Skip to main content

मोठी

आता तू मोठी झालीस
ऐक नीट
जोरात बोलायचं नाही
जोरात हसायचं नाही
नीट बस गं.
नीट कपडे घालायचे
फार कुठे बोलायचं नाही
तरीही काही झालंच "तसं"
शु SSSSSSSSSSSSSS
कोणाला सांगायचं नाही
अगदी स्वत:लाही नाही'
delete करून टाकायचं एकदम
शेवटी तुझं चांगलं तर हवय ना आम्हाला

("ती" एकच विचारते)
चांगलं म्हणजे नक्की काय ……?