कावळा म्हणाला...
ग्लोरी
कावळा म्हणाला
मी नाही काळा
मी तर आहे
जरासा सावळा
बगळा म्हणाला
मी नाही पांढरा
मी तर आहे
गोराच गोरा
पाहा पाहा इकडे
म्हणाला कोंबडा
आहे का कुणाला
तुरा असा तांबडा
तितक्यात तिथे
मोर नाचत आला
सगळ्यांनी त्याला
नमस्कार केला
- ग्लोरी
मस्तंय
मस्तंय! (बाकी कोंबड्याकडेही विविध रंग असतात हा!)
छोट्यांसाठी या नव्या सदराबद्द्ल ऐशा-संस्थापनाचे (ऐसीअक्षरेच्या संस्थापनाचे :) ) आभार
यावरुन एक कविता आठवली:
कुणा आवडतो मोर पिसार्याचा
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
कुणा असतो छंद कोकीळेचा
मला परी नाद आहे कोंबड्याचा!
बालगीत / कविता छान आहे . पण
बालगीत / कविता छान आहे .
पण सगळ्यांनी मोराला नमस्कार का केला ?