अनेस्थेशिया
सायली
तू......अनेस्थेशिया सारखा
अंगभर पसरत जाणारा
आत आत खोलवर
सार्या जगाचा विसर
आणि पूर्णपणे स्तब्ध झालेला काळ
फक्त मी माझी
आणि तू बरोबर
माझ्याकडे बघत!
काही कळत नाही
भविष्य भूत सार रिकाम
वर्तमानाचा आभासही नाही
कुठेय मी कळत नाही..
... पण तू बरोबर
माझा हात हातात घेऊन
..अनेस्थेशिया!
शांत आहे मी
विचारच नाहीत
सगळ कोर...शांत...निश्चल
कशाशीच संबंध नाही
फक्त आपण दोघे.
....आणि तू...
चढलेल्या अनेस्थेशिया सारखा
..............गात्रभर......!!!!
साईड इफेक्ट
आणि अॅनेस्थेशियाचे तेच ते साईड इफेक्ट
मळमळणे, उलट्या आणि कॉय कॉय!