Skip to main content

उंदरीन आणि उंदीरशेठ...

उंदरीन आणि
उंदीरशेठ
पिंजर्‍यात झाली
दोघांची भेट

उंदीरशेठ
बाताडे भारी
उंदरीनिला म्हणाले
"हे सुंदरी"

सांग सांग करशील का
माझ्याशी लगीन
तुझ्यासाठी नभीचे
तारे मी कतरीन

उंदरीन म्हणाली
दावीत नखरा
आधी या पिंजर्‍याचा
एक तार कतरा...

- ग्लोरी

धुमकेतू Thu, 22/12/2011 - 18:57

लहान मुले बोबडीच बोलतात.
भाऊलीचं लगीन त्यांना गोड वाटते तद्वतच ही शब्दरचनाही बच्चे कंपनीला आवडेल याची खात्री आहे.
छोट्या मुलामुलींमध्ये लग्नाची कन्सेप्ट न आणता त्यांच्या निरागस बालपणाची जपणूक करणारी अजून गाणी तुम्ही लिहिलीत तर चांगले होईल.
छोट्यांसाठी योग्य शब्द निवडायची ताकद तुमच्यात दिसली म्हणून सांगतोय एवढेच.

ऋषिकेश Mon, 26/12/2011 - 13:29

तुमच्या आधीच्या बालगीते-बडबडगीतांशी तुलना करता अधिक चांगले जमले असते असे वाटते