अस्तित्व धोक्यात आलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि मी (रुपांतरीत विनोदी कथा)

"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "Unendangered species" या ललीत लेखाचा स्वैर अनुवाद -
.
बरेचदा राहून राहून वाटते की मानवाने , निसर्गाला गुलाम बनविण्यात काही तृटी सोडल्या आहेत. हा आता हे अगदी १००% म्हणता येणार नाही कारण हेच घ्या ना निसर्गावर अधिकार गाजविण्यात काही चांगले निष्पन्न झालेच नाही असे नाही. उदाहरणार्थ saber - toothed वाघ. या प्रजातीचे निर्मूलन झाले हे उत्तमच आहे. मला या प्राण्याचे उच्चाटन झाल्याची खंत अज्जिबात वाटत नाही कारण गरीब हरणाच्या शिकारीस सुसज्ज होउन निघालेल्या शिकार्‍यास या saber - toothed वाघाच्या भीतीने भोवताली पाळत ठेवावी लागत नाही हा केवढा मोठा फायदा आहे. स्व-प्रजातीचे नियमन करण्याचा मानवाचा दुसरा उपाय आहे युद्ध. वा किती कार्यक्षम अन यशस्वी उपाय आहे.
.
अर्थात लहान मोठ्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या म्हणजे - दूत-कबुतरांसारखा उपयुक्त पक्षी जेव्हा धोक्यात आला तेव्हा आपले पूर्वज निव्वळ बघ्याची भूमिका घेउन बसले, काडी हलवली नाही. अजून एक तापदायक गोष्ट ही की जळवा, डास व राजकारणी यांचे निर्मूलन ना पूर्वज करू शकले ना आपल्या हातात आहे. अशा बाबी क्षुल्लक अन दुर्लक्षणीय अजिबातच नाहीत. ते एक असोच.
निवृत्ती नंतर endangered व extinct प्रजातीं कडे विशेष लक्ष पुरवायचे काम मी मनावर घेतले. याचे कारण केवळ हेच की जे अधिकारी या प्रजातीं चा विदा गोळा करतात, राखतात ती ही माणसच की हो. अन त्यांना मदत करणे , त्यांच्या चुका दुरुस्त करणे हे जागरूक नागरिकाचे परम व आद्य कर्तव्य असलेच पाहिजे अशी उपरती मला निवृत्ती नंतर लवकरच झाली. आपण आपल्या परीने या लोकांना विदा द्यावा, अशी इच्छा जागृत झाल्याने मी तत्काळ मनावर घेतले.
.
तुम्हाला वाटले असेल की हे काम तर सोप्पे आहे परत समाजोपयोगी असल्याने , उच्चपदस्थ अधिकारी आनंदले असतील, किमान त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला असेल. पण कसचं महाराजा, हे काम अजिबातच सोपे नाही. आता २ उदाहरणेच देतो ना मग तुम्हीच ठरवा मी बरोबर होतो की ते नाठाळ अधिकारी.
.
परवाच मी "पुणे हरित वनीकरण" खात्याला फोन लावला. मी त्यांना हे सांगितले की आपल्या endangered प्रजातींची यादी मी कसोशीने नजरेखालून घातलेली आहे. अन मला त्यात एक त्रुटी आढळली आहे. ती म्हणजे "सुतार" पक्षी या यादीत नाही. तो तेवढा घाला. यावर माझे कौतुक करण्याचे सोडून, त्या फोनवरच्या माणसाने मलाच गंभीरपणे सांगितले की - "सुतार पक्षी हा endangered तर नाहीच उलट या पक्ष्याच्या हजारो जोड्या ही प्रजाती चालविण्यास अविरत कार्यरत आहेत." हे ऐकून मलाच प्रश्न पडला की हा अधिकारी मला काय मूर्ख समजतो काय? मग मी उलटून त्यांनाच उदाहरण दिले की हे पहा रोज भल्या पहाटे ६ वाजता एक सुतार येउन आमच्या बंगल्याच्या पत्र्याच्या पाइपवरतॆ ट्ण्ण टण्ण टणत्कार करत बसतो अन माझी रोज झोपमोड होतेय. आता जर माझी सटकली ना तर मी माझी छर्याची रायफल घेउन अंगणात जाईन अन हा पक्षी endangered वरून एकदम extinct होउन जाइल. यावर तो अधिकारी एकदम गप्पच बसला, त्याला काय बोलावे तेच कळेना अन मग आमचा वाद बराच वेळ असाच चालू राहिला व शेवटी तो अधिकारी काकुळतीला येउन म्हणाला "अहो भाउसाहेब, सुतार पक्षी endangered नाहीये हो." मी शेवटी त्याचा नाद सोडला हां आता extinct होण्याआधी त्या सुताराला पूर्वसूचना देणे मी माझे कर्तव्य समजत होतो अन मी ते बजावले होते.
.
हे असे उच्चपदस्थ लोक जेव्हा तर्कविसंगत वागून त्यांचे निर्णय सामान्य जनांवर लादतात ना तेव्हा खरं तर उठावाच व्हायला हवा. पण असो मी माझ्या परीने प्रयत्न चालूच ठेवला. या अनुभवानंतर मी ताबडतोब "पुणे हरित वनीकरणा" विभागाच्या ३ याद्या मागविल्या - unendangered , endangered अन extinct . त्यांचा अभ्यास करताना मला लक्षात आले की या कोणत्याही यादीत "चिंबुल" पक्षी नाही. मग मी ताबडतोब फोन उचलला अन नेमका त्याच अधिकार्याने फोन उचलला. त्यालाही मी चांगला लक्षात होतो. मी त्याला म्हटले "अहो काय हे तुमच्या तीनही यादीत "चिंबुल" पक्षी कसा नाही? हा फार ओळखीचा पक्षी असून तो कोणत्या ना कोणत्या यादीत असायलाच पाहिजे होता. यावर त्या अधिकार्‍याने मला निर्वाळा दिला की "जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी-घरी-बाहेर-आकाशात-पाण्यात-जमिनीवर ...... कोठेही असा पक्षी नाही. ना त्याने पाहिला आहे, ना ऐकला, ना वास घेतला, ना चव घेतली आहे."
"अरे काय हे! हेच्च अगदी हेच्च वर्णन मी "रात्री मारल्यानंतर , सकाळी येणार्‍या Hangover बद्दल म्हणू शकतो की. पण म्हणजे Hangover नसतो का?" यावर तो अधिकारी निरुत्तर अधिक हतबल झाला. एकदा तो गप्पा झाल्यावर मी त्याला सांगितले "काय्ये ना या पक्षाचे डोके असते शेपटीला अन शेपूट असते डोक्याला त्यामुळे तो उलटा उडतोय असे वाटते. मग त्यामुळे कोणीही शिकारी त्याची शिकार करू शकत नाही. अन फार चपळ पक्षी हो एकदम वेगाने उडून जातो की फ़ोटोत येणेही अशक्य. त्यामुळेच उघड आहे ना की ना फ़ोटोत ना भुस्सा भरलेला कोणीही हा पक्षी असा स्पर्श करून पाहिलेला नाही. पण एक सांगता येईल की याची मादी दिसते अगदी चिमणी सारखी अन नर दिसतो अगदी बुलबुलच जणू. यावर तो अधिकारी चक्रावला. मला अधिकच जोर चढला. तो विचारता झाला तुम्ही कुठे पाहिलात हा?
त्यावर मी उत्तरलो "छे छे मी कुठला पहायला बंडूने पाहीला. एकदा नाही तब्बल १२ वेळा. अहो पाषाण तलावापाशी बंडू अन मी असेच शिकारीस गेलो असताना बंड्याने ११ ते १२ वेळा हा पक्षी पाहिला. अन बंडू खोटं बोलणार नाही किंबहुना बंडू च्या प्रामाणिकपणाबद्दल ब्रह्मदेवही संशय घेणार नाही. तरी मी बंडूला म्हटले की अरे तू चिमणी किंवा बुलबुल मारताना १२ वेळा नेम चुकलास का? तर बंडू म्हणाला असा कसा नेम चुकेल तो? तेही खरय म्हणा बंडू एकदम आमच्या ग्रुपमधला नामवंत शिकारी आहे. तो नेम चुकणे केवळ अशक्य आहे. बंडू ठासून म्हणाला की तो पक्षी १२ वेळाही "चिंबुल" च होता. अन मागे मागे उडत असल्याने त्याच्यासारख्या निष्णात शिकार्‍या नेम चुकला. बंडू जे बोलतो त्यावर वाद घालायची आपली टाप नाही. त्यामुळे माझी तरी खात्री आहे की "चिंबुल" पक्षी आहे. अन तुम्ही तो कोणत्या ना कोणत्या यादीत घातलाच पाहिजे.
.
पुढे बर्‍याच दिवसांनी गप्पा मारताना आमच्या गृपमध्ये मला कोणीतरी सांगीतले की "पुणे हरित वनीकरण" अधिकार्‍यांनी म्हणे पुण्यातील पेन्शनर्स चा धसका घेतला आहे. खर्‍याची दुनियाच नाही राहीली.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

ROFL

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुस्तक परत एकदा वाचते आहे. काही नजरचूकीने राहून गेलेले बारकावे तर काही वाचायचे राहून गेलेले ललीत लेख वाचताना अ-व-र्ण-नि-य आनंद मिळतो आहे. हाडाचे शिकारी त्यांच्या छंदाबद्दल किती passionate असतात ते वाचूनच एकदम काटा येतो अंगावर. हे लोक निसर्ग वेगळ्या रीतीने अनुभवतात. त्यांचं निसर्गाशी नातं खूप जवळचं असतं. अन शिकार एक गोष्ट झाली पण "Journey is as important as destination" या न्यायाने, हे लोक कितीतरी शिकारीशी अवांतर, निगडीत अनुभव समरसून घेतात. रुचिने कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, त्यांचे विश्व , त्या विश्वातील hierarchy , स्नेहसंबंध, जय-पराजय आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा केवढे वेगळे असतात.
.
EXCELLENT पुस्तक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ऋ व अनुप दोघे नेहमी प्रोत्साहन देतात. त्यांची आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हा हा हा ROFL
पुण्यातील पेन्शनर Wink
मस्त झालंय लोकलायझेशन. अगदी ओघवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिंकू अगदी अगदी ....हा पुणेरी पेन्शनर टाइप यांच्याकडेही (अमेरीकन्स) असतो हे वाचूनच माझी वैश्विक भावना परत बळावली.
___

आमचं सुपिरीअर अक्षरक्षः लहानसं गाव आहे. आता पुण्यात कसं बादशाही आहे ना तसं लोकल "Erbert-Gerbert" इथे आहे.
अगदी, सगळ्यांना सगळे माहीत असतात. एक विनोदी वाक्य ऐकलेलं - "The nice part about living in a small town is that when you don't know what you are doing someone else does" ROFL
इथे बस ड्रायव्हर बरोबर लोक जोरजोरात गफ्फा हाणत असतात अन त्या अशा बरं का - ड्रायव्हर म्हणतो "पीट गेला" मग लगेच कोणला तरी कळतं कोण पीट वगैरे अन तो उद्गारतो- "अरे काय संगतो केव्हा गेला तो? परवाच त्याला नाक्यावर पाहीलेला." ROFL अन मग सुरु होतं संभाषण ती गाडी एकदम आपल्या गावगप्पांसारखी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हे बघा शुचि.ताई त्या तुमच्या वैश्वीक भावना वगैरे ठीक आहे पण ब्रह्मांडाला एकच केंद्रस्थान असते ते विसरु नका Wink

The nice part about living in a small town is that when you don't know what you are doing someone else does. >> अगदी अगदी. मिस मार्पलच्या कथा आठवल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile पूर्वी मला तसच वाटे टिंकूमॅडम पण बॅट्या अन गब्बरने, अनुक्रमे मिरज व कर्‍हाड चे गुण गाऊन माझं मत बदलून टाकलय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ब्रम्हांडाच्या केंद्रस्थानाविषयीचे मत बदलण्याची बदमाषी केल्याबद्दल सदर सदस्येस कडक शब्दात जाहीर समज देण्यात येत आहे.
मत परत पूर्वीसारखे न केल्यास त्यांना आपल्या घरी १०० सुतार पक्षी पाळण्याची शिक्षा देण्यात येईल.
-हुकमावरून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपांतर आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्व प्रतिसादकांचे तसेच वाचकांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down