ही बातमी समजली का? - १३

भाग | | | | | | | | | १० | ११ | १२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
==============

http://zeenews.india.com/news/nation/shashi-tharoor-having-an-affair-wit...

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महाप्रतापी (!)केन्द्रिय मनुश्य्बळ विकास मन्त्री शशी थरूर यान्चे मेहर तरार नामक एका पाकिस्तानी आय एस आय एजन्ट शी विवाह-बाह्य सम्बन्ध असल्याचा अतिशय गम्भीर आरोप थरूर यान्ची पत्नी सुनन्दा पुश्कर ह्यानी केला आहे. पुरावे म्हनून ट्विटर वरून झालेले सम्भाशन प्रसिद्ध केलेले आहे.

हे अतिशय गम्भीर आहे. इतका मोठा राश्ट्रद्रोह एका खान्ग्रेसी मन्त्र्याने करावा हे खान्ग्रेस चा अनागोन्दी कारभार किती खालच्या थराला गेला आहे, अन त्यामुळे देशाच्या सुरक्षेला किती गम्भीर खतरा निर्माण होवु शकतो, याची कल्पनाही करवत नाही. कारण सन्रक्षण विशयक अनेक महत्त्वाची सिक्रेट या बयेने स्त्री-लम्पट थरुर कडुन काधुन घेतली असणार हे उघड आहे....

धिक्कार अन त्रिवार णिशेध!

field_vote: 
0
No votes yet

हो का? थरुर यांना दोनदोन बायका मिळतात व उपवर तरुणांना बायको मिळत नाही याबद्दल आळवलेला हा राग म्हणावा काय?
आणि हे खान्ग्रेस काय आहे? काँग्रेस का? छान छान... आता विरोधी पक्षाला बारतीय जंता पक्ष म्हणावे काय?

बारतीय जंता पक्ष

लिहिताना नाही तरी बोलताना सगळे असाच उच्चार करतात- फक्त बा ऐवजी भा (तमिळेतर असेल तर).

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बार...तीय...जंत....आ

अशी पांचट फोड करून उगाच फुटले!

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

चला, आता कॉग्रेसी म्हणणार मोदीने अकाउंट हॅक केले.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे शशी थरुर प्रकरण म्ह्णजे भयंकर च आहे. मला हे कळत नाही थेरड्याला या वयात विवाह-बाह्य संबधां ची काय गरज असावी ? जनाची नाही तर पदाची तरी लाज बाळ्गावी.

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कामातुराणां न भयं न लज्जा Smile

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

बाय द वे तो इंटलेक्चुअल म्ह्णुन प्रसिद्ध आहे. आमच्या एका प्रोफेसरचे मत आठवले. असे काही प्रकरण झाले की तो हुशार माणसांची लैगिक भुक मोठी असते असे सांगुन तो धडाधड तशी उदाहरणे देत असे. Smile

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

बाय द वे तो इंटलेक्चुअल म्ह्णुन प्रसिद्ध आहे. आमच्या एका प्रोफेसरचे मत आठवले. असे काही प्रकरण झाले की तो हुशार माणसांची लैगिक भुक मोठी असते असे सांगुन तो धडाधड तशी उदाहरणे देत असे

लैंगिक भूक मोठी असणारे लोक हुशार असतात - असे म्हणता येईल का ? (कदाचित हो ... कदाचित नाही.)

Consensual लैंगिकता ही Win-win असते व हुशार माणसांना Win-win अरेंजमेंट्स खूप आवडतात - हे कारण असू शकेल.

मौजमजा?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धाग्यांना ऋण श्रेणी देता येण्याची व्यवस्था करता येईल काय?

सहमत.

आणि फक्त आमच्या प्रोफेसरच्या या एका गोष्टीमुळे माझं मत त्याच्याबद्दल फारसं चागलं नव्हतं.

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

http://timesofindia.indiatimes.com/india/Sunanda-Pushkar-wife-of-Union-m...

या प्रकरणात बरेच पाणी मुरतेय . आय एस आय आणि थरुर दोघेही संशयाच्या भोवर्यात आहेत ... आणखी किती छोटे- मोठे मासे आहेत यात काय माहित?

Mandar Katre

साधीशी आत्महत्येची केस आहे हे जाहीर होइल आता लागलिच. किंवा सवयीप्रमाणेच आपण सारं काही विसरुन जाउ.
अर्थात ही आत्महत्य असण्याचीच शक्यता आहे.
वाय एस राजशेखर रेड्डी , राजेश पायलट व माधवराव शिंदे / सिंधिया ह्या सगळ्यांचेच नाही का योगायोगानं अपघात झाले?
पब्लिकनं तेव्हाही दबक्या आवाजात विनाकारण संशय घेतला होता.
इन शॉर्ट लवकरच प्रकरण निवळेल अशी खात्री वाटते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोकप्रभाचं नवीन रुपडं अजिबात भावलेलं नाही. दळभद्री आहे.
नुकत्याच आलेल्या अंकातील एकूण लेख किती व कोणते ह्याचा काहिच पत्ता लागत नाही.
जर तुम्ही www.lokprabha.com व गेलात तर फक्त चार लेखच आले आहेत असं वाटतं.
(उदा ;_ २४ जानेवारीचा अंक बघा. त्यात किती लेख आहेत ते संगा. जो बरोब्बर सांगेल त्याला एक चहा लागू माझ्याकडून.)
बाकीचे लेख कुठे शोधायचे, कोनते आहेत, ते काहिच समजत नाही.
आधीचे रुपडेच बरे होते ह्यापेक्षा.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा बघ अख्खा २४ जानेवारीचा अंक.. अगदी छापिल स्वरूपात जसाच्या तसा.

चहा कधी देतोयस?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://maharashtratimes.indiatimes.com/business/NSE/articleshow/29110578...
नवी दिल्ली - सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) शेअरमधील व्यवहारांच्या संख्येमध्ये जगातील सर्वांत मोठा शेअर बाजार म्हणून स्थान कायम राखले आहे. चीनच्या शँझेन शेअर बाजाराने न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये १४५ कोटी शेअर व्यवहार झाले. २०१२ च्या तुलनेत त्यात तीन टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे जगातील ५१ शेअर बाजारारमध्ये राष्ट्रीय शेअर बाजार आघाडीवर राहिला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबई शेअर बाजार आठव्या स्थानावर गेला आहे. बीएसईवर चार हजार कंपन्या नोंदल्या गेल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षी ३४.४६ कोटी व्यवहार झाले.
.
.
जागतिक अर्थकारणात , त्यातही वित्तीय संस्थात्मक रुपात आघाडिचे असलेले पाश्चात्य देश अमेरिका, युरोपीय देश(विशेषतः ब्रिटन व जर्मनी) , एशियन टायगर्स (सींगापूर्,तैवान), जपान कीम्वा टायगर कब अर्थव्यवस्था (थायलंड , मलेशिया वगैरे) ह्यांना, चक्क नॅसडॅक, डाउ जोन्स वगैरेंना भारतातील स्टॉक एक्स्चेंजनं मागं टाकलं ??!! कसं शक्य आहे ?
वित्त संस्थांत तर हे देश monstrous, राक्षसी, अफ्फाट आकाराचे आहे ना ? ते मागे कसे ?
तेसुद्धा nse बरीच नवीन असताना.
की तिथे otc व्यवहार खूप जास्त असून, त्यांचीए एक्स्चेंजवर नोंद होत नाही, असे काही आहे?
गब्बर आणि इतर डॉन मंडळी, काहीतरी सांगा बुवा.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'ऐसी अक्षरे'वर 'कहाणी आपल्या रुपयाची...' ही लेखमाला लिहिणारे सदस्य शैलेन यांचे भाषण आज पुण्यात आहे.
विषय - 'रीकन्स्ट्रक्टिंग द पास्ट : न्यूमिस्मॅटिक्स अँड हिस्टरी'
स्थळ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खुन्या मुरलीधराजवळ, १२४२, सदाशिव पेठ
वेळ : संध्या. ५:३०

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क्या बात!
कोणी अटेंड केले तर एक लेख/वृत्तान्त नक्की येऊ द्या!

छ्या! नेमका क्लायंट कॉल आहे. तो क्यांन्सल करायच्या क्लृप्त्या लढवायला हव्यात Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजून एका छानशा समारंभाला मुकणार मी.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओह! शैलेन पुण्यात आहेत. भारीय की. माझ्यासाठी त्यांचा ऑटोग्राफ आणा कोणीतरी प्लिज Smile

सुरवातीला अतिशय आश्चर्यकारक वाटलेली बातमी- एका जेष्ठ मानसोपचार तज्ञाच्या मते समलैंगिकता अनैसर्गिक आहे.
मात्र पुढे बातमीत "मुलग्यांचे लवकर लग्न करून द्या त्यामुळे बलात्कार कमी होतील" वगैरे मुक्ताफळे ऐकल्यावर बातमीचे/वक्तव्याबद्दलचे आश्चर्य वाटेनासे झाले Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्रिपाठींच्या इम्मॉर्टल्स ऑफ मेलुआह चे हक्क हॉलिवूड निर्मात्याने विकत घेतले.
पण ही बातमी महत्वाची नाही, ही बातमी देताना सकाळने "इम्मॉर्टल्स" ऐवजी "इम्मॉरल्स" असे छापून त्या पुस्तकांचे एका शब्दात अ‍ॅनालिसीस केले आहे Smile
लिंक: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=A4HZD

बरं झालं! करण जोहरपेक्षा कुणीही बरा. कांती शहासुद्धा.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओ आदूबाळ तुम्ही बोलताय काय आँ? कांती शहाची तुलना त्या करण जोहरशी?????? हाय रे दैवा, हे वाचण्याआधी मी कुणाला तरी जोहारात का नै मारले Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन आणि जोहारात मरायच्या बाता?? भौ तुम्ही लढा Wink
----सोकाजी स्टा. (सामुहीक जोहारची वाट पाहणारा) सिफर

सिफरभौ नीट पहा. मी मरायची नाही मारायची बात करतोय Wink

(व्रजन्ति ते मूढधियः पराभवम्, भवन्ति मायाविषु ये न मायिनः या वचनाचा फ्यान) बॅटमॅन.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरी म्हटलं… सालं चूकलच वाचतांना. चू.भू.द्या.घ्या. Smile

मेरा नाम है इबु हटेला
मा मेरी चुदैल की बेटी
बाप मेरा शैतान का चेला

.....पुढचं जौ द्या:)

गुंडा प्रचंड आवडला होता.

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

जौद्या म्हणतानाही एक श्लिप झालाच तुमच्याकंडं Wink ROFL

मेरा नाम है इबु हटेला
मा मेरी चुदैल की बेटी
बाप मेरा शैतान का चेला

ROFL ROFL ROFL

नक्की काय म्हणायचंय ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साला टायपिंग मिष्टीक, भलत्या जागी....संपादित करता येत नाहीय.

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

Biggrin

नया है वह.

जौद्या म्हणताना तुम्हीही एक श्लिप करायला वाव होता.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नको, उगीच श्लिप होऊन वावीत पडायचो कुठेतरी Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://timesofindia.indiatimes.com/india/With-first-nuclear-submarine-IN...

असल्या १० SSBN आपल्याकडे असणे गरजेचे आहे. न्युक्लिअर बॅलेस्टिक मिसाइल सबमरिन ह्या अण्वस्त्रे (वॉरहेड्स) साठवण्याची बेस्ट तिजोरी आहे. स्मोक सिग्नेचर नसणे व डिझेल ची टाकी न लागणे - ही दोन अत्यंत महत्वाची अ‍ॅडव्हांटेजेस आहेत SSBN / SSN ची.

मागे मी ऐसीवरच भाषांतरीत केलेल्या या लेखानुसार अरिहंत २०१२ च्या शेवटीच सामिल व्हायला हवी होती. आता त्याच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत म्हणजे हे बरेच मागे पडले आहे. Sad

ऑगस्टा वेस्ट लँड घोटाळ्यानंतर एकूणच संस्रक्षण खात्याची निर्णयप्रक्रीया/खरेदी मंदावली आहे हे ऐकून होतो - वाचनात येत असते, पण यात का उशीर व्हावा हे समजत नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२४.५ मैल प्रति गॅलन म्हणजे साधारणपणे १०.४ किमी प्रति लिटर असा हिशोब येतो.

आता अमेरिकेतील रस्त्यांची एकंदरीत सुस्थिती आणि वाहनांना मिळणारा सरासरी वेग पाहता १०.४ चा अ‍ॅवरेज तसा अजूनही कमीच वाटतो. याचे कारण काय असावे?

अंदाज - एका ठराविक वेगापलिकडे गेलं की गाडीची इकॉनॉमी हवा-वाऱ्यामुळे कमी होत असावी. घर्षण.
शहरातली रहदारी, गर्दी प्रमाणात असेल तर कधी, कधी शहरात इकॉनॉमी जास्त मिळते, कारण रस्ते छोटे असल्यामुळे वेग मर्यादित असतो. हायवेवर वेगमर्यादा साधारण ७०-७५ मैल प्रतितास अशी असते. गाडीची इंधन इकॉनॉमी ६२-६५ मैल प्रतितास या वेगापुढे उतरणीस लागते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुनील यांच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर भारतीय गाड्यांच्या मानाने अमेरिकन गाड्या प्रचंड मोठ्या असतात. नव्वदच्या दशकात पेट्रोल प्रचंड स्वस्त होतं - गॅलनला १ डॉलर! त्यामुळे लोकांनी प्रचंड मोठ्या एसयुव्ह्या उडवल्या.

अंदाज - एका ठराविक वेगापलिकडे गेलं की गाडीची इकॉनॉमी हवा-वाऱ्यामुळे कमी होत असावी.

हे तत्त्वतः बरोबर आहे. पण फ्रीवेवर मायलेजसाठी ऑप्टिमम रेंज ही ताशी सुमारे ५० मैल ते ताशी ६० मैल अशी असते. ५५ ला सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त मायलेज मिळतं. शहरात साधारणपणे कमी मायलेज मिळतं कारण सतत सिग्नलला थांबावं लागतं. त्यामुळे गाड्यांची मायलेजं सांगताना शहरात २२, आणि फ्रीवेवर २९ असे दोन आकडे सांगतात. प्रियसमध्ये ब्रेक दाबल्यावर ती ऊर्जा साठवली जाते. त्यामुळे प्रियसचं उलटं आहे.

हायवेवर वेगमर्यादा साधारण ७०-७५ मैल प्रतितास अशी असते.

हे तुमच्या टेक्सासात असेल कदाचित. इतर अनेक राज्यांत स्टेट स्पीड लिमिट ५५ असते. क्वचित काही रस्त्यांवर ६५. मला वाटतं सत्तरच्या दशकातल्या तुटवड्यामुळे सरकारने तेल वाचवण्यासाठी सगळीकडे स्पीड लिमिट ५५ केली होती. त्याचे अवशेष असावे.

वारुणीशौकीनांसाठी खुषखबर - आता प्या चिकूची!

हान तेजायला.

चिकु वाईन !!!

मागे आमच्या एका मित्राने नारायणगाव मधून आणलेली बोरांची वाईन दिली होती. लई मजा आली होती.

परवा कूर्ग - मडिकेरी इथं दक्षिण कर्नाटक भटकून आलो आख्खा.
कसलय कसल्या home made wine होत्या.स्ट्रॉबेरी, चिकू,पेरु अन् बरच काय काय होतं.
पब्लिकला विचारलं आणू का? तर पब्लिक बायकोला किंवा पालकांना घाबरुन आपण त्या गावचेच नाही असा आव आणू लागले.
पिताय तर लाजू नये, लाजताय तर पिउ नये.
तू बोल्ला असतास तर घेउन आलो असतो.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पिताय तर लाजू नये, लाजताय तर पिउ नये.

तुझी आज्ञा कशी मोडू ? घेतोच थोडीशी टेकिला.

कुर्ग प्रांताची खासीयत कॉफीची तसेच तांदळाची वाईन आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कॉफी आणली आहे, होउ द्यात एक चक्कर माझ्याकडे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला वाटते ते कॉफीच्या वाइनबद्दल बोलताहेत.

मनोबा, लवकर डीट्टेल टाका, किमान फटू.
काय काय आहे बघण्यासारखे?

बघण्यासारखे म्हणाल तर, कूर्गी मुली! देखण्या आणि रेखीव!! (मनोबा, खरं सांगा - हो की नाही?)

खाण्यासारखे म्हणाल तर, सूकरमांस पाकृ. (तसे कूर्गी हिंदूंना गोमांसदेखिल अभक्ष्य नाही!)

बाकी, कॉफी आणि मसाल्याचे मळे, कावेरी नदीचे उगमस्थान, तिबेटी धर्मशाळा इ. इ. आहेच!

होssssssssssssssय, या भागाला कन्नडीगांचा काश्मीर म्हणतात याच कारणासाठी.

ऐला, मग तर गेलंच पाहिजे इथं!!!!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाहीतर घरीच बनवता येईल की, हव्या त्या फळाची वारुणी. ही रुचीताईंची पाककृती.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फारशी वेगळी नसलेली बातमी दिसली .
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Gang-Rape/articleshow/2923...
.
.
भारतात सर्वत्र , विशेषतः ग्रामीण भागात जातपंचायतींचं बेकायदा अस्तित्व आहे, आणि भारतीय कायद्याच्या वर त्यांचे सडके फतवे आहेत ही वस्तुस्थिती आहे.
मागे पाच सात महिन्यांखाली महाराष्ट्र पोलिसांनी ह्याविरुद्ध एकदम मोठीच मोहिम उघडल्याचं पाहून आश्चर्य व कौतुक वाटलं होतं.
धडाधड एकापाठोपाथ एक एकेका जातपंचायत प्रमुख म्हणवून घेणार्‍याला धरुन पोलिस त्याच्या सगळ्या प्रकरणांची चौअकशी करत होते.
आपलं प्रशासन प्रथमच इतकं थेट्,स्पष्ट जातपंचायतीविरोधात गेलेलं मी पाहिलं.
हे असच इतर राज्यातही होइल तो सुदिन.
वाढते शहरीकरण व वाढते आधुनिकीकरण ह्याच्या रेट्यात ह्यांचे दिवस भरतील लवकरच हे ही निश्चित.
फक्त ते लवकरात लवकर व्हावं, ही इच्छा.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पन्नास हजार रुपये नाहीत म्हणून १३ जणांनी बलात्कार. एका बलात्काराची व्हॅल्यू सुमारे ४ हजार रुपये!

वाढते शहरीकरण व वाढते आधुनिकीकरण ह्याच्या रेट्यात ह्यांचे दिवस भरतील लवकरच हे ही निश्चित.
फक्त ते लवकरात लवकर व्हावं, ही इच्छा.

आमेन.

दर वेळी एखादी गोष्ट 'पर क्यापिटा'च्या भाषेत मांडल्याशिवाय चैन पडत नाही का हो तुम्हाला?

(आणि तेही दर वेळी बलात्काराच्या बाबतीत.)

शहरीकरण हाच या प्रवृत्तीला नष्ट करायचा सगळ्यात सोप्पा उपाय आहे याच्याशी सहमत! रोजच्या जगण्यासाठी कामावर जाणे, काम करणे, कामावरुन घरी येणे आणि पुन्हा दुसर्‍या दिवशीच्या कामासाठी रिकव्हर होणे यातच इतका वेळ गेला पाहिजे की हे असले जात पंचायतीचे उद्योग करायला वेळच मिळायला नको या लोकांना.

ननिशेट, उपरोध वापरलात. पण मला खरच तसं म्हनायचय.
धकाधकिच्या आयुश्यात भेदभाव करायला भेंडी टाइअम्च मिलाला नै पाय्जे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

M82 असं रोमांचकारी नाव असलेल्या दीर्घिकेत नवा सुपरनोव्हा फुटला आहे. या दीर्घिकेत तसे बरेच अतिनवतारे/सुपरनोव्हे होऊन गेले आहेत. रेडीओ दुर्बिणी वापरून त्यांच्या उरल्यासुरल्याचा अभ्यास होतो. आता हे नवं प्रकरण मिळालं आहे. ही बातमी. आणि हे चित्र, त्याच बातमीतलं.

डोळ्यांनी काही यात दिसेलसं नाही. ही दीर्घिकाही दुर्बिणीशिवाय डोळ्यांना दिसत नाही. पाचेक इंची दुर्बिणीतून ही दीर्घिका म्हणजे धुरकट डाग असल्यासारखी दिसते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२२ जानेवारीला आपल्याला कळले म्हणजे ही बातमी किती जुनी आहे? Blum 3 (म्हणजे हे प्रकरण आपल्यापासून किती प्रकाशवर्षे दूर आहे?)

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

११ मिलियन वर्ष

व्हिडिओ इंटरनेटवर अपडोल
अपलोड नाय काय अपडोल!!!

हॅ हॅ हॅ हे इसकाळवाले खतरनाक लिहीतात.!!!

"इराण "चे अध्यक्ष सद्दाम, कट्टर अरबी देश इस्राइल असे लय लय बहरी व एकाहून एक शोध सकाळ लावते.
त्यावर मिसळप्वाववर ,मी एक धागाही काढला होता.
पण सकाळवाल्यांच्या चुका मोजताना आम्ही सारेच थकलो, शेवटी प्रयत्न सोडून दिला.
तनिष्कांनी , साहेबांच्य भक्तांनी व आर्युर्वेदात हरेक समस्येची उत्तर शोधणार्‍यांनीच सकाळ शिरेसली वाचावा.
कारण ती मंडळी तसंही काही खटाकायच्या पलीकडे गेलेली आहेत.
नाही म्हणायला मुक्तपीठ हे अमूल्य रत्न सकाळनं मराठी भाषेला दिलेलं आहेच.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा एक मित्र सकाळच्या छापखान्यात कामाला होता. लोकांची पेपर वाचायची वेळ असते तेव्हा हा घरी परते. त्याच्या घराच्या वाटेवर एक पेपरांचं सार्वजनिक वाचनालय होतं. तिथे रोज बसणारे एक कानटोपीधारी शनवारपेठी आजोबा "अहो देशपांडे" अशी हाक मारून त्याला सकाळमधल्या चुका दाखवायचे! हा वैतागायचा, "माझं काम छापायचं असतं, काय लिहिलंय त्यात मी ढवळाढवळ करू शकत नाही" वगैरे सांगूनसुद्धा आजोबा यालाच पकडायचे!

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/our-medicines-not-for-indi...

मी बेयर च्या बाजूचा आहे.

मी पण

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सॅमसंग फोनची (अर्थातच'सकाळ'मधली) जाहिरातः
आजच आजला उद्यापेक्षा मोठा का नाही बनवायचे. जे काम अशाप्रकारे होत आले आहे ते तशा प्रकारे करा. बस असेच, रस्त्यांवर नाही, वार्‍याच्या इशार्‍यांवर चालायचे. तिथे पोहचून, जो पुन्हा कधी भेटणार नाही, असा मित्र बनवायचा. नव्या Samsung Galaxy Grand 2 सोबत, असेच घालवलेले क्षणही ग्रॅन्ड होतील. Club Samsung सोबत उत्कृष्ट मनोरंजनाचा उपहार मिळवा. त्याच्या मोठ्या HD स्क्रीनवर सुंदरतेला अधिक सुंदर होताना पहा. आणि त्याच्या मल्टि-स्क्रीन विंडोवर आयुष्याचा ताळमेळ घाला. तर चला, प्रत्येक दिवस ग्रॅन्ड करा.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ह्यावेळी महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी देत आहे.
अगदि एकेरी आणि दुहेरी अवतरणचिन्हेसुद्धा बातमीतील जशास तशी ठेवली आहेत. जशाला तशी बातमी कॉपी पेस्ट करतो आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/Ranbaxy-Labs-gets-U...

‘रणबक्षी’ला USचा दणका

भारतीय औषध उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असणाऱ्या 'रणबक्षी फार्मास्युटिकल्स'ला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. या कंपनीच्या पंजाबमधील तोन्सा प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या औषधांची अमेरिकेत विक्री करण्याला बंदी घालण्यात आली आहे.

तोन्सा प्रांतामध्ये उत्पादन करण्यात आलेल्या औषधांच्या दर्जावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. 'या औषधांचा दर्जा योग्य नव्हता. त्यामुळे ही औषधे अमेरिकन ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकांपर्यंत पोहोचणारी औषधे योग्य दर्जाची आणि सुरक्षित असावी, याची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे,' असे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध मूल्यमापन व संशोधन विभागाचे संचालक कॅरोल बेनेट यांनी सांगितले. तोन्सा प्रकल्पामध्ये तयार करण्यात आलेल्या 'अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट'ची (एपीआय) अमेरिकेत होणारही आयातही थांबविण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये काही औषधांचा तुटवडा जाणवू शकतो, त्याचाही अभ्यास करण्यात येत आहे.

या निर्णयानंतर 'रणबक्षी'ला आता तोन्सा प्रकल्पाची तटस्थ संस्थेकडून पाहणी करून घ्यावी लागणार आहे. त्यातून औषधाचा दर्जा योग्य असल्याचे 'रणबक्षी'ला अमेरिकन संस्थांना पटवून द्यावे लागणार आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रॅनबॅक्सीचे रणबक्षी करणार्‍या या इसमास एकदा भेटायला पाहिजे. एकदम अलेक्झांडरचे अलक्षेन्द्र हे रूप आठवले. मुळात इतके डोके लावले हीच परम आश्चर्याची गोष्ट आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://truthonthemarket.com/2007/08/23/our-protective-fda/

गोषवारा : अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन (FDA) जरा जास्तच कॉझर्व्हेटिव्ह आहे. एखादे औषध बाजारात आल्यावर त्याचे दुष्परिणाम (पेशंटांवर) झाले तर त्याची बातमी मोठ्ठी बनते. पण औषध जर बाजारात आलेच नाही तर (FDA) ला कोणीही दोष देत नाही. भलेही पेशंट्स औषधाविना मरेनात.

या लेखातील शेवटचे वाक्य लक्षणीय आहे.

--

आणखी - http://www.fdareview.org/incentives.shtml

एक अतिशय पॉसिटिव्ह बातमी, शिवाय याला भारत-जपान संबंधांतील पुढले पर्व (स्ट्रॅटेजिक अलायन्स न राहता स्टॅटेजिक पार्टनरशिप चे सुतोवाच) समजावे काय यावर मत देण्याआधी अधिकचा विदा जमतोय/शोधतोय.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जपान चे प्रधानमंत्री अबे हे भारत धार्जिणे आहेत असे वाचले होते. मागे.

जपान ला यावर्षी प्रचंड ट्रेड डॅफिसिट झालेला आहे.

मी पॉसिटिव्ह बातमी म्हणालो त्यामागे जपानची वाढती इच्छा नव्हती तर भारताने एका मर्यादेबाहेर संबंध वाढवायची दाखवलेली इच्छा हे आहे.
थोडक्यात भारत नावाच्या नवयौवनेच्या मागे अनेक थेरडे आहेत, पण जपानशी जितकी जवळीक भारत दाखवतो आहे ते भुवया उंचावणारे आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडक्यात भारत नावाच्या नवयौवनेच्या मागे अनेक थेरडे आहेत

रूपक आवडल्या गेल्या आहे.

ही बातमी कमी व विश्लेषण जास्त आहे. http://indianexpress.com/article/opinion/columns/indias-biggest-failing/0/

भारताची सगळ्यात मोठ्ठी अपयशं कोणती? यावर त्यांची मते. त्यांनी न्यायसंस्थेतील समस्यांवर भर दिला आहे.

हेच मी बोललो, तर ऐसीकर धावून येतात.
आता कुणी मोथी माणस्म तेच म्हटली म्हणून ह्यांनी माना डोलावू नयेत म्हणजे झालं.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ती बातमी नैचे.. ते ओपिनियन या सदरातच आहे.
ते असो.
मला त्यांनी जी 'अपयश' वगैरे म्हटलंय ते चुकीच्या जागी धोपटणे वाटले. एकूणच लेख उपरोधाच्या नादात अगदीच सत्वहीन झाला आहे. मुळात या(ज्युडिशियरी) अंगाने येणारे अपयश हे सर्वात मोठ्ठे अजिबात नैये. आणि त्यापुरतेच बोलायचे तर हे अपयश असलेच तर ज्य्डिशियरीपेक्षा गृहखात्याचे अधिक आहे. न्यायालये मुद्दाम उशीर करतात असे वाटत नाही व प्रकरणाची पूर्ण छाननी केल्याशिवाय न्यायदानाची घाई केली जाणे योग्यही वाटत नाही.

तसेही क्रिमिनल केसेस पैकी भयंकर केसेस वर्षानुवर्ष पडून रहाण्याचे प्रमाण कमीच असावे. तुलनेने सिविल न्यायालयात (विशेषतः जागांशी संबंधित) किंवा अ‍ॅपेलाईट साईडला तुंबलेली प्रकरणे अधिक असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>तसेही क्रिमिनल केसेस पैकी भयंकर केसेस वर्षानुवर्ष पडून रहाण्याचे प्रमाण कमीच असावे.

लालू यादव यांची चारा घोटाळा केस क्रिमिनलच आहे ना?

>>न्यायालये मुद्दाम उशीर करतात असे वाटत नाही व प्रकरणाची पूर्ण छाननी केल्याशिवाय न्यायदानाची घाई केली जाणे योग्यही वाटत नाही.

हे मान्य आहे. पण पक्षकारांकडून चालढकल चाललेली असेल तर न्यायालय त्यावर आक्षेप घेत नाही असे दिसते. मोअर दॅन विलिंग टु गिव नेक्स्ट डेट. उदा एका वकीलाची अशी कीर्ती आहे की तो एखाद्या केसमध्ये वकील असेल तर केस दहा एक वर्षे सुनावणीलाच येत नाही (हा त्या वकीलाचा यूएसपी आहे बर्का !!!!). तो वकील बहुतांश तारखांना कुठल्या ना कुठल्या रोगाने "आजारी" असतो आणि पुढची तारीख दिली जाते. Smile

सरकारला पाठिंबा देणार्‍या खासदारांच्या केसेस सोयीनुसार मागे पुढे होतात त्याला न्यायालये अटकाव करताना क्वचितच दिसतात.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसेही क्रिमिनल केसेस पैकी भयंकर केसेस वर्षानुवर्ष पडून रहाण्याचे प्रमाण कमीच असावे.

लालू यादव यांची चारा घोटाळा केस क्रिमिनलच आहे ना?

आहेच. प्रमाण कमी आहे म्हटले नाहिये असे नाही.
याचे कारण व्यक्तीला 'अटक' केल्यानंतर २४ तासांत न्यायालयापुढे उभे करावे लागते. 'अनेकदा' (पुन्हा प्रत्येक वेळी नव्हे) बराच काळ चार्जशीट दाखल केली नाही तर कोर्ट जामिन देते जे पोलिसांची केस दुबळी करणारे असते. अश्या केसेसमध्ये (लालुंसारखे) मोठे मासे सापडल्यावर मात्र या केसेस अतिशय हळु पुढे सरकतात हे मान्य मात्र त्यात न्यायालयांचा दोष किती याबद्दल पुन्हा साशंक आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुलनेने सिविल न्यायालयात (विशेषतः जागांशी संबंधित) किंवा अ‍ॅपेलाईट साईडला तुंबलेली प्रकरणे अधिक असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.

वा.. अशी प्रकरणे एखाद्या कुटुंबाच्या दृष्टीने दुय्यम महत्वाची असू शकतात आणि जीवनमरणाचा प्रश्न नसू शकतात या खोल अध्याहृत गृहीतकामुळे वाईट वाटलं.

-(पस्तीस वर्षे जमिनीच्या खटल्यात दोन पिढ्या गमावलेला) एक सामान्य पक्षकार.

हे अध्याहृत का बरे जाणवावे?
माझी प्रतिक्रीया ही मुळ एक्सप्रेसमधील लेखावर होती. तो लेख क्रिमिनल केसेसबद्दल बोलतो. मात्र मी इथे अधोरेखीत करत आहे की न्यायालयांत अधिक विलंब होत असेल तर तो सिवील न्यायालयांत होतो. इथे दुय्यम दर्जा कुठे बरं जाणवला? किमान माझे असे अध्याहृत नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्पष्ट केल्यामुळे आता प्रश्नच नाही.

मूळ प्रतिसादात असं वाटलं की क्रिमिनल (महत्वाच्या) जास्त पेन्डिंग राहात नाहीत.. दिवाणी, जागांशी संबंधित अशाच केसेस लांबतात... याचा अर्थ मला उगीचच तसा वाटला. तसे नसल्यास माझा आक्षेप मागे.

जाता जाता.. या लांबलेल्या जमिनीविषयक "दिवाणी" खटल्यांतून किंवा त्यांच्या आजुबाजूला असंख्य "क्रिमिनल" खटले जन्माला येत असतात याचीही नोंद असावी..!!

ही बातमी नसून विश्लेषण आहे - http://marginalrevolution.com/marginalrevolution/2014/01/why-the-worst-g...

निष्कर्ष/गोषवारा - निवडणूकीच्या उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड हे मतदारांच्या दृष्टीने (काही प्रमाणावर) त्या उमेदवाराच्या धडाडीचे/धैर्याचे द्योतक असते.

मला काहीसे असे वाटले की डॉ. मिलन वैष्णव यांनी कोरिलेशन चे काउझॅलिटीत रुपांतर केलेले आहे.

--

लेखाचा मथळा (Why the Worst Get on Top ) मात्र प्रा. हायेक यांच्या लेखावरून "प्रेरणा" घेऊन .......

भारतातल्या सर्वात ताकदवान स्त्रीवाद्याची मुलाखत पाहिलीत का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Royal Dutch Shell Plc (RDSA), Europe’s largest oil company, said profit plunged 48 percent on exploration expenses and lower production.

To read the entire article, go to http://bloom.bg/1icV03w
रॉयल डच शेल आता आपल्या अ‍ॅसेट्स विकून पैसा मोकळा करायच्या प्रयत्नात आहे.
या बातमीतले खालील वाक्य ही फार रोचक आहे.
“Its Americas growth strategy –- the home for 50 percent of past investment –- woefully underdelivering under the weight of dead capital,” Lucas Herrmann, a London-based analyst at Deutsche Bank AG, said before the earnings report. “Corporate change could release huge value.”
http://bloom.bg/1icV03w
अमेरिकेच्या तथाकथित दुसर्‍या ऑईल रेनेसाँमध्ये यांना हात धुऊन घेता आले नाहीत म्हणजे आश्चर्यच म्हटले पाहिजे.

हि ऑइल बूम आणि ह्या कंपन्यांचे तोटे हे सगळचं थोडं गडबड वाटतं.

अमेरिकेच्या तथाकथित दुसर्‍या ऑईल रेनेसाँमध्ये यांना हात धुऊन घेता आले नाहीत म्हणजे आश्चर्यच म्हटले पाहिजे

ह्यामुळेच मला गडबड वाटत आहे.

एक्झॅक्टली. गडबड आहे म्हणूनच आश्चर्यकारक घटना घडतात.
अमेरिकेच्या ऑईल बूमचा माध्यमांमध्ये इतका प्रचारकी गाजावाजा झालेला पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
आता या फ्रॅकिंग वेल्सचा संपण्याचा दर बराच आहे आणि सतत नव्या विहिरी खणाव्या लागताहेत अशा बातम्या यायला लागल्या आहेत.
एकाच जागी राहण्यासाठीही वाढत्या वेगात धावावं लागतंय म्हणे.
आता या कंपनीने अ‍ॅसेट्स विकून यावर्षी नफा कमावला तरी पुढच्या वर्षी काय करणार कोण जाणे?

खरे खोटे काहीही कळत नाही.
जितकी माह्तिई काढाल तितकी डोके चक्रावून टाकणारी असते.
विविध देशांना घरगुती सूर्य पाळता येणे अनिवार्य होणार काय ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars