Skip to main content

खार बाई खार...

खार बाई खार, लाडाची खार
झाडाच्या अंगावर खेळते फार

मोर बाई मोर
रंगांचा चोर
चोरलेत बाई त्याने रंग हजार

भालू बाई भालू
चाले डुलूडुलू
नाचून दाखवतो गमतीदार

मनी बाई मनी
किती किती गुणी
गरम गरम दुध पिते करून गार

हत्ती बाई हत्ती
जाडजूड किती
त्याचीच भिती त्याला वाटते फार

ससा बाई ससा
धरू तरी कसा
चाहूल लागताच होतो पसार...

- ग्लोरी

तिरशिंगराव Wed, 07/12/2011 - 17:23

तुम्ही या बालकविता फारच छान करताय. आवडली कविता. अजून येऊ द्यात.

ऋषिकेश Wed, 07/12/2011 - 17:33

छानच!
मंगळागौरीचे वगैरे काहि खेळ - गाणी मध्यंतरी ऐकायचा योग आला होता त्याच्याच चालीवर हे मस्त बसते ;)

शहराजाद Thu, 08/12/2011 - 04:32

छान बालगीत
यावरून हे आठवलं:

खार बाई खार
नाजुक नार
शेपूट सुंदर झुबकेदार

खार बाई खार
भित्री फार
पाऊल वाजताच झाली पसार

खार बाई खार
चपळ फार
क्षणात होते नजरेपार

http://www.youtube.com/watch?v=hsNjE5I5xMA

उत्पल Thu, 08/12/2011 - 10:56

छान कविता!! आवडली...तुमची पहिली कविताही आवडली..(मांजराने केला उंदराला फोन..)

नगरीनिरंजन Thu, 08/12/2011 - 12:44

बालांसाठी मजेदार असेल असे वाटते.

एक प्रश्न: तुम्ही नेहमीच बालकविता करता की संस्थळाचे वय पाहून त्या प्रमाणे? ;)

अतृप्त आत्मा Thu, 15/12/2011 - 23:17

साहेब सगळ्या बालगीतांना चाली लाऊन सीडी येऊ देत १ अता,नाय तर आधीच आलेली असेल तर नाव तरी कळवा? आंम्ही (आमच्या माननीय धंद्याला स्मरून) अनेक देवांचे जन्म दरवर्षी करत असतो,तेंव्हा ते पाळणे म्हणतो ना,त्यांची का कोण जाणे आज अठवण झाली...पण खुप बंरं वाटतं हो तुमच्या कविता वाचतांना..वा वा फार छान..! :-)