'जंजिरे मेहरूब' आणि मी

मी असा मधोमध उभा आहे. काळ्याशार खडकावर पाय घट्ट रोवून. डाव्या बाजूला पाहिलं की शांत , निवांत किनारा. त्याच्यावरची चमचमती वाळू. उजव्या बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र. किनाऱ्याला समुद्राच्या अथांगपणाच आकर्षण तर समुद्राच्या लाटांना किनाऱ्याच्या पूर्णविरामाची असोशी.
गेली कित्येक वर्षं या खडकावर उभं राहून समुद्राची वेगवेगळी रूपं बघतोय मी. माझ्याच संगतीनं अजून एक जण असाच उभा आहे. थेट माझ्या नजरेसमोर काही मैलांवर. माझ्यासारख्याच एका काळ्याभोर खडकाच्या पाठीवर. माझ्याच नजरेसमोर बघता बघता उभा राहिला आणि मग मोठा झाला. कळत नकळत त्याचंच नाव सर्वांच्या मुखी झालं. आज कितीशे वर्षं झालीत अजूनही माझ्या नजरेसमोरून त्याच्या उमेदीची वर्षं हाटत नाहीत. जशा काळ्याशार बेटावर मी उभा आहे तसंच एक बेट माझ्या नजरेच्या टप्प्यात पण काही मैल अंतरावर होतं. लांबरुंद पसरलेल्या त्या बेटावर बघता बघता तो उभा राहिला.
मला आठवतं, त्याला बांधणीच्या मनसुब्याची खलबतं माझ्याच सदरेवर झाली. त्याच्या महाद्वाराची रचना, बालेकिल्ल्याच काम या साऱ्याचा मी साक्षीदार होतो. त्याच्या बांधकामाचं सगळं साहित्य गलबत भरून भरून माझ्या आवारात यायचं आणि मगच पुढे जायचं. शिसं वितळवून त्याचा पाय घातला गेलेला. भरभक्कम पायावर एकेक चिरा आणि घाशीव कातळ चढत गेले. माझ्या डोळ्यासमोर तो आकार घेत होता. त्याचं बांधकाम पूर्ण झालं. बुरुजांवर तोफा चढवल्या गेल्या. एका दिवशी त्याच्या उन्नत मस्तकावर मालकाचं निशाण उभं राहिलं.
बघता बघता त्याची कीर्ती वाढू लागली. माझ्या आजूबाजूचा प्रदेशही त्याच्याच नावाने ओळखला जाऊ लागला. तीस तीस पुरुष उंच लाटा अंगावर घेतानाचा त्याचा बेफामपणा, बुरुजावरच्या कराल तोफांमधून सुटणाऱ्या तोफगोळ्यांचा बेलगामपणा, त्याच्यावर डौलाने फडकणाऱ्या निशाणाचा तोरा याच्या चर्चा रंगू लागल्या. बघता बघता तो 'मोठा' झाला. त्याचं मोल वाढलं. तो आपल्याचकडे असावा अशा इच्छेपोटी त्याच्यावर सत्ताधीश चालून जाऊ लागले. पण तो मात्र अजिंक्य राहिला.आताशा त्याच्यावर फडकणारं निशाण त्याच्या मालकाची मक्तेदारी नाही तर त्याच्या अजिंक्यतेचा तोरा मिरवू लागलं. त्याच्या या साऱ्या आलेखाचा मी साक्षीदार होतो, अजूनही आहे.

बघता बघता डोळ्यांसमोर एखादा इतका मोठा होतो, नाव करतो, अजिंक्य राहतो आणि मग आभाळाच्याच नजरेला नजर देत दूरवर जाउन पोहोचतो. हे सगळं आपल्या आजूबाजूलाही घडत असतंच. राजकारणात, कॉर्पोरेटमध्ये, रोजच्या आयुष्यात… मी फक्त त्याच्या प्रवासाचा एक साक्षीदार ठरलो. बघता बघता तो 'जंजिरे मेहरूब' झाला आणि मी??… मी ही तसाच एक जलदुर्ग पण माझं नाव इतिहासातल्या कुठल्यातरी बखरीत कुठल्याश्या पानावर लिहिलंय. ना मी ते शोधायचे कष्ट घेत न इतिहास त्याविषयी फार काही बोलत. 'जंजिरे मेहरूब' सारखं कौतुक आमच्या नशिबी नाही.

कित्येकशे वर्षांपासून आम्ही असे एकमेकांसमोर उभे आहोत. 'जंजिरे मेहरूब' आणि मी. परवाच्याला एक समुद्रपक्षी त्याच्या अंगावरून उडत उडत आला आणि माझ्या ढासळत्या बुरुजावर येउन बसला. मी त्याला विचारलं, कसाय रे आपला 'जंजिरे मेहरूब'? तो म्हणाला, तुझ्यासारखाच. मी चपापलो. म्हटलं, म्हणजे ? तो समुद्रपक्षी म्हणाला, "म्हणजे ढासळते बुरुज, खचलेल्या भिंती, कलथून पडलेले दरवाजे…" मी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, "तरीही हा अजिंक्यच आहे. खचलंय त्याचं शेकडो वर्षांपूर्वीचं जुनं शरीर. पण कमावलेलं नाव मात्र अजूनही तसंच आहे. इतिहासाच्या पानांत, वर्तमानाच्या मनात आणि भविष्याच्या उदरात आमच्या ओळखी वर्षानुवर्ष कायम राहतील. तो… 'जंजिरे मेहरूब' आणि मी…. त्याचं आयुष्य पाहिलेला एक जलदुर्ग."

-अभिषेक राऊत.

(टीप: सदर लेख हा ललित लेख असून यातील ऐतिहासिक संदर्भ हे लेखाच्या सोयीनुसार वापरलेले आहेत.)

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

आवडला.

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, "तरीही हा अजिंक्यच आहे. खचलंय त्याचं शेकडो वर्षांपूर्वीचं जुनं शरीर. पण कमावलेलं नाव मात्र अजूनही तसंच आहे. इतिहासाच्या पानांत, वर्तमानाच्या मनात आणि भविष्याच्या उदरात आमच्या ओळखी वर्षानुवर्ष कायम राहतील. तो… 'जंजिरे मेहरूब' आणि मी…. त्याचं आयुष्य पाहिलेला एक जलदुर्ग."

जास्ती विचार करू नका. In the end, we are all dead.

Smile Smile

अभिषेक राऊत

वाह... रायता फैल गया. बहोत खुब.

actions not reactions..!...!

वाह राऊत जी छा गये आप. असे म्हणायचे आहे का? चुकून ते वेगळच लिहीलं गेलं आहे का?

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

रायता फैल गया अथवा रायगयाफैला दिया... हे उर्दु फ्रेजिंग आहे. दाद देण्यासाठी त्याचा वापर होतो. आणी मी लेखकाला फक्त दाद(च) दिलेली आहे.

रायता फैल गयाचा अर्थ तुस्सी छा गये.< असाच आहे. पण कोणाश्रोणीवर्तुळाने खोडसाळपणा करुन उगाचच "खोडसाळ" श्रेणी दिली आहे.

actions not reactions..!...!

असं आहे होय! मला वाटायचं कोशिंबीर सांडल्यावर "रायता फैल गया" म्हणत असावेत!

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हिंदी सोशल मीडियाशी अत्रस्थ जन्ता परिचित नाही असे म्हणायचे आहे का जॅकी भट्ट?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भट्टमॅन... आजकाल प्रतिसाद कोणाला लिहलाय हे समजुन घ्याय्चे देखील कष्ट होत नाहीत काय ? की खोडसाळ श्रेणी आपण दिली होती ? आल्याभट्ट आणी आपल्यात फक्त हाच फरक उरला आहे का ? म्हणजे आजकाल माझ्या प्रतिसादांवर हा खवचटपणा स्वतः हुन आपोआप की इतर कोणासाठी ?

बाकी अ‍ॅशचे कजरारे गाणे ज्यांनी ऐकले आहे त्यांना तरी हा मुहावरा नवीन नक्किच नसावा.

actions not reactions..!...!

वाह... रायता फैल गया. बहोत खुब.

ह्यातून नक्कि काय म्हनाय्चे आहे?

अभिषेक राऊत

उर्दुमधे रायता फैल गया... फैला दिया या फ्रेजिंगचा अर्थ "तुस्सि छा गये" अशी दाद देण्यासाठी केला जातो. ह्यातुन मला इतकेच म्हणायचे आहे की मि आपल्या लिखाणाला उस्फुर्त* दाद दिली आहे. लिखाणाचे कवतुक केले आहे.

* म्हणूनच भाषेचा मुलाहीजा न बाळगता. विषेशतः आपण जर टायटल मधे उर्दुचा वापर करणार असाल तर एखाद्याने प्रतिसादात अमराठी वापरली तर हरकत नसावीच नाही का ?

actions not reactions..!...!

रोचक!

ललित लेखन आवडले.

अजून येऊ द्या!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!