.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
सामान्य नागरिक सहसा जागरूक नसतात, असले तर फारतर आपापसात चर्चा करतात, किंवा काहीच न करण्यामागे त्यांचा कल असतो. ( मी काय करू शकतो/ते याची माहिती / जाणीव नसल्याने अथवा मी एकट्याने/टीने जर काही करण्यासाठी पाऊले उचलली तर काही निष्पन्न होऊ शकेल ह्याबद्द्ल अविश्वास) ही काहीच न करण्यामागे कारणे असावित. कोणी काहीही करेनात, माझ्यावर जोपर्यंत प्रत्यक्ष परिणाम होत नाही तोपर्यंत मला त्यात पडून काय करायचे असेही अनेकदा ऐकलेले आहे.
माझ्या मते आपल्या आजुबाजुला काय सुरू आहे याबद्दल जागरूक असणे ही लोकशाहीतील सामान्य नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या वरील वृत्तांतावरून त्या जबाबदारीची आपणांस जाणीव आहेच आणि ती आपण अतिशय सिरियसली ( मराठी शब्द = गंभीरपणे येथे फारसा रूचला नाही) घेता व काही आक्षेपार्ह दिसल्यास त्याबद्दल काही constructive (कायदेशीर व संयम राखूनकरता )हे आवडले ...
शिवाय अनिल गोखलेंना केलेली मदत यावरून हे सुद्धा लक्षात येते की आपली तक्रार कुणा व्यक्तीबद्दल नसून, प्रवृत्तीबद्दल आणि अशा प्रवृत्ती जिथे चालून/ खपून जातात अशा व्यवस्थेबद्दल आहे.
तेव्हा पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा.
स्तुत्य प्रयत्न
व्हाईट बर्च यांच्याशी सहमत. सरकारी यंत्रणेच्या रिंगणात कागदी घोडे नाचवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. ते तुम्ही भरपूर घेतलेले आहेत. तसंच ते कष्ट घेतले की थोड्याफार प्रमाणात का होईना पण यंत्रणा हलते, आणि काही योग्य गोष्टी घडतात हा तुमचा अनुभवही मोलाचा आहे.
हा प्रश्न तुमच्या नजरेला कसा आला? याविषयी वाचायला आवडेल. लेखातच आलं असतं तर उत्तमच, पण पुढच्या चर्चेत आलं तरी हरकत नाही.
केवळ व्यक्तिगत असल्यानेच हा तपशील टाळला.
हा प्रश्न तुमच्या नजरेला कसा आला? याविषयी वाचायला आवडेल. लेखातच आलं असतं तर उत्तमच, पण पुढच्या चर्चेत आलं तरी हरकत नाही. >>
तो तपशील व्यक्तिगत असल्याने टाळला आहे. अर्थातच हा तपशील टाकायला माझी काहीच हरकत नाही परंतू त्यामुळे ले़खासोबतच लेखकही व्हलनरेबल ठरतो त्यामुळे लेखनाची पद्धत बदलावी व मुख्य म्हणजे असा व्यक्तिगत तपशील लेखातून टाळावा असा सल्ला मला आपणच चर्चेत दिला असल्याचे स्मरते.
हे कुणी सांगितलं?
अस्ले पंगे घेतले की 'आत' जाण्याची शक्यता असते म्हणे? >>
ही माहिती आपणांस कुणी दिली? मी जे काही केलंय त्याला "पंगा" म्हणत नाहीत. अगदी हे http://www.loksatta.com/daily/20061111/mv04.htm असं केलं तरी...
आणि असं काही केल्यावर दंड / शिक्षा समोरच्या पक्षाला होते. मी "आत" जायचे कारणच काय? मी जे काही करतो ते सनदशीर / वैध मार्गानेच. आपण व्यवस्थित वाचलेलं दिसत नाहीये.
गुगळ्यांना त्यांच्या
गुगळ्यांना त्यांच्या भ्रष्टाचारमुक्त कार्यासाठी पर्सन ऑफ द ईयर हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी जोरदार शिफारस आम्ही करत आहोत. हजारांच्या अण्णांसारखं नुसतीच उपोषणं करत न बसून अर्धवट काहीसे हातात पाडून न घेता प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची धडाडी उल्लेखनीय आहे.
भ्रष्टाचाराविरुध्द नेटाने लढा
भ्रष्टाचाराविरुध्द नेटाने लढा दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन
पुढील कार्यास शुभेच्छा