मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील. क्वचित असा एखादा असतो जो त्या कागदाला हातात घेऊन त्याला उलगडून पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कागदात काय लिहिले आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला पुन्हा त्याच्या हरवलेल्या पुस्तकात ठेवतो. रस्त्यात एखादा स्प्रिंग आणि स्पंज सापडला तर जरूर कुणीतरी त्याला दाबून बघतो. रस्त्यात दगड असला तरी कुणी सहसा त्याच्या वाटेला जात नाही!

समजा तुम्ही एकदा जगाला दाखवले की तुम्ही कुणालाही नेहमी खूश ठेवण्याचा प्रयत्न करता, मऊ आहात, स्पंज आणि स्प्रिंग आहात तर तुम्हाला सतत दाबून ठेवणारे लोक या जगात पुष्कळ मिळतील. पण जर जगाच्या दृष्टीने तुमची प्रतिमा स्प्रिंग अथवा स्पंज ऐवजी दगड अशी असली तर कुणी तुमच्या वाटेला जाईल का? नाही. कारण दगडाला स्प्रिंग सारखे दाबण्याचा प्रयत्न केला तर दाबणाऱ्याचा हात रक्तबंबाळ होईल तसेच दगडात इतरांचे रंग स्पंजासारखे शोषले जाण्याची शक्यता नसतेच!

नेहमी दगड बनावे असे नाही पण तुम्ही जर स्प्रिंग आणि स्पंज असाल तरी तुमची दुसरी बाजू मात्र विसरू नका.
म्हणजे कसे ते सांगतो. तुम्हाला माहीत आहेच की निसर्गनियमा नुसार म्हणजेच भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया असतेच! त्यानुसार स्पंज आणि स्प्रिंग याना "प्रतिक्रियेची" दुसरी बाजू असतेच.

त्यानुसार, दाबले जाण्याची दुसरी बाजू (गुणधर्म) त्याच तीव्रतेने उसळणे हीच असते. तुम्ही स्प्रिंग असाल म्हणजे सतत दाबले जात असाल (म्हणजे भावनांचे दमन, सतत फक्त इतरांच्या स्वार्थाचा विचार करणे, स्वत:चा विचार सोडून!) तर स्प्रिंग हा जास्त दाबल्यास उसळतो आणि दगडापेक्षाही जास्त इजा करतो हे मात्र लोकांना दाखवायला विसरू नका. एवढेही अपेक्षांचे ओझे आणि वजन मनाच्या स्प्रिंगवर ठेवू नका की तुम्ही तुमचा उसळणे हा गुणधर्म विसरून जाल किंवा तुमच्यात उसळण्याची ताकदच उरणार नाही.

तुम्ही स्पंज असाल तर लक्षात ठेवा की एवढेही स्पंज बनू नका की तुमच्यात शंभर टक्के फक्त इतरांचा रंग शोषला जाईल आणि तुमच्या स्वत:च्या रंगाला जागाच राहणार नाही. स्पंजाची दुसरी बाजू (गुणधर्म) सुद्धा लोकांना दाखवायला विसरू नका. म्हणजे वेळ पडल्यास पिळल्यानंतर एका क्षणात स्पंज हा स्वत:तले शोषलेले सगळे काही बाहेर टाकून रिकामा होवू शकतो हेही जगाला दाखवून द्या. स्पंजाला अशा प्रकारे रिकामा होण्यास मदत करणारा सव्वाशेर, म्हणजेच त्याला पिळून (चांगल्या अर्थाने!) रिकामा करणारा आणि त्यात स्वसामर्थ्याचे रंग भरणारा कुणीतरी असतोच आणि तो कधीतरी भेटतोच.

तुम्ही कोण आहात? दगड, स्पंज की स्प्रिंग? पण लक्षात घ्या की तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात!

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

मजेशीर आहे. पण शेवटचे वाक्य कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःच्या सुरक्षेपुरते दगड बना, इतरांना त्रास देण्यासाठी नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

तसं नाही हो स्पंज आणि स्प्रिंग मिळून दगडाला त्रास कसा देतील ते समजलं नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्प्रिंग उसळून त्रास देईल आणि स्पंज त्याला भेटणाऱ्या सव्वाशेराच्या (मित्र म्हणून) मदतीने!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

दगड त्यांचा बंदोबस्त नाही का करणार, स्वतः च्या ईतर दगड मित्रांच्या मदतीने . शिळा मैत्रिणही असेल त्याची मग स्प्रिंग आणि स्पंजचं काय होईल? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिळा मैत्रिणही असेल

या वाक्यात व्याकरणाची चूक नाही काय? 'जुही चावला'सारखी?

(बोले तो, हे वाक्य 'शिळी मैत्रीणही असेल' असे नको काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिळा = दगड हा अर्थ घेतल्यास चालून जावे. अर्थात तरीही वाक्यात शब्दांची ऑर्डर अंमळ गंडली आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खीळे होऊन लोकांच्या गाड्यांचे टायर पंक्चर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
हातोडे होऊन खिळ्यांना ठोकून काढा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाताशी हातोडा असला, तर अखिल विश्व हे खिळ्यासमान भासू लागते.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टोन पेपर सिझर...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी हेच्च लिहायला आलो होतो. बायदवे याची बिगबँगीय व्हर्जन "रॉक पेपर सिझर लिझर्ड स्पॉक" अशी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोडक्या काचेचा सिद्धांत
http://en.wikipedia.org/wiki/Broken_windows_theory

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला हे नव्हतं माहीत.
हे म्हणजे - A stitch in time saves nine.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हे नविन कळलं. विन्टेस्ट्रींग आहे. आपल्याकडचे मोठे गुन्हे वाढण्याचं मूळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोस्त से गम केहकर तो खुष हो (निमीष बाबु) लेकिन तुम ये क्या जानो,
तुम दिलका रोना रोते थे वोह दिलमे हसता होगा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ट्रकच्या मागे लिहिण्यायोग्यः

पत्थर बन, स्प्रिंग बन
लेकिन किसीका स्पंज मत बन

मूळः छुरी बन काटा बन
लेकिन किसीका चमचा मत बन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पंज सबकुच सोखता है..लेकिन वक्त आने पर सबकुच थूकता है.

साला एक पत्थर लॉरी को पलटा देता है..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0