२० वर्षानंतरच्या मला

मला जर २० वर्षापूर्वीच्या "मला" काही सल्ला द्यायचा झाला तर नक्कीच ४ शहाणपणाच्या गोष्टी सुचवता येतील. पण मग तोच धागा पुढे ओढून, "२० वर्षापुढील मी" माझ्या आत्ताच्या स्वतःला नक्कीच मोलाचे काही सांगू शकेन. शकेन का? कशी असेन मी २० वषांनंतर? खरं तर कल्पना करण्याचाही धीर होत नाहीये. पण असे नक्कीच वाटते की तिने (भविष्यातील मी) स्वप्नात येऊन काही मार्गदर्शन करावे. ही प्युअर कविकल्पनाच आहे.
पैकी सुख = नातवंडात रममाण होणे अन दु:ख = एकटे निरुद्देश्य रस्तोरस्ती भटकणे या माझ्या सुख-दु:खाच्या सरळसोट अन माझ्या तोकड्या बुद्धीला जाणवणार्‍या कल्पना यात आलेल्या आहेत. ज्या अगदीच बाळबोध अन ब्लॅक & व्हाइट असू शकतात. अनेक इंटुक अथवा बुद्धीमान लोकांच्या काही वेगळ्या कल्पना असतीलही.
कविता विशेष जमलेली नाही पण लिहीताना डोळ्यात पाणी आले होते. खरच स्वप्नसंकेत मिळावा असे कधीकधी वाटते.
__________________________
इकना हुकमी बखसीस इकि हुकमी सदा भवाईअहि
Some, by His Command, are blessed and forgiven; others, by His Command, wander aimlessly forever.

कशी आहेस तू, कशी दिसतेस,
बेघर, आजारी,
गुन्हेगारी भावनेने खंगलेली,
अपयशाने खचलेली
रस्त्यावरुन निरुद्देश्य भटकणारी,
अनुभवाने शहाणपण आलेली,
की अनुभवाने शहाणी झालेली,
कडवट, विदीर्णशी,
आतल्या आत रडणारी?
कशी आहेस तू, कशी आहेस,
मनस्वी, धीराची,
शांत जलाशयासारखी
तटस्थ, नितळ समाधानी,
आत्ममग्न ,भरुन पावलेली?
लेकुरवाळी,
खेळवतेस तुझ्या नातवंडांना?
भरवतेस मेतकूट-भात त्यांना?
कशी आहेस, कशी आहेस?
एखाद्या गूढ स्वप्नी येशील का?,
मला जवळ घेशील का?
केसांतून हात फिरवत, सांग एवढच
कोणता रस्ता घेतला होतास,
सर्पांचा अन जंगलाचा
की
खर्‍या हिरवळीचा?
अपयशाने खचून गेलीस,
की त्यांच्यावर मात केलीस?
खोल डोळ्यांनी भटकत राहीलीस?
की सावरुन घेतलस घरकुल?
एकटी संघर्ष करत राहीलीस?
की बनलीस कणा कुटुंबाचा
कशी आहेस तू, कशी दिसतेस,
तुझी सुखंदु:ख काय?
एखाद्या गूढ स्वप्नी येशील का?,
मला जवळ घेशील का?
केसांतून हात फिरवत, सांग एवढच
कोणता रस्ता घेतला होतास,
सर्पांचा अन जंगलाचा
की
खर्‍या हिरवळीचा?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली. त्यामागची, भविष्यातल्या स्वतःशी संवाद साधण्याची कल्पना रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अनेक धन्यवाद मुसु.

अतिशय पराकोटीची आजारी असताना, अंतःचक्षूंपुढे/स्वप्नात एक खरं तर अत्यंत "dishevelled" पण माझ्यासारखाच चेहरामोहरा असलेली एक वृद्ध स्त्री दिसायची अन असे वाटायचे की कधीतरी या स्त्रीला भेटण्याचे मी वचन दिले आहे अन कुठल्यातरी प्रतलावर्/जगात ती वाट पहाते आहे.
अर्थात ते आजारपणाचे दिवस गेले अन ती हाँटींग इमेजही.
पण त्यातून ही कल्पना आलेली आहे. Smile
____
कदाचित मरणासन्न आजारी अवस्थेतील ते इंट्युशनही असेल की आपल्याला जगायचे आहे. स्वतःतील जिजीविषेने मारलेली ती हाकही असेल की तुला बरच जगायचय हे तू स्वतःला दिलेलं वचन आहे.
पण ती इमेज हाँटींग होती हे सत्य आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अपु गपु! बिग हग टू यू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स डियर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची कविता आवडली.

अवांतर : Before Midnight चित्रपटातील नायक जेसी असेच एक पत्र २० व्या वर्षी लिहितो, ४० वर्षाच्या जेसी ला. त्याची आठवण झाली.
त्या पत्राची सुरुवात फक्त चित्रपटात आहे. (शब्द नि शब्द बरोबर नसेल पण अर्थ साधारण तसाच. )
"Dear 40 year old Jesse, hope you are not divorced"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंसात from your third husband नसतं का Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला Third Wife म्हणायचे आहे का? कारण जेसी हा नायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"Dear 40 year old Jesse, hope you are not divorced"

Oh my God!!! काही भीती अन भावना किती युनिव्हर्सल असतात त्याचाच पुनःप्रत्यय आला सव्यसाची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडेश...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0