इति प्रेमपुराण संपले

तिच्यावर त्याचे चॉकोप्रेम
त्याच्यावर तिचे कॅडप्रेम
जागत होता तिच्याचसाठी
जगात होती त्याच्याचसाठी
दु:ख काहीच ठाऊक नव्हते
सुखात दोघे डुंबत होते !
आले कधी जर त्याचे डोळे
तिचेच डोळे पाणी गाळे !
हासत खेळत आनंदाने
मजेत जीवन चालू होते
जिवापाड ते प्रेम तयांचे
तहानभूकही विसरायाचे
त्या प्रेमाला दृष्ट लागली...
सुमुहुर्ताची ओढ लागली !
इति प्रेमपुराण संपले
-त्या दोघांचे 'लग्न' लागले !
लग्नाची ही चूक तयांची
वाताहत जी दोन जिवांची
प्रेम संपुनी घरपण आले
रांधा वाढा सुरू जाहले !
सुरू जाहली जगरहाटी
जीवन वैवाहिक ललाटी
नवरा नवरी जगू लागले
असामान्य सामान्य जाहले !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हँहँहँ

कविता वाचून तेँ च्या अशी पाखरे येती मधल स्वगत आठवलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.