ही बातमी समजली का? - ३४
आजच्या 'लोकसत्ता' मधल्या या बातमीने लक्षं वेधले
'शाळा आमच्या ज्ञान तुमचे'
http://www.loksatta.com/mumbai-news/tata-to-adopt-government-school-717606/
सध्या असलेली सरकारी शाळांची दयनीय 'स्थिती' , शिक्षणाचा आणि शिक्षकांचा खालवत जाणारा दर्जा , विषेशतं पुराण झालेली शिक्षण पध्दती हे सगळं बघता, टाटां' सारख्यां संस्था चे हे पाउलं उत्साह वर्ध़़्क आहे.
'टाटां' सारख्या संस्थानी पुढाकार घेतल्यामुळे एकूणचं 'शिक्षणसंस्थेला' आलेल कंटाळा/आळस घालवायला मदतं होईल असे वाटतय.
मी इथे 'टाटां' यान्चे नाव खूप आदरपूर्र्वक घेते आहे कारण, त्यांनी या पूर्वी देखिल, वेळो-वेळी वेग-वेगळया सामजीक क्षेत्रात 'अभ्यासपूर्वक' केलेले काम
सर्वात महत्वाचे म्हणजे या क्षेत्रातील संशोधनाला वेग आणि funding मिळेल
नवे उपक्रम राबवणे, शिक्षण पध्दतीमधे आवश्यक ते बदल वेळेत करणे या सारख्या अनेक घोष्टी फालतू vote bank politics च्या मोहोता़ज राहाणार नाहीत.
ख्ररतर जगातील बर्याच देशान मधे प्रार्थमिक शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांसाठी सरकार स्वतं सक्षम असते, पण आपल्याइथे सरकारच्या क्रूपेवर चालणार्या सगळ्याच योजना भ्रष्टाचाराच्या बळी पडतात!
म्हणूनच कदाचित आज सरकारने मारलेल्या ह्या बोंबेला, टाटांनी दिलेला प्रतिसाद हा एखाद्या मित्राच्या 'सादे 'पेक्षा कमी नाही
वा उत्तम बातमी.
वा उत्तम बातमी.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काश्मिरात अल कायदा अन आयसिसचे
काश्मिरात अल कायदा अन आयसिसचे झेंडे फडकवले गेले.
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4753735135965957121&Se...!
स्वतः स्वतःचे संरक्षण करायची औकात नाही आणि चालले स्वायत्तता दाखवायला. हाड थू त्यांच्यावर. दीडदमडीचे फडतूस आणि माज तरी किती असावा. यांचा माज कठोरपणे मोडून काढला पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मागची
मागची काही दशके मिलिटरी वगैरे घुसवून ठेवण्याचा कठोरपणा सुरुच आहे की.
( काश्मीरातील प्रतिनागरिक सैनिकी उपस्थिती जगातील सर्वाधिक म्हणता यावी इतपत आहे.)
अजून काय करायचं नेमकं?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अजून वाढवा, कायतर करा पण ही
अजून वाढवा, कायतर करा पण ही ब्याद खतम करा. काय करायचं ते कळत असतं तर मीच झालो नस्तो का पंतप्रधान?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यांचा माज कठोरपणे मोडून काढला
यांचा माज कठोरपणे मोडून काढला पाहिजे.
का ओ ????
कठोरपणे च्या ऐवजी "क्रूरपणे व निष्ठुरपणे" - हे शब्द वापरायला लाजता का ???? (की जालीय रेप्युटेशन प्यारे आहे म्हणून डेलिबरेटली स्केल डाऊन केलात प्रतिसाद ???)
(की जालीय रेप्युटेशन प्यारे
जालीय रेप्युटेषन प्यारं असतं तर आक्रस्ताळे स्त्रीवादी/समतावादी/सेकुलरवादी प्रतिसाद सोडून काही दुसरं लिहिलं असतं असं वाटत नाही ओ, तस्मात कठोरपणे हेच अपेक्षित होतं. बाकी कै नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दिल्लीतले बलात्कार : आकड्यांमागचे सत्य
दिल्लीतल्या बलात्काराच्या खटल्यांविषयी एक रोचक विश्लेषण 'हिंदू'मध्ये आलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लेखातलं एक वाक्य वाचून
झोपडपट्ट्या कित्ती चान चान म्हणणारे काही प्रतिसाद आठवले.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अगदी अगदी. गैरसोयीचं वाटणारं
अगदी अगदी. गैरसोयीचं वाटणारं काही प्वाइंट औट केलं की श्रेणीदानाने दाबून टाकण्याची क्लृप्ती बाकी छान आहे ओ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे जरा अवांतर आहे. दिल्लीत
हे जरा अवांतर आहे.
दिल्लीत होणाऱ्या बलात्कारांच्या बहुतांश तक्रारींत खरोखर तथ्यं नसण्याच्या शक्यतेची शक्यता आहे. पण गुर्जी, (हिंदूचे वेगवेगळ्या विषयांमधले दावे वाचताना मला कायम पडणारा हा प्रश्न) कधी कधी सत्याच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना निरागसपणे केलेली विधानं सामाजिक वास्तवाच्या परीघात मात्र शस्त्र म्हणून अंदाधुंद/विशिष्ट दिशेनं वापरली जाण्याचा संभव असतो - विधानकर्त्याचा उद्देश तसा नसला तरीही. (इथे हिंदूचा लेख सत्य का असत्य हे पडताळून पाहण्यासाठी लागणारा विदा मजजवळ नाही. मी विदा शोधायला जाणारही नाही, ते माझं क्षेत्र नाही. त्यामुळे विधान सत्य का असत्य याबद्दल मी काहीच म्हणत नाहीय, ध्यानात घ्या.) अशा वेळी आपल्या विधानाचं संभाव्य शस्त्रपण जाणून आपण विधान करताना पुरेसा विचार केला आहे की नाही, याबद्दल हिंदूचे लेखक कधी काही विचार करतात का? असा विचार करायला हवा (मग भलेही विचारान्ती त्यांनी त्यांना दिसलेलं सत्य मांडण्याबद्दल कुठल्याही दिशेनं निर्णय ते घेतील, पण मुळात त्यांनी असा विचार करायला हवा) असं तुम्हांला वाटतं का? की असा विचार करणं हे अभ्यासकाचं कामच नाही, असं ते मानतात?
अनावश्यक पर्सनल अवांतर!
अनावश्यक पर्सनल अवांतर!
असं स्कोर सेटलिंग गुर्जींकडून झालेले बघुन खेद वाटला
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यात स्कोअर सेटलिंगची शंका का
यात स्कोअर सेटलिंगची शंका का आली कळलं नाही. हे प्रतिसादाचं विडंबन आहे. तिरकसपणे का होईना पण मी काय म्हणतो हे स्पष्ट आहे. नसल्यास ते मांडतो.
'स्त्री-भ्रूणहत्येसारख्या एखाद्या गंभीर विषयाचा अभ्यास करताना सामाजिक भान ठेवावं. स्त्री-भ्रूणहत्या होतात हे स्वयंस्पष्ट असतानाही त्यांची संख्या कमी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा वापर कोणी शस्त्र म्हणून करेल हा विचार अभ्यासकाने करायला हवा.'
या वाक्यात स्त्री-भ्रूणहत्या च्या जागी बलात्कार घालून वाक्य वाचून पहा. जी तक्रार स्त्री-भ्रूणहत्यांची संख्या मोठी वाटते, पण नक्की किती आहे? या अभ्यासाबाबत झाली तीच बलात्कारांची संख्या मोठी वाटते, पण नक्की किती आहे? या अभ्यासाबाबत व्हायला हवी.
नंदनच्या प्रतिसादाचं जे विडंबन आहे, तेही स्पष्ट करतो.
'आधीच स्त्री-भ्रूणहत्येसारख्या प्रश्नाकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. तेव्हा जर आकडा मोठा वाटत असेल, आणि त्यामुळे काहीतरी कृती होणार असेल तर तो आकडा लहान करण्याचा प्रयत्न करू नये.' असा युक्तिवाद होता.
या वाक्यात स्त्री-भ्रूणहत्या च्या जागी बलात्कार घालून वाक्य वाचून पहा.
विशिष्ट व्यक्तींना 'इथेही तोच युक्तिवाद करणार का?' असा प्रश्न विचारणँ म्हणजे पर्सनल स्कोअर सेटलिंग नाही असं माझं मत आहे.
अश्या खवचटपणाने काहीही सिद्ध
अश्या खवचटपणाने काहीही सिद्ध होत नाही इतकेच
बाकी, तुमच्या प्रतिसादांवरून (मला सहज उपलब्ध झालेला विदा वापरून) मी त्या धाग्यावर काही आरोप जाहिर केले होते, तेव्हाही ते आरोप मला उपलब्ध विद्याच्या आधारे केले होते, त्याच्या परिणामांची तमा न बाळगता - निव्वळ माझे उलपन्ध विदा वापरून केलेले निरिक्षण म्हणून! आता तसे करणे योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. माझ्याकडून इतिश्री!
(असा अनावश्यक जुने सदर्भ असणारा खवचटपणा हल्ली ऐसीवर अनेकदा अनेकांकडून दिसतो (काही बाबतीत माझ्याहीकडून पूर्वी असे होत असे असेही जाणवते आहे), नी वाचन करताना जुने संदर्भ माहिती नसणार्यांना त्यामुळे निव्वळ विस्कळीतपणा नी संदर्भ माहिती असणार्यांना सर्वत्र तेच ते वाद वाचून कंटाळा येऊ लागला आहे - किमान मला तरी!
)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ज्या समाजात लोकांचा प्रतिसाद
ज्या समाजात लोकांचा प्रतिसाद हा झाडांच्या संख्येच्या समप्रमाणात असतो, त्या आदर्श समाजासाठी हे ठीक आहे. प्रत्यक्षात आवश्यक उपाययोजनेची व्याप्ती 'क्ष' असेल, तर केवळ ०.१*क्ष किंवा त्याहूनही कमी उपाय होताना दिसतात. जोवर हे चित्र बदलत नाही तोवर अशा काटेकोर मोजमापांतून फायदे होण्यापेक्षा तोटेच होण्याची शक्यता अधिक.
पुन्हा एकदा - याचा अर्थ अशा चर्चा किंवा अशी मोजमापं होऊच नयेत, असं नव्हे. परिमाण हे महत्त्वाचे खरेच. पण परिमाणातल्या त्रुटीतून जर अधिक चांगला परिणाम साधला जात असेल, तर ते अधिक श्रेयस्कर. मायक्रो-पातळीवर काटेकोर मोजणीला महत्त्व हवंच, पण सामाजिक संवादाच्या मॅक्रो पातळीवर ज्या गोष्टींनी अधिक अपेक्षित परिणाम साधला जाईल - त्या अधिक श्रेयस्कर.
त्यामुळे दिल्लीतल्या बलात्कारांचा आकडा असा खोडून कमी न करणं श्रेयस्कर.
(इथे हिंदूचा लेख सत्य का
हिंदूचा लेख? ती दुसर्यांनी केलेल्या स्टडीवरची माहिती आहे. त्यात त्यांचे म्हणणे काहीच नाही.
---------------------
प्रचंड रिलायेबल विदा वापरून मत मांडली आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरूण राव, बस चुकलिये तुमची
अरूण राव, बस चुकलिये तुमची बहुदा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
शिवसेनेचा चपाती राडा शेवटी
शिवसेनेचा चपाती राडा शेवटी यशस्वी ठरला म्हणायचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtrian-food-in-Maha...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एंड्स जस्टिफाय द मीन्स!
एंड्स जस्टिफाय द मीन्स! 'थोडीशी धार्मिक तेढ झाली खरी, पण खाणं वाईट मिळायचं ते सुधारलं की नाही?'
जस्टिफिकेशन असाईड,
अगदी अगदी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नवा मेनू
काल एका मराठी वाहिनीवर नवा मेनू दाखवत होते. त्यात 'मालवणी छोले' नावाचा पदार्थ मराठमोळा म्हणून दाखवला जात होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तेवढं चालायचंच. ग्लोबलाईझ्ड
तेवढं चालायचंच. ग्लोबलाईझ्ड जमाना एट ऑल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतीय वृत्तव्यवसायातल्या लिखित/अलिखित निर्बंधांची दखल
भारतीय वृत्तव्यवसायातल्या लिखित/अलिखित निर्बंधांची दखल 'न्यू यॉर्क टाइम्स'नं आपल्या संपादकीय पानावर घेतली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चांगला अग्रलेखएकुणच "भारतीय
चांगला
अग्रलेखसंपादकीय पानावरील लेखएकुणच "भारतीय उपखंडातील बदलता मिडीया" याचा अतिशय उत्तम उहापोह या तिमाहीच्या "हिमाल साऊदेशियन" च्या अंकात आहे. भारतातील मोदींच्या इमेज मेकोव्हरच्या निमित्ताने मिडीयाकडे आलेला पैसा, त्याचे परिणाम हा त्याच लेखांपैकी एक लेख आहे, त्या व्यतिरिक्त पाकिस्तान, अफनाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका आदी देशांतीलही विविध प्रकारचे बदल असे अंकाचे स्वरूप आहे आणि अंक निश्चितच वाचनीय आहे
(प्रतिसाद आधी सध्या काय वाचताय? मध्ये देणार होतो, पण इथे विषय निघालाय तर तेच आठवल्याने इथे समांतर असे देतोय)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
न्यू यॉर्क टाइम्सचं पॉलेमिक?
ह्या विधानाला काही दुवा संदर्भ म्हणून न्यू यॉर्क टाइम्सने दिलेला दिसत नाही, किंबहूना २०१४च्या In "Reporters Without Borders"च्या सर्वेक्षणात भारताबद्दल ह्या अनुशंगाने काहीच सापडत नाही.
जे कुनी फारेनर बाबे भारतात
जे कुनी फारेनर बाबे भारतात प्रेसला फ्रिडम नाही इ म्हणतात ते रोज सांच्याला आमच्यासारखे टिवीवर बातम्या पाहत नैत. भारताच प्रेसचे फ्रिडम कामापेक्षा जास्त होते, आहे. जी प्रेस तद्दन गाढवांच्या हातात आहे तिचाच खप सर्वाधिक आहे. म्हणजे सुधारणा अगदी वाचक प्रेक्षकापासून करायला लागणार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रिपोर्ट काय म्हणतो?
एकूण १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक - १४०
ब्रिक्सशी तुलना करायची झाली, तर -
द. आफ्रिका - ४२
ब्राझील - १११
रशिया - १४८
चीन - १७५
काश्मीरबाबत -
'VIOLENCE AND IMPUNITY IN INDIAN SUB-CONTINENT' ह्या उपविभागातून -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अभिव्यक्तिस्वातंत्र्यास
अभिव्यक्तिस्वातंत्र्यास सपोर्ट इ. देणार्या काँग्रेस राज्यात असे हल्ले पाहून रोचक वाटलं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Criminal organizations,
पत्रकारच काय कोणत्याही शीर्षकाखाली एकत्र वावरणार्या सगळ्या लोकांना हा त्रास भारतात आहे. आता इतरांना सोडून हे सगळे फक्त पत्रकारांना झोडपतात असे असेल तर वेगळे पण तसे काही नाही. आपल्या कडे लोक्-पोलिस युद्धांत किती पोलिस मेले हे देखिल रोचक असावे. आपला पेशंट मेला म्हणून किती डॉक्टर (जे परंपरागत रित्या देवासारखे) मेले हे ही रोचक असावे.
-----------
पण आंतरराष्ट्रीय तुलना करता अर्थातच हे आकडे बाहेरच्या पत्रकारांपेक्षा जास्त दिसणारच. तिथे एकूणातच शांती आहे. पण म्हणून पत्रकार भारत वेचून मारले, पिडले जातात असे म्हणता न यावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शब्दप्रयोग आणि बायस
काश्मीरमधलं वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि इराक/अफगाण युद्धादरम्यानचं वृत्तपत्र स्वातंत्र्य ह्याची तुलना केल्यास वेगळं काही घडतं आहे असं वाटत नाही, सेन्सॉरशिपशी संबंधीत विदा/उदाहरणे सर्वेक्षणात तेवढी सापडत नाहीत जेवढी हिंसेबद्दल सापडतात अर्थात त्याचा संबंध सेन्सॉरशिपशी लावला जाऊ शकतो, पण 'one of the most restrictive' हा शब्दप्रयोग आणि सर्वेक्षणातील माहिती ह्यांचा ताळमेळ मला लागला नाही.
लेखात राडिया/बरखा ह्यांचा उल्लेख उपहासाने(बरखाला सपोर्टिव्ह)झाल्यासारखा भासला, वास्तविक पहाता कॉर्पोरेट सेन्सॉरशिपचेच ते एक उदाहरण नव्हे काय?
भारतातील वृत्तपत्र सेन्सॉरशिप एका मोठया (बहुदा वाइट) बदलातून जात आहे पण एकपानी लेखातून पॉलेमिक झाडण्यापलिकडे काही साधते आहे असे वाटत नाही.
भारतातील वृत्तपत्र सेन्सॉरशिप
खरे आहे.
दुर्दैवाने हे वृत्तपत्रांपर्यंत सिमीत नसून एकुणच मिडीयाला लागू आहे. या बदलांवर अगदी मुळाशी जाऊन लिहिलेला "The Fact and fiction of news demand" नावाचा एक लेख श्री अभिषेक चौधरी यांनी यावेळच्या हिमालमध्ये लिहिला आहे, चांगला १२-१५ पानी लेख आहे. उत्तम कंटेन्ट, आतील कित्येक बातम्या, माहिती नावासकट दिली आहे (जसे दैनिक भास्कर ला जे पतपुरवठा करतात त्यांचे इंटरेस्ट कोल इंडस्ट्रीतही असताना त्यांच्याकडून त्या बातम्यांवर रेस्ट्रीक्शन्स येणे अपेक्षित आहे वगैरे). किंवा बदाऊमधील घटनांच्या अनुषंगाने टिपण्ण्या, काही पत्रकारांचे लोकल गुंड होण्यात झालेले परिवर्तन वगैरे अनेक पैलु आहेत. तरी लेखात लेखक म्हणतो इतक्या छोट्या लेखात हे कमर्शियल गणित समजावून देणे अशक्य आहे. हा लेख एक जुजबी इंट्रोडक्शन म्हणून वाचावा
यावेळचा २७० पानी अंकातील ७०% पाने तरी याच विषयावरील लेखांना वाहिली असल्याने मात्र भारतच नाही तर उपखंडात या क्षेत्रात किती व कोणत्या स्तरावर बदल होत आहेत त्याची काहिशी भयचकीत करणारी माहिती मिळते आहे. सगळा अंक वाचून झाला (बसमध्ये वाचतोय त्यामुळे वेळ लागेल) की एक सारांशात्मक लेख लिहायचा प्रयत्न करेन.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नॉन इक्विटी म्युच्युअल फंड
मला वाटते यापूर्वी व्होडाफोन संदर्भातील पूर्वलक्ष्यी करआकारणीच्या बाबतीत काँग्रेसच्या हाताळणीवर इथे बरीच टीका झाली होती. मोदी-जेटली सरकारने नॉन इक्विटी म्युच्युअल फंडांतील उत्पन्नावर तांत्रिकदृष्ट्या थेट पूर्वलक्ष्यी म्हणता येणार नाही अशी परंतु बऱ्याच अंशी सामान्य गुंतवणूदारांची फसवणूक करणारी करआकारणी सद्य अंदाजपत्रकात केली आहे.
नॉन इक्विटी फंडांमध्ये अनेक निवृत्त व कमी जोखीम पत्करणाऱ्यांची गुंतवणूक असते त्यांना चांगलाच बांबू बसला आहे असे दिसते.
आता इक्विटी फंडवाल्यांना कधी बांबू लावतात ते बघायचे.
१६ मे रोजी धीरेंद्र कुमार यांनी विशेष लेख लिहून मोदी सरकारच्या आगमनानिमित्त जनतेचे व सामान्य गुंतवणूकदारांचे अभिनंदन केले होते. त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झालेला दिसतोय.
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=25732
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=25757
दिलेल्या दुव्यात हे
दिलेल्या दुव्यात हे वाचलं.
लाँगटर्म गुंतवणूकदारांना (म्हणजे ज्यांना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक करायची आहे त्यांना) याने कसा काय फरक पडतो ते समजले नाही. गेल्या एक-दोन वर्षात ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना ती दोन-एक वर्षे विकता येणार नाही इतकेच. सध्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करायची असेल तर काहीही कर लागणार नाही असे दिसते.
इक्विटी इन्व्हेस्टमेंटवर भविष्यात लाँगटर्म कॅपिटल गेन्स टॅक्स बसेल अशी शक्यता आहे म्हणून आज असलेली गुंतवणूक विकून पुन्हा गुंतवणूक करा म्हणणे पॅरॅनॉईड वाटले. सरकार तसे नक्कीच करु शकते आणि आधीचेही सरकार करुच शकत होते, पण तसे न करण्याची सॉलिड कारणे लक्षात घेतलेली नाहीत.
असो. एकंदरीत हा बदल फार काही पूर्वलक्ष्यी म्हणता येणार नाही. यापूर्वीच्या रिडम्प्शन्सना हा नियम लावला असता तर त्याला पूर्वलक्ष्यी म्हणता आले असते.
इंडेक्सेशनचा फायदा मिळणार नाही
एक तर जे लोक तीन वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक करणार आहेत ते 'शक्यतो' नॉन इक्विटी फंडात गुंतवणूक करत नाहीत. शिवाय प्रामुख्याने सामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्ससारख्या योजना १३ महिन्यांसारख्या कालावधीपुरत्या मर्यादित असतात. त्या मॅच्युअर झाल्यावर विकाव्याच लागतात. अशा योजनांना यापूर्वी मिळत असलेला इंडेक्सेशनचा फायदा मिळणार नाही.
फार काही पूर्वलक्ष्यी नाही हे कसे? गुंतवणूक करताना डेट म्युच्युअल फंड ही बँकांच्या एफडीपेक्षा रिस्की अॅसेट आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने फायदा मिळावा असा काही काळापूर्वी जाणीवपूर्वक निर्णय घेतलेल्यांची ही फसवणूकच आहे. यापूर्वीच्या केलेल्या गुंतवणुकींच्या रिडेम्शनवर कर लावणार हे पूर्वलक्ष्यीच वाटते. यापुढील गुंतवणुकींना फायदा मिळणार नाही असे जाहीर केले असते तर ते पूर्वलक्ष्यी झाले नसते.
कॉर्पोरेट आणि रिटेल गुंतवणुकींसाठी वेगळे टॅक्सेशनचे नियम करणे सरकारला सहज शक्य होते. मात्र तसे करण्याची इच्छाशक्ती नाही इतकेच यातून दिसले. निवृत्तीनंतर चार पैसे अधिक मिळावेत व मुद्दल सुरक्षित राहावे या हेतूने नॉन इक्विटी फंडात गुंतवणूक करणाऱ्या निवृत्त मंडळींवर तर हा मोठाच अन्याय आहे. कोणतीही सोशल सेक्युरिटी नाही. महागाईदराने उच्चांक गाठलेला आहे, मेडिकल व इतर खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे व सरकारी पाकिटमारीचाही सामना त्यांना करावा लागणार आहे.
इक्विटी इन्वेस्टमेंटवर भविष्यात लॉँगटर्म टॅक्स बसेल म्हणून विकण्याचा सल्ला मला तरी योग्यच वाटतो. इक्विटीमध्ये गुंतवणूक करा असा आग्रह सरकार प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे धरत असते. सोन्यासारख्या फिस्कल डेफिसिट वाढवणाऱ्या किंवा रिअल इस्टेटसारख्या नॉन प्रॉडक्टिव अॅसेटमध्ये पैसे अडकून राहू नये म्हणून टॅक्स बेनेफिटचे गाजर सरकारने सामान्य गुंतवणूकदारांसमोर धरले आहे. ह्या गुंतवणुकीला कोणतेही सरकारी संरक्षण नाही तरीही घामाचे पैसे गुंतवण्याचा निर्णय सामान्य गुंतवणूकदार घेतो. मात्र सरकारची मर्जी पाहिजे तशी फिरू शकते व हक्काचे पैसे ढापण्याचे नियम सरकार करु शकते या विरोधात करण्यासारखे दुसरे काहीही गुंतवणूकदारांच्या हातात दिसत नाही.
इथे थोडे अधिक विश्लेषण आहे. १ एप्रिलऐवजी जुलै हा फरक वगळता या धोरणात जेटलींनी बदल केलेला नाही.
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=25641
लाँगटर्म कॅपिटल गेन्सवर टॅक्स
लाँगटर्म कॅपिटल गेन्सवर टॅक्स हेच काय याच्याआधीचे कोणतेही सरकार लागू करु शकत होते पण आताच एवढी भीती का? मुळात सरकारच्या कृतींमागे कोणतीही सुसूत्रता नसून सरकार लोकांना लुबाडतेय अशा दृष्टीकोनातून याकडे पाहायची गरज नाही. सरकार डेट फंडात लाँग टर्म गुंतवणूक करा म्हणत असताना दुसरीकडे इक्विटीतल्या लाँगटर्म गुंतवणुकीवर कर कशाला लावेल?
मुळात याचं मॅक्रोइकॉनॉमिक कारण काय असेल याची चर्चा कोणीही भारतीय अॅनालिस्ट करताना दिसत नाही. भारतात महागाईचे कारण अतिरिक्त मागणी हे नसून इन्फ्रास्ट्रक्चर अभावी कमी पुरवठा हे आहे आणि त्यासाठी औद्योगिक गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. त्यात सरकारला व्याज दर कमी करता येत नाहीत कारण ते रिझर्व बँकेच्या अखत्यारित येतं. त्यात लोक फक्त शॉर्ट टर्म गुंतवणुकीवर भर देणार असतील तर कंपन्यांना आणि सरकारलाही भांडवलासाठी परदेशी गुंतवणुकदारांच्या तोंडाकडे पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.
दुसरीकडे लोकांना रिस्क कमी म्हणून शॉर्टटर्म गुंतवणुक करायची असते; त्यावर रिअल रिटर्नही चांगला पाहिजे आणि वर सरकारने टॅक्सही लावायचा नाही आणि एवढं करुन सरकारने भाववाढही कमी केली पाहिजे.
जगात इतरत्र शॉर्टटर्म डेट इन्व्हेस्टमेंट्सचा यिल्ड शून्यावर पोचला असताना शॉर्टटर्म गुंतवणुकीवर मजेत राहू ही अपेक्षाच चुकीची आहे. गेल्या एक-दोन वर्षभरात ज्यांनी नव्याने गुंतवणूक केली आहे त्यांना कर वाचवण्यासाठी अजून दोन-एक वर्षे ती ठेवावी लागेल; त्या आधीच्या गुंतवणुकीवर काहीही कर नसताना पूर्वलक्ष्यी म्हणून बोंब मारण्यात काहीही अर्थ नाही कारण याव्यतिरिक्त दुसरा काय उपाय आहे याचे उत्तर या अॅनालिस्टांनी दिलेले नाही.
बाकी भारतातले बहुतेक लोक क्लॉजेटेड राईट विंगर कंझर्वेटीव्ज आहेत असा संशय हळूहळू दृढ व्हायला लागला आहे.
भारतात महागाईचे कारण अतिरिक्त
भारतात महागाईचे कारण अतिरिक्त मागणी हे नसून इन्फ्रास्ट्रक्चर अभावी कमी पुरवठा हे आहे आणि त्यासाठी औद्योगिक गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे.
Inflation is always and everywhere a monetary phenomenon ______ Milton Friedman (July 31, 1912 – November 16, 2006)
ते बरोबर असेलच पण व्याजदर
ते बरोबर असेलच पण व्याजदर इतके चढे ठेऊनही इन्फ्लेशन कमी होत नसेल तर काय केले पाहिजे मग?
इन्फ्लेशन हे कमी होण्यासाठी
इन्फ्लेशन हे कमी होण्यासाठी किमान १८ महिन्यांचा कालावधी जावा लागतो. रघुराम राजन रुजु होऊन १ वर्ष सुद्धा झालेले नाही. ऑक्टोबर २०१३ मधे ११% होतं. आज ते ७.३% वर आलेलं आहे. http://www.tradingeconomics.com/india/inflation-cpi
हे राजन यांचं यश आहे.
माझ्या माहीती नुसार सुमार ४% इन्फ्लेशन असले तर ते ठीक आहे कारण रिझर्व्ह ब्यांकेला मनी सप्लाय मेंटेन करावा लागतो व तो दूरगामी वृद्धी च्या अपेक्षित दरावर असतो.
खरंतर न्युझिलंड मधे जो कायदा आहे/होता तसा कायदा करणे सुद्धा लक्षणीय आहे. याकायद्यान्वये ४% पेक्षा जास्त इन्फ्लेशन असले तर ते लोक त्यांच्या रिझर्व्ह ब्यांकेच्या गव्हर्नर ला बडतर्फ करतात.
आणि
आणि जपानमध्ये इन्फ्लेशन शून्यवरून दोन टक्क्यांवर आणण्यासाठी (इन्फ्लेशन दोन टक्क्यानं वाढवण्यासाठी) सगळी यंत्रणा झटत असते!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
इन्फ्लेशन वाढवण्यापेक्षा कमी
इन्फ्लेशन वाढवण्यापेक्षा कमी करण्यात मॉनेटरी कंट्रोल्स जास्त परिणामकारक असतात हे मला मान्य आहे पण म्हणून तो निव्वळ मॉनेटरी प्रकार आहे हे मान्य करणे मला जड जाते. विशेषतः भारतात कांद्या-बटाट्याच्या भावात सिझनल चढउतार होत असताना.
पण तो निव्वळ मॉनेटरी प्रकार असतो असे मान्य केल्यास मोदी सरकार उगीचच प्रयत्न करतोय असे दाखवतेय असा खालील बातमीचा अर्थ होतो.
www.reuters.com/article/idINKBN0ES2KS20140618?irpc=932
फिस्कल व मॉनेटरी असे दोनच
फिस्कल व मॉनेटरी असे दोनच प्रकार असतात. फिस्कल स्टिम्युलस सध्यातरी नाहिये कोणताही. व एनिवे फिस्कल पॉलिसीचा इन्फ्लेशन वर अत्यंत कमी परिणाम होतो असे म्हणायला जागा आहे. प्रचंड. कारण ती केनेशियन तत्वांना थेट मारक ठरली असती.
इन्फ्लेशन मधे डिमांड पुल व कॉस्ट प्लस असे ही दोन प्रवाह आहेत. मला यांबद्दल फारसे माहीती नाही. पण आद्य मॉनेटरी इकॉनॉमिस्ट मिल्टन (पुन्हा एकदा) फ्रिडमन यांनी त्या दोन्ही फारसा दम नसलेल्या संकल्पना आहेत असे नमूद केलेले वाचल्याचे आठवते.
दुसरीकडे लोकांना रिस्क कमी
सरकारला करआकारणी करण्याचा कायदेशीर अधिकार आहेच. त्याबाबत काहीही आक्षेप नाही. मात्र धोरणे मुद्दामच संदिग्ध आखून गोंधळ उडवून देण्याचे काम सरकारी बाबू करतात की काय असा संशय येतो. गुंतवणुकीचा निर्णय घेताना भूतकाळातील गोष्टींची शिक्षा देणे अभिप्रेत नसावे.
माझे मुद्दे साधे आहेत
१. कोणत्याही स्वरुपाची पूर्वलक्ष्यी आकारणी करणार नाही, करआकारणीचा दहशतवाद बंद करणार अशा स्वरुपाच्या गोष्टी जेटली-मोदी यांनी निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. आता ह्या गोष्टींचा त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे.
२. गुंतवणूक करताना त्यावरील करआकारणीबाबत सुस्पष्टता नाही. उद्या त्यावर कोणत्याही स्वरुपाची करआकारणी सरकार करु शकते ह्या स्वरुपाचे वातावरण निर्माण झाले आहे. हेच मोठ्या स्केलवर कॉर्पोरेट गुंतवणुकीलाही लागू आहे.
३. कशाला केवायसी वगैरे लफडी करुन सगळी माहिती ब्यांका आणि म्युच्युअल फंडांना देऊन ठेवायची? ह्या सर्व भानगडीत पडून, सरकारला प्रामाणिक कर भरुन कायदेशीर पद्धतीने उत्पन्न मिळवण्यापेक्षा सोन्याच्या विटा घेऊन ठेवाव्यात, बायकामुलांच्या नावांवर घरांमध्ये पैसे गुंतवून ठेवावेत ह्या स्वरुपाची गुंतवणूक अधिक टॅक्स एफिशियंट आहे. तिथे करचुकवेगिरीला प्रचंड वाव आहे.
का नाही लावू शकणार? उद्या डेट फंडामध्ये घातलेल्या गोंधळाला वैतागून लोकांनी सोन्यामध्ये पैसे गुंतवले की फिस्कल डेफिसिट वाढणार. मग उत्पन्नाचे नवे स्रोत शोधावे लागणार. इक्विटीच्या लॉँगटर्म गुंतवणुकीवर सध्या टॅक्स नाही. पूर्वलक्ष्यी प्रभावाने करआकारणी केल्यास बरेच उत्पन्न मिळू शकते. डेट फंडांबाबत आज तेच केले आहे.
डेट फंडांमध्ये कॉर्पोरेट गुंतवणुकीला टॅक्स आर्बिट्राजचा फायदा होतो. तो कमी करायचा आहे. त्याचा सामान्य गुंतवणूकदारांवर फारसा परिणाम होणार नाही अशी भोंगळ कारणमीमांसा जेटलींनी दिली आहे. देशातील बहुतेक सर्व करनियम हे कॉर्पोरेट व रिटेल गुंतवणुकदारांसाठी वेगळे असताना इथे वेगळे नियम करायला हवे होते हे अॅनालिस्टांनी म्हटलेच आहे. मागील वर्षी घेतलेल्या व जुलैनंतर म्याच्युअर होणाऱअया १३ महिन्यांच्या एफएमपीवर आता टॅक्स भरावाच लागेल. ही माहिती ती गुंतवणूक करताना नव्हती. हे पूर्वलक्ष्यीच आहे.
यिल्ड
जिथे शॉर्टटर्म डेट यिल्ड शून्यापर्यंत आहे तिथे महागाईदरही तुलनेने बराच कमी आहे असे वाटते.
+१
+१
रिअल इन्फ्लेशन का रिअल ग्रोथ काहीतरी म्हणतात त्याला.
ज्या दराने महागाई/किमती वाढते/वाढतात तो दर, आणि जीडीपी वाढीचा वेग ह्यातले अंतर.
ह्यात भारतात बराच लोच्या आहे म्हणतात.
अर्थात ननि म्हणाले तसे भारतात सगळ्या समस्या येउन जाउन त्या पायाभूत सुविधा (इन्फ्रा) नामक संज्ञेपाशी येउन थांबतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भारतात सगळ्या समस्या येउन
नी या सुविधा द्यायच्या तर जमिन अधिग्रहण आले, पर्यावरणाचा र्हास आला, ओरबाडणे आले.
त्याला किमान माझी सहमती नाही. त्यापेक्षा आर्थिक प्रगती हळु झालेली मला चालणार आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्यापेक्षा आर्थिक प्रगती हळु झालेली मला चालणार आहे.
त्यापेक्षा आर्थिक प्रगती हळु झालेली मला चालणार आहे.
कारण इथून पुढे प्रगती हळूहळू होत राहिली तरी फार मोठा प्रचंड फरक पडणार्या गटातील आपण नसावात.
प्रगती न झाल्याने ज्यांना फरक पडेल अशांना, आणि प्रगती झाल्याने ज्यांना फरक पडेल अशांनाही ह्यात बोलण्याचा अधिक स्टेक हवा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मी प्रचंड प्रगती झाल्याने
मी अशी ऐहिक/इन्फ्रा प्रगती प्रचंड वेगात झाल्याने प्रचंड मोठा निगेटिव्ह फरक पडणार्या गटात आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
इज इट ?
इज इट?
म्हणणे स्पष्ट करुन पाहतो :-
इथून पुढे प्रगती झालिच नाही, स्टेटस क्युओ राहिला तर उपाशी मरण्याची किंवा वैद्यकीय सुविधा न मिळण्याची किंवा किमान मानवी गरजा उपलब्ध होउ न शकणार्या गटाबद्दल मी बोलतो आहे. प्रगती होते, तसे अधिकाधिक लोक ह्या जाळ्यात (किमान गरजा भागवल्या जात असणार्या गटात) जोडले जातात. भारत , चीन वगैरेतील मागील काही दशकांचा विकास ह्याची साक्ष देतील.
(ह्याबद्दलचा विदा उपलब्ध अर्थातच विदासूर्य राघांकडे असू शकतो.)
माझे म्हणणे :-
विकास झाला किंवा न झाला ह्याने अंबानीच्या प्रत्यक्ष जीवनशैलीत फार मोठ्ठा फरक वगैरे पडेलसे वाटत नाही.
मनोबांना मात्र फरक नक्कीच पडेल. सायकलवरून फिरणारे मनोबा, विकास होत राहिल्यास मोटरसायकलवरून फिरु शकण्याची शक्यता वाढते; संधी उपलब्ध होतात. अंबानीपेक्षा मनोबाला विकासाची अधिक गरज आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तुमच्या माझ्या विकासाच्या
तुमच्या माझ्या विकासाच्या कल्पना वेगळ्या आहेत तेव्हा सायकलीवरून मोटार चालवली, मला चालवणे परवडले म्हणजे विकास झाला इतके मला पुरेसे नाही.
मला ती मोटार चालवायला मिळण्यासाठी कोणी काय व कशा प्रकारची किंमत मोजली आहे ते ही मला विचारात घ्यावेसे वाटते.
माझा मुख्य आक्षेप विकासाला नाहीये तर त्याच्या अनिर्बंध वेगाला आहे. असा विकास होण्याआधी काही मुल्यांची, मानवी हक्कांची पायामल्ली होणार नाही असे कायदे बनणे आवश्यक आहे. तसे कायद्याचे प्रोटेक्शन नसताना असा विकास उद्या माझ्याच मानवी हक्कावर गदा आणू शकतो. आज पोसलेला हा भस्मासूर माझ्याच डोक्यावर हात ठेवेपर्यंत मी वाट पहायला तयार नाही.
एक जरा बरा जमिन अधिग्रहण कायदा बनतोय न बनतोय तोच नवे सरकार तो कायदा "डायल्युट" करणार आहे का तर म्हणे असा कायदा "विकासाला" अडथळा आहे.

असा तुमचा तथाकथित विकास मला नाही झाला तरी चालणार आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ओके
ओके
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबा व ऋषिकेष - दोघेही -
मनोबा व ऋषिकेष - दोघेही - talking NOT about the central issue.
टॅक्स व पूर्वलक्षी
टॅक्स व पूर्वलक्षी प्रभावाबद्दल बोलायला मी नालायक माणूस आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गब्बर
सेंट्रल इश्यूंबद्दल बोलायचा सर्वाधिकार व मक्ता परमेश्वराने तुम्हासच दिला असल्याने आम्ही इकडे तिकडे वाइड बॉल टाकतोय.
बादवे, इतरांना असा सर्वाधिकार द्यायचा अधिकारही परमेश्वराने स्वतःच स्वतःला ट्याक्स भरुन मिळवला अशीही एक वदंता आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
खडूस
खडूस
आय स्मेल मनोबा २.० हिअर.
आय स्मेल मनोबा २.० हिअर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
महागाईचा दर कमी आहे पण
महागाईचा दर कमी आहे पण जोपर्यंत तो शून्याच्या वर आहे तोवर परिस्थिती तीच.
http://www.outlookindia.com/n
http://www.outlookindia.com/news/article/Rahul-Stopped-Sonia-from-Becomi...
नटवरलाल यांची निरीक्षणे रोचक आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पगडी सलामत तो...
रूढ अर्थाने ही बातमी नाही, पण वर्णभेदाच्या इतिहासातला एक छोटा रोचक तुकडा -
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काही कृष्णवर्णीयांनी अमेरिकेतील वर्णभेदाच्या झळीची तीव्रता काही अंशी कमी व्हावी म्हणून चक्क फेटा/पगडी घालून भारतीय म्हणून तत्कालीन समाजात खपून जाण्याचा प्रयत्न केला. Korla Pandit नावाचा तत्कालीन प्रसिद्ध कलाकारही (मूळ नाव John Roland Redd) यात सामील होता.
बातमीचा दुवा.
आयला, जबरीच म्हायती ओ
आयला, जबरीच म्हायती ओ नंदनशेठ!!!! अनेकानेक आभार!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जपानने नव्या कायद्यांतर्गत
जपानने नव्या कायद्यांतर्गत शस्त्रविक्रीला सुरूवात केली
भारताचे पंतप्रधानांचा कल जपानकडे मोठ्या प्रमाणावर झुकलेला आहे + त्यांची जपान भेट तोंडावर आहे हे लक्षात घेता भारतालाही जपानी शस्त्रांची आयात करायला मिळेलच, त्याहून महत्त्वाचे नव्या FDI मध्ये जपानी शस्त्र कंपन्या भारतात कारखाने उघडण्याची मोठी शक्यता दिसतेय.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भारताने गेल्या वर्षी बाली इथे
भारताने गेल्या वर्षी बाली इथे मान्य केलेल्या भुमिकेवरून आता करार करायची वेळ आल्यावर घुमजाव केले आहे, भारताने भुमिकेचा पुनर्विचार करावा असे अमेरिकादी देश म्हणत आहेत.
खरंतर या घुमजावमुळे प्रगत देश भारतावर वैतागले असल्याचे लोकसत्ताच्या या अग्रलेखात म्हटले आहे.
भारतावर आता दबाव मोठा आहे, केरी भारतात पोचले आहेत. आता भारत व विशेषतः मोदी काय भुमिका घेताहेत हे बघण्यासारखे असेल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरभाट चिल्ड्रेन्स फिल्म क्लब - नवीन सत्र
गेलं वर्षभर पुण्यात 'अरभाट निर्मिती' ह्या संस्थेनं लहान मुलांसाठी फिल्म क्लब चालवला होता. त्यांचं नवं वार्षिक सत्र २ ऑगस्टपासून सुरू होतं आहे. त्याविषयीचे तपशील -
उद्घाटनाचा चित्रपट : 'व्हाइट बलून' (दिग्दर्शक : जाफर पनाही)
स्थळ : नॅशनल फिल्म आर्काइव्ह, पुणे
वेळ : दुपारी २:३० ते ४:३०
उद्घाटन अमृता सुभाष आणि चित्रा पालेकर ह्यांच्या हस्ते होईल. चित्रपटानंतर त्या मुलांशी बोलतील.
वर्षभरात मुलांशी बोलायला डॉ. जयंत नारळीकर, दिलीप प्रभावळकर, सई परांजपे असे काही नामवंत लोक येतील. शिवाय, FTII आणि NFAIसारख्या संस्थांना भेटी देण्याच्या उपक्रमांद्वारे मुलांना चित्रपटमाध्यमाची तांत्रिक ओळख करून देण्यात येईल.
वार्षिक सत्राची वर्गणी - रु. १५००/-
अधिक माहितीसाठी -
फेसबुक पान
मोबाईल संपर्क - 8007893571
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माळीण दुर्घटनेनंतर
माळीण दुर्घटनेनंतर शरदचंद्ररावजी पवार साहेब म्हणताहेत, आता सगळ्या डोंगराजवळच्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करायला हवा!
शेवटी माझी भिती काही केल्या जाणार नाही असेच दिसते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भीती साधार आहे खरी. पण तरी
भीती साधार आहे खरी. पण तरी इथे बीजेपीचा हात होता किंवा कसे हे तपासून नको का पहायला
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
???
'हात' ही काँग्रेसची निशाणी आहे, अशी समजूत होती.
असो.
पण मग यास जिम्मेदार
पण मग यास जिम्मेदार दिग्गीराजे स्वतः आहेत. ज्यात्त्यात बीजेपी आपलं आरेसेसचा हात आहे असं म्हणून कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट करणारे अन ती पापिलवार करणारे आद्य कायदेतोडक ते आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
???
दिग्गीराजे???
ती परंपरा पुरातन असावी, असे वाटते.
श्री. राजीव गांधी यांसही ज्यातत्यात परकीय 'हात' दिसत असे, असे स्मरते.
असेलही. 'आमच्या वेळी' जे
असेलही. 'आमच्या वेळी' जे पाहिल्याचे स्मरते तदनुसार प्रतिक्रिया दिल्ही इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
? नै कळ्ळे. इस्कटून प्लीज
? नै कळ्ळे. इस्कटून प्लीज
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
म्हणजे अँटीगरीब निर्णय
म्हणजे अँटीगरीब निर्णय घेण्यामागे नवनिर्वाचित सर्कारची फूस आहे खरी, पण या केसमध्ये तसे तूर्त वाटत नाही. तरी पाहिले पाहिजे, म्हणजे सत्य बाहेर येईल इतकेच म्हणालो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
परदेशी तुरुंगातील भारतीय
http://ibnlive.in.com/news/nearly-6000-indians-languishing-in-foreign-ja...
६००० भारतीय देशाबाहेर तुरुंगात आहेत. यातले सीमेवरच्या देशांत फारच कमी आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्युझियम
राष्ट्रपती भवनातील म्युझियम पुन्हा सुरू
कोणा दिल्लीकरांनी या न्युझियमला भेट दिलीये का? कसंय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ही बातमी समजली का?
साराअन्श : रतनजिनि सामाजिक बान्धिल्कि दाखव्लि अनि पवारानि सामाजिक विचार (?) !!!
GM बियाण्यांच्या चाचण्या थांबवण्याचा केंद्राचा निर्णय
जनुकीय सुधारित (GM) बियाण्यांच्या चाचण्या थांबवण्याच्या केंद्राच्या निर्णयाविषयीचा लोकसत्तातला आजचा अग्रलेख.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मला लोकसत्तेची भुमिका अजिबात
मला लोकसत्तेची भुमिका अजिबात पटलेली नाही.
सदर चाचण्यांना परवानगी देण्याचा निर्णय सरकारने थांबवले ते बरेच झाले. अर्थात ज्या कारणाने ते थांबवले आहे ते तितकेसे योग्य नाही पण कुणाच्या का कोंबड्याने उजाडेना!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विरोधाभास
त्यांनी मोदींच्या गुजराथ आणि राष्ट्रीय स्तरावरच्या निर्णयातला विरोधाभास दाखवला आहे, मोदींचा दुट्टपीपणा/लांगुलचालन आहे हे पटण्यासारखे आहे.
विसंगती
कापूस किंवा तेलबियांच्या बाबत हे बियाणे चालत असेल तर अन्य पिकांबाबत ते का चालू नये हा प्रश्न मला रास्त वाटतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
@मी व चिंजं हा विरोधाभास
@मी व चिंजं
हा विरोधाभास आहेच. तेलबिया व कापसाच्या बाबतीतही जीएम बियाणांवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी लोकसत्ताने केली असती तर पाठिंबा दिला असता. मात्र अग्रलेख नुसताच विरोधाभास दाखवतो. भुमिका मात्र निर्णयाविरूद्ध घेतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पेटंट
हा कुबेर यांचा दावा पेटंटनियमांच्या विरोधात नाही काय?
संदर्भानुसार
इथे 'हे बियाणे' म्हणजे 'विशिष्ट पेटंटेड वाण' असा न घेता 'जीएम तंत्रानुसार विकसित केलेली नवी गुणी बियाणं' असा संदर्भानुसार मी घेतला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओके
निव्वळ जीएम तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही. मात्र मोन्सान्टोच्या एकाधिकारशाहीला नक्कीच विरोध आहे.
+१
एन्ड्स जस्टिफाय मीन्स.
हे वाक्य तद्दन विनोदी आहे. पाश्चात्यांनी केलं ते आपण केलं की प्रगती असा समज झालाय का संपादकांचा?
जनुकात थेट बदल न करता संकर करून आणि मृद्संधारणाच्या व जलसिंचनाच्या नव्या पद्धती शोधल्याने/वापरल्याने देशाची प्रगती होणार नाही?
शिवाय वितरणाचे काय?
+१
सहमत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संदर्भातील लेखही अत्यंत आक्रस्ताळा होता. गिरीश कुबेर स्वतःला प्रचंड हुशार समजतात व इतरांना अत्यंत मूर्ख लेखतात असे वाटत राहते बॉ.
पण
पण ते निदान भारतात फारशी मांडली जात नसलेली बाजू समोर आणत राहतात म्हणून मला आवडतात.
"चंगळवादी व्हा" हा लेख त्याच्या गुणदोषासकट मला आवडला होता.
आपल्याकडे पत्रकारांनी डावंच असलं पाहिजे असा नियम असल्यासारखं आहे.
मग येणारं इनपुटपण एकांगी येत राहतं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्केप्टिक
प्रगती म्हणजे काय वगैरे प्रश्न उभे रहातात, जनुकीय बदलाला विरोध करावा अशा दुरगामी अहितकारी परिणामांचा विदा सध्या उपलब्ध नाही त्यामुळे विरोध करताना नक्की कोणते कारण वापरले जाते हे बघितले पाहिजे, त्याउप्पर कुबेर मुळात मोदींच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत जो अग्रलेखाचा मुळ मुद्दा आहे, मोदींच्या दुटप्पी भुमिकेबद्दल सोयिस्कर मौन का बाळगावे?
जनुकीय बदलाला विरोध करावा अशा
हे विरोधाला पुरेसे कारण आहे. अहितकारी परिणाम नाहीत हे फूली, फायनली, नि:संशयरित्या सिद्ध झाले पाहिजे. मग कितीही नंगानाच करा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विदा
नंगानाच म्हणजे एक अहितकारी परिणाम, त्याचा तरी विदा द्या तुम्ही.
नंगानाच म्हणजे एक अहितकारी
नंगानाच म्हणजे एक अहितकारी परिणाम नाही, असं मी म्हटलंय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फिल्ड ट्रायल्स
मग नंगानाच म्हणजे फिल्ड ट्रायल्स(हितकारी?) काय?
Any trial, any experiment
Any trial, any experiment with all reasonable care must be welcome. नाहीतर मग प्रगती कशी होईल?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अशा दुरगामी अहितकारी
आधीच्याच एका प्रतिसादातला काही भाग इथे पुन्हा डकवतोय. ही माहिती खरी नाही हे सिद्ध झाले आहे काय?
WSJ: Is there evidence from other countries that GM food improves food security?
Ms. Variava: Macroeconomic data for the largest adopters of GM food indicate the opposite. In the U.S., food insecurity has risen from 12% in pre-GM 1995 to 15% in 2011. In Paraguay, where nearly 65% of land is under GM crops, hunger increased from 12.6% in 2004-06 to 25.5% in 2010-12. In Brazil and Argentina, GM food has not reduced hunger. In any event, GM does not increase yields, as the Union of Concerned Scientists established through a review of 12 years of GM in the U.S.
>>In any event, GM does not
>>In any event, GM does not increase yields, as the Union of Concerned Scientists established through a review of 12 years of GM in the U.S
परिच्छेदातले एवढेच वाक्य रिलेव्हंट आहे. आणि जीएमच्या थेट विरोधात आहे
बाकी सगळं जीएम पिके घेतल्याने भूक कमी झाली नाही/वाढली असं आहे. हंगर हॅज इन्क्रिज्ड म्हणजे लोकांना अन्न मिळत नाही इतकाच अर्थ होतो. जीएम पिकांमुळे पीक किती येते/येत नाही याचा हंगर वाढण्याशी थेट संबंध नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हंगर हॅज इन्क्रिज्ड म्हणजे
एक्झॅक्टली. यिल्ड कितीही असला (त्याच मुलाखतीत भारतात पुरेसा अन्न-धान्यसाठा आहे असे म्हटले आहे) तरी गरजू लोकांपर्यंत अन्न पोचत नसेल तर यिल्ड वाढेल या कारणासाठी जीएम पीके घ्यावी या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही.
ती वाक्ये जीएम पिकांच्या विरोधात नसली तरी जीएम समर्थनाच्या विरोधात नक्कीच मार्मिक आहेत.
ती अर्थशास्त्रीय प्रश्नाला जीवशास्त्रीय उत्तर देण्याच्या विरोधात आहेत.
नरेंद्र मोदी यांचे सरकार
नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर वैचारिकदृष्टय़ा कालबाहय़ स्वदेशी जागरण मंचीय मंडळी धुमाकूळ घालतील ही भीती व्यक्त केली जात होती. ती काही प्रमाणात तरी खरी ठरताना दिसते.
स्वदेशी चा आग्रह नेहमीच कालबाह्य होता, आहे, असेल.
पण उलट केले असते तर "सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बाहुले झालेले आहे" असा आरडाओरडा झाला असता.
राजदीप सरदेसाई
राजदीप सरदेसाई यांनी नुकतीच त्यांची एक वेबसाईट लाँच केली आहे. काही मोजक्या तटस्थ लोकांनी एकत्र येऊन इथे काही उत्तम लेखन, विचार मांडले तरी ते उपयुक्त ठरावे.
वेगळे पुस्तक लिहिण्याआधी या आधुनिक माध्यमाचा वापर करून पुन्हा लोकांसमोर ते येताहेत हे योग्य, आनंददायक (नी आशावाद जागा ठेवणारे) वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'बाजी' - निखिल महाजन
'पुणे-५२'चा दिग्दर्शक निखिल महाजन ह्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर/प्रोमो यूट्यूबवर उपलब्ध झाला आहे. श्रेयस तळपदे सुपरहीरो असावा असं काहीसं दिसतंय. म्हणजे आधीच्या चित्रपटापेक्षा ह्याची जातकुळी खूपच वेगळी वाटते आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चुकलेला वाटला.
काही नोंदी -
२:०३ मिनिटांचा प्रोमो- खास वाटला नाही. सुरूवातीच्या काव्यपंक्ती आणि नंतरचं ते गाणं प्रचंड अनैसर्गिक वाटलं. आणि एवढे हुकलेले स्पेशल इफेक्ट्स का??
तो रात्री चालणारा म्हातारा आणि त्याच्या दृष्टीतून बघितलेला परिसर मात्र जमलाय. त्यामानाने उरलेला ट्रेलर अगदीच सुमार.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मराठी सिंघम?
हा मराठी सिंघमसारखा काही प्रकार वाटला. प्रोमोवरुनच Hemalkasa चा प्रोमो आठवला
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अतिअवांतर
मराठी सिंघम या नावाने यूट्यूबवर सर्चवल्यावर जे रत्न समोर येते ते प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर (स्ट्रिक्टलि हेडफोन लावून) पहावे. तेच अभिप्रेत आहे काय
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अडाण्यांचा आग्रह
लोकसता च्या लेखाचे शिर्शक वाचुन वात्ले कि "अदानि चि आग्रह"...भाजप चा या लेखाशि समन्ध नाहि हे कल्यानन्तर मि पुधे काय वाच्ले नहि...!!!
http://www.batmidar.in/2014/0
http://www.batmidar.in/2014/07/30/3710/
असं झालं की पर्यावरणप्रेमी विकास घडवू पाहणार्यांना झोडपून काढतात. राजकारण्यांना व बिल्डरांना डायरेक्ट जोड्याने मारा वगैरे.... व विकासाच्या समर्थकांना लाखोल्या. आता या दरडी कोसळल्या आहेत त्यात ही डोंगरांची तोड (डोंगरावरच्या झाडांची) हा मुद्दा कारण म्हणून उचलून धरण्यात आलेला आहे.
दोष किसका?
बघा सगळ्यात पहिले ह्या गोष्टीला जबाबदार असणारे तर मेले आहेत, आता दोन नंबरला कोण आहे म्हणता? लेखक/कवी वगैरेंना कोपर्यात घ्यायचं का?
प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद आवडला. खरोखर.
मुद्दा संपलाच माझा.
इबोला
इबोला व्हायरसच्या अनुषंगाने सोप्या भाषेत लिहिलेला न्यु यॉर्करचा रंजक शैलीतला हा लेख थोडा घाबरवणारा आहे.
अवान्तर
अवान्तर
MATRIX चित्रपटात एजंट स्मिथ हा यंत्रांचा प्रतिनिधी 'नियो' या महामानवाला हा डायलॉग बोलतो.
"जितका वेळ मी इथे घालवलाय त्यात एक गोष्ट मला उघड झालीय आणि ती तुला सांगायला मला नक्कीच आवडेल.तुमच्या प्रजातीचे वर्गीकरण करतांना मला ती जाणवली. तुम्ही माणसं म्हणजे फक्त सस्तन प्राणी नाही. या ग्रहावरचा प्रत्येक सस्तन प्राणी त्याच्या आंतरिक प्रेरणेने आजुबाजूच्या पर्यावरणाशी नैसर्गिक संतुलन विकसित करतो. तुम्ही माणसं तसं करत नाही, तुम्ही एका क्षेत्रात पसरता, तिथे वाढता आणि वाढतच जाता. जोपर्यंत तेथील प्रत्येक नैसर्गिक संसाधन संपत नाही तोपर्यंत फक्त वाढता. शेवट दिसू लागला कि अस्तित्व टिकवण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग उरतो. दुसर्या ठिकाणी पसरणे. अश्या प्रकारे वाढणारा या ग्रहावर आणखी एक जीव आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी तो हाच पॅटर्ण वापरतो. माहित आहे तो जीव कुठलाय ? विषाणू. तुम्ही माणसं विषाणूंसारखी आहात. एक महामारी. या ग्रहाला झालेला एक कर्करोग.एक प्लेग. आम्ही त्यावर उपाय आहोत. "
पहिल्यांदा ऐकला तेव्हापासून मेंदूत तसाच्या तसा कोरलेला आहे.
किंचित दुरुस्ती? - स्मिथ हे
किंचित दुरुस्ती? - स्मिथ हे सगळं मॉर्फिअसला सांगतो.
दुरुस्तीबद्दल धन्यवाद
दुरुस्तीबद्दल धन्यवाद
+१
+१
काँग्रेसचे सरकार
http://timesofindia.indiatimes.com/India/Why-victims-of-custodial-deaths...
महाराष्ट्रात तुरुंगांत मुस्लिमांचेच मृत्यू होतात. ते का बरे? इथे तर काँग्रेसचे सरकार आहे. तेच गुजरातमधे होत असतं तर काय राडा झाला असता.
बातमी म्हणते -
अल्पसंख्यकांचे कनवाळू कुठे आहेत?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गैरसमज
तुमचा गैरसमज असेल पण मला वाटतं मुसलमान हे सत्य बऱ्यापैकी जाणतात की दंगलींदरम्यान किंवा इतरही वेळेस कुठल्याही कारणामुळे ते पोलिसांच्या हातात गेले कि सर्वात जास्त असुरक्षित असतात.( ज्या केसच्या संदर्भात न्यायाधीशांनी ताशेरे ओढलेय तीत पोलीस कोठडीत मरण पावलेला ताज मोहम्मद अन्सारी यावर मोबाईल चोरीचा क्षुल्लक आरोप होता ) पोलिस कोठडीत गेलेला मुसलमान गरीब असेल आणि त्याचा कैवार घेणारी माणसे अक्षम असतील तर विचारूच नका. हरप्रकारे त्याला छळण्यात आणि त्याच्या लोकांचा आवाज दडपून टाकण्यात पोलिस क्रूरतेची हद्द गाठू शकतात. हे मग उत्तर प्रदेश असो , महाराष्ट्र असो अथवा गुजरात किंवा गोवा. मुसलमानांचा पोलिसांवर विश्वास नाही. न्यायव्यवस्थेवर मात्र विश्वास आहे. पण तिथेही आता हितसंबंध जपणाऱ्या लोकांची वर्णी लागते असे गेल्या काही दिवसांत वाचनात आलेल्या बातम्यांवरून कळते. काँग्रेस जे लपुनछपून करते ते बीजेपी उघड उघड करते. कोणीही मुसलमानांचे कैवारी नाहीत. एकूण परिस्थिती अतिशय निराश करणारी आहे. गुजरातबद्दल यासंदर्भात ही बातमी कदाचित आपणास मनोरंजक वाटू शकेल.
धर्म - पोलिस नि न्याय
१. माझा बातमी देण्याचा मूळ उद्देश काँग्रेस नि भाजप सरकारांत काही फरक नाही हे सांगण्याचा आहे. कोणतीही सांख्यिकी उचलायची, भाजपच्या कोणत्याही राज्यात मुसलमान विरोधात ती सांखिकी निघाली कि ते सरकार (नेमके तेच) कसे दुष्ट दुष्ट आहे असा ओरडा करायचा अशी स्यूडोसेक्यूलरांत प्रथा आहे इकडे माझा निर्देश होता. भाजपचं किती राज्यांत किती वर्षे राज्य होतं हे पाहता मुसलमान हेरून त्यांच्यावर विशिष्ट अन्याय करण्यात आले म्हणण्यात तथ्य नाही. या माझ्या म्हणण्यात नि आपल्या वरच्या प्रतिसादात फार अल्प का होईना साम्य आहे.
-------------------------
इथून पुढे चर्चा आपण वेगळ्या मुद्द्यावर आणली आहे.
२. पण यापुढे जाऊन आपण मुसलमानांचा पोलिसांवर विश्वास नाही नि न्यायव्यवस्थेवर आहे असा विचार मांडला आहे. याच्याशी सहमत नाही. म्हणजे मुसलमानांच्या आपण म्हणताय तश्या श्रद्धा असू शकतात. पण प्रत्यक्ष पोलिस नि न्यायपालिका यांच्या वागण्यात भेद नाही असं मला म्हणायचं आहे.
एकतर एक व्यवस्था म्हणून पोलिसांची निष्पक्षता नि न्यायपालिकेची निष्पक्षता यात काहीच फरक नाही. दोन्ही 'सगळ्यांनाच' 'सारखेच' चांगले नि वाईट. उप्रमधे पोलिसांनी सगळ्या संशयितांना (संशयित अतिरेक्यांना) सोडले नि हायकोर्टाने परत तुरुंगात घातले. तर असा काही भेद नसावा.
वर पोलिस मुस्लिमांकरिता जास्त वाईट आहेत हे देखिल पटण्यासारखे नाही. अतिरेकी कार्यवायांचे गुन्हे फार गंभीर असतात. तिथे आरोपींना जास्त सहानुभूती दाखवून चालत नाही. पोलिस प्रामुख्याने हिंदू आहेत असे मानले तरी त्यांना मुसलमानांबद्दल जास्त आकस आहे हे कसे सिद्ध होणार? म्हणजे करोडो मुस्लिमांपैकी काही-शे मुस्लिमांवर अन्याय केल्याने या करोडो लोकांवरच्या आकसाला पुरेसा 'संतोष' मिळेल काय? अर्थातच नाही. असे नाहीच. पोलिस त्यांचे त्यांचे के आर ए पाहतात. त्यांची चौकशी करायची पद्धत दुष्टच असते. त्यांचेकडून परतलेला कोणी आरोपी (स्वतःला निर्दोष मानणारा) त्यांचेबद्दल वाईट मत करून परततो, मग तो कोण्या का धर्माचा असेना. हिंदू पोलिसांचा मुस्लिम 'नागरिकांबद्दल' आकस असता तर काश्मिर पोलिस जे स्वतः मुस्लिमच आहेत त्यांच्या भागात 'भारतात सर्वात जास्त अन्याय' 'कस्टडीतील मुस्लिम आरोपींवर' झाला नसता. तिथे दोष नसताना किती काळ डांबून ठेवावे याला मर्यादाच नाही. पण तुमच्या लॉजिकने तिथे अन्याय फक्त हिंदूवर झाला असता, पण असे अजिबात नाही.
३. दोन्ही समाजांत १. काही लोकांत धार्मिक कडवटपणा नि म्हणून दुसर्या धर्माचा द्वेष, दुजाभाव करायची वृत्ती नि २. धर्माशी संबंध नसलेली 'मानवी' गुन्हेगारीता असते. पण या दोहोंतून बाहेर राहणारे'च' दोन्हीकडे बहुसंख्य आहेत. म्हणून किडे असणारे लोक प्रचंड असूनही नि इतके दारिद्र्य असूनही भारतीत समाज फार शांत आहे. या १ नि २ चा समाजावरचा प्रभाव अत्यल्प आहे नि शासकीय व्यवस्थांवरचा प्रभाव तर अत्योत्यल्प आहे. गुजरातमधली आपण जशी मनोरंजक बातमी दिली आहे तशी झारखंडमधल्या नक्षलपिडित हिंदूची देखिल आहे. फार कमी प्रमाणात असेल पण अगदी पुण्यात ब्राह्मण माणसाची देखिल असू शकते. पण हे सगळं व्यवस्थांबद्दल विपरित मत बनवायला वापरलं जाऊ नये.
४. पोलिस धर्माच्या आधारावर बायस्ड आहेत असं सुशिक्षित माणसाचं मत असेल तर मग कशालाच अर्थ नाही. अगदी या देशाला, घटनेला, लोकांना, त्यांच्या देश चालवायच्या पद्धतीला, कशालाच अर्थ नाही. ती न्यायपालिका काय न्याय देऊ शकणारंय जर पोलिसांनाच अन्याय करायचाय तर? शक्य आहे का ते?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अल्प का होईना सह्मतीबद्दलधन्यवाद
अल्प का होईना सह्मतीबद्दल धन्यवाद. पण दगडापेक्षा विट मऊ या म्हणीप्रमाणे कांग्रेस ही मऊ विट आहे आणि भाजप दगड.
कशालाच काही अर्थ नाही वैगेरे जो उद्वेग तुम्ही व्यक्त केला आहे तो समजण्यासारखा आहे. लोकशाही स्वीकारलेल्या देशाच्या कुठल्याही सद्गृहस्थ नागरिकाला असेच वाटेल. पण मुसलमानांचा पोलिसांवरचा अविश्वास हा त्यांच्याबरोबरच्या पोलिसांच्या इतर कुठल्याही समाजघटकांपेक्षा अधिक भेदभावाच्या वागणुकीमुळे निर्माण झालाय. (इतर समाजघटकांत दलित कदाचित वगळता येतील). त्या बाबतीत नुकतेच पोलिसांनी आत्मपरीक्षणसुद्धा केलेय. पोलिस नि न्यायपालिका यांच्या वागण्यात भेद नसणे ही आदर्श स्थिती आहे पण सरसकटीकरणाचा दोष पत्करूनही मी असेच म्हणेन की सध्या तरी आपल्या देशात ती नाहीये. जोवर मुसलमानांची / दलितांची संख्या पोलिस यंत्रणेत त्यांच्या देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रातिनिधिक असणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत हे शक्य होईल. अगदी हवालदारापासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत हे घडावयास हवे. देशातल्या विविध समाजघटकांचं योग्य ते प्रतिनिधित्व अश्या सार्वजनिक हितांचे रक्षण करणाऱ्या यंत्रणांमध्ये असायलाच हवे.पण दुर्दैवाने संसदेतही जे नाही त्याची इतर ठिकाणी अपेक्षा कशी करावी. १६ व्या लोकसभेत फक्त २३ एमपी मुसलमान. त्यात सत्ताधारी भाजपचा एकही नाही
आणि NDA मध्ये फक्त १ (लोजपा चे महबूब अली कैसर मुसलमान आहेत). संसदेतली मुसलमानांची उपस्थिती घटते आहे. भविष्यात संसदेशी वाटणारी आपुलकी आणि विश्वास नाहीसा होऊ लागेल अशी दुर्दैवी भीती वाटते.
दगड आणि वीट
१९९१ चा माहौल -
http://indiatoday.intoday.in/story/muslims-live-in-fear-in-bjp-ruled-sta...
२०१४ चे राजकीय सत्य -
http://indianexpress.com/article/india/politics/bjps-muslim-score-7-of-4...
पण हे ही पहा.
http://www.dnaindia.com/india/report-lok-sabha-elections-nda-won-75-of-m...
उत्तर प्रदेशात सपा, बसपाची (हिंदू) मते फार काही कमी झालेली नाहीत. याचा सरळ अर्थ असा आहे कि मुस्लिमांनी भाजपाशी दुजाभाव न करता त्या पक्षाला मते दिली आहेत. अगदी एकही मुस्लिम उमेदवार नसताना. कितीतरी राज्यांतल्या या ७४ जागांपेक्षा 'सोप्या' जागांवर भाजपा हरली आहे.
http://kashmirreader.com/bjps-vote-share-in-valley-increases-by-166-in-f...
हे तर अजूनच रोचक आहे. म्हणजे सगळेच 'बाहेरचे' अधिकारी भाजपला मत देतात मानले तरी त्यांची संख्या पाच वर्षांत स्थिर आहे.
मुस्लिम विटेपेक्षा दगड का पसंद करत आहेत? ते ही दगडांतला तथाकथित कठिणतम दगड पंतप्रधानपदाचा उमेदवार असताना?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुळात काँग्रेस मुसलमानांचे
मुळात काँग्रेस मुसलमानांचे किंवा अल्पसंख्यांकांचे तारणहार आहेत असा दावा नाहिच्चे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी प्रश्न काँग्रेसला नाही
मी प्रश्न काँग्रेसला नाही विचारला. जे कोणी ती तारणहार आहे असे म्हणत, वा भाजप अन्यायी आहे म्हणत, भाजपवर टिका करतात त्यांना विचारला आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नै कळ्ळे. महाराष्ट्रातील
नै कळ्ळे.
महाराष्ट्रातील तुरूंगांमध्ये जे होत आहे त्यामुळे भाजपा अन्यायी नाही हे कसे सिद्ध होते?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण
पण भाजपा इतरांपेक्षा, निदान काँग्रेसपेक्षा फार वेगळा नाही असे तरी म्हणता यावे; असे त्यांना म्हणायचे असावे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पण तो काँग्रेसपेक्षा वेगळा
पण तो काँग्रेसपेक्षा वेगळा आहे या पर्सेप्शनने काँग्रेस/युपीएला हटवून लोकांनी त्यांना लोकांनी सत्ता दिली नं?
का ते पर्सेप्शन चुकीचे होते याचा कबुलीजबाव इतक्या लवकर?
असो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कबुली
"कबुली " मला उद्देशून लिहिलं नसावं अशी आशा आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
http://www.nrlc.org/archive/n
http://www.nrlc.org/archive/news/2001/NRL04/hugs.html
Stressed out twin being saved with co-bedding.