बटाटावडा

बटाटे वडे आपण सगळेच जण घरीदारी खात आणि करत असतोच, त्यात नवीन असे काहीच नाही. तरीही प्रत्येक ठिकाणची खास चव जिभेवर असतेच, विशेषतः गाडीवरच्या वड्याची.. आणि घरी तस्सा वडा होत नाही असे सगळेच हळहळतात आणि पावलं परत एकदा नाक्यावरच्या गाडीवर नाहीतर टपरीवर वळतात. पण काही वेळा आणि ठिकाणे अशी असतात की तेथे अशा वडापावच्या गाड्या,टपर्‍या नसतात,:( मग वड्याची तल्लफ भागवायला बटाटे उकडत ठेवावे लागतात आणि खाताना परत तेच.. तस्सा वडा नाही झाला..
म्हणून एकदा आमच्या खास आवडीच्या वड्याच्या मालकाला त्याची कृती विचारली आणि तेव्हापासून 'घरी तसा वडा नाही होत..' अशी हळहळ संपली एकदाची..
(ज्यांना नाक्यावर, कोपर्‍यावर जाऊन चटकन वडापाव खाणं सहज शक्य आहे अशांनी पुढचे नाही वाचले तरी चालेल.. Smile )
साहित्य-वड्यांसाठी:
५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे,
४ ते ५ लसूणपाकळ्या,
२ पेरं आल्याचा तुकडा,
३/ ४हिरव्या मिरच्या (मिरच्यांच्या आणि तुमच्या प्रकृतीनुसार प्रमाण कमी जास्त करु शकता)
कढिपत्त्याची २-४ पाने,
फोडणीचे साहित्य
मीठ
वरच्या कव्हरसाठी:
डाळीचे पीठ (बेसन), थोडा ओवा, थोडे तिखट, हळद, चवीनुसार मीठ
तळणीसाठी: तेल
बटाटे उकडून घ्या, साले काढून कुस्करुन घ्या.
आले+ मिरची+लसूण यांचे वाटण करुन घ्या.
नेहमीसारखी फोडणी करुन त्यात कढिपत्ता घाला व आले, मिरची व लसणीचे वाटण घाला. परता.
कुस्करलेल्या बटाट्यांवर ही फोडणी ओता, चवीनुसार मीठ घाला व कालवा.त्याचे वडे करा.
डाळीच्या पिठात ओवा,मीठ, हळद, तिखट घाला व घट्ट सर भिजवा. (पीठ घट्ट भिजवले की वड्याचे कव्हर गाडीवरच्या वड्यासारखे होते.)
तेल तापत ठेवा व एक चमचाभर मोहन डाळीच्या पिठात घाला.
तेल तापले की वडे पिठात बुडवून काढा व तेलात घाला व तळा.
आता वाट कोणाची पाहता?
चटणी बरोबर हादडा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

एकदम पोटभरू डिश. आजकाल हाटेलात फक्त बटाटेवडे हा पदार्थ मिळत नाही. जो वडा मिळतो तो वडापाव वाला वडा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

फर्मास दिसताहेत वडे!
[कल्याणच्या खिडकी वड्यांची रेसिपी का? की कुंजविहार/राजमाता? :)]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चटकन वडापाव खाणं सहज शक्य असुनही पाकृ वाचली Smile

मी कधीतरी रुचीपालट म्हणून बटाट्यांसोबत बारीक चिरलेला कांदाही घालतो आणि मग फोडणी देतो.
शिवाय फोडणीत कडीपत्ता चुरून घालतो. म्हणजे मधेमधे तोंडात येत नाही आणि चवही मस्त लागते.
या शिवाय क्वचित चवीत वेरीएशन म्हणून कधी फोडणीत कोथिंबीर घालतो तर कधी मेथीचे दाणे घालतो. कधी बटाट्यांसोबत थोडासा (वास येण्यापुरता) पुदीना घालतो. प्रत्येकाचा स्वाद, वास वेगळा असल्याने वडे नेहमीचेच असले तरी त्या त्या काँबिनेशनची वेगळी मजा येते.

अवांतरः वडे जरा गोरे गोरे दिसताहेत Wink जरा जास्त तळायला हवे होते असे वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गेले चार दिवस आंतरजालापासून सक्तीचा सन्यास घेतला होता. पण ही चमचमीत पाककृती पाहून सगळं वैराग्य संपलं. मी करायचो ते वडे नेहमी चांगले लागायचे, पण अगदी बाजारातल्यासारखे कधीच लागत नसत. बाजारातल्यासारखे म्हणजे दादर स्टेशनजवळ आयडीयलच्या शेजारी असलेला वडेवाल्याचा स्टॉल. त्या दुकानाचं नाव श्रीकृष्ण का काहीतरी असलं तरी मी लहानपणापासून ओळखतो म्हणजे मंजू वडेवाला म्हणून. त्यांच्याकडे वड्याबरोबर मीठ लावलेल्या मिरच्या मिळत. वाफेने तोंड भाजणारा ताजा वडा आणि त्याबरोबर खारट तिखट मिरच्या खाऊन मग त्यावर चहा पिणं म्हणजे स्वर्गसुखच.

स्वातीताईंनी थंडीचा मोसम वाफाळ, चमचमीत, मसालेदार करण्याचा चंगच बांधलेला दिसतोय.

ऋषिकेश - ते फोटो पांढरट दिसतात याचं कारण बहुतेक ट्युबलाईटसारख्या निळसर प्रकाशात फोटो काढले हे असावं. फ्लॅशने फोटो काढले की सुद्धा असा परिणाम होऊ शकतो. स्वातीताई, पिकासा किंवा इतर कुठल्यातरी सॉफ्टवेअरमध्ये फोटो उघडून कलर सॅच्युरेशन वाढवा, की वडे आणखीनच सुंदर दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल रात्री हा धागा पाहून आजच गरमागरम वडे हादडले
डायटप्लानची ऐशी की तैशी

मुंबैत मिळणारा अशोकचा वडाही फेमस आहे
श्रीकृष्णवाला वड्यासोबत भज्याचा चुरा देतो
दिवाडकरही प्रसिध्द आहेत वड्यासाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्त आहेत हो वडे. आमच्या ऑफिसातील क्यांटिनात सोमवारी सकाळी मिळतात. आता वाट पाहणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाखा