कळीकाळानं असला कसला मौका साधला

कळीकाळानं असला कसला मौका साधला

कळीकाळानं असला कसला मौका साधला
व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ||

बाप तू रं आमचा तूच आमची माय
दूध बी तूच आन तूच दूधावरली साय
कोना म्हनू आता आमी माय अन बाप
तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१||

न्हावूमाखू केलं तू रं
तूच घातलं खावू
तू न्हाई समोर आता
आमी कुठं पाहू
इस्तवात पडलो जवा
तवा तूच विझवाया आला ||२||
पुर्वप्रकाशित:शब्दगाऽऽरवा २०११

- पाभे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दूध बी तूच आन तूच दूधावरली साय

हे आवडलं.

कवितेत वृत्त थोडं सांभाळलं तर अधिक परिणामकारक होईल अशी खात्री आहे. उदाहरणार्थ

बाप तू आमचा आन तूच झाला माय
दूध तूच झाला तूच दुधावर साय
या दोन ओळी पुढच्या ओळीशी अधिक चांगल्या जमतात.
कोना म्हनू आता आमी माय अन बाप

एकंदरीत कविता कुठेतरी अपुरी राहिल्यासारखी वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद राजेशजी.
एका चित्रपटातील हे गीत आईविना असलेल्या लहान बहिणभावाच्या तोंडी आहे. आता त्यांचा बाप मेलेला आहे अन काय करावे या विवंचनेत ते आहेत.

>>>> एकंदरीत कविता कुठेतरी अपुरी राहिल्यासारखी वाटते आहे.
हे सुरूवातीचे गाणे आहे. त्यामुळे अपुर्ण राहणारच.

>>कवितेत वृत्त थोडं सांभाळलं...
रानात वाढल्येली लेकरं हायत ती. तेंला कोन्त वृत्त आन आलंकार गावत्याल वो? Smile

सुचनेबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही