जॉनी वॉकर!!!

काळ्या स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं. गेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता ‘appreciation mail ‘ येईल. “Weekly Achievers” मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरु राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्ष झरझर त्याच्या डोळ्यांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येउन तो स्थिरावला होता. वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये येउन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आणि या साऱ्याच्या मध्यात आज बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी “appreciation mail” येणार ही गोष्ट सुखावणारी होती.

त्याने डोळे उघडले, आळस झटकला इतक्यात समोरून मॅनेजर आला. म्हणाला चल, कॉफी प्यायला जाऊ. याने कॉफी मग उचलला आणि दोघे कॅफेटेरिया कडे निघाले.

वाफाळत्या कॉफीचा एक घोट घेत मॅनेजरने विचारलं, “नक्की काय करायचंय मग तुला ?” याला काही सुचेना. काही क्षणभर शांतता. “काय करायचंय ते माहीत नाही पण जे करतोय ते करायचं नाहीये आयुष्यभर.” आपोआपच याच्या तोंडून निघालं.

मॅनेजरच्या चेहऱ्यावर किंचित हास्य. “बरं, पण जे करतोयेस त्यात वाईट काय आहे ?” पुन्हा काही क्षण शांतता. “कारण हे सगळं खूप रुटीन आहे. तेच तेच काम, शिफ्ट्स, सामान्य आहे फार. मला काहीतरी वेगळं करायचंय.”

“वाह, छानच !!!” हातातला मग टेबलावर ठेवत मॅनेजर म्हणाला , “छान वाटतंय ऐकायला. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असावीच. खरंय. पण त्याआधी जे सामान्य आहे, रुटीन आहे ते सुद्धा अव्याहतपणे, तक्रारी न करता जमायला हवं. जे काम आपण करतोय ते आवडत नाही की जमत नाही याचा शोध घ्यायला हवा. आवडीचं काम करायला मिळणं हा नशीबाचा भाग असू शकतो पण कामाची आवड जोपासणं आपल्या हातात असतं.”

” ऐकायला बरं वाटतंय , पण ही तर सरळसरळ तडजोड झाली.” याचा सडेतोड प्रश्न आला.

काही क्षण शांततेत गेले मग मॅनेजर म्हणाला, ” कसंय, काही लोकांना आपलं ‘destination , काय आहे याची माहिती असते आणि त्यानुसार ते आपला मार्ग निवडतात. त्यांना आपण असामान्य म्हणतो. काही लोक असे असतात ज्यांना आपलं ‘destination’ माहीत नसतं पण असलेल्या मार्गावर चालत राहणं माहीत असतं आणि चालता चालता त्यांना आपलं ‘destination’ गवसतं. हे लोक अव्याहतपणे चालून आपल्या ‘destination’ पर्यंत पोहोचतात. यांना आपण ‘यशस्वी’ असं म्हणतो. बरेचसे लोक ‘सामान्य’असतात ज्यांना ‘destination’ सुद्धा माहीत नसतं आणि हाती असलेल्या मार्गावर चालायचंही नसतं. आत्ता ह्या घडीला तू सामान्यच आहेस आणि कदाचित आज जो मार्ग तुला रुटीन आणि सामान्य वाटतोय, कदाचित त्याच मार्गावर तुझ्या यशाची बीजं असतील.”

“म्हणजे नक्की मी काय करायला हवं??” याचा प्रश्न. मॅनेजरने कॉफी संपवली आणि जाता जाता हसत हसत म्हणाला,” जॉनी वॉकर!!!”

टेबलावर एकटाच बसून विचार करताना याला आठवलं, “Keep Walking”. चालत रहा. सामान्य ते असामान्य हा खरंतर एक प्रवासच आहे.

– अभिषेक राऊत

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

घर को मै निकला तनहा अकेला, साथ मेरे कौन है यार है मेरा
जो भी करना था कर आगया मै, प्यार कोही मानते चलते जाना...

अपने ही दिलमे बसाये हुये कुछ इरादे है... दिल के कीसी कोने भी कुच ऐसेही वादे है.
इनको लिये जब हम चले... नजारे भी हमसे मिले.
इनको लिये कब तक चले... हजारों मे हम भी मिले....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Smile

नोकरी/व्यवसाय हे पैसे कमवायचे मार्ग आहे.
तुम्हाला जे करायचंय, जे आवडतं त्या क्षेत्रात "नोकरी/व्यवसाय" करू नये असे माझे मत! (यावर अनेक जण असहमत असतील/आहेत याच्याशी सहमत Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अत्यंत सहमत. जे आवडतं, ज्याची पॅशन आहे ते काम ग्राहकांकडून / बॉसकडून / स्वतःकडून पैशाच्या बदल्यात ऑर्डर म्हणून स्वीकारणं आणि टाईमलाईनमधे, त्यांच्या आवडीनुसार टेलरमेड करुन देणं अन हेच रुटीन बनणं यामुळे ती पॅशन उरत नाही हे अनुभवाने समजलं आहे. याचा आल्टर्नेट म्हणजे आपल्या मनासारखं काम आपणच करायचं आणि ते मार्केट करत फिरायचं. हेही पॅशनला मारकच.

त्यापेक्षा मन लावून करता येईल अशा अन्य कामात पैसा उभा करा, आपल्या आवडत्या गोष्टींसाठी पैसा मिळतोय हे कारणच त्या कामात मन लावण्यासाठी पुरेसं असतं..

ज्यातून स्वतःसाठी वेगळा वेळ काढता येईल असं काम करुन त्या वेगळ्या काढलेल्या वेळात पूर्ण स्वतंत्रपणे आपल्या मनाने आपल्या पैशाने, अ‍ॅट ओन टर्म्स आपली आवड एन्जॉय करा.

सर्वात मुख्य म्हणजे, चेज युअर ड्रीम्स बट डोंट बी अ स्लेव्ह ऑफ युअर ड्रीम. हे अनेकांना पटत नाही हेही साहजिकच आहे. जाऊदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याची पॅशन आहे ते काम ग्राहकांकडून / बॉसकडून / स्वतःकडून पैशाच्या बदल्यात ऑर्डर म्हणून स्वीकारणं आणि टाईमलाईनमधे, त्यांच्या आवडीनुसार टेलरमेड करुन देणं अन हेच रुटीन बनणं यामुळे ती पॅशन उरत नाही.

हा मुद्दा रोचक आहे. पॉर्न स्टार्सना लैंगिक सुख अनुभवता येत असेल का याची चर्चा एकदा मित्रांमध्ये झालेली आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फुटबॉलची प्रचंड आवड असणारा एक मुलगा पॉर्न मूव्हींमधे कामे करत असतो आणि बाहेर फुटबॉलचा खेळ चालू असतो त्यात त्याची पॅशन लागलेली असते, मधेच शूटिंगसाठी आत बोलावले की कर्तव्यबुद्धीने तेवढा शॉट देऊन पुन्हा उत्साहाने मैदानाकडे बाहेर पडणे अशा प्रकारचा एक सिनेमा असल्याचं आठवतं. नाव आठवत नाही.

बादवे, पॉर्न स्टार्सना लैंगिक सुख नक्कीच अनुभवता येत असेल. पण कुठे ? कामाच्या ठिकाणी नव्हे. स्वतःची वेगळी वेळ, सुट्टी, वीकेंड, आपली प्रेयसी, आपल्या आवडीची एकांताची जागा, कॅमेरे-रीटेक्सपासून दूर अशी असेल तिथे ते सुख उपभोगता येईल. त्यामुळे लैंगिक सुखाची पॅशन आहे म्हणून पॉर्न स्टारचा जॉब हा ड्रीम जॉब होऊ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित आज जो मार्ग तुला रुटीन आणि सामान्य वाटतोय, कदाचित त्याच मार्गावर तुझ्या यशाची बीजं असतील.” .... ” जॉनी वॉकर!!!”..... “Keep Walking”. चालत रहा. सामान्य ते असामान्य हा खरंतर एक प्रवासच आहे.

स्फुट म्हणून छान आहे, पण हा मुद्दा पटत नाही.

असं किती वेळ चालत राहायचं? कशाच्या भरोशावर? ही श्रद्धा कोणत्या बळावर निभावायाची?

चालचालचालूनही सामान्यच राहिलो तर? "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असा विचार का करायचा?

आणि ऋषिकेशच्या मुद्द्याशी असहमत. पण तो वेगळाच विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत. काम आवडत्या क्षेत्रात असेल तर त्याचा त्रास होत नाही. बाकी पॅशन वगैरे हॅ हॅ हॅ!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा अगदी खरय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कदाचित आज जो मार्ग तुला रुटीन आणि सामान्य वाटतोय, कदाचित त्याच मार्गावर तुझ्या यशाची बीजं असतील.” .... ” जॉनी वॉकर!!!”..... “Keep Walking”. चालत रहा. सामान्य ते असामान्य हा खरंतर एक प्रवासच आहे

बऱ्याचदा असं होतं कि 'मला काहीतरी वेगळं करायचं", "यशस्वी व्हायचं" याच्या अट्टाहासातून जे काम आपण करत आहोत (या स्थितीत त्याला नोकरी म्हणूया) त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे अंती फार काही वेगळंही करता येत नाही आणि रुटीन सुद्धा झेपत नाही. अशा वेळेस कदाचित रुटीन मार्गावर प्रामाणिकपणे आणि मनापासून चालत राहण्यात यश मिळू शकते. असा एक विचार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत

@ पॅशन ... आमच्या मित्रमंडळीत अशी चर्चा होत असते.
मग एखाद्याने जर चित्र काढलं, गिटार वाजवलं, थोडं काही लिहिलं किंवा फोटो काढले तर लगेच त्याला "टॅलेंट है यार! तू फुल टाईम __क्षयज्ञ___ क्यो नही करता?" असं म्हणण्याची फॅशन आहे. (विशेषतः फोटोच्या बाबतीत)

ज्यांना क्षयज्ञ ची आवड असते, ते ऑलरेडी क्षयज्ञ गोष्ट करतच असतात. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, तर तुम्ही ती करत असता- कदाचित पैशासाठी पण बहुतेकवेळा पैशाची अपेक्षा न करता.
ह्याच विषयावर मागी "सुपरमेन ऑफ मालेगाव" सिनेमा आलेला, पाहिलाय का? त्यातले लोक निव्वळ हौसेखातर चित्रपट काढतात आणि सगळे उपद्व्याप करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत. एखाद्या गोष्टीची पॅशन असणे आणि आवड असणे ह्या वेगळया गोष्टी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाणाची आवड असली तरी वृत्तपत्रासाठी ठराविक शब्दमर्यादेत लिहीण्याचा सराव आपल्याला लिहीताना कामी आला आला असं शांता शेळकेंनी लिहीलं आहे. "कोवळी उन्हे" या सदराबद्द्ल नंतर लिहीताना तेंडुलकरांनीही नियमितपणे आणि ठराविक विषयावर सदर लिहीणे याचा लेखक म्हणून उपयोग झाल्याचं म्हटलं आहे.

तेव्हा आवड ही व्यवसाय किंवा नोकरीशी संबधीत असली तर तोटाच होतो असं काही नाही. शेवटी ज्याचा त्याचा दृष्टीकोन.

आवडीसाठी पैसा जमवण्यासाठी काम करतोय या परिस्थितीत माणूस पैश्यासाठी वा नोकरी टिकवण्यासाठी निंदनीय तडजोडी करत असेल अशीही शक्यता असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणतीही गोष्ट बोदर होत नाही तोपर्यंत ती रॉक करते. मग गरज असो अथवा पॅशन... एकदा का बोदरेशन सुरु झाले की ना गरज मजा देते ना पॅशन. तरीही मी स्वतः जे पॅशन आहे तेच करा असेच सुचवेन जर पैसापाण्याची विशेष अडचण नसेल तर. अन्यथा...चाकोरी बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत

आवडली, जो पर्यंत योग्य मार्ग सापडत नाही, थांबण्यापेक्षा आहे त्या मार्गावर चालणे योग्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0