गोटीपुअ

हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे.

या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ".

हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार?

गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये पूर्वी देवदासी प्रथा होती. या देवदासी बाहेर नाचू शकत नव्हत्या, मग मुलग्यांना स्त्री वेष देऊन नाचवायची प्रथा सुरु झाली असे म्हणतात. कुणी म्हणतात, जगन्नाथ आणि शिवाची पूजा एकत्र होत असे, जगन्नाथाला स्त्रीच्या विटाळाचे काही नसे, पण शंकराला मात्र "अपवित्र" होऊ शकत असलेल्या स्त्रीदेहाने केलेली आराधना चालत नसल्यामुळे मुलग्यांना स्त्रीवेष देऊन ही नृत्याराधना करण्याची प्रथा रुढ झाली. पंधराव्या शतकात.

कारण काहीही असले तरी नृत्य मात्र आहे रोचक. यावरुनच पुढे ओडिसी नृत्य विकसीत झाले असे म्हणतात. या नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे "बंध". अशक्यप्राय वाटणार्‍या कसरती करत ईशस्तुतीचे विविध नमुने हे नृत्य सादर करते. सहा ते पंधरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना याचे प्रशिक्षण देण्यात येते. पंधरा वर्षांपुढील वयाची मुले हे नृत्य करत नाहीत. याविषयी अधिक माहिती या चलचित्रात मिळेल -

आणि इथेही -

आवर्जून दखल घेण्याजोगा हा नृत्यप्रकार आहे यात वादच नाही. विकीवरही याची माहिती आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

माहितीपुर्ण लेखन. एका वेगळ्याच नृत्य कला प्रकाराची माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली माहिती आहे.

शिकणार्‍या मुलांच्या चित्रफिती चांगल्याच आहेत. सोबत एखादे "गुरू"नृत्य बघायला मिळते का, शोधले पाहिजे. चेहर्‍याच्या हावभावांसह, तालावर प्रभुत्व असलेला कलाकार...

(प्रसिद्ध ओडिसी कलाकार केलुचरण महापात्र [आता हयात नाहीत] यांनी नृत्याची सुरुवात गोटीपुआ मध्ये केली असे इंटरनेटवरून कळले. म्हणजे बहुधा गोटीपुआमधील उत्तमात उत्तम कलाकार पुढे ओडिसीत जात असावेत. महापात्र यांच्या नृत्याच्या अनेक चित्रफिती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्या येथे देऊन गोटीपुअ वरून विषयांतर करत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नृत्यामधलं मला फारसं समजत नाही, पण आवडलं. या मुलांची शारीरिक क्षमता प्रचंड आहे. एक प्रश्न आहे, जुनी परंपरा असणारं बरचसं संगीत हे एकतर धार्मिक असतं नाहीतर महाभारत, रामायण अशा कथांवर आधारित असतं. पहिल्या फितीतले गाण्याचे बोल फक्त तालवाद्यांचे बोल आहेत. हे संगीत नवीन आहे का परंपरागतच आहे?

अलिकडच्या काळात 'यक्षगान' नावाचा कन्नडा लोकनृत्यप्रकार पाहिला होता. यक्षगान पुरूष सादर करतात. मी जे पाहिलं होतं त्यात दोन स्त्री-पात्रं होती आणि त्यांतला एक तर इतका ग्रेसफुली नाचत होता की ही बाई नाही हे सांगितल्याशिवाय लांबून बघून समजणारही नाही. एक धूसर, किंचित हललेला फोटो आहे:
yakshagana

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहितीपूर्ण आणि नाविन्यपूर्ण लेखन - प्रतिसाद!
मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!