पुन्हा विचार करतांना
लेणी खोदणार्या
लोकांना सोडून काहीच
मानवी भौतिक वास्तव नसतांना
गाळलेली जागा
म्हणजे संवादाचा एक प्रकार
अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न.
तोतया कविता लिही
वाचका कविता वाच
वाच का कवि तावाच
वाचकाक विता वाच
वाच काकवी तावाच
वा चकाक वितावाच
पृथ्वी अजून ४-५ अब्ज वर्षांनी नसेल.
सूर्यही मग रेड जायंट बनल्यावर
शेवटी एक बटुकनाथ तारा बनून विझून जाईल.
मग एके दिवशी कोणीच नसेल-लिहायला किंवा वाचायला.
त्यापेक्षा हे बरं.
वाचका कविता वाचवाच का कवि
वाचका कविता वाच
वाच का कवि तावाच
वाचकाक विता वाच
वाच काकवी तावाच
वा चकाक वितावाच
भयंकर आवडल्या गेलेला आहे हा प्रकार. याला चरणयमक असे म्हणतात. पंडित काव्यांत याची उदाहरणे आहेत, उदा.
पायां न मी देइन वंश सारा, पायां नमी दे इनवंश सारा |
अजून उदाहरणे नक्की आहेत, पण आठवत नाहीत. पाहून सांगतो.
याचीच नक्कल पुलंच्या गाळीव इतिहासात एक अप्रकाशित आर्या या नावाने आहे.
"कखगघङटठडणम वर्णमाला | कखगघ ङटठडणम वर्णमाला |
कख गघङट ठडणम वर्णमाला | कख गघङटठडणम वर्णमाला |" इ.इ.
याचाही बाप म्हणजे प्रतिलोम यमक. श्लोकाच्या चार ओळींपैकी पहिली ओळ उलटी केल्यास तिसरी ओळ अन दुसरी ओळ उलटी केल्यास चवथी ओळ, उदा.
वीराजते मत्त उदार पाहे
वीरा धरी शक्ति शराव साहे
हे पारदा उत्तम तेज रावी
हे सावरा शक्ति शरी धरावी || इ. अर्थ विचारू नका. मला माहिती नाही आणि सारस्वतकारांनीही त्या नागेश की विठ्ठल नामक कवीला या काडेकरूपणाबद्दल झाडला आहे.
हा असला प्रकार संस्कृतातहि आहे. विलोमकाव्य या नावाने. एक ओळ नेहमीसारखी वाचली तर रामाचे अन उलटीकडून वाचली तर कृष्णाचे वर्णन. रामकृष्णविलोमकाव्यम् या नावाने ते स्तोत्र फेमस आहे. ढवळे प्रकाशनाने प्रकाशित केलेले.
काय सुंदर प्रतिसाद आहे.
काय सुंदर प्रतिसाद आहे.
http://www.manogat.com/node/2341 - येथे काही अलंकारांची उदाहरणे सापडतील.
म्हंजी काय दादा....?
म्हंजी काय दादा....?