हरिश्चंद्रगड १९७५

१९७५ साली मी आणि माझे मित्र श्री.विजय देव - गोनीदांचे जामात - असे दोघेजण एक रात्रभर हरिश्चंद्रगडावर राहिलो होतो. त्यावेळेस डिजिटल छायाचित्रण कोणाच्या स्वप्नात पण नव्हते. माझ्या साध्या कॅमेर्‍याने आणि रंगीत फिल्मवर मी जे काही फोटो काढले ते येथे दाखवीत आहे. ते आता चाळीस वर्षांचे जुने असल्यामुळे त्यांचे रंग उडाले आहेत.

आमच्या सहलीचे रसभरित वर्णन करण्याचा येथे हेतु नाही कारण ते जालावर पुष्कळ ठिकाणी मिळेल. आजहि बरेच उत्साही तरुण तेथे जात असतात. ४० वर्षांपूर्वी ती जागा कशी दिसत होती आणि आज कशी आहे अशी तुलना करून पाहण्याची कोणास इच्छा असल्यास त्याला उपयोगी पडतील अशा हेतूने ही छायाचित्रे येथे दाखवीत आहे. प्रत्येक चित्राच्यावर त्याचे त्रोटक वर्णन आहे.

मुख्य मंदिर आणि शिखर


गणपति


मंदिराच्या आतील एक विष्णुमूर्ति


आवारातील वीरगळ



पुष्कळ जुन्या गावांमधून आणि मंदिरांजवळ असे वीरगळ दिसतात. केव्हातरी जुन्या काळात युद्धात पडलेल्य कोणा अनाम वीराचे हे स्मारक. ह्यावर ते स्मारक कोणाचे आहे अशा स्वरूपाचा काहीच उल्लेख नसतो. त्यावरील शिल्पकामहि एकाच प्रकारचे असते. सर्वात वर तो वीर आणि त्याची पत्नी स्वर्गामध्ये शंकराची पूजा करीत बसलेले दिसतात. मधल्या पातळीवर तोच वीर कोणाशीतरी झुंजतांना दिसतो. सर्वात खाली त्या वीराने आपले पृथ्वीवरचे आयुष्य ईश्वराची भक्ति करण्यात घालविले असे दाखविणारे काम असते.

मंदिरासमोरील पुष्करिणी आणि मूर्तींसाठी जागा



मंदिरासमोर एक बांधीव पण आता बरीच पडझड झालेली पुष्करिणी आहे आणि तिच्या चारी बाजूंनी अनेक कोनाडेवजा जागा आहेत. देवादिकांच्या मूर्ति ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा. आम्हांस मात्र ते सर्व कोनाडे मोकळेच दिसले.

मंदिराभोवतालची ओवरी



मंदिराभोवती ओवरी आहे. त्यातीलच एका खणात आम्ही रात्रीचा मुक्काम केला. त्या मुक्कामाची एक मजेदार आठवण. आम्ही वर जातांना एकदोन भांडी, डाळतांदूळ, फोडणीचे सामान आणि डाळीचे पीठ नेले होते, अशासाठी की वर स्वहस्ते खिचडी किंवा पिठलेभात करून खाता यावा. वर कसलीच वस्ती नाही आणि चिटपाखरू नाही. सर्वात जवळ म्हणजे डोंगर उतरल्यावरचे गाव. आसपासच्या टेहळणीत विजयरावांना गचपणामध्ये राजगिर्‍याची झुडुपे दिसली आणि त्यांनी जाहीर केले की मी आता ह्या राजगिर्‍याची परतून भाजी करणार. वस्तीपासून दोनचार मैल दूर डोंगरावर कुठलातरी रानपाला खाणे मला धोकादायक वाटत होते आणि मी तसे सुचवूनहि पाहिले. पण त्यांच्या दृढनिश्चयापुढे माझा विरोध टिकू शकला नाही. परिणामतः अतिशय रुचकर अशी राजगिर्‍याची भाजी मला मिळाली.

जवळच्या लेण्यातील गणपति



देवळाबाहेर आसपासच्या खडकांमध्ये काही ओबडधोबड लेणी आहेत आणि त्यांमध्ये काही अस्पष्ट शिलालेखहि आहेत. पैकी 'चांगा वटेश्वराचा' असा एक लेख आम्ही प्रयत्नपूर्वक वाचला. ज्ञानेश्वरांचा समकालीन चांगदेव योगी ह्या डोंगरावर राहात असे असे ह्या संदर्भात मी वाचलेले आहे. अशाच एका लेण्यामध्ये ही महाकाय गणपतिमूर्ति आहे.

पश्चिमेचा कोकणकडा १


पश्चिमेचा कोकणकडा २


परतीच्या वाटेवरून मंदिर


खिरेश्वराचे मंदिर


मंदिरातील शेषशायी विष्णु



ही अखेरची दोन चित्रे मी आदल्या दिवशी डोंगर चढायला सुरुवात करण्यापूर्वी मी घेतली होती पण ती येथे अखेरीस दाखवीत आहे. डॉगराच्या पायथ्याशी खिरेश्वर नावाचे एक कुग्राम आहे. हे नाव गावात शिरतांना लागणार्‍या खिरेश्वराच्या मंदिरावरून पडलेले आहे. मंदिर अगदी छोटे - एक मंडप आणि छोटा गाभारा - आहे. बाहेरून त्याची बांधणी ह्या भागातच आढळणार्‍या अन्य मंदिरांसारखीच - उदा. कुकडेश्वर - आहे. ते शिलाहारकालीन असावे असा तर्क मी वाचला आहे. आम्ही पाहिले तेव्हा मंदिर उभे होते पण त्याची बरीच पडझड झाली होती. बाहेरून साधे दिसणारे मंदिर आत नाना शिल्पांनी गजबजलेले आहे. संपूर्ण छतावर सुमारे एक फूट चौरस आकाराचे आणि पानाफुलांच्या वेगवेगळ्या नक्षीने सजविलेले दगड जडविले आहेत. गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर ५' गुणिले २' आकाराचा एकसंधी शिलाफलक आहे आणि त्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे. विष्णूच्या पायापाशी बसलेली लक्ष्मी स्पष्ट दिसत आहे. विष्णूच्या मस्तकामागे शेषनागाचा फणा आणि मूर्ति दिसत आहे. मंदिराच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत राहते त्यामुळे शिल्पावर पाण्याच्या ओघळाचे डाग भरपूर पडलेले आहेत. आम्ही पाहिले त्यावेळी तरी येथे पुरातत्त्व खात्याची सुरक्षित स्थानाची कसलीच वैधानिक सूचना नव्हती.

परतीच्या वाटेवरील अजून एक न विसरलेला अनुभव. आम्ही परतीसाठी सकाळी ९च्या सुमारास खाली गावात उतरलो. गावाकडे जायचा रस्ता शेतांच्या पाळींवरून जात होता. अचानक मला आपल्यासमोरून काहीतरी हलल्याचा भास झाला. उजव्या बाजूस पाहिले तसा एक सुमारे ६ फूट लांबीचा साप शेपटाचा आधार घेत उडया मारत दूर जातांना दिसला. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तो पाळीवर ऊन्ह खात आडवा पडलेला असावा आणि - आमच्या सुदैवाने - आमच्या चाहुलीमुळे सावध होऊन तो आपणहून दूर गेला असावा. तो नाग होता आणि येथे तो अनेकदा दिसतो असे जवळ शेतात काम करणार्‍या एका शेतकर्‍याने सांगितले.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छानच! आता गाडीरस्ता झालाय म्हणे खिंडीपर्यंत. म्हणजे सिंहगड-लोहगड होणार याचा लवकरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्गम भाग जोडले जात असतील तर ते चांगलच आहे की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै कळले. त्या दुर्गम जागी कोणी रहात नसताना तेथील स्वच्छता, आपात्कालीन परिस्थिती हाताळण्याची सोय इत्यादीची तजवीज न करता, ते ठिकाण सीमेवरही नसताना केवळ ते ठिकाण जोडल्याने नक्की काय फायदा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद अरविंदराव. फोटो जपून ठेवलेत इतके वर्षं आणि इथे दिलेत.
खिंडीतला रस्ता कोतूळ ते खुबिफाटा जोडतो. याच देवराईत शेकरू आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख छानच पण खालील वाक्यात 'कुग्राम' ह्या शब्दाचे प्रयोजन समजले नाही.

डॉगराच्या पायथ्याशी खिरेश्वर नावाचे एक कुग्राम आहे.

कुणाकडे ह्याच जागांचे सध्याचे फोटो असतील तर कृपया टाकावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कुग्राम' ह्याचा अर्थ 'वाईट'गाव असा नसून 'छोटे' गाव असा आहे. पहा मोनिअर विल्यम्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा अर्थ ठाऊक नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति

अल्पवयीन ('लहान') मुलगा जन्मणे एक वेळ ('क्वचित') ठीक आहे, पण अल्पवयीन माता होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थ संदर्भ न पाहता केवळ शब्दाला शब्द जोडून होत नाही. वरील श्लोकात 'कु' उपसर्गाचा अर्थ खरोखरच 'वाईट' असा आहे. 'कुपुत्र' म्हणजे 'अल्पवयीन मुलगा' नाही तर 'वाईट मुलगा'. श्लोक सांगतो की 'मुलगा वाईट उपजू शकतो पण माता कधीच वाईट नसते'. प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो काका, ती 'न"बा नी केलेली गंमत होती. त्यांना नक्की खरा अर्थ माहीती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. आता हिशोब केला तर आम्हालाही हरीशचंद्रगडावर जाऊन १६-१७ वर्षे झाली.
आठवणीतला गड नी ही छायाचित्रे यात फार फरक जाणवला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हरिश्चंद्रगडावर जाऊन बरीच वर्षे झाली. शेषशायी विष्णू तेव्हा अंधारात नीट दिसला नव्हता. आता फोटोत चांगला दिसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्र शासनाच्या गझेटीअर विभागाच्या ह्या पानावर हरिश्चन्द्रगडाची बरीच माहिती नोंदविली आहे (पानाच्या जवळजवळ अखेरीकडे) आणि ती सर्व अलीकडची आहे. जिज्ञासूंनी अवश्य पहावी.

अवान्तर - प्रत्यक्ष https://gazetteers.maharashtra.gov.in/ ह्या संस्थळावरून वरच्या पानापर्यंत कसे पोहोचायचे हे कळत नाही. वरच्या URLशी मी अनेक चाळे करून पाहिले पण ते पान प्रत्यक्ष कोठे आहे हे कळू शकले नाही. ते कळले तर ऐतिहासिक स्थळांच्या माहितीचा एक नवा खजिनाच खुला होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://gazetteers.maharashtra.gov.in/ च्या पानावर उजवीकडे Download ebook लिंक बघा.
ती लिंक https://gazetteers.maharashtra.gov.in/download.html इथे जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ह्या पानावरची" महा गैजटीर पीडीएफ काल सर्विस नॉट अॅवलबल येत होती पण आज काम झाले सातशे केबी आहे. चांगली माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0