कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज ('हॅप्पी न्यु इयर' स्पेशल)

आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार म्हणून एक न्यु इयर स्पेशल कॉकटेल टाकतो आहे.

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे पान सरप्राईज

पार्श्वभूमी:

ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना एक धमाका कॉकटेल टाकायचे असे ठरवून ठेवले होते. सर्वांना करता येईल असे आणि चवही आपली देशी ओळखीची असावी अशी इच्छा होती. कुठचे कॉकटेल टाकावे असा विचार करत होतोच आणि एक मित्र घरी जेवायला येताना आमच्यासाठी मघई पान घेऊन आला. ते पान खाताना एकदम एक कॉकटेल आठवले. पूर्ण देशी चव असणारे 'पान सरप्राईज'.
31 डिसेंबरला मस्त भरपेट आणि चोपून जेवण झाल्यावर, टीव्हीवर नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम बघता बघता हे डिझर्ट कॉकटेल ट्राय करा आणि तुमचे मत प्रतिसादातून नक्की कळवा. Smile

प्रकार: व्होडका बेस्ड कॉकटेल, डिझर्ट, देशी धमाका

साहित्य:

वोडका 1.5 औस (45 मिली)
कंडेन्स्ड मिल्क 1 औस (30 मिली)
मघई पानं 2
एक कप बर्फ
ब्लेंडर
मोजण्याचा जिगर

ग्लास: – ओल्ड फॅशन्ड

कृती:

ब्लेंडरमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून घ्या. त्यावर वोडका ओता. एक पान त्यात टाका आणि एक पान सजावटीसाठी ठेवून द्या. आता कपभर बर्फ ब्लेंडरमध्ये टाका.

व्यवस्थित ब्लेन्ड करून घ्या. पानाचा पूर्णपणे लगदा होऊन ते मिल्क आणि वोडकामध्ये एकजीव व्हायला हवे. आता हे तयार झालेले कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पान ग्लासच्या कडेला सजावटीसाठी अडकवा.

देशी धमाका 'पान सरप्राईज' तयार आहे:)

सदर कॉकटेल 'द टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल'मधून साभार

सूचना: हे कॉकटेल धमाकेदार होण्यासाठी मघई पानाचा दर्जा फार महत्वाचा आहे. एकदम थंड केलेले पान वापरल्यास आणखीणच मजा येते.

!!! सर्व वाचक मित्रांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!!
!!! Wish you and your family a happy new year !!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सोकाजी तुमचे काँकटेल चांगली असतात
पण माझ्यासारख्या दारू पासून चार हात लांब राहण्याऱ्‍याना काय उपयोग

आमच्यासाठी काहीतरी वेगळ द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पान टाकायची आय्ड्या भारीच. भारतीय चवीची अजून येऊ द्यात. व्हॅनिला वगैरे घातलेली बेलीज छानच लागते पण तीच केशर मसाला वगैरे घालूनही मस्त लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा
(पण अ‍ॅब्सोल्यूट सित्रोन घेतलेली दिसते. लिंबाची चव दुधात बरी लागते का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिट्रोन वापरताना तसे वाटले होते पण चवीत काही कमीजास्त झाले नाही.
पान आणि त्यातला मसाला ह्याची चव खूप तीव्र असल्यामुळे ओके लागले.

माझ्याकडे 'रास्पबेरीही' होती पण त्यादिवशी मित्राने त्याच्या गर्लफ्रेंडवर इंप्रेशन मारायला ती नेली होती Wink
ती वापरल्यास आणखी मजा येईल.

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त! एकदा ट्राय करून पहायला हवे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऍबस्युल्युट रास्पबेरी वापरून ट्राय करून सांगा चव कशी लागते ते.

- (मिक्सॉलॉजीस्ट) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा न्यू यीअर पार्टीला केलं होतं - आपली नेहमीची स्मर्नॉफ वापरून. क्लास आणि लै खास.. मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

- (कॉ़कटेलप्रेमी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच रे सोकाजी! आणि तुलाही हॅपी न्यू इयर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.