"कूल" भाषांतरं

रोचना यांच्या या आणि त्याखालच्या प्रतिसादांवरून थोडा विचार करत होते. 'धन्स' आणि 'धन्यु' हे शब्द मला अजिबात आवडत नाहीत. त्यापेक्षा 'तुमच्या धन्यतेबद्दल वाद आहे' असं ज्यांना म्हणता येतं त्यांना (अर्थातच मित्रमंडळ!) एवढं लांबलचक वाक्य म्हणणं मला कूल वाटतं. त्या आधी तोंडात 'भगवंतास्टीक' असा शब्द बसला होता. त्याची 'व्युत्पत्ती' अशी होती की माझ्या एका ब्रिटीश मित्राला मी अनेकदा 'भगवान आप का भला करे।" असं म्हणायचे. त्याला अर्थातच एवढं लांबलचक हिंदी वाक्य लक्षात रहाणं कठीण होतं, त्याने भगवान्+फंटास्टीक जोडून भगवंतास्टीक हा शब्द बनवला, मला तो कूल वाटला, आम्ही सगळ्यांनीच वापरायला सुरूवात केली.

अलिकडच्या काळात आडकित्ता यांच्याशीही हेच बोलत असताना असंच काही बोलणं झालं. रच्याकने अर्थात रस्त्याच्या कडेने = बाय द वे, हे मला अगदीच टुकार भाषांतर वाटतं. विकान्त हा शब्दही मला आवडत नाही. शुद्ध भाषाप्रेमी सप्ताहान्त म्हणू शकतात किंवा माझ्यासारखे धेडगुजरी, वीकेण्ड. व्यनि (का व्यनी?), खरड हे शब्द अस्सल मराठी वाटतात त्यामुळे ते चालून गेले. फेसबुकाला चेपु (किंवा थोपु, थोबाड पुस्तक) म्हणणं रोचना यांच्याप्रमाणे मला कूल वाटलं आणि अनेकदा तो शब्द माझ्या वापरात येतो. पण पुन्हा यूट्यूबला तूनळी म्हटलं की मला बोर्डावर नखाने ओरखडे काढल्यावर काटा येईल तसं काहीसं होतं.

मधेच थर्मोडायनामिक्स आठवतं. एखादी गोष्ट कूल नसली तर ती हॉट असली पाहिजे. तर सध्या भारतात 'कोलावेरी डी' हॉट असावं असं दिसतं आहे. त्यामुळे रजनीकांतला 'कोलावेरी डी' म्हणजे काय हे माहित आहे, हा जोक हॉट आहे. पण हॉट गोष्टही कूलच असते. या कूल आणि हॉटचीही थोडी मजा आहे. स्त्रियांनी चामड्याच्या, मोठी मोठी बटणं असणार्‍या आकाराने मोठ्या पर्सेस वापरणं सध्या साधारणतः कूल समजलं जातं, सध्याची फॅशन. गळ्यात अडकवलेल्या 'हरे कृष्ण हरे राम' लिहीलेल्या झोळीतून 'Science and religion' टाईप पुस्तकं वाचणं सिरीयसली अनकूल असतं, पण अनकूल असणंही एक प्रकारे कूल असतं; त्यातूनही कूल पॉईंट्स मिळतात हे माझं एक निरीक्षण. दुनिया पुण्यात स्कूटर चालवताना कार कधी घेऊ याचं गणित करते आणि आपण सायकल हाणत ऑफिसात पोहोचलो, गेल्या-गेल्या अर्धा लीटर पाणी घशात ओतलं की प्रचंड कूल पॉईंट्स मिळतात. त्यातून आपली सायकल जरा गियरवाली वगैरे असेल तर विचारूच नका.

लिहायचं काय होतं आणि सुरू काय झालं ... हल्ली काही शब्दांमधे 'व'चा 'ब' करण्याची सवय लागली आहे. माझ्या आणि नवर्‍याच्या ओळखीतले काही लोकं 'बेल्स फार्गो' बँकेत अकाऊंट उघडतात, 'एभरीडे' कार चालवतात, इ. त्यामुळे आम्हीपण मजेमजेत असं 'व'चे 'ब' करतो. शिवाय कानावर पडणार्‍या स्पॅनिशचाही थोडा प्रभाव असेल. ओळखीतले काही बंगाली भाताबरोबर 'कार्ड' खायचे, फार वाद झाला की 'आता थांब' असं म्हणताना 'चोर' म्हणायचे मला ते ही कूल वाटायचं त्यामुळे त्याचीही सवय लागली होती. माझेही असे काही उच्चार त्यांना मजेशीर वाटत असतीलच.

मी बरेच दिवस विचार करते आहे की चेपु (किंवा थोपु) हे कूल पण तू नळी का "डाऊनमार्केट"? धन्स आणि धन्यु हे शब्द म्हणजे सरळसरळ 'धन्यवाद' हा शब्द 'थँक्स' किंवा 'थँक्यू' प्रमाणे चालवलेले असल्यामुळे मला कसेतरीच वाटतात. पण भाषांची सरमिसळ असणारा भगवंतास्टीक शब्द कूल वाटतो. त्यात कदाचित ब्रिटीश, पोलिश मुलांना भ म्हणता न येणे आणि त्याचे उच्चार साधारण 'बगुअंतास्टीक' असे होणे हे मजेशीर होतं हे आहेच. पण प्रश्न असा आहे की कोणते उच्चार कूल? I ain't know nothing हे कूल वाटतं पण valid through आणि expiration date असले शब्दप्रयोग ऐकून पुन्हा अंगावर काटा येतो. आज रोचनाही म्हणाल्या, त्यांनाही धन्स आणि धन्यु हे शब्द आवडले नाहीत म्हणून हा किंचित विचार. तुम्हाला कोणते शब्द कूल वाटतात? कोणते शब्द अजिबात आवडत नाहीत? त्यातून काही शब्द कूल आणि काही शब्द अगदीच टाकाऊ असं का वाटतं? मला याचं कारण सापडलेलं नाही.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

*हां; तर असं भन्नाट शीर्षक दिल्याशिवाय पब्लिकचं प्रतिसादाकडं लक्षच जात नाही बर्‍याचदा. *
*आता प्रतिक्रिया देतोयः-*
*कूल म्हणत म्हणत काहिच सीमारेषा राहिली नाही तर काय होउ शकते हे इथे देतोय.*

फ्रेश सब्जेक्ट आणि सिम्पल प्रेझेंटेशन बद्दल आणखी काय कमेंट देणार?
केवळ आयडियाशीर स्टाइलने केलेले रायटिंग फंटास्टिक म्याच झालय.
ही वरची दोन सेंटंन्स इंटरप्रीट करीत बसल्याने तुमच्या ब्रेनचे भुसभुशीत बर्गर बनल्यास प्रस्तुत रायटर (म्हंजे मी)
कलप्रिट नसुन वाचणारे रीडर्सच स्टुपिडिटी प्रदर्शन करताहेत असे प्रूव होते.

ह.घ्या् हे.वे.सां . न.ल.

रूटला हँड घालुन थिंक केलं तर माइंडमध्ये येइल की आपल्या लँग्वेजमधुन कम्युनिकेट करण्यासाठी एखाद्या अदर लँग्वेजचा सपोर्ट घेणं किती शेमास्पद आहे ते.

अरे तुम्हाला काय आयडेंटिटी आहे का नाय?

तुम्हा ऑलचा थ्री वार
प्रोस्टेट
प्रोटेस्ट
प्रोटेस्ट

युवर्सचाच,
माइंडोबा
(मनोबा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला 'धन्यु' हा शब्द गेय वाटतो व अर्थातच कानाला गोड लागतो म्हणून मी तो कधी कधी वापरते.. बाकी 'व'चा 'ब' ही मात्र मज्जाय मग नवरा 'नब्रा' 'न बरा ' असे काय काय होऊन जातो.. Wink आणि हो.. " पण हॉट गोष्टही कूलच असते..." हे आवडले.. !! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

कूऽऽऽल असं आहे ते!! आणि तू फक्त शब्दांबद्दल बोलतेयस का? इतर हॉट आणि कूल गोष्टींबद्दल कोण लिहिणार? उदा... (जौंद्या, कशाला आठवण करून द्यायची? ;))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरुवातीला मी देखील प्रकाटाआ रचाकने वगैरेने गोँधळले होते
नंतर सवय झाली
मलाही ते धन्यु, बै, वगैरे शब्द कूल वाटत नाही
अजून एक म्हणजे केल्या गेले, आहे आवडल्या गेले आहे.
हे काय प्रकरण आहे तेच कळत नाही
चेपु गबोल आवडेश इनो घ्या हे शब्द कूल वाटतात
एकदा मी आंजावरचा मोठे व्हा शब्दप्रयोग चुकून मैत्रिणीँमधे वापरला तर त्यामुळे गंमत झाली आणि तो जाम हिट झालाय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

आदरणीय खगोलीका अदिती

दुहेरी भाषा वापरणार्‍या व्यक्तिमत्वाचा वेध घेताना असे दिसेल की त्यामागे जनुकरावाने जो काही बाजार मनी वसवला आहे त्याचे शारीरिक (शारिरीक नव्हे, बरं का !) आणि मानसिक परिणाम ज्ञानतंतूवर होत असून त्यामुळे भावनांचे पृथःकरण आगळेवेगळे करण्याची दाट (चितळे श्रीखंडासारखी) उर्मी मनी दाटून येते आणि त्याचे ज्या संचितात रूपांतर होते त्यातूनच ती धन्यू-धन्सची राहूकेतू पिलावळ आंदोलित होत असते.

अस्मितेचा आविष्कार हा शब्दांची विविध रुपे दाखवूनच होत असेल तर मग जालीय वापरातील काही शब्द कूल (सो-कुल नव्हेत) आणि काही टाकावू वाटणे याला शरीरशास्त्रात होमिओस्टेटिक घडामोडी (व्वा ! काय अभ्यास आहे, पाटील असूनही ) म्हणतात, आणि त्या रक्त मासपेशात अशा काही रुजल्या जातात की त्यांची निर्मिती नित्यसवयीत होत जाते आणि त्यामुळे वापरणार्‍याला त्या कूलच वाटत जातील यात संदेह नको.

सबब, शब्दांची मोडतोड करीत मतमांडणी प्रभावी वाटणार असेल आणि जर सदस्याचे हे स्वातंत्र्य आपण मान्य करणार असू तर मग कूल-टाकावूचे प्रयोजन शून्यच होईल.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यु, धन्स, रच्याकने आणि तुझ्या भगवंताचे फाळकूट यांपैकी काहीच आवडले नाही. चेपु, खरड, व्यनि वगैरे मात्र आवडले.
तुमच्याकडे फक्त 'व'चा 'ब' आणि 'v' चा 'भी' होतो फक्त? आमच्याकडे 'र'चा 'ड़' देखील होतो. Blum 3
जसे, भेडिएबल, भेक्टड, शोउडभ शडकाड इ. उइकिपिडिया किंवा उएव सारखे शब्दसुद्धा मजेदार वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅ हॅ हॅ..फार्च कुल लेख Smile विशेषतः ३रा आणि ४रथा पॅरा तर अगदी म्हणजे अगदीच मनातला(टॉप्स). Smile

तुम्हाला कोणते शब्द कूल वाटतात? कोणते शब्द अजिबात आवडत नाहीत? त्यातून काही शब्द कूल आणि काही शब्द अगदीच टाकाऊ असं का वाटतं? मला याचं कारण सापडलेलं नाही.

"व" ला जसं "ब" म्हणतात तसं काही वेळेला "व" ला "अ" म्हणण, उदा. वॉटर ला ऑटर, वाजलं ला आजलं थोडं वेगळं वाटतं. धन्यु कॅटेगरितले कोणचेच आवडले नाहीत, त्यापेक्षा लांबलचक "आभारी आहोत, अनंत उपकार झाले" वगैरे कुल वाटतं. बाबांच्या एवजी तिर्थरुप किंवा वडिल असं म्ह्णणं कुल वाटतं, किंवा तिर्थरुप आईस मेल्टेड आईस म्हणणं कुल वाटतं (अर्थात आम्हाला कुल वाटतं), जीन्सवर कोल्हापुरी चप्पल म्हणजे कुलपणाचा कळस, फालतु प्रश्नांवर उत्तराऐवजी ग्रेसछाप दुर्बोध(आम्हाला) कवितेच्या ओळी म्हणणं, बोलता बोलता एकदम बखर-छाप बोलणं कुल वाटतं,

आमचा कट्टा स्नेही वापरतो त्या काही उपमा - फु़कट काम करुन दिल्यास - "थँक्यु अकाउंट मध्ये काम केलं", शंकेला जायचे असल्यास - "शीशु-वर्गात जाउन येतो". अजुनही आहेत पण त्या इथे द्यायच्या लायकिच्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करून येणे, म्हणजे शुक्रिया करून येणे : शू क्रिया करून येणे असा एक वेगळा अर्थ निघतो.
याप्रकारचे अर्थ हे वेगळे विधे होत काय? (मला निन्नीन शब्द साप्ड्लाय. विधा. अन जमेल तिथे विधवून बघ्णारे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यु, रच्याकने हे अजिबातच आवडत नाहित. त्याचप्रमाणे थोबाडपुस्तक पण आवडत नाही. फेसबुक ला एफबी म्हणतात तिथपर्यंत ठीक आहे. [समथिंग आऊट ऑफ द मराठी आंजा.. E&OE (एरर्स अ‍ॅन्ड ओमिशन्स एक्सपेक्टेड)चं मराठी भाषांतर चुभुदेघे (चुक भुल द्यावी घ्यावी) हे मात्र सुपर कूल वाटतं..] अजुन जसे आठवतील तसे इथे देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जालावर, वा एकंदरीतच मराठीचा प्रचार/ आजची भाषा असा कोणताही पावित्रा घेत होणारे अनेक नवे नवे शब्दप्रयोग पाहिले की आता आपल वय झालय असे वाटू लागतः) कुणाला गार गरम काही वाटल तरी त्याची पर्वा न करता सहजपणे जे शब्द येतात ते वापरावे, किमान मी तसेच करते. मारूनमुटकून कोणतीही गोष्ट केली की त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो:)
भाषा माणसांमुळे निर्माण होते, माणसांकरता निर्माण होते. ८५ वर्षाचे माझे आजोबा आणि ६५ चे त्याचे आजोबा अशा व्यक्तींशी संवाद साधणारा- ५ वर्षाचा माझा मुलगा या सर्वांना जोडणारी भाषा आहे ती माझी भाषा आहे:) असे मला कायम वाटत..

शब्द कसे वाटतात हे अर्थातच व्यक्तिसापेक्ष आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

परप्रांत/परदेशवासामुळे माझा आत्मविश्वास तोकडा आहे. त्यामुळे नवे इंग्रजी-स्लँग-अनुवाद वापरण्याबाबत मला तितका आत्मविश्वास नाही.

सैद्धांतिक आडथळा वगैरे नाही - पण धन्यु/धन्स, रच्याकने वगैरे स्वतःहून वापरत नाही. परंतु जे मित्र ते शब्द वापरतात, त्यांच्याशी बोलताना अनुकरणाने "धन्यु" क्वचित वापरतो.

(पण मला "धन्य" "धन्य-आहे= धन्यए" वापरायला सुरू करता येईल. नाहीतरी "धन्यवाद" म्हणजे "धन्य-असे-म्हणणे". किंवा "आभार" म्हणता येईल.)

स्पॅनिश बोलायला नव्याने शिकत होतो तेव्हा स्पॅनिश वाक्ये मला बोलता येत नसत. पण इंग्रजी विशेषनामे स्नॅनिश उच्चाराच्या नियमाप्रमाणे म्हणण्यात गंमत वाटत असे. तशा प्रकारे इंग्रजीत वापरायचो - उगाच मजा.
उआचिन्तोन् (वॉशिंगटन),
तेहास (टेक्सस, पण हा शब्द मुळात मेक्सिकनच आहे, त्यामुळे स्पॅनिश उच्चाराची उरफाटी गंमत)
चिकागो (शिकागो, पण हा उच्चार काही इंग्रजी बोलींमध्येसुद्धा आहे)
विर्हीनिया (व्हर्जिनिया)
केऽबिन् (केव्हिन - पुरुषाचे नाव)
दीआन् (डायॅन - स्त्रीचे नाव)
वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"धन्य-आहे= धन्यए" प्रमाणेच "ठिक-आहे= ठिकाय" किंवा "बराय" असे पण म्हणतो, तसेच "ओके=ओकाय किंवा ओकी" असे देखिल प्रचलित आहे.

तसेच इंग्लिश बोलताना नाउनच्या(नामाच्या) आधी किंवा रँड्म्ली कुठल्याही शब्दाच्या मागे 'एस' लावणे किंवा 'दि' मधेच कुठेतरी घालणे कधी कधी कुल वाटते. (सलाम नमस्ते वाला जावेद जाफरी टैप्स). उदा. - आय दि डोन्ट दि लाइक्स दि इन्डिअन्स'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, तू जे लिहीलं आहेस हेच बरोब्बर मला 'डाऊनमार्केट' वाटतं; तुझा तोच उद्देश होता हे समजतं आहे. इंग्लिश शब्द मराठीतल्या शब्दांप्रमाणे चालवणं किंवा उलट. सीडी सारख्या शब्दांचं मारूनमुटकून भाषांतर्/अनुवाद केला तर तो मला फार रटाळ वाटेल. त्यापेक्षा सीडी हाच शब्द मराठीत आणायचा, एक सीडी, अनेक सीड्या; जसा 'वायसर' मराठी शब्द आहे, टोमॅटो हा मराठी शब्द आहे तसंच. रटाळ हा शब्दही असाच कूल वाटतो, जसा 'बोअर मारतंय' हा शब्दप्रयोग. "भगवान ब्ला ब्ला ब्ला" बोलता न येण्यातून शब्द तयार होणं वेगळं आणि "बाय द वे"च्या जागी "पण ते असो" किंवा असा काहीसा शब्दप्रयोग करणं वेगळं आणि अशा शब्दप्रयोगांचं शब्दशः भाषांतर वेगळं.
अजून एक प्रकार म्हणजे बोलतो तसं लिहायचं, ऑपॉप, शी बै, फार्फार (फारफार आणि फार्फार यांच्या अर्थात बर्राच फरक असू शकतो.) असे शब्दही कूल वाटले नाही तरी चालून जातात. त्यापेक्षा "बर्मग्ठिव्का", "आर्मला टावर्नाय" असे शब्द गोड वाटतात.

दिलतितली, तू बोललीस तेव्हा लक्षात आलं, आम्ही इंग्लिश शब्दांमधेच 'व'चा 'ब' करतो, पण न-बरा हे तुफान आहे.
मिहीर, तू दिलेले उच्चार आणखीनच गोंधळवणारे आहेत. Biggrin

श्री. पाटीलः तुमचा प्रतिसाद मजेशीर आहे खरा! पण मुद्द्याचं म्हणाल तर, मी अमक्या प्रकारचे शब्द वापरते. आणि काही प्रकारचे शब्द ऐकले की मला अंगावर पाल पडल्यासारखं होतं. यात काही पॅटर्न आहे का, काही लॉजिक आहे का असा विचार मी करत होते, जो जमला नाही म्हणून मोडकेतोडके विचार मांडले.

मी: तुमचे सगळेच कूल शब्द आवडले. किंबहुना काही वापरात आहे. आमचा एक जुना शेजारी (याचं वय आता ४०) वडलांचा (काकांचं वय ७०+) उल्लेख 'आमचे हीरो' असा करतो, किंवा "ओ हीरो, पानं घेतली आहेत, चला आता!" असं म्हणतो ते ही मला कूल वाटतं. दुर्दैवाने आमच्या 'हीरों'ना हीरो असं हाक मारण्याचं धाडस थोडं उशीराच आलं.
इंग्रजांच्या बोलण्यात "बअर", "वॉअर" असे काहीसे उच्चार ऐकले आहेत, 'ट' चा 'अ' (साधारण).

सुवर्णमयी: प्रतिसाद आवडला; पण हे गार-गरम भाषांतर अगदीच अनकूल आहे. Wink शारीरिक वय वाढणं अपरिहार्य आहे, नैसर्गिक आहे. पण नवनवीन शिकत रहाण्यामुळे मेंदू ताजा राहू शकतो. तेवढंच करायचं. "डाऊन विथ नॉस्टॅल्जिया; जय हो मुसुबाबा की!"

धनंजयः धन्यए, याचा बोलताना अर्थ "धन्य आहे" असा निघू शकतो, ज्याला वेगळा अर्थ आहे. तिथे म्हटलं तर गडबड होईल, म्हटलं तर कोटी.
'तेहानो' हा उच्चार समजला तेव्हापासून माझ्या तोंडात टेक्सस येणं कमीच झालं. मला टेक्सस हा उच्चार जीभेला कठीण वाटतो आणि 'तेहानो' सोपा आहे असंही कारण असेल. बाकीच्या नावांचे उच्चार मलाही मजेशीर वाटले.

-- अदिती "हो"शी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती "हो"शी.

शी शी शी शी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या पैकी एकदेखिल माझ्या वापरात नाही. पण वाचतांना गंमत वाटते खरी! "आर्मला टावर्नाय" पहिल्यान्दाच ऐकलं. काय हो अर्थं त्याचा?
"आमाला पावर नाय" ऐकलं होतं बुवा.
मी मराठीच काय इंग्लिश सुद्धा स्लॅन्ग वापरत नाही ( प्युरिटन ना आम्ही!!!!) त्यामुळे कामावर एखादेवेळी असा जाणून बुजून शब्दप्रयोग केलाच तर सहकर्मचारी त्याबद्दल चर्चा अणि टिंगल करतात... सर्वं मजेतच अर्थात!
"बर्मग्ठिव्का" ? Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुल भाषांतर - तो प्रेमभराने तिचे ओठ किसु लागला
अनकुल भाषांतर - तो प्रेमभराने तिला कडकडुन हगला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला चेपु कूल नाही वाटला, शब्द ऐकून मी गार झाले!
प्रकाटाआ माहित आहे - रच्याकाने, गबोल म्हणजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रच्याकने गबोल = जीटॉक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखात व्यक्त केलेली बरीचशी मते मान्य आहेत. पण हे कूल आणि हॉट असण्याचे प्रकरणच मुळात (आमच्या जुनाटपणामुळे) आम्हाला पटत नाही.
शिवाय :"त्यामुळे रजनीकांतला 'कोलावेरी डी' म्हणजे काय हे माहित आहे, हा जोक हॉट आहे." हे वाक्य खटकले.
कोलावेरी म्हणजे 'रक्तपिपासू' (ब्लडसकर) असे आमच्या काही तमिळ मित्रांकडून समजले. आमच्या आवडत्या रजनीकांतवर केलेला जोक फसला आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं कूल असण्यामध्ये थेट भाषांतराचा संबंध नाही. रुळलेल्या शब्दाला कूल साउंडींग शब्द मिळाला की तो आपोआप हॉट अन हिटही होतो.

पुण्यात इंजिनिअरींगला असताना 'पुण्यामुंबईकडच्या' पोरांमध्ये शिंच्या शब्द आम्ही कूल करुन टाकला होता. जो दिसेल तो शिंचा. पुढे मद्रासात गेल्यावर आम्ही सगळ्यांना यनगूंडू केला होता. हे शब्द नंतर बराच काळ हिट होते. आमचा मामा मूड मध्ये आला की (बरेचदा लॅडिज खेळताना तो मूडमध्ये येत असे) "शतमूर्ख आहेस" किंवा "सहस्त्रमूर्ख आहेस" वगैरे म्हणायचा. मग आम्ही शाळेत बर्‍याच जणांना शत नाहीतर सहस्त्रमूर्ख केलं होतं. इथं अमेरिकेत आल्यावर पांढरपेशी मित्रांमध्ये आम्ही "Holy Buttercup" फेमस केला.

आमची शाळा तशी खेडेवजा शहरात होती. तिथे अगदी पाचवीतला पहिल्या बेंचावरचा पोरगाही भकार-झकार शिव्या सहज द्यायचा. पाचवीतच ह्या शिव्या अतिवापराने बोथट झाल्यामुळे काहीतरी करावे असा विचार आमच्या मनात आला. तेव्हा नुकताच 'समागम' हा शब्द कुठेतरी वाचला होता (तेव्हा आमचे वाचन 'दांडगे' होते.. पण ते असो). झालं.. आम्ही लगेच भकाराचे उत्तर 'समागम्या'-ने देऊ लागलो. आठवड्यात शब्द हिट्ट झाला. सुरुवातीला पोरांना अर्थ कळत नसल्याने पोरं लै वैतागली पण हळू हळू मोठ्या भावंडांना, मित्रांना वगैरे विचारून त्यांनी आपले भाषिक ज्ञान वाढवले आणि शब्दाला पापिलर केले.

तर सांगायचा मुद्दा काय की अर्थ लगेच कळणार नाही किंवा थोडासा न-रुळलेला असा शब्द वापरून इंप्रेस करायला जमलं की ते आपोआप कूल होतं. धन्यु वगैरे मध्ये मला मिळमिळीतपणा वाटतो. जसं सुशिक्षित-शहरी लोकांना नमस्कार म्हणताना एकदम गिळगिळीतपणा वाटतो. त्यापेक्षा रामराम म्हणलं की मजा येते. खेड्यात राम्राम म्हणाल तर तिथे सगळे राम्रामवाले, तिथे 'काय हिरो काय म्हंतो' म्हणून पहा. आमच्या नगरला गेलात तर तिथे सगळेच "काय रे" इतकंच म्हणतात. तिथे जोरदार हेल काढून "नमस्कार" म्हणून पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेपु पेक्षा मुख-पृष्ठ हा शब्द यथायोग्य आहे असे वाटते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

मला चेपु बरे वाटते पण ..थोपु पेक्षापण थोबाड्वही जास्त कूल वाटतं.

आणखी आमच्या कॉलेज ग्रुप मधली काही प्रिय वाक्ये

१. थॅन्क यू - मंडळ आपले आभारी आहे.
२. कोणी अपेक्षित असलेली, वेगळी बोलून दाखवण्याच्या लायकीची नसलेली, फुटकळ गोष्ट बोलून दाखवत असेल (उदा: मी ना आज चहा केला, मी आज तुला स्वतःहून फोन केलाय बर का इ.इ.) - हे केल्याबद्दल तुमचा शनिवारवाड्यावर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल.
३. थापा मारणार्‍यास - उगा "मनाचे श्लोक" नकोत!

अजून आठवेल तसे लिहीन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आम्ही 'जुने, आजोबा' असल्यामुळे आम्हाला 'कूल' हा शब्दच पचत नाही. त्यामुळे या चर्चेत भाग घ्यायला आम्ही पात्र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अहो 'जुने आजोबा', माझा एक मित्र आहे. वय साधारण ५६-५७ असेल. मी शिकत असताना आम्ही एक 'फंटू२२२श' नामक टुकार सिनेमा पाहिला होता; त्या पिच्चरमधे 'बभूषा' नावाच्या राजाचं पात्र आहे. आम्ही फोनवर बोलतानाही तो 'बभूऽषा' अशी आरोळी एकदातरी देतोच.
या मित्राच्याच म्हणण्याप्रमाणे, ते लोकं कॉलेजात असताना बेल बॉटम ट्राऊजर्स घालण्यावर बंदी आणायचा विचार सुरू झाला. या काही लोकांनी त्याला विरोध केला. "ट्राऊझर्स घालायला सुरूवात करणार्‍यांनी बेल बॉटम्सवर बंदी का आणावी?" असा त्यांचा प्रश्न होता. तेव्हा बेल बॉटम्स "कूल" होत्या. तुमच्या काळात असंच काही ना काहीतरी कूल असणारच, फक्त त्याला कूल म्हणत नसतील, दुसरा काही शब्द असेल. कपड्यांच्या फॅशनी जशा परतपरत येतात तशाच शब्दांच्याही येतील कदाचित!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या काळी 'कूल' ला समांतर काहीतरी शब्द नक्की असेल.
मीही त्याकाळात 'बेल बॉटम' घातली आहे. कंबर ३४" आणि बॉटम ४०". शब्दशः पँट फलकावतच चालायला लागायचं. त्यावेळेस 'स्ट्रेचलॉन' कापडाची पँट शिवायची फॅशन होती. त्यात मात्र आतमधे लिटरली 'कूल' वाटायचं. काही मित्र त्याला 'खेचलॉन' म्हणायचे. बराय, जेवायची वेळ झाली, कवळी घालायला
पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

"खेचलॉन" शब्द भयानक आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी आहे शब्द!

तिरशिंगराव, तुमच्या कवळीमुळे एक आजोबा आठवले. एखादा पदार्थ अतिगोड किंवा आंबट असेल तर "दात आंबले माझे!" अशी तक्रार करायचे. आम्ही पोरांनी त्यांना छळलं की झटक्याने आम्हालाच झटकायचे. ते आजोबाही 'कूल' होते. तुम्ही तुमच्या वेळच्या कूल गोष्टी लिहा हो, वाचायला मजा येईल. आता जुन्या जमान्यातले कपडे पाहून गंमत वाटते तसंच काहीसं, म्हटलं तर स्मरणरंजन पण म्हटलं तर मजेशीरही!

(कधीमधी दोन वेण्या घालून बसणारी) अदिती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कंपू हा शब्द देखील 'कंपनी' ह्या इंग्रजी शब्दाचे कूल भाषांतर / विडंबन करून बनविला गेला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com