सुक्या घोळीचा रस्सा
साहित्यः
सुक्या घोळीच्या तुकड्यांचे छोटे तुकडे.
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
मसाला २ चमचे जर मिरची पुड वापरणार असाल तर पाऊण ते १ चमचा पुरे.
२ चमचे तांदळाच पिठ
फोडणी साठी तेल २ मोठे चमचे
लिंबा एवढी चिंच
गरजे नुसार मिठ
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची
पाककृती:
१) सुक्या मशाचे एक ते दिड ईंचाचे तुकडे करून ते पाण्यात ठेवावेत ५ मिनीटांनी खवले जरा मऊ पडली की खवले काढून टाकावी व तुकड्या स्वच्छ धुवुन घ्याव्या.
२) भांड्यामधे तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा गुलाबी रंगावर परतवावा.
३) आता त्यात हिंग, हळद, मसाला घालून गरजेनुसार पाणी घाला. माश्याच्या तुकड्या घाला. १० मिनीटे हा रस्सा उकळू द्या.
४) ह्या रश्यात मिठ (तुकड्या खारवलेल्या असतात त्यामुळे मिठ थोडे कमीच घालायचे), चिंचेचा कोळ व तांदळाचे पिठ पाण्यात पेस्ट करून सोडा. आता अजून ५ मिनीटे उकळू द्या. वरून मोडलेली मिरची व कोथिंबीर घाला उकळताना व गॅस बंद करा.
टिपा:
सुक्या माश्याचे कालवण अगदी तोपासू लागते. अशाच रावस, पापलेट वगैरे मोठ्या माशांच्या तुकड्याही मिळतात. ह्याच पद्धतीने त्याचे कालवण करता येते.
तांदळाचे पीठ दाटपणासाठी वापरले जाते.
ह्या तुकड्यांना खाराचे मासेही म्हटले जाते.
सुक्या घोळीच्या तुकड्या बाजारात मिळतात. सुकी घोळ नीट पारखुन घ्यावी. चांगली कडकडीत सुकलेल्या व खाली फोटोत अशी मोठी खवले दिसतात तशा खवले असलेल्या तुकड्या घ्यायच्या. खवल्यांमुळे मासा घोळीचा आहे की दुसरा ते लक्षात येत. घोळीची खवले खाली फोटोत देत आहे.

मस्तच!माझे दोन प्रश्न :१.
मस्तच!
माझे दोन प्रश्न :
१. सुक्या माश्यांचा वास येत नाही का जास्त (स्टींकी)? (बोंबील च्या अनुभवावरुन हा प्रश्न विचारावा वाटला).
२. हिरवी मिरची अशी मोडून वरून टाकण्यामागे काही विशेष कारण? (मुळ चवीला किंवा रस्स्याला मिरचीने डॉमीनेट करू नये म्हणून असे असावे का?)



अहाहा!
अहाहा!