ही बातमी समजली का? - १९
भाग १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---------
http://www.ndtv.com/elections/article/election-2014/muslims-are-too-secu...
मुस्लिम जास्त सेक्यूलर आहेत. त्यांनी कम्यूनल व्हावे. मुसलमानांना मत द्यावे. - इति शाझिया इल्मि, आआपच्या पहिल्या दहा प्रभावी लोकांपैकी एक.
One more party with difference losing difference.
अशा प्रसिद्ध भडकाऊ वाक्यांची टॅलि खालिलप्रमाणे आहे -
१. भाजप - तोगडीया (मुस्लिमांना घरे घेणे अवघड करावे), गिरिराज (मोदीविरोधकांनी पाकिस्तानात जावे), अमित शाह (बदला), मोदी (पिंक रिवोल्यूशन)- ४
२. शिवसेना - कदम (मोदी मुस्लिम दंगेखोरांची दखल घेतील) -१
३. सपा - आजम खान (कारगिल भारतीय मुस्लिम सैनिकांनी फते केले. याचा लोक बाऊ का करत ते मला कळले नाही.), अबू आझमी (स्वत:च वाचा) -२
४. काँग्रेस - इमरान मसून (मोदीचे तुकडे करेन), बेनी प्रसाद वर्मा - (बीजेपीचे सारे प्रधानमंत्री उमेदवार पाकिस्तानात पाठवा, मोदी हिटलरची औलाद) -२
५. आआप - १
एकूण १०. न रेकॉर्ड झालेले, इ याच्या १०० पट मानू. एकूण १०००. आजपर्यंतचे सर्वात चांगले इलेक्शन. पुढे अजूनही व्हिडिओची वाढल्याने असे करता येणार नाही. रिपोर्टींग १००% होईल. अच्छे दिन आने वाले है.
यातील श्री.कदम यांचे वक्तव्य
यातील श्री.कदम यांचे वक्तव्य संदर्भहीन प्रोजेक्ट केले असे प्रथमदर्शनी मत झाले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
का? आजम खान ही हेच म्हणत
का?
आजम खान ही हेच म्हणत आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मी कदम यांचे पूर्ण भाषण ऐकले
मी कदम यांचे पूर्ण भाषण ऐकले नाही पण मला जे समजले ते असे की:
आझाद मैदानावर पोलिसांवर जमावाने हल्ला केला. त्यापैकी अनेकांवर ते केवळ मुस्लिम आहेत म्हणून गुन्हे दाखल केले नाहित किंवा त्यांना सोडून दिले गेले. पोलिसांवरच हल्ला करणार्यांना ने निव्वळ मुसलमान आहेत म्हणून मोदी पाठीशी घालणार नाहीत. ते मुस्लिम असले तरी त्यांच्यावरही कारवाई होईलच.
त्याचा मिडीयाने मोदी मुस्लिमांवर कारवाई करतील असा काहिसा अर्थ घेतला असे वाटते.
नुकतीच निवडणुक आयोगाने काहितरी कारवाई करण्याचे वृत्त आहे, त्या अर्थी कदाचित मी वर लावलेला अर्थ चुकीचाही असेल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'हे मुसलमान पोलिसांवर हल्ले
'हे मुसलमान पोलिसांवर हल्ले करतात, पोलिसांच्या गाड्या जाळतात, शहिदांचं स्मारकं तोडतात आणि महिला पोलिसांवर हात टाकण्यापर्यंत यांची मजल जाते. आम्ही हे खपवून घेणार नाही. आमच्या मायभगिनींच्या अब्रुवर कोणी हात टाकणार असेल तर नरेंद्र मोदी त्यांचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत,'
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Ramdas-Kadam-M...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे कार्टून पाहून इथे द्याय्चा
हे कार्टून पाहून इथे द्याय्चा मोह आवरला नाही

सौजन्य : द हिंदू
कार्टुनिस्टः सुरेन्द्र
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कदम मागच्या निवडणुकीत हरले
कदम मागच्या निवडणुकीत हरले होते बहुदा, त्यांच्या मतदारसंघात ह्याचा कितपत उपयोग होइल हे बघितले पाहिजे.
माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्ट्वर चढाईसाठी वापरला जाणारा सदर्न रूट यंदाच्या वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय शेर्पा लोकांनी घेतलाय. या संदर्भातील ही रोचक बातमी. फार वर्षांपूर्वीपासून एव्हरेस्टच्या चढाईचं व्यापारीकरण झाल्याचं माहीत होतं पण किती पैसा यात गुंतलेला आहे याची थोडी कल्पना या बातमीतून मिळेल. याशिवाय एव्हरेस्टवरच्या सुरस कहाण्या एवढ्यातच मिपावर वाचण्यात आल्या.
उत्तरेकडचा चीन मधून जाणारा मार्ग अजूनही चढाईसाठी खुला आहे.
सेंट झेविअर्सच्या
सेंट झेविअर्सच्या मुख्याध्यापकांचे विद्यार्थ्यांस पत्र
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
-
असे पत्र लिहिणे निषेधार्ह आहे.
अवांतर शंका: हेच त्यांनी लेख म्हणून कॉलेजच्या नियतकालिकात लिहिले असते तर चालले असते का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत. निषेध नोंदवणार होतो पण
सहमत.
निषेध नोंदवणार होतो पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने मुलूखमैदानी तोफा गरजल्या असत्या. आमची चिलखते दरवेळेस इतकी ष्ट्राँग नस्तात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विद्यार्थ्यांना पत्र
विद्यार्थ्यांना पत्र वाचण्याची जबरदस्ती नसल्यास त्यात वावगे ते काय?
१) तुमचा प्रश्न सुयोग्य
१) तुमचा प्रश्न सुयोग्य आहे.
२) वाचण्याची जबरदस्ती असलीच तरी कोणत्याही एका विशिष्ठ गटास मतदान करण्याची जबरदस्ती नसेल तर वावगे काय आहे ?
मी ही ते पत्र वाचले आहे.
मी ही ते पत्र वाचले आहे. त्यात निषेधार्ह काय आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे पत्र लिहिणे आचारसंहितेच्या
हे पत्र लिहिणे आचारसंहितेच्या दृष्टिने (काही प्रमाणात त्या पदाकडून लोकांच्या अपेक्षआंच्या दृष्टीने) गैर आहे हे खरे.
त्याच बरोबर, पत्रातील मुद्द्द्यांवरही चर्चा करणे गैर ठरू नये, त्यात काही मोठे तथ्यात्मक ब्लंडर्स दिसले नाहित.
जाता जाता: ज्यांना मोदी येऊ नये असे वाटते ते आपापल्या कपॅसिटीत शक्य तितके सारे प्रयत्न - कायदेभंगाची रिस्क घेऊनही - करताहेत हे अजो यांना पटते आहे काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जाता जाता: ज्यांना मोदी येऊ
काँग्रेस येऊ नये म्हणूनही असे प्रयत्न लोकांनी केले असतीलच की. ही एक बातमी पुढे आली त्यावरून एक्स्ट्रापोलेट किती करणार?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काँग्रेस येऊ नये म्हणूनही असे
काँग्रेस येऊ नये म्हणून काही प्रयत्न करावे लागत असतील ही शक्यता दाखवून दिल्याबद्दल आभार!
मला भेटलेल्या भाजपा समर्थकांच्या मते "काँग्रेस या वेळी भुईसपाट होणारच आहे!" हे गृहित धरूनच ते पुढे बोलतात, त्यामुळे त्यासाठी काही वेगळे प्रयत्न घ्यायची गरज आहे असे त्यांना वाटत नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
म्हणजे
मी कुणीतरी abc मनुष्य आहे.
माझ्या परिचयातील व्यक्तिंना मी माझे राजकिय परिस्थितीबद्दलचे मत सांगू नये का ?
नक्की चूक काय आहे ?
आपण आपल्या मताचा प्रसार करायला वर्तमानपत्रातून वगैरे पॉम्प्लेट्स वगैरे वाटतोच की.
की फक्त "आचार संहितेचा भंग झाला आहे. मतदानाअच्या अमुक इतके इतके दिवस आधी प्रचारात्मक
काही बोलू नये असा नियम आहे. " असे म्हणणे असेल तर तो फक्त तांत्रिक मुद्दा ठरेल.
प्राचार्यांनी त्याची काळजी घ्यायला हवी होती.
आपल्याला पटणार्या धोरणाचा प्रसार्,पुरस्कार्,प्रचार करणे हे फक्त चालण्यासारखेच आहे असे नव्हे तर लोकशाहीचे
गौरवास्पद लक्षण आहे.
लोकशाही आहे म्हणूनच तर मी "थुत त्या मनमोहन्/वाजपेयी सरकारच्या" असे भर चौकात उभे राहून बोलू शकतो ना ?
चार चौघात मला त्यांचं काय पटलं नाही हे सांगू शकतो ना ?
असं सांगण्यात नेमकं चूक काय आहे ?
पत्र वाचलं ; पण लोकांची तक्रार कशाबद्दल आहे हे समजत नाही.
व्यक्तिश: मला मिडियातील काहिंना वाटते तितकी भीती/राग्/द्वेष असं काहीही संभाव्य मोदीराज्याबद्दल वाटत नाही.
एखादेवेळेस असलोच तर मी त्याच्या पक्षाचा मतदारही असेन.
पण संभाव्य मोदी सरकारबद्दल कुणाला काय वाटतं; धाक्-भीती-राग वाटतो; ते बोलूही न देणं; किंवा
"असं बोल्लासच कसं?" , "बोल्लास तर खबरदार्/याद राख" म्हणणं चूक वाटतं वाटतं.
हो, वादविवाद होउ शकतात. पण ते लेखणीनच व्हावेत.
"असं बोल्लासच कसं?" ह्याऐवजी ""असं बोल्लासच का?"" असं विचारत साधार म्हणणं खोडून काढा की योग्य त्या ठिकाणी दम आणि थोडिफार अक्कल असेल तर.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संभाव्य मोदी सरकारबद्दल
ये तो बस झाँकी है!.. असं काही जण हलकेच कुजबुजताहेत का मलाच भास होतोय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कशाला किती महत्त्व द्यावं,
कशाला किती महत्त्व द्यावं, कशाचा काय अर्थ काढावा यासाठी त्या महाशयांची अक्कल किती आहे हे (जर मी मोदीसर्मथक आहे, वा त्यात देशहिताच्या दृष्टीने मला वावगे वाटले तर एक सामान्य नागरीक म्ह्णून) आरामात दाखवून देता येईल. पण त्यात मला रस नाही. ते एक राजकीय मत आहे. त्यांचे पद, संहिताभंग तेच जाणोत. भावना तीव्र असतील तर काहीही रिस्क घ्या, काहीही म्हणा. मी कोण सांगणारा? राजकीय मतांतर म्हणून ते खपून जाईल.
अशा पत्रामागे एक कव्हर्ट अजेंडा असू शकतो ( मला माहित नाही.) सहसा उच्चशिक्षित , उच्चपदस्थ ख्रिश्चन नि भाजपचे जमत नाही. कुरियन त्याचं मोठं उदाहरण आहे. सी वी सी चे अध्यक्ष थॉमस हे दुसरं. भाजपने त्यांना चक्क हाकललं. त्यात कॅथोलिक सोनियांना भाजपने केलेला जहरी विरोध. मग हे लोक खार खाऊन असायची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमी अशी पत्रे ठिक आहेत.
पण ऋषिकेशने concentration camp ची बातमी द्यावी, लोकांना हुकुमशहा आवडतात म्हणावे, मग 'मोदी बहुमताने सत्तेवर आले तर घटनेच्या मूळ स्वातंत्र्यांना धोका असायची शक्यता आहे' असे म्हणावे, हे ठिक नाही. कारण तो संसदेचं वृत्तावलोकन निष्पक्षपणे करतो, त्याला बर्याच भाजप नेत्यांचीही भाषणे आवडतात, (मुस्लिम शासित अखंड भारताबद्दल बोलताना) तो मी बर्यापैकी धार्मिक हिंदू आहे असे म्हणतो, समान नागरी कायदी हवा म्हणतो (I hope I am recollecting this correctly), इ इ. समलैंगिकता त्याचा मुख्य मुद्दा असल्याने तो भाजपला मत देणार नाही हे ओके आहे. तो राजकीय नेता नाही (गृहितक). नि त्याचा कोठला स्वार्थ नाही. पन्नास एक काँग्रेस्यांनी, विरोधकांनी मोदीला हिटलर म्हटले. मला काही फरक पडला नाही. मी पण बायकोला हिटलर म्हणतो कधी कधी. त्यात काय? सेन, कृष्णमूर्ती, लागू, कर्नाड, नंदिता, अख्तर, भट, इ इ मंडळी इतकी जास्त सिनिकल आहेत कि त्यांचा प्रामाणिकपणा फिका पडतो. जाऊ द्या. जयती घोष नि इतर बरेच आकडेबाज वै. intellectually corrupt आहेत. ते ही जाऊ द्यात.
जनतेचा एक अॅटिट्यूड असतो नि एक क्षणिक मूड असतो. त्या क्षणिक मूडच्या आधारावर attitude assess करायचा नसतो. शिक्षित लोकांना नेहमी चांगलं बोलत राहायला हवं. त्याने अटीट्योड चांगला बनत जातो नि क्षणिक मूड उग्र रुप धारण करत नाही. आता समजा प्रत्येक पेपरात, राज्यात, भाषेत, चॅनेलवर आगामी सरकार आणि ज्यूंचा वंशविच्छेद असे लेख/ शो येऊ लागले तर मुसलमान सगळे एक तर घाबरून जातील किंवा घरात तलवारी, बंदुका बाळगून बसतील. हे अपेक्षित आहे का? तुम्हाला 'व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी' होईल असेच म्हणायचे आहे ना? मग हिटलरचेच उदाहरण कशाला? माहौल का खराब करायचा? इतर प्रत्येक अन्यायाला कितीतरी उदाहरणे मिळतील. ती द्यावीत.
लोक शहाणे असतात. ते असल्या बोलघेवड्यांच्या बोलण्यात येत नाहीत. पण जेव्हा आजूबाजूचे सगळे शहाणेच संयम सोडतात, तेव्हा लोक कंफ्यूज होतात.
या महाशयांचे पत्र अत्यंत सयंत भाषेत आहे, आणि मोदी सरकार हे अयोग्य आहे हे त्यांना "माहितच" असले तर त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम्हाला
हिटलरचे उदा मी दिलेले नाही, ते लेखात दिले होते. त्या लेखात दाखवलेल्या साधर्म्यांमध्ये सपशेल नाकारण्यासारखी साधर्म्ये मला दिसली नाहीत.
जर तो लेख हिटलर ऐवजी मुशर्रफ व मोदींची साम्यस्थळे दाखवणारा असता तर हिटलर ऐवजी मुशर्रफ घेत माझी सहमती/असहमती दर्शवली असती, दुसर्या टोकाला जाऊ जर कोणी दलाई लामा व मोदींमधील साम्यस्थळे दाखवली व ती मला पटली तर त्यांच्यातही काही साम्यस्थळे आहेत ते मी मान्य करेनच. जर, जसे रामाने सीतेला सोडले तसे मोदींनीही पत्नीला सोडले असे मला कोणी सांगितले तर राम व मोदींमध्ये पत्नीला सोडण्यापुरते साधर्म्य मी मान्य करायला तयार आहे. म्हणजे मोदी हे राम, मुशर्रफ, दलाई लामा वा हिटलर आहेत असे माझे मत माही (हे कितव्यांदा लिहितोय कोण जाणे)
निव्वळ लोक कन्फ्युज होऊ नयेत म्हणून शहाण्यांनी आपले मत देऊ नये असे वाटत नाही. मत देण्यामागे लोकांना कन्फ्युज करणे हा उद्देश नसावा. कित्येकदा प्रबोधनाची पहिली पायरी ही लोकांच्या मुळ मतापासून हलवून त्यांना कन्फ्युज करण्यातच असते. विशेषतः अंधश्रध्दांच्या बाबतीतले प्रबोधन. मोदीबद्दलची अंधश्रद्धाही यात आलीच. (माझा मोदींबद्दल अंधद्वेष आहे किंवा किमान द्वेष आहे, हे कोणाचे मत असेल तर ते मला नामंजूर आहे इतकेच इथे सांगतो) कोण मत देतंय यापेक्षा काय मत आहे ते आपल्यापुरत्या तर्काच्या कसोटीवर पटतंय का याला मी अधिक महत्त्व देतो. निव्वळ ऋषिकेशने म्हटलंय म्हणून ते मान्य करणे किंवा त्यावर टिका करणे दोन्ही गैरच! त्यातील मुद्द्यांवर सहमती व/वा असहमती असु शकतेच.
सहमत आहे. मात्र त्यांनी सदर मत एक मुख्याध्यापक म्हणून व्यक्त करणे हे नैतिकदृष्ट्या मला गैर वाटते हे ही खरेच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आणखी एक उदाहरण
अडवाणी/मोदी आणि माजी निवडणूक आयुक्त जेम्स लिंगडोह.
जे एम लिंगडोह यांच्या आडनावावरुन पुरेसा 'अर्थबोध' होत नसल्याने मोदी-अडवाणी प्रभृतींनी त्यांना नेहमी 'जेम्स मायकेल लिंगडोह' असे संबोधित केले होते असे आठवते.
http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Did-Modi-try-a-James-M...
???
आम्हाला तर 'लिंगडोह' या केवळ आडनावातूनच भरपूर, नको तितका (अन)र्थबोध होतो ब्वॉ!
'निजलिंगप्पा'नंतर 'लिंगडोह'च! और नहीं कोई दूसरा|
असे पत्र लिहिणे निषेधार्ह
असे पत्र लिहिणे निषेधार्ह आहे.
थत्ते साहेब, का निषेधार्ह आहे ?
१) केवळ ते प्रिन्सी आहेत म्हणून ? ते प्रभावपाडणार्या पदावर आहेत म्हणून ?
२) कॉलेजातील विद्यार्थी इंप्रेशनेबल आहेत म्हणून ?
३) झेवियर्स ला सरकारी मदत असेल म्हणून ?
ऑल इज वेल विथ द वर्ल्ड
बातमीखालचे अनेक प्रतिसाद अपेक्षेनुसार जहाल आहेत. उदा :
विविध लोकांच्या विविध अवयवांचे संदर्भ देणारे प्रतिसादही आहेत. असो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण (फादरचा) कॉन्फ्लिक्ट ऑफ
पण (फादरचा) कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट डिनाय करता येत नाही.
बांगड्या-टिकल्या घालावयास
बांगड्या-टिकल्या घालावयास पोरींना बंदी करणार्या, इंग्रजीखेरीज अन्य भाषा बोलल्याचे आढळल्यास दंड ठोठावणार्या लोकांबद्दल१ अशी भावना झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. शेवटी इरॅशनल गोष्टीचा बॅकलॅशही इरॅशनलच येणार.
१ परिचयात किमान ३ अशी उदा. आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे अवांतर आहे
आणि बांगड्या-टिकल्या घालायची सक्ती पोरींवर करणार्या लोकांचं काय? माझ्या नातेवाइकांत अशी किमान ३ उदाहरणं आहेत. त्यांना उद्देशून बॅकलॅश आला की मात्र 'ज्यात त्यात स्त्रीवाद'!
असो. सक्ती वा बंदी कशाचीच नसावी. आपल्याला जे पटत नाही, त्याला उद्देशून कुठेही बोंबाबोंब केली जाणं हा मानवी स्वभाव आहे, इतकंच दाखवून द्यायचं होतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आणि बांगड्या-टिकल्या घालायची
सक्ती करणारे मूर्खच आहेत. तदुपरि जिथे स्त्रीसंबंधित इश्श्यू पर्टिनंट की कायसा असतो तिथे स्त्रीवाद एट ऑल ठीके. पार्टिनांट्य नसतानाही आणल्यास मग ज्यात्त्यात स्त्रीवाद इ.इ. फ्रण्टलॅश होणारच. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आत्ता तू दिलेल्या प्रतिसादात
आत्ता तू दिलेल्या प्रतिसादात टिकल्या-बांगड्यांवरच्या बंदीचा काय संबंध होता? पण दिलास की नाही? चूक नाही म्हणत, असं होतंच. त्यात इतकं जगावेगळं काही नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
३-२
सकाळपासून बॅटमनने तुझ्या आघाडीवर २ भेंड्या चढवल्या आहेत.
तुझ्या आघाडीने त्याच्यावर ३ भेंड्या चडह्वल्या आहेत.
तुमचं चालु द्या.
मी मोजतोय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संबंध होताच की. भारतीय
संबंध होताच की. भारतीय संस्कृतीची निशाणे दाखवणे कान्व्हेण्टात प्रशस्त मानत नैत या दाव्याच्या पुष्ट्यर्थची उदा. होती ती. त्यातले एक नजरेत भरण्यासारखे उदा. म्ह. ते होते म्हणून दिले. त्यात सिलेक्शन बायस असलाच तर त्याचं कारण हे ईझी व्हिजिबिलिटी इतकंच होतं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सिलेक्शन बायस असल्याचं तू
सिलेक्शन बायस असल्याचं तू मान्य केलं आहेस. तो असतोच, त्यात कुणी कुणाला 'ज्यात तुम्ही तुमचा ...वाद आणून रडीचा डाव करता बॉ' असं भुणभुणून दाखवण्यात अर्थ नाही असं मी म्हणते आहे.
त्यामुळे वादाचं कारण संपलं आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ईझी व्हिजिबिलिटी हे एकमेव
ईझी व्हिजिबिलिटी हे एकमेव कारण त्या सिलेक्शन बायसच्या मागे आहे- माझा अमुकतमुक वाद हा पर्सनल प्रेफरन्स म्हणून नव्हे. त्या दुसर्या केसमध्ये इतकं इंपर्सनल कारण होतं असं दिसत नाही. त्यामुळे अप्रस्तुत वाटण्याला कारण आहे.
तदुपरि वाद घालण्यात कै अर्थ कधीच नसतो फारसा. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतीय संस्कृतीला (भाषा,
भारतीय संस्कृतीला (भाषा, इतिहास, परंपरा इ.) विनाकारण कमी लेखून कुणी पाश्चिमात्त्य प्रथांची भलावण करताना दिसलं की तुझ्या अस्मिता जागृत होताना एकाहून जास्त वेळा पाहिलेल्या असल्यामुळे तो तुझा प्राधान्यक्रम नव्हता, यावर मी विश्वास ठेवणार नाही.
प्लीज नोटः त्यात गैर काही नाही, असं होणं साहजिक आहे असंच मी पुन्हापुन्हा म्हणते आहे. फक्त कुसळमुसळ प्रमाणाकडे लक्ष पुरवावं इतकंच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तू गैर म्हणालीस अथवा नाही असं
तू गैर म्हणालीस अथवा नाही असं म्हणतच नाहीये. मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करतो. कॉन्व्हेंटवाल्यांना शिव्या घातल्या. का? तर भारतीय संस्कृतीची चिन्हे दिसू नयेत (उघडपणे) असे ते केल्याची उदा. ठौक आहेत. त्यामुळे सँपल स्पेसमध्ये सर्वच उदाहरणांत भारतीय ओळखचिन्हांचे सप्रेशन हा कॉमन धागा अगोदरपासूनच आहे. तस्मात टिकलीचे उदा. व अन्य उदा. यांत गुणात्मक फरक नाही. त्यामुळे माझी अस्मिता कशामुळे जागृत होते हे तू जरी योग्यपणे सांगितले असलेस तरी इथे उदा. च्या सिलेक्शन बायसमागे तो निकष नव्हता.
असं होणं साहजिक आहेच, पण इथे विषय तो नाही. शेवटी 'इरॅशनल गोष्टींचा बॅकलॅश इरॅशनल येणार' हे तिथे अगोदरच कबूल केलेले आहेच की. लोकांच्या कैच्याकै कमेंटी येतात त्यामागे काहीएक कारणं आहेत इतकंच सांगायचं होतं. एवढ्यातेवढ्यावरून कुणाला राष्ट्रद्रोही किंवा हिटलर ठरवायला मी आंधळा समर्थक/विरोधक थोडीच आहे कुणाचा?
अॅज़ फॉर ज्यात्त्यात स्त्रीवादः जिथून याची सुरुवात झाली तो मुद्दा मोदीराज्याबद्दल होता. काही विदा इ. न देता केलेल्या आरोपामुळे तशी संभावना होणे क्रमप्राप्त होतेच. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वरच्या प्रतिसादामध्ये: भारतीय
वरच्या प्रतिसादामध्ये:
भारतीय ओळखचिन्हांची दडपणूक करण्याचा काय संदर्भ होता? मोदींबद्दलची अप्रीती शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर लादावा का, ते अनैतिक आहे की बेकायदेशीर, मुळात ते लादणं आहे का - असा मुद्दा होता. तरीही तू ओळखचिन्हं मध्ये आणलीस. का? कारणः तुझा पूर्वग्रह. (तो चूक का बरोबर याबद्दल आपण काहीच बोलत नाहीयोत.)
'ज्यातत्यात स्त्रीवाद' या तुझ्या नेहमीच्या प्रतिसादाला उद्देशूनः
असेच पूर्वग्रह लोकांचेही असतात. लिंग, इतिहास-भूगोलाची पार्श्वभूमी, अनुभव, स्वभावभेद यांमुळे असतात. (पुन्हा एकदा: ते चूक का बरोबर हे अलाहिदा.) आणि ते थेट संबंध नसतानाही मध्ये डोकावतात. त्यामुळे जर त्यातून कुणाचा थेट अपमान / मानभंग केला जात नसेल, तर त्यावरून वृथा हिणवणं टाळावं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भारतीय ओळखचिन्हांची दडपणूक
चिंजंनी त्या बातमीखालच्या प्रतिक्रिया हायलाईट केल्या. तशा एक्स्ट्रीम प्रतिक्रिया येण्यामागे काहीएक कारण असूही शकेल असं मला वाटलं आणि मी ते दिलं इतकंच. त्यात तो संदर्भ आला.
संदर्भ नसताना मध्ये पूर्वग्रह डोकावल्यास हिणवणे क्रमप्राप्तच आहे. मानभंग होत नै इ.इ. कारणं पुढं करून पूर्वग्रहांना वृथा गोंजारू नये या मताचा मी आहे. आता उद्या पाकिस्तानबरोबर व्यापारी वाटाघाटी करताना हिंदूमुसलमान पूर्वग्रहाला गोंजारण्यात अर्थ काय आहे? हे अर्थातच मलाही तितकेच लागू आहे. कुणाला कशाचं तर...इ.इ. म्हण त्यातूनच आलेली आहे ती अगदी अन्वर्थक आहे. पण या केसमध्ये मी जो संदर्भ आणला तो अस्थानी नाही असं मला वाटतं. त्याची कारणपरंपरा मी दिलेली आहेच. ती पटत नसेल तर नाइलाज आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुमचे पूर्वग्रह ते ससंदर्भ,
तुमचे पूर्वग्रह ते ससंदर्भ, लोकांचे ते संदर्भहीन... असो.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
स्वाक्षरी म्हणून चांगली आहे
स्वाक्षरी म्हणून चांगली आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(अतिअवांतर खुस्पट)
वाक्यांश काहीसा 'जुही चावला'सारखा वाटला.
असो. बाकी चालू द्या.
मुद्रितशोधनाबद्दल आभार. चूक
मुद्रितशोधनाबद्दल आभार.
चूक लक्षात येईस्तोवर उपप्रतिसाद आला होता, त्यामुळे दुरुस्ती शक्य नव्हती. पण तुम्ही शुद्धिपत्र लिहिलंत, काम झालं!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
जानवे
जानवे घालायला बंदी केली असे म्हणाला नाहित तुम्ही.
जानवे घातले की नै ते बाहेरून
जानवे घातले की नै ते बाहेरून लगेच दिसत नाही. टिकली इ. लावली असेल तर ते बाहेरून लगेच दिसतं. त्यामुळे तुलना योग्य नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बर मग 'भस्म' लावण्याबद्दलही
बर मग 'भस्म' लावण्याबद्दलही तुम्ही काही म्हणाला नाहीत
इन जण्रल भस्म लावणारे/र्या
इन जण्रल भस्म लावणारे/र्या आणि टिकली लावणार्या यांचे परस्पर % पाहिले तर टिकलीवाल्या जास्त भरतील असे वैयक्तिक निरीक्षण असल्याने भस्माबद्दल बोललो नाही. शिवाय ऐकलेली उदा. भस्माबद्दल नव्हती. असती तर भस्माबद्दलही बोललो असतो, हाकानाका
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हणजे संस्कृती टिकवायची
म्हणजे संस्कृती टिकवायची जबाबदारी बायकांवर आल्ये असं म्हणायचंय का गं तुला?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सेकंड सेक्स वाचा, सर्व
सेकंड सेक्स वाचा, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवांतर होइल
अवांतर होइल, पण बोलतोच.
अशा तथाकथित जबरदस्त्या पब्लिक स्वतःहून मान्य केल्याशिवाय होउ शकत नाहित.
दोषी असलेच तर तशा शाळांत जाणारे अधिक दोषी आहेत.
"ती शाळा वाईट वाईट्ट आहे; नाही त्या गोष्टींची जबरदस्ती करते " असे म्हणणार्यांना एकच प्रश्न :-
"वाईट वाईट्ट शाळेत वर्षानुवर्षे पाल्य पातह्वणारे तुमचे सगे-सोयरे नातेवाईक काय आहेत ?"
शाळेच्या निष्ठा देशाबाहेर आहेत; तर मग अशा रष्ट्र विघातक शाळेत तुमची लोक पोरं काय म्हणून घाल्तात ?
अशा शाळांच्या व्यवस्थापनास जोडे मारण्याआधी त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्यांना का मारु नये ?
तिथे गेलेल्यांच्या देशनिष्ठेवर शंका का घेउ नये?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कॉष्ट-बेनिफिट रेषो इज़ दि
कॉष्ट-बेनिफिट रेषो इज़ दि आन्सर.
अशी अॅक्यूझेशन्स इ.इ. ही कॉष्ट तर कॉन्व्हेण्ट एज्युकेटेड इ.इ. पत एट ऑल हा बेनिफिट. तेव्हा ज्याचा त्याचा हा रेषो जैसा इंटरप्रीटवेल तैसा होवोन जाईल. तदुपरि मुळात असल्या गोष्टी कॉष्ट, अण्डिझायरेबल, इ. वाटावयास कारणीभूत होणारे कॉन्व्हेण्टवाले अधिक दोषी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमन साहेब, काही समजले
बॅटमन साहेब, काही समजले नाही.
१) कॉस्ट कोणास, कोणती व कशी?
२) बेनिफिट्स कोणास, कोणते व कसे?
३) एकाची कॉस्ट ही दुसर्याचा इन्कम असते ना (व इन्कम हा बेनिफिट नाही का ?)
४) एकाचे बेनिफिट्स हे दुसर्याची कॉस्ट असते ना ?
---
तेव्हा ज्याचा त्याचा हा रेषो जैसा इंटरप्रीटवेल तैसा होवोन जाईल. तदुपरि मुळात असल्या गोष्टी कॉष्ट, अण्डिझायरेबल, इ. वाटावयास कारणीभूत होणारे कॉन्व्हेण्टवाले अधिक दोषी.
अधोरेखित भागाबद्दल -
अधोरेखित पहिला भाग - व्यक्तीसापेक्ष असतो म्हणून इंटरप्रिट होईल तेव्हा व्हेरियेशन्स येतील ना ?
अधोरेखित दुसरा भाग - दोषी कोणाच्या नजरेत ? (In the eyes of - Those who pay more costs that the benefits, which accrue to them)
कॉस्ट व बेनिफिट हे दोन्हीही
कॉस्ट व बेनिफिट हे दोन्हीही त्या शाळेत पोरे पाठवणारांस.
इथे तो झीरो सम गेम आहे, पण एक व्यक्ति या न्यायाने पालकांची पॉवर कमी आहे.
बाकी व्हेरिएशन्स येतीलच-पण मुळात अशा एका संस्कृतीला हेतुपुरस्सर नाकारणार्या कॉन्व्हेंट्समुळे बेशिक अधिकारावर घाला येतो. एखाद्याच्या हक्कांची पायमल्ली केली त्याची त्याला जाणीव नसल्याने (या केसमध्ये विद्यार्थी) ते कृत्य कमी त्याज्य होते असे मला वाटत नाही. तस्मात दोषी हे माझ्या नजरेत. हा व्यक्तिसापेक्ष भाग आहेच, आणि त्यातला युनिव्हर्सल भाग म्हम धार्मिक चिन्हे अशी दाबण्याचा अधिकार शाळेस नसावा ही मागणी/मत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुमारीकेची टिकली व बांगड्या
कुमारीकेची टिकली व बांगड्या यात कोणते धार्मिक चिन्ह आहे हा एक जुना विचार डोक्यात आला.
अर्थात शाळेतील मुले-मुली कुमार-कुमारिका असतात हे गृहित आहे हे मान्य!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धार्मिक नसेल, सांस्कृतिक
धार्मिक नसेल, सांस्कृतिक म्हणू. खुश? त्याने मुद्दा बदलत नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फरक पडतो. फक्त 'आमच्याच'
फरक पडतो. फक्त 'आमच्याच' धार्मिक चिन्हावर बंदी का? असा आवेश अनेकदा ऐकला आहे (इथे तो तसा नाहीये असा अंदाज- तेव्हा इथे फरक पडणारही नाही कदाचित)
तिथे हा प्रश्न पडतो. असो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तिथे पडला तर पडूदे. इथे तो
तिथे पडला तर पडूदे. इथे तो मुद्दा नाही. हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन-जैन-बौद्ध-पारशी-ज्यू-मैतेई-बहाई व ते सोडून अन्य जे कुठले धर्म असतील त्या सर्वांबद्दलच हे लागू आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गणवेशाचा भाग असावा
शाळेचे गणवेशाचे नियम करण्यास शाळा स्वतंत्र आहे असे वाटते. बांगड्या टिकल्या न घालणे हा गणवेशाचा भाग असल्याचे पालकांना आधीच सांगितले असल्यास त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे.
सुमारे २० वर्षापूर्वीची गोष्टः आमच्या निमसरकारी शाळेत मुलींना दोन वेण्या व पिनोफोर प्रकारचा ड्रेस असा गणवेश होता. मुलींना बुरखा घालण्यास बंदी होती. बुरखा घालण्याची आवश्यकता भासत असल्यास उर्दू शाळेत प्रवेश घेता येत असे.
बुरखा घालण्यास बंदी ही काही लोकांना इरॅशनल वाटण्याची शक्यता आहे.
(मला स्वतःला बांगड्या - टिकल्या घालावयास बंदी करु नये असे वाटते. मात्र आजकाल मुलामुलींनी डब्यात काय आणावे याचेही नियम शाळा करते. माझ्या (नॉन ख्रिश्चन शाळेत जाणाऱ्या) पुतणीला रोज डब्यात काय आणायचे याचे वेळापत्रक शाळेने दिले आहे. ही इतर शाळांमध्येही सामान्य पद्धत आहे असे दिसले. त्यावर फारसा आक्षेप घेतल्याचे वर्तमानपत्रात वाचले नाही मात्र बांगड्या-टिकल्यांवर ख्रिश्चनशाळांची बंदी आवर्जून चघळली/चघळवली जाते हे रोचक आहे.)
असे बांगड्या टिकल्यांबाबत कोअर्सिंग केल्याने येशूच्या तत्बज्ञानाने प्रभावित होऊन कितीजणांनी धर्मांतर केले आहे?
>>माझ्या पुतणीला रोज डब्यात
>>माझ्या पुतणीला रोज डब्यात काय आणायचे याचे वेळापत्रक शाळेने दिले आहे
माझ्या मुलीला डब्यात पोळीभाजीच आणली पाहिजे अशी सक्ती आहे. सकाळची शाळा असली तरी. दहा वाजताच्या सुटीत पोळीभाजी खायची आणि मग साडेबारा वाजता घरी येऊन पुन्हा पोळीभाजी आणि भात जेवायचा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मार्मिक श्रेणीने समाधान होणार
मार्मिक श्रेणीने समाधान होणार नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नाही
रॅशनल देणे गरजेचे आहे, अन्यथा बुरखा सक्ती हि ह्या न्यायाने(शाळेचे स्वातंत्र्य) योग्य वाटते.
जे घरात बनते तेच आणायला सांगतात पक्षी: जे घरातले वागणे आहे तेच शाळेत अपेक्षीत असल्यास त्यावर गहजब होणार नाही.
रॅशनल देणे बंधनकारक नसावे
अमुकतमुक गणवेश का याचे रॅशनल शाळा देत असेल असे वाटत नाही. माझ्या शाळेत मुलांना गांधीटोपी घालणे सक्तीचे होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गांधीटोपी ही साधारणपणे राजकीयऐवजी सांस्कृतिक परंपरेशी जोडली गेली आहे असा माझा समज आहे. आमच्या शाळेत बरीच मुस्लिम मुले होती. मुस्लिमांमध्ये गांधीटोपीची फॅशन (किंवा सांस्कृतिक परंपरा म्हणूया) बरीच कमी आहे हे सहज कळते. आता गांधीटोपीची सक्ती हे मुसलमानांना सांस्कृतिक अतिक्रमण वाटू शकते. मात्र शाळेला गणवेश ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. गांधीटोपीच का याचे कारण दिले असावे की नाही हे मला आठवत नाही.
गांधीटोपी घातलेली मुले फारच शामळू आणि बावळट दिसतात त्यामुळे शाळेच्या कंपाऊंडच्या आतच टोपी घालण्यात येत असे... काही वर्षांनी गांधीटोपीची अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून शाळेने गांधीटोपीऐवजी 'सोल्जर कट' सक्तीचा केला.
अन्यथा बुरखा सक्ती हि ह्या
माझ्या गावातील जिल्हा परिषदेच्या सरकारी उर्दू शाळेत सर्व मुली बुरखा घालून येत असत.
शाळेचे गणवेशाचे नियम करण्यास
घटनेच्या मर्यादेत.
वाहतुकीच्या नियमांत शीखांनी हेल्मेट घालणे गरजेचे नाही. परिवहन खाते तसा नियमच बनवू शकत नाही. शाळा किस झाड पत्ती.
आपल्या घटनादत्त अस्मितांना आळा घालणारे अवास्तव नियम नसावेत. त्यात एक मर्यादा असावी.
काँव्हेंट शाळांचा पोरांना सगळ्यात जास्त राग येतो तो तिथे "अंडे खावेच लागेल" हा नियम असल्याने. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अवांतर कुतूहलः अंडे सक्तीने
अवांतर कुतूहलः
अंडे सक्तीने खायला घालणारी कुठली शाळा आहे ही?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अंड्याबद्दलचा नियम खरेच आहे
अंड्याबद्दलचा नियम खरेच आहे का? मी असे कधी ऐकले नाही. पण असे असेल तर येडझवी शाळा आहे असेच म्हणावे लागेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शाळेगणिक नियम बदलतात. पण अशी
शाळेगणिक नियम बदलतात. पण अशी शाळा एक पुण्यात/पिंपरीत नि एक उदगीरमधे ऐकली आहे. आता आम्ही अगदीच गावठी शाळेचे असल्यामुळे तेव्हा आम्हाला 'नियम असणेच' खराब वाटायचे. काय नियम तो भाग अलहिदा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अच्छा, ओक्के.
अच्छा, ओक्के.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हिंदू धर्माला नीचे दिखाने का
हिंदू धर्माला नीचे दिखाने का प्रकार कळतो, तो सिद्ध करता येत नाही. तो नियमांच्या पडद्यांआडून असतो. रोज दूध पिणे -भारतीय पद्धत, रोज अंडे खाणे -शास्त्रीय पद्धत. मग ती कम्पल्सरी.
मोदी मुस्लिमांना नीचे दाखवतो पण ते सिद्ध करता येत नाही असं फील ज्यांना आहे त्यांना हा मुद्दा चांगला कळेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
न्यूनगंड
काहीही!
मला आठवते त्यानुसार माझ्यासह आजूबाजूच्या अनेक गावांमधील निमसरकारी शाळांमध्ये सकाळी 'या कुन्देन्दु तुषारहारधवला' ही सरस्वतीवंदना सक्तीची होती. आता काय होत आहे याची कल्पना नाही. पण हा मुसलमान-बौद्धांना नीचे दिखानेका प्रकार आहे काय?
आमच्या शाळेत आम्ही महिन्यातून एकदा चारआणे-आठआणे वर्गणी काढून गुरुवारी किंवा शुक्रवारी दत्ताची किंवा देवीची पूजा करत असू. (प्रसाद व पूजेचे साहित्य आणण्यासाठी शाळेच्या वेळात गावात भटकता येणे हे मुख्य कारण व,नंतर एखादा तासभर पुजेच्या नावाखाली टाईमपास, शिवाय गोळा केलेल्या पैशाची अफरातफर व तत्सम बहुउद्देशीय व्यक्तिमत्व विकास हेही एक कारण). कोणी बुद्धवंदना किंवा नमाज पढल्याचे आठवत नाही. हा कोणत्याही धर्माला नीचे दिखानेका प्रकार असावा काय?
मला खात्री आहे हा आयसोलेटेड प्रकार नसून अनेक गावांमध्ये होत असावे. बऱ्याच वर्गांमध्ये सरस्वती किंवा गणपतीचे फ्रेम केलेले फोटो पाहिले आहेत.
अविनाश धर्माधिकारी यांच्या (बहुदा १ विजयपथ नावाच्या) एका पुस्तकात ज्ञानप्रबोधिनीमध्ये मुलांना इ्ंग्लिश चांगले बोलता यावे यासाठी त्यांच्या शिक्षिकेने शाळेत मराठी बोलण्याची बंदी केली होती असे वाचल्याचे आठवते. त्यावरुन मुले 'तू मराठीत हसू नकोस, तू मराठीत का शिंकला' वगैरे विनोद करत असत.
आता काही वर्षापूर्वी एका ख्रिश्चन शाळेतील शिक्षिकेने, शाळेत इंग्रजीतच बोलावे असा नियम केल्यावरुन गोंधळ झाल्याचे पेपरात वाचले. त्याविरोधात शिवसेना, मनसे व तत्सम हिंदूसंघटनांनी मराठी संस्कृतीसह हिंदू धर्मावरही आक्रमण झाल्याची बोंब केल्याचे आठवते.
आता काही वर्षापूर्वी एका
हा निर्णय बिफोर बीइंग हिंदूफोबिक, मला मूर्खपणाचा वाटतो. अशाने धड काहीच होत नाही. इंग्लिश तर नाहीच नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धर्माधिकारी
शाळेत इंग्रजीतच बोलावे असा नियम केल्याने इंग्रजीची भीती निघून गेली व त्याचा आयएएसच्या मुलाखतींमध्ये अतिशय फायदा झाल्याचे अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
विदाबिंदूसाठी
धन्यवाद. पण सामान्यीकरण करण्याइतपत जोर या एका विदाबिंदूने येत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विदाबिंदू
मुद्दा इंग्रजीत बोलण्याचा फायदा होतो की नाही असा नसून ज्ञानप्रबोधिनीने असा नियम केल्यास तो नाविन्यपूर्ण व फायदेशीर मात्र हाच नियम ख्रिश्चन शाळेने केल्यास ते सांस्कृतिक अतिक्रमण असा अर्थ लावण्याचा आहे.
ह्या पुस्तकात ज्ञानप्रबोधिनीतील सदर घटनेचा संदर्भ आहे. (कुठल्याही परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीसाठी नर्मविनोदी शैलीतील हे पुस्तक छान आहे) http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b54063&lang=marathi
ज्ञानप्रबोधिनीने असा नियम
ज्ञानप्रबोधिनीने असा नियम केला आहे हेच माहिती नव्हते. इन द्याट केस, त्यांचाही निषेधच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ज्ञानप्रबोधिनीने असा नियम केला आहे
ज्ञानप्रबोधिनीतील एका इंग्रजी शिक्षिकेने मुलांचे इंग्रजी सुधारावे म्हणून हा नियम केला होता. सध्या काय परिस्थिती आहे याची कल्पना नाही.
एका 'सेक्युलर' कॉलेजाची गोष्ट
मूळ चर्चेत कदाचित अवांतर होईल, पण हा लेख या उपचर्चेच्या संदर्भात वाचनीय.
छान लेख
सुंदर लेख. असे लेख अधिक प्रसिद्धी असणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये वगैरेही छापले जायला हवेत असे वाटते.
मस्त
तो धागा खूपच छान.
अनेकानेक आभार, नंदनशेठ.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आपला गैरसमज झाला आहे.
आपला गैरसमज झाला आहे. प्रत्येक शाळेतला असा प्रत्येक नियम असा दुरुद्देशाने प्रेरित असतो असे नाही म्हणायचे मला. जेव्हा तो असतो, तेव्हा तो सिद्ध करता येत नाही. काँवेंट वाल्यांचा दुरुद्देशच असतो का हे मी कसे सांगू? काही पोरांना तो तसा वाटतो असा मला फिडबॅक आहे. तो मी नमूद केला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उत्तर
ख्रिश्चन मिशनऱ्यांनी कष्ट करुन देशाच्या कानाकोपऱ्यात दर्जेदार शिक्षणसंस्था आणि हॉस्पिटले उभी केली आहेत. हिंदूंची किंवा महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतीके जपण्यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हे सुरु केलेले नाही. का म्हणून ख्रिश्चनांनी त्यांच्या तत्त्वाला मुरड घालावी?
ही आयजीच्या जिवावर बायजी उदार प्रकारची अपेक्षाच ठेवणे मुळात चुकीचे आहे. महाराष्ट्रापुरते रयत शिक्षण संस्था वगळता हिंदूंची म्हणावी अशी मोठी शिक्षणसंस्था आढळत नाही. (रयत शिक्षण संस्थाही ज्याला रूढ भाषेत 'हिंदू अस्मिता'वाले म्हणतात त्यांची नाही... बहुजनांची आहे) रयत शिक्षण संस्थेतही फार काही सुरळीत आहे असे नाही आणि उरलेल्या शिक्षणसंस्थांच्या तर दर्जाऐवजी भ्रष्टाचार, प्रवेशातील घोळ, पेपर फुटले, बदल्यांमधील अन्याय, सेट-नेट वगैरे मुद्यांचीच नेहमी चर्चा होत असते. त्यामुळे आलेल्या न्यूनगंडातून प्रतिक्रियावादी धोरण म्हणून, नागालँडला जाऊन 'वनवासी कल्याण आश्रम' काढणे वगैरे भंपक उत्तरे शोधण्यात आली आहेत. हेही जमले नाही तर धर्मांतर, मिशनऱ्यांचा पैशाचा स्रोत वगैरे भोंगळ मुद्दे काढून टीका करणे किंवा अंडी खायला घालतात आणि टिकल्या लावू देत नाहीत अशी काहीतरी खुसपटे काढणे सुरु आहे असे वाटते.
कोण आयजी नि कोण बायजी??? उगीच
कोण आयजी नि कोण बायजी??? उगीच वडाची साल पिंपळाला? टिकल्या घालू दिल्याने कसली तत्त्वं मुरडली जाणारेत ते पाहू की. एरवी अर्ध्या चड्डीवरून नाझीपर्यंत नेणारे लॉजिक इथे का कुचकुचते ते कळत नाही. हिंदवेतर प्रत्येक गोष्टीवरची टीका ही न्यूनगंडाधारित असते हा हेत्वारोपच मुळात न्यूनगंड दर्शवतो. स्वतःस तसा न्यूनगंड असेल म्हणून इतरांसही असेल हे म्हणणे अतिशय अज्ञानमूलक आणि तितकेच मूर्खपणाचे आहे.
बाकी चालू द्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शाळा बदला
ख्रिश्चन/कॉन्वेंट शाळांमध्येच शिकण्याचे कोणतेही बंधन हिंदू बालकांवर नाही. या शाळांचे नियम अन्यायकारक वाटत असतील तर उपलब्ध शाळांपैकी दुसरी शाळा निवडा किंवा कॉन्वेंटसारख्या दर्जेदार अशा स्वतःच्या शाळा सुरु करा.
कसलेही उत्तरदायित्व फक्त
कसलेही उत्तरदायित्व फक्त पालकांवर टाकणारं हे अर्ग्युमंट एकांगी आणि म्हणूनच चूक आहे. याच अनुषंगानं बोलायचं झालं तर मग स्वतःच्या जन्मदत्त देशात न राहण्याचे स्वातंत्र्यही प्रत्येकाला आहेच, ज्यांना देशाचे नियम अन्यायकारक वाटतात त्यांनी देश सोडून जावा पण देशात राहून देशाच्या नियमांवर टीका करू नये असंही म्हणता येईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तरदायित्व पालकांवरच आहे
हे आर्ग्युमेंट एकांगी कसे?
नॉन ख्रिश्चन शाळांनी डब्यात काय आणू नये हे सांगितले हे सांगितले तर येडझवेपणा किंवा मूर्खपणा. मात्र ख्रिश्चन शाळांनी कोणते दागिने घालू नये हे सांगितले तर सांस्कृतिक अतिक्रमण आणि देशद्रोह अशी मांडणी विशिष्ट विचारसरणीसाठी सोयीस्कर आहे. मला आज डब्यात पोहेच न्यायचे आहेत मात्र शाळेने पोळीभाजी सांगितल्याने माझ्या खाद्यसंस्कृतीवर आक्रमण होते असाही युक्तिवाद करता येतो. (लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना रेल्वेमधील खानपान सेवांमध्ये फक्त पोळी भाजी व तत्सम पदार्थांना परवानगी दिली होती. इडलीवड्यांवर बंदी घातल्याने द्रमुक-अद्रमुक पक्षांनी योग्य ठिकाणी हालचाल करुन निदान सदर्न रेल्वेमध्ये तरी इडलीवडे मिळतील अशी व्यवस्था केली होती हे त्यासंदर्भातील उदाहरण आहे. मात्र ते खाजगी संस्थेसंदर्भात नसून सरकारी संस्थेसंदर्भात आहे)
राज्यघटनेने तुम्हाला देशात राहण्याचे (व पसंत न पडल्यास इतर देशात कायदेशीररीत्या जाण्याचे व नागरिकत्व सोडण्याचे) स्वातंत्र्य दिलेले आहेच की. मात्र त्याच राज्यघटनेच्या नियमांतर्गत ख्रिश्चन शाळांना त्यांचे व्यवहार स्वतंत्रपणे चालवण्याचे स्वातंत्र्यही दिले आहे.
मिशनरी/कॉन्वेंट शाळा खाजगी आहेत. हिंदू-मुसलमानांनी आमच्या शाळेत येऊ नये असे बंधन त्यांनी घातलेले नाही. त्यांनी गणवेशाचे नियम बनवले आहेत. ज्यांना हे नियम पटत नाहीत त्यांना शाळेत प्रवेश न घेण्याचे स्वातंत्र्य आहे. शाळांचे इतर पर्याय उपलब्ध असल्याने 'दुसरा पर्यायच नसल्याने मिशनरी शाळा त्यांच्या स्थानाचा दुरुपयोग करत आहेत' असेही नाही. हे नियम माहीत असूनही (पुणे परिसरापुरते) बहुसंख्य हिंदू पालक व्हिन्सेंट, लॉयोला, मेरीज, हेलेना, अँड्र्यूज, उर्सुला वगैरे मिशनरी शाळांच्या प्रवेशासाठी धडपड करतात. टिकली-बांगड्या किंवा अंडी यासारख्या मुद्द्यांपेक्षा शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतो.
टिकली-बांगड्यांसारखे मुद्दे आजकालच्या मुलींनाही फारसे महत्त्वाचे वाटत असतील असे वाटत नाही. अनेक शाळांमध्ये मुलांनाही विशिष्ट लांबीचेच केस ठेवण्याची परवानगी असते. एखाद्याला ज्ञानेश्वरांप्रमाणे मानेवर रुळणारे किंवा अमिताभ-राजेश खन्नाप्रमाणे कानावर आलेले केस वाढवायला आवडत असले तरी शिस्तीच्या दृष्टीने शाळांना केसांच्या लांबीवर बंदी आणण्याचे स्वातंत्र्य योग्य वाटते.
नॉन ख्रिश्चन शाळांनी डब्यात
दोन्हींना विरोध केलेलाच आहे. मात्र कशाला विरोध केलाय हे पाहिले तर वेगळ्या मांडणीचे कारण स्वयंस्पष्ट आहेच.
म्हंजे मिडल ग्रौंडची परमिशनच नाही तर. रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हंजे मिडल ग्रौंडची परमिशनच नाही तर. रोचक आहे.
कुठले मिडल ग्रौंड? मला तुमचा मुद्दा समजला नाहीये अशी शंका येते आहे. मला जितपत समजले आहे व सांगायचे आहे त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करतो.
१. हिंदू किंवा मराठी सांस्कृतिक प्रतीके सांभाळण्याची जबाबदारी पाळणारी उत्तम दर्जाची शिक्षणसंस्था हवी असल्यास ज्ञानप्रबोधिनी हा उत्तम पर्याय आहे. अशा आणखी शाळा उभ्या करण्यास राज्यघटना किंवा सोनिया गांधी वा मिशनरी शाळा यांनी प्रतिबंध केलेला नाही. मिशनरी शाळांमध्येच प्रवेश घेतला पाहिजे असाही कुठला नियम नाही. यात स्वतःहून दार बंद करुन घ्यायचे व कोंडले गेल्याचा आव आणायचे असे दिसते.
२. हिंदूंची प्रतीके सांभाळण्याला मिशनरी स्कूलने प्राधान्य दिलेच पाहिजे असे काही नाही. शाळेच्या अंतर्गत कायदेशीर नियमांतर्गत काय चालते हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक शाळेचे आहे. (दुसरे उदा. सरकारी अनुदान घेणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत बुरखा घालण्यास परवानगी नव्हती. मुलांना लांब केस ठेवण्यास परवानगी नव्हती.)
३. हिंदू प्रतीके सांभाळणे हीच ज्यांना प्राथमिकता वाटते त्यांच्यासाठी मिशनरी स्कूल हा पर्याय नाही. मिशनरी स्कूलचे 'ध्येय' येशूचा संदेश तळागाळात पोचवणे हा आहे. हे ध्येय मिशनरी शाळांनी लपवून ठेवलेले नाही. शिक्षणसंस्था किंवा आरोग्यसंस्थांच्या माध्यमातून असा संदेश पसरवण्याचे कार्य ते करत असतात. मात्र अनेक पालकांना त्यांच्या शिक्षणसंस्थांचा दर्जा चांगला वाटतो.
यात देशाचे राहण्याचे स्वातंत्र्य वगैरे मुद्दे असंबद्ध वाटत आहेत. मात्र देशात राहणे आवडत नसल्यास दुसऱ्या देशात जाण्यास प्रतिबंध नाही. (काही देशांमध्ये तसा प्रतिबंध आहे असे दिसते)
टीपः मला स्वतःला बांगड्या किंवा टिकल्या घालण्यास बंदी किंवा सक्ती असू नये असे वाटते. बांगड्या-टिकल्या घालण्यास परवानगी देणाऱ्या शाळेस मी प्राधान्य देईन. मात्र मिशनरी शाळा काही बेकायदेशीर करत आहेत असे नाही. बांगड्या-टिकल्यांपेक्षा शिक्षणाचा दर्जा व तळागाळात शिक्षण पोचवण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे वाटते.
बाकी ठीकच, पण त्यांच्या
बाकी ठीकच, पण त्यांच्या त्यांच्या ज्युरिसडिक्शनमध्ये शाळांनी काही केलं तरी बोलायचं काम नाही अशी भूमिका इथे दिसते जी मला अयोग्य वाटते. रयत इ. अन्य शाळांचे उदा. तुम्ही दिलेय त्यातही कुणी हा मुद्दा उचलून धरल्यास मी त्याला समर्थनच देईन. हिंदू प्रतीके जतन करण्यास प्राथमिकता देणे हा मुद्दा नाहीये, पण प्रतीके नष्टवणारी अशी सक्ती मला चूक वाटते. असे चूक वाटणे हेच मुळात चूक आहे असा काहीसा तुमचा मुद्दा दिसतोय म्हणून त्याला विरोध केला इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फक्त माहितीची देवाणघेवाण
फक्त माहितीची देवाणघेवाण म्हणून, या चर्चेत घुसखोरी करत आहे -
आमच्या (आणि ठाण्यातल्या बऱ्याच मराठी माध्यमाच्या) शाळांमध्ये, निदान २००० साल उजाडेपर्यंत मुलींवर टिकल्या, बांगड्यांची सक्ती होती. काही शाळांमध्ये लाल रिबीनी सक्तीने वापराव्या लागत. (त्यामुळे माझ्या, इतर शाळांमधल्या काही मैत्रिणी केस वाढवतच नसत. लाल रिबीनी फारच गबाळ्या दिसतात, फॅशन नाही म्हणून.) या सगळ्या शाळा निमसरकारी प्रकारच्या - सरकारकडून ग्रँट घेणाऱ्या पण खासगी संस्था शाळा चालवणार असं. माझ्या ओळखीत कोणत्याच घरातून टिकल्या-बांगड्यांची सक्ती नव्हती. पण ठाण्यातल्या, आमच्या भागातल्या आजूबाजूच्या, शाळकरी मुलामुलींना चालत/सायकलने जाता येईल अशा सगळ्याच मराठी शाळांमध्ये अशी सक्ती होती. (महानगरपालिकेच्या शाळांमधलं टिकली-बांगडीचं माहित नाही, पण लाल रिबीनी रस्त्यातून जाताना नजरेत भरल्यामुळे लगेच दिसत.) मुलांनी केस वाढवण्याबद्दल तेच; कापायला लावत.
सक्ती म्हणजे शाळेतून काढणं वगैरे प्रकार नव्हते. पण शारीरिक शिक्षणाच्या तासाला शिक्षा होत असे. शिंगं फुटल्यावर आम्ही त्या तासाच्या आधी दप्तरातून टिकल्या-बांगड्या काढत असू. अडीनडीला टिकल्यांची देवाणघेवाण आणि एकमेकींना टिकल्या भुवयांच्या मध्यभागी लावणं हे एक प्रकारचं (माकडीणी एकमेकींच्या उवा काढतात तसं) बॉडींग वाटायचं. लिहीताना, बऱ्याच मुलींना बांगड्यांचा उपद्रव वाटायचा, पण तेव्हा बंड वगैरे करण्याची बुद्धी (दुर्दैवाने!) झाली नाही. (वर्गात शिक्षकांना त्रास द्यायचा झाला की बांगड्या बाकावर आपटण्याचा उद्योग करता येत असे. पण प्रत्येकीच्या हातात नाममात्र एकेक बांगडी, किती उपद्रव होणार त्यातून!)
आता काय परिस्थिती आहे माहित नाही.
बाकी अतिशहाणा यांच्या प्रतिसादाच्या मतितार्थाशी सहमती आहे.
---
मराठी-हिंदी 'शीरीयली' आणि प्रत्यक्षातली लग्नकार्य, समारंभ पाहता, टिकल्या-बांगड्या ही प्रतीकं नष्ट होतील याची अजिबातच चिंता वाटत नाही. क्वचित वाटलीच चिंता तर त्यातल्या उग्रपणाची वाटते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गमतीशीर
बरीच माहिती नवीन मिळते आहे.
अतिशहाणा ह्यांच्याशी मीही सहमत आहे.
(अर्थातच मला स्वतःला अशी सक्ती असणारी शाळा आवड्णार नाही; पण कुणी सक्तीवाला नियम ठेवला तर त्याला मी हरकतही घेत बसणार नाही.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
...
परिवहन खाते हे सरकारी खाते असल्याकारणाने त्यावरील मर्यादा समजता येते.
कधीपासून?
शंका: त्या परिस्थितीत, आईबापांना सांगून दुसर्या (कॉन्व्हेंटेतर) शाळेत बदली करवून घेण्याचे स्वातंत्र्य प्रस्तुत पोरांपासून नेमके कोणी हिरावून घेतले आहे? (गृहीतक: इलाख्यात कॉन्व्हेंटेतर शाळा आहेत.)
परिवहन खाते हे सरकारी खाते
तसे खाजगी जागेतही घटनादत्त स्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही. शाळा तर रेग्यूलेटेड स्पेस आहे.
मायबापांनी कोंबून कोंबून खाऊ घातले तर मोठी होणारी अशी पिढी कोणताच इगो काँप्रो करत नाही. पण गरीब लोकांना काँप्रोमाइज करणे हा इगो इश्श्यो नसतो. "उज्ज्वल भविष्य" येणार असेल तर ते आता कोणतेही काँप्रोमाइज करतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शाळा स्वतंत्र आहे तसाच मीही
शाळा स्वतंत्र आहे तसाच मीही निषेधास स्वतंत्र आहे. वैयक्तिकरीत्या माझे बुरखा घालणे या प्रकाराबद्दल तितकेसे बरे मत नसले तरी तो हक्क डावलू नये असेच वाटते. तदुपरि डब्यात काय आणावे याचे नियम करणार्या शाळांचाही धिक्कार असो.
आणि निव्वळ धर्मांतर होईल न होईल म्हणून निषेध करायची वाट पहावी काय? हे अतिशय हास्यास्पद आहे. बेशिक वेषभूषेचा हक्क डावलणारे हे कोण टिकोजीराव अशा भावनेतून केलेला तो धिक्कार आहे. धर्मांतराचा मुद्दा आणून टिपिकल उजव्या माणसास चीड आणावी असा डाव असेल तर तो फेल गेला इतकेच सांगतो
असो, बाकी चालू द्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला वाटतंय की पोळी भाजी
मला वाटतंय की पोळी भाजी आणण्याची सक्ती यासाठी असते की मुलांना दुसर्या मुलांच्या डब्यातला पदार्थ पाहून आपल्या डब्याविषयी कोणताही कॉम्प्लेक्स येउ नये.
होय, ते एक कारण देतात, पण
होय, ते एक कारण देतात, पण आठवड्यातील एखाददुसर्या दिवशी वेगळे कै आणायला पर्मिषण असावी असे वाट्टे. गणवेषापासूनही जर बुधवारी इ. सुट्टी असते तर यापासूनही एखाद दिवशी सुट्टी घेतली तर बिघडू नये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गणवेष
गणवेषाच्या सुटीचे दिवस संपले.
internation school नामक प्रकारांचे हल्ली दोन्-दोन गणवेष ठरलेले दिसतात.
सप्ताहातील तीन दिवस एक गणवेष, उरलेले दिवस दुसरा असा प्रकार आहे.
माझ्या आसपासच्या लोकांत आपल्या पाल्याला नॉर्मल शाळेत धाडणारं कुणीच नाहिये.
ही सध्या माझ्या आसपास बसलेली मंडळी सारीच international school मध्ये घालताहेत.
*internation school ,convent school, english medium ह्या सर्व वेगवेगळ्या क्याटेगरी असू शकतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अलबत!
अवश्य.
फाशिस्ट
सहमत. शिवाय, मला नेहमी पडणारा एक प्रश्न -
पुण्यातल्या अनेक आय.टी. किंवा उच्चभ्रू मुलांच्या पालकांमध्ये लोकप्रिय असलेल्या बहुतांश शाळा अनेक जाचक नियम पालकांवर लादताना दिसतात. इतके, की त्या शाळा चालवणारे लोक फाशिस्ट प्रवृत्तींचे असणार असंच वाटावं. तरीही, 'सोशल लॅडर क्लाइंब' करू पाहणारे पुणेरी पालक आपल्या मुलांना तिथे राजीखुशी घालतात आणि सगळे जाच सहन करतात. आणि तरीही, मध्यमवर्गाला फाशिस्ट प्रवृत्तीच्या नेत्यांची आवड आहे ह्यावर शंका का घेतल्या जातात? (ह.घ्या.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मागे आपण एक बातमी पेस्ट केली
मागे आपण एक बातमी पेस्ट केली होती ऐसी मधे. काश्मीर पोलिसांनी १७ वर्षाच्या (बातमीमधे तो पोलिसांवर दगड फेकत होता असे लिहिले होते) अल्पवयीन मुलास हेर म्हणून वापरले, इ इ लिहिले होते. I am not able to locate the link. तिथल्या प्रतिक्रिया इथे पेस्ट कराल का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मागे चिंतातुरनी खालिल बातमी
मागे चिंतातुरनी खालिल बातमी मागे इथे ऐसीवर दिली होती. म्हणजे बातमीतल्या मुख्य पात्राला त्यांची सहानुभूती होती. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया इथे देतोय. त्याही चिकार जहाल आहेत.
http://newint.org/blog/majority/2013/07/22/police-children-spies-kashmir/
•
#1 irfan 22 Jul 13
a criminal is a criminal,it is sad we are supporting a boy who has taken stones in his hands to through it and raising slogans against the India,he was well aware about the act,and who knows what does he narrates is true,it can be concocted story,may be he is supported by separatists to malign the image of men in uniform
•
#2 sajjad Hussain 22 Jul 13
Its shameful and highly deplorable.
•
#4 Jammal Yousuf 22 Jul 13
India has spilled so much Kashmiri blood and committed heinous crimes in Kashmir. And such crimes of arresting minors and abusing them seem ordinary in comparison and get usually unnoticed by media. Thank you Uzma for bringing this to the notice.
Children are a reflection of their parents and adults in a household. Kashmiri children hate Indian occupation and Indian establishment in Kashmir as much as Kashmiri adults do.
•
#5 Raafi 23 Jul 13
JKP home grown terrorists.... (जम्मू कश्मोर पोलिस घरी उगवलेले अतिरेकी आहेत)
•
#6 Syed Difran 23 Jul 13
It is nothing, But genocide of Kashmir!!!
and it is not the first case, here are cases in thousands of kashmiris, who faced the same behaviour!!
there is only one remedy for these cases that is
Drag india to leave Kashmir!!
•
#7 Syed Difran 23 Jul 13
It is nothing, But genocide of Kashmir!!!
and it is not the first case, here are cases in thousands of kashmiris, who faced the same behaviour!!
there is only one remedy for these cases that is
Drag india to leave Kashmir!!
•
#8 Afra 24 Jul 13
I am sad but nit shocked . In fact India commit crimes worst in every respect every day in occupied state of Jammu Kashmir. I wonder when was it last I found any goodness in India....!!
Crimes against children, crimes against women ....crimes against young and old...by Indian forces, has since been order of the day. The wounds and memories of sodomy of small children at Nowhatta police station is still fresh....the huge number of orphans and school drop outs and increasing child labour is a constant reminder of Indian ugly and illegal presence on the soil of Jammu Kashmir.....
•
#10 Misha G 29 Sep 13
There is nothing more baseless and shameful than burning a child's innocence, a child's childhood, a child's soul. The police hsould realize that this is exactly how one breeds demons and monsters. By peeling away the sanctity of the children's soul layer by layer till nothing remains and darkness flows in to fill the void. And this darkness is a fertile breeding ground for hatred, revenge, vengeance and violence. It will all come back to them but sadly, when this wave of fury returns, it will sweep everyone and everything in its path. Leave the kids ALONE!!!
इथे १ व १० नंबर सोडले तर बाकी सार्या प्रतिक्रिया जहाल आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"It is unfair that he isn't
"It is unfair that he isn't even allowing students to make their own decision.
शेलार साहेब हे कशाच्या आधारावर म्हणतायत ?
tank man
निषेधार्ह काय आहे हे अजूनही कुणी सांगितलं नाही.
आचारसंहित, हे एवढच कारण आहे का ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
असं बोललं की आपण कसे
असं बोललं की आपण कसे 'हुच्चभ्रु' नाही, कसे दोन्ही बाजुने विचार करणारे आहोते हे ठसवता येत असावं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
इन द कपॅसिटी ऑफ प्रिन्सिपल
इन द कपॅसिटी ऑफ प्रिन्सिपल लिहिले आहे म्हणून निषेधार्ह
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ओके
ओके.
पण म्हणजेच हे त्याने शाळा कॉलेजच्या लेटरहेडवर न लिहीता साध्या पांढर्अय कागदावर लिहून व खाली स्वतःचे designation न टाकता केवळ नाव लिहून पाठवले असते तर चालले असते, असे म्हणताय का ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नक्कीच.
नक्कीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आक्षेप
मग थत्ते प्लस तुझा आक्षेप विचारकरण्यासारखा आहे.
मी जरा जादाच तावातावात प्रतिसाद दिलेत असं वाटलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बेस्ट कॉमेडी ऑन मोदी
https://www.youtube.com/watch?v=aZDYsSOngik#t=130
केजरीवाल
This comment has been moved here.
जोवरी पैसा तोवरी बैसा?
This comment has been moved here.
पैसे वाटप :(
This comment has been moved here.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
राहूल गांधी यांची मुलाखत
This comment has been moved here.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लिवइनमधील अपत्य 'अनैतिक' नाही
This comment has been moved here.
काही देशांमध्ये
This comment has been moved here.
http://indianexpress.com/arti
This comment has been moved here.
स्पर्धा
This comment has been moved here.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.