आर. के. लक्ष्मण! आम्हांला माफ करा!!

निव्वळ मनातच खदखदणार्‍या गोष्टी कधीतरी स्फोट होऊन बाहेर येतातच.
व्यक्त करण्याशिवाय पर्यायच उरत नाही… अशा क्षणी!
एक वेगळ्या बुद्धीचा – हं, ‘बुद्धी’ हा शब्द अवतरणात लिहायला हवा! – संपादक आला आणि त्यानं ठरवलं की व्यंगचित्राची जागा पहिल्या पानावर नाही!
तोवरचा काळ असा होता… म्हणजे अगदी लहानपणापासून, जेव्हापासून वृत्तपत्रं वाचण्याची सुरुवात झाली तेव्हापासून म्हणूया, वृत्तपत्र आलं की आधी घडी पालटून हेडलाइनआधी व्यंगचित्र पाहण्या-वाचण्याची सवय लागली होती. हे असंच आहे आणि असंच असतं आणि असंच असणार आहे… असं तोवर वाटत होतं – जोवर हा संपादक इथं संपादक म्हणून निपजला नाही.
आज जिभेवर शिव्या येतात किंवा मनात हिंसा निपजते की असे सडके मेंदू एखादी लोखंडाची पातळ सळी घालून फोडायला पाहिजे होते. शिव्या का येतात जिभेवर किंवा हिंसक विचार का येतात मनात? कारण माणसांना व्यंगचित्रं समजेनाशी झालीत!
तर या भारतकुमार राऊत नावाच्या प्राण्यानं ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधलं पहिल्या पानावरचं व्यंगचित्रं आतल्या कुठल्यातरी पानावर फेकलं. एरवी एकमेकांशी दुश्मनी निभवणारे संपादक नको तिथं अनुकरण करतातच! त्यानुसार इतरांनीही क्रमशः जागा बदलल्या!
याचं स्पष्टीकरण काय होतं?
तर : ज्यांना व्यंगचित्र हवंय ते लोक ते कुठेही असलं तरी पाहतीलच!
आणि आम्ही पाहतच राहिलो साले ते ‘कुठेही’ फेकलेलं व्यंगचित्रं!
व्यंगचित्रकारांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा विनोद होता… बदललेली जागा दाखवून देणारा!
हा माणूस… आर. के. लक्ष्मण!
यानं काम करायचं थांबवलं आणि त्यानंतरचे व्यंगचित्रकारांचे दिवस अधिकाधिक वाईट होत गेले. बाकीचे तर हयातीतच मेले आहेत आणि ज्या जागेचा तुकडा तो संपादक फेकेल त्यावर जगताहेत. ज्यांना हेही मान्य नाही, ते थांबताहेत गपगुमान.
राज्यकर्त्यांच्या सेन्सॉरशीपबाबत आपण बोंबा मारतो, पण मीडियातल्या या ‘घरा’तल्याच सेन्सॉरशीपविषयी कोण ब्र काढणार?
पहिल्या पानांना जाहिरातींनी कधीच व्यापलं. त्यानंतरची जी खर्‍या अर्थाने पहिली म्हणावीत अशी पानं असतात, तिथं इयत्ता दुसरीतल्या पोरांनी सांगितलेले ‘विनोद’ छापायला यांच्याकडे जागा आहे, पण व्यंगचित्रासाठी नाही! त्या विनोदांच्या शीर्षकांसाठीही यांना मराठी शब्द सापडत नाहीत; स्पष्ट सांगायचं तर ‘चालत’ नाहीत. ‘भाषा घडवणं’ हे काम वृत्तपत्रांचं राहिलं नाही, तो हेतू जुनाट झाला. बापलोक सांगायचे, ‘भाषेसाठी अग्रलेख वाचा!’ आता सांगत नाहीत. कारण आता ‘लोकांची भाषा’ वृत्तपत्रांना हवीशी झालीये पाचकळ ‘अनुनया’साठी! ती वापरणं सोपं! मग तमाम चुका माफ होतात, ‘ही बोली आहे’ म्हटलं की!
अग्रलेखही आता चिमुकले आणि चिमखड्या बोलांचे बनलेत. त्यातही छायाचित्रं पेरण्याची गरज भासू लागलीये. तीही रंगीत छायाचित्रं! का बौ? तुमच्या शब्दांतली ताकद कुठं पासली पडलीये?
वाईट… वाईट्ट आहे सगळं!
बरं झालं आर. के. लक्ष्मण, तुम्ही मेलात!
तुम्हांलाच काय, तुमच्या पुढच्या सात पिढ्यांना जागा राहिली नाहीये इथं!
आणि जी माध्यमं व्यंगचित्रांचा गळा घोटतात, त्यांना आमच्यासारख्या सामान्य वाचकांचा गळा घोटणं काय अवघड होतं. किती आक्षेपाची पत्रं त्या काळात कचराकुंड्यांनी गिळली! शेवटी सत्तेवर असतो तोच ठरवतो की काय नैतिक आणि काय अनैतिक!
ज्या समाजातली विनोदबुद्धी नष्ट होते, तो समाज ‘जिवंत’ नसतोच! मुर्दाड असतो तो!
माफी असावी आर. के. माफी असावी की आमची बोंब कमी पडली!

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

आर. के. लक्ष्मण गेले, वाईट झाले. इतपत तुम्ही बोलला असतात, तर पटले असते. पण तुम्ही जरा वाहावत गेलात, असे वाटले. संपादकाने काय करावे, त्याने पेपर कसा छापावा, व्यंगचित्र कुठल्या पानावर छापावे, याबद्दल तुमची मते तीव्र असतीलही, पण म्हणून आताची संधी साधून लगेच आगपाखड करायची गरज काय? तुम्हाला पटत नसेल तर वाचू नका. मीपण वाचत नाही, त्यात खूप जाहिराती असतात, (बर्‍याचदा अश्लील) म्हणून.

जाता जाता: "हे असंच आहे आणि असंच असतं आणि असंच असणार आहे… असं तोवर वाटत होतं" असे म्हणताय, तर "असे सडके मेंदू एखादी लोखंडाची पातळ सळी घालून फोडायला पाहिजे होते." ही अशी भाषा आजकालची फॅशन आहे काय?

असो. आर. के. लक्ष्मण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वभाव आहे वाहवत जाण्याचा. त्याला औषध नाही.
आणि न वाचून मला चालणार नाही. वाचन माझ्या व्यवसायाशी निगडित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

सॉरी. आर.के. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र पहिल्या पानावरच छापले पाहिजे हा आग्रह कळला नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कविताताईंचा आग्रहही कळला अन तुम्हाला पडलेला प्रश्नही. अर्थात प्रत्येकाची आवडनिवड अन आग्रह, प्रायॉरिटीज वेगळ्या असतात. मला तीव्रतेने वाटू शकते की व्यंगचित्र ना .... ते महान असतं अन पहील्याच पानावर हवे पण अन्य कोणी त्याबाबत अगदी "डिस-पॅशनेट" असू शकतात.

अन त्या कारणासाठी डोक्यात सळई घालण्याची भाषा अन विचार मला "इन्टॉलरन्ट" (असहिष्णु) वाटतात. सॉरी कविताताई पण मलाही थोडं भावनेच्या भरात वहावत गेल्यासारखा लेख वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

< शिव्या का येतात जिभेवर किंवा हिंसक विचार का येतात मनात? कारण माणसांना व्यंगचित्रं समजेनाशी झालीत! > हे वाक्य त्या (अ)विचाराला जोडून याचसाठी लिहिलेलं आहे.
ही कोंडी इथून सुरू झाली आणि मग ती अनेक जागी विस्तारत गेली. भाषा, शुद्धलेखन ( वा प्रमाणलेखन ), अग्रलेखांचा आकार, पहिल्या पानावर शीर्षकासोबत गणपतीचे फोटो छापणं, पुरवण्यांचे आकार घटवणं, पुरवण्यांमध्ये एका पानावर किमान पाच ते कमाल पंधरा लेख ( ! ) येतील असं बंधन पुरवणी संपादकांवर घालणं इत्यादी पुष्कळ गोष्टी आहेत. मोकळीक जाते तिचं घालवणं व्यंगचित्रांपासून सुरू झालं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

पहिल्या पानावर शीर्षकासोबत गणपतीचे फोटो छापणं,

कमाल आहे. पहिल्या पानावर केवळ नरेंद्र दाभोळकरांचे फोटो छापावेत असा कायदा आहे का? तुम्ही कोण्या कारणांनी नास्तिक, अहिंदूवादी, अगणपतीवादी, इ इ असाल म्हणजे महाराष्ट्रात लोकांनी तसेच केले पाहिजे? पुरोगाम्यांना धर्माला चार शिव्या घातल्याखेरीज कोणतेही कार्य पूर्णत्वास गेल्यासारखे वाटत नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अन त्या कारणासाठी डोक्यात सळई घालण्याची भाषा अन विचार मला "इन्टॉलरन्ट" (असहिष्णु) वाटतात. सॉरी कविताताई पण मलाही थोडं भावनेच्या भरात वहावत गेल्यासारखा लेख वाटला.

तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखून....

फ्री स्पीच प्रत्येकाला हवे असते. पण ज्याला ते थोडेस्से जरी ऑफेन्सिव्ह वाटते तो लगेच फ्री स्पीच च्या विरुद्ध टोलेबाजी करायला सुरुवात करतो. ही टोलेबाजी सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करूनच केली गेलेली असते. पण तिचा उद्देश प्रतिस्पर्ध्यास खामोश करण्याचा असतो. पण बिल माहर म्हणतो तसे - फ्री स्पीच वर्क्स ओन्ली इफ देअर आर नो वेव्हर्स. नो वेव्हर्स.

जॉन स्टॉस्सेल ने सुद्धा यावर एक प्रोग्राम केला होता. त्यात त्याने अनेकांच्या (सामान्य नागरिकांच्या) मुलाखती घेतल्या होत्या. मुलाखती म्हणा किंवा लाईव्ह सर्व्हे म्हणा. पण प्रत्येक जण तसाच. फ्री स्पीच हवं. पण हेट स्पीच नको. फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन हवं पण जरासुद्धा ऑफेन्सिव्ह स्पीच नको. जरा भावना दुखावल्या की लगेच "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढू नका" - असे लेक्चर ठरलेले. किंवा "स्वातंत्र्य म्हंजे स्वैराचार नव्हे" हा भारतीय पालकांचा आवडता डायलॉग थोडास्सा बदलून "अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हंजे दुसर्‍यास ऑफेंड करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. त्यावरही मर्यादा आहेत." असा डायलॉग मारून आपण कसे "मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे उत्तराधिकारी आहोत" हे दाखवून देण्याचा यत्न.

मी कविता महाजन यांच्या लेखाचे थेट समर्थन करतो. त्यातील भावना कितीही इन्टॉलरन्ट वाटल्या तरी तुम्हास त्याविरुद्ध बोलण्याचे स्वातंत्र्य आहेच. त्यांनी कोणावरही फिजिकल हल्ला केलेला नाही.

(आता लगेच - गब्बर त्यांना समर्थन देऊन अप्रत्यक्षपणे गब्बरने स्वतः आजपर्यंत केलेल्या असहिष्णु बडबडीचे समर्थन करत आहे का ??? असा प्रश्न विचारा. अवश्य विचारा. कारण तो आरोप आहे. व तो मला मान्य आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित मीच फार "Read between the lines" केले असेन. पण भारतकुमार राऊत (हे महोदय संपादक आहेत्/होते हे मी आता ऐकलं त्याआधी मी नाव ऐकलं नव्हतं. कच्चं सामान्य ज्ञान व लिमिटेड इन्ट्रेस्ट्स! असो) ज्यांनी त्यांचे संपादनाधिकार वापरले, किंवा अन्य संपादक ज्यांनी राऊतांचे अनुकरण केले, ते या फोरमवर असते तरी हाच लेख अस्साच लिहीला गेला असता का? असता तर आय रेस्ट माय केस.
नसता तर का नाही?
अन जर जर तर ला काही अर्थच नसेल तर बातच राहीली.
____
सांगायचा मुद्दा हा आहे की व्यक्तीच्या गैरहजेरीत त्या व्यक्तीविरुद्ध खूनाची हिंसक भाषा वापरली जाणे म्हणजे फक्त फ्रीडम ऑफ स्पीच आहे का?
(यावर तुम्ही म्हणणार - हजेरीत अथवा गैरहजेरीत दोन्ही scenarios मध्ये, फ्रीडम ऑफ स्पीच चालून जावे. तुम्ही तर "स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते" होऊन तुमच्यापुरता मुद्दा निकालात काढला आहेच. आम्हालाच अशी एकांगी बाजू उचलून धरता येत नाही. असो. जर आम्ही "मर्यादापुरषोत्तम श्रीरामाचे उत्तराधिकरी" आहोत तर तुम्ही अत्यंत एकांगी विचारसरणीचे पाईक आहात.)
___
अन मी तरी लष्कराच्या भाकर्‍या कशाला बडवतेय. ते दुखावलेले राऊत, अन्य संपादक अन कविताताई पाहून घेतील की. पण नाही @गब्बर - तुम्ही बोललात म्हणजे मी बोललच पाहीजे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..... तर तुम्ही अत्यंत एकांगी विचारसरणीचे पाईक आहात.

नेमके कुठले अंग आम्ही मिस्स केले की जाणूनबुजून दुर्लक्षिले ते सांगाल का ?

व अशी किती अंगे आहेत्/असतात ते ही सांगा. म्हंजे पुढच्यावेळी लक्षात ठेवून "सर्वांगी" विचार मांडता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या केसपुरती सपशेल सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये व्यंगचित्राची पहिल्या पानावरची जागा वर्षानुवर्षे निश्चित होती. लोकसत्तेसह इतर जी वृत्तपत्रे अशी पॉकेटसाइजची व्यंगचित्रे छापत, त्यांनाही पहिल्या पानावर जागा दिली जाई. या जागेचे महत्त्व होते आणि आहेही.
व्यंगचित्रांच्या जागा बदलून ती आत कुठेही टाकली जाऊ लागली आणि 'नसली तरी चालेल' असाही दृष्टिकोण बळावत जाण्यास सुरुवात झाली.
याचा अर्थ सूज्ञ समजू शकतीलच.
" ज्या समाजातली विनोदबुद्धी नष्ट होते, तो समाज 'जिवंत' नसतोच!" : हे मी प्रतिक्रियेत नोंदवले आहेच.
अनेक व्यंगचित्रकार मित्रांकडून जे अनुभव गेली काही वर्षं ऐकायला मिळताहेत, ते विदारक आहेत.
विनोदाच्या नावाखाली जे काही छापून येतंय ते वाचकांना इयत्ता दुसरीच्या पातळीवरचं समजणारं आहे.
पहिलं पान किती महत्त्वाचं असतं? का? - हे पहिल्या पानावरील जाहिरातीचे दर आणि बाकी पानांवरील जाहिरातींचे दर काय आहेत याची चौकशी केली तरी सहज समजेल.
म्हणून हा आग्रह की, केवळ आर. के. लक्षण यांच्याच बाबतीत नव्हे, तर सर्वच व्यगंचित्रकारांच्या बाबतीत धरला होता / आहे / असेल की, व्यंगचित्राचं स्थान पहिल्या पानावरच असावं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

पहिला मुद्दा म्हणजे वाचकांना जे पाहिजे ते वर्तमानपत्रांनी छापावं की वाचकांनी काय वाचावं असं वर्तमानपत्रांना वाटतं ते वर्तमानपत्रांनी छापावं या दोन मुद्द्यांच्या निवडीमध्ये गोंधळ आहे. वर्तमानपत्रं बालबुद्धी विनोद छापतात आणि ते वाचकांना वाचावे लागतात असा आक्षेप आहे की वाचकांना बालबुद्धी विनोद आवडतात म्हणून वर्तमानपत्रं ते छापतात (लोकानुनय) असा आक्षेप आहे?

कुठला कॉलम कुठं छापायचा, आणि छापायचा की नाही याचं पूर्ण स्वातंत्र्य वर्तमानपत्रांना आहे. महाराष्ट्र टाईम्स हे पुरोगामित्त्वाचे किंवा वाचकांना शहाणपणा शिकवण्याचा मक्ता घेतलेले 'पत्र नसून स्मार्ट मित्र' आहे.

दुसरं म्हणजे मराठीत दर्जेदार व्यंगचित्र राहिलीच नाहीयेत. आर.के. लक्ष्मण यांची व्यंगचित्र 'अनुवादित' स्वरुपाची होती. मूळ इंग्रजी व्यंगचित्राचं मराठी भाषांतरटाईप. मला वाटतं प्रशांत कुलकर्णी यांनी मराठी व्यंगचित्रकलेचा इतिहास सांगणारं एक पुस्तक संपादित केलं होतं. ते पुस्तक माझ्याकडं होतं. त्यात जुन्या काळातली सरवटे, ठाकरे यांची व्यंगचित्रं पाहता आजच्या काळातली व्यंगचित्र अगदीच बालिश आहेत. ती पहिल्या पानावर काय कुठल्याच पानावर न छापल्यानं कुठल्याच विनोदबुद्धीचा संकोच होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालिश तेच छापायचं असं धोरण आहे. गांभीर्याने व्यंगचित्रं काढणारी लोकं नाकारलीच जाताहेत. ही वस्तुस्थिती आहे. सरवटेंनी देखील 'मी राजकीय व्यंगचित्रं काढणं का थांबवलं' हे लिहिलेलं आहेच. सरकारी नोकरी होती आणि ती करण्याची गरज होती, म्हणून रोष ओढवून घेतला नाही... ही खंत ते व्यक्त करतातच.
सखोल, अभिजात असं सगळं नकोसं होत चाललंय प्रसारमाध्यमांना.
वाचकांना काय हवंय, हे कुठल्या आधारावर ठरवलं जातं? हेही पाहिलं पाहिजेच. पहिल्या पानावर जाहिरात हवी, असं म्हणणारे किती वाचक सापडतील? राशीभविष्य छापणं तर एकही वृत्तपत्र टाळू शकलेलं नाहीये... जरी ते कोण व कसं लिहितं याचे किस्से सर्वश्रुत असले तरीही. यांच्या वेबसाइट्सवर पोर्न लिंक्स असतात. अजून काय घसरायचं बाकी राहिलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

यांच्या वेबसाइट्सवर पोर्न लिंक्स असतात. अजून काय घसरायचं बाकी राहिलंय?

याबद्दल श्री अस्वल, श्री ऋषिकेश आणि श्री. गब्बर यांचे विचार ऐकायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यांच्या वेबसाइट्सवर पोर्न लिंक्स असतात. अजून काय घसरायचं बाकी राहिलंय?

“A major source of objection to a free economy is precisely that it ... gives people what they want instead of what a particular group thinks they ought to want. Underlying most arguments against the free market is a lack of belief in freedom itself." ___________ मिल्टन फ्रिडमन

कविता मॅडम च्या मतांशी मी सहमत आहेच. प्रश्नच नाही.

अधोरेखित भाग बारकाईने वाचा. खरोखर प्रत्येक शब्दनशब्द लक्षपूर्वक वाचा. इथे तो पर्टिक्युलर ग्रुप म्हंजे धागाकर्ती.

खरंतर पॉर्न च्या लिंका असतात म्हणून अनेक जण वृत्तपत्रे खरेदी करीत असतीलही. त्यांचेच पैसे घेऊन वृत्तपत्र मालक इतरांना कॉस सबसिडाईझ करत असतो हे लक्षात येणे कठिण आहे. विचार करा की एक वृत्तपत्र व त्याच्या वेबसाईट वर येणारे लक्षावधी लोक - ती वेबसाईट ते तेवढे लोड कसे सहन करीत असेल. त्यासाठी किती सर्व्हर्स लागतील ? किती गुंतवणूक करावी लागेल ? हे पैसे वसूल कसे करायचे ??? वृत्तपत्र वेबसाईट वर वाचणारा तर एक पै ही न देता ते वाचत असतो. लक्षावधी युजर्स ना विचारवंतांची ऑप-एड (Op-ed - Opinion/Editorial) पेजेस (जे हाय क्वालिटी कंटेंट आहे असे गृहित धरूया) मोफत उपलब्ध करून देणे कसे परवडेल ?? मग क्रॉस सबसिडायझेशन सारखे काहीतरी करावे लागते.

----------

तुमच्या साध्या प्रश्नास उत्तर लांबलचक होत आहे म्हणून खालील भाग लपवीत आहे.

खरंतर वृत्तपत्र हे एक उत्तम उदाहरण आहे की ज्यात अनेक लोक एकत्र येतात. मल्टी साईडेड प्लॅटफॉर्म. नोकरी शोधणारे, किरायाचे घर शोधणारे, जीवनसाथी शोधणारे, मनोरंजन शोधणारे, राजकीय व सामाजिक माहीती शोधणारे, गंभीर वैचारिक खाद्य शोधणारे, क्रीडाविषयक माहीती शोधणारे. व यांना पूरक म्हणून व्हेकन्सी असलेले उद्योग, घरमालक, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, राजकीय पक्ष, सरकार, नेते, संपादक, खेळाडू .... असे अनेकजण. मटा किंवा सकाळ चा क्लासिफाईड सेक्शन काढून बघा म्हंजे समजेल की वृत्तपत्र हे कसे प्लॅटफॉर्म ($$) म्हणून काम करते ते. त्याचे नेटवर्क इफेक्ट्स जाणून घ्या. व मग टीका करा. नेटवर्क इफेक्ट्स सोडा .... त्यामागची मूलभूत माहीती ही आहे की वृत्तपत्रातील जाहिरात अत्यंत कमी पैशात लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचते. ( http://home.uchicago.edu/~vlima/courses/econ200/spring01/stigler.pdf )

जाहिराती ह्या पैशास पासरी आहेत असा डिसमिस्सिव्ह कॉमेंट करून टाकणारे सुद्धा जाहिरातींचे अनन्यसाधारण महत्व न जाणताच डायलॉग मारीत असतात. नोकरी शोधायची असली की मात्र किमान शंभरएक कंपन्यांना रेझ्युमे/बायोडाटा पाठवतात. आय अ‍ॅम कास्टिंग अ वाईडर नेट ... यू नो. असा लगेच डायलॉग असतो.

-------

शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या - वेबसाईट वर पॉर्न च्या लिंका मोफत पुरवणे हे वाचकासाठी मोफत असते. पण त्या पॉर्नसाईट ला मोफत नसते. ती साईट (अ‍ॅडव्हर्टाईझर) वृत्तपत्रमालकास पैसे देते. व ते पैसे वृत्तपत्र मालक इतर लोकांना (वाचकांना) बाकीचे कंटेंट पुरवण्यासाठी वापरतात. थोडेसे क्रॉस सबसिडायझेशन सारखे.

$$ - प्लॅटफॉर्म मॉडेल हे दिग्गज कंपन्या वापरतात. गूगल, अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, सेल्स्फोर्स, फेसबूक वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे तो पर्टिक्युलर ग्रुप म्हंजे धागाकर्ती.

नो. नो. हा विशिष्ट संच म्हणजे वृत्तपत्राचे मालक. कृपया दिशाभूल नका करू.
=================

त्यांचेच पैसे घेऊन वृत्तपत्र मालक इतरांना कॉस सबसिडाईझ करत असतो हे लक्षात येणे कठिण आहे.

पोर्नवाल्यांचे पैसे घेऊन इतर सब्सिडाइज होतात याला आधार काय? उलटे ही होत असणार.

वृत्तपत्र वेबसाईट वर वाचणारा तर एक पै ही न देता ते वाचत असतो.

म्हणून काहीही वाचायला, पाहायला लावणार. जमत नाही म्हणून घरी बसा त्यापेक्षा. उद्या कोणाच्या घरी पैसा जास्त आहे नि सेक्यूरिटी कमी आहे याचे डीटेल पेपर (चोरांसाठी) देऊ लागले तर त्याचेही असेच समर्थन करणार का?
कशाने (आर्थिक रित्या) पेपर चालेल हाच फक्त पेपरात काय यावे याचा निकष?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पोर्नवाल्यांचे पैसे घेऊन इतर सब्सिडाइज होतात याला आधार काय? उलटे ही होत असणार.

अजो - वादाकरता वाद म्हणुन लिहीले आहे काय? तुम्हाला असे खरेच वाटते का की वाचकांचे पैसे घेउन पॉर्न वाल्यांना सबसिडी मिळत असेल. कैच्या कै.

आणि जाला वर फुकट वाचणार्‍यांकडुन कसले पैसे मिळणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणून काहीही वाचायला, पाहायला लावणार

लावणार? अजोंना कोणी तरी जबरदस्तीने पॉर्न बघायला लावते आहे असे चित्र डोळ्यासमोर आले. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@पहिले पान - निदान ई आवृत्तीवर तरी लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस , सामना(!) इथे व्यंगचित्र पहिल्या पानावर अजून दिसतंय.
अग्रलेखही लोकसत्तेचा ठळक मथळा असतो.
आणि टाईम्सवरून वृत्तपत्र किंवा पत्रकारिता ठरवायचे दिवस बहुतेक बर्‍याच वर्षांपूर्वी संपले असावेत!

(नव्या जगात वर्तमानपत्रांपे़क्षा दर्जेदार अशा गोष्टी आहेतच की- Caravan Magezine, Tehelka, Gulail वर अतिशय तपशीलात बरेच इश्यू दिले जातात. इंटरनेटवर अतिशय प्रभावी व्यंगचित्रं आहेत, त्यासाठीच असलेल्या साईटसुद्धा. तेव्हा नव्या व्यंगचित्रकारांनी वर्तमानपत्रांपुरतंच रहायची गरज फारशी नसावी असा एक कयास.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रिय कविताबाई यांस,
व्यंगचित्र पहिल्या पानावरुन आत गेले तर फार मोठे नुकसान झाले आहे असे वाटत नाही. वर्तमानपत्रांच्याही काही आर्थिक गरजा असू शकतात आणि कोणती गोष्ट कोठे छापायची यावर त्यांचे नियंत्रण असावे. मात्र वर्तमानपत्र म्हणजे शालेय पाठयपुस्तक नाही त्यामुळे ते ठराविक क्रमानेच वाचले पाहिजे असे नाही हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला देखील ठाऊक असते. त्यामुळे माझ्यासारखा वाचक आधी व्यंगचित्राचेच पान उघडतो, त्यानंतर अग्रलेख वाचतो आणि नंतर इतर बातम्या चाळतो. ज्याला खेळांमधे रस आहे तो शेवटचे पान पहिले वाचतो. जोपर्यंत माझ्याकडे हा पर्याय आहे तोपर्यंत फारसे काही बिघडले नाही.
शिवाय तुम्ही ज्या वर्तमानपत्राचा दाखला देतायेत ते भले स्वतःला 'पत्र नव्हे स्मार्ट मित्र' म्हणत असले तरी आम्ही त्याला 'पत्र नव्हे कुत्रं' असे जाहिररित्या म्हणतो व त्याला त्याची जागा दाखवून देऊ शकतोच हे काय कमी आहे काय ?
तुमचा दुसरा आक्षेप म्हणजे 'दुसरीतल्या मुलांचे विनोद छापायला त्यांच्याकडे जागा असते'. आता समाजातील बहुसंख्यांचे (किंबहूना ते पत्र वाचणार्‍यांचे) मानसिक वय दुसरीतल्या पोरांइतकेच आहे हे नमूद करु इच्छितो. ज्यांचे वय त्यापेक्षा जास्त झाले आहे त्यांनी कधीच त्याकडे पाठ फिरवली आहे.
अर्थात हे सर्व मी आपणांस सांगावे अशी माझी पात्रता नाही असे मी समजतो. तुम्हाला हे सर्व नक्कीच माहित आहे पण लेख लिहितांना तुमचा राग / भावना कदाचित अनावर झालाय व त्या भरात हा लेख लिहिला गेला असावा असे वाटते.

अवांतर : आमच्या इमारतींच्या संकुलात कॉमन मॅनच्या व्यंगचित्रात दिसणार्‍या व्यक्तीसारखी तंतोतंत व्यक्ती आहे. ती मला रोजच आर.कें.ची आठवण देते.
पण 'आनंद मरते नही' हे ही तितकेच खरे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ह्या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंमध्ये काही ना काही तथ्य दिसते.

टिळकांच्या काळात वर्तमानपत्रांच्या संपादकांकडे मार्गदर्शनाच्या अपेक्षेने वाचक पाहात असे. दर मंगळवारी गावोगावचे लोक केसरी दारात पडला की 'बघू या बळवंतराव काय म्हणतात' अशासाठी पेपराचे पान उलटून प्रथम अग्रलेख वाचत असत. परुळेकरांनी आपला सकाळ इतक्या भारदस्तपणापासून विचारपूर्वक दूर नेला आणि सामान्य साक्षर मनुष्य हेअर कटिंग सलूनमध्ये आपल्या नंबराची वाट पाहातांना उचलून वाचेल असे रूप त्यांनी आपल्या पेपरला दिले. त्यापुढे तळवलकरांनी उच्चभ्रू वाचकाला आकर्षक वाटेल असे रूप म.टा.ला दिले. (त्या दिवसात 'नीचभ्रू' वाटणारा लोकसत्ता आता म.टा. ने मोकळ्या केलेल्या जागेवर आहे.) काळ आता त्याच्याहि पुढे सरकला आहे आणि बातम्यांसाठी वर्तमानपत्रांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता उरलेली नाही, बातमीचे wall-to-wall covering थोडया संयत प्रमाणात CNN/BBC वर आणि आक्रस्ताळ्या मार्गाने 'आज तक'वर २४ तास चालू आहे.

असे सर्व जगभर चालू आहे. पश्चिमेत भारदस्त वर्तमानपत्रे आर्थिक अडचणीत आहेत. वाचक बदलला आहे. कागदापेक्षा स्क्रीनवरचे वाचणे पसंत करणारा नवा वाचक निर्माण झाला आहे. त्या वाचकाला बांधून ठेवण्यासाठी इंटरनेटशी कसे जुळवून घेता येईल ह्याच्या युक्त्या शोधण्याच्या खटपटीत पश्चिम देशातील चालकवर्ग आहे.

सुदैवाने भारतातच साक्षरता आता लहानसहान गावात पोहोचल्याने एक नवा साक्षर वाचकवर्ग निर्माण झाला आहे आणि त्याच्या जीवावर भारतातील वर्तमानपत्रे खपाचे आकडे वाढवीत आहेत. जगातील प्रसिद्ध आणि जुनी वृत्तपत्रे माना टाकत असतांना भारतातील वृत्तपत्रे चांगले बाळसे धरून आहेत. ह्या विकिपानावरील माहितीत जगातील शंभर वर्तमानपत्रांचे उपलब्ध आकडे आहेत. त्यात ३१ वर्तमानपत्रांचा खप कमी होत आहे आणि १९ वर्तमानपत्रांचा खप वाढत असल्याचे दिसते. त्या १९ पैकी १२ भारतातील आणि ती सर्व बहुतांश देशी भाषातील आहेत.

ह्यापुढचा भारतीय वृत्तपत्रांचा अन्नदाता हा डे.जि./शिवाजी पार्क भागातील नसून भुइंज/कर्‍हाडाकडे आहे. त्याला लक्ष्मणचा तरल विनोद भिडतच नाही. (येथेच काही महिन्यांपूर्वी 'घटनानिर्मितीचे काम फार संथ चालू आहे आणि त्यामुळे आंबेडकर-नेहरू त्रस्त असून नेहरूंनी चाबूक उगारला आहे' ह्या व्यंगचित्रावरील चर्चा आठवते. तो चाबूक आंबेडकरांवर आहे असे काहींना वाटले!) टिळकांच्या 'पत्रकर्त्याच्या स्फुट सूचना' केव्हाच विस्मृतीत गेल्या पण दिलीप पाडगावकरांच्या Euro-Communism वरील बौद्धिक चर्चेतहि आता कोणासच स्वारस्य नाही असे त्यांनीच एकदा मला सांगितले होते. टाइम्सच्या मालकगटाची जुनी पिढी जाऊन समीर जैनची नवी पिढी आल्यावर त्या नव्या मालकपिढीच्या ध्यानात हे आले आणि त्यांनी वृत्तपत्राचे रंगरूप बदलले. पत्र टिकायचे असले तर हे केलेच पाहिजे असे ते म्हणतात. ते कोणास पटो वा न पटो.

थोडक्यात म्हणजे असे बदल होतच राहणार. त्याला 'अधःपात' म्हणायचे की 'मागणी तसा पुरवठा' हे ज्याने त्याने ठरवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडीशी असहमती. वाचकवर्ग वेगवेगळ्या भागातला असला तर त्याचा परिणाम वर्तमानपत्राच्या पुरवण्यांवर आणि बातम्यांवर पडतो / पडत असावा. त्यामुळे मुळ गाभ्याला / संरचनेला धक्का लावावा लागेल असे वाटत नाही. व्यंगचित्र किंवा अग्रलेख हे पुणे / मुंबई किंवा संभाजीनगर आवृत्तीमागे बदलतो असे दिसले नाही.
चुकभुल द्यावी घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समतोल प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात म्हणजे असे बदल होतच राहणार. त्याला 'अधःपात' म्हणायचे की 'मागणी तसा पुरवठा' हे ज्याने त्याने ठरवावे.

कोल्हटकर हे जुन्या जमान्याचे आहेत म्हणून ते "जन्विन" संतुलित आहेत, तेच नव्या जमान्याचे ऋषिकेश प्रयत्नशील, प्रयत्नपूर्वक, निसरडे इ इ संतुलित आहेत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेखिकेचा त्रागा समजण्यासारखा आहे. व्यंगचित्र हे सामाजिक भाष्याचं एक प्रभावी माध्यम आहे. अनेक व्यंगचित्रांनी पहिल्या पानावरील दर्जाची ती एक पावती म्हणून वेळोवेळी सिद्धही केले आहे. असे असता, मागणी नाही म्हणून का असेना, पण दर्जा घसरला म्हणून हळहळ करू नये असे थोडेच आहे? अशा सवंग वर्तमानपत्रात आपापला दर्जा सांभाळणारी वृत्तपत्रं नाहीत असं थोडीच आहे? विशेषत: जी व्यक्ती लेखन व्यवसायात आहे तिने जर हळहळ केली तर ती रास्तच म्हणायला हवी. रिअ‍ॅलिटी शोजमुळे वाहिन्यांचा दर्जा घसरला म्हणून आम्ही पेक्षक हळहळ व्यक्त करतोच की. किंबहुना त्याचमुळे अजूनही दर्जा ठेवून असलेल्या वाहिन्यांचे आम्हाला प्रेम आहे ते त्याकरताच.

टाईम्स वृत्तपत्रसमूहाची वाटचाल अत्यंत लाजिरवाणी आहे असे मत जाता जाता नोंदवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अगदी सहमत. आणि आपण रटाळ मालिकावाल्यांना भरपूर शिव्या घालतोच. फक्त त्या घरातल्या घरात असतात. कविताताईचा तळतळाट प्राय्वेट पब्लिक फोरमवर व्यक्त झाला आहे इतकेच. लेखाची शैली पाहाता अतिक्षुब्ध भावनांना वाट करून देण्यासाठी त्यांनी अशी टोकाची संतप्त भाषा वापरली आहे हे सहज समजते. त्यांनी हे लिहिले म्हणजे लगेच उठून त्या कुणाच्या मेंदूत सळी खुपसायला जाणार नाहीत हेही समजते.
अर्थात पब्लिक फोरमवर लिहिण्याचे काही शिष्टाचार असतात असे आर्ग्युमेंट करता येण्यासारखे आहे. पण मग हा लेख म्हणजे एक शिष्टाचारभंगाचे उदाहरण ठरू शकेल. त्याहून अधिक काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांनी हे लिहिले म्हणजे लगेच उठून त्या कुणाच्या मेंदूत सळी खुपसायला जाणार नाहीत हेही समजते.
अर्थात पब्लिक फोरमवर लिहिण्याचे काही शिष्टाचार असतात असे आर्ग्युमेंट करता येण्यासारखे आहे

माझ्या सारख्या संतुलनच नसलेल्या बाई कडुन सुद्धा असले लिहीले जात नाही. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या सारख्या संतुलनच नसलेल्या बाई कडुन सुद्धा असले लिहीले जात नाही

काकाजींचे स्थितप्रज्ञ अन गर्दभ यावरील विवेचन आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुमच्या भावनेशी सहमत आहे. नर्म विनोद आवडणारा एक वर्ग कमी झाला आहे. पण हे काही आज चालू नाहीये. बरीच वर्ष झाली आहेत. पुण्याबाहेर आल्यावर सकाळची सवय कमी झाली पण टाईम्सची सवय लागली पण आता भारताबाहेर गेल्यावर तीपण कमी झाली. सुरवातीला जरा रोजची सवय मोडल्याने रुखरुख वाटली होती पण आता फारकाही फरक पडत नाही. नंतर कधीतरी नसीम तालेबचे एक वाक्य फार टोचले. सध्याच्या वर्तमानपत्राचा फार काही उपयोग नाही. ते वाचणे बंदच केले पाहिजेल. साधारणपणे ५ वर्षांपूर्वीचे मथळे आणि सध्याचे मथळे ह्यामध्ये फार काही फरक नाहीये. तीच रडारड तोच राजकारणी लोकांचा मुखवटा आणि अग्रलेख पण तसलेच. त्यातून किती पत्रकार प्रामाणिक आहेत हा प्रश्नच आहे. एक नाव्ही दुसर्या नाव्ह्याचे पैसे घेत नाही असे पुल म्हणाले आहेत तद्वत पत्रकार लोक पण अळीमिळी गुपचिळीच साधून असतात. फार काही गोष्टी धसास लावता आहेत असे दिसत नाही. थोडेफार अपवाद. नितीश काटारा किंवा दिल्लीच्या बाल्त्काराची बातमी सोडली तर. माझा थोडासा त्यामध्येपण सिनिकल व्हिव आहे. ह्या बातम्या सनसनाटी होत्या आणि शुअरशॉट टीआरपी वाल्या होत्या. बाकी त्यामुळे फार काही फरक पडत नाही. वरती कोल्हटकर म्हणतात तसेच आहे आवड बदलली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. भांडवलशाहीचा नियम म्हणजे वाचकांना जे हवं आहे ते दिलं नाही किंवा वाचकांना नको आहे ते दिलं तर वाचक वर्तमानपत्र घ्यायचे थांबवतील.

दुसर्‍या शब्दात- तुम्हाला नसेल पसंत तर नका विकत घेऊ .... आग्रह नाही.

२. पत्रकाराची मुस्कटदाबी हा धंदेवाईक वर्तमानपत्राचाच (किंवा आधुनिक काळाचा- पोस्ट लिबरलायझेशन) विशेष गुण नाही. वर्तमानपत्राच्या मालकाला जे हवं तेच लिहायला हवं हा पूर्वापार चालत आलेला नियम आहे. बहुधा आगरकरांना केसरी यामुळेच सोडावा लागला. तसंच शौरी जेव्हा रिलायन्सच्या गैरव्यवहारांबाबत एक्स्प्रेसमध्ये लिहीत होते ते काही त्यांना सत्य लिहिण्याचे स्वातंत्र्य होते म्हणून नाही. त्याकाळी एक्स्प्रेसच्या बोर्डावर असलेले नस्ली वाडिया यांच्या हितसंबंधांच्या आड रिलायन्स येत होती म्हणून ते लिहिले जात होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्याकाळी एक्स्प्रेसच्या बोर्डावर असलेले नस्ली वाडिया यांच्या हितसंबंधांच्या आड रिलायन्स येत होती म्हणून ते लिहिले जात होते.

तुमच्याकडे वाडिया यांनी शौरींना दिलेल्या आदेशाची प्रत आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नै बा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते, आता तुमच्या सहीतसुद्धा 'आमचेकडे कोणताही पुरावा मिळत नाही' अ‍ॅड करा. मगच अजो नमतील Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"प्रतिभातैंनी भांडी विसळून चहा करून दिला म्हणून त्यांना राष्ट्रपती बनवा" असा सोनियाबैंचा आदेश अजोंनी दाखवला की मी वाडियांच्या आदेशाची प्रत दाखवीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जग हे सत्यवादी लोकांसाठी कमी आणि सिनिकल लोकांसाठी जास्त बनले आहे असे या पुरावा प्रकरणातून दिसून येते.
-------------
बाय द वे - "एकाच विषयावर" मतभिन्नता असेल तर चर्चा तरी करता येते. पण भिन्न विषयांवर मतांतराचा दाखला दिला तर ती ही बंद होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर्तमानपत्राच्या मालकाला जे हवं तेच लिहायला हवं हा पूर्वापार चालत आलेला नियम आहे.

पूर्णपणे सहमत. मराठी वर्तमानपत्रांची अगदी 'दर्पण'पासून चालू असलेली ही परंपरा आहे. अत्रे-ठाकरे सारख्यांनी स्वतःचा पर्सनल अजेंडा आणि खुन्नस काढण्यासाठीही वर्तमानपत्रांचा सढळ वापर केला आहे. आणखी एक म्हणजे नोकरी सांभाळण्यासाठी सरवटेंनी1 राजकीय व्यंगचित्रे काढणं बंद केलं. तिकडे फ्रान्समध्ये हत्येच्या धमक्या येत होत्या तरी तिथल्या कार्टूनिस्टांनी व्यंगचित्रं काढणं बंद केलं नाही. शेवटी मेले. तरीही नंतर व्यंगचित्र छापलंच.2 आता या मराठी व्यंगचित्रकारांच्या व पत्रकारांच्या वागण्याला जर समृद्ध परंपरा म्हणायचंय तर त्याने खुशाल म्हणावं. मराठी वर्तमानपत्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्तमानपत्राच्या मालकासोबतच आपल्या जातीला जे हवं तेच लिहायचं.

1. सरवटेंविषयी अत्यंत आदर आहे. मात्र हा फरक उल्लेखनीय वाटला.
2. व्यंगचित्राच्या दर्जाविषयी मला काही टिप्पणी करायची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच तणतण...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अल्ट्रा मेगा मार्मिक.
----------------
तणतण नव्हे तण तण तण आणि तट्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाचन, लेखन हे विरंगुळ्याचं साधन नसून गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे असं मानणार्‍या कविताताईंचा वैताग समजण्यासारखा आहे. पण तो व्यक्त करताना वापरलेली भाषा वापरताना थोडी भडक आहे . किमान लेखासाठी जे निमित्य आहे त्यासाठी तरी. सुदैवाने आर.के. च्या काळात गुणग्राही संपादक, वृत्तपत्रमालक, रसिक आणि राजकारणीही असावेत. काही थोडे अपवाद वगळता त्यांना त्यांच्या कामाचे स्वातंत्र्य आणि योग्य पावतीही मिळाली. ९५ वर्षांचे समृद्ध आयुष्य ते जगले. त्यामुळे जुन्या भाषेत बोलायचे तर त्यांचे सोने झाले. मग त्यांना श्रद्धांजली वाहताना आताच्या सृजनशील लेखक,व्यंगचित्रकारांची कुचंबणा मांडायची ही वेळ नाही असं वाटतं. मुद्दा फक्त योग्य असून चालत नाही तो योग्यवेळी मांडला तरच पटवता येतो.
बाकी काळ बदलतोच. तरी आताही चांगली व्यंगचित्रे काढली जातात उदा. लोकसत्तातली प्रशांत कुलकर्णीं.
(अवांतर: आधी आधी लोकसत्तेच्या पहिल्या पानभर जाहिरात पाहिली की माझे वडील चिडून ते पान आधी नीट फाडून रद्दीत टाकायचे मग पेपर वाचायचे. आता वाचतात तसाच. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी आताही चांगली व्यंगचित्रे काढली जातात उदा. लोकसत्तातली प्रशांत कुलकर्णीं.

लोकसत्तात निलेश जाधव म्हणुन एक लेखांची अर्कचित्रे काढायचा. ती फार्फार समर्पक असायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूणच लेखाचा कार्यकारण भावच समजला नाही. तसेच बरीच बेधडक विधाने लेखात आहेत.

कारण माणसांना व्यंगचित्रं समजेनाशी झालीत!

हे कोणी सांगीतले?

अग्रलेखही आता चिमुकले आणि चिमखड्या बोलांचे बनलेत.

मला तर हे कुठे जाणवले नाही. अग्रलेखांचा आकार आहे तसाच आहे. आणि २५ वर्षापूर्वी वाचलेले अग्रलेख पण फार काही भारी आणी विचारप्रवर्तक होते असे वाटले नव्हते.

मुख्य म्हणजे दर्जा दिला तर किंमत मिळते ह्या विचारसरणीवर विश्वास हवा. चांगला व्यंगचित्रकार असेल तर पहील्या पानावर पण छापुन येइल.

माझ्या मते लोकांना पण आता तेच तेच राजकारण्यांवरची व्यंगचित्रे बघुन कंटाळा आला असावा. त्यातली पात्रे सोडुन विषेश काहीच नविन नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला व्यंगचित्रकार असेल तर पहील्या पानावर पण छापुन येइल.

क्या ब्बात है !!!

( त्या युरोपियन कार्टूनिस्ट ने मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे च्या झेंड्यातील हिरव्या पट्ट्याची शान राखण्यासाठी केविलवाणा डायलॉग मारला होता की - "व्यंगचित्र काढण्यासाठी मुळात चित्र असावे लागते. तर व्यंगचित्र काढता येते". आता बोला !!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकसत्तेचा अग्रलेख अजूनतरी पूर्ण लांबीचा असतो. मात्र महाराष्ट्र टाइम्स मधील अग्रलेख प्रत्येकी ५०० शब्दांचे दोन तुकडे या आकाराचे असतात. अगदी क्वचित एकच सलग लेख असतो. अग्रलेखात फोटोही छापले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

या लेखावर गब्बर आणि घासकडवींची प्रतिक्रिया हवी आहे.
--------------
क्षणभर लेखिकेचा भाव नि भाषा बाजूला ठेऊ. पण तिने काही मौलिक तक्रारी, काही तांत्रिक तक्रारी, काही दर्जात्मक तक्रारी, इ इ केल्या आहेत तिकडे लक्ष देऊ.

उदा. मौलिक तक्रार - व्यंगचित्राची जागा विनोदाने घेतली. त्यातही बालबुद्धी विनोद जास्त आहेत. याचे कारण हे नाही हे पेपर चालवणारे लोक चांगली(म्हणजे दर्जेदार्,अभिजात, इ इ) व्यंगचित्रे वा विनोद बनवू शकत नाहीत. पण ते मुद्दाम बनवत नाहीत कारण ते फायद्याचे (त्यांना स्वतःला इष्ट नाही) नाही, समाजाची विनोदबुद्धी मग कोण्या का प्रतलावर राहिना.

उदा. तांत्रिक तक्रार - एरवी एकमेकांशी दुश्मनी निभवणारे संपादक नको तिथं अनुकरण करतातच! व्यंगचित्र मागणी आहे म्हणून शोभते तिथे सोडून आत फेकले आहे.

उदा. दर्जात्मक तक्रार - अगदी अग्रलेख शुद्ध भाषेसाठी रिकमेंड करता येत नाहीय. अग्रलेखही आता चिमुकले आणि चिमखड्या बोलांचे बनलेत.

या तक्रारी किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या अशा तक्रारी पहिले म्हणजे तुम्हाला मान्य आहेत काय?
आता असतील तर-
@ गब्बर - कॅपिटॅलिझलमधे कॅपिटॅलिस्टच्या फायद्याची दिशा आणि समाजाच्या हिताची दिशा या अलाईनड नसतात. शिवाय स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतीही संस्था चालवणारे लोक जो आपला स्वार्थ समोर ठेवतात त्याची नी समाजाच्या हिताची देखिल अलाइनमेंट नसते. फ्रीडम कपल्ड विथ कॅपिटॅलिझम can take societies away from their interests and can take the "only" people at the helms at the institutions towards their self-interest. It is impossible to establish a detailed regulatory framework writing down minute details. And an equilibrium (benefitting all) is never reached as new factors continuously keep coming.
(कृपया लिंका देऊ नका. स्वतःची एकच ओळ लिहिली तरी चालेल.)
@घासकडवी - वृत्तपत्र जीवनाचा एक छोटा हिस्सा आहे. असे छोटे छोटे हिस्से मिळून जीवन बनते. कालौघात नविन व्यवस्थांचा परिपाक म्हणून आणि परंपरांचा दट्ट्या नाही म्हणून अशी बरीचशी काँप्रोमायजेस प्रत्येकाला करून घ्यावी लागत नैयत का?
------------------------
माझ्या व्यक्तिगत अनुभवाने, वृत्तपत्रातील "माहिती" हा प्रकार बरेच पट वाढला आहे, (बरीच आवश्यक ती माहिती रोखली जाते ते असो),पण अनालिसिस हा प्रकार कमी झाला आहे, आणि दृष्टिकोन हा प्रकार नष्ट झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या लेखावर गब्बर आणि घासकडवींची प्रतिक्रिया हवी आहे.

अजो, माझी संभाव्य प्रतिक्रीया शब्दनशब्द चूक व निरर्थक असणार आहे हा तुमचा आडाखा एकदम बरोबर असल्याने प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुमच्याकडून शंभरेक निरर्थक श्रेण्यांची मागणी करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाविना श्रेणी म्हणजे काथ्याकुटाविना ऐसी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही प्रतिक्रिया चूक नि निरर्थक आहे, पण तशी अपेक्षा नव्हती.
----------
पण एरवी तुम्ही मुद्द्याला धरून ज्या प्रतिक्रिया देता त्या प्रचंड मुद्देसूद असतात, माझ्यापेक्षा वेगळा दृषटीकोन मांडतात पण खूप सभ्य नि रास्त असतात. उगाच त्याबद्दल कंफ्यूजन नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्यंगचित्राची जागा विनोदाने घेतली. त्यातही बालबुद्धी विनोद जास्त आहेत. याचे कारण हे नाही हे पेपर चालवणारे लोक चांगली(म्हणजे दर्जेदार्,अभिजात, इ इ) व्यंगचित्रे वा विनोद बनवू शकत नाहीत. पण ते मुद्दाम बनवत नाहीत कारण ते फायद्याचे (त्यांना स्वतःला इष्ट नाही) नाही, समाजाची विनोदबुद्धी मग कोण्या का प्रतलावर राहिना.

कदाचित समाज जास्त प्रगल्भ झाला असेल, त्याला व्यंग कोणी व्यंगचित्र काढुन न दाखवता पण कळत असेल.

त्यातही बालबुद्धी विनोद जास्त आहेत.

ह्यात तर मला श्रेठत्वाचा आव दिसतो. पूर्वी मी मटा च्या पुरवणीच्या पहील्या पानावर येणार्‍या "ढग्गोबाई" च्या बालिश काही विनोदांनी खोखो हसली आहे आणि दुसर्‍यांना पण ते सांगितले आहेत.
त्या काळात, मटाच्या पहील्या पाना आधी ढग्गोबाई चे विनोद वाचले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात तर मला श्रेठत्वाचा आव दिसतो.

आव आहे नि नसावा हे नि:शंकपणे मान्य आहे.
अभिजात व्यंगचित्र देखिल असावे, खासकरून वृत्तपत्राच्या स्टाफची स्वतःची अभिरुची तशी असेल तर जरूर व्हावे असे म्हणायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यात निरर्थक काय? कि अचानक अनु राव या मुस्लिमविरोधी आहेत हे श्रेणी देताना आठवले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होय. तेव्हा 'ढग्गोबाई' आणि 'हसा लेको' मुकेश माचकर लिहीत असत. मामंजी हे टोपणनाव होतं. त्यातील 'हसा लेको' चं तर नंतर पुस्तकही प्रकाशित केलं राजहंस प्रकाशनाने. ते तिथून गेल्यानंतर त्या विनोदांना वाली उरला नाही.
आता 'मी मराठी' या चॅनलचं वृत्तपत्र येऊ घातलं आहे आणि माचकर तिथं संपादक म्हणून रुजू झाले आहेत. पाहूया, हे नवं वृत्तपत्रं तरी कसं असेल हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

ढग्गोबाई या नावाच्या मागचा लेखक सांगितल्या बद्दल धन्यवाद. खुप दिवस उत्सुकता होती कोण आहे त्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यंगचित्रांच्या परिप्रेक्ष्यामध्ये जुना काळ हा नव्या काळापेक्षा चांगला आहे असं म्हणता येईल का? अरूण राव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तो प्रश्न वर घासकडवींना विचारला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पहिल्या पानांना जाहिरातींनी कधीच व्यापलं. त्यानंतरची जी खर्‍या अर्थाने पहिली म्हणावीत अशी पानं असतात, तिथं इयत्ता दुसरीतल्या पोरांनी सांगितलेले ‘विनोद’ छापायला यांच्याकडे जागा आहे, पण व्यंगचित्रासाठी नाही! त्या विनोदांच्या शीर्षकांसाठीही यांना मराठी शब्द सापडत नाहीत; स्पष्ट सांगायचं तर ‘चालत’ नाहीत. ‘भाषा घडवणं’ हे काम वृत्तपत्रांचं राहिलं नाही, तो हेतू जुनाट झाला. बापलोक सांगायचे, ‘भाषेसाठी अग्रलेख वाचा!’ आता सांगत नाहीत. कारण आता ‘लोकांची भाषा’ वृत्तपत्रांना हवीशी झालीये पाचकळ ‘अनुनया’साठी! ती वापरणं सोपं! मग तमाम चुका माफ होतात, ‘ही बोली आहे’ म्हटलं की!

का बरं होत असेल हल्लीच हे सगळं ? पाश्चात्य? भांडवलशाही? कट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेचा त्रागा किंवा तो व्यक्त करण्याची भाषा ह्याविषयी अरुची निर्माण होत असेल तर तसं म्हणणं गैर नाही, पण लिखाणातल्या विचारांना आलेले काही आक्षेप मात्र मजेशीर आहेत. उदाहरणार्थ, वर्तमानपत्राकडून गंभीर, वैचारिक खुराक अपेक्षित असावा ह्या (आणि पोरकटपणासाठी किंवा विकतं ते खपवण्यासाठी इतर मार्ग आहेत हेदेखील ज्यात अध्याहृत आहे अशा) अपेक्षेमागची प्रबोधनाची आदर्शवादी परंपराच काहींच्या परिचयाची नाही की काय, असं ते वाचून वाटतंय. लक्ष्मण ह्यांची व्यंगचित्रं खुमासदार आणि तरीही विचार करायला लावणारी असत, आणि म्हणून लक्ष्मणांचा मृत्यू हे ह्या त्राग्याचं निमित्त आहे, हेदेखील मग अशा लोकांच्या ध्यानीमनी येत नसणार. वृत्तपत्रानं सॉफ्ट पॉर्न दिलं तर काय बिघडतं असंच जर वाटत असेल, तर मग टिळक-आगरकरांच्या काळातल्या मराठी वृत्तपत्रांच्या वारशाबद्दल तुम्हाला आज नक्की काय वाटतं? स्वातंत्र्यपूर्व काळात तरी असा समाजाला खडबडून जागं करू पाहणारा आणि त्याचं प्रबोधन करू पाहणारा आदर्शवाद योग्य होता, की तेव्हाही तो अस्थानीच होता? जर तेव्हा तो अस्थानी नसेल, तर मग आजच्या समाजाला त्याची का गरज नाही? शिवाय, इतरांचा श्रेष्ठत्वाचा जो काय असेल तो आवच, आणि आमचा पोरकटपणा मात्र खराखुरा अशीच जर विचार करण्याची पद्धत असेल, तर त्यापुढे ह्या दोन टोकांमधला संवाद खुंटणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वृत्तपत्रानं सॉफ्ट पॉर्न दिलं तर काय बिघडतं असंच जर वाटत असेल, तर मग टिळक-आगरकरांच्या काळातल्या मराठी वृत्तपत्रांच्या वारशाबद्दल तुम्हाला आज नक्की काय वाटतं? स्वातंत्र्यपूर्व काळात तरी असा समाजाला खडबडून जागं करू पाहणारा आणि त्याचं प्रबोधन करू पाहणारा आदर्शवाद योग्य होता, की तेव्हाही तो अस्थानीच होता? जर तेव्हा तो अस्थानी नसेल, तर मग आजच्या समाजाला त्याची का गरज नाही?

मार्मिक. समयोचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वृत्तपत्रानं सॉफ्ट पॉर्न दिलं तर काय बिघडतं असंच जर वाटत असेल, तर मग टिळक-आगरकरांच्या काळातल्या मराठी वृत्तपत्रांच्या वारशाबद्दल तुम्हाला आज नक्की काय वाटतं? स्वातंत्र्यपूर्व काळात तरी असा समाजाला खडबडून जागं करू पाहणारा आणि त्याचं प्रबोधन करू पाहणारा आदर्शवाद योग्य होता, की तेव्हाही तो अस्थानीच होता? जर तेव्हा तो अस्थानी नसेल, तर मग आजच्या समाजाला त्याची का गरज नाही?

याचे विश्लेषण साध्या सोप्या मार्केट फेल्युअर थियरी वापरून केले जाऊ शकते. There can be other explanations also. But let me provide one.

यात ४ भिन्न मागण्यांचा मुद्दा आहे - १) पत्रकारितेच्या सर्व्हिसेस ची मागणी, २) जनताभिमुख सरकार साठी जनतेची असलेली मागणी (demand for governance), ३-अ) कामतृप्तीच्या सेवांची मागणी, ३-ब) व ३-अ चा उपसंच - पॉर्न ची मागणी.

मार्केट फेल्युअर मधे Co-ordination failure हा एक प्रकार असतो. म्हंजे एखाद्या गोष्टीची मार्केट मधे गरज आहे पण ती अप्रकट असल्याने तिचा पुरवठा होण्यासाठी जी इन्पुट्स एखाद्या संभाव्य प्रोड्युसर ला लागतात ती प्रकट होत नाहीत व म्हणून प्रोड्युसर कडे साधनसंपत्त्ती, कौशल्ये नाहीत. व म्हणून प्रोड्युसर निर्माण होत नाही. केसरी व मराठा स्थापित झाले तेव्हा इतर किती वृत्तपत्रे अस्तित्वात होती ? - ह्याचा डेटा माझ्याकडे नाही. पण संख्या अत्यंत कमी असावी. दर्पण त्या काळी (१८८१ मधे) होते की नव्हते माहीती नाही. दर्पण चा शेवटचा अंक १९४० मधे निघाला असे विकिपेडिया म्हणतोय. टिळक-आगरकरांनी जे वृत्तपत्र सुरु केले (केसरी व मराठा) ते Excellent example of entrepreneurship होते.

दुसरी गरज - १८८१ मधे समाजात सरकार अस्तित्वात होते पण असे सरकार की जे आवाम निवडू शकेल - असे सरकार होते असे ठामपणे म्हणायला जागा आहे ? खरंच ? There was a latent demand for an institutional enforcer of rights and newspapers (Kesari, Maratha and others) helped surface this demand. १८८० मधे दर्पण जवळपास दिसेनासे झालेले असल्याने केसरी व मराठा यांना First mover advantage होते. जोडीला १८५० नंतर तरी लोकसंख्या वाढत होती. As the population grows, the transaction complexity increases and hence the demand for governance (rules and rulers). त्यामुळे केसरी व मराठा ची डिमांड पण वाढत होती असे म्हणायला जागा आहे.

आता मुख्य मुद्दा - टिळक व आगरकरांचे वैचारिक द्रष्टेपण. हे "स्वातंत्र्यपूर्व कालात" जनतेला स्वातंत्र्याकडे लक्ष द्या असे सांगण्यासाठी जागे करीत होते. व ती मागणी ही प्रचंड होती (कारण वर दिलेले आहे). टिळक व आगरकरांनी ती अप्रकट मागणी कॅप्चर करून वृत्तपत्रे स्थापित केली. दुसर्‍या बाजूला - त्याकाळी जनतेस कामतृप्तीसाठी मार्ग नव्हते असे नाही. त्याकाळी कामतृप्तीसाठीचे मार्ग हे मार्केट म्हणून अस्तित्वात होतेच की. ते अप्रकट सुद्धा नव्हते. फारतर असे म्हणता येईल की पॉर्न ची डिमांड अप्रकट होती. पण आजही अगदी अमेरिकेत सुद्धा पॉर्न ही ओव्हरऑल पोलिटिकल्/इकॉनॉमिक्/सोशल मिडिया पेक्षा मोठी इंडस्ट्री नाही. भारताच्या बाबतीत तर पॉर्न इंडस्ट्री चा विचार केला तर (वादग्रस्त) say's law सुद्धा लागू पडेल. आजही भारतात - market demand for political, social, and economic "governance related media" is larger than the market for sexual services.

मुद्दा हा आहे की टिळक व आगरकरांनी प्रचंड व अप्रकट मागणी कॅप्चर करून वृत्तपत्रे स्थापित केली. म्हणून ते entrepreneurs.

राहता राहिला प्रश्न - त्याकाळी त्यांनी सेक्श्युअल सर्व्हिसेस च्या जाहिरातीं देऊन त्या पैशाचा वापर आपल्या वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी का केला नाही ? त्याकाळी त्यांनी कॉस सबसिडायझेशन का केले नाही व/वा का करू शकत नव्हते व आजचे वृत्तपत्र मालक का करतात - हा प्रश्न असू शकतो.

------

माझा प्रश्न हा आहे की - मी दिलेला प्रतिसाद हा किमान काही प्रमाणावर तरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दिलेला प्रतिसाद हा किमान काही प्रमाणावर तरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो का ?

काहीतरीच गब्बर तुमचे. उत्तर आधीच ठरलेले आहे, तुम्ही काहीही प्रतिसाद लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना नाही.....

कमजोरीवरच्या औषधांच्या जाहिराती त्याही काळी बर्‍याच प्रमाणात येत असणार.

अवांतर: मटा सेक्शुअल सर्व्हिसेसच्या "जाहिराती: करत नाही असे वाटते. कंटेण्ट प्रोव्हाइड करते बहुधा.

आर के लक्ष्मण राहिले बाजूला..... मीडियाची भूमिका असा धागा वेगळा करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

संपादक, ही चर्चा वेगळी काढता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवांतर: मटा सेक्शुअल सर्व्हिसेसच्या "जाहिराती: करत नाही असे वाटते. कंटेण्ट प्रोव्हाइड करते बहुधा.

हेच लिहायला आलो होतो.

एकदा पेजस्पेस विकली की अकामाईसारख्या कंटेंट प्रोवायडर कंपन्या कंटेंट दाखवतात. कोणत्या जाहिराती/कंटेंट दिसणार हे ठरवणारा अल्गोरिदम असतो. ब्राऊझरच्या कुकीज, आयपी ट्रॅक करून भौगोलिक "बिग डेटा" वगैरेच्या विश्लेषणावरून कोणता कंटेंट दिसणार ते तो अल्गोरिदम ठरवतो. (इतरही फॅक्टर्स असतील, हे अल्गोरिदम्स अतिगुप्त असतात.)

उदा. एक वेबपेज घरून+घरच्या लॅपटॉपवरून उघडलं तर त्यावर पॉर्नच्या जाहिराती दिसतात. तेच वेबपेज ऑफिसच्या लॅपटॉपवरून उघडलं की वेगळ्या (उदा. हॉटेलबिटेलच्या, टूरिस्ट साईट्सच्या) जाहिराती दिसतात. भारतातल्या घरून+लॅपटॉपवरून उघडलं की "भारत मॅट्रिमोनियल", मॉन्स्टर वगैरेच्या जाहिराती.

तस्मात - टाईम्सच्या वेबपेजवर पॉर्नच्या जाहिराती दिसतात हे स्थानमहात्म्य+यूजरमहात्म्य असावं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी नवी माहिती माझ्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> माझा प्रश्न हा आहे की - मी दिलेला प्रतिसाद हा किमान काही प्रमाणावर तरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो का ? <<

जुन्या प्रबोधनवादी आदर्शवादाला तुमचं उत्तर निखळ बाजारपेठीय प्रतिवादातून येणार हे अपेक्षितच होतं. त्यामुळे ह्यातून मला तरी काही नवा बोध झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रबोधन व आदर्शवाद यांपेक्षा बाजारपेठ महत्त्वाची आहे अशी गब्बरची विचारसरणी आहे. हे दोन्ही दोन्ही काळांत अस्थानी आहेत काय याचे उत्तर त्यांनी पूर्णतः टाळलेले आहे. टिळकांनी म्हणे एक मार्केट गूड जे मागणीत होते नि उपलब्ध नव्हते ते पुरवण्यासाठी मार्केट टॅप केले.
-------------
गब्बर विष्णुने राम व कृष्ण व बुद्ध म्हणून जे अवतार घेतले ते देखिल एक मार्केट टॅप करायला (कोणते ते तेच जाणोत) असे आरामात म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत.
---------------
जिथे मार्केटचा संबंध येत नाही असे कोणते क्षेत्र आहे याचे उत्तर गब्बर काय देत असतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गब्बर विष्णुने राम व कृष्ण व बुद्ध म्हणून जे अवतार घेतले ते देखिल एक मार्केट टॅप करायला (कोणते ते तेच जाणोत) असे आरामात म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत.

हे गब्बर कशाला म्हणायला पायजे? स्वतः भगवान श्रीकृष्णच गीतेत म्हणतात.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ||
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म माजतो, तेव्हा दुर्जनांचा विनाश करण्याचे व सज्जनांना आधार देण्याचे आणि इफेक्टिव्हली धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठीचे मार्केट खुले होते. ते मी युगानुयुगे टॅप करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रबोधन व आदर्शवाद यांपेक्षा बाजारपेठ महत्त्वाची आहे

अजो - "महत्वाचे काय आहे" ह मुद्दा मधे मधे आणल्यामुळेच नेहमी घोटाळा होत आला आहे.
त्यापेक्षा खालील काही प्रश्न विचारले तर बरे होइल.

१. मानवी स्वभावाला कोणता वाद जास्त चांगल्या प्रकारे समजुन घेऊ शकतो.
२. जो विचार मांडला जात आहे तो हा मानव स्वभाव लक्षात घेता लागु होउ शकेल काय?
३. checks and Balances कोणत्या विचारात मुलभुत रीत्या आहेत आणि implement पण करता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे मार्केटचा संबंध येत नाही असे कोणते क्षेत्र आहे याचे उत्तर गब्बर काय देत असतील?

१) मार्केट व्ह्यु हा एकमेव व्ह्यु नाही. अर्थशास्त्रीय टूल्स ही विषय समजावून घेण्यासाठी आहेत. तुम्ही इतरही अनेक फ्रेमवर्क्स वापरू शकता. उदा. मानववंशशास्त्रीय, तत्वज्ञान, समाजशास्त्रीय वगैरे.

२) तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर - काही नॉन मार्केट बिहेवियर चे विश्लेषण सुद्धा अर्थशास्त्रीय टूल्स वापरून केले गेलेले आहे. पण ते (१) मधे म्हंटल्याप्रमाणे एकमेव व्ह्यु नाही. अनेकांपैकी एक व्ह्यु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा काळ ध्येयवादी आणि आजचा विकाऊ , बाजारू असे पिढीचे हिशेब सरसकटकरण कोणी देऊ लागल कि डोक्यात जात राव . आणि तुम्हाला कोणी (म्हणजे लक्ष्मण म्हणूनच नाही पण इतर कोणीही ) आवडत आणि त्याला संपादकान मधल्या पानावर टाकल म्हणून तो direct सडका मेंदू ? इतक कस पटकन सगळ्या गोष्टींच simplification करता येत ? बाकी चालू द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

जाऊद्या हो. वाहवत गेल्याचं स्वतः धागाकर्तीनंच कबूल केलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्रागा (एक वेळ) समजू शकतो, पण...

असे सडके मेंदू एखादी लोखंडाची पातळ सळी घालून फोडायला पाहिजे होते.

यावरून दुर्दैवाने 'निर्भया' आठवली.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही प्रतिगामी लोकच अतिरेकी असतात असे म्हणायची फॅशन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अतिरेक ही काही प्रतिगाम्यांची मक्तेदारी नव्हे, हे मान्य आहेच. तो मानवी स्वभावाचा भाग आहे, नि असे 'मानव' दोन्हीं गोटांत सापडावेत.

मात्र, एखाद्या पुरोगाम्याने अतिरेक केल्यास त्याविरुद्ध "हा अतिरेक आहे" म्हणून दुसर्‍या पुरोगाम्यानेच बोंब मारण्याची शक्यताही तुलनेने अधिक असावी, असे प्रतिपादण्याचे धाडस या निमित्ताने करू इच्छितो.

अँड देअरइन लाईज़ द डिफरन्स.

..........

पुरावे आम्हीही देत नाही ज्जा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'प्रतिपादण्याचे धाडस' हा वाक्प्रचार इन आयसोलेशनमध्ये पाहता, त्याच्या पूर्वार्धाची फाळणी केल्यास अतिशय चपखल होईलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समोरच्याचे तोंड (कदाचित नाकसुद्धा) बंद करण्याकरिता तो एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. का वापरू नये?

..........

'नाक दाबले, की तोंड उघडते'वाला फंडा या ठिकाणी पूर्णपणे गैरलागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत प्रभावी आणि तितकाच प्र-वासी.

अतिअवांतरः

जुन्या कथांमध्ये 'अमुक नगरी तमुक राजा वास करी' वगैरे वर्णनेही तशीच वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मात्र, एखाद्या पुरोगाम्याने अतिरेक केल्यास त्याविरुद्ध "हा अतिरेक आहे" म्हणून दुसर्‍या पुरोगाम्यानेच बोंब मारण्याची शक्यताही तुलनेने अधिक असावी, असे प्रतिपादण्याचे धाडस या निमित्ताने करू इच्छितो.

असे म्हणणे खरोखरच धाडस आहे. आणि चूकीचे धाडस आहे.
कोल्हटकरांच्या धाग्यावर मानवाच्या इतिहासात (१८००-१९०० पूर्वी?) स्त्रीयांचे सरासरी वय २३ आणि पुरुषांचे ४२ असे कोणी म्हणाले. Imagine this kind of society. Forget that it is not only unsustainable, but also no where recorded in history. No account of Indian history suggests anything to this effect.
कोणत्या दुसर्‍या पुरोगाम्याने बोंब मारली? ऐसीवर तर त्यांची रेलचेल आहे.
-------------
पुरोगामिता नावाचा एक स्वतंत्र धर्म आहे. त्यांची विशिष्ट दैवतं आणि पुस्तकं आहेत. म्हणून ते आपसांत लढत नाहीत. तथाकथित प्रतिगाम्यांना बदडणे हाच त्यांचा फुलटाइम अजेंडा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सम 'पाद्' काच 'प्रति ''पादन' ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

काल आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर ज्यांना ते 'बाप' वाटत अशा काही व्यंगचित्रकारांशी बोलणं झालं. त्यातून तो 'काळ' आणि 'हा' काळ अशी एक चर्चा झाली. गेली दोनेक वर्षं व्यंगचित्रकार मित्र वृत्तपत्रांकडून मिळणार्‍या एकंदर वागणुकीने अत्यंत त्रासलेले आहेत. ( त्या सगळ्यांचं ऐकून काल डोक्याचा भुगा झाला होता, त्यातून हे लिहिलं गेलं. एरवी पात्रांच्या तोंडूनदेखील मी कधी इतकी तीव्र हिंसक विधानं लिहिलेली नाहीत. ) व्यंगचित्रांचं नाहीसं होत जाणं, म्हणजे असहीष्णु वृत्ती वाढत जाणं... असं त्यांपैकी एकाने म्हटलं. या सगळ्या चर्चा खासगीतल्या होत्या; त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय त्यांची नावं लिहू शकत नाही.
ऑनलाईन काही करता येईल, या चर्चाही झाल्या आमच्यात. पण तो पर्याय शेवटी छापिल पर्यायांच्या तुलनेत फारच कमी लोकांपर्यंत पोहोचतो. जिथे मालकांच्याच आज्ञा असतात, तिथे इलाज नसतो, असे म्हणता येईल; पण 'आपल्या अधिकारात' असलेल्या गोष्टींबाबत जेव्हा संपादक असे निर्णय घेतात, तेव्हा खेद वाटतोच.
एक सकारात्मक उदाहरण सांगते. एक्सप्रेस समुहाने जाहिरातींचे दर वाढवले, तेव्हा केतकर लोकसत्ताचे संपादक होते; त्यांनी संबंधितांशी बोलणी / पाठपुरावा करून पुस्तकांच्या जाहिरातींचे दर कमी करून घेतले. आजही ते इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत अत्यल्प आहेत. म्हणजे इच्छाशक्ती असेल, तर काही गोष्टी करता येऊ शकतात.
एकवेळ निष्क्रिय लोक परवडले, पण नासमज नकोत, असं म्हणायची वेळ कला-साहित्य क्षेत्राशी संबंधित काम प्रामाणिकपणाने व गांभीर्याने करणार्‍या लोकांवर आलेली आहे. ( अवांतर : जे.जे. स्कूल ऑफ आर्ट वरील 'कालाजगत' ( इथं कनंतरचा काना अवतरणात होता, तो टाइप करता येत नाहीये.) असा अंक चिन्ह या मासिकाने काढला होता, तो उदाहरणादाखल पाहता येतील. साहित्य संस्थांमध्ये काय चाललं आहे, हे अधूनमधून संमेलनाच्या निमित्ताने का होईना कळत असतंच. भाषा संचालनालयाला गेली ६ वर्षं संचालकच नाहीये, सरकारी अनास्थेतून ही नेमणूकच झालेली नाही. इत्यादी.) थोडक्यात अशा दबलेल्या अनेक गोष्टी कालच्या चर्चांमधून बाहेर निघाल्या. त्यातून उद्विग्नतेने हे लिहिलं गेलं.
तरीही अशी भाषा असायला नको होती. चांगली भाषा वापरणं मला केव्हाही आवडेलच; तशी वापरण्याजोग्या गोष्टीच मुळात फार कमी घडताहेत; याचा खेद आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

तरीही अशी भाषा असायला नको होती. चांगली भाषा वापरणं मला केव्हाही आवडेलच; तशी वापरण्याजोग्या गोष्टीच मुळात फार कमी घडताहेत; याचा खेद आहेच.

Sometimes mood overpowers attitude. असो. पण साहित्यक्षेत्रातील समस्यांवर ऐसीवर "व्यंग" लिहून लक्ष्मण यांना पुनश्च श्रद्धांजली वाहा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां हा छान प्रतिसाद आहे अजो. फार मार्मीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खीक.. वाहवत जायला लेखिकेला ऐसीअक्षरेच सापडले का? ROFL

सगळ्यांनाच पैसा कमवायचाय. स्वीमिंगपूलवालं घर आणि दारात अगदी ऑडी-बिडी नसली तरी एखादी सेडन असल्याशिवाय आजकाल साधी समुद्रसपाटीवरचीही प्रतिष्ठा मिळत नाही. अशा वेळी भारतकुमार राऊतांनी खादीचे कपडे घालून चौथ्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहावी अशी अपेक्षा ठेवणे अवघड आहे.
आणि काय होतं त्या व्यंगचित्रांनी? विनोदाला हुकूमशहा घाबरत असतील, लोकशाहीच्या घाटावरचे साधू ढुंकूनही पाहात नाहीत.
मुळात ज्यांना पाहायला उसंत आहे त्यातल्या शंभरातले दहा टीव्हीतून, सिनेमाच्या पानातून आणि शेअरबाजाराच्या आकड्यातून वेळ काढून व्यंगचित्र पाहतात आणि त्या दहातल्या एखाद्याला ते नीट समजतं आणि तोही विषण्ण हसत दुसर्‍या मिनिटाला दुसरं काहीतरी 'मनोरंजक' शोधतो.
त्यामुळे गेलं व्यंगचित्र आतल्या पानावर म्हणून काही बिघडत नाही. सगळं मार्केट आहे हा विचार इतका प्रबळ आहे की उद्या एखादा डोळ्यादेखत भुकेने मेला तरी त्याला अन्न न मिळणे हेच कसे मार्कॅटच्या नियमांप्रमाणे व आरोग्यासाठी योग्य आहे ते सांगितले जाईल. त्यामुळे जस्ट चिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळं मार्केट आहे हा विचार इतका प्रबळ आहे की उद्या एखादा डोळ्यादेखत भुकेने मेला तरी त्याला अन्न न मिळणे हेच कसे मार्कॅटच्या नियमांप्रमाणे व आरोग्यासाठी योग्य आहे ते सांगितले जाईल.

गब्बरीय विचारसरणीचं सार, मर्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तसाही लक्ष्मणांचा कॉमन मॅन हा गेल्या १५ वर्षापासुन Irrelevent झाला होता. हल्लीचा मध्यमवर्ग* ( जो व्यंगचित्रांचा वाचक असतो ), तो भाबडा, पिचलेला, सरकारी ऑफिस मधे काम न करता युनियन बाजी करणारा नसतोच. वर त्याला सर्व राजकीय नेत्यांची आणि पक्षांची खरी रुपे माहीती असतात.
Its now time to move on.

-------------
नोट : * लक्ष्मणांचे कार्टुनचा वाचक मध्यमवर्गच होता ह्या बद्दल कुठलाही विदा माझ्याकडे नाही. तसा माझा तो समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रैट्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

< खीक.. वाहवत जायला लेखिकेला ऐसीअक्षरेच सापडले का? > होय. कारण असे 'सर्वसमावेशक' प्रतिसाद फक्त ऐसीवरच मिळू शकतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

मार्मिक श्रेणी दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत गवि. असा ३६० डीग्री धिंगाणा फक्त ऐसीवरच बघायला मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि नेमके ३६० डिग्रीच का? त्याहून जास्त अथवा कमी का नाहीत यावर तपशीलवार (वैज्ञानिक विरुद्ध अजोवादी) चर्चाही होऊ शकते.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने