शब्दार्थ आणि शब्द पर्याय

अनेकदा इंग्रजी शब्दांचे अर्थ चटकन सापडत नाहीत. काहीवेळा अर्थ म्हणजे वाक्यच दिलेले असते. जसे की clone या शब्दाचे भाषांतर 'एकाच वंशाच्या आणि ज्या जन्मदात्या पेशीपासून संभोगरहित पुनरूत्पत्तीने निर्माण होऊन तिच्याशी वांशिक एकरूपता दाखवतात अशा पेशी' असे होते. त्याऐवजी चपखल अर्थ हवा असतो. खांडबहाले वरही सगळे शब्द असतातच असे नाही. काहीवेळा आपल्याला हव्या असलेल्या अर्थाचा शब्द सापडत नाही अशा शब्दविषयक मदतीसाठी व चर्चांसाठी हे पान बनवत आहे. या निमित्ताने एक शब्दसाठाही एकाच पानावर तयार होईल ही अपेक्षा आहेच!

मराठी मध्ये खालील शब्दांसाठी चपखल शब्द हवे आहेत
sensors
programmable
anthropomorphism
percussion

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

सेन्सर - संवेदक
अँथ्रोपोमॉर्फिझम - मानवौपम्य, मानवरूपक
पर्कशन - (संदर्भ काय?) संगीतात चर्मवाद्य किंवा ताल किंवा आघात ; वैद्यकात ठोठावून निदान, दस्तकनिदान. सामान्यपणे आघात

क्लोन : जुळी प्रत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरोखर चपखल! धन्यवाद.
फोकस साठी काही?
(प्रतिमा स्वच्छ येईल अशी भिंगाची रचना करणे असे गुगल ने भाषांतर केले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

भिंगाचे फोकस = केंद्रिकरण, किरण केंद्रित करणे/ किरण एकवटणे
फोकल स्पॉट् = केंद्रबिंदू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

programmable = 'प्रणालीसुलभ' चालतो का पाहा. ('प्रणाली' नावाच्या समस्त महिलांची क्षमा मागून Smile )
'प्रणालीकरण करण्याजोगे' असेही म्हणू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

programmable: याला चपखल एकच असा मराठी शब्द नसावा. "प्रोग्रॅम करता येण्याजोगा" किंवा "प्रणाली लिहिता येण्याजोगा" असा शब्द समुच्चय वापरणेच अधिक योग्य ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कारण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुळात प्रोग्रामलाच अचुक प्रतिशब्द नाहिये. प्रणाली म्हणजे प्रोग्रामपेक्षा/बरोबरच अ‍ॅप्लिकेशन(ही) वाटते.
दुसरे प्रोग्रामिंग ही कंसेप्टच भारतीय नाही. फार उस्तवार करण्यापेक्षा प्रोग्रामला प्रोग्राम म्हणावे या मताचा मी आहे. प्रत्येक शब्दाला 'प्रति'शब्द शोधण्यापेक्षा काही नव्या शब्दांचा 'नवा मराठी शब्द' म्हणून स्वीकार करावा.

पुढेमागे प्रोग्राम या शब्दाच्या सर्व छटांना/रुपांना सामावणारा एक किंवा प्रत्येक छटेला/रुपाला किमान एक शब्द मिळाला की मग प्रोग्रामेबल वगैरेचा विचार करता येईल. तोवर शब्दसमुच्चय योग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नवा मराठी शब्द म्हणून स्वीकार करावा हे मलाही मान्य आहे. पण भाषांतराचे काहीएक प्रयत्न व्हावेत असंही वाटतं. मग ते भाषांतर आणि मूळ शब्द यांतलं जे सोईचं असेल ते(च) लोक स्वीकारतील आणि रुळवतील(च). असं केलं नसतं, तर संपादक, वार्ताहर, दिनांक वगैरे नसते मिळाले.

शिवाय शब्दसमुच्चय अर्थाचं स्पष्टीकरण करायला योग्य असला, तरी वापरासाठी तो फार गैरसोईचा जातो असा अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बहुतेक आपली एकूणात सहमतीच आहे Smile
प्रत्येकवेळी शब्दसमुच्चय असावाच असे नाही. जर बर्‍यापैकी योग्य शब्द असेल तर छानच, नवा शब्द तयार होत असेल तरीही उत्तमच (जसे विदा - या शब्दाबद्दल तक्रार विद्याने, विद्याला वगैरे रुपे ही विद्या या नावाच्या मुलीशी साधर्म्य राखतात, पण त्याला इलाज नाही ;))

पण प्रत्येकवेळी हा एकास एक प्रतिशब्दाचा अट्टाहास नको इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Transgender - लिंगांतरित / लिंगांतरणाकांक्षी
Homosexual - समलैंगिक
Bisexual - उभयलैंगिक
Heterosexual - भिन्नलैंगिक / विरुद्धलैंगिक
Lesbian - स्त्रीसमलैंगिक
Gay - पुरुषसमलैंगिक

ही भाषांतरं अचूक / अर्थवाही / सोपी (या मुद्द्यांना याच क्रमाने प्राधान्य) आहेत का? नसतील, तर काय पर्याय सुचवता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Transgender बद्दल साशंक आहे. अर्थाशी अधिक जवळचा असा 'तरललिंगी' हा शब्द सुचतो.
Heterosexual ला विरुद्धलिंगी अधिक योग्य वाटतो.
बाकी ठीक!

याव्यतिरिक्त
Asexual ला निरिच्छलिंगी म्हणावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा! तिन्ही खूपच आवडले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन