एकच प्याला, चार शक्यता, चार जोड्या!!

अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्याबाबतचे माझे नवे विचार मी खाली मांडले आहेत:

आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.

पण आता दोन्ही प्रकारच्या व्यक्तीसंदर्भात दोन शक्यता वर्तवता येतात:

(१) आपण प्रथम आशावादी मनुष्याचा विचार करू:

(१-अ) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी होतो आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही.
किंवा
(१-ब) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्याचा आशावाद त्याला उरलेला अर्धा प्याला सुद्धा भरायला उद्युक्त करतो.

(२) आपण आता निराशावादी मनुष्याचा विचार करू:

(२-अ) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी नसतो आणि त्याला तो पूर्ण भरण्याची ऊर्मी मिळते.
किंवा
(२-ब) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे तो अधिक निराश होवून प्याला पूर्ण भरण्याचा विचार सोडून देतो.

तुम्हाला काय वाटते कोणती जोडी बरोबर आहे?
जोडी १- (१-ब) आणि (२-ब): आशावादी असणे चांगले!
जोडी २- (१-अ) आणि (२-अ): निराशावादी असणे चांगले??? (काय सांगता?)
जोडी ३- (१-ब) आणि (२-अ): कोणताही "वादी" असले तरी परिणाम चांगलाच??? असे कसे? असे कसे?
जोडी ४ - (१-अ) आणि (२-ब): कोणताही "वादी" असले तरी परिणाम वाईटच??? असे कसे? असे कसे?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१-ब ............... श्रेष्ठ
२-अ ................मध्यम
१-अ & २-ब ............कनिष्ठ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपुली ताई - तुम्ही एकदम सीरियसली घेतलेत की ह्या धाग्याला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार अभ्यासपूर्ण चर्चांची, व्यासंगाची आवश्यकता नसलेले असे धागेच आम्ही पामर लोक (राखीव कुरण नसलेले) व्यक्त होण्याकरता वापरतो झालं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आशावादी आणि निराशावादी माणसात फारसा फरक नसावा.

कोणीसे म्हटलेलेच आहे:

An optimist believes that we live in the best of all possible worlds.

A pessimist fears that this is true.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे हे वाक्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२-ब फक्त बरोबर आहे. बाटली असल्याचा उल्लेख नसल्याने उरलेला अर्धा प्याला भरण्याचा विचार निष्फळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कशाने भरणार तो प्याला? हे सांगितल्याशिवाय मजा नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्याला विषाचा असला तर?
Smile
बाकी कोणताही 'वादी' होण्यापेक्षा 'प्रतिवादी' होणं जास्त चांगलं! निदान वादीकडून खटल्याचा खर्च तरी वसूल करून घेता येतो!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0