छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३० : गंध

गंध, आपल्या मूलभूत संवेदनांपैकी एक महत्त्वाची संवेदना. ही अमूर्त संवेदनासुद्धा एखादं छायाचित्र पाहून कधी कधी आपल्या नाकाला जाणवते. फुलं, गवत, माती, स्वयंपाकघर असे काही विषय यात येऊ शकतील. उदा. हा फोटो

------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १२ फेब्रुवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १३ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------
मागचा धागा: पॅटर्न, आणि आवडलेली छायाचित्रे.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

फुलं, गवत, माती, स्वयंपाकघर असे काही विषय

काही विषय म्हंटलंय, हेच नव्हे. त्यामुळे घरातले अजुन पण 'काही' विषय डोक्यात आले - पण मला त्या विषयावरची छायाचित्र पहायला आवडणार नाही त्यामुळे जाउद्या! खरं सांगायचं तर च्यायला सगळं सोडून तोच विषय का पटकन डोक्यात यावा, अगदि कितीहि गंधित असला तरी, या विचाराने यातना झाल्या मनाला त्यामुळे जाउद्याच!! आणि "मीच का त्रास करून घेतोय, तांत्रिकददृष्ट्या संयुक्तिक आहे ना मग झालं" असंहि वाटलं पण लेखिकेने उदाहरणादाखल इतका प्राजक्ताच्या रसरशीत फुलांचा छान फोटो टाकल्याव वात्रटपणा पण करवत नाहिये त्यामुळे जा उं दे च मु ळी !!!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

तसे नव्हे माझ्याही डोक्यात 'तोच' विषय आला.
मुळात त्या गोष्टींसाठी उद्युक्त होण्यात 'गंध' हा सर्वात मोठी भुमिका बजावतो. रंग/रूप वगैरे सगळे दुय्यम आहे. स्मेल इज वॉट मॅटर्स Wink

बाकी केतकी: विषय अतिशय आवडला. छायाचित्र बघण्यास उत्सुक आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहा.. मला पण आला होता तसा विचार डोक्यात. पण तरीही चांगल्या / वाईट गंधाचे लोकांनी पाहावेत असे कोणतेही फोटो चालतील Smile

<<छायाचित्र बघण्यास उत्सुक आहे.>>

+१

@केतकी - 'लोकानी पहावेत असं' छायाचित्र काढायची एक कल्पना आहे पण त्यासाठी 'मॉडेल' नाहिये आत्ता माझ्याकडे!
"............आई-बाबाच्या चेहेर्‍याचा समोरून शॉट, बाळाचे पाय हाताने उंचावलेले धरलेत त्यातली फक्त पावलं दिसतायत त्यावरनं काय कार्यक्रम चाललाय ते समजतं, आई-बाबाचे फक्त डोळे दिसतायत, आणि उंचावलेल्या भुवया, कपाळावरच्या आठ्या यावरून 'गंधाची' चटकन कल्पना यावी!!............." च्यायला मला हे चित्र दिसतंय....बाहुली वापरून छायाचित्र जमलं तर बघतो Smile

@ऋषिकेश - 'रंग-रूप' वरनं आठवलं. फार वर्षांपूर्वी, भाची अगदि लहान होती नी पोट बिघडलं होतं पहिल्यांदाच. मीहि ताईबरोबर डॉक्टरांकडे गेलो होतो. "नव्या आईच्या उत्साहाने" ताईने 'कसं पोट बिघडलंय' याचं संपूर्ण वर्णन केलंन. डॉक्टर म्हणाले "बरं, आता रंग, रूप, वास सगळं सांगितलंस तू मला, चव राहिली फक्त" :-)))))))))

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

बहुदा आपले "ते विषय" वेगवेगळे आहेत.
मी पाय वर उचलून चाललेल्या कार्य्क्रमाशी साधर्म्य राखणारे विषय नव्हतो म्हणत. ज्या कारणाने बेडरूममध्य जाताना नव-नवरा/नवरी पर्फ्युम्स शिंपडतात वा सुवासिक साबणाने आंघोळ करतात ते मी म्हणत होतो. पार्टनरच्या रंग रुपापेक्षा गंध अधिक धुंद करतो असे शास्त्र म्हणते Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता कळलं "माझ्या मनाला यातना झाल्या" असं का म्हंटलं मी ते? Smile तरी बरं, ईतकी वर्षं झाली आता त्या 'डायपर बदला' काळातनं बाहेर पडून. पण अजूनही गंध म्हंटलं की तेच आठवतं!!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

रंग रुपापेक्षा गंध अधिक धुंद करतो असे शास्त्र म्हणते

अहो तो शरीराचा गंध. काही रुपड्यांच्या पर्फ्यूमचा गंध नव्हे!

(बहुतेक) मत्स्यगंधेला "योजनगंधा" असं पण एक नाव आहे कारण तिच्या शरीराचा मादक वास म्हणे एक योजन अंतरावरून येत असे!

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(बहुतेक) मत्स्यगंधेला "योजनगंधा" असं पण एक नाव आहे कारण तिच्या शरीराचा मादक वास म्हणे एक योजन अंतरावरून येत असे!

एक निरीक्षण: (सवय नसेल तर) मत्स्याचा गंध हा एका योजनावरूनच (मादक वगैरे नाही कदाचित, पण) सह्य होऊ शकतो.

==============================================================================================================================

"कारण शेवटी आम्ही..." - पु.ल.

धागा वाचून माझ्या डोक्यात काय विषय आले ते लिहीते. इतर कोणी तसे फोटो काढले तरी काही अडचण नाही. एकाच विषयावरचे बरेच फोटो बघायलाही आवडेल.

कोरड्या मातीवर पडलेले पाण्याचे थेंब, नुकतं कापलेलं गवत, रस्त्यावर पसरलेला पाचोळा (याचा काय गंध येणार असा प्रश्न असेल तर बंगळुरूच्या रामन रस्त्यावर, रामन संस्था आणि IISc चं मुख्य दार यांना जोडणारा रस्ता, जाऊन या.), चकचकीत मॉल्स, विमानतळांवरचे ट्रान्झिटचे भाग जिथे बरंच ड्यूटी फ्री शॉपिंग करता येतं, अर्थातच परफ्यूम्सची दुकानं, पण (फक्त) चॉकोलेटची दुकानं, बेकऱ्या, दुकानातला चहा-कॉफीचा भाग किंवा फक्त कॉफीचं दुकान, सध्या नारायणगाव आणि त्या वाईन बेल्टमधे जाणार असलात तर तिथेही द्राक्षांचा मादक वास येईल, चहाची टपरी, कोपऱ्यावरचे वडे-भजीवाले, मासेवाल्या ....

आणि एवढं करून मला आत्ता न आठवणारी बरीच ठिकाणं अनेकांना सुचतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रान्झिस्टर रेडीओ आणि Sonyचा रेकॉर्डर आठवला जुना - आडवा, वरच्या भागात स्पीकर आणि खाली बटणं असलेला. त्या रेकॉर्डर ला, मुख्यत्वे बटणाना एक विशिष्ट वास असायचा. कसल्या प्लास्टिकचा करायचे तो देव जाणे. पण अगदि टिप्पिक्कल वास असायचा तो. 'प्ले'चं बटण सर्वात डावीकडे, लाम्बडं...आणि त्यात मधे छोटा लाल भाग - रेकॉर्ड करायला त्या लाला भागासकट दाबायचं बटंण...

हल्लीच्या फोनला, कॅलक्युलेटरला, कुठल्याचा उपकरणाला असा प्लॅस्टिकी वास नसतो. नको तिथे सुधारणा......

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

धागा वाचण्याआधीच, केवळ शीर्षक वाचून आमच्या टाळक्यात ती अय्यर-अय्यंगार मंडळींची भलीमोठी, आडवी-उभी गंधे चमकून (आणि आमच्या डोळ्यांसमोरून तरळून) गेली, इतकेच.

=====================================================================================================

, "कारण शेवटी आम्ही(ही) भटेंच! त्याला काय करणार?" (प्रेरणा: पु.ल.)

यावरून आठवले: मनोबांच्या डोळ्यांना 'मनश्चक्षू' (शुद्धलेखनाची... चूभूद्याघ्या.) असे संबोधणे सयुक्तिक ठरावे काय?

आज माझा "यावरनं ते आठवलं" दिवस आहे. तुझ्या मनश्चक्षू वरनं. पु.लं.चा लेख आठवला - 'सैलबाला' वाला. त्यात त्यांचा मित्र 'एका मिनिटात चष्म्याला तीन शब्द देउन गेला'. त्यातलं फक्त कृष्णोपनेत्र आठवतं. दुसरी दोन कुठले? उपनयनत्राण असा काहिसा होता त्यातला एक?

संपादक, या अवांतराबद्दल माफ करा. पण दातात सुपारी अडकल्यागत झालंय हो!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

नयनत्राण आणि ऊनप्रतिबंधक उपनेत्र हे ते दोन शब्द. आणि हरी काळुस्कर हे त्या मित्राचं नाव. लेखाचं नाव- अडला हरी. पुस्तक- उरलं सुरलं.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

थँक्यु व्हो!! कृपया रविवार सकाळमधल्या रामा गड्याच्या स्वरात वाचावे!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हेच लिहावयास आलो होतो, पण तत्पूर्वीच सदैव जागृतच असलेल्या 'गृह कुक्कुटाप्रमाणे' आधीच लिहून माझे टंकनश्रम वाचविल्याबद्दल आजन्म ऋणी राहीन Smile

चिझ गार्लिक ब्रेड्चा खमंग - खरपुस वास येतोय का? Wink

स्पर्धेसाठी नाही.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/500 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
Flash Used: No

विषय अवघड आहे का हा खूप?
फक्त दोनंच फोटो आलेत, त्यातलाही एक स्पर्धेसाठी नाही! Sad

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

Camera NIKON D60
Focal Length 40mm
Exposure 1/60
F Number f/5.3
ISO 200

Camera NIKON D60
Focal Length 50mm
Exposure 1/100
F Number f/5
ISO 200

प्रतिसादांचे रोप खुरटले
'गंध'ही उडून गेला
आणि पाक्षिक बगिच्यासाठी
कोणही माळी नुरला
Wink

कोणी हूंगणारे नाक आणि हुंगायचा पदार्थ दाखवा ना.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो,
या दुव्या वरील पाच नंबरचा (तै, अस्मि, सचिनचा) फोटो चालेल का बघा Wink

ROFL ROFL ROFL

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL
गुर्जी/तर्कतीर्थ, कुणी काढलाय हा फोटो? स्पर्धेसाठी पात्र ठरवूया का? Wink
(तेवढाच अजून एक फोटो! Smile )

गुर्जीँनी काढलाय :-). तुला योग्य वाटत असेल तर घे तो पण स्पर्धेसाठी.
आणि मला वाटत अदिती म्हणतेय तसा निकाल लाऊन टाक अजुन मुदतवाढ देण्यापेक्षा. जर ३ नंबर काढता येत नसतील तर एकच विजेता फोटो ठरव.

पुरेसे फोटो नसतील तर वेगळा विषय देता येईल किंवा आहेत तेवढ्याच फोटोंमधून विजेता फोटो निवडता येईल. हे माझे फोटो -

तिन्हीसाठी कॅनन टी३, १८-५५ मिमी भिंग.

१. सुप्रभात

२. मासेमारी

३. शकुनाच्या मिरच्या -

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धाग्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल क्षमस्व!
एकदा शेवटची मुदत वाढवून पाहूया, १५ मार्चला या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत अजून फोटो टाका लोकहो!!

धागा वर आणत आहे.

याबद्दल काय मत आहे?

- स्पर्धेसाठी नाही (अर्थातच!)

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

असाच एक फोटो ढकलपत्रातून आला होता. त्यात फोटोखाली कचराकुंडी नव्हती. एक माणूस मूत्रविसर्जन करत होता.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ईथे फोटो टाकणे कित्ति अवघड आहे.

'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे.

व्यवस्थापकांकडून सुचना: height, width हे आकडे रोमन अंकात द्यावेत.

अजून निकाल जाहिर केलेला नाही, याचा अर्थ अजूनही फोटो टाकता येईल का?

सॉरी, पण मी जस्ट निकालाचा प्रतीसादच लिहितेय. अर्थात तुम्ही तरीही फोटो टाकू शकताच, फक्त स्पर्धा (फायनली) संपलीय. Smile

मी विषय दिला तेव्हा फुलं, खाद्यपदार्थ, माती, परफ्युम्स या सर्व प्रकरांमधील छायाचित्र भरपूर येतील असं वाटलं होतं. मला लगेचच आठवणार्‍या गंधांमधे या सर्वांशिवाय एस. टी. स्टॅंडवरचा आणि लहानपणी खूपदा केलेल्या नगर-नाशिक प्रवासातला साखर कारखान्याचा भयानक वास आहे!

स्पर्धेला आलेल्या फोटोंमधे, म्हणजेच घनु, अतुल ठाकूर, द्रुष्टद्युम्न आणि अदिती यांमधील घनुचा गार्लिक ब्रेडचा, अदितीने टाकलेल्यांपैकी कॉफी आणि फिशिंगचा, हे आवडले. अमुक यांनी सुचवलेल्या गंधकोषाची संकल्पना मस्तंय. अतुल ठाकूर यांनी जास्वंदीच्या फुलाचा त्या अनुषंगाने काढलेला फोटो तांत्रिकदृष्ट्या सर्वांत जास्त आवडला. अतुल यांनी नवीन विषय द्यावा.

अमुक आणि सर्वसाक्षी, फक्त कुतुहलापोटी विचारतेय, इतके छान फोटो स्पर्धेसाठी का नाहीयेत?

(हुश्श!! पुढचा विषय सोप्पा द्या बुवा! Wink )

इतके छान फोटो स्पर्धेसाठी का नाहीयेत?

२०१२ मध्ये सलग तीन वेळा क्रमांक मिळाल्यानंतर मी प्रदर्शनमात्र राहण्याचा निर्णय घेतला. नपेक्षा माझ्या चित्रणात सुधारणा होणार नाही.

धन्यवाद

कुमार सानु आठवला ;-). पण सलग कसं काय जिँकलात? स्वतःच स्वतःला विजेता घोषीत केल की काय Biggrin ह घ्या.

मी काय म्हणते, विजेत्यांनी स्पर्धेत भाग घेतला नाही तर बाकीच्यांच्या चित्रणात सुधारणा कशी होणार? त्यामुळे २०१३मधे झाल्या तेवढ्या सुधारणा पुरे तुमच्यासाठी. आता या परत स्पर्धेत ही विनंती. वाटल्यास सलग एकालाच पैला नंबर देऊ नये असा नियम अॅड करता येईल.

पण सलग कसं काय जिँकलात? स्वतःच स्वतःला विजेता घोषीत केल की काय >>>
अगदी पटलं. सर्वसाक्षींच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

सर्वसाक्षीँनी जो विजेता घोषीत केला त्याने परत सर्वसाक्षींनाच विजेता केल असणार.
पण 'असे करणे अलाऊ नाही' या एका नियमाने हा प्रॉब सॉल्व्ह होइल.

इतके छान फोटो स्पर्धेसाठी का नाहीयेत?
............तुम्ही दिलेला विषय उत्तम होता. हवे तसे, तितके प्रतिसाद आले नाहीत हे दुर्दैव.
मी दिलेले चित्र फारच थेट होते. त्यात चित्रणाची मजा फारशी नव्हती. त्याहून बर्‍याच बर्‍या आणि आव्हानात्मक अश्या इतर काही कल्पना सुचल्या होत्या. मात्र कॅमेरा सध्या बिघडलेला असल्याने प्रत्यक्षात उतरवू शकलो नाही. क्षमस्व.

ओके

धन्यवाद केतकीजी Smile

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?