वेडा गणू

गजाअण्णांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून ज्योतिषी महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर गजाभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा गणू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का?

मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्या कडे चांगले दहा हजार खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही ज्योतिष लोक, म्हणजे पृथ्वीवरचे सर्वज्ञच हो.

"ते मरू द्या,तुमचे कीर्तन. मला आमच्या गणूची झकास पैकी कुंडली काढून द्या. त्याची आधीची गहाळ झालीय कस होणार पोराचे देव जाणो'.

गणूच्या हातात कुंडली पडताच तो खवळला वडिलांशी भांडू लागला "हे काय केलेत बाबा, पुन्हा पैसे वाया घालवलेत. तो वडिलांशी भांडू लागला तेवढ्यात त्याचा मावस भाऊ श्याम तेथे आला श्यामलाही खबर लागलीच होती कि गणू हल्ली वेड्यासारखे वागतोय.

श्यामला घेऊन तडक गणू ज्योतिषी महाराजांकडे गेला तो ज्योतिषी महाराजांना म्हणाला. "ओ काका,माझ्या कुंडली काढण्याचे जे पैसे काढलेत ते द्या आणि हि कुंडली घ्या परत, माझा विश्वास नाही यावर".श्याम त्याला गप्प करत होता, "अरे गणू, हे काय करतोस". ज्योतिषी महाराज गोड हसले श्यामला म्हणाले, "तुम्ही नका बोलू त्याच्याशी,मी बोलतो ह, तर बोल गणू,तुला मी काढलेल्या कुंडलीत काय खोटे वाटले".

"अहो काका,त्यात खर वाटण्यासारखे काय आहे"."मग इतके लोक जे माझ्याकडून कुंडल्या काढून घेतात ते काय मूर्ख आहेत?". "मला दुसर्यांबद्दल काही सांगू नका, माझा विश्वास नाही, मला माझे पैसे परत द्या. "अरे पण का विश्वास नाही?

"हे पहा काका, तुम्ही हिला नवग्रहांची कुंडली म्हणता सूर्य, चंद्र, मंगल, बुध, गुरु, शुक्र,शनी, राहू, केतू हे ते नवग्रह.परंतु यातला सूर्य हा तर तारा आहे,आम्हाला दुसरीला शिकवले होते शाळेत.चंद्र हा हि ग्रह नसून पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो.राहू आणि केतू हे तर अस्तित्वातच नाहीत, पृथ्वीचा व्यास काढण्यासाठी त्यांचा वापर केला होता. म्हणजे तुमच्या नवू ग्रहांपैकी चार ग्रह तर ग्रहच नाहीत. तरी म्हणे नवग्रह.

ज्योतिषी महाराज हसले म्हणाले, "आधी तू तुझे प्रश्न पूर्ण कर मग मी उत्तर देतो हो बाळ". गणू म्हणाला, " काका, मला सांगा सर्वात खतरनाक ग्रह कोणता? "शनी नि मंगळ" ज्योतिषी महाराज आवेगाने उद्गारले.

"काका, मला एक सांगा उद्या मंगळावर पाणी नसले तुमचे काय अडणार आहे का? "नाही. काका म्हणाले."उद्या शनिवर हवा नसली तुमचे काय अडणार आहे का? 'नाही' काका म्हणाले."पण जर पृथ्वीवर हवा,पाणी नसले तर?" "अरे गणू, कायतरीच काय बोलतोस वेड्यासारखा, पृथ्वीवर हवा पाणी नसले तर आपण जगणार कसे."

तेच तर मी म्हणतोय न काका माणसासाठी सर्वात चांगला ग्रह आहे तो पृथ्वी. आणि सर्वात खतरनाक ग्रह आहे तो हि पृथ्वी. तो ग्रहच कुंडलीत नसतो".

मघापासून गणूचे हे बोलणे ऐकत दारापाशी त्याचे वडील गजाअण्णा उभे होते. ते तडक पुढे झाले त्यांनी गणूची कॉल्लर खेचून त्याच्या मुस्कटात भडकावली. "गण्या, नालायका,ज्योतिषी महाराजांना प्रश्न विचारतोस? महाराजांशी उलटे बोलायचे नसते हे हि तुला माहित नाही. ज्योतिषी महाराज याला माफ करा, हा वेडा झालाय वेडा."

"अरे गण्या तू यांना प्रश्न विचारतोस यांचा अभ्यास आहे तुझे काय?.ज्या विषयातल आपल्याला काही माहित नाही त्यात नाक खुपसू नये कळल का.माफ करा ज्योतिषी महाराज हा वेडा झालाय वेडा".
"अहो, पण बाबा मला माहित आहे मी या विषयातला तज्ञ नाही पण माझ्या प्रश्नांची उत्तरे कोणी देयील का बाबा? गप बस. आणि घराकडे चल. आणि त्याला खेचत ते बाहेर घेऊन गेले.

रस्त्याने परत जाताना शाम विचार करत होता नक्की गणूच वेडा आहे ना? आणि त्यांना जाताना बघून ज्योतिषी महाराजांनीही निश्वास सोडला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

उपरोध जमलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या केसची मांडणी मुळातच चुकली आहे. एक तर घेतलेली वस्तू परत करतानी मूळ ग्राहक किंवा त्याचा प्रतिनिधी यालाच ती केली जाऊ शकते. इथे गणू हा त्याच्या वडिलांचा अधिकृत प्रतिनिधी ठरू शकत नाही कारण वडिलांनी त्याला पाठवलेले नाही किंवा या व्यवहाराला वडिलांची संमतीही नाही. (गणू ती पत्रिका जबरदस्तीने वडिलांकडून घेऊन आलेला आहे.) दुसरे म्हणजे वस्तू विकताना जर तिच्या गुणधर्माविषयी जर काही दावा विक्रेत्याकडून केला गेला असेल आणि तो खोटा ठरला असेल तरच परतफेड किंवा नुकसानभरपाई मागता येईल. इथे कसलाही दावा केला गेलेला दिसत नाही. म्हणून पत्रिका देऊन पैसे परत मागण्याचे गणूचे कृत्य योग्य वाटत नाही. आधीची दहा हजार रुपयांच्या शांतीची केस वेगळी आहे.
मात्र/अर्थात 'ज्योतिषावर विश्वास ठेवू नये' हा देय संदेश यातून पोचतो, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0