सबटायटल्स की डबिंग?

सध्या 'ऐअ' वर टारगेट प्रॅक्टिससाठी वापरल्या जाणाऱ्या 'पुणे-५२' या सिनेमामुळे या विषयावर लिहिण्याचं निमित्त झालं. यू-ट्यूबवर तो पाहात असताना अनेक ठिकाणी मला असं वाटलं की त्याची (इंग्रजी) सबटायटल्स सदोष आहेत, आणि अर्थाचा विपर्यास होतो आहे. (मला मराठी समजत असल्यामुळे सबटायटल्सकडे दुर्लक्ष करणं हा सरळ आणि सोपा मार्ग झाला असता, पण दुर्दैवाने मला ते जमत नाही.) पण 'अमुक शब्द चुकला किंवा तमुक ठिकाणी अर्थछटा ढमुक नसून कामुक आहे' इत्यादि खुसपटं काढत बसण्याचा इथे माझा हेतू नाही.

मुद्दा असा की सबटायटल्स चांगली करणं फार अवघड असावं असं विचारांती वाटतं. भाषांतर नेमकं करणं पुरेसं नाही, तर ते पटकन वाचता येईल असं करावं लागेल. एकतर स्क्रीनवर खाली टायटल्ससाठी जागा तुटपुंजीच असते आणि पुष्कळदा ती वाचायला दोनचार सेकंदच वेळ मिळतो. त्यामुळे मोठे इंग्रजी शब्द किंवा गुंतागुंतीची वाक्यरचना वापरणं बहुतेक वेळा शक्य होत नसावं. (पुस्तक वाचणारा वाचनाची गती स्वत: ठरवू शकतो तसं सिनेमाचं अर्थातच असत नाही. त्यात सबटायटल नीट दिसलं नाही म्हणून रीवाइंड करणं हे कटकटीचं आणि रसभंग करणारं आहे.) याचा अर्थ असा की मूळ सिनेमातल्या भाषेचा जो आयाम आहे त्यापेक्षा सबटायटलच्या भाषेचा आधीपासूनच आखूड असतो. म्हणजे भाषांतर हा प्रकार आधीच भानगडीचा आणि त्यात तो एक हात मागे बांधून करायचा अशासारखं ते आहे.

मग असं असूनही डबिंग हा पर्याय इतका दुर्लक्षित का आहे? मला एक संशय असा की डबिंग हा एकूणच प्रकार अप्रतिष्ठित किंवा 'डाउनमार्केट' समजला जातो. उदाहरणार्थ, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसारख्या ठिकाणी मी तरी डब केलेली फिल्म कधीही पाहिलेली नाही. पण समजा, 'पुणे-५२' सारखा सिनेमा हा अमराठी प्रेक्षकांसाठी इंडियन इंग्लिश अॅक्सेंटमध्ये डब केला तर फार खटकणार नाही. (म्हणजे इतर कारणांमुळे खटकेल, पण यामुळे नाही.) जर यू-ट्यूबवरच टाकायचा तर एक मराठी आवृत्ती आणि एक डब केलेली आवृत्ती अशा दोन्ही टाकता येतील.

एक अंदाज म्हणजे डबिंगला सबटायटल्सपेक्षा जास्त खर्च येत असणार. पण इतकंच कारण आहे की आणखीही काही आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

>> मग असं असूनही डबिंग हा पर्याय इतका दुर्लक्षित का आहे? <<

चित्रपटातल्या मूळ कलाकारानं भूमिका करताना त्यात आपल्या आवाजातूनही अभिनय केला असतो. डबिंगमध्ये ते हरवतं. आवाजातले सूक्ष्म ताण, पिचचा फरक, घोगरा होणं असे अनेक तपशील भाषा कळत नसतानासुद्धा ऐकू येतात आणि त्यातून आस्वादात फरक पडतो. प्रसंग चित्रित करतानाचा आवाज वापरणं (सिंक साउंड) ह्याला मुळात प्रतिष्ठा आहे कारण अभिनेता प्रसंग वठवत असतो तेव्हाचा आवाज त्यात प्रेक्षकाला ऐकू येतो. आपल्याकडे त्याच अभिनेत्याकडून नंतर स्टुडिओत संवाद डब करून घेण्याची पद्धत आहे. तिलाही परदेशात प्रतिष्ठा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लगान आणि दिल चाहता है (२००१) ह्यांनी आपल्याकडे पहिल्यांदा सिंक साउंड वापरला असं ऐकून आहे.
अजूनही आपल्याकडे सर्रास स्टुडिओत संवाद डब करून घेतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख आठवला - http://www.newyorker.com/online/blogs/books/2014/05/translating-frozen-i...

विशेषतः डबिंग करताना येणारी आव्हानं -

Literary translation is challenging, and tends to work best when the translator has recourse to the amplifying and telescoping powers of periphrasis, poetic license, and, if it comes to it, a discreet footnote here or there. Few of these tools are at the disposal of the cinematic translator. The perfect dub must convey meaning within an allotted timeframe. It is often set to music and accompanied by context-specific body language, and must aim to fit the shape of characters’ mouths as they are speaking. Of course, songs also have to rhyme, jokes have to be funny, and cultural references have to be legible to an audience of foreign children. Dubbing is translation in four dimensions.

अवांतर - काही विनोदी सबटायटल्सची उदाहरणं : jaiarjun.blogspot.com/2008/05/dvd-subtitles-he-become-skinny-punctual.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ.

हा प्रतिसाद 'आजचे दिनवैशिष्टय' ह्यासाठी होता. तो चुकून येथे पडल्याचे लक्षात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला स्वतःला सबटायटल्स वाले चित्रपट पाहणे फार अडचणीचे ठरते. चलतचित्र पहावे की खालचे सबटायटल्स पाहावेत यात डोळे आणि बुद्धी दोन्ही शीणतात. त्यापे़क्षा ड्युअल ऑडीओ ट्रयाक असलेले चित्रपट परवडतात. कोणताही एक निवडता येतो किंवा मधेच बदलून दुसरा निवडता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपटांमध्ये सबटायटल्स असतात ती मला पुरेशी वाटतात. डबिंग केलेले चित्रपट बघायला आवडत नाही.
म्हणजे माझे तोंड "च्यायला, गोंधळच झाला की राव!" असे हलावे आणि समोरून "oh! it's quite confusing" असे ऐकू यावे. लिपसिंक नसेल तर बघण्यातली मजा निघून जाते.

मात्र ज्यांना इच्छा आहे त्यांना नाटकांसाठी संसदेत लाईव्ह भाषांतराची जशी सोय असते तशी सोय असावी असे वाटते, ज्यामुळे परभाषेतील नाटकेही बघता यावीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझी शंका :-
जागतिक स्तरावर काय ट्रेंद आहे ?
जपानी लोक आंग्ल चित्रपट सबटाय्टल्सने पाह्तात की डबिंग करुन ?
जर्मन मंडळी चायनीज वा कोरियन वा इराणे चित्रपट कशी पाहतात ?
जपानमध्ये सामान्य जनतेत इंग्लिशचा , जर्मनीमध्ये चायनीज ,कोरियन ,इराणी भाषांचा प्रसार नाहिये म्हणतात .
ती लोक कशास प्राधान्य देत असावीत ?

माझी निवड :-
कधी हे , कधी ते.
इतक्या वेगवान आंग्ल भाषेची सवय नसल्याने "सोशल नेटवर्किंग" तर दर वाक्यानंतर थांबत, खालचे सबटायटल्स वाचून पहावा लागला होता.
इतर चित्रपटांना (मॅट्रिक्स वगैरे) मात्र तशी विशेष अडचण येत नाही.

मधे एकदा जालावर शेक्सपिअरचे काही तुकडे पहात होतो.
त्यात वाक्यातील शब्द कळे. एकूण संपूर्ण वाक्याचा असा नेमका अर्थ कधीकधी लागत नसे.
पण समजल्यास मजा येइ. कैकदा तर quote, म्हणी ह्यांचा उगम नेमका कुठं झालाय ते पाहून मौज वाटे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शेरलॉक पाहताना फार भरभर बोललेले कळत नाही आणि तीन-तीन ओळींचे सबटायटल्स तितक्या भरभर वाचताही येत नाहीत, म्हणून काही दीड तासांचे एपिसोड्स दोन तासांचे करून पाहिले आहेत. (पण फार झाले की असे पॉज करून वाचायचा कंटाळा येतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हीएल्सी मीडिया प्लेअरवर प्लेइंग स्पीड कमी करून पाहता येते. [यात आवाजाचा पिच मात्र बदलत नाही हा फ़ायदा आहे].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जपानी लोक आंग्ल चित्रपट सबटाय्टल्सने पाह्तात की डबिंग करुन ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> जागतिक स्तरावर काय ट्रेंद आहे ? <<

महोत्सवांमध्ये किंवा आर्टहाऊस/इंडी सिनेमे दाखवण्यासाठी प्रख्यात असलेल्या चित्रपटगृहांमध्ये (म्हणजे जिथे चित्रपटाचं कलात्मक मूल्य महत्त्वाचं असतं तिथे) सबटायटल्स वापरतात. व्यावसायिक मूल्य किंवा 'धंदा' जिथे महत्त्वाचा असतो तिथे स्थानिक भाषेत डब करण्याची पद्धत अनेक देशांत दिसते. भारतीय सरकारचा अधिकृत महोत्सव (गोवा) किंवा महाराष्ट्र सरकारच्या 'पिफ'मध्ये इंग्रजीखेरीज इतर भाषांतल्या चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स बंधनकारक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थ्यांक्स.
ह्याचा आणि दूरदर्शनच्या धोरणाचा काही संबंध असावा काय ?
दूरदर्शनवरही जे प्रादेशिक निवडक चित्रपट दाखवले जात, ते सबटायटल्स असलेलेच असत.
तुम्ही म्हणताय त्या धोरणाशी ह्याचा संबंध असेल काय, असे वाटून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> ह्याचा आणि दूरदर्शनच्या धोरणाचा काही संबंध असावा काय ?
दूरदर्शनवरही जे प्रादेशिक निवडक चित्रपट दाखवले जात, ते सबटायटल्स असलेलेच असत.
तुम्ही म्हणताय त्या धोरणाशी ह्याचा संबंध असेल काय, असे वाटून गेले. <<

चित्रपट महोत्सवांमध्ये हे धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाण आहे. आपण ते अनुसरतो एवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला इंग्रजी चित्रपटातले (खासकरून हॉलीवूड) अक्सेंट, संवाद अज्जीबातच कळत नाहीत. आणि सबटायटल्स वाचत बसलं तर अभिनय, दृश्य नीट पाहीलं जात नाही. त्यामुळे कमी क्वालिटीच्या का होइना पण डबिंगची काहीतरी सोय व्हावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल टीव्हीवर इंग्रजी सिनेमांना सब्टयटल्स दाखवायची संतापजनक पद्धत सुरु झाली आहे. आणि कहर म्हणजे, मध्ये एका इंग्रजी चित्रपटात अधुन मधुन चिनी भाषेतले डायलॉग होते. तेव्हा कुठलीच सबटायटल्स नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आजकाल टीव्हीवर इंग्रजी सिनेमांना सब्टयटल्स दाखवायची संतापजनक पद्धत सुरु झाली आहे
ह्यात संतापजनक काय ?
की दुसर्या वाक्यामुळे म्हणत आहात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला नाही आवडत अशी सबटायट्ल्स मध्ये मध्ये आलेली. आणि जेव्हा ज्या भाषेतला सिनेमा आहे त्याच भाषेतली सब्टायटल्स असतील तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अहो, ती बहिर्‍या लोकांकरीता केलेली सोय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह.. ओके. हा विचार नव्हता केला. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कुतुहलः आता तुमचा संताप कमी झाला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile
संताप कमी झाला थोडा.. पण नावड आहे अजुनही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किंबहुना मला वाटलच होतं कोणीतरी विचारणार असं म्हणून. आधिच लिहिणार होतो पण म्हटल बगुयात नक्की कोण विचारतं हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+ छायागीतमधे हिंदी गाण्यांचे सबटायटल्स यायचे ते जनसाक्षरता वाढावी म्हणून असे वाचलेले कुठेतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छायागीत ह्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात सबटायटल्स पाहिल्याचे आठवत नाही.

परंतु, VCR च्या सुरुवातीच्या काळात शेमारू कंपनीच्या विडियो कॅसेट्स येत. त्यात हिंदी चित्रपटाचे (गाणी तसेच संवाद) इंग्रजी सबटायटल्स येत. त्यातील इंग्रजी इतके अफलातून असे की चित्रपट पाहून मनोरंजन होवो वा न होवो पण सबटायटल्स वाचून मनोरंजनाची १००% खात्री!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंगोलीमध्ये असायची सबटायटल्स. हल्ली नसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रंगोलीत गीताची शब्द रचना पुढे पुढे सरके. ग्रेट रेस नावाच्या सिनेमात गाण्याच्या शब्दांवर एक गोळा नाचत पुढे जायचा असे पाहिल्याचे आठवते.
मी हा प्रकार उपयोगात आणायसाठी गीतरामायणाच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त सादर केला गेलेल्या कार्यक्रमातील गीते अनेकदा रस्त्यावरील वाहनांच्या गोंगाटामुळे वा अन्य कारणांनी नीट ऐकू येत नसत. गीत रामायणाचा विशेषतः गदींच्या शब्दसाधनेचा तो गाभा आस्वाद घ्यायला सोपा जावा म्हणून आनंद माडगूळकरांना फोन वरून बोलून सबटायटलिंग अनिवार्य आहे असे सुचवले होते. सुचना मान्य करून त्यांनी योग्य लोकांशी बोलून पाहतो म्हटले होते. मात्र तसा बदल केला गेल्याचे स्मरणात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल घाइघाईत तुम्च्याशे सहमती दाखवली. तुमच्या मुद्द्यात एक कमी आहे. ही सबटायटल्स फक्त ईंग्रजी चित्रपट आणि सिरियल्सनाच का दाखवतात. मराठी/ हिंदी/ बातम्यांच्या चॅनेलवर नाही दाखवत. का फक्त ईंग्रजी चॅनेल्सना उपरती झालेली असते. एका गृपचे सगळे चॅनल दाखवतात सब्टायट्ल्स तर असही नाही. स्टार मूव्हीज दाखवतं तर स्टार प्लस नाही. तुमचं कारण नाही पटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला उलट ते बरे वाटते, पुर्वी ५०% टक्के कळणारे संवाद आता निदान ८५-९०% कळतात. मग एकदाच चित्रपट पाहिला तरी पुरतो! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

इथे मराठी चित्रपट असून, परिक्षण वाचूनही लोकांना चित्रपट कळत नाही, सबटायट्ल्स असल्याने किंवा नसल्याने काय फरक पडणार? पण प्रत्यक्षात सुरुवातीला भाषेच्या लहज्याची ओळख होईपर्यंत सबटायट्ल्स असावेत कारण चित्रपटाचे अनेक पदर शब्दातून व्यक्त होत असतात चित्रपट कंटाळवाणा व्हायला न समजलेले संवाद हे ही एक कारण आहे. लोकल भाषेतील डबिंग नसावे ह्या मताचा आहे कारण ते डबिंग मुळ संवादातील अपेक्षित आशय व्यक्त करणारे असेलच ह्याची शक्यता आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन कमीच आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही प्रसिद्ध परभाषिक सिनेमे सबटायटल आणि डबिंग असे दोन्ही वापरून पाहिले, दोन्हीवेळी निराशा झाली. सिनेमाच्या डिस्क विकत किंवा लायब्ररीतून आणल्या होत्या, म्हणजे कुठेतरी फुकटात हलक्या प्रतीचं म्हणून वाईट असं होऊ नये हा विचार. रोशोमानसारख्या सिनेमाचे डबिंग तरी नीट केले असेल अशी अपेक्षा होती, पण त्यावेळी सबटायटल्सचाच पर्याय निवडावा लागला. डबिंग सबटायटल्स पेक्षा सोपं असेल असं वाटत नाही, पण सबटायटल्सपेक्षा डबिंग जास्त प्रभावी करता येणं शक्य आहे असं मात्र वाटत राहतं. (सबटायटल्सपेक्षा डबिंगकडून अपेक्षा अर्थातच जास्त असतात असं मला वाटतं, कारण सबटायटल्स वाचताना एकंदरीत अनूभवाला थोडा सैलपणा येतो तो डब पाहताना येत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

राशोमॉनची गोष्टच वेगळी. सत्य अनाकलनीय असतं असाच मुळात त्याचा संदेश (माझ्या मते) असल्यामुळे डबिंग/सबटायटल्समध्ये काहीही घोळ घातला तरी तक्रार करता येणार नाही.

पण ते असो. राशोमॉन (सबटायटल्ड व्हर्जन) आत्ता पुन्हा थोडा अध्येमध्ये बघितला. आवाजातले ताण, पिचचा फरक इत्यादि गोष्टी डबिंगमध्ये हरवतील ह्या चिंजंच्या मुद्द्यात तथ्य आहे, पण माझा अनुभव असा की भाषा जर पूर्ण परकीच असेल तर त्यांच्यामागचा 'अर्थ' खात्रीने समजावून घेणं फार अवघड आहे. जपानी बोलणाऱ्याचा आवाजात मला जो ताण वाटतो, आणि त्याचा जो अन्वय मी लावतो तो जपानी माणसाला पूर्ण चुकीचा वाटणं शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

>> सत्य अनाकलनीय असतं असाच मुळात त्याचा संदेश (माझ्या मते) असल्यामुळे डबिंग/सबटायटल्समध्ये काहीही घोळ घातला तरी तक्रार करता येणार नाही.<<

अधोरेखिताशी असहमत. मी राशोमॉनचं शूटिंग स्क्रिप्ट वाचलं आहे, वाईट सबटायटल्ससह त्याची एक आवृत्ती पाहिली आहे आणि चांगल्या सबटायटल्ससह दुसरी आवृत्ती पाहिली आहे. संवादांमधल्या अर्थच्छटा लक्षात घेऊन केलेल्या भाषांतरामुळे चित्रपटाच्या आकलनात फरक पडतो असा माझा अनुभव आहे.

>> माझा अनुभव असा की भाषा जर पूर्ण परकीच असेल तर त्यांच्यामागचा 'अर्थ' खात्रीने समजावून घेणं फार अवघड आहे. जपानी बोलणाऱ्याचा आवाजात मला जो ताण वाटतो, आणि त्याचा जो अन्वय मी लावतो तो जपानी माणसाला पूर्ण चुकीचा वाटणं शक्य आहे. <<

मानवी आवाजातल्या काही गोष्टी संस्कृतिसापेक्ष असू शकतीलही, पण अनेक गोष्टी समान असतात. उदाहरणार्थ, हसतहसत किंवा भावुक होऊन म्हटलेले संवाद ऐकू येण्यासाठी भाषेचं आकलन गरजेचं नाही. बोलता बोलता आवंढा गिळल्यामुळे आवाजात पडणारा फरक, अतिउत्तेजित होऊन घसा कोरडा पडणं, अतिउत्तेजित झाल्यामुळे धाप लागून आवाज बदलणं, प्रसंगभर घसा खरवडून बोलल्यामुळे नटाचा आवाज प्रसंगाअखेरीपर्यंत हळूहळू अधिकाधिक घोगरा होत जाणं, अशा अनेक गोष्टी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाईट सबटायटल्ससह त्याची एक आवृत्ती पाहिली आहे आणि चांगल्या सबटायटल्ससह दुसरी आवृत्ती पाहिली आहे. संवादांमधल्या अर्थच्छटा लक्षात घेऊन केलेल्या भाषांतरामुळे चित्रपटाच्या आकलनात फरक पडतो असा माझा अनुभव आहे.

वरील टिप्पणीबाबत थोडी शंका आहे. एकदा चित्रपट पाहून झाल्यानंतर त्याचे मर्यादित आकलन झालेलेच असते. तो चित्रपट पुन्हा एकदा पाहिल्यानंतर अधिकचे आकलन होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे पहिल्यांदा पाहिल्यावेळी झालेले मर्यादित आकलन हे सबटायटल्सच्या दर्जामुळेच झाले असा निष्कर्ष काढता येऊ शकतो काय? किंवा सुरुवातीलाच चांगल्या सबटायटल्सची आवृत्ती पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा वाईट सबटायटल्सची आवृत्ती पाहताना सबटायटल्सचा दर्जा ओळखता येऊ शकतो काय याबाबत साशंक आहे.

चित्रपट, सबटायटल्स किंवा डबिंगबाबत माझा अभ्यास नाही. साधारण उत्तर अमेरिकन उच्चारांची इंग्रजी बऱ्यापैकी समजते. सदर्न अमेरिकन्स किंवा ब्रिटिश-ऑस्ट्रेलियन इंग्रजीचे काही संवाद झाल्यानंतर तेही समजू लागतात. अगदीच आवश्यक असल्यास मी सबटायटल्स सुरु करतो. (विशेषतः शेरलॉकसारखे अगदी वेगवान संवाद किंवा एबोनिक्सचा भरमसाट वापर असेल तर.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> एकदा चित्रपट पाहून झाल्यानंतर त्याचे मर्यादित आकलन झालेलेच असते. तो चित्रपट पुन्हा एकदा पाहिल्यानंतर अधिकचे आकलन होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे पहिल्यांदा पाहिल्यावेळी झालेले मर्यादित आकलन हे सबटायटल्सच्या दर्जामुळेच झाले असा निष्कर्ष काढता येऊ शकतो काय? किंवा सुरुवातीलाच चांगल्या सबटायटल्सची आवृत्ती पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा वाईट सबटायटल्सची आवृत्ती पाहताना सबटायटल्सचा दर्जा ओळखता येऊ शकतो काय याबाबत साशंक आहे. <<

सर्वप्रथम, 'सबटायटल्सच्या दर्जामुळे आकलन झाले' असं मी म्हणत नाही आहे; तर त्यामुळे आकलनात फरक पडू शकतो असं म्हणतोय. थोडक्यात, आकलनाच्या पातळीमागची कारणमीमांसा करताना सबटायटल्सचा दर्जा हा एक घटक म्हणून लक्षात घ्यायला लागेल असं म्हणतोय.

आता, असा विचार करून पाहा -

शक्यता १ : चांगल्या दर्जाची सबटायटल्स असलेली आवृत्ती आधी पाहिली. नंतर वाईट सबटायटल्ससहित आवृत्ती पाहिली.
जर पहिल्या आवृत्तीतल्या संवादांमधल्या अर्थच्छटांमुळे तुम्हाला सिनेमा कसा अधिक आकळला होता हे तुमच्या लक्षात असेल, तर त्या अर्थच्छटा नंतर पाहिलेल्या आवृत्तीत जाणवत नाही आहेत हे जाणवू शकेल.

शक्यता २ : वाईट दर्जाची सबटायटल्स असलेली आवृत्ती आधी पाहिली. नंतर चांगल्या सबटायटल्ससहित आवृत्ती पाहिली.
पहिल्यांदा पाहताना संवादात न जाणवलेल्या अर्थच्छटा नंतरच्या आवृत्तीत जाणवू शकतात. त्यामुळे आकलनाला मदत होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'फँड्री' अमेरिकेत पाहिल्यामुळे सबटायटल्ससकट मिळाला. त्यात काही ठिकाणी भाषांतर विनोदी वाटलं, वाक्यरचना, शब्दांची निवड या दृष्टीने. पण नंतर सबटायटल्स बघायचा नाद सोडून दिला. जी भाषा आणि नटांचे हेल-बोल समजतात तिथे मला सबटायटल्सकडे दुर्लक्ष करता येतं.
अर्धवट समजणाऱ्या भाषांमधले चित्रपट पाहताना, भाषा शिकायचा प्रयत्न होऊ नये यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते.
'धोबी घाट' नामक हिंदी चित्रपट पाहताना काही संवाद मूळ इंग्लिशमध्ये होते ते पाहताना हिंदीत आल्याचं जाणवलं. दोन्ही भाषा थोड्या थोड्या समजत असल्यामुळे रसभंग झाला. 'आमेली' हा फ्रेंच चित्रपट इंग्लिश डबिंगसकट पाहण्याचा प्रयत्न केला, ते ही जमलं नाही. आता सबटायटल्सच आवडतात; ते वाचायलाही जमतं.

न समजणाऱ्या भाषांमधले चित्रपट पाहताना, 'फँड्री'सारख्या अनुभवांमुळे किंचित धाकधूक वाटते. त्यातही 'क्रायटेरियन कलेक्शन' यांनी प्रसिद्ध केलेली डीव्हीडी असेल तर भाषांतर चांगलं असेल अशी उगाच खात्री वाटते. कारण त्यात चित्रपटासंबंधी वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखतींचे व्हीडीओ, छापलेली माहितीपत्रकं वगैरे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रसास्वाद, कलाकृती घडते तिथल्या मातीचा गंध वगैरे विषयांवर कैकदा रसिकांत चर्चा चालताना दिसतात.
फार पूर्वी राजेश घासकडवी ह्यांनी "झणझणीत पिठल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणाल " अशा काहिशा शीर्षकाचा धागा काढला होता.

आता सबटायटल्स - डबिंग ह्यासर्वांशी हे थेट संबंधित नाही, पण रुपांतर - भाषांतर संदर्भात वाचनीय ठरावं असं वाटलं.
व्यंकटेश माडगूळकरांच्या "तू वेडा कुंभार" चे पंजाबीमध्ये 'चक्का चलदा ए' ह्या नावानं सइ परांजप्यांनी प्रयोग केला; यशस्वी झाला;
त्याबद्दल लिहिलं आहे. (अर्थात दक्षिण आशियात स्वतःचा असा एक समान धागा असल्यानं मूळ लेखन काही अगदिच "परकं" ठरलं नसणार. )

http://www.loksatta.com/lokrang-news/marathi-drama-484687/

बाकी "ती फुलराणी", "अंमलदार" किंवा "पिंजरा" हे बाहेरच्या देशातून येउन इथे चांगलेच रुळलेले दिसतात.
हिंदी मेन्स्ट्रीम बॉलीवूडचं उदाहरण घ्यायचं तर "जो जीता वही सिकंदर "ची प्रेरणा बाहेरची असली, तरी भट्टी जमलेली दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पिन्जरा कुठुन आलाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जर्मन का रशियन कथा का कादंबरी आहे म्हणे एका आदर्शवादी व्यक्तीबद्दल.
ह्या लागू - फुले वगैरे लोकांच्या मुलाखतीतून समजलं. अधिक डिटेल्स माहित नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> पिन्जरा कुठुन आलाय? <<

प्रेरणास्थान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओह! धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !