मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३३
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
बारशाला "कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या" हे फक्त पुत्ररत्नाकरताच म्हणतात की कन्येकरताही?
मला आठवतच नाहीये.
ते मावशी-मामी यांनी लिहीलेले पाळणेही सुंदर सुंदर असतात. कौतुक वाटतं अशा साध्या पण गोड कवितांचं.
मूळ प्रश्नांची उत्तरे माहीत
मूळ प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत. तोपर्यंत पुढचा प्रश्न नोंदवून ठेवतो.
आपल्या स्वतःच्या अनुभवावरुन, इतर मित्र/नातेवाईकांच्या अनुभवांवरुन, वाचन आणि जनरल नॉलेजवरुन, आकडेवारीवरुन यापैकी एका किंवा अनेक गोष्टींवरुन भारतात राहण्यासाठी सर्वात छान* (छानची व्याख्या सांगता येत नाही) शहर कोणतं? हवामान, संधी, राहत्या जागांची विस्तीर्णता, गर्दी, ट्रॅफिक, सुविधा, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मनोरंजन, सोशल लाईफ आणि अन्य मुद्द्यांवर मुंबई, दिल्ली, बंगलोर, चेन्नई, पुणे, हैदराबाद, मैसूर यापैकी किंवा इतर कोणती शहरं चांगली आहेत?
कायमचे सेटल होणे यादृष्टीने कोणती चांगली आहेत?
माझ्या अनुभवानुसार काही संकीर्ण निरीक्षणं. अर्थात मर्यादित व्यक्तिगत परीघातली:
अ. कोंकणातले लहानपणचे मित्र - त्यांपैकी तीन चतुर्थांश मित्र तीनचार दशकांनंतर अद्यापही कोंकणातच आहेत. आणि मोस्टली त्याच गावांमधे. त्यांनी फार पैसेवाल्या करियर किंवा खास उद्योगधंदा केला असं नाही, पण ते कोंकण सोडायला तयार नाहीत.
ब. देशावरचे मित्र / लोक शिक्षणानंतर त्या त्या गावातून बाहेर निघण्याचं प्रमाण फार मोठं आहे. एखाद दुसरा मित्र (तोही घरचा व्यवसायधंदा असलेला) तिथे सेटल होऊन राहिलाय. अन्यथा देशात आणि परदेशात मायग्रेशन झाले आहे.
क. बंगलोर या ठिकाणी जे जे मित्र / नातेवाईक / कलीग्ज इ इ गेले त्यातले निम्म्याहून अधिक तिथेच सेटल झाले आणि उरलेले बहुतांश संधी मिळाल्यास तिथेच सेटल होण्याची इच्छा बाळगून आहेत. तिथे काहीतरी असं आहे की जे त्यांना सर्वांना आवडलं आहे, आणि भाषा किंवा प्रांत असा मुद्दा मनात न येता ते तिथे घरबीर खरेदी करुन कायमचे राहिलेत.
ड. मुंबईचं विकेंद्रीकरण (अर्थात जवळपासही चालेल.. पनवेल, अलिबाग इ) होण्याची अत्यंत जोरदार गरज आहे असं माझं वैयक्तिक मत
ई. कोलकाता या शहराविषयी इतर भारतात अत्यंत कमी माहिती आहे.. इतर शहरांविषयी काहीना काही ग्रह असतो, पण कोलकाता काय चीज आहे ते माहीत नाही.
फ. चेन्नई हे अत्यंत उष्ण आणि गलिच्छ असल्याचं तेथील वास्तव्यात आढळलं होतं.
आणखी कोणाचे काय अनुभव?
*छान म्हणजे उदा. घरा(च्या आवारा)त आरामात विनात्रास मोठा कुत्रा पाळता येणं आणि कुठे मनोरंजनाच्या ठिकाणी जायचं असेल तर पार्किंगची काळजी मनालाही न स्पर्शणं. वगैरे.
बेंगलुरु मस्त आहे ट्राफिक
बेंगलुरु मस्त आहे ट्राफिक वगैरे प्रोब्लेम तिथेही आहेत, पण मला लोकांचा, अनुभव चांगला आला. अतिशय मैत्रीपुर्ण वागणूक अन परप्रांतिय असल्याचा विशेष कसलाच उपद्रव नाही. आजही येथिल जेवड्या नेटीव लोकांशी जी ओळख(मैत्रीच) झाली ती अगदी कौटुम्बीक पातळीवरही टीकुन आहे याचे विषेश वाटते.
बाकी आशा आहे यु आर नॉट लुकिण्ग फॉर अ चिटी इन इंड्या हुज अॅप्प्ल्स आर ऑरेंजेस ;)
शेजारी मुली चिकण्या असतील तर
शेजारी मुली चिकण्या असतील तर स्वतःला चिकण्या मुली होत नाहीत गब्बर. तुझं झालं गेलं सावरलं. आता काय करणारेस चिकण्या मुली शेजारी* ठेउन? ;)
-------------------
इंफाळ मधे चिकार चिकण्या मुली आहेत. मी तिथे असतो तेव्हा सदैव घायाळ असतो.
===========
* शेजारच्या घरात वैगेरे. भाषेचे सौंदर्य आड यायला नको.
आता काय करणारेस चिकण्या मुली
आता काय करणारेस चिकण्या मुली शेजारी* ठेउन?
अश्लील अश्लील
----
काय करणार शेजारी ठेवून ?
एखादी "चतुर नार" पडोसन ठेवून आणखी काय करणार ? गाणं म्हणणार - तुम ही तो लायी हो जीवन मे मेरे प्यार प्यार प्यार.
उनसे कहने वाली ... और भी है सारी बाते
सामने सबके बोलो कैसे कह दूं ... सारी बाते ....
भाषेच्या सौंदर्याचा इतका
भाषेच्या सौंदर्याचा इतका गैरफायदा?
मी मुद्दाम तळटीप दिली शेजारी शब्दावर. शिवाय मुली ठेवत नाहीत, बायका* ठेवतात**.
------------------
* बाई या शब्दाचे अनेकवचन, बायकोचे नव्हे.
** ठेवतात म्हणजे ठेवाव्यात नव्हे. जे काय गैर आहे त्याला काय शब्दप्रयोग आहे ते लिहितोय.
नोकरी अथवा एकूण उपजिविकेच्या
नोकरी अथवा एकूण उपजिविकेच्या संधी हे धरणे आवश्यक आहेच. गणपतीपुळे, मालगुंड हीदेखील अत्यंत सुंदर ठिकाणे आहेत. ऊटी अत्यंत उत्तम थंड हवेचे ठिकाण आहे. पण सेटलमेंटच्या दृष्टीने शहरी मनुष्याला जे लागतं (व्यवसाय, उपजिवीका, सोशल अॅक्टिव्हिटी लेव्हल्स-छंद- समानधर्मी लोकांची उपलब्धता असण्याची जास्त शक्यता, सिनेमाथेट्रे, मनोरंजन,) तेही.
माझ्या डोक्यात अशी निमशहरे
माझ्या डोक्यात अशी निमशहरे नव्हती मात्र गोव्यातील काही जागा, कोल्हापूर, नागपूर अशी मोठी शहरे आली., तिथे सेटल व्हायचं तर मुख्य प्रश्न नोकरीचा असेल.
असो.
मग माझ्यासाठी फारसे पर्याय उरत नाहीत:
मुंबई, पुणे, बंगळूर, हैद्राबाद, नॉएडा, चेन्नै इत्यादी. पैकी मला दक्षिणमुंबईत (विशेषतः कुलाब्यात) छानशा (किमान २ बीएच्के) फ्लॅटमध्ये रहायला आवडेल पण परवडणार नाही तेव्हा पुणे हाच एक ठीक पर्याय उरतो.
त्या खालोखाल हैदराबाद/इंदौरबद्दल चांगले ऐकून आहे. मात्र दोन्ही शहरे पाहिली असली तरी दीर्घकाळ दोन्हीकडे राहिलो नसल्याने स्वानुभव नाही.
गवि, या रेटने नेमकं उत्तर तर
गवि, या रेटने नेमकं उत्तर तर मिळणार नाहीच, पण आलेल्या सुचवण्यांमध्ये चिक्कार मोठी रेंज असेल.
प्रत्येकाची आवडनिवड, प्राधान्यक्रम हा एक भाग. पण "उपजीविकेच्या संधी" हेही पुरेसं धूसर आहे. उदा. अरूणजोशी इंफाळमध्ये सहज उपजीविका मिळवतील/मिळवू शकतील. तुम्हाला किंवा मला ते इतकं सहजसाध्य नाही.
हे पटतंय. मुळात लिहितानाही
हे पटतंय. मुळात लिहितानाही मनात आलं होतं.
प्रश्न मर्यादित करुन पाहू.
राहणीमान -स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, सोशल लाईफ क्वोशंट, हवामान, प्रदूषण, ट्रॅफिक, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे दृष्टीने मेट्रो आणि अर्बन (सेकंडरी मेट्रोज) या क्लासमधे येणारी कोणती शहरं उत्कृष्ट आहेत ?
गोव्यातले मित्र बाहेरही पडले
गोव्यातले मित्र बाहेरही पडले नाहीयेत. हेवा वाटतो राव त्यांचा.
बंगलोर फार छान. ऑलमोस्ट वर्षभर आल्हाददायक हवामान, माफक पाऊस माफक थंडी.. याच्याशी सहमत! हैद्राबाद प्रचंड स्वस्त आहे असं ऐकलंय. सलीम फेकूला भेटून बिर्याणी चापायला तरी तिथे जायचं आहे. :) चेन्नई आणि एकंदर तमिळनाडू महाहुकलेली जागा आहे. दीड वर्ष राहीलो आहे. आता परत तिकडे रहायला वगैरे जाणं अशक्य आहे. दुर्दैवानं सगळ्या मेकॅनिकल कंपन्यांचं त्या शहरावर प्रचंड प्रेम आहे.
पुणे आवडतं, सगळा पश्चिम महाराष्ट्र आवडतो, कोल्लापूर, कराड, सांगली, मिरज, सातारा कुठेपण आवडेल.
.
>>त्यामुळे श्री. थत्ते यांना मिळालेले प्रमाणपत्र योग्यच असावे.
म्हणजे? अरुण जोशी खोटी प्रमाणपत्रे वाटतात असा आरोप करताय का? (ह. घ्या)
उन्हाळ्याचा त्रास हा पर्सन डिपेंडंट असावा. मी आयुष्यातला मोठा काळ मुंबईत राहिलो. आणि सुमारे दोन वर्षे अतीव उन्हाळ्याच्या ठिकाणी भिलाई येथे तर ४ वर्षे पुण्यात. मला स्वतःला उच्च तापमानाच्या मानाने उकाडा सुसह्य वाटतो.
असं विशफुल थिंकिंग सगळ्यांचंच
असं विशफुल थिंकिंग सगळ्यांचंच असतं. (माझंही आहे.)
खरंच असं मोठ्या शहरातून छोट्या/शांत गावात गेलेल्या लोकांनी नेमकं कसं ठरवलं/जमवलं हे आठवून पहातो आहे.
आठवलेल्या दोन केस ष्टडीजः
१] दूरची मावशी आणि मावसोबा दोघेही पुण्यात वेगवेगळ्या बँकांमध्ये होते. मावसोबांची बदली मुंबईला झाली. मावशी मुंबईला जायला तयार नव्ह्ती, बँक बदली रद्द करायला तयार नव्हती. मग दोघेही लोणावळ्यात रहायला गेले, आणि अर्धं अर्धं अंतर अप-डाऊन करायचे. यथावकाश दोघांनाही दुसर्याच्या शहरात बदली मिळायची शक्यता निर्माण झाली. पण तोवर ते लोणावळ्याच्या इतके प्रेमात पडले होते की ते तिथेच राहिले. आता दोघेही निवृत्त झाले आहेत, पण लोणावळ्यातच रहातात.
२] एक फार्मासिस्ट मित्र फार्मा-संबंधित उपकरणांचा सेल्समन होता. ती धोपटी घेऊन गावगन्ना भटकत असे. त्यात सातार्यातल्या एका फार्मा कारखान्यातही जात असे. तिथल्या पर्चेस ऑफिसरशी भरे हुए जाम पे बोलताना त्याने आपल्या भटक्या आयुष्याबद्दल खंत व्यक्त केली. पर्चेस ऑफिसर म्हणाला - आमच्या इथे जुनियर प्रोडक्शनसाठी पोस्ट आहे, येतोस का? हा तयार झाला. मस्त मजेत सातारा गावाबाहेर घर बांधून रहातो आहे. जेवायला घरी येतो, आणि डुलकी काढून परत जातो.
या दोन्हींमध्ये त्या त्या लोकांनी आलेल्या संधीचा चट्कन लाभ घेतला - हे समान सूत्र मला जाणवलं.
या गविंच्या प्रश्नांनी माहिती
या गविंच्या प्रश्नांनी माहिती मिळालीच आणि करमणूकही झाली.
पर्याय समोर असले की निर्णय लवकर होत नाही परंतू काही कारणामुळे त्या शहरात गेलेले नंतर तिकडेच आनंदाने स्थायिक होतात. ते शहर आवडते म्हणण्यापेक्षा आवडू लागते.
बंगळुरू आणि एकंदर कर्नाटकातली शहरे चांगली आहेत. कानडी भाषा पटकन येते आणि ती शिकली तर त्यांना आवडते. तसे तमिळचे नाही. तुम्हाला तमिळ समजू नये अशी त्यांची इच्छा असते. जेव्हा आपले वाहन न वापरता राज्याच्या बस ने जावे लागते त्यावेळीही भारतातली एक नंबरची परिवहन व्यवस्था आहे हे जाणवते. त्यांना उपऱ्यांची सवय आहे .फारच छान वातावरण असते.
कोचि आणि तिरु॰पुरमही आवडले.
इंच
मी हे ऐकले आहे कि आकर्षक स्त्रीची फिगर ३६ -२४ - ३६ असते. त्यातला पहिला ३६ हा छातीचा असतो. ही मापे इंचात असतात. मी असेही ऐकले आहे कि ३६ इंच ही फिगर इर्ष्या करावी अशी (जास्त) आहे. वर मी असेही ऐकले आहे कि स्त्रीयांची छाती पुरुषांपेक्षा जास्त घेराची असते. मग ते मोदी छाती ५६ इंच कसे म्हणाले? इर्ष्यनीय स्त्रीपेक्षा २० इंच जास्त घेर? काही तांत्रिक चूक झाली आहे का?
----------------
(डिस्क्लेमर - तसा मी रेडीमेड कपडे घेतो. अन्यथाही टेलर कपडे शिवतो तेव्हा मी कधी मापे काय आहेत हे पाहिले नाही. चाची चारसो बीस मधे कमल हसन साईज म्हणून तब्बूला ट्रक नंबर सांगतो तशी हालत आहे.)
चिलखत
हाय-सेक्यूरिटी रिस्कवाले लोक बहुधा शर्टाच्या आतमध्ये सुरक्षिततेसाठी गोळीधोकामुक्त चिलखतासारखे काहीतरी घालतात. जयललितांचा काळा स्टोल किंवा तत्सम काहीतरी आठवतेय का?
त्यामुळे छातीचा घेर वाढतो पण तो इतका वाढत असेल असे वाटत नाही.
तसेही छप्पन आकड्याला अलंकारिक महत्त्व असावे. छप्पन भोग, छप्पन टिकली, अबतक छप्पन, 'तुमच्यासारखे छप्पन पाहिलेत' वगैरे.
जाता जाता : आकर्षक स्त्रीची फिगर ३६-२४-३६ असते असे नसून ३६-२४-३६ अशी फिगर असणारी स्त्री आकर्षक असते, असे असते.
५६ इंची छातीवाले नरपुंगव
>> स्त्रीयांची छाती पुरुषांपेक्षा जास्त घेराची असते. मग ते मोदी छाती ५६ इंच कसे म्हणाले? इर्ष्यनीय स्त्रीपेक्षा २० इंच जास्त घेर? काही तांत्रिक चूक झाली आहे का?
५६ इंची छातीचे काही नरपुंगव इथे पाहायला मिळतील :
Who can boast about a 56-inch chest?
या व्हिडिओचा काँटेक्क्ष्ट
या व्हिडिओचा काँटेक्क्ष्ट वेगळा आहे.
---------------------------
भारतातल्या वेगवेगळ्या रंगाचे लोक वेगवेगळ्या रेसचे आहेत असे म्हणता येते का?
------------------
एकाच पित्याची* एक मुलगी गोरी आणि एक काळी असेल तर गोरी मुलगी आवडणे पुन्हा रेसिस्ट?
================================
* म्हणजे मातापित्याची.
वर्णव्यवस्था, वसाहतवाद, इ.
>> भारतातल्या वेगवेगळ्या रंगाचे लोक वेगवेगळ्या रेसचे आहेत असे म्हणता येते का?
भारताच्या संदर्भात गोरेपणा आणि उच्चवर्णीयत्व ह्यांत संबंध असू शकेल. उदा. महाराष्ट्रात गोरी मुलगी ब्राह्मण असण्याची शक्यता अधिक असू शकेल. किंवा गोरेपणाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमागे एक वासाहतिक न्यूनगंडसुद्धा असू शकेल. शिवाय, पॉप्युलर कल्चरमध्ये गोरेपणाचा इतका उदोउदो केलेला असतो की लहानपणापासून काही गोष्टी मनावर बिंबल्या जातात त्यापैकीही ही एक असू शकेल.
वसाहतपूर्व
>> गोरेपणाचं फॅड किंवा आकर्षण याबद्दल वसाहतपूर्व काळातले काही सदंर्भ सापडतात का? म्हणजे हळद लावणं वगैरे गोर्या कांतिसाठी करतात अशी माझी समजूत आहे. ती प्रथा खूप जुनी आहे का?
माझा अभ्यास नाही, पण मुघलसुद्धा गोरे असावेत. त्यापूर्वी ग्रीकही आले होते. त्यामुळे सत्ताधारी गोरे असणं वसाहतपूर्व काळातही होत होतं. शिवाय, पंजाबी किंवा पठाण वगैरे लोकांतही गोरेपणा आढळतोच. त्यामुळे निव्वळ ब्रिटिशांच्या गोरेपणामुळे ती कल्पना अस्तित्वात आली नसावी. साहित्यात किंवा चित्रकलेत मात्र सावळ्या किंवा काळ्या रंगाचं चित्रणही सौंदर्यदर्शक म्हणून केलेलं आढळतं. सावळा कृष्ण, शिव, विठ्ठल वगैरे तर आहेतच. त्यामुळे बदल हळूहळू झाला असणार. आजही केरळ, आंध्र किंवा तमिळनाडूमध्ये गोरेपणाविषयी काय मत आहे हे मला ठाऊक नाही.
अंदाज
>> लातूर जिल्ह्यात लिंगायत आणि वंजारी मुली ब्राह्मण मुलींपेक्षा खूप गोर्या (आणि देखण्या) आहेत. काही काही ब्राह्मण तर प्रचंडच काळे आहेत. काही ब्राहमण गोरे देखिल आहेत.
काही ब्राह्मणेतर मुलींमध्ये गोरेपणा आढळू शकतोच. प्रश्न असा आहे, की गोरी मुलगी म्हटल्यावर ती उच्चवर्णीय असण्याची शक्यता वाढते का? उन्हाळी प्रदेशांत कष्टकरी जनतेत गोरेपणा कितपत आढळेल? दुसरं म्हणजे वंजारी मुली बाहेरून आलेल्या, म्हणजे पुन्हा एक्झॉटिक. ह्या एक्झॉटिकपणातही आकर्षणाचं मूळ असू शकेल.
गोरेपणाच्या श्रेष्ठत्वाच्या
गोरेपणाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमागे
आवड ही श्रेष्ठता निदर्शक असते का? मला आभाळाचा रंग निळा असतो (दिल्लीत काळा असतो ते सोडा) म्हणून लहानपणी निळा रंग प्रचंड आवडे. आता मला हिरवा रंग आवडतो. डिस्कवरीवर हिरवा पॅनोरमा पाहताना खूप आवडतं. यात श्रेष्ठत्व कुठून आलं?
दुर्दैवानं माणसांचे रंग फार सिमित आहेत. मग आहे त्यात आवडणारी रेंज गोरी असणं रेसिस्ट वा मागास वा ब्रेनवॉश वा तसलं कैतरी कसं होईल? पांढर्या (म्हणजे गोर्या) रंगाचंही सौंदर्यदर्शक म्हणून खूप अपिल असतं.
..अजो..आणखी एक उदाहरण
..अजो..आणखी एक उदाहरण पहा...नुकताच इथे अन्य धाग्यावर आलेला एक प्रतिसाद.
..वास न आवडणंही साधा सरळ चॉइस उरला नाही:
लिहिणार्या-वाचणार्या लोकांच्यात उच्चवर्णीयांचं प्रमाण जास्त असल्यामुळे असेल, किंवा सुकी मच्छी म्हटल्यावर तिच्या वासाच्या कल्पनेनंच ताबडतोब नाक मुरडण्याची फ्याशन आहे, त्यामुळेही असेल. पण या गोष्टींबद्दल कुठे वाचायला मिळत नाही.
नाक मुरडण्यावर ते कापण्याची
नाक मुरडण्यावर ते कापण्याची कारवाई करणे आणि त्या कारवाईचा हक्क कोणाला असणे यावर वरील विधान अवलंबून नाही. या गोष्टींचा परस्परसंबंध ध्यानात आला नाही.
अजोंनी विचारलेल्या प्रश्नाशी साम्य असलेला आणखी एक मुद्दा आढळल्याने तो अधोरेखित केला इतकंच.
सुक्या मासळीपैकी काही मासळीप्रकारांना येणारा वास काही प्रमाणात सडक्या वासाशी जोडला जाऊन किंवा अन्य काही कारणाने म्हणा, आवडत नाही, याचा थेट अथवा आडून संबंध उच्चवर्णीय असण्याशी आणि लेखनात वर्णन कमी येण्याशी लावला आहे.
उच्चवर्णीय म्हणजे कोण? कोंकणस्थ ब्राह्मण किंवा देशस्थ ब्राह्मण कदाचित मोठ्या प्रमाणात मासे खात नसतील. पण लेखकांपैकी कमी लोक मासेखाऊ आहेत का? पुलंच्या लेखनात पुष्कळ मोठा भाग खाद्यवर्णनांचा आहे. त्यात मासे पुरेपूर आहेत. दळवी आणि इतर अनेक उदाहरणं, अगदी तुलनेत गेल्या काही काळातले कणेकर इत्यादि लिहिणारे बरेच लोक मासेभक्त आहेत. त्यांनी सुक्या मासळीचं कितपत वर्णन केलंय मला माहीत नाही. पण मासे या प्रकाराचे अनंत उल्लेख त्यांच्या लेखनात वाचले आहेत. हे लेखक नवमासेखाऊ नसून पिढीजात मासे खात आलेले आहेत.
पण सुक्या मासळीची (परसिव्ह्ड) दुर्गंधी ही दुर्गंधी म्हणून आणि त्यामुळे एक नावड बाय चॉईस अशी एखाद्याच्या बाबतीत न राहता तिचा उच्चवर्ण आणि नाक मुरडणे (चव न बघताच विरोध करणे) असा संबंध तयार होतो.
मी स्वतः या सुक्या मासळीचे अनेक प्रकार खाल्ले आहेत, त्यातला एखाददुसरा प्रकार आवडलाही आहे. पण त्याचा वास न आवडणं ही गोष्ट किंवा पापलेटच आवडणं अन बांगडा न आवडणं ही गोष्ट गोरी त्वचा आवडणं यासारखी एक चॉईस म्हणून असू शकते. त्यामागे काही खास जातिवर्णसंबंधित कंडिशनिंगच असेल असं नाही.
याचप्रमाणे आणखी एका विषयाचा उल्लेख करता येईल. अपत्य म्हणून मुलगा असणं हे जास्त प्रिय असणं हाही अनेकदा एक सिंपल चॉईसचा भाग असू शकतो. पण जनरलाईज्ड दुरित सामाजिक परिस्थितीमुळे भारतात मुलगा असलेला जास्त आवडेल हेही इतरांप्रमाणे मुलगाच हवा (आणि मुलगी नकोशी आहे) असं ऐकलं जात असल्याने तो विचारच वाईट मागास इ ठरतो. त्या विचाराला एक जनरल चॉईस असण्याचा पर्यायच उपलब्ध नाही.
अपत्य म्हणून मुलगा असणं हे
अपत्य म्हणून मुलगा असणं हे जास्त प्रिय असणं हाही अनेकदा एक सिंपल चॉईसचा भाग असू शकतो. पण जनरलाईज्ड दुरित सामाजिक परिस्थितीमुळे भारतात मुलगा असलेला जास्त आवडेल हेही इतरांप्रमाणे मुलगाच हवा (आणि मुलगी नकोशी आहे) असं ऐकलं जात असल्याने तो विचारच वाईट मागास इ ठरतो.
च्यायला, बरं झालं ही वाक्यं तुम्हाला सुचली. मी खरोखरच या मानसिकतेची शिकार होतो. यापुढे मला मुलगा आहे हे अभिमानाने सांगेन. धन्यवाद गवि.
.
>> अपत्य म्हणून मुलगा असणं हे जास्त प्रिय असणं हाही अनेकदा एक सिंपल चॉईसचा भाग असू शकतो.
शक्य आहे. जोपर्यंत गर्भाचे लिंग तपासून मुलगी असल्यास गर्भपात करणे ते मुलगी झाल्यावर तिला हरप्रकारे कमी लेखणे किंवा संगोपनात हयगय करणे असे प्रकार होत नाहीत तोवर ते स्वीकार्यही असू शकते.
आज आपल्या शिक्षित सुखवस्तू वर्गात मोस्टली एकच मूल असण्याची पद्धत रुजत आहे. त्यात ज्यांना दोन मुले आहेत अश्या जोडप्यांपैकी बर्याच जणांना पहिली मुलगी असते असे एक मर्यादित निरीक्षण आहे. म्हणजे पहिला मुलगा असताना दुसरे मूल असलेली जोडपी तुलनेत पहिली मुलगी असताना दुसरे मूल असणार्या जोडप्यांपेक्षा सिग्निफिकंटली कमी आढळतील. अर्थात पहिली मुलगी असताना एकावर थांबणार्यांची संख्याही लक्षणीय आहे.
अवांतर: मासळीवरून उपक्रमावरील नेहमीची जुगलबंदी आठवली.
शक्य आहे. जोपर्यंत गर्भाचे
शक्य आहे. जोपर्यंत गर्भाचे लिंग तपासून मुलगी असल्यास गर्भपात करणे ते मुलगी झाल्यावर तिला हरप्रकारे कमी लेखणे किंवा संगोपनात हयगय करणे असे प्रकार होत नाहीत तोवर ते स्वीकार्यही असू शकते.
परफेक्ट..
पण वरीलपैकी काहीही न करता केवळ मुलगा झाल्यास जास्त आवडेल हा चॉईस मुलगी झाल्यास जास्त आवडेल या चॉईसइतकाच वैध असायला हरकत नसावी. दोन्हीपैकी काहीही होऊ दे, तंतोतंत एकाच लेव्हलची आवड असं प्रत्येक व्यक्तीचं असेलच असं नाही.
नंतर दोन्हीपैकी काहीही होणं आणि यथावकाश कालानुरुप नातं अधिकाधिक घट्ट होणं हे होईल. तसंच मुळात गोरा रंग फार आकर्षक वाटतो असं प्राथमिक मत असू शकतं. कर्मधर्मसंयोगाने सावळ्या स्त्रीशी संबंध आला आणि बराच काळ एकत्र व्यतीत केला की त्यांचेही अन्य पॅरामीटर्सवर नाते अधिक चांगले होईलच. पण मुळात बाकी कोणतेच गुण माहीत नसताना केवळ वर्णाबाबत बोलताना गोरा रंग काळ्यापेक्षा सुंदर वाटणे हा अॅबसोल्यूट चॉईस असू शकतो.
एखाद्या चालू ट्रेण्डबद्दल मत
एखाद्या चालू ट्रेण्डबद्दल मत - विरोधी वा बाजूनं - व्यक्त केलं की 'बघा, हल्ली हेही करायची सोय उरली नाही' असं लोक ओरडताना दिसतात. अरे बाबा, तुला हवं ते तू कर की. लोक काय ट्रेण्ड्स वाचतात, त्यानं तुला का फरक पडावा? पण छे, रामा शिवा गोविंदा.
त्या कोष्टकात बसणारा तुमचा प्रतिसाद होता म्हणून स्वच्छच विचारलं. बाकी जातीचा संबंध असेलच असं माझं म्हणणं नाही. पण 'सुक्या मच्छी'बद्दल मराठीतून इतकं प्रेमभरानं लिहिलेलं लिहिलेलं मी यापूर्वी वाचलेलंच नाही हे मात्र नक्की. त्याचा सध्या / पूर्वापार असलेल्या 'दुर्गंधीस नाक मुरडणे' फ्याशनीशी संबंध नाकारणार कसा?
असो. तुमच्या दुसर्या उदाहरणाखाली तुम्ही म्हटलं आहे 'त्या विचाराला एक जनरल चॉईस असण्याचा पर्यायच उपलब्ध नाही.' हे चुकीचं आहे. पर्याय कायमच उपलब्ध असतो. फक्त त्याबद्दल लोक काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करण्याचं धैर्य दाखवावं लागतं. नि हे कोणत्याही बाबतीत, कोणत्याही बाजूनं खरंच आहे. त्यामुळेच माझा तुमच्या तक्रारीच्या सुराला आक्षेप होता. तर पुन्हा, असो.
तुझं अगदी बरोबर आहे
तुझं अगदी बरोबर आहे तात्विकदृष्ट्या. माझा विरोध / तक्रारीचा सूर, हे काही असेल ते
त्याचा सध्या / पूर्वापार असलेल्या 'दुर्गंधीस नाक मुरडणे' फ्याशनीशी संबंध
या रचनेलाच आहे फक्त. मुळात दुर्गंधी म्हणताय आणि तिला नाक मुरडणे ही "फ्याशन" कशी ? पुन्हा ताबडतोब नाक मुरडणे असंही म्हटलंय. हळूहळू बराच काळ दुर्गंध नाकात घोळवून मग आरामात नाक मुरडावं का? ज्याचा वास कुजका येतो ते खावंसं न वाटणं हे साहजिक आहे, त्यात एकूण एखाद्या खाद्यपदार्थांच्या गटाला हिणवणे असंच नसतं. असो.
माझाही विरोध फक्त आणि फक्त टोनलाच आहे. लोक काय म्हणतात याच्याशी देणंघेणं नक्कीच आहे, पण त्यामुळे एखादी आवडनिवड बदलण्याइतकं ते देणंघेणं दाट नाही.
माझी शब्दयोजना चुकली. दुर्गंध
माझी शब्दयोजना चुकली. दुर्गंध म्हणायला नको होतं. 'गंधाला नाक मुरडणे' म्हणते.
तो गंध आहे की दुर्गंध आहे, हे आपापल्या कंडिशनिंगनुसार ठरतं. हे मागेही म्हटलं आहे, परत एकदा - तांदळाच्या पापड्या / फेण्या करायला तांदूळ भिजत घालतात त्याचा वास मला प्र चं ड आवडतो. लोकांना त्यानं ओकारी येते. आता हे लोक बहुमतात आहेत की नाहीत, त्यानं मला काय फरक पडतो? जोवर माझ्या तांदूळ भिजत घालण्यावर बंदी येत नाही, तोवर खुशाल नाकं मुरडा.
पण - 'असं नाक मुरडायची फ्याशन आहे. बहुतांशी फेण्या ठाऊक नसणारे देशावरचे लोकच अशी नाकं मुरडतातसं दिसतं' या निरीक्षणाला का बरं आक्षेप असावा? मी नाकं मुरडायला आक्षेप घेतलेला नाही, घेऊ शकत नाही. फ्याशनीबद्दल बोलतेय.
मी नाकं मुरडायला आक्षेप
मी नाकं मुरडायला आक्षेप घेतलेला नाही, घेऊ शकत नाही. फ्याशनीबद्दल बोलतेय.
हम करें सो प्रचंड आवड, वो करे तो नाक मुरडने की फ्याशन..
प्लीज प्रश्न वाईट घेऊन नको.. केवळ तात्विकच प्रश्न आहे. हातभट्टीचा वास घेतला आहे का? हातभट्टीचा वास आवडतो का ? वास घेऊन नाक सरळ ठेवता येईल ?
ती अमृताप्रमाणे असणारेही लोक आहेत. पण बरेचसे इतर लोक आणि विशेषतः त्या अमृत मानणार्यांच्या बायका त्या वासाने नाक मुरडतात. तीही फ्याशनच का?
आमच्या हपीसात काही लोक सुकी मासळी लंचबॉक्सात आणतात. इतर सर्व टेबल्सवरचे लोक (ब्राह्मण ऑर अदरवाईज) नाके रुमालात दाबून उमासे आवरत एकमेव असलेल्या भोजनकक्षात आपली जेवणे जेवत असतात आणि पटापट आवरुन तिथून बाहेर पडण्याचे पाहतात. मायक्रोवेव्हमधे त्यांनी टिफिन गरम केला की पुढे त्या सेशनला कोणीही त्या मायक्रोवेव्हमधे काही गरम करु शकत नाही.
तीही फ्याशनच का नाक मुरडायची?
मीही मस्त्याहारी आणि सर्वाहारी आहे, पण आय कॅन सी अँड फील इट. तुलाही ही जाणीव नक्की असेल असं गृहीत धरुन लिहितोय.
आऽहो! वाईट कशाला वाटून
आऽहो! वाईट कशाला वाटून घेत्ये...
पण हो, माझ्या मते फ्याशनच. इथे या विधानात, माझं मत सर्वाधिक महत्त्वाचं आहे. मी केलेलं मूल्यमापन चूक आहे की बरोबर आहे, वस्तुनिष्ठ आहे की अवास्तव आहे, लोकप्रिय आहे की लांछनास्पद आहे, ते महत्त्वाचं नाही. मी उदबत्तीचा वास घेऊन बरेचदा नाक मुरडते. उद्या कुणी ’हल्ली मेल्या पुरोगाम्यांच्यात उदबत्तीच्या वासानं उमासे आणण्याची फ्याशन आहे की काय जळ्ळी!’ असं म्हणालं, तर ते बरोबरच. कारण इथे मत महत्त्वाचं. पाठोपाठ साधारण किती लोकांना उदबत्ती त्रासदायक वाटते तेही महत्त्वाचं. उदबत्तीच्या वासानं खरंच ढवळतं का नाही, ते बरोबर की चूक, हे इथे महत्त्वाचं नाही.
**
बाकी या वादातून निघालेलं एक गंमतीदार निरिक्षण. लगेच ते अंगावर ओढून घेऊन तुम्ही आक्रमक होणार नाही, त्यामागचं सूत्र समजून घेऊ पाहाल, अशी खातरी आहे म्हणून इथे लिहायची हिंमत करतेय.
जोवर एक विशिष्ट गोष्ट बहुमतात असते, तोवर बहुमतातल्या लोकांना ते मत व्यक्त करणं अजिबात खुपत नाही. अल्पमतातले लोक शक्यतोवर बहुमताकडे काणाडोळा करून आपलं अस्तित्व टिकवत असतात. (तुमचंच हे हापूसचं उदाहरण इथे चपखल आहे.) मात्र एकदा का अल्पमतातले लोक बहुमताकडे झुकायला लागले / एका विशिष्ट ठिकाणी तरी त्यांचं बहुमत व्हायला लागलं (उदा. ऐसीवरचे शिंचे पुरोगामी) / त्यांचं मत जाणवण्याइतपत लोकांकडून ऐकू यायला लागलं - की लग्गेच त्याचा आधीच्या बहुमतातल्या लोकांना त्रास व्हायला लागतो. ’छ्या! काय हे... हल्ली मेलं आमचं ’बरोबर’ मत बोलून दाखवायची सोय उरली नै बॉ! लग्गेच जज करायला बसलेत लोक...’ असा ठणाणा त्यांच्याकडून सुरू होतो. (याची उदाहरणं अनंत. मुलींचं शिक्षण, पाचवारी पात्तळं, बायकांच्या नोकर्या, बायकांना मतदानाचा हक्क. झालंच तर ज्वालाग्राही आरक्षण. ऍट्रोसिटी कायदा. शोधावीत तितकी कमीच.)
यात चूक बरोबर काय ते ठरवणं व्यर्थ आहे. असं होताना दिसतं मात्र.
जोवर एक विशिष्ट गोष्ट बहुमतात
जोवर एक विशिष्ट गोष्ट बहुमतात असते, तोवर बहुमतातल्या लोकांना ते मत व्यक्त करणं अजिबात खुपत नाही. अल्पमतातले लोक शक्यतोवर बहुमताकडे काणाडोळा करून आपलं अस्तित्व टिकवत असतात. (तुमचंच हे हापूसचं उदाहरण इथे चपखल आहे.) मात्र एकदा का अल्पमतातले लोक बहुमताकडे झुकायला लागले / एका विशिष्ट ठिकाणी तरी त्यांचं बहुमत व्हायला लागलं (उदा. ऐसीवरचे शिंचे पुरोगामी) / त्यांचं मत जाणवण्याइतपत लोकांकडून ऐकू यायला लागलं - की लग्गेच त्याचा आधीच्या बहुमतातल्या लोकांना त्रास व्हायला लागतो. ’छ्या! काय हे... हल्ली मेलं आमचं ’बरोबर’ मत बोलून दाखवायची सोय उरली नै बॉ! लग्गेच जज करायला बसलेत लोक...’ असा ठणाणा त्यांच्याकडून सुरू होतो. (याची उदाहरणं अनंत. मुलींचं शिक्षण, पाचवारी पात्तळं, बायकांच्या नोकर्या, बायकांना मतदानाचा हक्क. झालंच तर ज्वालाग्राही आरक्षण. ऍट्रोसिटी कायदा. शोधावीत तितकी कमीच.)
यात चूक बरोबर काय ते ठरवणं व्यर्थ आहे. असं होताना दिसतं मात्र.
अय्यो रामा..थांब. वाचतोय.. डायग्राम काढून बघतो. नीट लाईन लागली की परत येतो. तोसवर कोल्ड्रिंक घेऊ. पीस.
आरामात. सॉरी हां, जरा
आरामात. सॉरी हां, जरा कंन्फ्यूजिंग लिहिलं गेलं आहे.
पण त्या निरिक्षणातल्या विरोधी बाजू एकच एक असतात असं मानायची गरज नाही. हॅना आरेण्ट नावाचा सिनेमा पाहिला आत्ता पिफमध्ये. ज्यूवधाच्या पापासाठी एकाच एक नात्झी अधिकार्याला जबाबदार ठरवता येणार नाही, असं म्हणणारी आरेण्ट अल्पमतात होती आणि तिचा आवाज बंद केला पाहिजे असा गदारोळ करणारे तिचे विरोधक तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी पुरोगामी. त्यामुळे कुणीही कुठल्याही बाजूला असू शकतं याचं भान असलेलं बरं. मेकॅनिझम साधारण असं दिसतं इतकंच.
या सर्वाचा मूळ छुपा उद्देश
या सर्वाचा मूळ छुपा उद्देश असा आहे की मेघना मला लुईसवाडीतल्या कोणत्याश्या प्रसिद्ध चारटेबली मासळीहॉटेलात उदारपणे पार्टीसाठी घेऊन जाणार आहे तेव्हा तिने सुक्या मासळीचे काही न मागवता पापलेट सुरमई आदि ताजी मासळीच मागवावी अन खिलवावी. तदनुषंगिक खिशाला ड्यामेज कितपत त्याचा हिशेबही तिला आधीच करायला बरे पडावे म्हणून.
छान प्रश्न
गोरा रंग आवडणे रेसिस्ट असते काय? मला मनापासून गोर्या बायका आवडत असतील तर मी रेसिस्ट (आणि/किंवा) सेक्सिस्ट ठरतो काय? आणि असे* असेल तर त्यावर उपचार काय?
फारच छान प्रश्न आहे.
मुळात एखाद्याला गोरा रंग आवडतो म्हणून तो रेसिस्ट वा "रंगभेदी" ठरू नये. मात्र तो रंग आवडण्यामगचे कारण त्याला रेसिस्ट वगैरे ठरवण्यासाठी पुरेसे असु शकते.
उदा. एखाद्याला गोर्या रंगाच्या व्यक्ती आवडण्यामागे वांशिक "भेसळ" नसणे हे कारण/समज असेल (उदा. गोरे-घारे-टकलु कोकणस्थ हे अधिक प्युअर ब्रीडचे किंवा हिटलरने प्युअर जर्मन शोधायच्या कसोटीवर जसे नीळे डोळे, भुरे केस वगैरे गोष्टींचाही समावेश केला होता) तर तो रेसिझम होऊ शकतो.
दुसरे असे "आवडणे" म्हणजे कोणत्य पातळीवर म्हणताय त्यावरही अवलंबून असावे. निव्वळ जैविक आकर्षण की इतर कारणांसाठी आवडणे त्यावरही तुम्ही (अॅज इन तुम्ही - अजो - असे नाही, जनरल तुम्ही -म्हणजे कोणीही) रेसिस्ट आहात की नाही यावर काही भाष्य करता यावे.
==
या निमित्ताने माझ्या एका खूप जुन्या ललित लेखाची आठवण झाली.
आता तो लेख बेतास बात वाटत असला तरी तेव्हा आवडला होता :)
===
या व्यतिरिक्त रंग आणि त्या योगे येणारे समज आणि एकुणच रंगाचे स्वातंत्र्य यावर F-1/105 हे प्रायोगिक नाटक अतिशय छान आहे
छ्या
सोबो इ़ज़ नो मोअर अ हॅपनिन्ग प्लेस नौ. हिरानन्दानी पवई मस्त आहे. सेन्ट्रल-वेस्टर्न दोन्ही जवळ शिवाय गार्डन शिवाय पवई तलाव शिवाय उरलीसुरली टेकडी शिवाय मोठी हॉटेल्स शिवाय फॉरिनरांचे दर्शन शिवाय आय्टी शिवाय आयाय्टी (कुणी विद्यार्थी नातलग असेल तर त्याला सोयीचे.)शिवाय सीप्झ्स सगळंच सोयीचं.
अवांतर
सोबो इ़ज़ नो मोअर अ हॅपनिन्ग प्लेस नौ
फार्फार वर्षांपूर्वी, आफ्टरनून डिस्पॅच अॅन्ड कूरियर मध्ये बिझिबी (बेहराम कॉन्ट्रॅक्टर) यांचे स्फूट वाचल्याचे आठवते -
उपनगरातील एक माणूस रात्रीच्यावेळी ओवल मैदानाकडे पाहात विचारतो, "दिवसा इथे गाई-गुरे चरत असतील नाही?"
बिझिबी चकित होऊन, "अरे बाबा, हे फोर्ट आहे. अख्या भारताची आर्थिक राजधानी. गाय-बैल तुमच्या उपनगरात. इथे नाही. हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे!"
...
...
(पुढचे सगळेच आता आठवत नाही. पण सारांश असा की, (त्याही काळात) रात्री उपनगरे फुललेली असत तर फोर्ट एखाद्या खेडेगावाप्रमाणे सूस्त!)
पिंजर्यातला पक्षी
पोपट वगैरे पक्षी इवल्याशा दोन वीत उंचीच्या पिंजर्यात ठेवणं कायदेशीर आहे का ?
.
.
शिवाय हे असं ठेवण्यामागे नक्की भूमिका काय असते ? फक्त मनोरंजन होतय किम्वा ठेवायला बरं वाटतय म्हणून घरातल्या पिंजर्यात एक जीव टांगून ठेवायचा ?
मला हे अतिशय क्रूर वाटतं. समुद्रावर नाव घेउन जाणारे कोळी जाळं टाकून माशांना पकडतात, पण त्याबद्दल काही शंका किंवा प्रश्न नाही.
अन्न म्हणून तुम्ही मासे गोळा करत आहात. त्यामुळे एकूणच "मांसाहार व्हर्सेस भूतदया" हा नेहमीचा मुद्दा आता मांडत नाहिये.
माझी शंका थोडिशी वेगळी आहे.
पक्ष्याचा आख्खा जन्म पिंजर्यात घालवणे हे क्रूर नाहिये का ?
त्या पिंजर्यात तो पक्षी एका दांड्यावर बसून असतो. त्याला पुरेसे पंख हलवता येत नाहित. फारशा हालचाली करता येत नाहित.
स्वतः एकाच खुर्चीवर सतत काही तास न हलता बसण्याची कल्पना करुन पहा. किंवा दोन्-चार दिवस नुसतच एका जागेवर उभं रहायला लागलं तर कसं वाटेल
हे कल्पून पहा. किंवा आपण असं मानू की हलायला फिरायला पुरेशी जागा आहे अशा ठिकाणी तुम्हाला कोंडून ठेवलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल.
एका आठ बाय दहा फुटाच्या खोलीत तुम्हाला कोणी कित्येक वर्षांसाठी बंद करुन ठेवलं तर ?
हो. अगदि खाणं - पिणं व्यवस्थित मिळेल तिथे तुम्हाला. अशा ठिकाणी बंद करुन ठेवलं तर ?
किती वर्ष...वर्ष सोडा हो; किती तास मानवू शकेल हा प्रकार तुम्हाला ?
.
.
पिंजर्यातले पक्षी पाळून पुन्हा वर कोणी "मला पक्षी खुप खुप आवडतात" असे म्हणू लागला तर आश्चर्य वाटते.
अरे गृहस्था, तुला खरच पक्षी आवडतात ?
कायदेशीर
कायदेशीर नसेल तर राजरोस दुकानं कशी सुरु असतात ?
नळ स्टॉपहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाताना म्हात्रे पुलाच्या अलिकडे अगदी मुख्य रस्त्यावरच पक्षी विकण्याचे दुकान आहे.
पिंपरी-चिंचवड लिंकरोडवरही एक दुकान मेन रोडवरच आहे.
रविवार पेठेतही कोठेतरी पाहिलय.
कायदेशीर नसेल तर इतकं उघड चाललं नसतं, असं वाटतं.
बातमी वाचली
बातमी वाचली. केस टाकावी लागली म्हणजे कायद्याबद्दल स्पश्टता नसावी, असा अंदाज आहे. शिवाय निर्णय गुजरात हायकोर्टाचा आहे. महाराश्ट्रात तो जशास तसा लागू होतो की नाही कल्पना नाही. आता पुन्हा त्या पक्ष्यांच्या दुकानाच्या एरियात गेलो की फोटो काढून ठेवतो दुकानाचे.
मीही मिपा आणि ऐसी हे दोन्ही
मीही मिपा आणि ऐसी हे दोन्ही ट्याब उघडून ठेवतो आणि वेळोवेळी दोन्हीकडे शिंतोडे उडवत बसतो.
मायबोलीचा इंटरफेस मला फेस आणतो, म्हणून तिथे जात नाही.
उपप्रश्नः ऐसी, मिपा आणि माबो वगळता इतर "डिस्कशन बोर्ड" टैप मराठी संस्थळ आहे का? (थंडगार मनोगत, वाचनमात्र उपक्रम, कभी-हां-कभी-ना मीम हे धरत नाही.)
वाचकाचे मनोगत
तेच तेच लेखक वेगवेगळ्या साईट्स वर (तेच तेच ??) लेखन करताना दिसतात व इकडच्या लिन्का तिकडे टाकत एकमेकाञ्च्या उखाळ्या पा़खाळ्या काडण्यात खुश दिसतात. लेखकान्चा एक वेगळा वर्ग एकमेकान्ची स्तुती करताना थकत नाही. आमच्या सारख्या भैताडान्ना काही कळते काही कळत नाही.
भै.
अजुन एक प्रश्न आहे. चंद्र हा
अजुन एक प्रश्न आहे. चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ आहे हे माहीत होते कारण दोघे क्षीरसागरातून, सागर-मंथनाचे वेळी निघाले.
पण खालील श्लोकात, शुक्रास, लक्ष्मीचा भाऊ का म्हटले आहे?