झाड

झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ||

गेली कित्येक उन्हाळे
सावली देत आहे उभा;
कोरडे ठेवीले वाटसरूंस
पावसाळ्यात सुध्दा;
हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१||

खोड जुन वाढले
फांद्या जुन्या झाल्या;
त्या मुळी न मातीत
नव्याने रूजल्या;
नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२||

कधी गळते दुजे
पान पहिल्यासारखे;
मातीत मिळूनी
होते ते मातीसारखे;
त्या पानांसारखे माझेही पान होई
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३||

- पाषाणभेद

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

कविता तशी ठिक. (राग मानु नकोस मात्र) तृटी ही की धृपदातलीच वाक्य गद्य वाटली. असो कदाचित चाल लावल्यावर जाणवणार नाहीत

या कवितेवरून 'बरेच काहि उगवून आलेले' मधील धामणस्करांची झाडांवरून पक्षी उडून गेल्यानंतरच्या झाडाच्या स्वगताची कविता आठवली. आता घरी जाऊन वाचली पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपले म्हणणे खरे असू शकते अन त्यात राग येण्यासारखे काय आहे? मी मागे म्हणायचो की कविता अन मुल होण्यापुर्वी खाजगी असतात पण झाल्यानंतर सार्वजनीक होतात. (पुढेमागे हे जगप्रसिध्द वाक्य होईल. Lol
हि कविता प्रकाशित करण्यापुर्वी ३ वेळा संस्करण केले. पहिल्या वर्शन मध्ये स्वःत ऑब्जेक्टच बोलतो आहे हे फिलींग आहे. त्याच गतीने कविता तेथे पुढे नेली आहे. ती खरोखर गेय आहे. तशी ही सुध्दा गेय आहेच थोडाफार शाब्दीक बदल येथे आहे. मुख्य बदल शेवटच्या कडव्याने जाणवतो. या ठिकाणी शेवटच्या कडव्यातच ऑब्जेक्ट बोलतो आहे हे समजते. चालीबद्दल बोलायचे झाले तर काहीशी संथ चाल मनात आहे. चालीत बसण्यासाठी एखादा शब्द पुढेमागे, अ‍ॅडावणे, बदल हे गृहीत धरले पाहीजे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही