Skip to main content

रमा

२०११ साली सुचलेली व अन्य संस्थळावर आधीच प्रकाशित झालेली ही कविता -

समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली. कौस्तुभ मणी, पारीजातक, कामधेनु गाय, अमृत , ध्न्वंतरी, वीष, चंद्र वगैरे वगैरे. पैकी लक्ष्मी ही देवी सुद्धा या १४ रत्नांतच गणली जाते. ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).


कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.
पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना
जिचा अनुज असे चंद्रमा,
अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.

चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

मिहिर Mon, 09/03/2015 - 18:52

In reply to by वृन्दा

अन म्हटलं अरेच्च्या कोणी माझं पासवर्ड क्रॅक केलय की काय?

काळजी नसावी. तुमच्या खात्याचा पासवर्ड क्रॅक करायचे एखाद्याने ठरवले, तरी तो तुमचे खाते नक्की कोणते हे न कळल्याने बेत रद्द करेल!

वृन्दा Wed, 04/03/2015 - 22:19

कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).

पण अर्थातच धनंजय किंवा अन्य कोणीही सदस्यांनी जर मीटरमध्ये बसवली किंवा सुधारली तर आनंदच होईल.

'न'वी बाजू Thu, 05/03/2015 - 10:51

In reply to by वृन्दा

फुटात बसवली तर चालेल काय?

काय आहे, अमेरिकेत मेट्रिक पद्धत प्रचलित नाही, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नसावी. त्यामुळे, मापालासुद्धा मीटर मिळणे दुरापास्त. म्हणून विचारतोय.

पिवळा डांबिस Thu, 05/03/2015 - 01:58

तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे

विष्णू वरमाला घालून घेण्यासाठी घाईघाईने रस्त्याकडेच्या पेड पार्किंमघ्ये गरूड पार्क करून आला आहे आणि म्हणून लोकांना मीटरकडे दुर्लक्ष करायला सांगतो आहे असं चित्रं डोळ्यापुढे उभं राहिलं!!!
:)

पिवळा डांबिस Thu, 05/03/2015 - 02:12

In reply to by वृन्दा

=))
नाय हो, उलट तुमचं एक पार्किंग तिकिट वाचवलं!!!

बाकी ही कविता कुठेतरी ओळखीची वाटते आहे.
मिपावर टाकली होती का याआधी?

गवि Thu, 05/03/2015 - 11:04

ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).

हे राम.. आय मीन हे रमा..

सुंदर मुलगी जरा आत्ता कुठे प्रकट झाली नाही झाली की लग्गेच तिला वर शोधून कोणाच्यातरी गळ्यात बांधायची नुस्ती घाई.

अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.

चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

चला.. वठणीवर आणली एकदाची बाई(च्या जाती)ला.

अमुक Thu, 05/03/2015 - 21:46

धागाशीर्षक वाचून 'ऐसी..'च्या जुन्या सदस्या रमाबाई कुरसुंदीकर परतल्या की काय असे वाटून गेले. :)

वृन्दा Thu, 05/03/2015 - 22:28

In reply to by आदूबाळ

होय त्याच. तीच शैली होती त्यांची. मस्त मजा यायची. नेफळे-कुरसुंदीकर शुभ लाभ इथेही घेता येऊ देत हीच सदिच्छा ;)

अजो१२३ Sat, 07/03/2015 - 14:52

शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

इथल्या स्त्रीवादी ब्रिगेडच्या नजरेतून सुटलात कशा? कि ते चंद्रशेखर आझादांसारखं - 'ब्रिटिशांचा शिपाई असला तरी त्याला मारू नका. तो भारतीय आहे शेवटी.'?