दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१८ जानेवारी
जन्मदिवस : न्या. महादेव गोविंद रानडे (१८४२), नाट्यछटाकार दिवाकर (१८८९), 'लॉरेल आणि हार्डी'तला अॉलिव्हर हार्डी (१८९२), रविकिरण मंडळातील कवी विठठ्ल दत्तात्रय घाटे (१८९५), सिने आणि फॅशन फोटोग्राफर जगदीश माळी (१९५२), क्रिकेटपटू विनोद कांबळी (१९७२), सिनेअभिनेत्री मिनीषा लांबा (१९८५)
मृत्युदिवस : 'जंगल बुक'चा लेखक रुड्यार्ड किपलींग (१९३६),अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी रावबहादुर काळे (१९३६), गायक, अभिनेता कुंदनलाल सैगल (१९४७), लेखक सादत हसन मंटो (१९५५), कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे (१९६७), वकील, संसदसदस्य बॅ. नाथ पै (१९७१), शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक प्राचार्य नारायण गोपाळ तवकर (१९८६), साहित्यिक हरिवंशराय बच्चन (२००३)
---
१८८६ : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना; हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता
१९१९ : व्हर्सायची परिषद सुरू, याच परिषदेत राष्ट्रसंघाची निर्मिती
१९१९ : 'बेंटली मोटर लिमिटेड'ची स्थापना
१९३८ : अंदमानच्या कारागृहातून सर्व राजकीय बंदी बाहेर काढले गेले.
१९४४ : भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
१९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच कॉंग्रेस आमदारांचा राजीनामा
१९६४ : न्यूयॉर्कमध्येवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन
१९७७ : लीजन तापाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- सामो
- तिरशिंगराव
प्रतिक्रिया
महान कलाकृती
मला हा कौल म्हणजे जीवनविषयक टिप्पणी वाटते. प्रश्न काय तर '.' या टिंबला एक काहीनाहीपणा आहे. जीवनाचा पोकळ फुगा फोडून टाकून त्याचा गोळा केला आणि घट्ट न्यूट्रिनो स्टार होईपर्यंत दाबलात तर काय उरेल? तसंच हे टिंब पूर्णविराम म्हणून देखील येतं. एका वाक्याचा अंत आणि दुसऱ्या वाक्याची सुरूवात या दोन्हींमधला एक प्रेग्नंट पॉझ. हे आयुष्य म्हणजे या गरोदरपणाच्या प्रश्नाचं एक ओझं आहे. आधीचं ठाऊक नाही, पुढे काय आहे सांगता येत नाही.
आणि या प्रश्नाला पर्याय काय आहेत? आयुष्यालाच पर्याय काय असतो? टिंब क्रमांक १, टिंब क्रमांक २, टिंब क्रमांक ३ - कुठलंही निवडा. उत्तर शेवटी तेच. मूळ प्रश्नाची प्रतिकृती.
केवळ चार टिंब वापरून, किंवा एकच टिंब चारदा वापरून आयुष्याविषयी इतकं गहन तत्त्वज्ञान सांगणारी ही कलाकृती अमूल्य आहे.
तुम्हालाही या कौलाविषयी असं काही भव्य दिव्य, आगळं वेगळं दिसलं तर सांगावं ही विनंती.
_/\_ स्पीचलेस!
केवळ . या कॅरेक्टर मधुन एवढा खरोखर विद्वत्तापुर्ण आणि मौल्यवान प्रतिसाद लिहिल्याबद्दल गुरुजींना त्रिवार प्रणाम. _/\_ (उद्या पुढे मागे या धाग्याला मो़क्ष प्राप्त झाला तर हे अमुल्य ज्ञानकण आपल्या झोळीतुन निसटुन जायला नको म्हणुन स्क्रीनशॉट काढुन ठेवत आहे.
) काय क्वोट कराव आणि काय करु नये, हेच समजत नाही, सगळा प्रतिसादच अमुल्य आहे.
मोजलेली टिंबे
सदर कौलात चार टिंबे वापरलेली आहेत हे घासकडवी यांनी मोजून दाखवल्याबद्दल त्यांचे आभार.
अवांतर :
लिंगनिरपेक्षतेच्या धोरणानुसार पुल्लींगी सामान्यनामांचे स्त्रीलिंगीकरण करणे क्रमप्राप्त आहे. जसे कॉम्युटर -> काँम्प्युट्रेस !
अशा रूपांतरात संगणकाला 'संगणिका' म्हणता येईल का? ('गणयति इति गणिका') शिवाय 'सं' मध्येही एक टिंब आहेच.
कौल सुरेख
कौल सुरेख आणि विचारप्रवर्तक आहे हे मान्यच पण दिलेल्या पर्यायांपैकी एकही पटला नाही.
टिंब ( . ) असा एक चौथा पर्याय हवा होता असे वाटते. पर्याय दिलेला नसल्याने माझे मत प्रतिक्रियेद्वारे नोंदवत आहे.
४- .
"इजा बीजा तीजा" या सूत्राला
"इजा बीजा तीजा" या सूत्राला अनुसरुन मी तिसर्या पर्यायास मत दिले आहे.
टिंबालाच
पिरियड असेही म्हणतात ना?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
टिम टिम टिंबा कि टिम टिम
टिम टिम टिंबा कि टिम टिम टिंबा
संगणकस्नेह्याच्या मार्गात बिब्बा
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गुरुजींचा प्रतिसाद वाचा थत्ते
गुरुजींचा प्रतिसाद वाचा थत्ते चाचा... सखोल रसग्रह्ण कळेल तुम्हाला आमच्या या महान लेखनाचे!
उच्चभृ
कॉलिंग उच्चभृ .
वा वा ऐसीवरील सर्वान महान
वा वा
ऐसीवरील सर्वान महान कलाकृती म्हणून या कौलाचा उल्लेख करता येईल
व्यवसायाने सीएस असल्याने त्या दृष्टीकोनातून मी माझी दिव्यदृष्टी मांडतेय
बऱ्याचदा असं होत की बँलन्सशीटची टोटल लागत नाही. सगळे जर्नल अकाउँट एन्ट्रा बघितल्या जातात. डोक्याला शाँट बसतो. एकनाथाप्रमाणे चूक शोधण्याचा जीवतोड प्रयत्न केला जातो. काँफीचे मग रिचवले जातात. डायरेक्टर्रसच्या नावाने शंख होतो. टँलीचा बँक अप बघितला जातो. घड्याळ्याने दहाची मर्यादा ओलांडली असते. सगळी उचकपाचक झालेली असते. काहीच सापडत नाही.
डोळ्यासमोर उरतो निव्वळ अंधार काळ्या डोह्यातला.
आणि अशावेळी लक्ष जातं ते शून्याकडे.
इथल्या कौलाप्रमाणे चार शून्य राहिलेली असतात मोजायची.
त्यामुळे डेबिट मस्ट ईक्वल टु क्रेडिट होत नाही.
शून्याशिवाय जीवन व्यर्थ आहे हे पटतं.
शून्य नाही तर आयुश्यात बाकी राम उरणारच नाही हे लक्षात येतं.
बाकी शून्य पुस्तक वाचायच ठरतं.
एक शून्य शून्य वेळीच बघितल असत तर नउ टाक्याची वेदना सहन करावी नसती हे पटायला लागतं
साला एक शून्य बँलन्सशीटको टँली करवता नही हा गोल्डन डाँयलाँग आठवतो
तर अशाप्रकारे एका शून्याचे महत्व स्नेह्यानी उत्तमप्रकारे बिँबवले आहे
एक शून्य नसेल तर जीवन किती निरस होईल हे त्यांनी उत्तम सांगितले
ज्याप्रमाणे शून्याचा शोध लावून आर्यभट्टाने भारतीय गणिताला मानसम्नान दिला त्या प्रमाणे शून्याचा कौल काढून स्नेहीनी ऐसीला आंजावरती एका वेगळ्याच उँचीवरती साँरी टिँबावरती नेउन ठेवले आहे
ऐसीच्या वाटचालीत स्नेही व त्याचे टिँबशून्य लिखाण मैलाचा दगड ठरेल अशी आशा बाळगते.
.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदम्
ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||
हेच
ट्म्कायला आले होते. माझं काम तूच करून टाकलंस! याबद्दल तुला ...... धन्यवाद!
श्री संगणकस्नेही यांनी मागे
श्री संगणकस्नेही यांनी मागे आळंदी येथे विपश्यना केली होती असे समजते. त्या विपश्यनेतून श्री स्नेही हे टिंबयुक्त ब्रह्मज्ञान आपणास देत तर नाहीत ना?
------------------------
घणघणतो घंटानाद
श्री संगणकस्नेही यांनी मागे
श्री संगणकस्नेही यांनी मागे आळंदी येथे विपश्यना केली होती असे समजते. त्या विपश्यनेतून श्री स्नेही हे टिंबयुक्त ब्रह्मज्ञान आपणास देत तर नाहीत ना?
आम्ही विपश्यने दरम्यान केलेल्या मौनाची भाषांतरे, तुम्हाला समजली याचा आनंद झाला. . चा अर्थ प्रत्येक जण आपापल्या रितीने, आपापल्या संर्दभात लावु शकतो आणि तेच या महान कलाकृतीचे सौंदर्य आहे.
.
आळंदी येथे विपश्यना ???
आळंदी येथे विपश्यना ??? काहीतरी गोंधळ होतो आहे का ठिकाणावरून? विपश्यना ईगतपुरीला आहे तशी आळंदीलाही आहे काय?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
होय हो, स्वतः संगणकस्नेही
होय हो,
स्वतः संगणकस्नेही ह्यांनीच ती तिथे केली आहे. त्यातूनच त्यांच्या अलौकिक प्रतिभेला घुमारे फुटून हे महान गूढार्थ असलेले टिंबयुक्त ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे.
------------------------
घणघणतो घंटानाद
अच्छा! संगणकस्नेह्याने अभ्यास
अच्छा! संगणकस्नेह्याने अभ्यास संपल्यावर कस्टमाईज विपश्यना केली तर.
ईगतपुरीला मुक्याची विपश्यना तर आळंदीला मुक्यांची विपश्यना आहे होय!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
पाभेजी..
विपश्यना सेंन्टर्स ही भारतातील व संपुर्ण जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांत आहेत, मी आळंदी निवडलं कारण निर्सग रम्य परिसर प्रदुषण मुक्त हवा इत्यादी. http://www.dhamma.org/ इथे विपश्यनेबद्दल अधिक माहिती मिळेल.
फार लांब
मूळ कौल फार लांब. रसग्रहण फार लांब.
- - -
मूळ कौल :
.
().
().
- - -
रसग्रहण :
------------>. |----------->||
^--------|---------|-------^
|----------().-->---|
कलाकृती
अशा कलाकृतींकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. मी तर म्हणेन असे वेगळे दृष्टीकोन असणं हे कलाकारचं यशच समजावं. इथे चर्चाप्रवर्तकाने इतक्या प्रभावीपणे चर्चा मांडली आहे की त्याचे अनेक कंगोरे दिसतात. मला दिसलेल्या अर्थाप्रमाणे रसग्रहण असे आहे.
. ----> ().
. ----> ().
(). ().
-Nile
हा हा हा
धनंजयचं रसग्रहण पाहून चोप्रांच्या रामायणातले एकमेकांवर बरोब्बर टोकं आपटून नष्ट होणारे बाण आठवले. या चित्रांना फेनमन डायग्रॅमच्या चालीवर "धनंजय रसचित्रण" म्हणावे अशी सूचना मांडते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ओ काकू, चोप्रांचं होतं ते
ओ काकू, चोप्रांचं होतं ते महाभारत.
रामायण रामानंद सागरांचं होतं.
------------------------
घणघणतो घंटानाद
..
||
|....|
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आवरा!
दुसरं काय मिळत नाही म्हणून सम्दे कायपण चघळून र्हायले का काय?
रुची
विविध सदस्यांच्या कलानैपुण्यात टिंबे टिंबे प्रीतिर्भिन्न: याची प्रचिती येते आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
टिंबज्ञ.
रसग्रहण :
------------>. |----------->| ^--------|---------|-------^
|-----|
धनंजयांच्या वरच्या अल्गोरिदम नंतर निळ्यांचं हे आलं:
. ----> ().
. ----> ().
(). ().
ऋ चे अधिकच वेगळे.
त्यातुन मुक्तचिंतन झालं की, टिंबाच्या असण्यात, त्याच्या परिघात/सभोवतालात बदल झाला, तर अर्थ बदलतो. स्वतः टिंब अर्थपूर्ण असतांनाच अर्थविहीनही असू शकतो, अन तोच टिंब जागा बदलून गूढ अर्थ सामावलेले प्रतिक म्हणूनही समोर येऊ शकतो. उदा:
. ----> (.)
(.) ----> ( . )
( . )( . )
.
.
( . ) ( . )
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
या बाबतीत पण मिपा च्या
या बाबतीत पण मिपा च्या पावलावर पाऊल ठेवले का ?
आभारप्रदर्शन
राजेश घासकडवी, नितिन थत्ते, जाई, पैसा, पाषाणभेद, घंटासूर, विश्वनाथ मेहंदळे, खवचट खान,
आडकित्ता, चिंतातुर जंतु, ऋषिकेश, ३_१४ वि़क्षिप्त अदिती, limbutimbu, Nile, मी, विसुनाना,
नगरीनिरंजन, धनंजय
आपणा सर्व प्रतिसादकांचा मनापासुन आभारी आहे! आपण माझ्या टिंबाला चार चांद लावलेत!
"."
तो बात फ़क़त एक नुक्ते की है जनाब .. !!
"नुक्ताचीं है!
ग़म ए दिल उसको सुनाये न बने,
क्या बने बात!
जहां बात बनाये न बनाये!"- ग़ालिब
- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!