Skip to main content

मांजराने केला उंदराला फोन...

मांजराने केला
उंदराला फोन
उंदीर म्हणाला
"हॅल्लो कोण ?"

मांजर म्हणाले
म्याँव म्याँव म्याँव
उंदराने घेतली
बिळामधे धाव...

लावुन घेतले
बिळाचे दार
तुटली रेंज अन
कटला कॉल

कटला कॉल पण
फुटला घाम
बिळात होते नागोबा
करीत आराम

- ग्लोरी

ऋषिकेश Tue, 06/12/2011 - 13:24

हे हे हे :)
बडबड गीत एकदम मस्तंय..

फक्त शेवटच्या कडव्यात 'बिळात होते' एकदम पटपट म्हणावे लागते आहे त्याऐवजी
नागोबांना बघितलं
करताना आराम
किंवा
तिथे होते नागोबा
करीत आराम

राजन बापट Tue, 06/12/2011 - 19:41

मजा आली. आजच मुलांना वाचून दाखवतो ! :)

... Tue, 06/12/2011 - 20:16

मजा वाटली वाचून
मांजर उंदीर म्हटल की टाँम अँन्ड जेरी कार्टून आठवतं

धनंजय Tue, 06/12/2011 - 21:51

मस्तच.

(ऋषिकेश यांच्या सुचवणीशी सहमत.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/12/2011 - 22:40

क्यूट. कविता आवडली.

खवचट खान Wed, 07/12/2011 - 05:28

मस्त.

मीटरसंबंधी सूचना पटल्या नाहीत. आहे ते बेष्ट आहे.

'न'वी बाजू Wed, 23/05/2012 - 17:48

'आयत्या बिळावर नागोबा' या म्हणीची प्रचीती आली.