सुटका

मोकळ्या आकाशी,
ऐसपैस भूमीवर
सुरक्षित छपराखाली,
एक मोठ्ठी चौकट,
अंगचोर दरवाजाची,
आखलेली.
आत तिच्या
अनेक आखीव-रेखीव चौकटी,
ठाकून-ठोकून फिट्ट बसवलेल्या,
प्रत्येकी एक खिडकी अन् एक दरवाजा
राखलेल्या.
खिडक्या-दरवाजे,
कडी-कोयंडा नसलेले
केव्हाही उघडझाप करता येऊ शकणारे.
उगवते-मावळते सूर्य-चंद्र-तारे,
खेळती हवा, मोकळे वारे.
आत-बाहेर ,बाहेर-आत,
इथून तिथे, तिथून इथे,
जा-ये , ये-जा..जा-ये , ये-जा...
येरझारा , येरझारा , येरझारा !
आतल्या आत, आतल्या आत.
गरगरत... भिरभिरत...
बिचकत...
दबकत...थबकत...
आक्रसत...
मोठ्ठ्या चौकटीच्या अंगचोर दाराच्या दिशेने,
सरकत.. सरकत...

field_vote: 
0
No votes yet