... जरा वाचा हो ....
जर श्रद्धेने प्रश्न सुटत असतील तर वाईट ते काय ? ... आता एखाद्या पक्षास भारद्वाज म्हटले किवा एखाद्या वाणास रामाचे वाण म्हटले तर वाईट ते काय ?आपले उदिष्ट साध्य होते का ते महत्वाचे असे हेकेखोर पणा कशाला ?? समाजशास्त्र, विज्ञान, कला, व्यक्ती, श्रद्धा हे सगळे एकत्र गुंफून काही केले तर ते वाईट का ?
वावगे या साठी की सिझरच्या
वावगे या साठी की सिझरच्या पत्नीचे वर्तन शंकाही येऊ नये असे असावे. तुम्ही/मी किंवा अन्य कोणी कोणती कृती करतंय आणि एखाद्या विशिष्ट पदावरील व्यक्ती तीच कृती करतंय तर बघण्याच्या नजरेत फरक पडतो (किमान माझा तरी).
उद्या समजा वैयक्तीक आवड म्हणून शंकराचार्यांनी गायीचे मांस खाल्ले किंवा पंतप्रधानांनी वैयक्तीक खर्चातून/अकाऊंटमधून कसाबच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली तर चालेल का?
पंतप्रधान आणी कसाबचे उदाहरण
पंतप्रधान आणी कसाबचे उदाहरण इतके ओढून ताणून दिलेय की भाष्यही करवत नाही त्यावर. मुद्दा ताणून धरायचा म्हटला की कुठल्या थराला गोष्ट जाते याचे हे उत्तम उदाहरण म्हणून सांगता यावे.
बाकी शंकराचार्यांशी केलेली तुलनाही तितकीच हास्यास्पद आहे. म्हणजे धर्मश्रद्ध लोक तर शेवटी अंधश्रद्ध आणि मूर्खच हो, पण इस्रोचा अध्यक्ष देव मानतो म्हणून त्यावरून त्याची निर्णयक्षमता ठरवणे म्हणजे एकप्रकारची अंधश्रद्धाच होय. हा दावा आणि अमुक एक अभिनेता वैयक्तिक आयुष्यात दारुडा असल्याने मी त्याचे पिच्चर पाहणार नाही असे म्हणणारे लोक यांत काहीच फरक नाही.
मिशन मार्स हे भारताला
मिशन मार्स हे भारताला परवडणारं, किंबहुना, परवडत असेल तरी आजच्या घडीला आवश्यक तरी आहे काय?
भरपूर आर्थिक बोजा तर आहेच.. ते नाकारता येणार नाही
आर्थिक बोजा कसा काय?
मुळात अख्ख्या 'स्पेस रिसर्च'खाली भारत आपल्या वित्तवर्षाच्या बजेटच्यी केवळा ०.३%च्या आसपास खर्च करते. यातील मोठा हिस्सा दळणवळणासाठीचे व हवामान खात्याशी संबंधित उपग्रह व त्यांना वाहून नेणार्या वाहकांवर खर्च होतो. चांद्रमोहिमा/मंगळ मोहिमा वगैरे सारख्या नव्या मोहीमांसाठी या ०.३%च्या ८%च्या आसपास पैसा खर्च होतो.
भारताला आपल्या आर्थिक बजेटच्या ०.३% च्या ८% इतका खर्च बोजा कसा काय? (हा खर्चही अख्ख्या एका मोहिमेवर वगैरे नाहीच, त्यातही अनेक मोहिमा वाटेकरी)
शिवाय इतरांचे उपग्रह सोडून इस्रोची मिळकतही वाढते आहे. काही काळात हा खर्चही त्यातूनच भरून निघु शकेल.
शिवाय या हवामन खात्याच्या उपग्रहांमुळे शेतकरी, मासेमार वगैरेंना होणारे फायदे, दळवणळणाच्या उपग्रहांमुळे जवळजवळ आपल्या प्रत्येकाला होणारे फायदे मोजले तर लोकहित आहे हे ही नाकारता येऊ नये.
४५० ते ५२० कोटी रुपये असा
४५० ते ५२० कोटी रुपये असा खर्च वेगवेगळ्या सोर्सेसमधे वाचला. एकूण बजेटच्या मानाने हा भाग कमी आहे हे मान्यच.
फक्त एक मुद्दा असा की मिशन मार्समधे मंगळाच्या पृष्ठभागावरचे पाणी किंवा तिथे भविष्यात जाऊन वस्ती वसवण्याची शक्यता वगैरे याच्या अभ्यासासाठी पाचशे कोटीसुद्धा खर्च करणे म्हणजे भुकेने खंगलेल्या माणसाने अन्न मिळण्याआगोदरच हाजमोलाची सोय करण्यापैकी आहे. त्यासाठी आलेला खर्च किती कमी केला यावर हे अवलंबून नाही.
हवामानविषयक सॅटेलाईट्स, शेतीविषयक सर्व्हे करणारे उपग्रह वगैरेंविषयी अर्थातच हा प्रश्न गैरलागूच..
कधीना कधी या मिशन मार्स प्रकारचे संशोधनही व्हावे, ते बिनमहत्वाचे नव्हेच, पण आज ते सुरु करण्याची योग्य वेळ आहे का अशी शंका..
तुम्ही म्हणताय त्या समस्या
तुम्ही म्हणताय त्या समस्या नाहित असे नाही पण त्या काही १०-२० वर्षात सुटणार्या नव्हेत (किंबहुना त्या टेन्ड्स टु झिरो होऊ शकतील पण शुन्य होतील का नाही शंकाच आहे)
त्या सुटेपर्यंत आपण नुसते बसून का रहायचे? त्या समस्यांवर भारत सरकार या योजनेच्या कित्येक पट खर्च करत आहे. उदा. द्यायचं तर अन्न सुरक्षा योजनेवर बजेट मध्ये १०,००० कोटींची तरतूद आहे. शिवाय ८०,००० कोटींच्या आसपास अन्नाशी संबंधित सबसिडी आहेत.
सरकार इतर समस्यांच्या तुलनेत याला प्राथमिकता देत असतं तर ही ओरड समजू शकलो असतो. मात्र प्रत्यक्षात अश्या रिसर्च वेस्ड मिन्सना अजिबातच प्राथमिकता मिळताना दिसत नाहीये, खरंतर यावर अजूनही थोडा खर्च व्हायला हवा असे मी म्हणेन.
कोअर सायन्स आणि अॅप्लाईड सायन्स ?
कोअर सायन्स कधी जादु दाखवेल सांगता येत नाही.
जगभर मेकॅनिकल इन्डस्ट्रीमध्ये वापरल्या जाणार्या नॅस्ट्रॅन/अॅडम्स सारख्या टुल्सची सुरुवात अशाच मोहीमेसाठी झाली असावी.
अशा गोष्टींचे फायदे लगेच दिसत नाहीत पण आज टेक्नोलॉजी घ्यायला प्रचंड पैसा बाहेर जातो तो कधी तरी भविष्यकाळात रोखता येइल.
फायदा बघता खर्च परवडणारा आहे
'मंगळयान' मोहीम यशस्वी झाल्यास फार मोठ्या प्रमाणात भारतीय अंतराळ उद्योगाची जाहीरात होणार आहे. जागतिक अंतराळ उद्योग $३०७ अब्ज इतक्या मोठया व्याप्तीचा आहे हे लक्षात घेता 'मंगळयान' सारखी यशस्वी मोहीम आपल्याला भविष्यात बराच मोठा व्यवसाय उपलब्ध करून देईल. जो आपण केलेल्या $ ८० दशलक्ष खर्चाच्या तुलनेत नक्कीच खूप जास्त असणार आहे. त्यामुळे त्यातून आपला फायदाच आहे. अंतराळ तंत्रज्ञानात विश्वासार्हता खूप महत्वाची आहे. डिसेम्बरात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन असलेले GSLV यशस्वी झाल्यावर तर बरयाच मोठया प्रमाणात अंतराळ व्यवसाय हाताशी येऊ शकेल कारण अवजड उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आपण मिळवू. आजचे PSLV रॉकेट चे उड्डाण हे सलग चोविसावे यशस्वी उड्डाण होते. अंतराळ उद्योगात ही मोठीच पत आहे. ह्या सगळ्या व्यवसायातून मिळणारा नफा भारताला नक्कीच इतर कल्याणकारी योजनांवरही उपयोगात येईल. :) शिवाय याचा प्रभाव परराष्ट्र राजकारणावरही पडतो. चीनने रशियाबरोबर राबवलेली मंगळ मोहीम Yinghuo-1 फसली होती. (खर्च $१६३ दशलक्ष) त्यांनी रशियाबरोबर असे हात पोळून घेतल्यावर आजच्या 'मंगळयान'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर चीनने भारताशी अंतराळ कार्यक्रमात सहकार्य करण्याची इच्छा बोलुन दाखवणे बरेच काही सांगून जाते.
यालाच पुरवणी: डॉन या
यालाच पुरवणी:
डॉन या वृत्तपत्राच्या साईटवरील इथे रझाक नावाच्या एका पाकिस्तानी वाचकाची ही प्रतिक्रिया बोलकी आणि मार्मिक वाटली: (अनुवाद मी केला आहे. चुभुद्याघ्या)
भारताला मंगळावर मिथेन मिळते का नाही याची काहीही पडलेली नाही. त्यांच्यासाठी ही केवळ गुंतवणूक आहे. तशीच गुंतवणूक जी त्यांनी काही दशकांपूर्वी सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रात केली होती. शिक्षण-संशोधनात गुंतवणूक करा, टॅलेंटला वाव द्या-जोपासा, तुमचे टॅलेंट जगाला दिसेल असे ते सगळ्यांसमोर मांडा आनि एक नवी इंडस्ट्री तयार करा असे ते सुत्र आहे. भारत $४५०बिलियन उलाढाल असणार्या 'रॉकेट' इंडस्ट्रीवर डोळा ठेऊन आहे. जर भारत पाश्चात्यांपेक्षा १/६ किंवा १/१० किंमतीत हे करू शकत असेल तर त्यांच्याकडे ही रॉकेट लाँचिंगचे जॉब ऑटसोर्स होतील. भारतासाठी ही सहज $२० ते $४० बिलीयन ची इंडस्ट्री बनू शकेल. आतापर्यंतच PSLVने १४-१५ युरोपियन उअप्ग्रहांना भुस्थिर कक्षेत पोचवलं आहे. जर हे (मंगळयान) मिशन यशस्वी झालं तर आंतरग्रहीय उड्डाणासाठीही त्यांची मदत घेतली जाऊ लागेल. आपण पाकिस्तानी लोकांनी यापासून शिकले पाहिजे. हे कटू असले तरी सत्य आहे.
आंतरजालावर विविध
आंतरजालावर विविध वृतपत्रांच्या वेबसाईट्सवर वाचक अतिशय गमतीदार प्रतिक्रीयाही देतात. त्याचे काही नमुदे देत आहे:
१.
४५०कोटी म्हणजे भारतात काहीच वाटणार नाही. आमची पुणे वॉरीअर टिमसुद्धा १२०० कोटींना विकत घेतली आहे
२.
पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे ;)
३.
चला दिवाळीतच तेही दहा वाजायच्या आत रॉकेट उडवलं ते बरं झालं!
हारुन शेख यांच्या वरील
हारुन शेख यांच्या वरील प्रतिसादाच्या अंगानेच माझं उत्तर आहे. पण त्यासाठी मी एक साधं उदाहरण देतो.
समजा एक अत्यंत गरीब कुटुंब आहे. घरची मुलं शेतात कामं करणं, गुरं चारायला नेणं, दूध काढणं वगैरे कामं करतात आणि तरीही त्यांना वेळोवेळी उपासमार होते. सहा पोरांमधला एक म्हणतो की मी एक रिक्षा तयार करतो. घरातल्या सगळ्यांना तो समजावून देतो की रिक्षा तयार करायची म्हणजे जुनं इंजिन फक्त आणायचं, बाकीचा सांगाडा तोच खपून तयार करणार. गरीबी असली तरी एवढ्या सगळ्या लोकांच्या खर्चात सेकंडहॅंड इंजिनाचा खर्च परवडण्यासारखा असतो - त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या १ टक्का फक्त. आणि सांगाडा करायला जी काय मेहनत लागेल ती. सगळे घरचे कबूल झाल्यावर तो खरोखरच रिक्षा तयार करतो. ती रिक्षा व्यवस्थित चालते आहे की नाही हे बघण्यासाठी तो फिरवून आणतो, तर लोक लगेच कुचाळक्या करायला लागतात -
'धड पोटं भरण्याची अक्कल नाही, आणि आले मोठे रिक्षा चालवायला. स्वतःला फार श्रीमंतच समजतात नाही का.'
'हे असले नसते धंदे करण्यात वेळ आणि पैसे फुकट घालवण्यापेक्षा या पोराने तितका वेळ मजुरी केली तर दोन पैसे हाती लागणार नाहीत का?'
'रतनशेठकडे गाडी आहे म्हणून यांनाही हवी. ऐपत नाही तर उगाच उंटाच्या गांडीचा मुका कशाला घ्यायला जावं?'
'या साल्याचा बाप परवा माझ्याकडे उधार मागायला आला होता. तसे कधी त्याने पैसे बुडवलेले नाहीत, पण उधारीवर गाड्या उडवण्याचा शौक करावाच कशाला म्हणतो मी?' जिभा वळवळायला काही कारण लागत नाही. पण त्या मुलाने विचार केलेला होता की गावात चारच गाड्या आहेत. आपली रिक्षा नीट चालली की बाजारापर्यंत लोकांची नेआण करून जुन्या इंजिनाचा खर्च काही महिन्यात सहज भरून निघेल. तोपर्यंत टॅक्सीच्या सांगाड्यावर काम करू आणि तिच्या इंजिनाची व्यवस्था करू. टॅक्सी झाली की एका वेळी सहासहा शीटा भरता येतात. महाग असली तरी फायद्याची पडते.
इथे मी मुलाचं उदाहरण दिलं. पण त्यातली एखादी मुलगी म्हणाली की मी नेलपॉलिश लावणं आणि हेअरड्रेसिंग करणं शिकून घेते. तिनेही पहिली प्रॅक्टिस थोडा खर्च करून आपल्या बहिणीवर केली तर गावकरी असंच म्हणतील.
या कुटुंबाचा प्रत्येक क्षण निव्वळ आत्ताच्या सर्व्हाव्हलसाठीच खर्च झाला पाहिजे असं म्हणणं सोपं आहे. पण आत्ता चालू आहे तेच करत रहाण्याने वाढीचा दर वाढू शकत नाही. अत्यल्प खर्च भविष्यात उपयोगी पडणारी नवीन तंत्र शिकण्यासाठीही झाला पाहिजे. नाहीतर इतर शिकल्यासवरलेल्यांचाच फायदा होत रहातो.
एकाच कुटुंबातल्या सदस्यांचं
एकाच कुटुंबातल्या सदस्यांचं उदाहरण आणि भारतातल्या विविध अवस्थेतल्या समाजघटकांचे उदाहरण यांचा मेळ तितकासा योग्य नाही. भारतातल्या काही प्रदेशांना, समाजघटकांना आपल्याला स्वातंत्र्य मिळालेय हेच जाणवत नाही तर काही ठिकाणी आम्ही किती दिवस सहा पदरी रस्त्यांवर समाधान मानायचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते, मोनोरेल, मेट्रो आम्हाला कधी मिळणार असे प्रश्न असतात. म्हणूनच त्या त्या परिस्थितीतून आलेले प्रश्न योग्यच असतात. भारताने उद्या अंतराळात वसाहती बनवल्या, पण देशातल्या काही वसाहतींकडे दुर्लक्ष चालूच ठेवले तर त्याचा त्यांना उपयोग काय अशा पद्धतीने हे प्रश्न पहायला हवेत. हे माझं मत नसून त्या चष्म्यातून पहायचा केलेला प्रयत्न आहे.
दुसरीकडे प्रगती थांबवता येत नाही. या प्रगतीचा फायदा समाजातल्या सर्व घटकांसाठी होणार आहे, असा सकारात्मक दृष्टीकोण ठेवूनच त्याला पाथिंबा दिला गेला पाहीजे. तसंच एक जबाबदार नागरीक म्हणून सरकारवर कायम अंधारात राहणा-या नागरिकांच्या प्रश्नाप्रती संवेदनशील असण्यासाठी दबावही ठेवता आला पाहीजे.
हारून शेख यांच्या प्रतिसादात
हारून शेख यांच्या प्रतिसादात हा खर्च म्हणजे गुंतवणूक असा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने तुमच्या प्रतिसादात जे उदाहरण आले आहे त्यात सर्वायवलसाठी खर्च या मुद्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी जे उदाहरण दिले ते तितकेसे चपखल नाही असं माझे म्हणणं.
एका कुटुंबात साधारणपणे एकच परिस्थिती असणार आहे म्हणून ते देशाचं प्रातिनिधिक चित्र नाही. याउलट, देशातला प्रचंड विरोधाभास लक्षात घेतला तर हा खर्च योग्य कि अयोग्य या प्रश्नाचं उत्तर त्या त्या परिस्थितीतल्या लोकांप्रमाणे बदलत जाईल आणि प्रत्येक वेळी ते योग्य मानावं लागेल. उदा. उत्तर प्रदेशाला मध्यंतरी पाच हजार कोटी रुपये प्रलयाचा सामना करण्यासाठी हवे होते. त्या संदर्भातल्या बातम्यांकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. त्याच वेळी मुंबईत मोनो रेल, मेट्रो रेल्वे, लोकलचं अपग्रेडेशन आणि प्लायओव्हर यासाठी एमएमआरडी आणि महापालिका यांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये खर्ची पडूनही समाधान नाही. केंद्र सरकारचे आशिर्वाद, भौगोलिक परिस्थिती यामुळं काहीच भागात विकास एकवटला. त्यांचा दृष्टीकोण वेगळा असणार आणि नाही रे वर्गाचा दृष्टीकोण वेगळा असणार.
एकच एक उत्तर योग्य असेल याची अपेक्षा ठेवता येणार नाही इतकंच सांगण्याचा प्रयत्न होता.
+
खर्च करावा या मताशी सहमत आहे. भावी अपत्यांच्या (आणि वृद्धत्वाकडे वाटचाल करणार्या आईवडिलांच्या) आयुष्याची, शिक्षणाची, संभाव्य आजारपणातील खर्चाची तरतूद पूर्ण केल्याशिवाय नवदांमपत्याने सिनेमा पाहण्यास जाऊ नये असा काहीसा युक्तिवाद वाटतो.
मूळ वादाचा जो मुद्दा होता 'इस्रोच्या अध्यक्षांनी' बालाजीची पूजा करण्याचा....
पर्सनली काही श्रद्धा ठेवावी की नाही हा वेगळा मुद्दा असू शकेल. त्या श्रद्धेचा कामात हस्तक्षेप होतो की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. (विदा/माहिती अर्थातच कोणाकडे असणार नाही पण) असल्या श्रद्धेपायी लाँचची तारीख महूर्त वगैरे पाहून ठरवली गेली होती का? म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी लाँच शक्य होता आणि वातावरणसुद्धा अनुकूल होते पण अमावास्या होती म्हणून ते ५ नोव्हेंबर रोजी केले गेले का?(३ नोव्हेंबरला रविवारची/दिवाळीची सुट्टी होती म्हणून नव्हे). तसे असेल तर केलेली गुंतवणूक श्रद्धेपायी दोन दिवस idle पडून राहिली असे होईल. अशा गोष्टी भारतात अनेक प्रोजेक्टमध्ये केल्या जातात असे दिसून येते.
आयुकामध्ये न्यूटनला ज्या झाडाखाली बसलेला असताना गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचला "त्या" झाडाची एक फांदी ठेवलेली आहे असे ऐकले आहे. या कृतीतून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचण्यात त्या झाडाचा (फळ पडणे* सोडून) काही वाटा होता असे सुचवले जाते. त्या झाडात काही विशेष गुण असल्याचे सुचवले जाते. पक्षी न्यूटन त्या झाडाऐवजी दुसर्या झाडाखाली बसला असता तर त्याला तो सिद्धांत सुचला नसता असेही सुचवले जाते. अशी श्रद्धा ठेवण्याचे किंवा तत्सम काही सुचवण्याचे स्वातंत्र्य सुमंगल पब्लिकेशन्स** या संस्थेस आहे पण आयुका आणि इस्रो या संस्थांना नाही.
*डोक्यावर फळ पडल्याने न्यूटनला गुरुत्वाकर्षण सुचले ही आख्यायिकाच आहे असेही कोठेसे वाचले आहे. पक्षी तो या झाडाखाली बसला होता तेव्हा दुसर्या झाडावरून फळ पडताना पाहून त्याला कल्पना सुचली असे वाचले आहे.
**हे नाव लिहिण्यात काही विशेष विचार नाही. (अशोकवनिकान्याय) :)
उदाहरणे
तुम्हीही पाहिली असतील अशी उदाहरणे....
सर्वर चालू करणे वगैरे .... सर्वर चालू होण्यास तयार आहे, डेटासुद्धा तयार आहे. पण सर्वर (राहुकाल चालू असल्याने किंवा तत्सम कारणाने) चालू केला नाही अशी दोन उदाहरणे पाहिली आहेत. इथे कंपनीच्या मालकाच्या इच्छेने नव्हे तर कर्मचार्याच्या (प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे) इच्छेने.
होल्ड इट प्लीज!
आयुकामध्ये न्यूटनला ज्या झाडाखाली बसलेला असताना गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचला "त्या" झाडाची एक फांदी ठेवलेली आहे असे ऐकले आहे. या कृतीतून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचण्यात त्या झाडाचा (फळ पडणे* सोडून) काही वाटा होता असे सुचवले जाते. त्या झाडात काही विशेष गुण असल्याचे सुचवले जाते. पक्षी न्यूटन त्या झाडाऐवजी दुसर्या झाडाखाली बसला असता तर त्याला तो सिद्धांत सुचला नसता असेही सुचवले जाते.
असं कोणी सुचवलं आहे? कोणाकडून ऐकलं आहे?
आयुकात लावलेली फांदी ही न्युटनच्या बापजाद्याच्या मालकीच्या सफरचंदाच्या बागेतल्या एका (कोणत्याश्या) झाडाच्या वंशजाची आहे असे खुद्द नारळीकरांनी आम्हाला सांगितलेले आहे. मुळात न्युटन झाडाखाली बसलेलाच नव्हता हे कवाच क्लीअर झालेलंहे! (आणि काही लोक तो मेंढरं वळत होता असेही म्हणतात. न्युटनचा बाप होता गडगंज, प्लेगची का कसली साथ आली म्हणून शिंचं लंडन सोडून सुटीला घरी आलं होतं.. वगैरे इतिहास आम्ही वाचलेला आहे.)
"त्या" बागेतली फांदी मुद्दाम
"त्या" बागेतली फांदी मुद्दाम आणून लावायचं आणि ती तशी लावली असल्याचं मुद्दाम/सहजपणे सांगण्याचं काही कारणच नाही. आणि तसे असेल तर "त्या झाडाचा" नाही तर "त्या बागेचा" काही विशेष गुण असल्याचं सुचित केलं जातं.
अन्यथा हे झाड त्या बागेतलं आहे असं सांगतानाच इतर प्रत्येक झाडाविषयी काहीतरी सांगायला हवं. उदाहरणार्थ त्याच्या शेजारचेच झाड निळे यांच्या बागेतून आणले आहे किंवा हे झाड आधीपासून इथेच होते वगैरे.
असहमत
"त्या" बागेतली फांदी मुद्दाम आणून लावायचं आणि ती तशी लावली असल्याचं मुद्दाम/सहजपणे सांगण्याचं काही कारणच नाही. आणि तसे असेल तर "त्या झाडाचा" नाही तर "त्या बागेचा" काही विशेष गुण असल्याचं सुचित केलं जातं.
त्या बागेतील फांदी हे न्यूटनच्या थेअरीपासून फळाला आलेल्या शास्त्रीयं शाखेचं प्रतिक म्हणून आहे. पूजनिय किंवा वंदनीय प्रतिक नाही. रोज सकाळी जाऊन कोणी तिथे "या कुंदे" वगैरे म्हणल्याचे किंवा हळदी कुंकू वाहील्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही.
थिओडोर वॉन कर्मन नावाच्या शास्त्रज्ञाचं एअरोडायनामिक्स मध्ये मोठं योगदान आहे. त्या बद्दल बराचसा अभ्यास करून झाल्यानंतर कुठेतरी रस्त्यावर मला त्याचं फ्लुईड्स वरचं छोटंसं पुस्तक मिळालं. त्यापुस्तकातलं सगळं माझं अभ्यासून झालेलं होतं. तरीही मी ते विकत घेतलं, त्याचं कारण फक्त ते वॉन कर्मन ने लिहलं आहे म्हणून. म्हणजे लगेच वॉन कर्मन माझ्यासाठी देव झाला नाही. किंवा, आईनस्टाईनला जिथे थेअरी ऑफ रिलेटीव्हीटी प्रथम सुचली त्या गावाला मला भेट द्यावीशी वाटते म्हणजे लगेच ते माझ्यासाठी तिर्थस्थळ आहे असे नाही.
अशोकवनिकान्याय
रावणाने सीतेला अशोकवनात का ठेवले? यामागे काही खास कारणमीमांसा नाही. कुठेतरी ठेवायचे ते अशोकवनात ठेवले. पक्षी अशोकवनाऐवजी खांडववनात किंवा आणखी कुठे ठेवले असते तरी हाच प्रश्न विचारता आला असता आणि असेच उत्तर देता आले असते.
तसे सुमंगल पब्लिकेशन्सचे नाव का घेतले? त्यामागे काही कारणमीमांसा नाही. निर्णयसागरचेसुद्धा घेता आले असते.
मुळात ही चर्चा एक ठाम मत
मुळात ही चर्चा एक ठाम मत रेटण्यापेक्षा मनात असलेले प्रश्न विचारुन इतरांचे विचार जाणण्यासाठी सुरु केली.
यामधे सर्वांनीच उत्तम मतमांडणी केली आहे. आत्तापर्यंतचे सर्व वाचून या प्रकल्पाच्या गरजेविषयीचं / आर्थिक बोजा / त्यातून साध्य होणार्या गोष्टी यांवरचं प्रश्नचिन्ह बरंचसं नाहीसं झालं आहे आणि या प्रकल्पाची आवश्यकता व्यवहार्यता आणि रास्तपणा पटला आहे.
तिरुपती बालाजीबद्दल अजूनही मन स्वच्छपणे काही मानत नाही. मी मुळात काय वाटलं ते मांडण्यात कमी पडलो असं वाटतं. श्रद्धा अंधश्रद्धा अशी जनरल वाटणी इथे वाटली नाही. प्रतीकात्मकच पण काय अयोग्य वाटलं हे खरंच सांगता येत नाही. (श्रद्धेलाच काय, देवाधर्मालाही एरवी विरोध नसतानासुद्धा.. कदाचित बटाट्याच्या चाळीप्रमाणे, *चाळीला कचर्याचे वावडे नव्हते पण कोणत्या बिर्हाडातून कोणता कचरा पडावा याविषयी तिची ठाम मते होती. तशातला प्रकार नकळत झाला असावा माझा..)
* संदर्भः अण्णा पावश्यांच्या घरातून निर्माल्यांऐवजी, द्रोणांतून अंड्यांची टरफले पडायला लागली, तेव्हा चाळ शहारली होती
बॅटमन
बॅटमनचे वरील प्रतिसाद समजू शकतो. in theory त्यात काहीही चूक नाही. ज्याला त्याला जे ते करण्याचं स्वातंत्र्य वगैरे वगैरे भारतीय घटनेनं दिलेलच आहे.
पण बॅट्या, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावतो; अशी अवस्था होते आहे बाबा.
ह्या गोष्टीचा रेफरन्स घेउन आधीच डोळे मिटून घेतलेली मंडळी डोळ्यावर अजून मोठ्ठं कातडं ओढतील.("बघा, तो सायंटिस्ट असूनही पाया पडतो ना. मग आम्ही..." वगैरे वगैरे छापाची बडबड ).
.
प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. सामान्य असण्याची किंमत आपण रोज देतच असतो.(सत्तास्थांनापेक्षा दुय्यम महत्व वगैरे वगैरे.)
असामान्य असण्याची , एक प्रतीक बनण्याची किंमतही त्यांनी द्यावी अशी अपेक्षा आहे.
प्रमुख ठिकाणी बसलेल्या व्यक्तीच्या ठळक वैयक्तिक बाबतीत पब्लिकने नाक खुपसणे स्वाभाविक आहे. कारण ती त्यांच्या मोठं असण्याची किंमत आहे.
(महाराष्ट्राला उद्या मुस्लिम मुख्यमंत्री मिळाला तरीही त्याने परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीस विठ्ठल पूजन करावे ही अपेक्षा आहे.(दुर्दैवानं इथेही देवा-धर्माचच उदाहरण मिळालं. ह्या उदाहरणाचा उलटहे वापर होउ शकतो ह्याची कल्पना आहे. पण हे उदाहरण वैयक्तिक श्रद्धांपेक्षा सामाज्जिक परंपरा धोरेखित करतं म्हणून दिलं.)
"मी मूर्तीपूजा मानत नाही" हे मत त्याला ठेवून चालत नाही.)
.
ह्या गोष्टी , ह्या अपेक्षा कोणत्याच कायद्या लिहिलेल्या नसतात. सगळ्याच गोष्टी लिहिल्या जाउही शकत नाहित. पण म्हणून त्या पाळायच्या नाहित असे नसते.
म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो:-
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावतो.
काही काळ बीळ सोकावत नाही.
काही काळ बीळ सोकावत नाही. तांत्रिक निर्णयावर याचा परिणाम होतो की नाही, कुठे झाला की नाही हे बघा आणि मग बोला इतकेच माझे म्हणणे आहे. ते न पाहता निव्वळ काळ सोकावतो काळ सोकावतो करत ओरडण्यात काय अर्थ आहे? याचे उत्तर मात्र कोणी देत नाही. इतकी साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. आणि इथे विदा द्या मगच बोला असेही नाही. जरा तरी लॉजिकल विचार करावा की माणसाने. निव्वळ प्रतीकब्याशिंगासाठी बाशिंग कशापायी बांधावे बघावे तेव्हा? केस बाय केस गोष्टी बदलतात. त्यामुळे मुसलमान मुख्यमंत्र्याने काय करावे हा वेगळा प्रकार आहे. राजकारण-समाजकारण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत मोटिफचे महत्त्व आजिबात सारखे नसल्याने हे उदाहरण गैरलागू आहे.
काल जवळपास सर्वच वृत्तपत्र
काल जवळपास सर्वच वृत्तपत्र पाहिली. एका ठिकाणी एक प्रतिक्रिया मार्मिक होती. गंमतीचा भाग असा आहे कि प्रशासनाच्या बाहेर असणा-यांना सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल काहीच माहिती नसते, तर सरकार अधिका-यांकडे उत्तरे असूनही त्याच मार्गदर्शक तत्त्वांमुळे खुलासे करता येत नाहीत. गुगळून पाह्ल्यास कन्डक्ट रुल्स / सीसीएस रुल्स पाहता येतात. त्यावरून थोडी कल्पना येते. यात वेळोवेळी जारी करण्यात आलेले सर्क्युलर्स, ऑफीस मेमोरंडम इ. चा समावेश नसतो.
ठळकपणे पाहील्यास सरकारी कर्मचा-यासाठीच्या अपेक्षा
-. राजकारणात भाग घेता येत नाही.
-. राजकारणात भाग घेणा-या संघटना, पक्ष यांच्याशी संबंध ठेवता येत नाही.
-. वरील घटकांशी राजकिय मंच शेअर अरता येत नाही किंवा राजकिय कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवता येत नाही.
-. राजकिय पक्षाला लाभ पोहोचवेल अशा प्रकारे पदाचा उपयोग करता येणार नाही.
-. सरकार, प्रशासन यावर टीका करता येणार नाही.
-. सरकार किंवा प्रशासन यांना गालबोट लागेल असे सार्वजनिक वर्तन करता येणार नाही.
-. सरकार / प्रशासन यांच्या धोरणावर शंकाउपस्थित होईल असे सार्वजनिक वर्तन करता येणार नाही.
-. पूर्वपरवानगीशिवाय प्रसिद्ध माध्यमांकडे जाता येणार नाही.
-. पदाचा वापर करून वैयक्तिक प्रसिद्धीसाठी माध्यमांकडे जाता येणार नाही.
- कांमाशी संबंधित माहिती.पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक करता येणार नाही.
- राज्यघटनेच्या अधीन राहण्याची अट आहेच
नवा अँगल
आजच्या डीएनए मध्ये जी माधवन नायर या इस्रोच्या माजी चेअरमन ची मुलाखतवजा लेख आला आहे. त्यात त्यांनी माहिती देतान एक इंटरेस्टिंग छुपा आरोप केला आहे.
ते म्हणतात की आपल्या या यानासोबत डझनभर यंत्रे जाणार होती. मात्र आपले GSLV खात्री वाटावी इतके तयार नसल्याने वजनावर मर्यादा आली आणि बरीच चांगली/गरजेची यंत्रे जाऊ शकली नाहित :(
मात्र तरीही तडजोड करून कमी यंत्रांसह भारताने PSLVचा वापर करत उड्डाअण केले.
यात मला वाटलेला छुपा आरोप किंवा मला पडलेला प्रश्न असा की:
खरंतर यंदाच्या 'मार्शियन विंडो' (ज्या काळात यान सोडणे आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या सगळ्यात योग्य असते)मध्ये आपले 'बेस्ट बेट' असणारे यान प्रक्षेपित करणे शक्य नव्हते. मात्र भारताने येन केन प्रकारेण यान सोडले आहे. या मागे येणार्या निवडणुका डोळ्यापुढे कशावरून नसतील? सदर यान मंगळाच्य कक्षेत पोचतेय नाही हे समजे पर्यंत कदाचित निवडणुका होऊन गेल्या असतील. या यानामुळे भारताला खरेच किती फायदा होतोय यापेक्षा सरकारला निवडणूकात किती फायदा होईल हे गणित वरचढ ठरले का?
नसावे
या मागे येणार्या निवडणुका डोळ्यापुढे कशावरून नसतील?
नसावे असे वाटते. अशा प्रक्षेपणाची तारीख ठरवताना अनेक गोष्टींचा विचार केलेला असतो. मंगळाचे पृथ्वीपासूनचे अंतर, हवामान, लँडींग स्पॉट वगैरे.
शिवाय वेगवेगळी यंत्रे ही वेगवेगळ्या शाखांकडून येत असतात. प्रथमच अशी यंत्रे बनवताना वजन जास्त येण्याची असण्याची शक्यता (हे एक प्रकारे अपयशच) अधिक असते. काही यंत्राकरता आख्खे मिशन थांबवले जाऊ शकत नाही. थोडक्यात इतकं सगळं ऑर्केस्ट्रेट करणे इतके सोपे नाही.
आणि इतकं सगळं करून निवडणूकात अशा गोष्टीचा फायदा होईल का तोटा हे सांगणं अवघड आहे. विरोधक पैसा फार खर्च केला म्हणून बोंब मारूच शकतात. शिवाय मिशन फेल झाले तर मात्र यात्रीने सरकारवर खापर फुटायची शक्यता असतेच. (या मिशनची प्रक्षेपणापूर्वी किती पब्लिसीटी झाली होती? नासाच्या क्युरीऑसीटीची पब्लिसीटी मला आठवते, त्यामानाने मंगलायनची नसावी असे वाटते. पण भारतातल्यांनी सांगावे.)
पूजा वगैरे
श्री राधाकृष्णन यांनी पूजा केली हा विरोधाचा मुद्दा नाही. मुद्दा त्याहून महत्त्वाचा आहे. राधाकृष्णन यांची वैयक्तिक श्रद्धा काय आहे हा जरी वैयक्तिक मुद्दा असला तरी त्यांच्या वैयक्तीक श्रद्धेमुळे निर्णयांमध्ये काही फरक पडला असेल का ही शंका अवाजवी नाही. विशेषतः भारतात, त्यातही दक्षिणेत (मी स्वतः दक्षिणेत, इस्त्रोच्या आवारात, काम केले आहे, निरीक्षण वैयक्तिक अनुभवानुसार), त्यांच्या आजूबाजूला अनेक समविचारी असताना (किंवा मतभेद/विरोध फारसा नसताना) तर शंकेस जास्त वाव मिळतो.
वैयक्तिक दृष्ट्या, राधाकृष्णन सारख्याची (उच्चपदस्थ वैज्ञानिक) अशा गोष्टींवर श्रद्धा असावी(?) हे दुर्दैवी आहे. सश्रद्ध असणं एक आणि कर्मकांडांवर विश्वास असणं दुसरं. जर राधाकृष्णन यांनी श्रद्धेपोटी असे केले असेल तर ते अंधश्रद्धाळू नाहीत असे कोणी मला पटवून द्यावे.
फरक
धर्मसत्तेने छळ का केला हे उघड आहे तेही पश्चिमेकडे, त्यात चर्चा करण्यासारखे काही नाही.
पण 'आता' विज्ञान बहरत असल्यास 'काय' हरकत आहे? 'सत्ता'(कुठलिही) आहे तिचा गैरवापर होणार हे गृहितक लक्षात घेउन मगच विचार करा. मी अमुक एका गोष्टीचे समर्थन करतो असे नाही, पण कला बहरली हे समर्थनीय असल्यास विज्ञान बहरणे समर्थनीय का नसावे ह्याचे उत्तर काय असावे?
श्री राधाकृष्णन यांची
श्री राधाकृष्णन यांची जबाबदारी ही मंगळ यान मोहीम यशस्वी करण्याची होती. जी त्यांनी पार पाडली पहिजे. पण त्यांनी ते करताना समाजात 'वैज्ञानिक द्रुष्टिकोन' पसरवला पाहिजे, नास्तिकच असलं पाहिजे अशी अपेक्षा का धरावी? असाच वाद तेंडुलकर आणि सत्यसाईबाबांच्या संदर्भात झाला होता. तोही या वादाइतकाच निरर्थक होता.
वाद त्यांनी नास्तिक असलं
वाद त्यांनी नास्तिक असलं पाहिजे वगैरे नसून त्यांनी आपली श्रद्धा खाजगी ठेवली पाहिजे अश्या मतावर आहे. त्यांनी वैयक्तीक कारणांसाठी देवळात जाण्याबद्दल हरकत नाही त्यांनी देशाचे यान व्यवस्थित उडावे म्हणून देवळात जाण्याला आहे. भारतीय यान उडण्या - न उडण्याचे श्रेय/दोष भारतीय तंत्रज्ञ सोडून कोणालाही देणे अयोग्य ठरावे. त्यांच्या कृतीमुळे यात देवाला वाटेकरी केले जाते आहे. जे चुकीचे वाटते.
श्रद्धा खासगीच पण -
श्रद्धा खासगीच पण व्यक्ती सार्वजनिक आहे. तिच्या सर्व हालचालींना देशभरात प्रसिद्धी मिळवून दिलीच पाहिजे असा विडा प्रसिद्धी माध्यमांनी उचलला असल्याने हा वाद आपण घालतो आहोत. देशाचे यान व्यवस्थित उडावे म्हणून साकडे घालण्यासाठी ते देवळात गेले तरी त्यांनी ते त्यांच्या व्यक्तीगत अधिकारात (आणि मानसिक गरजेतून) केले आहे. यापुढे असे साकडे घालताना यानाची प्रतिकृती अर्पण करू नये असा आदेश जर सरकारने दिला तर त्यांना पाळावाच लागेल. पण जर इस्रो या सरकारी संस्थेऐवजी एखादी खासगी संस्था असली तर तसा आदेश सरकारही देऊ शकणार नाही. आणि त्यांनी प्रक्षेपणाअगोदर देवळात जाऊ नये असा आदेशही देऊ शकणार नाही.
(श्री. ए.के. अँटनी यांच्या पत्नीने आयेनेस विक्रांत या नव्या विमानवाहू नौकेच्या जलावतरण प्रसंगी नारळ फोडणे आणि नौकेची पूजा करणे याबाबत कोणी काही का बोलत नाही?) ;)
वाहव्वा...
श्री. ए.के. अँटनी यांच्या पत्नीने आयेनेस विक्रांत या नव्या विमानवाहू नौकेच्या जलावतरण प्रसंगी नारळ फोडणे आणि नौकेची पूजा करणे
काय? क्रॉस समोर प्रार्थना केले नाही? माय मेरीला करुना भाकली नाही?!
वाहव्वा! हे तर सांस्कृतिक एकीकरणाचे प्रतीक!!!
कुठे आहेत ते RSSवाले. भारतातील ख्रिश्चनही हिंदू-ख्रिश्चन असतात्/असायला हवेत असे काहीतरी म्हणत होते ना ते?
बहुत खूब.
.
मायला. पण बोंब मारणं आवश्यक आहे खरं.
च्यामारी "आमचे" मंत्री/आमदार "तिकडे" जाउन टोप्या घालतात, इफ्तार पार्ट्या करतात हे चूकच ना.
मग "त्यांच्या"तल्या कुणीतरी नारळ फोडणं!!! छे छे. हे सुद्धा बलपूर्वक थांबवलच पाहिजे.
देशाचे यान व्यवस्थित उडावे
देशाचे यान व्यवस्थित उडावे म्हणून साकडे घालण्यासाठी ते देवळात गेले तरी त्यांनी ते त्यांच्या व्यक्तीगत अधिकारात (आणि मानसिक गरजेतून) केले आहे
नाही. ते त्यांनी 'सार्वजनिक' मंदिरात केले आहे. स्वतःपुरतेच साकडे घालायचे होते तर घरीच घालायचे होते. त्याला हरकत नाहीच. आपल्या पदाबरोबर असणार्या नैतिक जबाबदारीला (आपल्या तंत्रज्ञांचे श्रेय त्यांना आणि फक्त त्यांनाच देणे) त्यांनी असे दुर्लक्ष करणे योग्य वाटत नाही.
बाकी अँटनी यांच्या पत्नीचे पद काय यावर दुसर्या बातमीवर मतप्रदर्शन करता यावे.
.
राधाकृष्णन हे प्रकल्प सुरू होण्याआधी बालाजीकडे गेले तर काही लॉजिक लावले जाऊ शकेल.... उदा. प्रकल्पातील गणिते करणार्या शास्त्रज्ञांच्या चुका ऑपॉप दुरुस्त करतील. किंवा गणित करताना काही ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा विचार करायला विसरले तर त्यांना टपलीत मारून आठवण करून देईल. किंवा प्रकल्पाच्या पर्ट चार्टमधील विसरलेल्या अॅक्टिव्हिटीज आपण होऊन घालेल. वगैरे.
यान तयार झाल्यावर बालाजीकडे जाऊन मोहीम यशस्वी करण्यास बालाजीस सांगणे हे बालाजींवर अन्यायकारक आहे. श्री बालाजी यांना पुढील कामे करावी लागतील.
१. वरीलप्रमाणे चंद्राचे गुरुत्वाकर्षण गणितात धरण्यास शास्त्रज्ञ विसरले असतील तर मंगळमोहीम पूर्ण होईपर्यंत चंद्र नाहीसा करावा लागेल. किंवा त्या चंद्राभोवतीचे गुरुत्वाकर्षण नष्ट करावे लागेल. [असे केल्याने आधीच अंतराळात असलेल्या इतर उपग्रहांच्या कक्षांवर परिणाम होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल]. किंवा यामुळे यान ज्या भलत्या दिशेस जाईल त्या दिशेस मंगळास नेऊन ठेवावे लागेल.
२. एखाद्या ठिकाणी स्क्रू ठरलेल्या टॉर्क इतके घट्ट झालेले नसतील आणि सैल असतील तर बालाजी ते स्वतः घट्ट करून टाकतील किंवा मोहीम पूर्ण होईपर्यंत धरून ठेवतील.
वरील कामे बालाजी करतील असे राधाकृष्णन यांना लॉजिकली वाटते का?
वरील कामे बालाजी किंवा इतर कोणी करतील असे इस्रो शास्त्रज्ञ राधाकृष्णन यांना वाटणे आणि संरक्षणमंत्री अँटनी यांना वाटणे (संदर्भ:- विसुनानांचा प्रतिसाद)यात फरक आहे.
चोक्कस.. संरक्षणमंत्र्यांना
चोक्कस.. संरक्षणमंत्र्यांना वाटणं आणि बोट बनवणार्या तंत्रज्ञाला / डिझाईनर / तपासनीस यांना वाटणे यात फरक आहे असं वाटतं...
अगदी बोटीच्या कप्तानानेही देवाला साकडे घातले तर ठीक.. पण बोटीच्या निर्मात्या शास्त्रज्ञाने / इंजिनियरने घालू नये बुवा.. डगमगायला होतं.
शंभर टक्के यशाची खात्री
पहिल्याच प्रयत्नात "शंभर टक्के यशाची खात्री" असा काही प्रकार कुठे असेल असे सांगता येत नाही. यावेळी प्रक्षेपण फारच वेगळ्या पद्धतीने झाले आहे. (४४ मिनिटे प्रक्षेपण कालावधी). शिवाय अचानक बदलू शकणारे हवामान, ट्रॅजेक्टरीमध्ये स्पेस डेबरीज, सोलर फ्लेअर्स इ. मानवी आवाक्यापलिकडच्या गोष्टी यामुळे राधाकृष्णन यांना देवाला साकडे घालावेसे वाटले (पुन्हा एकदा - अस्तिक असणे हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा भाग आहे) तर त्यात त्यांची चूक नाही. त्यांना घरातल्या देवापेक्षा तिरुपती बालाजीलाच साकडे घालावेसे वाटणे हाही त्यांच्या मानसिकतेचा (अस्तिकांच्या भाषेत स्थानमहात्म्याचा) भाग आहे. शिवाय 'इस्रो' हे स्पेस 'रीसर्च' ऑर्गनायझेशन असले तरी प्रक्षेपण म्हणजे प्युवर सायन्सेसपेक्षा टेक्नॉलॉजीकल अॅचीव्हमेंट (तांत्रिक उपलब्धी) आहे.
डॉ. के. राधाकृष्णन हे मुळात एक तंत्रज्ञ (अभियंता) आहेत. त्यांना शास्त्रज्ञ म्हणणे हा थोडा विपर्यास आहे.
(आपल्याला इथे बसून गफ्फा मारायला काय जातेय?);)
>>शिवाय अचानक बदलू शकणारे
>>शिवाय अचानक बदलू शकणारे हवामान, ट्रॅजेक्टरीमध्ये स्पेस डेबरीज, सोलर फ्लेअर्स इ. मानवी आवाक्यापलिकडच्या गोष्टी
हो. या गोष्टी बालाजी थांबवू शकेल किंवा घडू देणार नाही अशी राधाकृष्णन यांची धारणा आहे का? या गोष्टी अगोदर घडलेल्या गोष्टींचा परिणाम आणि निसर्ग नियम यांमुळे घडतील. त्या घडू नयेत म्हणून निसर्गनियम बदलावे लागतील. जे बालाजी करू शकणार नाही हे उघड आहे. स्पेसमधील डेब्रिमधला एक आयटम जो त्याच्या सध्याच्या गतीच्या आणि अवकाशातील गुरुत्वाकर्षणाच्या योगाने यानावर आदळू शकतो (ट्रॅजेक्टरी छेदल्यामुळे तसेच यान आणि तो आयटम एकाच वेळी त्याच ठिकाणी असणार आहे ते बालाजीला साकडे घातल्याने वेगळी ट्रॅजेक्टरी पकडेल असे राधाकृष्णन यांना वाटते का?
या गोष्टी बालाजी थांबवू शकेल -
या गोष्टी बालाजी थांबवू शकेल किंवा घडू देणार नाही अशी राधाकृष्णन यांची धारणा आहे का?>>>
असू शकेल किंवा नसेलही.डॉ. राधाकृष्णन 'अस्तिक' असावेत असे म्हणता येईल. अस्तिक माणूस तसे मानतो. पर्टिक्युलरली डॉ. राधाकृष्णन तसे मानतात का?- ते माहित नाही. त्यांनाच का विचारत नाही? chairman(at)isro.gov.in
करून पहावे -
हायपोथेटिकल प्रश्न असल्याने हायपोथेटिकल उत्तर - 'त्यांनी तसे करून पहावे.'
तसे झाल्याचे मला (आणि सर्वच समाजला मीडियामधून) समजले आणि त्यावर कुठल्या चर्चेत माझे मत मांडायचे असेल तर ते काय असेल? हा एक हायपोथेटिकल प्रश्न- माझे उत्तर "योग्य"(क्वालीफाईड - अटींसह).
थॉट एक्सपेरिमेंट म्हणून चर्चा करायला हरकत नाही. चर्चाप्रस्ताव मांडा. :)
उपरीनिर्दिष्ट गोष्टी बालजी
उपरीनिर्दिष्ट गोष्टी बालजी करू शकेल का ते मला माहीत नाही. राधाकृष्णन यांनी बालाजीला या गोष्टी कर अस सांगीतलं का? तेही मला माहीत नाही. पण वैयक्तिक अथवा व्यावसायिक आयुष्यातल्या ताण-तणावांना सामोरं जाण्यासाठी एखादा शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ देवळात/चर्चात गेला तर मला ते आक्षेपार्ह वाटत नाही. त्यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा बोकाळेल असही वाटत नाही.
तिकडे जणू सर्व आलबेल
तिकडे जणू सर्व आलबेल असल्याच्या थाटात इथल्यावर टीका केली जाते म्हणून.
विशेषतः नासाने गुडलक म्हणून शेंगदाणे पाठवले इस्रोला फेबुवर, तिकडे कुणाचे कसे लक्ष गेले नाही हे रोचक आहे.
शेण
मला वाटतं, nile काय किंवा थत्ते काय ह्यांचा सूर नासाचंही न चालण्याबद्दलच आहे.
वरती असलेलं दुसरी गोष्ट म्हणजे, असेल त्याने शेण खाल्लं, पण मग त्याचंही अनुकरण कशाला? तेच अधोरेखित करतं.
नासानं केलेलं चालतं हा निष्कर्ष चूक आहे.
माझ्यासमोर जे आलं, जी इस्रोवाल्याची बातमी दिली; त्यावर मी माझं मत दिलं.
नासाची दिसली असती तरी मला असच आश्चर्य वाटलं असतं; पण दु:ख कमी झालं असतं.
माझ्या देशातील व्यक्ती हे करते म्हणून जास्त वाईट वाटते. इतरांचे समर्थनीय नाहिच.(तसंही नासा काय झाट भाव देते म्हणा मनोबाच्या मताला.
अर्थात, तरीही स्वतःपुरती मतं ठरवण्यात मनोबाचंही काहिच जात नाही. तर मग चालु द्यात. )
.
बाकी मी वरती म्हटल्याप्रमाणं मला काळ सोकावण्याची भीती वाटते. तुला वाटत नाही.
आपापली मतं. आपापले भविष्याबद्दलचे आडाखे (आणि आखाडे!!)
सो व्हॉट? परम संगणकाची नाडी
सो व्हॉट? परम संगणकाची नाडी बघायला भटकर कधी गेले असते तर ठीक होतं. आणि तुझं अर्ग्युमेंटही नवीन नाहीच. अमुकतमुक शास्त्रज्ञाचाही देवाधर्मावर विश्वास आहे (म्हणून) आमचा धर्म भारी आहे इ.इ. अर्ग्युमेंटे लै जुनी आहेत. त्यामुळे काळ सोकावेल ही भीती कुठल्या परिप्रेक्ष्यात व्यक्त केली जातेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. नपेक्षा याला काहीअर्थ नाही.
Argument 101
तिकडे जणू सर्व आलबेल असल्याच्या थाटात इथल्यावर टीका केली जाते म्हणून.
१. इथल्या अंधश्रद्धेवर टिका करायला तिथे काय अंधश्रद्धा आहेत याचा संबंध काय? उद्या इस्त्रोवाले बोकड कापून आरंभ करतील. ते चुक आहे हे कळायला आम्हाला नासावाले काय कापतात हे बघायला जायची गरज नाही.
२. तिकडे सगळे आलबेल आहे असा थाट कोणी आणि कधी आणला?
३. तिकडच्यावर आम्ही टिका करत नाही हा आरोप कशाच्या आधारावर मांडलेला आहे? आम्ही तिकडे काय काय करतो हे सगळं आपोआप दिसायला श्री बॅटमॅन म्हणजे काय श्रीकृष्णाचा रथावर स्वार होऊन त्याच्या तोंडात विश्वदर्शन घेणारे पार्थ आहेत का काय?
नासाने गुडलक म्हणून शेंगदाणे पाठवले इस्रोला फेबुवर, तिकडे कुणाचे कसे लक्ष गेले नाही हे रोचक आहे.
४. फेसबुकवर काय काय चालतं ह्या सगळ्याची आम्हास कल्पना नसते. श्री बॅटम्यान यांना असते काय?
५. नासाने शेंगदाणे पाठवले हे कळण्याआधी प्रतिक्रीया दिली नाही म्हणजे लगेच आमचा नासाच्या अंधश्रद्देला पाठिंबा आहे हा निष्कर्ष श्री बॅटम्यान यांनी कसा काढला?
६. नासात ४०% भारतीय शास्त्रज्ञ आहेत याचा अन शेंगदाण्याचा काही संबंध असू शकतो असा विचार श्री बॅटम्यान यांनी केला आहे का? (आम्ही नाही केला ब्वॉ, तुमचं काही सांगता येत नाही.) ;-)
शांत अंधश्रद्धावधका, शांत!
निळोबांना इतके वर्क्ड अप झालेले पाहून मजा वाटली. किमानपक्षी तक्षकाबरोबरच इंद्रालाही स्वाहा केलेत हे उत्तम.
नाउ टु द मेन प्वाइंटः
इस्रोचा अध्यक्ष काय करतो हे पाहण्याचा हक्क आपल्याला कधी येतो? त्या पूजेचे पैसे ट्याक्सपेयरच्या खिशातून गेले असतील तर ठीक. नसतील तर हा निषेध वांझोटा आहे.
फर्दरमोर, वरती ऋषिकेशने एका निरुपद्रवी पूजेची तुलना पंतप्रधानाने कसाबला मदत करण्याशी केलेली पाहून वाईट वाटले. आपला मुद्दा पुढे दामटायचा म्हणून काहीही बिनबुडाची उदाहरणे द्यायची, दुसर्याच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ काढून स्वतःच्या बोलण्याला मात्र मुलामा द्यायचा ही तर्कदुष्ट वृत्तीच जर तर्कशुद्ध म्हणून मिरवणार असेल तर मिरवा बापडे. फक्त आधी 'आम्ही बोलतो तेवढेच खरे' असा ढिस्क्लेमर लावा म्हणजे प्रामाणिकपणा तरी राहील.
Answer
First of all, my questions have nothing to do with this. So, even though you might think this is a smart way of creating a diversion, it is not.
Now, who believed what is a whole another topic. I wouldn't mind debating on it, of course. But I can't answer all that to some brief randomly asked question. Start a detailed topic on why god exist or whatever you think pertinent and I will participate.
About scientists; I don't know whether all believed in god or what was their definition of god to be precise. I am pretty sure Einstein didn't believe, I have read enough on that. (You can prove otherwise, if you wish.)
About Collins my opinion is same as Dawkins. If he believes in talking snake (he admitted he does), then he is not very smart.
To make my point clear again about the discussion in this thread, quoting Dawkins, "people who want to believe in god (may) do so as long as they don't trespass on science's turf."
Here is Dawkins' take on your question by the way. I would go the same way if I have to be brief. http://www.youtube.com/watch?v=wF-yUYRo5AY
वोक्के
श्री राधाकृष्णन यांनी पूजा केली हा विरोधाचा मुद्दा नाही. मुद्दा त्याहून महत्त्वाचा आहे. राधाकृष्णन यांची वैयक्तिक श्रद्धा काय आहे हा जरी वैयक्तिक मुद्दा असला तरी त्यांच्या वैयक्तीक श्रद्धेमुळे निर्णयांमध्ये काही फरक पडला असेल का ही शंका अवाजवी नाही. विशेषतः भारतात, त्यातही दक्षिणेत (मी स्वतः दक्षिणेत, इस्त्रोच्या आवारात, काम केले आहे, निरीक्षण वैयक्तिक अनुभवानुसार), त्यांच्या आजूबाजूला अनेक समविचारी असताना (किंवा मतभेद/विरोध फारसा नसताना) तर शंकेस जास्त वाव मिळतो.
वैयक्तिक दृष्ट्या, राधाकृष्णन सारख्याची (उच्चपदस्थ वैज्ञानिक) अशा गोष्टींवर श्रद्धा असावी(?) हे दुर्दैवी आहे. सश्रद्ध असणं एक आणि कर्मकांडांवर विश्वास असणं दुसरं. जर राधाकृष्णन यांनी श्रद्धेपोटी असे केले असेल तर ते अंधश्रद्धाळू नाहीत असे कोणी मला पटवून द्यावे.
बाकीची टिप्पणी सोडून द्या. ती जी शंका आहे, तिला तुमच्या अनुभवाने काय खतपाणी मिळाले तेवढे सांगा. असेल, तसेही असेल, होऊही शकेल, या तर्कटांना अंत नाही. वैयक्तिक श्रद्धेचा तांत्रिक निर्णयांवर काय परिणाम झाला एवढे नक्की सांगता येत नसेल तर मग अमुक एखाद्या नटीच्या तर्जनीनासिकान्यायाबद्दलची गॉसिप आणि हे यात फरक नाही. विदा नसताना किती ओरडायचे याला मर्यादा असते. इस्रोमध्ये गेली चार वर्षे माझाही जवळचा मित्र काम करतो आहे आणि त्याच्या बोलण्यावरून तरी असे कधी दिसले नाही.
तेव्हा विद्याविना व्यक्त केलेल्या नुसत्या शंकेला किती आणि का महत्त्व द्यायचे? काही नेमके असेल तर बोला, नपेक्षा काही अर्थ नाही.
बाकी आम्ही दैववादी आहोत हे लेबल लावण्याची झाडूमार-विधाने निरीश्वरवादांधांना साजेशी आहेत हेही गौरतलब आहे.
हो ना राव! मंडळी ऐकायलाच तयार
हो ना राव! मंडळी ऐकायलाच तयार नाहीत.
जर्मनमधे एक रोचक शब्द आहे 'Berufung' असा. 'Beruf' म्हणजे आपला पोटापाण्याचा व्यवसाय. 'Berufung' म्हणजेही पोटापाण्याचा व्यवसायच, पण 'Beruf' बदलता येतो. 'Berufung' बदलता येत नाही. 'Berufung' म्हणजे जणू जन्मभरासाठी घेतलेला वसा. तनमनधन अर्पून करण्यासाठी हाती घेतलेले काम.
या दोन निराळ्या गोष्टी आहेत, याचे भान का नाही बाळगत आपण? त्या बिचार्या देवळात जाणार्या गॄहस्थासाठी नसेल त्याचे काम म्हणजे आयुष्यभराचा वसा. काम सोडून उरलेल्या वेळात ठेवत असेल तो विज्ञान खुंटीला टांगून. आधीच बिचार्याच्या आयुष्यात हे असे दुहेरी - विसंगत वागणे त्याला भाग पडते आहे. त्याची कीव कराल की त्यावरून एवढा गहजब कराल?! बरे, तो काही आपल्या देशाच्या वि़ज्ञाननिष्ठतेचा सरकारमान्य आणि सरकारने नेमलेला चेहरा मानला जावा, असा मॅस्कट किंवा ब्रॅण्ड अॅम्बेसिडरही नाही. मग त्याला त्याची खाजगी आयुष्य असू नये की काय?
सचिनने सत्यसाईबाबांकडे जाऊ नये वा भूखंड मागू नये असे मलाही फार वाटले होते. पण तो क्रिकेटमध्ये थोर आहे, त्याचा अनेकांवर प्रभाव आहे, त्याच्याकडे अनेक जण आदर्श म्हणून पाहतात; म्हणून आयुष्याच्या बाकी अंगांमध्ये त्याला त्याची वैयक्तिक मते असण्याचा आणि ती अमलात आणण्याचा हक्क नाकारणारे आपण कोण? त्याचे बघून उद्या कोणी सत्यसाईबाबांच्या भजनी लागले, तर क्रिकेट सोडून बाकी ठिकाणी त्याचे आदर्श घेऊ पाहणार्या त्या आचरट प्राण्याचीच ती चूक. ती चूक सचिनची कशी काय?
+१
हा खरा उदारमतवाद.
नायतर सरळ-सरळ विज्ञान-संबंधीत रिसर्च संस्थेने पाटी लावावी - "इथे काम करणार्यांनी देवळात वगैरे जाऊ नये, कुठल्याही प्रकारची श्रद्धा इथे खपवून घेतली जाणार नाही." म्हणजे सगळ्यांची सोय होइल.
जोक्स अपार्ट - बहुतांश बुद्धिवादी जनतेला इन्टेग्रिटी असलेली मंडळी भावतात, इन्टेग्रिटी नसलेली व्यक्ती कामाला न्याय देण्यास अपात्र असण्याबद्दल एक भुमिका आहे जी बर्याच अंशी बरोबर आहे, पण अनुभव समृद्ध झाल्यावर अनेक(बर्याचवेळा) परस्परविरोधी(वाटणार्या) भुमिका एकत्र नांदु शकतात अशी भुमिका तयार होत जाते (पुढे ती भुमिकाही बदलत असावी पण सर्वसमावेशक होत जाणार हि हमी वाटते). हा प्रवास करणे प्रत्येकाला गरजेचे आहे असं आपलं माझं मत आहे.
वेगळ्या
>>या दोन निराळ्या गोष्टी आहेत, याचे भान का नाही बाळगत आपण?
दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. निदान यांच्याबाबतीत (इन्क्लूडिंग नासा) तरी नाहीत. सचिन तेंडुलकर साइबाबांकडे गेला तर ते एकवेळ माफीयोग्य* आहे.
फेनमन या शास्त्रज्ञाने सांगितलेली आठवण इथे आठवली. भौतिकशास्त्र शिकणार्या विध्यार्थ्यांचा त्याला आलेला अनुभव. भौतिकशास्त्राचे नियम हे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आसपासच्या सृष्टीचे नियम नव्हते. तर ती केवळ परीक्षेत येणार्या प्रश्नांची उत्तरे होती. तसे इस्रोचे अध्यक्ष समजत असतील तर** आम्ही त्यांच्यावर टीका करूच.
*मी माफीयोग्य नाही असे म्हणतो याला काही किंमत नाही हे ठाउक आहे.
** राधाकृष्णन यांनी तिरुपतीला मिशन यशस्वी व्हावे म्हणून साकडे घातले अशा बातमीच्या बेसिसवर (आणि त्यावरून इतरही वेळी प्रकल्पाबाबत निर्णय घेताना अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या कामाच्या आड येत असावी या कयासाच्या बेसिसवर) ही टीका आहे. त्यांनी तसे केले नसेल*** तर हा सगळा विषयच रद्दबातल ठरतो.
*** बॅटमॅन यांनी अशा स्वरूपाचे मत वरच्या एका प्रतिसादात मांडले आहे म्हणून हा डिसक्लेमर.
दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. का
दोन वेगळ्या गोष्टी नाहीत.
का बुवा? असे पहा, महर्षी कर्वे यांनी बायकांना शिकवण्याचे काम आयुष्यभर केले. त्यांनी स्वत:हून निवडलेली ती चाकोरीबाहेरची वाट होती. अशा वेळी संस्थेबद्दल लोकमत वाईट होऊ नये म्हणून त्यांनी फार बंधने पाळली. ही बंधने पाळणे त्यांनी स्वत:हून निवडले. पण इस्रोच्या अध्यक्षांचे तसेच असावे, हा काय जुलूम? हे गृहस्थ पगारी नोकर आहेत. त्यांच्या वैयक्तिक निष्ठा आणि कामातल्या निष्ठा निराळ्या असतील, तर तो काय गुन्हा झाला काय?
टीका करावी म्हणा खुशाल, आपल्याला काये नि त्या इस्रोच्या अध्यक्षांना काये! पण हे सरळ सरळ व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात आहे.
त्यांच्या वैयक्तिक निष्ठा आणि
त्यांच्या वैयक्तिक निष्ठा आणि कामातल्या निष्ठा निराळ्या असतील, तर तो काय गुन्हा झाला काय?
गुन्हाबिन्हा नाही हो कोणी म्हटलेलं.. अटकवॉरंटही नाही काढलेलं.. कायद्याला झळंबणारा मुद्दाच नव्हे.
टीका करावी म्हणा खुशाल, आपल्याला काये नि त्या इस्रोच्या अध्यक्षांना काये! पण हे सरळ सरळ व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य.. हम्म.. अगदी अगदी.. इथे कोणी त्यांना देवळातून खेचायला निघालेलं नाही आणि ते शक्यही नाही. थोडंसं खटकणं, "असं असायला नको" असं वाटणं वगैरे काही भावना असतात ना? तशातलीच भावना त्या मूळ मुद्द्यात आहे. व्यक्तिस्वातंत्र्य या एका शब्दाने जगातल्या सुमारे सर्वच चर्चा संपुष्टात आणता येतात की नायतर..!!
राधाकृष्णन यांनी तिरुपतीला
राधाकृष्णन यांनी तिरुपतीला मिशन यशस्वी व्हावे म्हणून साकडे घातले अशा बातमीच्या बेसिसवर (आणि त्यावरून इतरही वेळी प्रकल्पाबाबत निर्णय घेताना अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या कामाच्या आड येत असावी या कयासाच्या बेसिसवर) ही टीका आहे. त्यांनी तसे केले नसेल तर हा सगळा विषयच रद्दबातल ठरतो.
नेमके हो थत्तेचाचा! तथाकथित तत्त्वांसाठी इतका आटापिटा करणार्यांना हे साधे सार समजले नसेल असे थोडेच आहे? पण तत्त्वाभिनिविष्ट झाल्यावर सुधरत नाही म्हणतात तेही खरेच.
माझे सारांशरूपाने म्हण्णे: ती श्रद्धा तांत्रिक कामाच्या आड आल्याचा नेमका पुरावा द्या, आत्ताच्या आत्ता निषेध ब्रिगेडला जॉइन होतो, हाकानाका.
पण जोपर्यंत पुरावा नाही तोवर अर्ग्युमेंट इज़ व्यर्थ बकवा. एरवी विदा विदा करणारे विद्रट इथे गुळणी ठेवून का गप्प राहतात? मूळ बाजूच लंगडी असली की असेच होणार. 'इस्लाम खतरे मे है' सारखीच 'विज्ञानवाद खतरे मे है' अशी ही विनोदी घोषणा वाटते. इतके बिनबुडाचे युक्तिवाद करूनही आणि स्वतःला तर्कशुद्ध वैग्रे म्हणवणारे लोक पाहिले की अगोदर शरम वाटायची, आता सवय झालेली आहे.
निर्णयांवर परिणाम होतो..
ऑफिशियल पत्रक काढून इस्रो कधीच असं काही जाहीर करणार नाही. तारीख बदलणं किंवा आहे त्या तारखेला मंगल करणं यात मोठा फरक मानला किंवा व्यक्तिगत्-व्यक्तिगत्-व्यक्तिगत अशा अनेक व्यक्तींच्या व्यक्तिगत मनोधारणेतून कसलाच सामूहिक अर्थ काढायचा नाही असं ठरवलं तर विषय संपतो.
तरीही लाँच डेटसुद्धा अशुभ दिवशी ठेवली जात नाही याकडे स्पष्ट निर्देश करणारी ही बातमीची लिंक देऊन सध्या गप्प बसण्याचा प्रयत्न करतो:
http://timesofindia.indiatimes.com/home/science/Superstitions-and-belie…
While Indian space scientists said that the agency as a whole does not follow any superstitious acts, they are not able to explain the absence of the rocket named Polar Satellite Launch Vehicle-13 (PSLV-C13).After sending up the rocket PSLV-C12, ISRO jumped one number and called its next rocket, which launched Oceansat-2 and six European nano satellites, as PSVL-C14.
Queried about PSLV-C13, a high-ranking ISRO official said: "There is no such rocket designated with that number."
He declined to say if ISRO considered 13 an unlucky number.
However, India's ambitious Rs.450 crore Mars Orbiter Mission in way was a tradition breaker as it flew on a Tuesday.
"This was the first time in ISRO's history that a rocket was launched on a Tuesday. Tuesday is generally considered as inauspicious day," an ISRO official said.
But for a senior official involved in the Mars mission, Tuesday was a lucky day. "For me Tuesday is a lucky day," he said, asking not to be identified by name.
धन्यवाद
प्रथमच विदा दिल्याबद्दल धन्यवाद, नैतर वर्तुळाकार अर्ग्युमेंटमध्ये अडकवण्याच्या नेहमीच्या प्रॉपेन्सिटीचे अजून एक उदाहरण वाटले असते. जे वर दिलेय ते हास्यास्पद आणि चुकीचे आहे खास. रॉकेटला १३ नाव देणं न देणं अनुल्लेखनीय आहे पण प्रक्षेपण मंगळवारी न करणं वैग्रे हहपुवा आहे.
शिवाय
While Indian space scientists pray to Lord Balaji at Tirupati in Andhra Pradesh prior to every space mission for its success, their American counterparts eat peanuts.
"More interesting is the tradition of Russian cosmonauts who urinate on the right back wheel of their transfer bus on their way to the launch centre," a space scientist at the Indian Space Research Organisation (ISRO) said.
हेही रोचक आहे.
आधी विदा शोधलाच नव्हता कारण
आधी विदा शोधलाच नव्हता कारण व्यक्तिगत विचारपद्धतीतूनच संस्था काम करते हे अनेक प्रकारच्या अंतर्बाह्य अनुभवांतून दृढपणे माहीत होतं. केवळ तू म्हणतोस तसं सर्कल ब्रेक करायलाच ती लिंक शोधून दिली. अधिकृतपणे सगळं काही आत काय चालतं ते स्पष्ट मिळणार नाही. विचारधारा / मानसिकता / धारणा या व्यक्तिगतच असतात. इस्रो म्हणजे तरी काय? त्यात काम करणारी व्यक्ती+ व्यक्ती + व्यक्ती = इस्रो आहे.
अध्यक्षाचा प्रभाव सर्वाधिक.. इतरांचाही असतोच. सर्वकाही घरी, व्यक्तिगत पातळीवर राहात नसतं.. ती एक विचारपद्धतीच असते. म्हणून त्या त्या व्यवसायाला न मॅच होणार्या विचारपद्धती त्या व्यवसायातल्या लोकांमधे पाहून काहीसा खेद होतो इतकंच. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं शोधत होतो. व्यक्तिगत आणि ऑफिशियल अशा दोन वेगवेगळ्या इन्शुलेटेड / कंपार्ट्मेंटाईझ्ड / स्प्लिट व्यक्ती नसतात..
आणि मुख्य म्हणजे मी शुद्ध विज्ञान"वादी" मुळीच नसूनही मी हे म्हणत होतो.. यातच काय ते आलं.
समांतर उदाहरण
ती एक विचारपद्धतीच असते. म्हणून त्या त्या व्यवसायाला न मॅच होणार्या विचारपद्धती त्या व्यवसायातल्या लोकांमधे पाहून काहीसा खेद होतो इतकंच. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं शोधत होतो.
मध्यंतरी टॉड एकीन नावाच्या अमेरीकन काँग्रेसमनने "लेजिटीमेट रेप" बद्दल कमेंट केली (गुगल करा, धमाल येईल), त्यानंतर हाऊस ऑफ काँग्रेसच्या सायन्स, स्पेस आणि टेक्नॉलॉजी कमिटीवर असलेल्या सदस्यांची मतं उघडकीस आली. इव्होल्यूशनवर विश्वास नसणारे; कोणत्याही स्टेजला, अगदी कन्सेप्शन पासून, अबॉर्शनला विरोध असणारे; ग्लोबल वॉर्निंग फ्रॉड आहे असं मानणारे वगैरे सदस्य या समितीवर पाहून लोकांनी बोंबाबोंब केली. ज्यांचा विज्ञानावर फंडामेंटलीच विश्वास नाही ते कमिटीवर कसे काय, हा प्रश्न वावगा कोणालाच वाटला नाही. अधिक इथे; http://www.wired.com/wiredscience/2012/08/house-committee-science/
एकंदरीत अमेरिकेत "पल्बिक सर्वंट लोकांच्या" वैयक्तिक श्रद्धेविषयी बराच खल केला जातो. त्यासमोर वैयक्तिक श्रद्धेचा काय संबंध? मतं पाहून गंमत वाटली. असो.
हास्यास्पद
राधाकृष्णन यांची बाजू घेताना, "एकंदरीत कृत्यावरून ते अंधश्रद्धाळू असू शकतात" या मवाळ मतावरती जुलुम, तर्कट, ओरडणे, गहजब इत्यादी विशेषणे मिळालेली पाहून हसू आले.
राधाकृष्णन अंधश्रद्धाळू असू शकतात याला त्यांनी केलेली पूजा/शांती हाच एक पुरावा आहे हे "विदा द्या" ओरडताना सोयीस्कररीत्या दुर्लक्षिलेले दिसते. वैयक्तिक श्रद्धेचा कामावर परिणाम होऊ शकतो हेच मान्य करायची तयारी नसलेल्यांना काय म्हणावे? असो, झोपलेल्याला जागे करता येते.
वैयक्तिक श्रद्धेचा कामावर
वैयक्तिक श्रद्धेचा कामावर परिणाम होऊ शकतो
नाईल, तुझ्या या म्हणण्याशी अगदी सहमत.. हेच म्हणायचं आहे.
शाळा कादंबरीतलं मांजरेकर सर हे पात्र पुस्तकात असलं तरी अत्यंत वास्तवातलं आहे. ते पुरोगामी आणि बंडखोर विचारांचे आहेत आणि म्हणून ते फक्त नेमून दिलेला पुस्तकातला भूगोल शिकवून थांबत नाहीत.. ते संधी घेऊन वर्गासमोर "आणीबाणी"वर आपलं भाष्य करतातच.. बंड करणार्या कथानायकाला दिलासा अन पाठिंबा देतातच. ते फक्त सिलॅबसपर्यंत राहू शकत नाहीत.
संस्था किंवा देश चालवणार्या व्यक्तीच्या धारणेनुसार कामावर परिणाम होतोच.
आणखीही बरंच काही म्हणता येईल. मुळात हा धागा , धागा नव्हताच. एका बातमीवरची "आँ? सिरियसली?" इतकी प्रतिक्रिया होती. पण त्यानिमित्ताने हे किती सहजपणे घेतलं जातंय हे दिसलं आणि माझं मत आता वेगळ्या शब्दात म्हणावंसं वाटतं की:
अंतराळविषयक संशोधन आणि याननिर्मिती / प्रक्षेपण करणार्या अतिउच्च विज्ञानाधारित प्रकल्पाचे अध्यक्ष बनण्याच्या पातळीपर्यंतचं या देशात / परदेशात मिळालेलं तांत्रिक शिक्षण मनुष्याला विज्ञाननिष्ठ बनवू शकलं नाही..याचं वाईट वाटतं, कारण ज्या कामासाठी त्या विद्यार्थ्याला तयार केलं त्यासाठी आवश्यक कोअर मेंटॅलिटी तयार झालीच नाही.. इंजिनियरींगच्या कामात परफेक्ट .. पण बिलीफ सिस्टीमचं काय?
अरे.. पौरोहित्य किंवा धार्मिक शिक्षण देणार्या विद्यापीठातून बाहेर पडलेला पंडित कीर्तन प्रवचन पूजा करताना तो पूर्ण धार्मिक, आस्तिक झालेला असला तरच ते त्या विद्यापीठाचं यश.. नाहीतर पूजा टाकून घरी आल्यावर मनातून हा विज्ञाननिष्ठ राहिला असेल तर तेही शिक्षण फेलच म्हणेन मी.
अरे.. पौरोहित्य किंवा धार्मिक
अरे.. पौरोहित्य किंवा धार्मिक शिक्षण देणार्या विद्यापीठातून बाहेर पडलेला पंडित कीर्तन प्रवचन पूजा करताना तो पूर्ण धार्मिक, आस्तिक झालेला असला तरच ते त्या विद्यापीठाचं यश.. नाहीतर पूजा टाकून घरी आल्यावर मनातून हा विज्ञाननिष्ठ राहिला असेल तर तेही शिक्षण फेलच म्हणेन मी.
तुमच्या हिशेबाने मग तंत्रशिक्षण हीदेखील एक आयडिऑलॉजीच आहे. आणि याइतके एकांगी विचार पहिल्यांदाच पाहतोय. पॉइंट नोटेड. उदारमतवादाच्या पुरस्कर्त्यांनी इतके एकांगी विचार ठासून मांडणे हे रोचक आहे.
तुमच्या हिशेबाने मग
तुमच्या हिशेबाने मग तंत्रशिक्षण हीदेखील एक आयडिऑलॉजीच आहे. आणि याइतके एकांगी विचार पहिल्यांदाच पाहतोय. पॉइंट नोटेड. उदारमतवादाच्या पुरस्कर्त्यांनी इतके एकांगी विचार ठासून मांडणे हे रोचक आहे.
कमालच आहे.. उदारमतवाद म्हणजे विज्ञानशिक्षणाला पुढे करुन पौरोहित्याला मागे दाबणे?
उलट स्पेक्ट्रमच्या दोन टोकांवरची दोन शिक्षणे घेऊन त्यांच्या रिस्पेक्टिव्ह यशस्वितांचा माझा निकष सांगितला तर ते एकांगी?
जे शिक्षण मिळालं ते (धार्मिक असो, वैज्ञानिक असो, ज्योतिष असो वा अन्य काही) त्या त्या अंतिम ध्येयासाठी आवश्यक धारणा मनात ठसवणारं नसेल तर ते कुठेतरी कमी पडलं.. हा विचार एकांगी?
आणि विज्ञान हीदेखील एक आयडियॉलॉजी आहे हे मान्य करणं एकांगी? हो. सर्वच गोष्टी आपापल्या जागी एक आयडियॉलॉजीच आहेत हे स्वीकारणं म्हणजे उदार नव्हे?
हे एकांगी विचार मग सर्वांगीण काय म्हणायचं?
बॅटमन थोडा नीट विचार कर.. खूप रिअॅक्टिव्ह होतंय..!!
गुड पाँईंट
अरे.. पौरोहित्य किंवा धार्मिक शिक्षण देणार्या विद्यापीठातून बाहेर पडलेला पंडित कीर्तन प्रवचन पूजा करताना तो पूर्ण धार्मिक, आस्तिक झालेला असला तरच ते त्या विद्यापीठाचं यश.. नाहीतर पूजा टाकून घरी आल्यावर मनातून हा विज्ञाननिष्ठ राहिला असेल तर तेही शिक्षण फेलच म्हणेन मी.
नास्तिक, कर्मकांडावरच विश्वास नसलेल्या पुरोहिताकडून कधी कोणी धार्मिक पूजा करवून घेईल असे वाटत नाही.
नास्तिक, कर्मकांडावरच विश्वास
नास्तिक, कर्मकांडावरच विश्वास नसलेल्या पुरोहिताकडून कधी कोणी धार्मिक पूजा करवून घेईल असे वाटत नाही.
पहिल्या छुट म्हंजे तो नास्तिक वा कर्मकांडावर विश्वास नसलेला आहे हे केव्हा कळणार. विचारांची देवणा घेवाण झाल्यावर. पुजेला गुरुजी बोलावून ती उरकून टाकणे अशा प्रकारात गुरुजी व यजमान या दोघांनाही असल्या गोष्टीत चर्चा करण्यात वेळ नसतो. व्यक्तिगत जीवनात अश्रद्ध असणारा अभिनेता हा नाटक सिनेमात श्रद्धाळू भुमिका करु शकतो. सश्रद्ध लोक दगडाची देव म्हणुन पूजा करु शकतात तर अश्रद्ध गुरुजीकडून का नाही पुजा करुन घेणार? अधिक माहिती साठी अतृप्त आत्मा यांना विचारा. त्यांचे व्यक्तिगत जीवन वेगळे व पौराहित्य हा पेशा वेगळा आहे.
काल्पनिक
मुद्दा असा आहे, वैयक्तिक श्रद्धेचा कामात फरक पडायचे कारण काय? या प्रश्नाला उत्तर म्हणून ती एक काल्पनिक केस आहे.
समजा एक पुरोहित आहे, तो जाहिर करतो की मी नास्तिक आहे, माझा देवादिकांवर, धर्मावर, कर्मकांडांवर इ. विश्वासच नाही. पण मी पुरोहितात 'उच्चविद्यासंपन्न' आहे. तर लोक त्याकडे पुजेला जातील का? माझे उत्तर आहे त्याचा धंदा बसेल.
अधिक माहिती साठी अतृप्त आत्मा यांना विचारा. त्यांचे व्यक्तिगत जीवन वेगळे व पौराहित्य हा पेशा वेगळा आहे.
ओके.
(अवांतर)
नास्तिक, कर्मकांडावरच विश्वास नसलेल्या पुरोहिताकडून कधी कोणी धार्मिक पूजा करवून घेईल असे वाटत नाही.
का बुवा? नास्तिक, कर्मकांडावरच विश्वास नसलेल्या पुरोहिताचा उपयोग समारंभपूर्वक जाळण्याकरिता पत्रिका (फुकटात!१) बनवून घेण्यापुरता(च फक्त) मर्यादित असावा काय?
========================================================================================================================================
१ (चूभूद्याघ्या.)
संभ्रम..
काय बोलावं काही कळत नाहीये.
मॉडर्न आणि प्युअर सायन्सच्या आधारावर सर्वकाही करणार्या संस्थेच्या अध्यक्षांनी व्यक्तिगत पातळीवर का होईना पण मानवी कक्षेबाहेरच्या शक्तींना यात आणावं यामधे नेमका अर्थ काय काढायचा?
आपल्या मानवी प्रयत्नांच्या पलीकडेही काही शक्ती (?!) आहेत याची जाणीव यातून दर्शवली असा सकारात्मक संदेश घ्यायचा की, स्वतःच्या पूर्ण मानवी कक्षेत असलेल्या कर्तबगारीवर काहीसा अविश्वास दाखवणारी ही कृती समजायची. म्हणजे असं आहे की इतर कोणी(मुख्यमंत्री किंवा खेळाडू वगैरे) सत्यसाईंच्या पाया पडले किंवा पूजा घातली किंवा काळुबाईच्या जत्रेत बळी दिला तरी त्याचा धक्का बसत नाही.. पण इस्रो चीफ हे एक व्यक्ती नसून एक प्रतिनिधी आहेत असं वाटून काहीतरी धक्का बसला हे खरं.
उद्या या मिशन मार्सतर्फे मनुष्य मंगळावर पाठवण्याची वेळ झाली की त्या जाणार्या व्यक्तीला (विज्ञाननिष्ठ असेल असं मानतो) हे बालाजीसाकडं पाहून कापरंच भरेल आणि तो जाणं रहित करेल की काय?