बांधवगढ बरोबरचा बंध

तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं. हो वाघ. आडनावाचा नव्हे, पिंजऱ्यातला नव्हे आणि सर्कशीतला पण नव्हे. खराखुरा. अस्सल. गावठी.

मी तसा wildlife ची विशेष आवड असणारा माणुस नव्हे. म्हणजे अगदी कुठेही न जाता नुसता डिस्कव्हरी channel पाहून स्वत:ला wildlife expert समजणारयांपैकी पण नाही. जबलपूरला एका मित्राच्या लग्नाच्या योगानं जाणार होतो. मग आजूबाजूला काय काय आहे ते पाहताना बांधवगढबद्दल कळलं. (तसा मी लग्नाला जायची आवड असलेल्या माणसातही मोडत नाही. पण यावेळी गेलो कसातरी. असो.)

वाघ दिसण्याची guarantee शून्य. आणी वर ३०-३५,००० रुपये घालवून, जीव धोक्यात घालून वाघ पाहायला जाव का? असे तद्दन कोकणस्थी विचार डोक्यात आले होते. पण मी तसाही नुसता (आड)नावाचा कोकणस्थ आहे. त्यामुळे ते लवकर मावळले.

लग्नात त्यातल्या त्यात जंगलात जाउन आले असावेत अशा वाटणाऱ्या माणसांशी ओळख करून घेतली. एक अतिशय महत्वाची शंका, जी पहिल्या दिवसापासून डोक्यात घोळत होती, तीची चार पाच वेगवेगळ्या लोकांकडून शहानिशा करून घेऊन घेतली. ती म्हणजे सफारीची Gypsy गाडी उघडी असते कि बंद? एक तरी माणुस - "बंद असते", "घाबरण्याचं कारण नाही" अस म्हणेल अशी उगीच अपेक्षा. पण एक जात सगळ्यांनी Gypsy उघडी असते अस उत्तर दिल्याने अपेक्षाभंग होऊन भीती वाढलेली. शिवाय "guard काही हत्यार वगैरे घेऊन नसतो" अशी नको असलेली आणखी माहिती मिळाली!

जबलपूरहून लग्न उरकून बांधवगढला निघालो. जाताना driver कडून थोडीशी महिती काढावी आणि हा सुज्ञ माणुस घाबरू नका सफारी ची Gypsy बंद असते वगैरे दिलासादायक महिती देईल अशा समजुतीन त्याच्याशी बोललो तर त्याने तिकडे हल्ली अनेक वाघ माणसानंवर हल्ले करून कसे 'हाद्से' करत आहेत हे सांगून लहानपणी वाचलेल्या 'अमुकअमुक चा नरभक्षक' वगैरे गोष्टींची आठवण करून दिली. MP मधल्या सफारीसाठी जाताना बांधवगढ की कान्हा असा एक प्रश्न सगळ्यांना पडत असावा. दोन्ही ठिकाण चांगलीच आहेत. कान्हा जास्त मोठं आहे आहे. तिथले forest officers जास्त समंजस आहेत. कान्हा (४:३० तास ) बांधवगढ (३/३. ५ तास) पेक्षा जबलपूरपासून थोडं लांब आहे. बांधवगढ हे MP मधल्या रीवा राजघराण्याच राखलेलं जंगल. महाराजा मार्तंडसिंह यांनी त्यातल्या वनसंपदेच रक्षण करून पुढे त्याचं अभयारण्य करायला मान्यता दिली. बांधवगढ मध्ये सुमारे ६०-६५ वाघ आहेत. बांधवगढमध्ये वाघांची density कान्हा पेक्षा जास्त आहे. त्यामुळे वाघ दिसण्यची शक्यता जास्त असते.

jokes apart, तुम्ही सफारीला पहिल्यांदाच जात असाल तर खरोखरच सफ़ारी एन्जोय करायची गोष्ट आहे हे स्वतः ला नीट पटवून मगच जा. साध कुत्र (?) नाही दिसलं तरी चालेल हे मनात बाळगूनच जा. याने निराशा होणार नाही. आणी जंगल तसही खूप सुंदर असतं. नुसता फेरफटकासुद्धा खूप सुखद वाटतो. गेलाबाजार माकड, हरीण, मोर वगैरे प्राणी दिसतातच. (त्यांना तिथे कोणी फार विचारात नसलं तरी). पण "फलाची आशा न करता कर्म करत रहा" हि गीतेची शिकवण आचरणात आणण तसंही कठीण असल्यामुळे, आम्ही शेवटी बांधवगढला जायचा निर्णय घेतला.

बांधवगढ जस जवळ आलं तसे लोक, लहान मुल, शाळकरी मुल/मुली, गुर-ढोर दिसु लागले. तेही एकटे दुकटे. तेव्हा थोडा जीवात जीव आला. driver चे हाद्से उगाच बनावट वाटू लागले. हे लोक एवढे बिनधास्त फिरत असतील तर इतकही काही घाबरायला नको अस वाटू लागलं. मग (मुळात कच्च्या) गणितात उगाच probability (जी फार कधी पल्ले पडली नाही ) चे हीशेब करत वाघाकडून हल्ला होण्याची probability मुंबईत गाडीच्या accident पेक्षा कमी आहे, जो होगा देखा जायेगा असा एक आत्मविश्वास अंगात आला.

दुपार होऊन सुद्धा आजूबाजूला बऱ्यापैकी धुकं होत. त्या धुक्यात आमची गाडी हॉटेल कडे वळली. Nature Heritage (http://www.natureheritageresort.com/photogallery.html) नावचं ते रिसोर्ट छोटेखानी पण छान होतं. नावाला साजेसं. स्वागत झाल lemonade type एका सरबताने. त्यामुळे प्रवासाचा सगळा थकवा दुर झाला. पटकन जेवण आटपून आम्ही सफारी साठी रेडी झालो. (सगळीकडून उघडी ) gypsy आमची वाट पाहत होती. driver तसा किरकोळ शरीरयष्टीचा होता. त्यात त्याची जागा व्यवस्थित बंद. आणि आम्ही 'निले गगन के तले' बसलेलो. तेव्हा माधवराव पेशव्यासारखे अचानक जबाबदारी यावी तसा - "माधवां (अनुनासिक बरं का), आता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशी मनाची तयारी करून घेतली. पुढे एक गाईडही बसला. तोही जेमतेमच. ती जोडगोळी मला उगीचच धृतराष्ट्र आणि संजय सारखी दुरून युद्धाची मजा घेणारी वाटली.

आठ दहा किमी वर बांधवगढ च्या gate क्रमांक २ वर आम्ही आलो. तिथे ३ गेट्स आहेत. मगधी, ताला, आणि खितौलि असे तीन मुख्य झोन आहेत. ताला वाघांच्या जास्त संख्येमुळे premium zone मानला जातो पण हल्ली तिथले खूप वाघ मेल्यामुळे मगधीला महत्व आल आहे. आमच्या travel arranger 'प्रयाण'न (http://www.prayaanindiaoverland.com) तिन्ही सफारीसाठी बरोबर या झोनची निवड केली होती. तुम्ही जात असाल तर resort/travel agent कडून कोणत्या झोन मध्ये सध्या जास्त activity आहे याची माहिती घ्या आणि मग बुकिंग करा. तसे सगळे झोन फिरणंही चांगलच.

गेट वर airport वर होत नसेल इतका तगडा चेक होतो. त्यामुळे तुमच ID कार्ड तयार ठेवाव लागतं. तेही तेच जे तुम्ही बुकिंगसाठी वापरलं आहे. एकूण सगळेच जण forest officer ना शिव्या देत होते. बांधवगडचा ८०% भाग सध्या tourist साठी बंद ठेवण्यात आला आहे. अस का केलय त्याची नक्की माहिती मला नाही, पण कुठल्याश्या international संस्थेन वाघांच्या संरक्षणासाठी अख्खा पार्क बंद करावा असा सल्ला दिला होता म्हणे! (उगीचच मला मी management consultant न झाल्याचा आनंद मला झाला). आजूबाजूच्या हॉटेल मालकांनी त्याच्याविरुद्ध अपील केल्यावर court न २०% जागेवर tourismला permission दिली. बांधवगढला सुमारे ५५ resorts आहेत. एक तर पावसाळ्यात ३.५ महिने पार्क बंद असतो. त्यामुळे सगळ बंद. आणि त्यात आता २०% भागच available असल्यामुळे येणारे लोक कमी झालेत. एका दिवशी फक्त ८० सफारी allot केल्या जातात ज्या आधी २०० असायच्या. शिवाय क्षेत्र कमी झाल्यामुळे आणि route system केल्यामुळे वाघ दिसण्याची शक्यता कमी होत आहे. या सगळ्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे आणि हेच चालू राहील तर ५एक वर्षात बांधवगढच tourism पूर्णपणे बंद पडेल. इतर tiger reserve मधे अस होत नाही म्हणे. हे सगळ ऐकल्यावर नक्की कुणाच बरोबर या बद्दल निर्णय मात्र घेता आला नाही. माणसाभोवती जग चालत, त्यामुळे उद्या वाघांसाठी अक्ख जंगल बंद केल तर त्याचा काय उपयोग असा विचार मनात आला. त्याचवेळी प्रत्येक गोष्टीचा "उपयोग" असलाच पाहिजे का? असाही counter विचार मनात येत होता. पण तरीही tourism मुळे प्राण्याचं नुकसान होत असे सबळ पुरावे नाहीत. उलट प्राण्यांना एक प्रकारची सुरक्षा मिळते.कारण लोकल लोकांना रोजगार मिळतो ज्यामुळे ते तस्करी सारख्या गोष्टी करण बंद करतात असा मतप्रवाह आहे. पण अशावेळी wild life tourism ची एक national level policy असावी; "एका" forest अधिकाऱ्याच्या हातात अशा गोष्टी देऊ नये इतक मात्र वाटलं. आणि सद्यस्थितीत एक भारतीय जे करतो तेच - म्हणजे नरेंद्र मोदिनी ह्याबद्दल काहीतरी कराव असा निर्णय घेऊन मी गेट मधून आत शिरलो. मोदींच्या पुढे असलेल्या कामाच्या डोंगरात वाघांचा विचार करायला त्यांना कधी वेळ मिळेल कुणास ठाऊक. मात्र देवीच वाहन वाघ असल्यामुळे देवीनेच जर "य: मोदी सर्वभूतेषु आशारुपेण संस्थिता नम:तस्यै नम:तस्यै नम:तस्यै नमो नम:" अस म्हटलं तर मोटाभाई लगेच मनावर घ्यावेत बहुदा.

वाघ हा खूप territorial प्राणी आहे अस ऐकल होत पण त्यावर इतका विचार कधी केला नव्हता. वाघ कायच्या काय जास्त territorial आहे. एक भाई दुसऱ्या भाई च्या area मध्ये गेला तर जस gang war सुरु होत तस वाघांच असत. male tiger तर आपले area मार्क करून ठेवतात. झाडावर दोन पाय वर करून उभे राहून नखांनी ओरखडे ओढून ते आपला area मार्क करतात. थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे मार्क सुमारे ८-१० फूट उंचीपर्यंत केलेले असतात!
IMG_4852
वाघाला पाहून हा प्राणी इतका लांब असेल अस वाटत नाही पण एक पूर्ण वाढ झालेला वाघ १० ft लांब असतो म्हणे. शिवाय ओरखडे ओढून वाघांची नख शार्प होतात. ह्या ओरखड्यांना एक विशिष्ट वासही असतो. जो खाली उतरणे शक्य नसल्यामुळे मी घेऊ शकलो नाही . (शक्य असत तरी घेतला नसता हि गोष्ट वेगळी.) तर, या वासाने हे ओरखडे किती ताजे आहेत हे दुसऱ्या वाघांना कळत. दुसरा वाघ तिथे आला कि तो आपले पाय ताणून ओरखडे काढायचा प्रयत्न करतो. त्याचे ओरखडे जास्त उंच जात असतील तर त्याला जाणवत की 'इस area का भाई हमसे कमजोर हैं'. मग तो जाऊन त्या भाई शी पंगे घेतो नाहीतर 'सुमडीमधे खिसकतो'.

या सगळ्या माजामुळे वाघांच नुकसानही खूप होत. charger नावाचा एक खूप ferocious वाघ बांधवगढ मधे राहायचा. तरुणपणी त्याचा दरारा एवढा होता कि हत्ती त्याच्या area जवळ जायला घाबरायचा. त्याच नाव charger पडल ते त्याच्या दऱ्याऱ्यामुळे. पण जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा त्याला इतर वाघ मारतील या भीतीन जंगलातून बाहेर ठेवावा लागला! ही अवस्था एखाद्या उद्योगपती च्या म्हातारपणात त्याचे नातेवाइक, मुल संपत्ती, जागा (area) यासाठी त्याचे लचके तोडतात त्यासारखीच म्हणायची. जागेचा लोभ हा कदाचित नैसर्गिक असावा. असो.

या अशा भांडणात या एका वर्षात बांधवगढ मधील ८-१० वाघ आणि पिल्ल मारली गेली. "बाबारे, तुमची संख्या एकतर कमी आहे, त्यात तुम्ही असले प्रकार करून स्वताचीच वाट लावून घेऊ नका" असा कळकळीचा सल्ला द्यावा असा विचार मनात आला होता. पण या (मोठ्या) मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी आणि कशी?

गेट मधून आत शिरल्यावर साल वृक्षांच्या बाहुल्यामुळे नेहमी हिरवागार असणार्या त्या जंगलात एक वेगळाच, सुखद गारवा जाणवत होता. त्या भागात नुकताच पाउस पडून गेला होता त्यामुळे धुळ नव्हती. नाहीतर धुळीने माखायला होईल इतकी धूळ उडते म्हणे. कच्च्या रोडवरच्या उंचसखल भागात आमची gypsy आम्हाला जंगलाच्या अंतर्भागात घेऊन चालली होती. सगळ्यांचीच नजर आता 'त्याला' शोधत होती. अधून मधून हरीणांचे कळप दिसत होते. black shoulder kite नावाचा helicopter सारखा एकाच ठिकाणी पंख फडफडत उडत राहणारा एक पक्षी दिसला. मोर दिसत होते. Indian रोलर दिसले. माकडं दिसत होती.

FB-IMG_4762

FB-IMG_4765

IMG_4837

माकड आणि हरीण यांची एक खास दोस्ती असते म्हणे. माकडं झाडावरून फळ , पानं वगैरे खाली पाडतात आणि हरीण ती खात. निसर्गातली मैत्री हि स्वार्थी असते अस मला वाटत. स्वार्थ हा शब्द त्यांना माहिती नसला तरी. आपण माणसाला कितीही शिव्या दिल्या तरी निस्वार्थीपणा हा माणसाचाच शोध. त्याचा कितीही अभाव जाणवला तरीही. तो निसर्गनियम नाही.

आत शिरून आता जवळ जवळ तासभर झाला होता. २० एक किमी आत आम्ही आलो होतो. दुसर्या gypsy, मधेच सायकल वर दिसणारे forest ऑफिसर दिसले कि गाड्या थांबून कुठे काही "activity" आहे का या माहितीची देवाण घेवाण होत होती. अजून "त्याची" कुठे काही चाहूल नव्हती. कानकटी नावाच्या एका लाडक्या वाघिणी बद्दल guide सांगत होता. २ एक वर्षापूर्वी तिने काही पिल्लांना जन्म दिला होता पण या वर्षी gang war मध्ये ती आणि तिची पिल मारली गेली होती. एका ठिकाणी १-२ मोर नाचत होते, म्हणून फोटो घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण मोरवंती बांधवगढकरीण आणि मंडळी यांचा आज लावणीचा मूड असावा. एक जात तोंड कॅमेरा कडे फिरवतील तर शपथ!
FB-IMG_4774

त्याची चाहूल नसल्यामुळे म्हणा किंवा त्या वातावरणाची थोडी सवय झाल्यामुळे म्हणा एक comfort आला होता. भीती वगैरेची जाणीव होत नव्हती. थोडी भुकेची जाणीव झाली म्हणून बरोबर नेलेले शेंगदाणे खायला सुरुवात करणार इतक्यात driver ने करकच्च ब्रेक लावले. एकदम सगळा comfort गायब झाला. दहशत जाणवू लागली. श्श…… guide ने गप्प राहायचा इशारा केला. हरीणांचा एक कळप खी:~ ~ असा आवाज करत होता. त्याचा 'call' होता. आमच्या काळजाचे ठोके आता जाणवत होते. आता पर्यंत जाणीव न झालेला 'वाघ येईल तेव्हा नक्की काय करायचं' हा प्रश्न आता मनात काहूर माजवत होता. कुठून येईल? धावत कि चालत? gypsyत उडी घेतली तर? सगळी सृष्टी जणू स्तब्ध झाली होती. हरणं थबकून एका दिशेला पहात होती. माकडंही आवाज करून संकेत देत होती. दरारा काय असतो, अदब कशाला म्हणतात हे अनुभवायचं असेल तर हीच ती जागा, हाच तो क्षण. न मागता, बळजबरी न करता मिळालेला मान, स्वयंभू सामर्थ्य काय असतं याचा प्रत्यत फक्त इथेच येऊ शकतो. आपली गाडी पास होईपर्यंत traffic बंद ठेवणाऱ्या (अगदी वाघाच चित्र पक्ष चिन्ह म्हणून वापरणाऱ्या) नेत्यांच्या कानफटीत द्यावी अस हे दृश्य. हरीणांचे आवाज अजून सुरु होते पण "तो" कुठे दिसत नव्हता. आमची gypsy तिथेच होती. आता त्यात उभ राहून आम्ही त्याला शोधत होतो. पण त्याची एन्ट्री होत नव्हति. अशी आणखी ५-१० मिनीट गेली. guide ला अजूनही आशा होती. मात्र मुळात समंजस असलेला मी दाण्याच्या पुडीत हात घालून परत खाऊ लागलो. अदब, मान वगैरे सगळ ठीक आहे पण वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो हे चांगलच माहिती असल्याने हरीणानी पण माझ अनुकरण करत चरायला सुरुवात केली. शेवटी चरणे या चराचर सृष्टीचे रहस्य आहे हा साक्षात्कार त्या दिवशी मला झाला.

आपण थोड पुढे जाउन परत इथे येउया अस म्हणून guide आम्हाला पुढे घेऊन गेला. बाकीच्या ३-४ gypsy तिथेच होत्या. आम्ही एक १५-२० मिनट पुढे जाउन परत आलो. Call होता, पण तीव्रता थोडी कमी झाली होती. त्याच भागात फिरत आम्ही त्याची वाट बघत होतो. तिकडे घड्याळ टिकटिक करत होतं. बांधवगढ मध्ये शार्प ५:३० वाजता सगळ्या gypsy ना गेटच्या बाहेर पडाव लागतं. आम्ही त्या भागत ४-५ फेऱ्या मारत गोलगोल फिरत होतो. हळूहळू उत्सुकतेची जागा निराशा घेत होती. आणि जणू हि निराशा निसर्गही काळोखाच साम्राज्य आणून व्यक्त करीत होता.
IMG_4782

driver ने गाडी आता मागे फिरवली होती. वाटेत पाणवठ्यांकडे आम्ही बघत होतो पण का कोणास ठावूक तो आज दिसणार नाही अशी एक खात्री मनात ठिय्या करू लागली होती. उद्या दिसेल का, नाही दिसला तर? वगैरे निराशाजनक प्रश्न आता मनात डोकवत होते. सकाळी वाघ दिसण्याचे chances जास्त असतात अस सांगून guide ने उसन अवसान दिल. वाढलेल्या थंडीत आणि धुक्यात आम्ही resort वर परतलो.

आता मस्त अंधार झाला होता. resort मध्ये शेकोटी होती आणि सगळे guests तिथे बसले होते. गरम गरम चहा घेत आम्ही थंडी आणि शांतता एन्जॉय करत होतो. तितक्यात सफारी पेक्षा timepass करायला आलेल्या एका मोठ्या group न कर्तुत्वाला साजेसा 'dumb' charades खेळ सुरु करून शांतता भंग सुरु केला. हैप्पी न्यू इयर सारख्या तद्दन टुकार चित्रपटावरून एका couple मध्ये एवढ्या जोराचं भांडण सुरु झाल कि त्यांनी almost एकमेकांचा गळा दाबला. आम्ही तिथून गपचूप बाहेर पडून दुसऱ्या शेकोटी जवळ जावून बसलो.

इथे एक elderly डच couple आणि त्यांचा Indian guide गप्पा मारत बसले होते. या डच माणसाला मी दुपारी जंगलात पाहिलं होत. एक मस्त telephoto लेन्स घेऊन Indian रोलर चे फोटो घेताना. हळूहळू त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या. ते दोघंही Holland मध्ये शिक्षक आहेत. त्यांना wild life आणी photography ची आवड. भारताची विशेष आवड. "you have a beautiful country" अस त्या बाईने म्हटल्यावर मला मुंबई मधली झोपडपट्टी आठवली. हा माझा नतद्रष्टेपणा होता हे मलाही जाणवलं. पण त्याला काही इलाज नाहि. त्यांनी सध्या एक वर्ष ऑफ घेतलंय फिरण्यासाठी! अशा लोकांबद्दल मला नेहमी आदर वाटत आलय. They know what they want from life. मला हे कधी जमेल अस वाटत नाही. म्हणजे जॉब सोडण नाही; अस नक्की एका गोष्टीची आवड असण आणि त्यासाठी बाकीच्या गोष्टींवर compromise करता येण. हे दोघ जवळ जवळ सगळी अभयारण्य फिरले आहेत. भारत, आफ्रिका सगळीकडे. मी त्यांना भारतीय आणि आफ्रिकन सफारी च्या अनुभवाबद्दल विचारलं. तर आफ्रिकेतील सेल्फ-driving सफारी ची availability वगैरे गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे Africans are more welcoming! आम्ही 'अतिथी देवो भव' वगैरे संकल्पनेचे "जनक"; पण बाकीच रामकहाणी तुम्हाला सांगणे न लगे.

त्यांच्याशी गप्पा मारून मग आम्ही रूम मध्ये गेलो आणि झोपलो. सकाळची सफारी पावणे सहा ला सुरु होणार होती.

शार्प पावणेसहा ला gypsy ने आम्हाला pickup केल. बाहेर खूप धुकं आणि प्रचंड थंडी होती. resort ने rug ची व्यवस्था केली होती पण तरीही थंडी लागत होती. साडे सहा ला आम्ही परत मगधी मध्ये प्रवेश केला. धुक्यामुळे आज वातावरण जास्त गूढ वाटत होतं. त्यात आजूबाजूला साडेपाच-सहा फूट उंच गवत. या धुक्यात आजूबाजूच्या उंच गवातामधून वाघ येणार तर नाही ना असा एक विचार आज सारखा येत होता. मधेच काही ओंडके, बसलेल्या वाघाचा आकार धारण करून आम्हाला हुलकावण्या देत होते. एका ठिकाणी गाडी थांबली. वाघाच्या पायांचे ठसे जमिनीवर होते.
IMG_4791

रस्ते थोडेसे उबदार असल्यामुळे वाघ थंडीत रात्री, पहाटे रस्त्यावरून फिरतात. "बापरे, कसले मोठे ठसे आहेत" अस मी म्हणत असताना हे वाघाचे नसून वाघिणीचे ठसे आहेत अस गाईड म्हणाला. ठश्यांवरून स्त्री/पुरुष ओळखण्याच्या त्याच्या कलेबद्दल मला अचानक आदर वाटला. मी न राहवून त्याने हे कस ओळखल असा भाबडा प्रश्न त्याला विचारला. आणि काहीतरी भन्नाट गोष्ट आज कळणार या प्रतीक्षेत असताना त्याने हे पंजे छोटे आहेत. वाघिणीचे पंजे वाघापेक्षा छोटे असतात अस सुमार उत्तर देऊन त्याने माझी निराशा केली. असो. पण मग वाघाचे पंजे किती मोठे असतात हा मात्र एक चांगला प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आम्ही थोडा वेळ ते पंजे follow केले पण एका ठिकाणी ते रस्ता सोडून गेले होते. त्यामुळे काही दिसण्याची आशा मावळली.

सुमारे १:३० तास आम्ही फिरत होतो. कालचे side hero हरीण, माकड हेही आज दिसत नव्हते. सार कस शांत शांत होत. बाकीच्या gypsy भेटत होत्या पण आज काहीच हालचाल नव्हती. कुठे call नव्ह्ता. १:३०-१:४५ तासाने एका patroling कॅम्प जवळ गाडी थांबली. इथे झोपडीवजा प्रसाधनगृह असतात. शिवाय एक प्रचंड मोठा हत्ती ही होता. काही वर्षापूर्वीपर्यंत हत्ती वरून सफारी करता यायची. आजकाल ती बंद करण्यात आली आहे.

इथला ब्रेक आटपून आम्ही खाली आलो. काहीही हालचाल नव्हती. एका सपाट भागात गाडी जात होती. अचानक उजवीकडे समोर हिरव्या पिवळ्या ३.५/४ फूट उंच गवतात काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी येत होतं. आधी हरीण असेल अस वाटत असताना, चक्क "तो" होता . काळजात एकदम चर्र झालं.
IMG_4801

जेमतेम ५-१० फूट अंतर असेल. गवतात मान वर काढत चालत तो आमच्या गाडीकडे येत होता. सगळे तिथेच थबकले. काय रूप, काय अदा, कसला रुबाब. सगळ थक्क करणार होत. आमची थंडी आता पूर्णपणे पळाली होती. अंगावरचा रग उडवून देऊन gypsy मध्ये उभ राहून आम्ही आता त्याला पहात होतो. गाईड ने "तो" नसून "ती" आहे अस सांगितलं. ती आमच्या gypsy च्या अगदी जवळून जात होती. जणू आमच अस्तित्व तिच्यासाठी नगण्य असाव. मनात आता फार भीती नव्हती. फक्त ५-१० मिनिटाचा परिचय असेल पण जणू एक ओळख निर्माण झाली होती. ती रस्ता क्रॉस करून एका गवत असलेल्या भागात शिरली. आणि ती त्या गवताच्या दुसरीकडून परत ज्या रस्त्यावर जाइल अशी आशा होती तिकडे आमच्या गाडीने कूच केली. हा सगळा थरारपट फक्त आम्ही आणि दुसरी एक gypsy पहात होतो. बाकीच्या लोकांना हा नजारा पाहता आला नाही.
Tiger 1

Tiger 1-2

fb-IMG_4824

गाईड च्या अपेक्षेप्रमाणे ती बरोबर एका जागी बाहेर आली. पुन्हा कॅमेरांचा क्लीकक्लीकाट सुरु झाला. इतक्यात आणखी दोन gypsy चा आवाज येऊ लागला तशी ती बिथरली. तिने आता धावायला सुरुवात केली. परत काही क्षण मनाचा थरकाप उडाला. सगळेच जण घाबरले. आता ती नक्की काय करेल काही सांगता येत नव्हत. ती उंच उड्या मारत गाडीच्या पुढे धावू लागली. माझ्या मनात त्या क्षणी सुद्धा ती "बघतोस काय रागानं, overtake केलाय वाघानं" असं तर म्हणत नसेल ना असा पोरकट विचार येउन गेला. ती त्याच वेगात एका डोंगरावर चढून गायब झाली. १०-१५ मिनट तिच्या सहवासात असून सुद्धा ती अजून दिसावी अस वाटत होत. बाकिच्या गाड्या तिथे येत होत्या but they were just too late. आम्ही उगाच हिरो झालो होतो. आमच लक खरच खूप चांगल असावं. नंतरचा पूर्ण वेळ आम्ही एक अतीव समाधान अनुभवलं. सुनीताबाईना त्याच्या "दर्शनमात्रे" झालेला आनंद आठवला. ती चाल, तो तोरा (वाघाला जपानी भाषेत 'तोरा' म्हणतात), पाहून देवीनं वाघाची वाहन म्हणून का निवड केली असावी हे लगेचच कळावं!अक्खी ट्रीप सफल झाल्यासारखं वाटत होत.

आम्ही १०:३०ला गेटच्या बाहेर आलो. तसं माझ्या (आळशी) मनात उरलेली दुपारची सफारी करावी का असा प्रश्न डोकावत होता. पण नक्की करायची अस quick उत्तर त्याला मनानच दिल. हॉटेल वर ब्रेकफास्ट, अंघोळ, आणि power nap घेऊन आम्ही २:३० ला दुसऱ्या सफारीला गेलो सुद्धा.

वाघ परत दिसावा, आता परत कधी येण होईल का वगैरे बोलत आम्ही फिरत होतो. काल दुपारच्या सफारी पेक्षा आज बऱ्यापैकी जास्त उन होतं. आज fox आणि jackal दोघही दिसले. jackal हा fox च्याच कुळातला पण तो शिळ मांस खातो, दुसऱ्याने मारलेल. fox तस करत नहि. jackal थोडा मोठा हि असतो. बांधवगढ ला इतर प्राणी फार नाहीत. चित्ते, अस्वल आहेत पण ते फार दिसत नाहीत. त्यामुळे वाघ हरीण किंवा सांबर यांना मारून खातो. त्यांना त्याच त्याच प्राण्याचा कंटाळा येत नसेल का? variety may not be spice of their lives. जंगली कोंबडी पण दिसते. मला ती आधी आजूबाजूच्या गावातून वाट चुकून आलेली पाळीव कोंबडी वाटली होती. पण जंगली कोंबडी जास्त colourful असते.

बांधवगढ पार्क मध्ये ५-६ गाव देखील आहेत. सफारी करताना गुर, गुराखी वगैरे दिसतात. वनविभागान त्यांना विशिष्ट हद्दीत वावरण्याची परवानगी दिली आहे. गुर easy prey असल्यामुळे अनेकदा वाघ गावात हल्ले करतात. नजीकच्या काळातच म्हणे एका वाघाने ४-५ माणसं मारली. का कोणास ठावूक मला त्या लोकांबद्दल उगाच एक सहानुभूती वाटली. वनखात्याचे नियमही गमतीदार आहेत - वाघाने मारलेली गाय जर हद्दीची आत असेल तर गावकऱ्याना compensation मिळत; हद्दीच्या पार सापडली तर नाही!

वाघ दिसल्यामुळे जीवाला एक शांतता लाभली होती पण अजून एकदा दिसावा ही इच्छा काही केल्या जात नव्हती. आजही जंगल शांत होत. जंगल शांत असल कि guide आणि driver खूप नाराज असतात. आपल्या गाडीतल्या guests ना वाघ दिसला कि त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसतो. याच मला फार अप्रुप वाटलं. बेस्ट च्या कंडक्टर ला कलानगर च्या stop वर वेळेवर गाडी पोचली की आनंद झाल्याचा कोणी पाहिला आहे का?

या सफारीत आम्ही मगधीच्या सगळ्यात आतल्या भागात आलो होतो. कुठलाही call नव्हता. आणि अचानक वाघ दिसला! रस्त्यात! मध्य्भागी!
IMG_4848
शांतपणे चालत होता. "होती" गाईड च्या मते. तेच रूपड. तोच बाज. ही वाघीण आधी दिसलेल्या वाघीणीपेक्षा तरुण होती. तिची कांती अधिक सतेज असल्याचं जाणवत होतं. थंडीमुळे तिच्या अंगावर फर चा आणखी एक layer आला होता. तस पाहायला गेलं तर सगळे वन्य प्राणी नग्न. पण नग्नतेचा लवलेश सुद्धा न जाणवता कसे gracefully राहतात हे? तिनं एकदाही मागे वळून पाहिलं नाही. celebrity कॅमेरा चुकवतात तस काहीस होत असाव त्यांच. ३-४ मिनिट ती चालत होती. समोर मोर आला आणि अचानक ती रस्ता सोडून आत गेली. अगदी कोणी मिळाल नाही तर म्हणे वाघ मोर वगैरे पण खातात. मोरांच stalking करून ती परत रस्त्यावर येईल या अपेक्षेत आम्ही तिथेच उभे होतो.
IMG_4847

दुसरी एक gypsy पण तेवढ्यात तिथे आली. बांबू च्या झाडी मध्ये 'ती' कुठे दिसतेय का म्हणून आम्ही पाहत होतो. तेवढ्यात जीवाच्या आन्कांतान पळत एक हरीण बाहेर आल. परत थरार सुरु झाला. वाघीण येणार हरणाच्या पाठून. धावत. डाव्या बाजूने. कुठून येईल? कशी? जबडा उघडून? असंख्य शंका मनात धिंगाणा घालू लागल्या. आणखी ५ मिनिट गेली. हरीण अजूनही ओरडत होत. पण "ती" कुठे नव्हती. थोडा वेळ थांबून आम्ही निघालो. दिवस ढळत होता. आकाशात रंगांची उधळण होत होती. ५:३० ला परत गेट वर जायचं होत. पण आयुष्य सार्थकी लागल्यासारख वाटत होत. बांधवगढ चा हा खरा बांधव जगण्याला एक नवीन दिशा देऊन गेला होता.

आतल्या आत एक शांतता जाणवत होती. या जंगलाशी एक नात निर्माण झाल होत.
मनात फक्त हेच घोळत होत ….
सरसाराती हुई टेहनिया, पत्तीया..
कह रही हैं कि बस इक तुम हो यहां
सिर्फ मैं हुं, मेरी सांसे हैं, और मेरी धडकने
ऐसी गेहरायीआ ऐसी तन्हाईयां और सिर्फ मैं
अपने होने पे मुझको यक़िन आ गया…

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (9 votes)

प्रतिक्रिया

फार सुंदर. फोटो तर अप्रतिम आले आहेत. नंतर शांतपणे वाचण्यासाठी वाचनखुण साठवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त आहे.
ऐसी अक्षरेवर स्वागत! तुमचे आणखीही लेख वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थ्यान्कू! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नागपूरमध्ये प्रशिक्षणासाठी असतांना कान्हा आणि ताडोबा ह्या दोन्ही अभयारण्यांमध्ये १९६६ साली मी माझ्या सहाध्यायांबरोबर गेलो होतो. तेव्हाचे अनुभव आणि आजचे अनुभव ह्यांची तुलना मनोरंजक ठरेल.

अभयारण्ये निर्माण झाली होती तरी पर्यावरणाचा समतोल, वन्य प्राण्यांना त्रास होईल आणि त्यांचे रोजचे जीवन विस्कळित होईल असे वर्तन न करणे इत्यादि जे उत्तम नियम आजच्या दिवसांतील पर्यटकाला पाळावे लागतात त्यांची तेव्हा विशेष जाणीव नव्हती. जंगलात जायचे आणि जमेल तसे आणि तितके प्राणी पाहायचे हेचे उद्दिष्ट असे. त्यामुळे प्राणी दिसण्याची हमखास वेळ म्हणजे सायंकाळ आणि रात्र ह्या वेळांत जंगलभर जीप घुमवणे असे प्रकार सरसहा चालत असत.

कान्हामध्ये वाघ पाहण्याचा निश्चित मार्ग म्हणजे विशिष्ट जागी रेडा बांधून - ह्याला तेथील गार्ड 'बोधा' म्हणत असल्याचे आठवते - शेजारच्या मचाणावर चढून बसणे आणि वाघाची वाट पाहणे हा होता. तदनुसार गार्डांना २०० रुपये देऊन आम्ही एक रेडा मिळविला. ठराविक जागी त्याला सायंकाळी बांधून ठेवले आणि मचाणावर चढून बसलो. रात्री प्राणी पाहणे सोपे जावे म्हणून आम्ही बरोबर कारच्या एकदोन बॅटरीज आणि त्यांवर चालविण्यासाठी प्रखर प्रकाशाचे सर्च लाइट्सहि बरोबर ठेवले होते. रेडा बांधायची जागा वाघांच्या परिचयाची होती. आम्ही स्थानापन्न झाल्यावर २०-२५ मिनिटे शान्तता होती पण अचानक रेडयाला काहीतरी जाणवले आणि त्याने शेणमूत टाकले. ५ मिनिटांमध्ये झुडपांमध्ये आम्हास एक वाघीण आणि बरोबर तीन पिले दिसली. दबा धरतधरत वाघीण आणि पिले रेडयाकडे सरकू लागली तसा रेडा घाबरा होऊन केविलवाणे ओरडू लागला. अखेर वाघीण उघडयावर आली आणि रेड्यासमोर बसकण मारून बसली. एव्हांना रेडा ओरडून ओरडून थकला होता. तोहि न हलता वाघिणीकडे एकटक पहात राहिला. अशी दोनतीन मिनिटे गेल्यावर वाघिणीने एकदम रेड्याच्या पाठीवर उडी मारून त्याला खाली पाडले आणि त्याच्या पोटात नखे आणि दात रोवून लचके काढायला तिने सुरुवात केली. पिलांनीहि तेच केले आणि तिघे मिळून रेडयाला जिवंतच खाऊ लागले. रेडा आक्रोश करतच होता. ४-५ मिनिटे मांस खाल्ल्यावर तिघेहि थोडे थांबले आणि पोट फुटलेला पण जिवंत रेडा आणि त्याला खाणारे समोरासमोर नुसते बसून राहिले. ४-५ मिनिटांनी असेच खाणे परत सुरू झाले. सुमारे अर्ध्या तासानंतर वाघीण आणि पिलांचे पोट भरले असावे कारण रेडयाला तसेच सोडून ते पुनः झुडुपात गेले. रेडा जिवंतच होता हे त्याच्या क्षीण ओरडण्यावरून कळत होते. वाघीण आणि पिले आता पुढचे दोनतीन दिवस रेडयाला खात राहतील असे गाइडने आम्हाला सांगितले. मचाणावरून उतरून खाली उभ्या असलेल्या आमच्या गाडीमध्ये बसून अर्धा-पाऊण मैलावरच्या आमच्या कॅम्पकडे आम्ही परतलो. नंतरहि रेड्याचा क्षीण आक्रोश कानी येत होताच. रात्री ११-१२ च्या सुमारास तो पूर्ण थांबला. रेडा एव्हांना मेला असावा.

हा झाला कान्हा-किसलीचा अनुभाव. ताडोबाला आम्ही आज बिलकुल करू दिले जाणार नाही असे वर्तन केले. येथेहि आम्ही सर्चलाइट घेऊन गेलो होतो. (नागपूरमध्ये ही सोय देणारी एकदोन दुकाने होती.) रात्रभर सर्चलाइट टाकत जीपमधून सर्व जंगल पिंजून काढले. डोळयावर प्रकाश पडला की प्राण्यांचे डोळे चमकतात आणि प्राणी असल्याचे जाणवते. रात्रभर अनेक हरणे, डुकरे, तलावातील मगरी वगैरे दिसलया. काहीवेळ तलावाच्या काठी मचाणावर चढून बसलो. तलावाच्या पाण्यावर लाइट टाकला की पाण्यावर चमकणारे मगरींचे डोळे दिसत. (नंतर काही वर्षांनी पुनः ताडोबाला गेलो असता तेथील मगर प्रजनन केन्द्र पाहण्यास मिळाले.)

ताडोबाची अजून एक आठवण. आम्ही तेथे जाण्यापूर्वी काही दिवसच तेथे अफगाणिस्तानचे तत्कालीन राजेसाहेब येऊन गेले होते. त्यांच्यासाठी खास बांधलेल्या तलावाकाठच्या बंगल्यातच आमची राहण्याची सोय केली होती.

(धाग्यातील छायाचित्रे उत्तम आहेत हे सांगणे न लगे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी अनुभव आहे. म्हैस/रेडे यान्च्यामधे वाघाला परतवुन लावण्याची क्षमता असते असही ऐकुन आहे. या व्हिडिओ ची उगाच आठवण झाली - http://www.ted.com/talks/beverly_dereck_joubert_life_lessons_from_big_ca...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वर्षी मे महिन्यात ताडोबाला जाणे झाले. असाच, जंगल सफारीचा पहिला अनुभव. ऐन उन्हाळ्यात जंगलात पहिल्यांदाच फिरण्याचा आनंद काही औरच वाटला. आम्ही एकूण ६ सफारी केल्या. ४ कोअर झोनमध्ये आणि २ बफर झोनमध्ये. पैकी एका सफारी दुरून वाघीण तळ्यात अंघोळ करताना पाह्यला मिळाली (मनातल्या मनात उगाच आंबटषौकीनपणा केल्याची लाज वाटली). एका बिबट्याची शेपूट पाह्यला मिळाली (म्हणजे तो जंगलात जाताना दिसला). एकुणात 'यंदा ताडोबाला खूप टायगर अ‍ॅक्टिव्हिटी आहे' असे ऐकून वाघ पाह्यला आलो आणि लांबून दर्शनाखेरीज हाती काही न लागल्याने नाराज होतो. पण शेवटच्या दिवशी काही ध्यानी मनी नसताना ताडोबातला सगळ्यात मोठा नर वाघ पाह्यला मिळाला, तोही बफर झोनमध्ये (जिथे वाघ दिसण्याची शक्यता तशी कमी असते) आणि आख्ख्या ट्रिपचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. (फोटो माझ्या भावाने काढला आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मनातल्या मनात उगाच आंबटषौकीनपणा केल्याची लाज वाटली) हाहा.
फोटो सुन्दर आहे. ताडोबाचे वाघ किस चक्की का आटा खाते है? गुबगुबीत दिसतोय एकदम Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो सुन्दर आहे. ताडोबाचे वाघ किस चक्की का आटा खाते है? गुबगुबीत दिसतोय एकदम

अहो तो भारतातला आकाराने सगळ्यात मोठा नर आहे (सध्या तरी). पूर्वी बांधवगड की कान्हामधला 'बी-२' की कायसासा वाघ सगळ्यात मोठा होता म्हणे.

(मनातल्या मनात उगाच आंबटषौकीनपणा केल्याची लाज वाटली)

अर्थात नंतर हा ही विचार केला की च्यायला वाघिणीला १०० लोकांसमोर अंघोळ करायला लाज वाटत नाही मग आपल्याला पाहायला कसली लाज? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय दिलखेचक शैली आहे हो तुमची! सफारी, त्याचं दर्शन, नवी माहिती.... वगैरे वगैरे सगळं थोर आहेच. पण शैली! हाय! तुमच्या मनातले पोरकट (आणि गंभीर) विचार सांगत लिहिण्याची शैली काहीच्या काही फ्रेश आहे. मजा आली! प्लीज, लिहा. अजून लिहा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

थैन्कू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. वाघ पाहिलेल्यांचा एक "जितं मया" असा सूर असतो तो नसल्याने व जंगलाबद्दल उगाचच उमाळा नसल्याने फ्रेश वाटला.
कोल्हटकरांचा प्रतिसादही अत्यंत इंट्रेस्टिंग वाटला. विशेषत: रेड्याला वाघ कुटुंबीयांनी जिवंत खाण्याचा प्रकार. नाॅर्मली शिकार करताना वाघ भक्ष्याचे नरडे धरून आधी जीव घेतो म्हणतात. कदाचित रेडा बांधलेला असतो आणि तो काही पळत नाही हे त्या वाघिणीच्या लक्षात आले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखनशैली खूप आवडली. छायाचित्रांची संख्याही नेमकी म्हणावी इतकीच आहे. जास्त नाही की कमी नाही.
बाकी या सफरीला ३०-३५,००० रुपये जास्त वाटले. ३०-३,५०० म्हणायचं होतं का?

बाकी सर्वसाधारण भारतीय वाघांपेक्षा हे वाघ किंचित बारकुडे वाटले. किंवा अँगलमुळे असावे.

=====

ऐसी अक्षरेवर स्वागत. असेच येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या माद्या असल्याने असेल कदाचित. माद्या इन जणरल नरांपेक्षा लहान असतात. टेरिटोरियल नेचर सहसा नर वाघांचे जास्त असते. एका पूर्ण वाढ झालेल्या नरासाठी आयडियली १०० किमी एवढ्या क्षेत्रफळाचा भूभाग लागतो. कारण वाघ त्यांच्या टेरिटरीत सतत फिरत असतात. एका नर वाघाच्या टेरिटरीत साधारणतः २ ते ३ माद्या असतात ज्यांना त्याच्यापासून पिल्ले होतात. आम्हाला दिसलेला 'वाघडोह मेल' ('वाघडोह' हे ताडोबातला एक पाणवठा आहे. इथे हा पहिल्यांदा दिसला म्हणून वाघडोह मेल) हा सध्या भारतातला सर्वात मोठा वाघ आहे (वजनी साधारण ३५० किलो) असे कळले. हा वाघ म्हणे ताडोबातला कुटुंबवत्सल वाघ म्हणून ओळखला जातो. 'त्याच्या तिन्ही माद्यांना यंदा बछडे झालेत आणि तो दर २-३ दिवसांनी एका-एक मादी आणि तिच्या बछाड्यांसोबत दिसतो' असे तिथल्या फॉरेस्टवाल्याने गप्पांच्या ओघात सांगितले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख! मस्त फोटो! मस्त प्रतिसाद! अरण्याची आवड असूनही एकदाही घोषित अभयारण्यात गेलेलो नाही त्यामुळे अशा कथा अधाशासारख्या वाचतो आणि कोचावर बसून डिस्कवरी पाहतो.
भारतात वाघ नंतर रशिआतून आले असे म्हणतात तर देवीचे वाहन सिंह अथवा बिबटे असावे.
शैली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर स्वागत ! लेख आणि छायाचित्रे दोन्ही अतिशय सुंदर. आणि ते धन्यवाद / थ्यांकू सगळ्यांना मिळून एकदाच म्हटलं तरी चालेल. काये की लेख आणी त्यावर इतरांनी दिलेले प्रतिसादही तितकेच रोचक असतात. पण त्यात सारखे सारखे धन्यवाद आल्यावर एकदम लग्नाच्या रिसेप्शनमधे उभं राहिल्यासारखं वाटतं. बाकी धन्यवाद नाहि दिले तरी इथली मंडळी रागावणार नाही. उलट इकडे काही मंडळी अशीही आहे की एकदा डिलीव्हरी झाल्यानंतर ते बाळाकडे ढूंकूनही पाहत नाहित. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि छायाचित्रे एकदम मस्त आहेत. लिखाणाची शैली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख फारच खास आहे. लेखनशैली नर्म-विनोदी आहे. खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin
मस्त लेख, लेखनशैली आणि फोटो!
ऐसीवर स्वागत.
कोल्हटकर आणि भटांचे प्रतिसाद रोचक. कसला गबदुल आहे तो वाघ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0