ससोबा आले उंदराच्या घरी...
ग्लोरी
ससोबा आले
उंदराच्या घरी
उंदराने केली
अंडाकरी
ससोबा म्हणाले
"काय उंदीरराव
शाकाहारी मी
नाही का ठाव ?"
उंदीर म्हणाला
"तसे नाही ससोबा
अंडाकरी खायला
येणार आहेत वघोबा"
"तुमच्यासाठी आहे
हिरवेगार झुडूप"
असे म्हणेस्तोवर
ससा झाला गुडूप
- ग्लोरी
एकदम क्युट
एकदम क्युट